'पल भर के लिये कोई मुझे प्यार कर ले...'

काल लई वर्षांनी टीव्हीचा रिमोट हातात मिळाला. सर्फता सर्फता ’दिल है के मानता नही’ दिसलं. थांबले.

त्यात शेवटच्या कडव्यापूर्वी पूजा भट आणि आमीर खानचा बागेतला प्रसंग आहे. कलिंगड खातानाचा प्रसंग. आमीर ते कलिंगड तस्सं एका बुक्कीत फोडून खातो आहे. पूजा भट त्याच्याकडे पाहतेय. तो तंद्रीत कलिंगडात मग्न. त्याच्या गालावर चिकटलेली बी. न राहवून पूजा भट ती बी काढते आणि मग - स्वप्नातून जागी होते. मग जाते नि तिरीमिरीत कलिंगड हिसकावून घेते! आमीर बिचारा एकदा घेऊ बघतो, नाही. दुसर्‍यांदा घेऊ बघतो, नाहीच देत. मग फिस्कारून हात उडवतो नि जातो झोपायला. ’डोण्ट टच मी!’ची पाटी लावून. काय फणकारा! अविश्वासानं बघत राहिलेली पूजा भट.

आख्खं गाणं बघितलं नि मग माझ्या लक्षात आलं, गाण्याचं चित्रीकरण किती काळ लक्षात राहिलं होतं ते.

मग अशीच गाणी आठवत गेली. एरवी कवायतीमास्टर नाहीतर पडदेमास्टर असलेल्या शामक दावरच्या नृत्यदिग्दर्शनाखालचं ’दिल तो पागल है’मधल शाहरुख-माधुरीचं एक गाणं आठवतंय? शाहरुख आणि माधुरीची एक जोडी कथानकातल्या वास्तवातली. एक जोडी त्या जोडीला न्याहाळणारी. पहिली जोडी भांडतेय, दुसरी त्या भांडणातली गोडी जाणवून मनापासून खुशाललेली. पहिली जोडी एकमेकांच्या पानातलं पळवून खाण्यात मग्न, दुसरी प्रेमभरानं त्यांना न्याहाळणारी. ते पाहून मला तेव्हा ’चार दिवस प्रेमाचे’ नामक मराठी नाटकातल्या नायक+नायकाचं मन आणि नायिका+नायिकेचं मन अशा अशक्य चलाख क्लृप्तीची आठवण झाली होती.

तुम्हांला आवडतात - आठवतात अशी गाणी निव्वळ चित्रीकरणामुळे लक्षात राहिलेली? असणारच.

गुरुवर्य विजय आनंद यांच्या सिनेमातली बहुतेक गाणी त्यात हजेरी लावून जातील. खिडक्या-फेम 'पलभर के लिये...'त्यात असेलच. ग्लासात बर्फाचा तुकडा टाकल्यावर गारठलेली नूतन असलेलं ’इक घर बनाउंगा तेरे घर के सामने’ही नक्की असेल. काही केवळ थोर मुद्राभिनयामुळे अजरामर झालेली निघतील. ’जाती हूं मै, जल्दी है क्या’सारखी काही निव्वळ आचरट नि बीभत्स नाचामुळे लक्षात राहिलेली असतील. हिरवा-हिरविणींनी एकमेकांना खुन्नस देत म्हटलेली अनेक पार्टी-सॉंग्स असतील. काहींशी तुमच्या एखाद्या खास आठवणीचा धागा जुळलेला असेल...

सांगा ना, तुम्हांला कुठली गाणी चित्रीकरणामुळे आवडतात-आठवतात, नि त्यांत काय आहे असं विशेष?

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

रोचक धागा! विचार करून लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आँखोमे तुम , दिल मे तुम हो, तुम्हारी मर्झी, मानो के ना मानो
https://www.youtube.com/watch?v=zAhFP43X5fE
.
प्रचंड आवडतं ते मधुबालाने किशोरकुमारच्या गळ्यात फासा टाकून त्याला नाचवल्यामुळे.
अन किशोरचा आचरटपणा अन वाह्यातपणा तर .... उफ्फ्फ!! कमाल.
_____

https://www.youtube.com/watch?v=GbVKW_gzZEc
मै बंगाली छोकरा करु प्यारको नमष्कारम ....
त्यातल्या घसरगुंडीच्या क्षणामुळे आवडतं.
______________
"जिस देशमे गंगा बेहेती है" - सर्व गाणी आवडतात. कधी पद्मिनीच्या नितंबांवर कोसळणार्‍या धबधब्यामुळे, कधी तिने तिच्या गच्च अन अर्ध-अनावृत्त पाठीवर घुंगरु छन-छन वाजविल्याने.
पद्मिनी सुंदर आणि एकदम उफाड्याची दिसते.
_________
धागा एकदम झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उफाड्याची हा शब्द स्तुतिपर नाही. टाळत चला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गप्प बसायचे ठरवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हो अ.जो.बा

कायम स्तुतिपरच का बुवा?

हां.. काही अपमानास्पद अर्थ असेल तर मग मात्र टाळले पाहिजे.

भाषाषास्त्री काय म्हणतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा अगदी अगदी सुंदर अन एरॉटीक च्या मधे मादक अन गच्च असं म्हणायचय मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. 'उफाड्याची' हा अगदी सुंदर चपखल शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पद्मिनी कोण आहे? कोणी देवी वगैरे आहे का? सांस्कॄतिक पोलीस मेले. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खेळ कुणाला दैवाचा कळला.. तू असो, मी असो, हा असो, कुणी असो..

www.youtube.com/watch?v=bUjwnoWxwd4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्नथिल मुथमित्तल या तमिळ चित्रपटातलं 'नेंजिल जिल जिल' हे गाणं निव्वळ चित्रीकरणामुळंही खूपच आवडतं. कुठंही पाऊस, धबधबा असं काही दिसलं की हे गाणं आठवतं. चित्रपटातील कथा श्रीलंकेतील वांशिक युद्धाच्या दरम्यान घडते. तमिळ विस्थापितांचं रखरखीत जीवन, वांशिक युद्धाची हिंसा वगैरेच्या पार्श्वभूमीवर गाण्यात दिसणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती, धबधबा-पाऊस-धुकं असा ओलावा खूप छान विरोधी प्रतिकात्मक वाटतो. ( [दत्तक] मुलीची समजूत काढण्यासाठी गायलेल्या गाण्याचे शब्दही छान आहेत. रहमानचं संगीत १ नंबर.)

www.youtube.com/watch?v=16AWPWkbzhc

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा पूर्ण पिच्चरच अतीसुंदर आहे. लहान मुले असलेल्या कुटुंबाचे जे चित्रण यात आहे त्याला तोड नाही. खर्‍या अर्थाने अकृत्रिम अभिनय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हे वाचून विजय आनंद च्या 'तेरे मेरे सपने' मधलं 'मैने कसम ली' हे मुमताज देव आनंद यांच सायकल वरचं गाणं आठवलं. त्यात मुमताजचा देव आनंद ला मारायचा लटका अभिनय लाजबाब आहे.
रुतिक रोशन च्या 'लक्ष्य' मधल्या 'अगर मै कहू' ह्या गाण्याचं पिक्चरायजेशन पण आवडतं. रुत्विक रोशन ने त्यात मस्त इनोसंट एक्स्प्रेशन्स दिली आहेत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जीवन की बगिया" ला अनुल्लेखाने मारण्याचा तुमचा डाव आमच्या लक्षात आलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

"या गाण्याचं पिक्चरायझेशन बघ" असं व्ही. शांताराम यांनी रंजनाला रेकमेंड केलं होतं असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरफरोशचं शीर्षकगीत - जिंदगी मौत ना बन जाए सम्हालो यारों...

शस्त्रांच्या तस्करीची सगळी (प्याकिंगपासून डिस्ट्रिब्यूशनपर्यंत) सप्लाय चेन गाण्यात दाखवली आहे. आणि त्याचे संदर्भ आख्ख्या चित्रपटभर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हॉय! शीर्षकगीतावरून आठवलं. बडजात्यांच्या सगळ्या सिनेमांना शीर्षकगीताचं निराळं चित्रीकरण असतं. पण 'हम आप के' सोडता बाकी सगळी एकजात निष्प्रभ. फुकट दवडलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ताज्या हवेच्या प्रसन्न झुळुकीसारखी असलेली दोन गाणी मला ऐकायला आणि बघायला आवडतात. एक आहे गजनी सिनेमातलं ' बेहेका मै बेहेका' आणि दुसरं आहे,जब वि मेट मधलं 'ये इश्क हाये बैठे बिठाये जन्नत दिखाये'. दोन्ही गाण्याच्या कोरिओग्राफीत व्हल्गर किंवा उत्तानपणाचा अभाव असल्याने ,साध्याच लोभस नृत्याने, सुमधुर संगीताने ती संमोहित करतात.
गजनी सिनेमातले माझ्यासाठी एकमेव आकर्षण असलेलं ,एकदम रसरशीत, चटकदार रंगांच्या उधळणित चित्रीत झालेलं हे अत्याधुनिक गीत हळुवार,धुंद आहे.लोकेशन्स आणि छायाचित्रण अफलातून आहे.गुलबक्षी कपडे घातलेला आमीर गुलबक्षी रंगाच्या गाडीवरून अलगद घसरून असीन कडे खेचल्या जाताना गात असतो ……
बेहका मै बेहका
वो बेहकी हवासी आयी
एकही नजरमे सब मंजिल वंजील पायी
हटके अलगसी थी
बिलकुल जुदासी
न कोई अदाए न कोई अंगडाई
उत्फुल्ल ,उत्तेजित हवेच्या झुळुकिसारखी ती आली, मी उत्तेजित झालो.तिच्या एका नजरेतच माझी मंजिल मिळाली .ती निराळीच आहे,नखरे नाहीत की अदाए ...................
असिन या नायिकेत निराळीच जादू आहे. निर्मळ ,उत्फुल्ल आनंदाचे झाडच जणू .या गाण्यात असिनच्या एका तिरप्या कटाक्षाने मोहित झालेल्या आमिरच्या विविध रंगरुपाताल्या सहा प्रतिमा एकाच वेळी संमोहित होउन,हवेच्या झुळुकिगत हेलकावत, लहरत ,लयबद्ध नृत्य करतात .झुमू झुमुक झुमाझुम म्हणणारा फंकी वेशभूषेतला आमीर त्याच्या चेहेऱ्यावर कोवळिक दिसत नसूनही निरागस प्रेमी दिसतो.
उसका चलना ,ऋतूए बदलना
झुठ भी उसके सच्चे लगे ,अच्छे लगे, सच से भी बडे लगे
राह में उसकी , हाथ बांधे , पलके बिछाये हुए,
सर को झुकाये हुए ,खुशबुओसे छाये हुए ,
टकटकी लगाए हुए , बैठे रहे साथ साथ कितने सारे मौसम खडे रहे ……….
संमोहित ,लुब्ध झाल्याचे इतके उत्कट ,विलोभनीय भाव आमिरच्या चेहेऱ्यावर उमटतात की मार डाला .
( गायक : कार्तिक, गीत : प्रसून जोशी, संगीत : ए. आर . रेहमान )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

च्यायला! सखूबाई, चुकलं माझं धागा काढून. मापी द्या एक डाव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गोल गोल पायर्‍या उतरत उतरत (कुतुब मिनार?) प्रेमाच्या पायर्‍या सांगणारं? Wink कॅमेरा अँगल्स, उतरणे आणि चेहर्‍यावरचे हावभाव लक्षात राहणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला सुद्धा हेच गाणं प्रथम सुचलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नूतन मोलकरणीसारखी दिसते असं कोणीतरी (खरं तर परा ने) लिहीलेले वाचून .... चपखल वर्णन सापडल्याचा आनंद जाहला. तदुपरी तिचे कोणतेही गाणे आवडत नाही. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरीच आहेत.. तेव्हा आठवेल तशी अ‍ॅडकवत जातोय. आणि क्रमशः असं काही नाही..
सुरूवात जरा रोम्यांटिक असावी..
१. विजय आनंद साहेबांची जवळपास सगळी गाणी. गाणं, मागचा वाद्यमेळ आणि पडद्यावरचं दृश्य ह्यांची इतकी अचूक त्रिमूर्ती अजून कोणाला साधली नसावी. आणि गाण्यांची जातकुळीही वेगवेगळी आहे.
विजय आनंद वेगळ्या लेखाचा विषय होईल. तूर्तास त्याचं एक आवडतं गाणं म्हणून "तेरे घर के सामने" निवडलं आहे.
@मेघना- ग्लासातली गारठलेली नूतनच,
.
२. देव आनंद साहेब - शिव्या दिल्यात तरी कबूल आहे, पण देव आनंदवर चित्रित झालेली काही गाणी अफलातून असल्यामुळे त्याला शरण जाणं क्रमप्राप्त आहे.
उदा.
"अपनी तो हर आह एक तूफान है". (पुन्हा विजय आनंद आलाच!) त्यात "सर पे मेरे.. तू जो अपना हाथ" वाल्या कडव्यात "हाथ" म्हटल्यावरच्या वहिदा आणि देव यांच्या प्रतिक्रिया. किंवा "जिंदगी है भूल कर ही राह मिलती है" वरचा सहप्रवाशी बाईंचा क्लोजअप वगैरे. गाण्यातल्या शब्दांत तर मजा आहेच, पण चित्रिकरणसुद्धा तितकंच दमदार! कथा पुढे नेत नसूनही.
किंवा मग "दिल का भंवर करे पुकार" (आयला, परत विजय आनंद!) मधला सेटअप. शिरीष कणेकर होण्याचा मोह पत्करूनही म्हणतो- ह्यापेक्षा रोमँटिक+निष्पाप+खेळकर असं काँबिनेशन शोधून मिळणं कठीण.
आणि त्यातला शेवटचा अंतरा चालू व्हायच्या आधी नूतन खिडकीत येऊन उभी रहाते तेव्हाचा तिचा चेहेरा + पार्श्वसंगीत + नंतरचा ओढणीवाला भाग हे सर्वाधिक बेष्ट.
किंवा मग "ओ निगाहे मस्ताना". असो, थांबावं.

३. दहेक मधलं "सावन बरसे.. तरसे दिल". मु़ंबईतला पाऊस एवढा भारी कधीच कुठल्या चित्रपटात पाहिला नाही.

४. तारे जमीन पर मधलं "मेरा जहां". एकदम क्लास.

५. सुजाता मधलं "नन्ही कली सोने चली". त्यात जेव्हा बाजूच्या खोलीतली सुजाता रडत असते, तेव्हा खिडकीत जाऊन सुलोचनाबाई तिला अंगाई गातात आणि मग ती रडणं थांबवते, हा भाग खूप भारी वाटतो.

६. देव-डी मधलं "ओ परदेसी" - दारू न पिताही trippiness अनुभवायला देणारं गाणं! (आणि खरं तर देव डी मधली सगळीच गाणी.)

७. "यू ही चला..चल राही" - स्वदेसवालं. गाण्यातल्या रेडिओत सुरू झालेलं गाणं, त्यात अचानक सूर मिसळणारा साधू-(मग मोहन भार्गवला मधेच "गाओ!" असा दटावणीवजा आग्रह), शारूख नसलेला शारूख, आणि एकूणच -प्रवास ही आयडिया झकास कॅमेरात उतरवणं- ह्यासाठी बेहद्द आवडलेलं गाणं.

आणि हो, त्रिदेव मधलं "गजर ने किया है इशारा". इतके सगळे दुष्टात्मे एकत्र नाचताना बघण्याची पर्वणीच. त्यातल्या एकेकाच्या चेहेर्‍यावरचे भाव बघण्यासारखे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सावन बरसे..'बद्दल एक मिठी आणि मधाची बरणी. बाकी सविस्तर नंतर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पडोसन मधलं "मेरी प्यारी बिंदू", "एक चतुर नार", दिल्ली का ठग मधलं "सी ए टी कॅट कॅट माने बिल्ली", गंगा की लहरे मधलं "छेडो ना मेरी जुल्फे", "मचलती हुई हवा मे छमछम" या व अशा अनेक गाण्यामधून दिसलेला किशोरकुमारचा खुशालचेंडूपणा. पडोसनमधे खरंतर किशोरच हिरो आहे व सुनिल दत्त हा साईड हिरो असल्यासारखे वाटते. साधारणपणे किशोरच्या ४०% अवखळपणा, वात्रटपणा शम्मीकपूर ने ब्लफ मास्टर चित्रपटातल्या "बेदर्दी दगाबाज जा" या गाण्यादरम्यान मधे केलेला आहे. खरंतर हे लताबाईंच्या श्रेष्ठ-अतिश्रेष्ठ गाण्यांपैकी एक असूनसुद्धा शम्मी चा आचरटपणा चढत चढत जाऊन शेवटी कडेलोट होतो.

देवसायबांनी फंटूश मधल्या "वो देखे तो उनकी इनायत" मधे पहिल्या पन्नास सेकंदांत त्या नावेत बसलेल्या व हिरॉइनवर उगीचच लाईन मारणार्‍या "एक्स्ट्रा" ची खिल्ली उडवताना ऐकवलेला टारगट शेर व त्या "एक्स्ट्रा" चा केलेला पोपट केवळ यादगार.

देव सायबांचं "फलसफा प्यार का तुम क्या जानो" हे प्रेमाचे मायने समजावून सांगायला दिलेले लेक्चरच वाटते. रफी सायबांच्या गायकीची मिठ्ठास मस्ताना बना देती है. वर्ना वैजयंतीला वकील सायबांकडून प्रेमाची शिकवणी का घ्यायला लावावी ?

लेक्चर से याद आया. दीदी पिक्चर मधलं "तुम मुझे भूल जाओ तो ये हक है तुमको" हे एक मानवकल्याणवादी लेक्चरच आहे असं वाटतं. ती त्याला सांगतेय की माझं तुझ्यावर उत्कट प्रेम आहे. आणि तो ठोकळा तिला लेक्चर पे लेक्चर देतोय. काय कटकट आहे यार. साहिर ने साने गुरुजींच्या प्रभावाखाली असताना लिहिलेले गाणे वाटते हे.

ऐ मेरी जोहरजबीं मधे सुरुवातीच्या आलापामधे बलराज सहानीने उडवलेल्या भुवया आणि हात क्रॉस करून वाजवलेल्या चुटक्या एका क्षणात मदहोशी पैदा करतात पण अचला सचदेव (जी जन्माला आली तीच मुळी आजी बनून) सगळा बेरंग करते. जंजीर मधल्या "यारी है मेरी इमान मेरा यार मेरी जिंदगी" मधे प्राण ने असेच रुमाल क्रॉस करून नाचवून मजा आणलेली आहे.

धूल का फूल मधल्या "धडकने लगी दिल के तारों की दुनिया", माया मधल्या "तस्वीर तेरी दिल मे" या गाण्यात माला सिन्हा ने एकदोन ठिकाणी उडवलेले नाक एकदम दिलखेचक.

राज, राजेंद्र व वैजयंतीमाला या तिघांचं मिळून असलेलं संगम मधलं "हर दिल जो प्यार करेगा" आठवा. गाणं एका पॉश पार्टीमधे घडतं. गाण्यादरम्यान (पहिलं कडवं सुरु व्हायच्या आधी) राज अ‍ॅकॉर्डियन वाजवत वाजवत तिच्याकडे जातो, ती पटकन राजेंद्र कडे जाते व राजेंद्र पटकन राज च्या पहिल्या जागी जातो. तिला राजेंद्र आवडत असतो व राज ला ती. त्रिकोण हे प्रकरण जरा एक्स्प्लिसिटच दाखवलंय. गाण्याच्या शेवटी राज ने "मेरा नाम" मधली जी धून अ‍ॅकॉर्डियन वर वाजवलिये तिचा जव्वाब नाय. पण संगम मधे राज ने "मेरे मन की गंगा" मधे अवखळपणा करायचा यत्न केलाय ... लेकिन बात कुछ बनी नही.

संग्राम चित्रपटातलं "मै तो तेरे हसीन खयालों मे खो गया" आठवा. रफी सायबांच्या आवाजातली मिठास लाजव्वाब. पण बथ्थड दिग्दर्शनाचा नमूना. एक रानरेडा बकरीच्या मागे पळत सुटलाय व ती जिवाच्या आकांताने स्वतःस वाचवायला पाहत्ये असे वाटते. आणि ... अरे यार ती समोर असताना "खयालों मे खो गया" कशाला ??

अनुपमा मधल्या "कुछ दिल ने कहा" मधले शर्मिलेचे व खामोशी मधल्या "हमने देखी है उन आखोंकी खुशबू" मधले (त्या नटीचे) वाजवीपेक्षा जास्त सलज्ज स्मित.

अमिताभचं व रेखाचं ते "सलाम-ए-इष्क मेरी जां". त्यात "एसके आगे की दास्तां" सुनवताना अमिताभ चेहर्‍यावर जो गुरुर दाखवतो तो जास्त सरस की त्याची अदाकारी की ज्यात तो "अब दवां दे हमे या तू दे दे जहर" असं म्हणून रेखाची "लाख जिगर चाक हो गए" हालत करून टाकतो ते जास्त सरस हे ठरवणं कठिण.

अंगूर मधल्या "रोज रोज डाली डाली" मधलं संजीवकुमारचं सिगरेट पिणं. आणि त्याच्या वासाला वैतागून, त्रासिक मुद्रेने माईक उचलून काही अंतरावर जाऊन आपलं गाणं "जारी" ठेवण्याची करामत करणारी दिप्ती नवल.

नरम गरम मधलं "मेरे अंगना आये रे घनश्याम आये रे". (मी असं ऐकलंय की याला ठुमरी असे म्हणतात.) हातात बंदूक घेऊन स्वरूप संपत ला व तिच्या बापाला हुसकवून लावायला आलेल्या उत्पल दत्तला तिचं हे गाणं (व रूप ही) इतकं आवडतं की उत्पल दत्त तिच्यावर लट्टू होतो. गाण्यादरम्यान त्याचा व अमोल पालेकर चा "सुसंवाद" संस्मरणीयच.

बाबर मधलं "सलाम्-ए-हसरत कबूल कर लो" हे सुधा मल्होत्रांचं नितांत सुंदर गाणं. ऋतिक रोशन च्या दादाजींनी संगीत दिलेले आहे याचं. यात शुभा खोटे पिंजर्‍यातल्या मैनेला आदाब ओ आर्जवे करत असते की "सलाम-ए-हसरत" कबूल कर लो. इशारा कही और होता है.

सांझ और सवेरा मधलं "अजहुन आए बालमा" हे एक बनवाबनवीप्रधान गाणं. अगदी "उछलम कूदम जय महमूदम" नसलं तरी महमूद मजा आणतोच.

दास्तान मधलं "तारारी आरारी" आठवतंय का बघा. राज व सुरय्याचं. नौशाद चं संगीत. सकाळी साडेसात च्या सिलोन च्या "पुराने फिल्मोंका संगीत" मधे महिन्या दोन महिन्यातून एकदा हटकून लागणारं. मानव-इतिहासातलं सर्वात रोमँटिक गाणं. गाण्याच्या सुरुवातीला ते दोघे मोटारीच्या एकाच दारातून बाहेर येतात ते थोडंसं ऑकवर्ड वाटतं. पण नंतरच्या संपूर्ण गाण्याच्या मदहोशीत तो ऑकवर्ड पणा कुठच्या कुठे विरघळून जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सलाम एक इश्क' आणि 'पडोसन'मधली गाणी सोडता माझा पास. एकेक करून पाहीन. एरवी इतक्या लिंका डकवत असता... इथे काय धाड भरली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पडोसनमधली सगळी गाणी अतीव प्रेक्षणीय, श्रवणीय आणि खतरनाकीय वगैरे आहेत. त्यातही चतुर नार आणि मेरी प्यारी बिंदू ही दोन म्हणजे तर कळसच. अनेक वर्षे आमचे बाथरूम सिंगिंग या गाण्यांनी साजरे झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मानव-इतिहासातलं सर्वात रोमँटिक गाणं.

हे गाणे विसरले होते. गोड आहे. पूर्वी अनेकदा ऐकले आहे.
_________

पण माझ्या मते सर्वोच्च गाणं -
धीरे धीरे आ रे बादल धीरे धीरे आ रे, बादल धीरे धीरे जा
मेरा बुलबुल सो रहा है,
शोर कुल ना मचा.
https://www.youtube.com/watch?v=RWdldFptbmA
.
https://www.youtube.com/watch?v=GFQIOMAfB6o
त्यातलं "आमीरबाईंचे" व्हर्शन प्रचंड आवडतं.

मेरा बुलबुल सो रहा है
बंद कर आँखें
नींद में डूबी हुई हैं
शरबती आँखें
जा तुझे मेरी कसम है
मेरी कसम है जा
मेरा बुलबुल सो रहा है शोर कुल न मचा.
धीरे धीरे

_______________
दुसरं आत्यंतिक आवडतं गाणं -

https://www.youtube.com/watch?v=i0J4IE7DkuQ

"दम भर जो उधर मुंह फेरे ओ चंदा,
मै उनसे प्यार कर लूंगी,
बाते हजार कर लूंगी"

शेवट तर निव्वळ सुंदर!! तळ्यातलं दोघांचं अन चंद्राचं प्रतिबिंब अन उठलेले तरंग.
_____
https://www.youtube.com/watch?v=OZRyy6-EFCA
धीरे धीरे चल चांद गगन में - काय मस्त ठुकलीये माला सिन्हा. अन तिचा गजरा अन साडी "दिल चाक" करतात.
किती सुगंधी, पोर्णिमेची रात्र दाखवली आहे. उफ्फ!! सर्व सेन्सेस तृप्त करणारी.
त्यातलं

"है मीठी छुरी येह जालीम नजर तुम्हारी"

"वोह क्या चीज थी मिलाके नजर पिला दी"

आई ग्ग! या ओळी खलास कलेजा करतात Smile माला सिन्हा प्र-ह-चं-ड आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिकनी चमेली! निव्वळ प्रेक्षणीय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाक मुरडणारा चित्रुला.

कत्रिना कैफ किती माठ - रांजण आहे राव! त्या गाण्यात माधुरी असती, तर काय(काय!) झालं असतं याची कल्पना करून मी कितींदा हळहळले आहे. बाकी नाचतानाचा मुद्राभिनय बघावा तर ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित या दोन लोकांचा. काय बोलतो त्यांचा चेहरा! त्या गाण्यात हृतिक तसाही कत्रिनात इंट्रेष्टेड नसतो. संजय दत्तही नसतो. 'कसा असेल असली भावली नाचवल्यावर?' असं वाटून मला अजय-अतुलचं गाणं फुकट केल्याबद्दल लई वाईट वाटलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL

नाक मुरडणारा चित्रुला.

ROFL
याच साठी केला होता प्रतिसादाचा अट्टाहास!

===

बाकी तुला कत्रिना आवड्त नै हे माहितीये. इट्स ओके इट्स ओके! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या गाण्यात अभिनयाची गरज काय? ऋषिकेशची प्रतिक्रिया नेमकी आहे - 'निव्वळ प्रेक्षणीय'. आड्यन्सला ते महत्त्वाचं असेल तर बाकी कशाला काय पायजे.

अन हो, आहेच क्याट्रिना अफाट प्रेक्षणीय. नाद नाय करायचा. अर्धयवनी नवनीतकोमलांगी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नॉटिंग हिल मधल्या गाण्यात दाखवलेले शीर्षकात असलेल्या स्थळामधे घडलेले ऋतुबदल आणि त्याचबरोबर कथानक काही महिने पुढे सरकलं असल्याची सूचना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अलिकडच्या काळात आवडलेल्या काही अन्य गाण्यांपैकी हे "बावरे बावरे" हे गाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"दिल्ली ६" मधल्या या गाण्याचं चित्रिकरण लक्षांत राहिलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आणि अर्थातच ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ओ मुसु, दोन शब्द लिहा की जरा. गब्बर चावला का तुम्हांला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उत्तम चित्रीकरण असलेल्या गाण्यांबद्दल चर्चा चाललेली असताना मणिरत्नमचं नाव येऊ नये याचं आश्चर्य वाटलं. मला आवडलेली काही उदाहरणे -

'रोजा' - एकूण एक गाणी, विशेषतः 'ये हसीं वादीयॉं'. यातलं हिमालयाचं चित्रण अंगावर येणारं आहे.
'युवा' - 'अंजाना अंजानी', 'कभी नीम नीम' - विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन या दगडांचा तथाकथित अभिनय सुंदर दिसला आहे तो केवळ चित्रीकरणामुळे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुन्हा कबूल आहे.

पण 'रोजा'मधली गाणी त्या मानानं सर्वसाधारण (नवीन काही नाही अशा अर्थी. देखणी आहेतच.) वाटतात मला. त्या गाण्याचा नि हिमालयाच्या देखण्या शिखरांचा काय संबंध आहे? पण ठीक. वाद नाही. हे सापेक्ष आहे.

पण 'युवा'बद्दल (आणि एकूण मणिरत्नमबद्दल) सहमती. 'युवा'मधलं ते अजय देवगणच्या दौर्‍यांचं चित्रण करणारं गाणं किंवा करीन-विवेकचं समुद्रावर सुरू होणारं गाणं केवळ थोर आहेत. 'बाँबे'मधली एकजात सगळी. एकाचाही अपवाद नाही. 'दिल से'मधलीही स-ग-ळी. 'सतरंगी' काय किंवा 'जिया जलें' काय किंवा 'ए अजनबी' काय. हाही विजय आनंदसारखाच निराळ्या लेखाचा विषय आहे. कान पकडून माफी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>त्या गाण्याचा नि हिमालयाच्या देखण्या शिखरांचा काय संबंध आहे? पण ठीक. वाद नाही. हे सापेक्ष आहे.
त्या गाण्यात हिमालय जसा दाखवलाय, त्याचा मूड, लायटिंग, सगळंच भारी आहे. कदाचित लहानपणी असलं काहीतरी पाहिल्याने ते मनावर कोरलं गेलं असेल. रोजा पाहिला तेव्हा मी ७ वर्षांचा होतो. मोठा झाल्यावर उत्तरेत जाऊन खरोखरचा हिमालय पाहिला तेव्हा एकदम त्या गाण्याचीच आठवण झाली.

>>'युवा'मधलं ते अजय देवगणच्या दौर्‍यांचं चित्रण करणारं गाणं
धक्का लगा बुक्का. या गाण्यात विशेष ठिकाणी अंतरा संपून मुखडा सुरु होण्याच्या मधल्या क्षणभराच्या पॉझ मधे काच फुटल्याचा आवाज वापरलाय, तो खासच!!
>>किंवा करीन-विवेकचं समुद्रावर सुरू होणारं गाणं केवळ थोर आहेत.
अंजाना अंजानी

'युवा' मध्ये करीनाचा मेकअपही काहीतरी वेगळा आहे, वेगळीच दिसते बया त्याच्यात विशेषतः विवेक ओबेरॉयला उचलून घेउन जातात त्याच्या आधीच्या प्रसंगात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हैला हो रे!

मला रावणचंही चित्रीकरण लक्षात आहे! एकदम हटके!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

..आणि हे एक दिलखुलास गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आर के ची जादू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

विजय आनंद यांचं हे सर्वोत्कृष्ट गाणं आहे असं मानावं काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

छैंय्या छैंय्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

देव साहेबांची विजय आनंद नी चित्रीत केलेली जवळ जवळ सगळीच.
राजेश खन्नाची पहील्या अनेक सिनेमांमधली.

बाकी हिंदी मराठी हिरो कुरुप, बालिश, कमी बुद्धीचे, अतिशय वाईट ड्रेसिंग सेंस असलेले, बावळट, जोकर ह्या पैकी कीमान एक दिसत असल्याने त्यांची उत्तम गाणी पण बघवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मुझे जीने दो मधले "रात भी है कुछ" हे वहीदावरच्या गाण्याचे चित्रीकरण, आणि शेवटी सुनिल दत्त बंदुकीवर नोटांची थप्पी लाउन बार काढतो ते अफलातुन.

२. साहेब बिबी और गुलाम मधले " साकीया आज मुझे निंद नही आयेगी". हलणारा पडद्याचा पंखा आणि त्यामुळे होणारा द्दष्य परीणाम आणि रहमान चा उर्मट चेहरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु हेच्च "रात भी है कुछ" हेच गाणं आठवत होते. त्यातली सुनील दत्तची केवळ शिकारी नजर अन ती कोवळी वहीदा.... आई ग्ग!!! फक्त त्या गाण्याकरता "मुझे जीने दो" पाहीला की कसं फुलतं त्यांचं प्रेम.

सुनिल दत्त बंदुकीवर नोटांची थप्पी लाउन बार काढतो ते अफलातुन.

अगदी अगदी.
अन ती नाचणार्‍यांची मुख्य मॅडम का कोण असते तिचाही आधाशी अन हार्ट्लेस अभिनय लाजवाब आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्विनी ये ना

गाणं भारी आहेच, पण सराफ-स्कूलच्या नाचाचं हे सर्वोच्च शिखर आहे. डावा हात जमिनीवर ठेवून तिरकं होत आपलं संपूर्ण शरीर गोल गोल फिरवणे अशक्य कमाल आहे. (इछुकांनी करून पहावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सराफ-स्कूलचा नाचः (बहुधा) 'खिचडी'मधले 'अगं नाच नाच राधे, उडवू या रंग' या गाण्यात या नाचाची एक अतिकोमल छटा पाहायला मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छोटी सी बात

गाणीच नाही, संपूर्ण सिनेमाच त्यातल्या सत्तरीतल्या मध्यमुंबईच्या चित्रीकरणासाठी खूप आवडतो. त्यातली अनेक ठिकाणं अजूनही आहेत (एक्स्प्रेस टॉवर्स) / आत्ताआत्तापर्यन्त होती (सामोवार).

आपल्या रोजच्या पहाण्यातल्या वृद्धाचे जवानीतले फोटो पाहिल्यासारखं वाटतं.

शेवटी-शेवटी एक डायलॉग आहे. अरुण प्रदीप (अ० पालेकर) एक फ्लॅट घेतो. प्रभा (विद्या सिन्हा) आसरानीला विचारते, "कहाँ लिया है फ्लैट?" तो नाक उडवून तुच्छतेने सांगतो, "हैं कहीं खार में..."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरुण प्रदीप (अ पालेकर)
..........खटाववाडीला भेट देऊन आलात की काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

जबरदस्त ष्टाईल आहे ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+११११११११११!

-(ष्टा० पंखा) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाय द वे, टायटलमधे जे गाणं आहे ते "पलभर के लिये कोई हमें प्यार करलें" असं आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय. पण काही चुका सुधारणे अधिक नामुष्कीचे असते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गुरू दत्तचं गाण्यांचं चित्रीकरण विशेष आवडतं. उदा. -

आपली शायरी कुणाच्या तरी तोंडी ऐकू आल्यामुळे चमकलेला कवी आणि त्याला एखाद्या Sirenप्रमाणे आपल्याकडे खेचून आणणारी गुलाबो - कधी दिसते कधी अदृश्य होते; कधी कमानीखालून, कधी खांबांआडून, रात्री शहरातल्या दिव्यांनी प्रकाशमान होणारी अशी झळझळीत वहिदा, आणि अंधारातला, तिच्याकडे नकळत ओढला जाणारा कवी गुरु दत्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझा 'साहिर'च्या धाग्यावरचा हा प्रतिसाद आठवला :).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यस्सर! आणि आता हे एक पूर्ण वेगळ्या जातकुळीचं चित्रीकरण पाहा -

बाहेरच्या फडतुसांच्या अंधारातून नृत्य चोरून पाहणारा भूतनाथ, आत झगझगीत प्रकाशात नृत्याचा आस्वाद घेणारा बेदरकार जमीनदार आणि त्याचे पित्ते, मुख्य नर्तकीव्यतिरिक्त ज्यांचे चेहरेही जणू बाहेरच्याच अंधारानं झाकले गेले आहेत अशा फडतुसांच्या प्रतिनिधी नर्तिका, आणि ह्या अंधार-प्रकाशाचा खेळ करणारा वर फिरणारा पंखा जणू भयावह पूर्वसूचना देतो आहे की हा झगझगाट टिकाऊ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हिरवा-हिरविणींनी एकमेकांना खुन्नस देत म्हटलेली अनेक पार्टी-सॉंग्स असतील.

मुळात आनंदाप्रीत्यर्थच्या पार्टीत हिरोने गाणंच खत्रा स्मशानछाप किंवा गुत्ताछाप निवडलेलं असतं.

गाण्याचे शब्द प्रचंड थेट आणि अतिसूचक असतात. हिरोच्या नजरा पापणीही न लववता हिरॉईनवर रोखलेल्या असतात. एकीकडे पियानोवादन किंवा काहीतरी करताना नजर फिक्स मोडमधेच असते.

हिरॉईन गिल्टने घळघळा रडत असते. सेम टाईम ती केविलवाण्या चेहर्‍याने मंगेतराचे डान्सहिसके हिरोवरची नजर न ढळवता सहन करत असते.

हिरोला कळतं, हिरॉईनीला कळतं, थिएटरभर बसलेल्या सर्व प्रेक्षकांना कळतं, नीट कळतं पण खुद्द पार्टीतला तो हिरॉईनीचा मंगेतर आणि इतर नातेवाईक निरागसपणे दारुचे ग्लास हाती घेऊन हसतखेळत नाच करत राहतात आणि टाळ्या वाजवत राहतात. त्या उदास आणि सूडभर्‍या सरपटत्या डिप्रेसिंग गाण्याच्या धुनेवर हे लोक एकदम "ताSSS की SSS ला SSS" ची ट्यून चालू असल्यागत जल्लोषयुक्त डान्स कसा करतात ते पाहणे मनोरंजक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग्ग!!! मी वारले. ROFL ROFL
निरीक्षण आवरा गवि. इतक्या सूक्ष्म विसंगती पकडताच कशा तुम्ही ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि, मी चित्रपटसृष्टीतील काही "व्याख्या" असा एक लेख लिहीण्याकरता काही गोष्टींची माहिती जमा करत होतो. त्यात "मैफिल" ची व्याख्या मी "जमवत" होतो ती तुम्ही वरती जे धमाल लिहीले आहे साधारण त्यासारखी आहे (स्मशानछाप/गुत्ताछाप शब्द जबरी आवडले). आता जेव्हा लिहीन तेव्हा हे इतके धमाल वर्णन डोक्यातून पुसले जाणार नाही. तेव्हा या वर्णनाच्या खुणा त्यात दिसल्या तर राग मानू नये ही विनंती. हे वर्णन वाचून जबरी हसलो हे वेगळे सांगत नाही Smile

एखादीचे चैत्रातले हळदीकुंकू किंवा मंगळागौर असते तशी या पूर्वीच्या हीरॉइन्सची "मैफिल" असे. तशीच रिच्युअल. त्या व्रतातील एक कंडिशन म्हणजे आधी एक गरीब गाठून त्यावर प्रेम करायचे, मग त्याच्याकडे चांदी वगैरे नाही याची खात्री करून ते मोडायचे. मग त्याच्यापेक्षा भीषण दिसणार्‍या पण वरकरणी दौलतवाला वाटू शकेल अशाशी लग्न ठरवून या मैफिलीत त्या हीरोला गायला बसवायचे..... ई.ई. :). अशा अजून काही व्याख्या जमल्या की सगळे एकदमच टाकतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. आवडणारी गाणी बव्हंशी वरील प्रतिसादांत येऊन गेली आहेत, तेव्हा या काही विस्कळीत नोंदी:

* टीव्ही नव्हता तेव्हाही गाण्याच्या चित्रीकरणामागे काहीएक विचार असणारे, मेहनत घेणारे दिग्दर्शक होतेच राज कपूर, विजय आनंद, गुरू दत्त, बिमल रॉय सारखे. पण जेव्हा टीव्हीचं आणि छायागीतचं बस्तान बसलं, तेव्हा नाइलाजाने सरसकट सार्‍यांनाच गाणी अधिक देखणी करण्यामागे मेहनत घ्यावी लागली असणार. हे नेमकं कधी झालं असावं? १९६५ ते ७५ च्या दरम्यान असा अंदाज बांधला (पहा: https://en.wikipedia.org/wiki/Television_in_India#History) तर, अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस (रफी? अरेरे!) सारख्या भयाण गाण्यांची संगती (साल १९६७) लागू शकेल का? :).

* तीच गत राजेन्द्र कुमारची. 'झुक गया आसमान' (साल १९६८) च्या शीर्षकगीतातले शब्द mime करून दाखवणे म्हणजेच अभिनय अशी त्याची समजूत असावी. कौन है जो दिल में (इथे हृदयाकडे हात) समाया, लो झुक गया आसमाँ भी (गाडीचं बॉनेट बंद करण्याचं प्रात्यक्षिक), इश्क मेरा रंग लाया (शारुक पोझ - जीप रस्ता सोडून चाल्ली - प्रयासाने स्टिअरिंग व्हीलवर नियंत्रण) हे फारच विनोदी. पण त्यावरही कडी म्हणजे पुढच्याच कडव्यात 'जिस्म को मौत आती है लेकिन...'मधला मौत हा शब्द प्रेक्षकांना कदाचित समजणार नाही, म्हणून 'गाई गाई'ची केलेली अ‍ॅक्टिंग अतिप्रेक्षणीय!

* प्रेम पुजारी (१९७०) हा देव आनंदने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. त्यातली गाणी सुरेख आहेत (शोखियों में घोला जाये, रंगीला रे, फूलों के रंग से इ.). त्यातल्या 'फूलों के रंग से'चं चित्रीकरण फारच ढिसाळ आहे (तुटलेली कंटिन्युइटी, एक्स्ट्रॉ म्हणून घेतलेल्या स्थानिक स्विस मुलींच्या चेहर्‍यावर 'हे काय चाललं आहे?' असे गोंधळलेले/मजेचे भाव इ.). त्याच सुमारास आलेल्या गॅम्बलर चित्रपटातलं चेहर्‍यावरची (नकली) मिशीही न हलू देता म्हटलेलं 'दिल आज शायर है' गाणंही असंच देवआजोबांनी विनोदी करून ठेवलेलं.

* तर ते असो. पुढच्या दशकातली दक्षिण मुंबईत चित्रित झालेली गाणी मात्र फार आवडतात. रोते हुए आते हैं सब, रिमझिम गिरे सावन, मेरे घर आना जिंदगी, दो दीवाने शहर में, ना जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ, बातों बातों में इत्यादी.

* ऐशीच्या दशकातलं आठवणारं उदाहरण म्हणजे 'सिलसिला' - 'ये कहाँ आ गये हम' आणि 'देखा एक ख्वाब तो ये'चे शब्द, Keukenhof ची ट्युलिप गार्डन्स आणि विवाहबाह्य संबंधांची पार्श्वभूमी, हे सारं जमून आलेलं. बाकी तेव्हाचे बरेचसे चित्रपट म्हणजे टपोरी/मोलकरणी एक्स्ट्रॉज् घेऊन मिथुन/अनिल कपूरचे ड्यॅन्स. पुढे नव्वदच्या दशकात हिंदी सिनेमांचं आर्थिक गणित सुधारलं, तसे एक्स्ट्रॉ/कोरसही बघणेबल झाले.

* फार थोर चित्रीकरण नसलं तरी, ७०च्या दशकातल्या फॅशनवरच्या स्पूफवरचा (मैं चली, मैं चली?) पहिला प्रयोग म्हणून 'वो लडकी है कहाँ' (दिल चाहता है) लक्षात आहे. पुढे स्पूफचीही अतिपरिचयादवज्ञा होत गेली.

* 'ये दिल और उनकी निगाहों के साये' हे एक अतिशय आवडणारं गाणं. या गाण्याच्या चित्रीकरणाचा व्हिडिओच उपलब्ध नाही. परिणामी त्यातल्या 'पहाडों को चंचल किरन चूंमती है, हवा हर नदी का बदन चूंमती है' किंवा 'लिपटते ये पेडों से बादल घनेरे, ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे' सारख्या ओळींच्या प्रतिमांना त्या गाण्याच्या चित्रीकरणाचे बंधन राहिलेले नाही. भटकताना अचानक सापडलेल्या नॉन-वॉलपेपरी दृश्यांशी त्यांची आता सांगड जमून गेली आहे. (शेवटचं वाक्य अंमळ खांडेकरी वळणाने गेलं आहे, पण त्याला इलाज नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गाई गाई'ची अ‍ॅक्टिंग?!!! ROFL ROFL ROFL

मुद्दाम लेख म्हणतो आहेस का धाग्याच्या सुरुवातीला लिहिलेल्या चार शब्दांना? Fool

देवानंदला असल्या गप्पांमधून वर्ज्य करणे अशक्य असावे बाकी. कधी तो केवळ विनोद म्हणता येईल असले चाळे करतो, कधी सुरेख अभिनय. त्याच्या नशिबानं त्याच्यावर चित्रित झालेली सुरेख गाणीही चिकार.

'डीसीएच'मधल्या 'वो लडकी हैं कहाँ'ची आठवण काढल्याबद्दल माझ्याकडून मार्मिक. हा सिनेमा पाहिला, तेव्हा सिंगल स्क्रीन्सचे दिवस शिल्लक होते. तेव्हा त्या गाण्यावर खूश होऊन आख्खं थिएटर उत्स्फूर्ततेनं डोलायला लागल्याची झटॅक आठवण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुद्दाम लेख म्हणतो आहेस का धाग्याच्या सुरुवातीला लिहिलेल्या चार शब्दांना? Stare

नै, नै, असं कमी 'लेख'ण्याचा उद्देश नव्हता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटलेच! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'झुक गया आसमान' (साल १९६८)

हा कहर शिणुमा आहे. मी पहिली चाळीसेक मिनिटंच पाहू शकलो. त्यात समजलेली कहाणी अशी:

- रा० कु० हिर्वीन पटवतो
- या आनंदात उघड्या जीपमध्ये बसून उपरोक्त गाणं म्हणतो
- दरम्यान यम (बहुदा इयरएंड टार्गेट पूर्ण करण्यासाठी) रा० कु० ला खपवतो
- यम त्याला घेऊन एंट्री करण्यासाठी जातो. चित्रगुप्त यमाचे कान उपटतो.
- यम आपली चूक मोठ्या मनाने मान्य करून रा० कु०चा आत्मा वापस घेऊन जातो.
- दरम्यान "बरी ब्याद कटली" या विचाराने रा०कु०च्या कुटुंबीय त्याला जाळून मोकळे झालेले असतात.
- मग यमाला हे आत्म्याचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला योग्य हार्डवेअर न सापडल्याने तो कोणा भलत्याच्या देहात ते इन्स्टॉल करून मोकळा होतो.

... पुढचा पाहिला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

साहब बिबी और गुलाम मधलं "पिया ऐसो जिया मे समाय गयो रे. " हे मीनाकुमारी साज चढवत असतानाचं गाणं त्याच पठडीतलं दुसरं (जुन्या) सौदागर मधलं "सजना है मुझे.. " हे पद्मा खन्नावर चित्रित झालेलं.
देवानंद- नुतन वर चित्रित झालेलं "दिलका भंवर करे पुकार". पुर्ण गाणंभर दोघंही जिना उतरतायत पण त्यांची जोडी खुप फ्रेश आणि मस्त वाटते, खास करुन नुतनचे विभ्रम. "अच्छा जी मै हारी " मधला मधुबालाचा लाडीक नखरा.
प्यासा मधलं "जाने क्या तूने कही " मधली विजयची कविताच असल्यासारखी उत्तर न देता पुढे जात रहाणारी गुलाबो (वहिदा). त्यातलंच "जाने वो कैसे.. " हे गाणं गुरुदत्तच्या चेहेर्‍यावरल्या भावांसाठी विशेषत: "बिछड गया हर साथी ... " या अंतर्‍याच्या वेळेचे.
किती तरी गाणी आहेत पण सगळी कृष्ण धवल काळातलीच. कदाचित गाणी मन लावून बघण्याच्या काळात हीच गाणी जास्त बघण्यात आली म्हणून असेल. "पलभरके लिये" हे खिडकी-गाणं ही बघायला आवडायचं. त्यातला त्यात नविन(?) म्हणजे अक्षय कुमार शिल्पा शेट्टीचं "चुराए दिल मेरा " त्यातल्या कसरतीपूर्ण डान्स स्टेप्स मुळे तेव्हा मजेशीर वाटलेलं आणि बरेचदा बघितलं जायचं म्हणून आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळ्यापांढर्‍या जमान्यातलं शेजारशेजारच्या खोलीतून गायलेलं 'इसलिये तुझसे मैं प्यार करू' नाही आठवलं? आशा पारेखसुद्धा चक्क गोड दिसते त्यात. शिवाय या गाण्यांचा सरताज म्हणता येईलसं 'जलते हैं जिसके लिये'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरे हो, जलते है. पण नाही. वेगळी कल्पना म्हणून ठिकाय. लक्षात रहाणारे चित्रीकरण म्हणून नाही.
अजून एक "जानू जानू रे आहे खनके है तोरे कंगना ". अनुराधा मधलं "हाये रे वो दिन क्यु ना आये ".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर 'छोटी सी बात' आणि मुंबईच्या चित्रीकरणाचा मुद्दा आला म्हणून आठवलेलं हे 'रजनीगंधा'मधलं गाणं -

खरं तर नायिका एका मित्राबरोबर टॅक्सीतून जाते एवढाच प्रसंग आहे. पण त्याद्वारे चित्रपटातला मुख्य तिढाच तिथे मांडला आहे. नायिकेच्या आयुष्यात एक गोड, सुस्वभावी, प्रेमळ (पण कारकुनी) पुरुष असताना अशा ऐटबाज इंटलेक्चुअल पुरुषाचं तिच्या आयुष्यात अचानक पुनरागमन होतं आणि तिचं मन तिच्या नकळत त्याच्याकडे ओढलं जातं. आयुष्याचं नक्की काय करावं ह्या संभ्रमात पडलेली नायिका आणि तिचा संभ्रम दाखवण्यासाठी गाण्याचा रोचक उपयोग केला आहे. ज्या काळात हीरो-हिरॉईन झाडांभोवती प्रेमाची गाणी गात फिरत असत त्या काळात अशा प्रकारे नायिकेच्या मनःस्थितीचं चित्रण करण्यासाठी एक साधा टॅक्सीचा प्रवास वापरणं हे मजेशीर होतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे लक्षात आलेले नव्हते. असे बारकावे लक्षात आणुन देण्याबद्दल धन्यवाद.
पण एकंदर लकब, हातात सिगरेट वगैरे - बरोबर ती व्यक्ती कदाचित इन्टेलेक्च्युअल असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डी-डे या दाऊद ला पकडण्यासाठी केलेल्या एका काल्पनिक कटावर आधारित आहे. पैकी श्रुती हसन ही अर्जुन रामपालची हिरवीण आहे. व्हिलन अर्जुनवर सूड म्हणून तिचे हाल हाल करून तिला मारतो. तिचा मृतदेह पोलिस नेत असताना अर्जुन तिथे येतो आणि जिथे खून झाला तिथे सावकाश फिरतो आणि श्रुतीला कसे मारले असावे हे तो आजूबाजूला असताना दाखवले जाते. पाश्वभूमीवर एक गाणे चालू असते." उम्रभर का साथ दे जो..क्यो वही प्यार हो, क्यो ना मिट के जो फना हो वो भी प्यार हो"

एक हिंसा दाखवणारे त्रासदायक पण तरी अत्यंत श्रवणीय आणि अर्थपूर्ण गाणे आहे. गायिका स्वत: श्रुती हसन आहे हे कळल्यावर, हि-याच्या खाणीतून अगदीच कोळसा निघाला नाहीये अशा निष्कर्षापर्यंत आले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

>>हि-याच्या खाणीतून अगदीच कोळसा निघाला नाहीये अशा निष्कर्षापर्यंत आले!

सारिका ही हिर्‍याची खाण आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कमल हासनबद्दल म्हणताहेत त्या आय गेस...

तदुपरि श्रुती हासन दिसते छानच. आमचा तिच्यावर अंमळ जीव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रुती हासनने गायलेलं, सोनाक्षीवर चित्रित केलेलं "जोगनिया" ऐकलं आणि तिच्याबद्दल आणखीनच आदर वाटायला लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म ऐकून पाहतो.

बाकी कोणी काही म्हणो, सोनाक्षीवरही आपला जीव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्यांचा तुमच्यावर जीव आहे त्यांना महत्व द्या बॅटोबा. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते सगळं आंजवर मांडण्यात कै अर्थ आहे? इथे येण्याचे मौजमजा आणि विदाग्रहण हेच मुख्य उद्देश आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसं असेल तर गाणं बघितलं तरी चालेल..तिचे आधीच सुंदर असलेले डोळे (कमी मेक-अप मूळे)आणखीनच एक्स्प्रेसिव्ह वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत! दबंगमध्येही काय मस्त दिसलीये ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचा 'तात्या'वरही अंमळ जीव आहे हे दिसले.
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगागागागागा, मेलो मेलो ROFL

जोड्यान् मारा पर असं बोलू नगासा. मी 'आनंदी'मार्गी नाही. आदमी हूँ और प्यार सिर्फ़ दोख़्तार-ए-हव्वा से ही करता हूँ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'हाय रामा ये क्या हुआ' हे असंच एक अतिशय आवडतं गाणं. त्या गाण्यात जॅकी श्रॉफ आणि उर्मिला, सावज आणि शिकारी असल्यासारखे वाळंवटातल्या काही अवशेषांच्या पार्श्वभूमीवर एका वर्तुळात फिरत असतात तो भाग, त्यात उर्मिलाच्या अंगातली ज्वाळा वाटावीत अशी लाल रंगाची वस्त्रं आणि मागे रहमाननं जो काही प्रकार वाजवला आहे तो - असं तिन्ही मिळून केवळ ब्रह्मानंद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आणि पूरियाधनाश्री-इश सुरावटीतील गाणं, आशाताईंचं शब्द कोमलपणे (ते शब्द जसे सोडलेत, कट केल्यासारखे, त्याला तोड नाही) टाकणं आणि हरिहरनचा आक्रमक सूर, सगळं काही जमून आलेलं. वाहवा!! असो. आशाताई हा वेगळ्या धाग्यासाठी योग्य विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हाय रामा यह क्या हुवा' हे स्वर्णलता नि हरिहरन यांनी गायले आहे.
'रंग रंग रँगीला रे' नि 'तनहा तनहा यहाँ पे जीना' ही दोन आशाताईंना गायली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. टंकनश्रम इत्यादी... Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमचे अज्ञान उघड केल्याबद्दल धन्यवाद!! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट - 'अनुभव' (नव्हे.. नव्हे! तो शेखर सुमनचा नव्हे!)

१. मुझे जाँ न कहो मेरी जान

२. मेरा दिल जो मेरा होता

बासू भट्टाचार्यांचे चित्रपट कमी पैशात बनत असल्याने नि कानू रॉय (गीता दत्तचा सख्खा भाऊ) तसाही गरजू असल्याने (हा मितभाषी इसम हावडा-ब्रिजसाठी वेल्डिन्गची कामे करी) बासूंच्या बहुतेक सगळ्याच चित्रपटांना कानू रॉयचे संगीत आहे. बरेचदा पैशांच्या चणचणीमुळे बासू एखाद-दोन वाद्यांपेक्षा अधिक वाद्ये येऊच देत नसत. मग बिचार्‍या कानूला मिनतवारीने स्वस्तातली वाद्ये नि वादक मिळावावी लागत. वरील दोन उदाहरणे जितकी कानूच्या अप्रतिम धुनेची (ठेकाविरहित) आहेत, तितकीच नंद व बासू भट्टाचार्य यांची आहेत. नंद यांनी छायालेखन (सिनेमॅटोग्राफी) केले आहे. दोन्ही गाण्यांत एक दृश्य दुसर्‍या दृश्यात अतिशय तरलपणे मिसळण्याची प्रक्रिया निव्वळ लाजवाब! आणि तेदेखील केवळ तांत्रिक करामत म्हणून नव्हे तर गाण्याच्या 'मूड'ला दुसरे काही साजेसे वाटणारच नाही अश्या पद्धतीने आलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने