सामाजिक

समाजसेवकांमुळे समाजाचा नक्की कोणता फायदा होतो?

Taxonomy upgrade extras: 

अखेर या लेखनातील या प्रतिक्रियेचा आवाका, वेगळी विस्ताराने चर्चा करण्याइतका मोठा वाटल्याने वेगळा धागा काढत आहोत. -- संपादक

या लेखनावरून आणि इतरही चर्चांमधून एक मूलभूत प्रश्न मला पडला आहे. त्यावर वेगळी चर्चा झाली तरी चालेल.
तो प्रश्न असा की - "समाजसेवकांमुळे समाजाचा नक्की कोणता फायदा होतो?"

या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. हा प्रश्न मी कोणतीही भूमिका घेऊन किंवा कसल्याही अभिनिविशाने करत नाही.
त्याला आजच्या काळाचाही पदर आहे. समाजसेवा ही आता पदरमोड करून करायची गोष्ट राहिलेली नाही.

विनोद हा भेदक सत्यकथनासाठी खरंच परिणामकारक फॉर्मॅट आहे का?

Taxonomy upgrade extras: 

सुरुवातीलाच महत्वाचं.

विनोद हा विनोद म्हणून म्हणजेच निव्वळ हसवण्यासाठी केला की शोभून दिसतो हे सर्वांनाच मान्य असावं.
तस्मात, विनोद या लेखनपद्धतीबद्दल जनरलाईझ्ड मत असण्याचं कारणच नाही. चार घटका हसून आपल्या जगण्यात आनंदच भरतो आणि त्याबद्दल सरळसोट प्रकारच्या विनोदाचे आभारच मानले पाहिजेत.

मी पुलंना वाचत, ऐकत मोठा झालो. अन्य खूप जणांचं लिखाण वाचण्यात आलं पण पुलं हे सर्वात प्रसिद्ध उदाहरण घेऊन माझा प्रश्न मला पुढे ठेवायचा आहे.

वाचनसंस्कृती बद्द्ल श्री. राम जगताप यांचा लेख

Taxonomy upgrade extras: 

श्री. राम जगताप यांच्या ब्लॉगचा (http://ramjagtap.blogspot.in/) उल्लेख मी आधीही एका लेखात केलेला आहे. लेखन/वाचन संदर्भातले, मराठीतली नवनवीन चांगली पुस्तकं , या संदर्भातली जगतापांची मतं, त्यांचे विचार या सार्‍याचं प्रतिबिंब त्यात पडत असतं.

प्रस्तुत लेखाचं कारण म्हणजे जगतापांचा वाचनसंस्कृतीबद्दलचा अलिकडचा लेख. लेखाचा दुवा : http://ramjagtap.blogspot.in/2012/04/blog-post_22.html.

याबाबत आपले मत व्यक्त करू शकता...

Taxonomy upgrade extras: 

जशी एखादी छोटीशी वेल एका विशाल वृक्षावर अतीव विश्वासाने नि:संकोचपणे वेटोळे घालते अगदी तसेच जर एखाद्या मानवाच्या अंगा-खांद्यावर त्याच्या नातेवाईकांचे बाळ आपलेपणाच्या प्रेमाने बागडत असताना त्याला त्याबद्दल स्वत:च्या बाळाइतकेच प्रेम, ममता वाटून हे आपलेच मूल आहे हीच भावना सदैव मनी वावरत असेल आणि आपत्य प्रेम मिळून, माया ममता पुरेपूर देता येत असेल तरीही मग त्या बाळाला दत्तक घ्यायचे म्हणजे नेमके अजून काय साधायचे?
(माझ्या येणा-या पुस्तकातील संदर्भा वरून)

एक्स्पायरी डेट

Taxonomy upgrade extras: 

आपल्याला मृत्यू गाठण्यापूर्वी कुठल्या कुठल्या अनुभवांची शिदोरी जमवावी?

रहस्य कशात असतं?

Taxonomy upgrade extras: 

अाज एक अनपेक्षित अनुभव अाला. टेलिव्हिजनवर मी टेनिस मॅचेस अनेकदा बघतो. २२ एप्रिलला मोनॅकोमध्ये दुपारी दोन वाजता Monte-Carlo Rolex Masters या स्पर्धेची final match राफाएल नदाल अाणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यामध्ये होती. मोनॅको इथल्या (म्हणजे विनिपेगच्या) सात तास पुढे असल्यामुळे मॅच सकाळी होऊन गेली, पण ती तेव्हा इथे टेलिव्हिजनवर live दाखवलेली नव्हती. पण त्याच मॅचचं रॅकॉर्डिंग इथल्या संध्याकाळी सात वाजता टेलिव्हिजनवर दाखवणार होते, ते मी पाहिलं.

पोलिसांची सर्वसामान्यांना भीती का वाटते?

Taxonomy upgrade extras: 

आत्ताच ई-सकाळ वर ही बातमी वाचली.

या बातमी मुळे मनात एक प्रश्न आला त्यावर विचारमंथन व्हावे असे वाटले म्हणून हा धागा.
'मण्णपुरम् गोल्ड'च्या कार्यालयातून चोरीस गेलेले साडेसतरा किलो सोन्याचे दागिने पुणे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह पकडले.
या चोरीतील दगिन्यांची व रोख अशी किंमत जवळपास तीन कोटी 39 लाख 14 हजार रुपये होती.

केवळ २४ तासांत पुणे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणून 'मण्णपुरम् गोल्ड' च्या सहाय्यक व्यवस्थापकासह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.

मुलांना आंतरजालावरील ‘कु’ स्थळांपासून कसे वाचवावे ?

Taxonomy upgrade extras: 

आजकाल सर्व क्षेत्रत प्रभाव पाडणारे आंतरजाल शालेय जगतातही पोचले आहे. आंतरजाल हे माहिती तंत्रज्ञानाचे प्रभावी साधन असल्याने ते कुठे न पोचले असले तरच नवल. त्यातून शाळा म्हणजे ज्ञान अन माहितीची अधिष्ठाने ! तेव्हा इतर कुठल्याही साधनांपेक्षा आंतरजाल हे अत्यंत प्रभावी शैक्षणिक साधन ठरू शकेल.

दुर्बोधता

Taxonomy upgrade extras: 

मला जे लिहायचं अाहे त्यासाठी वेगळा धागा काढणं श्रेयस्कर वाटलं. ग्रेस 'दुर्बोध' होते की नव्हते यावर जो काथ्याकूट झाला, त्यात मला अाणखी भर घालायची नाही. पण 'ग्रेस सर्वसाधारणपणे दुर्बोध समजले जात होते' यावर फारसं दुमत होऊ नये.

आय आय टी रामैय्या

Taxonomy upgrade extras: 

पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक