मृत्यु अटळ आहे, परंतु सुखद मरणही आपल्या हातात नाही...

(मुंबईचे पोटविकारतज्ञ, डॉ. दीपक अमरापूरकर यांचा 29 ऑगस्टच्या मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून मृत्यु झाला. दोन दिवसानंतर छिन्न विछिन्नावस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. आपण मृत्युला टाळू शकत नाही हे खरे असले तरी मृत्युचे हे राक्षसी थैमान व एकूणच मृत्युसंबंधीचे विचार आपल्याला नक्कीच सतावले असतील. यासंबंधात मनात आलेल्या विचारांना वाट करून द्यावी म्हणून हा लेखन प्रपंच.)

१७व्या शतकातील वैद्यकीय इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये क्षयरोगाची लागण झालेले रुग्ण राजाच्या हस्तस्पर्षामुळे रोगमुक्त झाले असे उल्लेख सापडतात. म्हणूनच कदाचित त्या रोगाला राजयक्ष्म असे म्हणत असावेत. इंग्रजांच्या सम्राज्यात या रोगाला King’s Evil या नावाने ओळखत जात होते. त्यामुळे सम्राटाच्या दरबारात रांग लावून टीबी रुग्ण उभे असत. पुढील कालखंडात ठिकठिकाणी या रुग्णासाठी सॅनिटोरियम बांधण्याची लाट आली. ज्यांना परवडत असेल ते टीबी रुग्ण आपल्या जवळच्या नातेवाईकासकट महिनो न महिने अशा ठिकाणी मुक्काम करत असत. व मृत्युला काही दिवसासाठी तरी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु राजा-महाराजांचा हस्तस्पर्ष होवो ना होवो, क्षयरोगाने मरणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. म्हणूनच क्षयरोग हा क्रॉनिक रोग म्हणूनच त्याकाळी ओळखला जात होता.

मृत्युची अशा प्रकारे चोरपावलानी येवून आकस्मिकपणे माणसांचे जीवन संपवणे 20व्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्रापूर्वीची नेहमीचीच घटना होती. 20व्या शतकापूर्वी माणसांचे सरासरी आयुष्य चिंपांझी वा घोड्याच्या आयुष्याइतकेसुद्धा नव्हते. वैद्यकीय प्रगतीमुळे 35-40 वर्षाचे आयुष्य आता 70-80च्या जवळपास पोचलेले आहे. कॉलरा, स्मालपॉक्स, प्लेग, यासारख्या सांक्रामिक रोगापासून जग मुक्त होत आहे. या दीर्घकाळच्या आयुष्यातील 25 टक्के आयुष्य वृद्धत्व व्यापत आहे. हेच वृद्धत्व काहीना काही शारीरिक तक्रारीचे मूळ असून सुख समाधानाचे आयुष्य जगू देत नाही. बहुतांश वृद्ध गोळ्या खावूनच दिवस ढकलत असतात. तरीसुद्धा आजची वैज्ञानिक व आर्थिक प्रगती मृत्युला इतके सहजासहजी जीव घेण्यास अशक्यप्राय करून टाकत आहे. आज मरण हे एक वैद्यकीय अनुभव असे वाटत आहे.

कुठे, कधी व कसे मरण येणार हे मागील शंभर वर्षात पूर्णपणे बदललेले आहे. नैसर्गिक संकट, अपघात वा आत्महत्या अशा दुर्घटनेमुळे मरणाऱ्यांचा अपवाद केल्यास 1990 पर्यंत 50 टक्के रुग्ण क्रॉनिक आजारामुळे मरणाच्या दारी जात होते. परंतु हे प्रमाण 2015 पर्यंत 30 टक्क्यावर आलेला आहे. विकसित देशातील रुग्णावरील उपचाराच्या वेळी अनपेक्षित वा गुंतागुंतीचे काहीतरी त्याच्या शरीरातील काही अवयव प्रयत्न करूनसुद्धा कुचकामी होत असल्यामुळे काही कालावधीनंतर ते मृत्यु पावतात. तसे काही न घडल्यास दीर्घकाळापर्यंत त्यांचा मुक्काम हॉस्पिटलमध्ये असतो. सुमारे 70 टक्के मृत्यु हॉस्पिटलच्या बेडवरच होतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तातडीचे उपचार करत जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. 65 वर्षावरील बहुतेक अमेरिकन माणसं मृत्युपूर्वीचे काही दिवस वा महिने आयसीयूमध्ये काढत असतात. सुमारे 20 टक्के रुग्ण मृत्युपूर्वीच्या एक महिना अगोदर मोठ्या ऑपरेशनला सामोरे गेलेले असतात.

परंतु अशा प्रकारचा डॉक्टरी हस्तक्षेप रुग्ण वा रुग्णाच्या नातेवाईकांना क्लेशदायक ठरत आहे. एकदा रुग्ण हास्पिटलच्या तावडीत सापडला की त्यातून त्याला बाहेर काढणे नेक्स्ट टु इम्पॉसिबल ठरत आहे. महाभारताच्या कुरुक्षेत्रावरील चक्रव्यूहासारखी ही अवस्था आहे; आत जाणे माहित आहे परंतु बाहेर सहीसलामत येणे शक्य नाही! हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला घरातच जुजबी उपचार घेत असलेल्या रुग्णापेक्षा फार मोठ्या प्रमाणात ताण व विषण्णतेचा सामना करावा लागतो. त्याचे कुटुंबीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी, हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांशी वाद घालतात, भांडण उकरून काढतात, व कुणालाही न जुमानता प्रसंगी मारहाणही करतात. एवढ्या सर्व खर्चिक उपचारानंतर रुग्णावर मृत्यु ओढवल्यास संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावाखाली वावरते. आणि त्यातून बाहेर पडायला त्यांना भरपूर वेळ लागतो.

महत्वाचे म्हणजे अशा प्रकारचा वैद्यकीय मृत्यु कुणालाच नको असतो. इकॉनॉमिस्ट या नियतकालिकाच्या पुढाकारानी घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार निरोगी असलेल्या बहुतांश नागरिकांना तशी वेळ आल्यास घरातच मृत्यु यावे असे वाटते. काही जणांना तुमचे शेवटचे दिवस कसे असावेत असे विचारल्यावर जास्तीत जास्त जीवन जगता यावे अशी इच्छा व्यक्त करत होते. या सर्वांना आपल्या घरात, आपल्या कुटुंबियांच्या सानिध्यात, वेदनारहित व शांत असा मृत्यु यावा असे वाटते. आपल्या मृत्युचे ओझे कुणावरही पडू नये ही प्रत्येकाची इच्छा असते. तरीसुद्धा काही जणांचा मृत्यु अत्यंत क्लेशदायक, जवळच्यांना त्रासदायक ठरतात.

एक मात्र खरे की शँपेनची बाटली उघडून कुणीही मृत्युला आमंत्रण देत नाही किंवा मृत्युला हसत हसत सामोरे जात नाही. म्हणूनच तुमचा मेंदू शाबूत असताना घरातच मरण यावे असे नमूद केलेल्या तुमच्या इच्छापत्राला डॉक्टर्स काडीइतकी किंमतसुद्धा देत नाहीत. त्यांच्या लेखी उपचाराची सर्व साधनं सुविधा हॉस्पिटलमध्ये असल्यास घरी मरावे या इच्छेला काही अर्थ नाही. त्यांच्या मते एखादा उपचार अत्यंत वेदना देणारा, अगदी जीव घेणारा असे वाटत असला तरी प्रत्यक्ष मरणापेक्षा तो नेहमीच उजवा ठरेल. व नंतरच्या काळात सगळे काही ठीक झाल्यास उपचाराच्या वेळच्या वेदना विसरल्या जातील. म्हणूनच कित्येक रुग्णांना शेवटच्या क्षणापर्यंत मृत्युशी दोन हात करावेत असे वाटते व त्यासाठी डॉक्टरी उपचारातील वेदना सहन करण्याची त्यांच्या मनाची तयारी असते.

रुग्णांची (वा त्यांच्या नातेवाईकांची) काहीही इच्छा असली तरी डॉक्टर्स आपल्याला हवे तसे उपचार करतच राहतात. रुग्णाच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये नळ्या घुसवून रुग्णाला होत असलेल्या वेदनांची पर्वा न करता हे उपचार चालू असतात. रुग्णाला हे उपचार अघोरी वाटत असले तरी डॉक्टरांना रुग्णाचा जीव वाचवण्याची जबाबदारी असते. उपलब्ध साधनं व स्वतःचे वैद्यकीय कौशल्य व अनुभव पणाला लावून रुग्णाचे जीव वाचवण्याची प्रतिज्ञा त्यानी प्रशिक्षणाच्या वेळी घेतलेली असते. त्यामुळे रुग्ण आयसीयूमध्ये नीट दिसतो की नाही, किंवा जवळच्या नातेवाईकांना रुग्णाला अशा स्थितीत बघून काय वाटत असेल, असले विचारच उपचार करणाऱ्या डॉक्टर्संना शिवत नाहीत. टर्मिनल कॅन्सरच्या रुग्णांना तुमची शेवटची इच्छा काय असे विचारल्यास 35 टक्के रुग्णांना, हॉस्पिटलमधून घरी जाण्याचा धोका पत्करूनसुद्धा, नातवाच्या वाढदिवसाला किंवा तत्सम एखाद्या घरगुती समारंभाला जावेसे वाटते. अनेक हृद्रोगतज्ञ नेहमीच मृत्यु प्रत्यक्षात बघत असतात, तरीसुद्धा मृत्युला सामोरे जात असलेल्या रुग्णाचे सांत्वन कसे करावे याची जाणच त्यांना नसते.

मानसिकरित्या सक्षम परंतु टर्मिनल आजार असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या मदतीने दयामरणाची परवानगी देण्यास अनुमती असावी अशा एखाद्या कायद्याची अत्यंत गरज भासत आहे. कारण आयुष्याच्या शेवटी मरणाचा हक्कसुद्धा त्याच्यावरील उपचाराचाच एक भाग होऊ शकतो. परंतु सैद्धांतिकरित्या या कायद्याला होकार देणारे प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा फारच कमी जण यासाठी पुढे येतात. सर्व्हैवल इन्स्टिंक्ट इतकी जबरदस्त असते की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मृत्युशी झुंज देण्याची तयारी त्यांच्यात असते. परंतु बहुतेक रुग्णांना वैद्यकशास्त्राने एकेक साधे सरळ, सोपे अशी पावलं टाकत मृत्युकडे नेण्यात काही गैर नाही असे वाटते.

या सर्व प्रकारात compassionate care फार महत्वाची ठरू शकते. वैद्यकशास्त्राच्या अभ्यासामध्ये वेदनारहित उपचार वा टर्मिनल आजार असलेल्यांना समुपदेशन या गोष्टींवर भर देण्यात येत आहे. परंतु प्रशिक्षण काळातील या गोष्टी प्रत्यक्ष प्रॅक्टीस करत असताना हवेत विरून जातात की काय अशी स्थिती आजची आहे. सांत्वनपर चार शब्द बोलण्याइतकाही वेळ या डॉक्टर मंडळीकडे नसतो याचे आश्चर्य वाटते. चार शब्द कसे बोलावेत यासाठी कुणीही पुढे येत नाही. कदाचित कसे बोलावे हेच कळत नसेल. चहा पीत पीत चार गोड गोड शब्द हे वैद्यकीय उपचाराच बसत नाहीत अशीच मनोधारणा यांची असावी. परंतु इतर सर्व उपचार थकल्यानंतर हे चार शब्दच रुग्णाला आजार सहन करण्यासाठी बळकटी देत असतात. सर्व उपचार थकल्यानंतर मरणासन्न अवस्थेतील रुग्णांना शेवटच्या क्षणापर्यंत उपचार घेण्याची सोय असलेल्या हॉस्पैस होममध्येसुद्धा या सांत्वनाचा अभाव असतो. परंतु हे सर्व चुकीच्या मार्गाने जात आहेत. कॅन्सर फारच बळावलेला असल्यास इतर उपचाराबरोबरच याही गोष्टी करू लागल्यास रुग्णांच्या वेदना काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर अजून चार दिवस जगण्याची शक्यतासुद्धा!

बहुतेक डॉक्टरांचा उद्देश मृत्युला आणखी काही काळ लांबवण्याचा असतो, मृत्युबद्दल भाषणबाजी करणे नसते. परंतु त्यांनी सांत्वनपर चार शब्द बोलावे ही अपेक्षा अप्रस्तुत नाही. अमेरिकेतील शल्यविशारद व डॉक्टरी व्यवसायाबद्दल सातत्याने लिहिणारे डॉ अतुल गवांदे यांनी Serious Illness Conversation Guide या त्यांच्या पुस्तकात क्रॉनिक रुग्णांच्याबाबतीत नेमके काय करावे, त्यांची आरोग्यस्थिती कशी आहे हे कुठले प्रश्न विचारून ओळखावे, यासंबंधीची माहिती दिली आहे. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिल्या दिल्या सांत्वनपर संवाद साधल्यास रुग्णोपचारात त्याचा नक्कीच उपयोग होईल.

गंभीर आजारांसाठी रोगोपचार करताना अशा प्रकारचा बदल नक्कीच उपयोगी ठरेल. व मृत्युला सामोरे जाण्यास रुग्णाच्या मनाची तयारी करणे यातून शक्य होईल. व रुग्णाला एक चांगले मरण यातून प्राप्त होईल. यात धंदा म्हणून हॉस्पिटल्स चालवणाऱ्यांचे काही प्रमाणात नक्कीच नुकसान होईल. परंतु प्रॉफिट व सामाजिक बांधिलकी याचे बॅलन्स राखणे हेही तितकेच महत्वाचे असते. क्रॉनिक रुग्णांना हॉस्पैस होममध्ये पाठवून हॉस्पिटलचे बेड इतर रुग्णांना उपलब्ध करून देण्यासही या सांत्वनाचा उपयोग होऊ शकेल, हेही नसे थोडके!

संदर्भः इकॉनॉमिस्ट

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक स्वानुभव....९५ वर्षाची व्यक्ती , अतिशय समृद्ध आणि सन्माननीय आयुष्य जगलेली. मृत्यूला समाधानानी भेटायची तयारी असलेली. पण डॉक्टर हॉस्पिटल मधून सोडायला तयार नाहीत. आणि धमकी काय तर घरी मृत्यू आल्यास "Death certificate" मिळणार नाही. आम्हाला अडचण आली नाही पण ज्यांच्या मित्रपरिवारात डॉक्टर नसेल त्याने काय करायचे. डॉक्टर कडे अजिबातच न जाता "वृद्धापकाळाने मृत्यू " हा बेकायदेशीरच आहे आता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालपासून एका मराठी वाहिनीवर, मुंबईतल्या नामांकित रुग्णालयात, रुग्णाला दाखल करण्यापासून, त्याच्या बिलांत डॉक्टरांचा कसा १०% कट असतो, हे दाखवत आहेत. रुग्ण लवकर मरु नये, असे त्या साखळीतल्या सर्वांनाही वाटत असेल. रुग्णाविषयी कळवळा म्हणून नव्हे, तर १०% वाढावे म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्यातरी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी वन वे तिकीट टू http://www.dignitas.ch/?lang=en हा पर्याय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा, पैसे आहेत. परंतु, (किमानपक्षी भारतीयांबद्दल बोलायचे तर) स्वित्झर्लंडमध्ये जाण्याकरिता व्हिसा लागतो. (माझ्या माहितीप्रमाणे गेली काही वर्षे स्वित्झर्लंड हे शेनजेन व्हिसाक्षेत्राअंतर्गत येते.)

आता, स्विस वकिलातीत व्हिसाकरिता अर्ज करताना 'कशाकरिता जाता आहात आपण स्वित्झर्लंडमध्ये?' या प्रश्नास 'मरायला!' असे उत्तर दिल्यास मला नाही वाटत वकिलात व्हिसा मंजूर करेल म्हणून! कारण सोपे आहे - 'मरायला जाण्याकरिता व्हिसा' अशी कोणतीही व्हिसा-क्याटेगरी अद्याप तरी (आणि माझ्या माहितीत तरी) अस्तित्वात नाही., किंवा, व्हिसा न लागणाऱ्या एखाद्या ईयूबाह्य देशाचा नागरिक (जसा, एखादा अमेरिकन वगैरे) जरी तेथे याच कामाकरिता थडकला, तरी त्यास नेमक्या याच कारणाकरिता प्रवेश नाकारला जाईल. (प्रवेश मंजूर करायचा तर कोणत्या क्याटेगरीखाली करणार? त्याकरिता सुयोग्य अशी क्याटेगरीच अद्याप अस्तित्वात नाही.)

बरे, समजा खरे कारण दडविले, आणि 'पर्यटन' हे कारण दाखवून टूरिस्ट व्हिसा मिळवला/व्हिसा लागत नसल्यास थेट स्वित्झर्लंडच्या/शेनजेनमधल्या विमानतळावर थडकला. तरीही प्रवेश नाकारला जाईल. कारण, टूरिस्ट व्हिसासाठी / टूरिस्ट क्याटेगरीखालील प्रवेशासाठी प्रमुख अट म्हणजे पोहोचल्याच्या दिवसापासून नव्वद दिवसांच्या आतले परतीचे (अथवा शेनजेनच्या बाहेर जाणारे) तिकीट तुमच्याजवळ पाहिजे. अन्यथा प्रवेश नाही. (शिवाय तुम्हाला तेथपर्यंत आणून सोडणाऱ्या विमानकंपनीस दंड होईल, तो वेगळाच. त्यामुळे, ती विमानकंपनीसुद्धा वन वे तिकिटावर तुम्हाला मुंबईतच / जेथे कोठे तुमचा स्टार्टिंग पॉइंट असेल तेथे विमानात पाऊल ठेवू देणार नाही, तुम्हाला बोर्डिंग डिनाय करेल.) थोडक्यात, वन वे तिकीट उपयोगाचे नाही. रिटर्न किंवा ऑनवर्ड पाहिजे.

याचा अर्थ, ईयूबाह्य देशांच्या नागरिकांकरिता आपण सुचविता ती तरकीब बहुधा उपयोगाची नाही. (चूभूद्याघ्या.)

==========

समजा, 'मरायला जाण्याकरिता व्हिसा' अशी एखादी नवीन व्हिसा क्याटेगरी स्थापन जरी करायची म्हटली, तरी त्यात खाली मांडल्याप्रमाणे अनेक अडचणी दृग्गोचर होतात. त्यामुळे मला नाही वाटत की अशी क्याटेगरी नजीकच्या भविष्यकाळात तरी कोणतेही सरकार स्थापन करेल म्हणून.

- सर्वप्रथम, 'मरायला जाण्याकरिता व्हिसा/एंट्री' हे कोणत्या प्रकारात मोडावे? इमिग्रंट की नॉन-इमिग्रंट?

- कंप्लायन्स इश्यूज़. समजा, एखाद्याने या क्याटेगरीखाली प्रवेश मिळविला, आणि नंतर सोयिस्करपणे मेलाच नाही, आणि आरामात स्वित्झर्लंडमध्ये राहू लागला तर? आणखी एका इल्लीगल इमिग्रंटाची भर पडली नाही का? (मला खात्री आहे की अशी काही व्हिसा क्याटेगरी सुरू केली, तर अनेक देशांतील स्विस वकिलातींपुढे रांगा लागतील म्हणून.) मग त्याचे काय करायचे पुढे? त्याला तुरुंगात टाकायचे? डीपोर्ट करायचे? करता येईल, आणि करावेही लागेल, परंतु ते खर्चिक आणि कटकटीचे काम आहे. म्हणजे पोलीस/इमिग्रेशनखात्यावर अधिक ताण. (गब्बर खुशाल म्हणेल की त्यांच्या व्हिसाप्रयोजनाची पूर्तता करायला त्यांना मदत करायची, म्हणून. म्हणूनच गब्बरला विचारलेले नाही.)

- किंवा मग मुळातच अशा व्हिसाअर्जांची छाननी अधिक कटाक्षाने करायची. म्हणजे वकिलातींना जास्तीचे काम.

त्यापेक्षा विकतचे दुखणे घ्यायचेच कशाला?

अर्थात, मी चौकशी करायला गेलो नाही म्हणा. उगाच कशाला 'ऐसी'वाल्यांना ''न'बा दिवस' स्थापन करण्याची संधी द्यायची? अगोदरच तसा 'दिवस' स्थापन करायला टपलेत साले! तर ते एक असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा, व्हिसा न लागणाऱ्या एखाद्या ईयूबाह्य देशाचा नागरिक (जसा, एखादा अमेरिकन वगैरे) जरी तेथे याच कामाकरिता थडकला, तरी त्यास नेमक्या याच कारणाकरिता प्रवेश नाकारला जाईल. 

माझ्या समजुतीप्रमाणे हे खरे नाही. ह्या कारणासाठी अनेक कॅनेडियन मंडळी तिथे गेल्याचे ऐकून आहे. विमानतळावर त्यांना थापा माराव्या लागलेल्या नाहीत. तुम्हीच असा उल्लेख केलात की नव्वद दिवसांच्या आतले ‘शेनजेनच्या बाहेर जाणारे तिकीट’ पाहिजे. ह्या वाक्प्रयोगाचा तिथे व्यापक अर्थ घेतला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

तुम्हीच असा उल्लेख केलात की नव्वद दिवसांच्या आतले ‘शेनजेनच्या बाहेर जाणारे तिकीट’ पाहिजे. ह्या वाक्प्रयोगाचा तिथे व्यापक अर्थ घेतला जातो.

शेनजेनच्या 'बाहेर' (अनइंटेंडेड कॉन्सीक्वेन्स म्हणून नव्हे. सांगूनसवरून.) नेणारे तिकीट विकणारी ही कोणती एअरलाइन ब्वॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुष्पक एअरवेज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचत गेलो तसा विचार येत गेला की लेख पार गंडलेला आहे. डॅाक्टरांवरचे काही आरोप अजिबात पटलेले नाहीत. परंतू शेवटी 'संदर्भः इकॉनॉमिस्ट' आधार लिहिला आहे तर त्या लेखाची लिंक द्या.
तुमची मतं काय यावर चर्चा करू. ते पेपरवाले काय म्हणतात ते बाजुला ठेवू.

# न'बा, तुमचा दिवस साजरा करूच पण इकडे अगोदर जु'बाचा महिना,सप्ताह वगैरे असतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद देण्यास विलंब झाल्याबद्दल सॉरी!
इकॉनॉमिस्टचा संदर्भ देत आहे.
कदाचित मला इकॉनॉमिस्टच्या लेखाचा रोख कळला नसेल. आपण ते योग्यपणे मांडू शकाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इच्छामरणाची मागणी आणि चळवळ करणारे मंडलिक नावाचे एक वृद्ध गृहस्थ कोणाच्या आठवणीत आहेत काय? ते पुण्यात लॉ कॉलेजच्या परिसरात राहात असावेत कारण मी त्यांना त्या रस्त्यावर पाहिलेले आठवते. काळ १९७८ ते १९८२.

आपल्याला असाध्य आजाराने ग्रासल्यानंतर एका विशिष्ट पातळीपलीकडे वैद्यकीय उपचारांनी आपणास जिवंत ठेवले जाऊ नये अशी इच्छा असेल तर वकिलाच्या सल्ल्याने योग्य वेळीच Living Will करून ठेवणे हा एक मार्ग सनदशीर मार्ग कॅनडामध्ये उपलब्ध आहे. त्याचा कितपत उपयोग होतो हे मात्र प्रत्यक्ष अनुभवाशिवाय सांगता येणार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वि. रा. लिमये यांचे ‘सन्मानाने मरण्याचा हक्क’ या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

दोनदा उमटल्यामुळे प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाने या विषयावर अगोदर सन्मानाने मरण्याचा हक्क लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

उद्बोधक व वाचनीय लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

जुना लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0