जालावरच्या नियतकालिकांचं / नित्यकालिकांचं संकलन
जालावर अनेक नियतकालिकं उपलब्ध असतात. हल्ली बरेचदा अशा नियतकालिकांचं वाचन कागदी आवृत्तीत न होता इथेच होतं. पण नुसत्या आपापल्या वाचनखुणा साठवण्यापेक्षा अशा नियतकालिकांची यादी सगळ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध असली, तर सोईचं जाईल असं वाटलं म्हणून इथे एकत्र करते आहे. लोकांनीही यथाशक्ती भर घालावी. (संपादकांना काही बदल करावेसे वाटले, तर त्यांनी जरूर... इत्यादी इत्यादी.)
'मागोवा' व 'तात्पर्य'
आजचा सुधारक
आपले वाङ्मयवृत्त
ऐसी अक्षरे (बेलवलकर घरवाले)
ऋतुगंध
ग्रंथवेध ('राजहंस' प्रकाशनाचे नियतकालिक)
डिजिटल कट्टा
परामर्श
परिवर्तनाचा वाटसरू
पालकनीती
महाराष्ट्र साहित्य पत्रिका
मिळून सार्याजणी
युनिक फीचर्स आणि अनुभव
रेषेवरची अक्षरे
लोकप्रभा
सम्यक संवाद
साधना
साहित्य सूची
Global मराठी
Himal magazine (इथे 'हिमाल'चे जुने अंक आहेत)
माहितीमधल्या टर्म्स
- परिवर्तनाचा वाटसरू (संपूर्ण
- परिवर्तनाचा वाटसरू (संपूर्ण लेख उपलब्ध होत नाहीयेत असं दिसतंय. पण तरी ताज्या अंकाची झलक पाहायला मिळते.)
- लोकप्रभा
---
सध्या प्रकाशित न होणाऱ्या काही नियतकालिकांचे जुने अंकही जालावर उपलब्ध केलेले सापडतात, तेही इथं नोंदवलेलं चालू शकलं तर-
पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे प्रकाशित- परामर्श
डाव्या विचारांची सत्तर-ऐंशीच्या दशकातली- 'मागोवा' व 'तात्पर्य'
उत्तम संकलन, आभार! परामर्शचे
उत्तम संकलन, आभार! परामर्शचे दुने अंक जालावर टाकून फार चांगले काम केले आहे.
सगळे जुने नवे अंक जालावर नाही टाकले तरी नियतकालिकाविषयी प्राथमिक माहिती देणारं एक छोटंसं पान जरी असलं तर किती उपकार होतील! उदा: समाज प्रबोधन पत्रिका. तिचे संपादक बदलले की पत्ता, संपर्काची माहिती, सर्व बदलतं, आणि वर्गणीत ब्रेक पडला की ताजी माहिती शोधणं हा एक त्रास. (कोणाकडे याचा ताजा अंक असल्यास प्लीज वर्गणी दर मला सांगा!) थोडी फोनाफोनी करून माहिती मिळते, पण त्यापेक्षा एक विकी पान तयार करून ते अपडेटवत राहिलं तरी किती सोप्पं.
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा ताजा अंक आता जालावर उपलब्ध आहे: http://masapapune.org/MASAPAPune/PDFs/SahityaPatrikaAnk351.pdf
काही मागील अंक (म्हणजे फक्त गेल्या वर्षाचे!) सुद्धा आहेतः http://masapapune.org/MASAPAPune/MagilAnk.aspx
मेघना, इथे
मेघना, इथे "http://reshakshare.blogspot.com/" रेषेवरची अक्षरे नियतकालिक का नाही गं?
आत्ता गविंचा मुसळी नावाचा लेख वाचत होते त्या दुव्यावरती वरचा दुवा सापडला.
___
की रेषेवरची अक्षरे हा ब्लॉग आहे आणि त्याचा फक्त दिवाळीअंक निघतो?
दिवाळीअंक भारी आहेत. आत्ता "सावरी" नावाचे ललित वाचले. प्रचंड आवडले.
'रेषेवरची अक्षरे'चा फक्त
'रेषेवरची अक्षरे'चा फक्त दिवाळी अंक निघतो. त्या अर्थी ते नियतकालिक आहेच! हा दुवा. वरही चढवते.
***
आता इतकी समयोचित विचारणा केलीच आहात तर (!) - यंदा 'रेषेवरची अक्षरे' पुन्हा येतो आहे.
२००८ ते २०१२ असे सलग पाच अंक निघाले. मग मराठीतले ब्लॉग्स काहीसे रोडावले. त्यामुळे ब्रेक घेतला. यंदा 'रेषेवरची अक्षरे' पुन्हा येतो आहे - मधल्या तीन वर्षांतली निवडक ललित पोस्ट्स घेऊन. आणि फक्त इतकंच नाही. आता ब्लॉग्सच्या बरोबरीनं मायबोली, मनोगत, मिसळपाव, ऐसी या फोरम्सवरचं गेल्या ३ वर्षांमधलं निवडक ललित लेखनही त्यात समाविष्ट असेल.
नक्की वाचा. :)
अर्थपूर्णता - एक सापेक्ष तरीही निरर्थक कल्पना
प्रतिसादांचं टेबल टेनिस खेळण्याची माझी सुद्धा इच्छा, स्वारस्य, गरज आणि आवश्यकता नाही.
माझी कारणं सविस्तर लिहिण्याचा मला आत्ता तरी कंटाळा आहे, कारण प्रत्येक कारणावर परत टेबलटेनिस होण्याची शक्यता आहे.
तुर्तास सध्या संकेतस्थळावरील अनेक गंडलेल्या लिंका सुधरवल्यात तरी पुष्कळ.
सदर प्रतिसाद अर्थपूर्ण असेलच असा माझा दावा नाही. मतमतांतरे शक्य आहेत. सर्वच काही आयुष्यात अर्थपूर्ण (सर्व अर्थाने) असावे असा माझा आग्रह नसतो.
आभार. हे उत्तम संकलन आहे. पण
आभार. हे उत्तम संकलन आहे. पण मागोवा,तात्पर्य, महाराष्ट्र साहित्य पत्रिका यांच्या लिंक्स उघडत नाहीत. त्यांच्या नव्या लिंका कुणी देऊ शकेल का?
ह्या निमित्ताने: जुनी नियतकालिकं आता बरीचशी खराब झाली. अगदी एकोणिसाव्या शतकातली वैगेरे जाऊद्या पण निदान गेल्या एक ५० वर्ष्यांमधली नियतकालिक तरी स्कॅन करून जतन करता येतील. उदा. अगदी गेला बाजार सत्यकथा किंवा नवभारत किंवा समाज प्रबोधन पत्रिका, किंवा शरद पाटलांच्या चळवळीचं नियतकालिक सत्यशोधक मार्क्सवादी, इत्यादी. तर ह्या उद्योगासाठी कुणी व्यक्ती/संस्था पुढाकार घेतात काय? कुणी ह्यासाठी फंडिंग देतं काय?
'माणूस'ची लिंक वर आलीच आहे.
'माणूस'ची लिंक वर आलीच आहे. त्याबरोबरच नुकतंच 'किशोर'चंही डिजिटायझेशन झालं. 'सत्यकथा'चं होणार आहे अशी बातमी होती.
तर ह्या उद्योगासाठी कुणी व्यक्ती/संस्था पुढाकार घेतात काय? कुणी ह्यासाठी फंडिंग देतं काय?
किशोरचं डिजिटायझेशन बुकगंगाने सीएसार (corporate social responsibility) म्हणून केलं. 'माणूस'चे पुरस्कर्ते कोण माहीत नाही.
पण अशा डिजिटायझेशनसाठी आपणच पुढाकार घ्यावा आणि फंडिंग द्यावं असं मनात आहे. बघू कसं काय जमतंय.
ह्या कामी आपणच पुढाकार घ्यावा
ह्या कामी आपणच पुढाकार घ्यावा ह्या अतिशय नोबल विचाराचं मी सहर्ष स्वागत करतो. वैयक्तिक पातळीवर जे काही थोडं फार शक्य आहे ते करत राहूच, पण ह्या प्रकारचे प्रयत्न संस्थात्मक पातळीवरून व्हायला हवेत. ज्या ग्रंथालयांकडे अश्या जुन्या नियतकालीकांचा साठा आहे त्यांना जर सरकार किंवा इतर शिक्षणसंस्थांकडून अनुदान मिळाल तर अशी कामं झपाट्यानं होऊ शकतील. पण आपल्या संस्था दिवाळखोरीत जाण हाच तर मुख्य क्रायसिस आहे.
मागे एकदा मी महाराष्ट्रातल्या फक्त २०व्या शतकातल्या सिग्नीफीकंट नियतकालिकांची एक ढोबळ यादी काढली होती तर ती जवळपास ७०/८० तरी झाली होती, आणि त्यातून कित्येक महत्वाची प्रकरणं सुटली असतीलच आणि शिवाय अनियतकालिकं वगैरे जाऊच द्या. आणि हे फक्त इतिहास, वांग्मय, सामाजिकशास्त्र वगैरे विषयातलं झालं. शेती, अर्थशास्त्र, धर्म, विज्ञान, पर्यावरण, तंत्रज्ञान अश्या असंख्य भानगडीविषयी छापणारी मासिकं इत्यादी मोजलेलीच नाहीत.
असो. रडत तरी किती राहावं...
माझ्या माहितीप्रमाणे असं
माझ्या माहितीप्रमाणे असं अनुदान मिळतं. बरीच ग्रंथालयं 'आमचा डिजिटायझेशनचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे' वगैरे हवा करत असतात. उदा० जयकर ग्रंथालय पाच लाख पुस्तकं डिजिटाईज करत आहे ही बातमी प्रथम २००३ मध्ये आली, आणि २०१७ पर्यंत अधूनमधून येतेच आहे. शिवाय 'आमची' पुस्तकं आम पब्लिकला का उपलब्ध करून द्यावी - हा ताणही असणारच.
त्यामुळे, संस्थांकडून काही होणार नाही या गृहितकासह पुढे जाणं मला योग्य वाटतं. शिवाय येत्या काळात काही भरीव करायचं असेल तर त्यासाठी संस्थेबिंस्थेच्या भानगडीत न पडता वैयक्तिकरीत्या केलं तरी काम तेवढंच होईल असं वाटतं. (पूर्वी संस्थास्थापनामुळे ज्या 'इकॉनॉमीज ऑफ स्केल' यायच्या त्या आज तंत्रज्ञानामुळे एकांड्यालाही उपलब्ध झाल्या आहेत.)
हे खरंच. वैयक्तिक
हे खरंच. वैयक्तिक पुस्तकसंग्रह अश्या पद्धतीनं जतन करता येईलच आणि हल्ली तंत्रज्ञान एकट्यादुकट्याच्या आवाक्यात आलंय हे ही चांगलंच. पण १०० वर्ष्यांपूर्वीच्या पुस्तकांचा आणि जुन्या नियतकालिकांचा एक्सेस सरकारी किंवा तत्सम ग्रंथालयांपलिकडे मिळणं दुर्मिळ आहे आणि वैयक्तिक पातळीवर हे करणं अतिशय वेळखाऊ आणि जिकरीचं आहे. मुळात म्हणजे येत्या २०/३० वर्ष्यांनी अभ्यासकांच्या पुढच्या पिढीला जागृतीचे किंवा दीनबंधूचे अंक पाहायला मिळणं ही जबाबदारी सार्वजनिक आहे. म्हणजे खाजगी प्रयत्नांची आवश्यकता आणि महत्व अजिबात न नाकारता मला ही सरकारची/सार्वजनिक क्षेत्राची जबाबदारी आहे असं म्हणायचं आहे. खेरीज ठिकठीकाणची स्थानिक इतिहासाची साधनं (म्हणजे उदाहरणार्थ अकोला किंवा धुळे ह्या शहरांतल्या विविध समूहांची, व्यापक सार्वजनिक व्यवहारांची नोंद ज्यात सापडते अशी लिखित साधनं) जतन करणं आवश्यक आहे.आता ह्या विषयीची जबाबदारी नेमकी कुणाची? सार्वजनिक क्षेत्रात ज्ञानव्यवहारात सहभागी असणाऱ्या निरनिराळ्या संस्था ह्यांच्यावर ही जबाबदारी असायला हवी. त्याअर्थी मी संस्थात्मक पातळीवरून हे काम व्हावं अशी अपेक्षा करतो. (ते दिवास्वप्न आहे हे मान्यच.)
म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचरा पडला असेल तर तो आपण वैयक्तिक पातळीवर उचलू किंवा मुदलात स्वतः तिथे कचरा टाकणार नाही, इतरांना तसं करण्यापासून रोखू हे योग्यच पण सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलण्याचं काम स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे आणि त्यांनी ते योग्य रीतीनं पार पाडावं असा आग्रह आपण धरायला हवा.
काही भर -
तत्त्व म्हणून धनुषचा मुद्दा मला मान्य आहे.
व्यक्ती म्हणून त्यात काही करता येईल तर, नियतकालिक/पुस्तक स्कॅन करायला घेतलं की माणसाचं काम फक्त पुस्तकाची पानं उलटून स्कॅनरखाली घालणं आणि सॉफ्टवेरमधून आलेल्या गोष्टी जतन करणं यापलीकडे नसाव्यात, एवढं सोपं तंत्रज्ञान निर्माण झालं; तर स्कॅनिंग करून जुनं साहित्य जतन करणं फार सोपं होईल.
सध्या देवनागरी OCRचा गिटहबवर उपलब्ध असलेला कोड बरा आहे; इतपत मी ऐकून आहे. डिजिटायझेशन म्हणून त्यात बऱ्याच गोष्टी वाढवता येतील. वेगवेगळ्या स्कॅनरवरून प्रतिमा OCRला पाठवणं; OCRमधून बाहेर आलेल्या टेक्स्टची (मराठी) पुस्तकासारखी रचना करणं; यात अनुक्रमणिका, क्लिक करून पुढे जाणं वगैरे गोष्टी; अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत.
या गोष्टी करायला मोठी यंत्रणा असण्याची गरज नाही. या विषयांतल्या तज्ज्ञांकडे पुरेसा वेळ असेल, पर्यायानं त्यांचं पोट भरायला पैसा उपलब्ध असेल तर गोष्टी घडतील. या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेण्याची मात्र गरज आहे.
मराठी विकीपीडिया OCR4wikisource
पूर्वी संस्थास्थापनामुळे ज्या 'इकॉनॉमीज ऑफ स्केल' यायच्या त्या आज तंत्रज्ञानामुळे एकांड्यालाही उपलब्ध झाल्या आहेत.
हे खरंच आहे. इथे एवढं सगळं आलं आहे तर संदर्भासाठी काही तांत्रिक माहितीही देतो. लोक जेव्हा डिजिटाईझ करतात तेव्हा पुष्कळदा त्यांचा भर केवळ पानं स्कॅन करून ती जालावर उपलब्ध करून देणं एवढाच असतो. मात्र, मजकूर जर युनिकोडमध्ये उपलब्ध झाला तर ते किती सोयीचं होतं ते इथल्या कुणाला सांगायची गरज नाही. त्यासाठी आता थोडी किचकट, पण फुकटात सोय उपलब्ध आहे. गूगल एपिआय, एका भारतीयानं जिटहबवर दिलेला पायथन कोड आणि एक लिनक्स मशीन एवढ्या सामग्रीवर हे करणं शक्य आहे. मराठी विकीपीडियावर काही लोक हे तंत्र वापरून प्रताधिकारमुक्त असलेले काही ग्रंथ विकिसोर्सवर उपलब्ध करून देत आहेत.
अधिक माहिती मराठी विकीपीडियावर विकिस्रोत:OCR4wikisource प्रणाली वापरण्याचा कृती आराखडा इथे मिळेल.
बेलवलकर हौसिंग नावाची हौशी
बेलवलकर हौसिंग नावाची हौशी कंपनी "ऐसी अक्षरे"** नावाचं मासिक आपल्या ग्राहकांना आणि हितचिंतकांना पाठवते. प्रसिद्ध मराठी लेखकांच्या कथा, कविता वगैरे सर्रास हाणतात. (प्रताधिकाराचं काय करतात देव जाणे.) उदा० जीएंची "तुती" ही कथा अशाच एका अंकात वाचायला मिळाली होती.
** सर्प्राईज सर्प्राईज
मेघना: "मिळून सार्याजणी"चा दुवा गंडला आहे.