सामाजिक

मराठी संस्थळांवर व्यनी किती सुरक्षित? (रिंगिंग द बेल)

Taxonomy upgrade extras: 

आज एका संस्थळावर मी एका घटनेचा साक्षीदार होतो. ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली. एरवी मी प्रशासनाकडे तक्रार केली असती मात्र या घटनेआधी काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे सर्वांना सावध करणे मी माझे कर्तव्य समजतो. यात मला एका संकेतस्थळावर काही खरडवह्यांमध्ये इतरांसोबत, खुद्द माझ्या व्यक्तीगत निरोपांची यादी प्रकाशित झालेली दिसली. मी प्रशासनाकडे तक्रार करे पर्यंत ती उडालेली असली तरी मी त्यापैकी खरडीत प्रकाशित झालेल्या काही यादीचे स्क्रीन शॉट घेऊन ठेवले आहेत. याचा अर्थ किमान माझे खाते 'कोणीतरी' हॅक केले होते व माझ्या व्यनीची यादी मिळवली होती.

आपण कुठे अन ते कुठे - मराठी कविता

Taxonomy upgrade extras: 

नमस्कार.

'आपण कुठे आणि ते कुठे' अशा शीर्षकाचा चर्चाविषय मांडताना धाकधूक आहे कारण तितकेसे शास्त्रीय अथवा अभ्यासक्रमात असते त्याप्रमाणे ज्ञान मिळवलेले नसल्याने ही मते केवळ एक 'फीलिंग' ठरेल आणि वास्तव वेगळेच असल्याचे निदर्शनास येईल आणि त्यातून आपले हसे होऊ शकेल असे वाटत आहे.

तरीही, विस्ताराचे भय असूनही हे लिहावेसे वाटत आहे की उर्दू काव्य, मराठी काव्य व हिंदी चित्रपट गीतांचा प्रवास याची काही प्रमाणात जमेल तशी ओळख करून घेतल्यानंतर हा विषय मांडत आहे.

===========================

झांशीची राणी!

Taxonomy upgrade extras: 

आजकाल मानसीचा दुपारचा वेळ फारच चांगल्या प्रकारे जात होता. मस्त जेवण, (अधून मधून चायनीज), थोडीशी वामकुक्षी, सटर फटर वाचन, व नंतर 42 इंची फ्लॅट स्क्रीनसमोर बसून आलटून पालटून दोन - तीन टीव्ही चॅनेल्सवरील पुनर्जन्मावरील मालिका बघणे यात वेळ कसा भुर्रकन उडून जात होता याची ती कल्पना करू शकत नव्हती. पोटात मूल वाढत असल्यामुळे डॉक्टरानी सक्तीच्या विश्रांतीची शिक्षा सुनावली होती. 12-15 तास (तेही ऑफिसचे काम न करता!) कसा घालवावा याची तिला पहिल्या पहिल्यांदा धास्ती होती. परंतु या टीव्ही सिरियल्सने तिचा प्रश्न चुटकीसरशी मिटवला. कुतूहल म्हणून मानसी या मालिका पाहू लागली. व त्या तिला चक्क आवडू लागल्या.

अपशब्द

Taxonomy upgrade extras: 

पुस्तकांच्या दुकानात 'रूड फ्रेंच' नावाचं पुस्तक दिसलं. त्याची प्रस्तावना वाचली आणि रहावलं नाही. लेखकांच्या परवानगीशिवाय प्रस्तावनेचं (अगदी शब्दशः नसलेलं, माझ्या शब्दांतलं) भाषांतर आणि इतर काही लिहीत आहे:

पाणिनी नेमका कोण, कुठला व कधीचा?

Taxonomy upgrade extras: 

पाणिनी हा अभिजात संस्कृतचा पहिला व श्रेष्ठ व्याकरणकार मानला जातो. हा नेमका कोणत्या काळात झाला याबाबत मतभेद आहेत. एवढेच नव्हे तर पाणिनी हे गोत्रनाम आहे कि व्यक्तिनाम याबाबतही विद्वानांमद्धे एकमत नाही. बौधायनाच्या मते पाणिनी हे गोत्रनाम असावे. परंतु भट्टोजी दीक्षित यांच्या मते "पणीचे पुरुष अपत्य तो पाणिन तर त्याचा नातु तो पाणिनी." पाणिनीला वाहिक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशाही संद्न्या आहेत. यावरुन पाणिनी हा वाहिक या गांधार देशातील प्रदेशात रहात होता व शालातुरीय हे नांव त्याच्या गांवावरुन पडले असावे असाही अंदाज आहे.

खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?

Taxonomy upgrade extras: 

यावज्जीव मनुष्य प्रयत्न करत असतो तो आहे या स्थितीपासून स्वातंत्र्य मिळवत अधिकाधिक मानसिक/आर्थिक आणि सत्तेचे अधिकाधिक अवकाश प्राप्त करण्यासाठी. आहे ती स्थिती सुखावह न वाटणे हे मानवी मनाचे एक व्यवछेदक लक्षण आहे. मग ती स्थीती कोणतीही असो. एकपट धन असणारा दुप्पट धनाची अपेक्षा बाळगत असतो हे पुरातन औपनिषदिक विधान या परिप्रेक्षात ध्यानात घ्यावे लागते. याला "हाव" हा शब्द पुरेसा नसून तो मानवी मनोभुमिकेवर अन्याय करणारा आहे.

चित्रपटातले प्रथम "हट के"

Taxonomy upgrade extras: 

भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ऐसी अक्षरेवर झालेला "सोहळा" फार मोठा दिमाखदार नसला तरी आवडला. त्यानिमित्ताने कोणत्या चित्रपटात सर्वप्रथम काही वेगळं झाल्याच्या नोंदी आहेत का हे शोधत होतो. काही सापडले, काही सापडले नाहीत. पण अशी एक संपूर्ण यादी बनवावी असे वाटते. विशेषतः इंटरनेट आणि आय.एम.डी.बी.च्या आधीच्या जमान्यातल्या चित्रपटांची माहिती चार लोकांशी बोलल्याशिवाय जमा होणार नाही.

फ्युचर शॉक!

Taxonomy upgrade extras: 

"ढीपू, काय आश्चर्य! किती वर्षानी भेटत आहेस.... वीस वर्ष तरी झाले असतील... कॉलेजमध्ये असताना... हे काय तुझ्या हातात पिस्तूल...?"

"मी तुला ठार मारण्यासाठी आलोय." ढीपूचे उत्तर, "तेही तुझ्याच लेखी संमतीने.."

"तू काय बोलतोस, कशाबद्दल बोलतोस... काही समजत नाही."

"तुला आठवत नाही का कॉलेजच्या हॉस्टेलवर गप्पा मारत असताना शंभर वेळा तरी तू बोलला असशील... मी कधीतरी कम्युनिस्ट पक्ष सोडून दुसर्‍या कुठल्याही पक्षात गेल्यास गोळी घालून मला ठार करा. आज तू तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहेस. पक्ष बदललास. तुझी तत्वनिष्ठा ढासळली. त्यामुळे तुला आता मरावे लागेल."

मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक

Taxonomy upgrade extras: 

मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते
म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले.

इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी
कार्यक्रम होत असतात.
या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात.
लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात.
प्रचंड संख्येने हजर असतात.

मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात. स्मरणशक्ती अफाट आहे.

अध्याय नं १६ श्लोक नं १९ असे उल्लेख धडाधड येतात.

बिग् बॉस

Taxonomy upgrade extras: 

बिग् बॉस या टीव्हीवर भरपूर टी आर पी कमावणाऱ्या रियालिटी शोला अलिकडे उतरंडीची कळा लागली होती. प्रेक्षकांनी व जाहिरातदारांनी या शोकडे पाठ फिरवली होती. कदाचित आमची माती आमची माणसं याची टी आर पी सुद्धा तुलनेने बरी असू शकेल. सुरुवातीला टीव्ही प्रेक्षकातील आंबटशौकीनांना बिग् बॉसच्या 'त्या बंगल्या'तील चार भिंतींच्या आड नेमके काय घडत आहे याची उत्सुकता होती. एपिसोड एडिटर त्याचा पुरेपूर फायदा घेत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होता. बिग् बॉसला न जुमानता त्याच्याही नजरेआड अनेक गोष्टी घडत असाव्यात. परंतु त्या दाखवल्या जात नाहीत याबद्दल प्रेक्षक नाराज होते.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक