बखर....कोरोनाची (भाग २)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरिता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

Hospital Scene

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच , या धाग्यावर ?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना ?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

(आधीच्या धाग्यावर १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)

बातमीचा प्रकार निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गूगलकडचा लोकांच्या हालचालींचा विदा वापरून वेगवेगळ्या देशांत लॉकडाउनचा काय परिणाम होतो आहे ते दाखवणारी नवी वेबसाईट गूगल मोबिलिटी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यांनी ह्यासाठी चकचकीत UI/UX बनवण्याचीही वाट बघितली नाही. 'जग वेगानं बदलतंय' असं मी माझ्या आयुष्यात म्हणेन असं वाटलं नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिरीष शेवाळकर : मूळचे पुण्यातील , पण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुख्यतः चीन व इतर ईस्ट एशियन देशांमध्ये वास्तव्य.
नुकतेच निवृत्त होऊन पुण्यात आले आहेत.
त्यांची ही डायरी.

करोना डायरी - १

खरंतर हे वादळ आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि एवढी पडझड होईल असे वाटलेच नव्हते. चीन मधल्या बातम्या आल्या त्या वेळेस असे वाटले की सार्स सारखे होईल आणि थांबेल. त्यातूनही मी सार्सच्या वेळेस खुद्द चीनमधे होतो आणि फर्स्टहँड अनुभव गाठीशी होता. पण बघता बघता चीन, इराण, इटली ........ भीषण बातम्या येत गेल्या त्या वेळेस अभद्राची चाहूल लागली.

मार्च १४ - मागच्या वर्षात खूप फिरलो होतो आणि वजन वाढले होते. खाण्या आणि पिण्यामुळे. मग जिम लावायचे ठरवले. घराजवळ एक जिम होते, मग त्याचे वर्षाचे पैसे भरले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात. मस्त प्रोग्रेस चालू झाला होता. रोज जिमला जात होतो आणि १४ मार्चला मॉल, थिएटर बरोबर जिमपण बंद झाली. त्यावेळी वाटले की होतील आठवड्या-पंधरवड्यासाठी बंद. पण आता कळते आहे की अजून दोन महिने तरी नक्की चालू होणार नाहीत. कदाचित जास्तच!!

१५ मार्च रविवार. गाढवलोट इथे सह्याद्री ट्रेकर्सचा ट्रेक होता. बहुतेक वेळा दर रविवारी मी जायचो. पण आज पैसे भरून पण जायचे नाही असे ठरवले. घरी गरोदर मुलगी. त्यामुळे जिथे ४०-५० माणसे जमणार आहेत तिथे जाऊन कशाला रिस्क घ्या असा विचार करून ट्रेक ला गेलोच नाही.

ट्रेक नाही, जिम नाही. किमान व्यायाम हवा म्हणून मग शिक्षक नगरच्या पाठीमागच्या टेकडीवरून ARAI पर्यंत पूर्वी जायचो तशी चालायला सुरवात केली.

मार्च १६-१७. अजून तरी भारतात रोग्यांचा वेगाने प्रसार नव्हता. पण पुण्यात बरेच जण मास्क लावत होते. तोंडावर फडकं, मफलर घेत होते. फोन केला तर प्रथम ऐकू येत होता खोकला. त्यावरून पण लोकांची टिंगल सुरु झाली होती. माझी काकू हॉस्पिटलमधे ऍडमिट होती. रेवती लिफ्ट वापरते. लिफ्टच्या दाराला हात लागला, बटणे दाबायला लागली म्हणून लिफ्ट मधून बाहेर आल्यावर लगेच हातावर सॅनिटायझर घेत होती. मी नेहमी जिना चढत जातो. जिना चढताना बाजूच्या कठड्याचा आधार घेणे साहजिक असते. पण आज मी पण खिशात हात घालून जिना चढलो होतो. कुठेही हात लागणार नाही याची काळजी घेत होतो. आजच्या दिवसात जेवढे वेळा सॅनिटायझर वापरले तेवढे आजपर्यंत कधीच वापरले नव्हते.

आज १८ मार्च. बरेच दिवस आजारी होती, तरी सख्खी काकू गेल्याचा धक्का बसतोच. करोनाचे सावट जरा गडद झाले होते. आटोपायच्या त्या सर्व गोष्टी आटोपल्या. चर्चा करोनाची चालू होतीच. सगळीकडे......स्मशानातपण.

घरी आलो आणि VFS चा मेसेज आला. इटलीच्या व्हिसाचे काम झाले आहे. पासपोर्ट घेऊन जा. मी पाच तारखेला अर्ज केला होता आणि आज १८ ला मेसेज आला होता. एवढे दिवस कधीच लागले नव्हते.

आता तर टेकडीवर चालणे पण बंद झाले. सरकारने टेकडीवर फिरायला पण बंदी घातली.

१९ मार्च - आम्ही मोजकेच जण दुसऱ्या दिवशी अस्थी विसर्जन करून आलो. बरीच रेस्टारंट बंदच होती. पुणे आळंदी रोड वरचे, आळंदीमधले सगळे धाबे पण बंद होते. आळंदीच्या पार्किंग मधे एवढी कमी गर्दी कधीच बघितली नव्हती. आळंदीचे माऊलींचे देऊळपण बंद होते त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. नेहमी येताना कुठेतरी थांबून चहा तरी पितो. आज कशालाही थांबलो नाही. सरळ घरी आलो.

मी खरतर युरोपची ट्रीप बुक केली होती आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात (५ एप्रिलला) इटलीच्या व्हिसासाठी VFS global च्या ऑफिसमधे पण गेलो होतो. पाच तारखेला अर्ज केला होता. बहुतेक हेच निमित्त झाले आणि काहीच दिवसात इटलीची परिस्थिती हाताबाहेर गेली. ट्रीप होणार नाही हे तर आता सूर्यप्रकाशाएवढे सत्य होते. किमान पासपोर्ट परत घ्यावा म्हणून VFS मधे जायचे होते. पासपोर्ट खरंतर पोस्टाने घेता येतो पण मला डकेथलाॅनमधे जायचे होते. ट्रेक करताना पाठीवरची सॅक काढून पाणी प्यायले जात नाही म्हणून नळी असलेली, दोन लीटर पाणी मावणारी, पाठीवरची पाण्याची पिशवी घ्यायची होती. तो मॉल VFS पासून फार दूर नव्हता म्हणून म्हटले की इकडे व्हिसा मिळाला की पासपोर्ट घेऊ आणि मॉल मधे जाऊ. पण व्हिसासाठी अप्लिकेशन करणे तर व्हिसा मिळणे यात एवढे महाभारत झाले होते की तो मॉल बंद झाला होता. इटली सरकारने पण, आम्ही काय कुणीच येऊ शकणार नाही हे माहित असतानादेखील व्हिसाचे पैसे खिशात घालून जून पर्यंत व्हिसा दिला होता. व्हिसा दिला पण इंटरनॅशनल फ्लाईट बंद!!! VFS च्या इथल्या पासपोर्ट देणाऱ्या माणसाने सांगितले की उद्यापासून VFS पण बंद आहे. आजचा शेवटचा दिवस. बरं झालं पासपोर्ट घेतलात आमची जवाबदारी संपली. ओरिजिनल रिसीट माझ्याकडे नव्हती (माझ्या ट्रॅव्हल एजन्ट कडे होती) तरीही कटकट न करता पासपोर्ट मिळाला होता.

शेअर मार्केट खाली कोसळू लागले होते. शेअर विश्वास बसणार नाहीत एवढ्या किमतीला कोसळले होते. सगळे म्हणत होते की चांगली संधी आहे. थोडे थोडे घ्या. रोज अगदी थोडी थोडी खरेदी चालू केली. पण रोज शेअर कोसळतोच आहे. मग मात्र भीती वाटायला लागली आणि शेअर अजून धाडकन आपटले. दुसऱ्यांदा लोअरसर्किट मधे गेल्यामुळे शेअर बाजार बंद झाला होता. आता तर शेअर खरेदी करण्याची हिम्मत पण उरली नव्हती.

२०-२१ मार्च. सगळ्यांचेच एव्हाना वर्क फ्रॉम होम चालू झाले होते. आज दादाकडे राहायला गेलो होतो. घरात दोनही पुतणे आणि सुना. पण सगळे जण कानात इअरफोन आणि पुढ्यात लॅपटॉप घेऊन. काही बोलल्याचा आवाज आला तर आपल्याशी बोलल्याचा भास व्हायचा पण त्यांची मिटिंग चालू असायची.

जिम बंद , ट्रेक बंद , टेकडी बंद. खूप वर्षांपूर्वी योगाचा कोर्स केला होता. तो कामाला आला. आता घरातच तासभर योगासने करण्याचे ठरवले. पण शरीर अजिबात वळत नव्हते. मन तर अजूनच कडक. या नव्या परिस्थितीशी कसे जुळवून घेणार? खूप वर्षांपूर्वी चायनाहून एक गेम आणला होता. मला वाटते दहा वर्षांनी तो बाहेर काढला. माझी आई आता ८३ वर्षाची. अनेक वर्षांनी तिच्यासोबत झब्बू आणि बदाम सातचा डाव रंगला. पण बदाम सात मधे अजूनही तीच सुटली. नेहमीप्रमाणे .........

२२ मार्च - मोदीजींनी फक्त एक दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. संध्याकाळी लोकांनी अक्षरश: लॉकआउट साजरा केला.

क्रमश: ( जमेल तसे. जमले तर).

©️ शिरीष शेवाळकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जी बातमी कधी वाचायला मिळते आहे त्याची तीव्र इच्छा होती ती वाचायला मिळाली सायन्स अलर्ट वर.
इटली मध्ये 5 रोबोट डॉक्टर आणि नर्स ला मदत करणार गंभीर corona बाधित रुग्णांना तपासण्यासाठी.
रोग्यांची नाडी. तपासण्यासाठी ते मदत करणार त्या मुळे डॉक्टर आणि नर्स ह्यांचा सरळ संबंध रुग्णांशी येणार नाही आणि त्यांच्या जीविताला असलेला धोका कमी होईल.
आजच्या घडीला डॉक्टर,सफाई कामगार,नर्स हे धोकादायक स्थिती मध्ये काम करत आहेत ते धोकादायक आहे.
अशा वेळीच कृत्रिम बुध्दी मात्तेचा वापर करून बनवलेले रोबोट कामाला येत आहेत अशी बातमी यावी
अशी खूप आतुरता होती .
हॉस्पिटल मधील सफाई, रुग्णांची तपासणी,त्यांना गरजेच्या वस्तू पुरवणे हे सर्व काम रोबोट नी केले पाहिजे .कारण रोबोट चे खूप मोठे कौतुक वाचून वाचून तशा अपेक्षा वाढल्या आहेत.
रुग्णांची वाहतूक सेल्फ ड्राईव्ह गाड्या करत आहेत अशी बातमी अजुन अमेरिकेमधील कोणत्याच सूत्र तर्फे आली नाही .
लोकांना घरपोच सामान पोचवायचे काम अजुन रोबोट का करत नाहीत कोणत्याच देशातून तशा बातम्या नाहीत.
की फक्त प्रयोग शाळेत हे योद्धे लढतात आणि प्रतक्ष्य रण भूमी वर कुचकामी असतात असे तर नाही ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

उत्तम बातमी.
आपण लिंक देऊ शकाल का ? इतरांनाही वाचू देत हे.
अशा नवीन developments आणणार का आपण इकडे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इटली मध्ये 5 रोबोट डॉक्टर आणि नर्स ला मदत करणार गंभीर corona बाधित रुग्णांना तपासण्यासाठी.
रोग्यांची नाडी. तपासण्यासाठी ते मदत करणार त्या मुळे डॉक्टर आणि नर्स ह्यांचा सरळ संबंध रुग्णांशी येणार नाही आणि त्यांच्या जीविताला असलेला धोका कमी होईल.

इटलीत रोग्याची नाडी तपासतात???

(येथे 'नाडी' या शब्दावर कोणताही श्लेष अभिप्रेत नाही, याची कृपया नोंद घ्यावी. 'पल्स' अशाच अर्थाने त्याची योजना केलेली आहे, तथा हा प्रश्न आत्यंतिक गांभीर्यपूर्वक विचारलेला आहे.)

(आजवरच्या अमेरिकेतील सत्तावीस वर्षांच्या वास्तव्यात डॉक्टरांकडे जाणे अगणित वेळा झाले असेल, परंतु आजतागायत एकाही डॉक्टराने वा डॉक्टरणीने (बाकी काहीही तपासले असेल, परंतु) माझी नाडी तपासलेली नाही. सबब, इटलीत तशी पद्धत असल्याचे वाचून आश्चर्य वाटले, इतकेच.)

हॉस्पिटल मधील सफाई, रुग्णांची तपासणी,त्यांना गरजेच्या वस्तू पुरवणे हे सर्व काम रोबोट नी केले पाहिजे .कारण रोबोट चे खूप मोठे कौतुक वाचून वाचून तशा अपेक्षा वाढल्या आहेत.

पाहा हं! बेरोजगारी वाढली, म्हणून उद्या तुम्हीच आरडाओरड कराल.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुग्णांची वाहतूक सेल्फ ड्राईव्ह गाड्या करत आहेत अशी बातमी अजुन अमेरिकेमधील कोणत्याच सूत्र तर्फे आली नाही .

कल्पना छान आहे. रुग्णाने ९११ दाबल्यावर, आलेल्या रुग्णवाहिकेतून रोबो उतरून रुग्णास कन्व्हेयर बेल्टवर फेकीत आहे, रुग्ण कन्व्हेयर बेल्टवरून सरकत रुग्णवाहिकेत चढविला जात आहे, मग स्वयंचलित रुग्णवाहिका ठणाणा करीत रस्त्यात कशालाही न धडकता वा कोणालाही न उडविता रुग्णालयात पोहोचत आहे, तेथे रुग्णास क्रेनने उचलून बेडवर टाकले जात आहे... अशी काहीबाही रम्य चित्रे डोळ्यांसमोरून तरळून गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

staff reduce the risk of direct contact

The shiny new robots gently check the pulses of highly infectious patients on life support in the Italian epicentre of COVID-19.
The doctors and nurses love them because they also help save their own lives.
Italians have seen the world around them turn unrecognisable from the various lockdowns and social distancing measures used to fight the new coronavirus outbreak.
But little appears to have pained them as much as seeing dozens of doctors and nurses die while trying to save the tens of thousands of patients who have suddenly ended up in hospitals across Italy's pandemic-hit north.
The country's medical association said Friday that at least 70 medics have died from various causes since Italy recorded the first official COVID-19 death on February 21.
The fear is that an overwhelmingly majority of the 70 would still be alive today had they been better protected against the coronavirus.
This helps explain why the doctors are nurses in a hospital near Italy's mountainous border with Switzerland are laughing behind their facemasks while posing for photos with their new robot
Tecxplore.com
Var hi mahiti aahe.
Mi science alert he लिहाल ते चुकीचं होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

TIFR आणि IISc यांनी कोविड ग्यान म्हणून वेबसाईट सुरू केली आहे. रोगाविषयी उपलब्ध ज्ञान ते संसर्गाविषयीची गणिती मॉडेल्स वगैरे विविध माहिती त्यात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोना डायरी - २

२२ मार्चचा जनता कर्फ्यू लोकांनी स्वयंस्फूर्तीने पाळला. पण संध्याकाळी काहीही कारण नसताना अनेक लोकं रस्त्यावर उतरले व अशा रीतीने दिवसभर पाळलेल्या कर्फ्यूला गालबोट लागलेच.

२३ मार्चला महाराष्ट्र सरकारने घोषणा केली की ३१ मार्च पर्यंत सर्व बंद. पेपर बंद. मार्केट यार्ड बंद. रस्त्यावर वाहने बंद वगैरे........वगैरे........आता करोनाचे सावट चांगलेच गडद झाले होते. थोडी जास्तच अनिश्चितता पण जाणवायला लागली होती. मग ताबडतोब घरात काय आहे आणि नाही याचा आढावा घेतला. जे काही आणायला पाहिजे होते ते आणायला बाहेर पडलो. गुजरात कॉलनीत भाज्या आणायला गेलो. लोकांची झुंबड उडाली होती. सर्व भाज्या होत्या पण लोक जरा जास्तीच्या घेऊन ठेवत होते. काही जणांनी तोंडावर फडकी, मास्क लावले होते. पण बहुतेक लोक मास्क वगैरे न लावताच होते. बिनधास्त. किराणा दुकानात सामान घेण्यासाठी लाईन लागली होती. पण दुकानदार फक्त दोन तीन जणांना आत घेत होते. त्यांचे झाल्यावर मग पुढचे लोक. पण बाकीचे दुकानाबाहेर असलेले लोक मात्र घोळका करूनच दुकानाबाहेर उभे होते. आम्ही भाज्या वगैरे घेऊन परतलो. घरात शिरल्या शिरल्या प्रथम बेसिन जवळ जाऊन हात धुतले. भाजी आणि आणलेल्या भाज्या तशाच बाजूला ठेवल्या. दुसऱ्या दिवशी बाहेर काढण्यासाठी.

तशी माझी कोणतीही इच्छा अपूर्ण रहात नाही.

ज्या वेळेस मी नोकरी करत होतो त्यावेळेस टेन्शन तर खूप असायचे, जसे सगळ्यांनाच असते. माझी कंपनी सीट बनवते आणि आम्ही ते जगातल्या जवळ जवळ सगळ्या कार तयार करणाऱ्या कंपन्यांना देतो. आमचा सप्लाय "जस्ट इन टाइम/सिक्वेन्स" असल्यामुळे आणि मी ऑपरेशन हेड असल्यामुळे कधीही रात्री बेरात्री फोन यायचे. मला फोन आला म्हणजे बहुदा सगळ्या लोकांचे साधारणपणे परिस्थिती सुधारायचे जे प्रयत्न असतात ते थकलेले असायचे. अशा वेळा तीन-चार महिन्यातून एखादे वेळेसच यायच्या, पण याची दहशत/प्रेशर कायम मनावर असायचे. कारण रात्री बेरात्री फोन वाजायचा. तो फोन घेतला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी OEM च्या प्लॅंट मॅनेजर समोर उभे राहायला लागणार हे निश्चित. तेव्हापासून मला बऱ्याचदा खूप वाटायचे की मस्त घरी शांतपणे बसायला मिळावे. अजिबात टेन्शन नको. मग आपल्याला हे करता येईल, ते करता येईल वगैरे वगैरे.......

२४ मार्चला रात्री ०८०० वाजता मोदीजींनी देशभरात ३ आठवड्याचा लॉकआउट जाहीर केला. ३१ मार्च पर्यंत असलेली अनिश्चितता अजून वाढली. आता एप्रिल १४ पर्यंत निर्बंध होते. पण अर्थातच मला या अशा तऱ्हेने शांत बसायची इच्छा पूर्ण होऊन नको होती.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे २५ मार्चला सकाळी दूधवाला तर नेहमीप्रमाणे घरी आला. पण आमच्या सोसायटीत काम करणारा वॉचमन आला नव्हता. ५६ फ्लॅटची आमची सोसायटी. रोज कचरा गोळा करायचे काम हा वॉचमन करायचा. मग सोसायटी मेम्बर्सची मिटिंग झाली. आता सोसायटी ऑफिस वापरले नाही. तर ओपन पार्किंग मधे, प्रत्येक माणसामधे अंतर राखून मिटिंग घेतली. तोडगा काढला. कचरा आणि त्याचे डिस्पोजल हा महत्वाचा आणि आरोग्याशी निगडित प्रश्न होता. वॉचमनसाठी एक आय कार्ड बनवले. ते पोलिसांना दाखवून तो रोज येऊ शकेल अशी आशा होती.

बिल्डिंगमधले एक ग्राउंड आहे. रोज संध्याकाळी तिथे मुलांचा कलकलाट असायचा. फुटबॉलचा खेळ रंगायचा. पण पोलीसच येऊन गेम बंद करून गेले होते. ग्राउंडला कुलूप लागले. संध्याकाळी सोसायटी मधल्या बाकड्यांवर महिला वर्ग येऊन बसायचा. तो बंद झाला. सोसायटीमधे फिरणारी माणसे पण बंद झाली. सर्व कार आणी टू-व्हीलर पार्किंग मधून निघायच्या बंद झाल्या. सोसायटी मधे येणारे व्हिजिटर बंद झाले.

ब्रेड, अंडी वगैरे मिळत आहेत असे कळले म्हणून बाहेर रस्त्यावर आलो. शेजारच्या मेडिकलवाल्या कडून ब्लड प्रेशरच्या दोन महिन्याच्या गोळ्या घेतल्या. त्याने दुकानात एंट्री बंद केली होती. एका वेळी दोन माणसे पुढे यायची आणि त्यांचे झाले की पुढची. त्याने दुकानाबाहेरच एक सॅनिटायझरची बाटली ठेवली होती. (त्याचा लोकं कसा गैरवापर करत होते हे मी एका दुसऱ्या पोस्ट मधे लिहिले होते.) किराणा मालाच्या दुकानात पण तेच. रस्त्यावर तरी माणसे दिसत होती पण याच कामासाठी बाहेर पडलेली. गाड्या वगैरे नव्हत्या.

असेच एकदोन दिवस गेले आणि पेट्रोल पंपपण सामान्य माणसाला बंद झाले. महाराष्ट्रामधे करोना पेशंटची संख्या संपूर्ण देशात जास्त होती.

२९ एप्रिल - रोज संध्याकाळी टीव्हीवर मराठी मालिका बघायचो. ठराविक एक-दोनच बघायचो, पण बघायचो. आता मालिकांचे आधी शूट केलेले भाग पण संपले. नवीन भाग शूट होत नव्हते कारण शूटिंग पण बंद होतं. आता मनोरंजनाचा प्रश्न उभा राहिला. पण बऱ्याच चॅनेलनी जुन्या सिरीयलचा स्टॉक बाहेर काढला. आम्ही जुनी असंभव नावाची गाजलेली सिरीयल परत बघायला लागलो.

एव्हाना माझ्या काकूचा दहावा दिवस आला होता. मोघे गुरुजींना फोन केला. पण आता घाट पण बंद होता. घाटावरचे सर्व विधी बंद होते. माझ्या आयुष्यात घाटावर दिवस न होण्याचा हा पहिलाच अनुभव होता. त्यांनाच विचारून माझ्या भावाने घरातल्या घरात काही विधी केले.

आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधे माझे एक स्नेही राहता. त्या नवरा-बायको-दोघांचे वय ६५ च्या पुढे. पण तरी एकदम ऍक्टिव्ह. त्याचीच लग्न झालेली मुलगी आमच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर राहते. त्यामुळे मुलीचे रोजच आई-वडिलांकडे जाणे येणे. आई-वडील आणि मुलगी दोघेही एकमेकांवर अवलंबून. रोज भाज्या पोळ्या शेअर करणे व्हायचे. आता आई-वडिलांनी मुलीला घरी यायला मज्जाव केला. म्हणजे सेफ्टी म्हणून. काही द्यायचे असेल तर मुलगी घराबाहेर पिशवीत ठेऊ लागली. नंतर आई-वडील पिशवी घरात आणायचे. एवढे भय या व्हायरसने लोकांच्या मनात प्रस्थापित केले.

करोनामुळे सर्वच व्यवहारात उलथापालथ झाली होती. न भूतो न भविष्यति अशी ...........

क्रमश: ( जमेल तसे. जमले तर).

©️ शिरीष शेवाळकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोघे गुरुजींना फोन केला. पण आता घाट पण बंद होता.

(या प्रतिसादातून.)

मोघे गुरुजींचा संदर्भ पुण्याबाहेरच्या वाचकांना पूर्णार्थाने समजण्याची शक्यता शून्य. कृपया स्पष्टीकरण द्यावे.

(हिंट: 'मोघे' हे आडनाव नसून संस्था (institution) आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीबीसी गुजराती सेवेसाठी दिल्लीत वार्तांकन करणाऱ्याकडून -
कोरोना वायरस: 'निज़ामुद्दीन में मेरे जाने की ख़बर गुजरात पुलिस को कैसे मिली?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Feb 2020 कोरोनाच्या बातम्या येतच होत्या, कम्पनी वेगवेगळ्या ठिकाणची ट्रॅव्हल अडव्हाईजरी देत होती, पण इंटरनॅशनल ट्रॅव्हलशी संबंध नसल्याने जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात काहीतरी चालू आहे इतकाच संबंध होता. देशांतर्गत प्रवास सुखेनैव चालू होता

मार्च 2020 फेब च्या शेवटच्या आठवड्यात स्विमिंग साठी कोच लावला होता, त्यामुळे रोज सकाळी पूल वर हजेरी लावायची होती, अजूनही पुण्यात सकाळी थंडी होती, पाण्यात काणे जीवावर यायचे.
6 मार्च ला मलाच ताप आला, ताप , सर्दी , तोपर्यंत कोरोनाची लक्षणे वगैरे ओळखीची झाली होती. त्यामुळे त्यावर विनोद करून झाले,
ताप प्रकारात जवळ जवळ आठवडा गेला. एप्रिल मध्ये एक इव्हेंट असल्याने स्विमिंग चुकवून चालणार नव्हते, त्यामुळे ताप गेल्या गेल्या एक दिवस स्विमिंग करुन आलो, या मिस अडवेनचर बद्दल रनिंग ग्रुप मधल्या दुसऱ्या माणसाने फोन करून दम भरला. तुझी इम्युनिटी कमी असताना स्वतःचा आणि तुला कोरोना झाला असेलंच तर दुसऱ्यांचा जीव धोक्यात घातल्या बद्दल.
हळू हळू कोरोना चे सावट गडद होऊ लागले होते.

13 मार्च ला सगळे पूल, जिम बंद ची सूचना निघाली,
माझा जिम अगदी छोटा, बुटीक असल्याने चालू राहील असा अंदाज होत, (ज्यात 10 पेक्षा जास्त माणसे कधीच नसतात). पण पुढच्या 2 दिवसात तो पण बंद झाला

आता स्वीम बंद आहे तर रन आणि सायकल कडे जास्त लक्ष देऊ ठरवले, पण मोठ्या ग्रुप ने पळता येणार नव्हते, सो 2 3 जण एकत्र येऊन पळू लागलो.
17 18 ला मुंबईला पण जाऊन आलो, तो पर्यंत नॉर्मल आयुष्य डिस्त्रब व्हायला सुरुवात झाली होती. मुंबईत हॉटेल अगदी WE हायवे वरच आहे, आयुष्यात कधी इतका सुनसान हायवे पहिला नव्हता, तेव्हाच सेरिअसनेस ची जाणीव व्हायला लागली.

या सगळ्यात अचानक फिटनेस इंडस्ट्री झपाट्याने बदलायला लागली.
युनिव्हर्सिटीमध्ये जमून होणारे ग्रुप वर्क आउट बंद पडले
रनिंग सुरवातीला 2 3 जण करायचे , मग एकेकटे जाऊ लागले, 4 5 दिवसात ते सुद्धा बंद पडले.
रिकाम्या हायवे वर सायकल घेऊन गुंगाट सुटायचे स्वप्न स्वप्नच राहिले, सायकलिंग सुद्धा बंद.
बऱ्याच साऱ्या कोचेस नि ऑन लाईन सेशन सुरू केली,
दिवसाच्या ठराविक वेळी इंस्टा /FB वर येऊन ग्रुप वर्क आउट सुरु झाले
जवळ जवळ सगळ्यांनीच घरी काय व्यायाम करतो याचे अपडेट टाकायला सुरवात केली. सारी चॅलेंज, कपल चॅलेंज सारखे 20/20 पुश अप चॅलेंज, स्पार्टान वर्क आउट चॅलेंज वगैरे फिटनेस ग्रुप मध्ये सुरू झाले.

FB वर अचानक FB लाईव्ह करायचं फॅड आलं, कधी कट्टा न करणारे, न बोलणारे लोक अचानक झूम कट्टा करू म्हणून टूम काढू लागले.

फिटनेस इंडस्त्री मध्ये बरेच बदल होतील असे वाटतंय, बघू पुढे काय काय होते ते

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रजेवर जातोय म्हणालो पाच दिवसांपूर्वी पण आता सर्वच.जण रजेवर आहेत. माझ्या रजेचं कौतुक नाही.
रोज तासभर एकटाच फिरून येतो. कुठे काय चाललय ते पाहतो.

पण आता घरून दम मिळाला आहे. आचरटपणा पुरे.
कारण - राजाजी पथ भागात एका ठिकाणी ५-१५ मार्च दरम्यान झालेल्या एका लग्नसमारंभात आलेल्या पाहुण्यांना करोना लागला आहे आणि एका कुटुंबातील पाच जण आजारी आहेत करोनाने. त्यातल्या बाई काल वारल्या. चारजण मुंबईत हलवले. आता पोलिस सगळीकडे शोध घेत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोज सकाळी cnn वाचून दिवसाची सुरुवात होते. रोज कमीत कमी १००० माणसे अमेरीकेत मृत्युमुखी पडत आहेत हे वाचून धस्स होते. तेरवा ६०००, परवा ७०००, काल ८००० ....
आज जनरल सर्जन यांचा इशारा आहे की हा आठवडा पर्ल हार्बर किंवा ९/११ इतका भयावह आहे मात्र आशेचा किरण दिसत आहे - https://www.cnn.com/2020/04/05/politics/jerome-adams-coronavirus/index.html
__________
अमेरीकेत काल मृतांची संख्या होती +1,331
आज आहे +७३३
https://www.worldometers.info/coronavirus/#countries
_________
बाकी स्तोत्रे, ज्योतिष, बुद्धीस्ट ट्वीट्स वाचन, पॉडकास्ट श्रवण, कविता वाचन - आदि छंद सुखेनैव चाललेले आहेत. घरात खाण्यापिण्याचे माफक प्रयोग होताहेत. औषधे मेल-इन-ऑर्डर करुन टाकली म्हणजे , परत परत बाहेर जायला नको.
________

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत ट्रंपतात्यांचा आचरटपणा सुरूच आहे.

आता सीडीसी (Centre for Disease Control) ह्या संस्थेनं आता जाहीर केलं आहे की बाहेर पडताना तोंडावर फडकं गुंडाळा; कापडी मास्क, रूमाल, वगैरे. हे बंधनकारक नाही, पण सूचना आहे. तात्यांनी हे म्हणून झालंच वर म्हणे, कुणी परदेशी पाहुणे, राजे, राण्या, देशाचे प्रमुख, डिक्टेटर्स वगैरे आले तर मी तोंडावर फडकं बांधून जाऊ का; मी काही ही सूचना पाळणार नाही.

न्यूयॉर्कमध्ये आता तोंडावर फडकं बांधणं बंधनकारक आहे. कारण अर्थातच, लक्षणं दिसत नसली तरीही लोक करोनाबाधित असू शकतात आणि त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होऊ शकतो. इतरांची काळजी म्हणून नाका-तोंडावर फडकं असावं.

आमच्याकडे स्थानिक परिस्थिती फार बदललेली नाही. काल, शनिवारी पुन्हा खरेदीसाठी बाहेर पडले होते. सकाळी लवकर उठायचा आळस केला, बाहेर ५-६ अंश से. तापमान आणि वारा-पाऊस होता. साडेआठला उठून तातडीनं फार्मर्स मार्केटात गेले. हवेमुळे गर्दी आणखीनच कमी होती. तिथून अमेरिकी वाणसामानाच्या दुकानात गेले. दुकान उघडून तासभर झाला होता, त्यामुळे काही मिळणार नाही आणि वर रांगेत उभं राहावं लागेल असं वाटत होतं. पण हवेमुळे लोकांनीही उठायला आळस केला असावा. सगळ्या वस्तू मिळाल्या. दुकानातून बाहेर पडताना बघितलं तर आत शिरायला रांग होती.

कुल्लाकागद येत आहेत, पण सकाळी दुकान उघडल्यावर तासाभरात गायब. ठरावीक चीजं, दही, दुधाचे मोठे कॅन, कॉफी, ठरावीक ब्रेकफास्ट सिरीयल ह्यांची हीच गत. कोरडे काळे वाटाणे (ब्लॅक बीन्स) गायब पण भिजवून, शिजवलेल्या वाटाण्यांचे टिन्स चिकार दिसले.

---

ऑफिसात आमच्या कामाची दिशा बदलली आहे. कॉल सेंटरमधल्या काही लोकांना बायबाय केलं. (त्या बाबतीत मध्यम आकाराची आणि स्टार्टप असली तरीही आमची कंपनी बरीच सहृदय म्हणावी लागेल. वाढीव एक महिन्याचा वैद्यकीय विमा आणि नवा रेझ्युमे लिहिण्याची सेवा ह्या गोष्टी पुरवल्या आहेत.) तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या सगळ्यांच्या नोकऱ्या टिकल्या; विदाविभाग आणि सॉफ्टव‌ेअर दोन्ही.

विदाविभागात आम्ही १२ लोक आहोत; पैकी (मी आणि आणखी एक असे) २ लोक पूर्णवेळ आणि इतर चार लोक अर्धवेळ काम करत आहेत ते कॉल सेंटरची एफिशियन्सी वाढवण्यावर. मी विदा गोळा करून देत्ये; दुसरा एक जण प्रारूपं (मॉडेलं) बनवतोय. पुन्हा सगळं पूर्ववत (!) होईल तेव्हा कदाचित कॉल सेंटरमधल्या नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं असेल. आम्ही आमची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी केलेली ही धडपड. आम्ही जे दोघे ह्यावर पूर्णवेळ काम करत आहोत, दोघंही ह्या परिणामाचा विचार करून अस्वस्थ आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

न्यूयॉर्कमध्ये आता तोंडावर फडकं बांधणं बंधनकारक आहे. कारण अर्थातच, लक्षणं दिसत नसली तरीही लोक करोनाबाधित असू शकतात आणि त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होऊ शकतो. इतरांची काळजी म्हणून नाका-तोंडावर फडकं असावं.

ते सर्व ठीक आहे, परंतु मास्क विकत कोठे मिळतात, हा प्रश्न आहे. दुकानांत पाहिलेले नाहीत. ॲमेझॉनवर दिसतात, परंतु आज मागविले तर मे किंवा जुलैमध्ये येतील म्हणतात. म्हणजे उपयोग शून्य. (तेही बहुधा चीनमधून येत असावेत, अशी शंका आहे. चूभूद्याघ्या.)

हं, रुमाल बांधून काम चालविता येईलच म्हणा. (पण म्हणजे आता रुमाल विकत घेणे आले. रुमाल बाजारातून गायब झाले नाहीत, म्हणजे मिळवले. भांडवलशाही झिंदाबाद!)

(त्या बाबतीत मध्यम आकाराची आणि स्टार्टप असली तरीही आमची कंपनी बरीच सहृदय म्हणावी लागेल. वाढीव एक महिन्याचा वैद्यकीय विमा आणि नवा रेझ्युमे लिहिण्याची सेवा ह्या गोष्टी पुरवल्या आहेत.)

सामान्यतः यात विशेष असे काही नाही. बऱ्याच कंपन्या एम्प्लॉयीज़ना लेऑफ देताना हे करतात. (दोन वेळचा अनुभव!) बहुधा स्टँडर्ड एचआर प्रॅक्टिस म्हणता यावी. (चूभूद्याघ्या.) तोंडाला पाने पुसणे याहून अधिक महत्त्व मी त्याला देणार नाही; दानशूरपणा, सहृदयता वगैरे सद्गुण तर त्याला मी अजिबात चिकटविणार नाही.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑस्टिनातच ह्यापेक्षा खूपच जास्त रक्तपिपासू कंपन्या स्वानुभवानं किंवा मित्रमैत्रिणींच्या अनुभवातून बघून झाल्या आहेत. गेल्या तीनच वर्षांतले निरनिराळ्या स्टार्टप कंपन्यांचे अनुभव...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मेंबरांचे अनुभव पाहता फार काही कोणाला त्रास झालेला दिसत नाही.
खिरीऐवजी शिरा खावे लागणे व वजन वाढायला लागणे वगैरे गोष्टी इतिहासात नमूद होतील का ह्याबाबत साशंक आहे.
लाॅकडाऊनची मुदत वाढवल्यास ज्यांचे उत्पन्न बुडाले आहे व जे लोक बेरोजगार झाले आहेत ते लोक लाॅकडाऊन धाब्यावर बसवून बाहेर पडले तर कदाचित इतिहास घडू शकेल भारतात.
काहीतरी एक्सायटिंग घडावं असं वाटतं; पण त्याची झळ आपल्याला बसली तर काय करणार असंही वाटतं.
त्यामुळे सध्या पिक्चर पाहणे व तीन वेळा जेवणे हा कार्यक्रम.
इथल्या सुपरमार्केटच्या तसल्याच कहाण्या सांगून काही उपयोग नाही. सगळ्या सुखवस्तु लोकांचं लाईफ सारखंच तेज्यायला.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ3

थोडी गल्लत होतीय का ?
सध्याचे ममव लोकं ,(इथे लिहिणारा वर्ग)दोन तीन महिने उत्पन्न बंद असेल तरीही चार वेळा जेवण्याइतपत पैसे राखून असतात. आणि आत्ता तर दोन तीन आठवडेच झाले आहेत.
आपले वास्तव्य कदाचित भारताबाहेर असावे.
इथे पोटात चार घास असले तरी त्याहून अतिशय मोठ्ठी भीती आहे, नोकरदार वर्गात. किमान 20-30 टक्के लोकांना आपल्या नोकऱ्या जातील अशी भीती वाटत आहे.
स्वतंत्र व्यवसाय वाल्या वर्गातील बहुसंख्य लोक हे प्रॉफिट वगैरे विसरून आपले लॉसेस कमीतकमी कसे राहतील याच्या काळजीत आहेत. मध्यम लेव्हल चे व्यवसाय बंद पडण्याची शक्यता बरीच दिसते.
कॉलेजातून नवीन बाहेर आलेल्या तरुणांचे वेगळेच चालू आहे.(यात फरक पडला नसेल तर तो फक्त प्रोफेशनल वर्गातील established वर्गाला)
पण आत्ता चालू आहे लॉक डाऊन.
त्यामुळे तुमचे म्हणणे की चार ठाव खाऊन वगैरे हे वरवर बघितल्यास तसेच आहे.प्रश्न लोकांच्या पोटात काय आहे तो.आणि लोक डाऊन संपल्यावर एकेक महिन्यात तो दिसणारच आहे.
आपण जिथे वास्तव्य करून आहेत तिथली काही निरीक्षणे शेअर करता आली तर बरे होईल.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साॅरी हां.
काय खिल्ली बिल्ली नव्हतो उडवत.
घरात बसून काय निरीक्षण करणार? बाहेर लोक कुत्री फिरवायला जातात सकाळ संध्याकाळ. अवतीभवती सगळेच काळजी नसलेले लोक राहतात असं वाटतंय. इकडे बघण्यासारखं काही नाही. नाही म्हणायला बसने जाताना एकदा ग्रॅड प्रिंसेस दिसली होती ओकलंड पोर्टात डाॅक केलेली; पण त्यावर कोणी नव्हतं.
अजून सहा महिन्यांनी जातील नोकऱ्या. घरी जाऊन बसायची तयारी आहे आपलीपण. तसं काही नाही हट्ट की इथंच राहायचं.
बहुतेक कोणा कोणाला काढायचं कामावरून हीच चर्चा चालत असेल आजूबाजूच्या घरात. तशी ओकलंडमध्ये आहे गरीब वस्ती; पण मी काही तिकडं गेलो नाही.
घरी काम करणार म्हणून कंपनीने जास्तीच्या स्क्रीन्स (माॅनिटर्स) घ्यायला पैसे देऊ केलेत सगळ्यांना. वर पन्नास मिलियन दान करणार म्हणे.
तरी नोकऱ्या जाणार हे खरंच. काही भारतीयांचा फायदा होऊ शकतो इकडच्या गेल्या आणि तिकडं आल्या तर; पण त्याला वेळ आहे. इकडं बेघर लोकांना शेल्टर केलेत, सूप किचन चालवले जाताहेत म्हणे. मी काही गेलो नाही बुवा स्वयंसेवक म्हणून. पिंडच नाही आपला तो.
सुपर मार्केट दोन तीन प्रकारची आहेत. लाॅकडाऊन केलं तेव्हा पहिल्या आठवड्यात फिरकलोच नाही. माहिती होतं ना! तरी जवळच्या ठिकाणी उगीच रिकामे रॅक्स पाहायला गेलो. तेही लांबूनच पाहीले आणि लगेच फिरलो. इंडियन ठिकाणी फिरकलेलो नाही आणि फिरकायचा विचारही नाही.
मग नंतर रिस्ट्रीक्षन आल्यावर गेलतो एकदा किराणा भरायला. काही त्रास झाला नाही. व्यवस्थित रांग, आत जाताना ग्लव्हज् देत होते, हातावर सॅनिटायझर मारत होते वगैरे.
बाकी करोना यायच्या आधीच भारतात बऱ्यापैकी लागली होती असे ऐकून आहे त्यामुळे त्या सर्वांनाच सहानुभूती. शेठवरचा ब्लेम टळणार म्हणून शेठचे अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी ???
पुन्हा गल्लत होतीय.
तुमचे 'निरीक्षण' बरोबरच होते.
मी फक्त त्या निरीक्षणाखाली लोकांची काय घालमेल होतीय ते लिहिले इथे.
तुम्ही खिल्ली उडवत होतात वगैरे असे नाही.
इथले 'दृश्य' परिणाम दिसायला दोन तीन महिने लागतील असा अंदाज (अर्थात तोही चुकीचा ठरू शकतो)
गैरसमज नसावेत.
हा प्रतिसाद श्री नगरी निरंजन यांच्या पोस्ट ला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑनलाईन निरीक्षण करतो फेसबुकवर वगैरे तर बहुतेक एनाराय सुखातच दिसताहेत; पण भारतातले लोकही दु:खात वाटत नाहीयेत.
थाळ्या वाजवणे, दिवे लावणे, मुसलमानांना टारगेट करणे वगैरे कार्यक्रम जोरात चालू आहेत असं दिसतं.
पुण्यातल्या दोन-तीन मित्रांशी बोलणं होत असतं. तबलिगींना सगळेच शिव्या घालताहेत सध्या. तिकीट त्यांच्यावर फाडलं जाणार म्हणे.
बाकी टेस्टिंग फारच कमी आहे असं ऐकलं. अजून एक लाख लोकही टेस्ट केले नाहीयेत. ह्याचा इतिहास कोणी लिहीणार आहे की नाही?
पीएमकेअर्स मध्ये पैसे देण्याच्या घोषणांवरून १० हजार कोटी जमा व्हायला हवेत म्हणे एव्हाना पण टेस्टिंगही होईना आणि पीपीईसुद्धा येईनात. त्यात डाॅक्टरांचे पगार कापलेत म्हणे. पीएम रिलीफ फंड असताना हा फंड कशाला हेही गुलदस्त्यात आहे.
पीएमकेअर्सच्या वेबसाईटवर काही दिवस स्विफ्ट कोडही होता म्हणे.
इथं आहेत का कोणी एनाराय महाभाग ज्यांनी पाठवलेत पैसे त्या फंडात?
बाकी एक लाख सत्तर हजार कोटींचं प्याकेज जाहीर केलंय ना? त्याचा फायदा होईल का छोट्या व मध्यम आकाराच्या बिझिनेसमनना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या Worldometer च्या साईटवर प्रत्येक देशाने किती टेस्टिंग केले याचा डाटा द्यायला सुरवात केली. त्यान्च्या आजच्या अपडेट प्रमाणे भारताने एक लाख चाळीस हजार टेस्टिंग केलं आहे, तर अमेरिकेने २१ लाख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेस्टिंग खूपच कमी असल्याने भारतातल्या रुगणांची संख्या कृत्रिमरित्या कमी असण्याची शक्यता दाट आहे.
नंतरही ह्या व्हायरसमुळे मेलेल्यांची संख्या नीट रिपोर्ट होईल की नाही ही शंकाच आहे. भारतातून येणाऱ्या कोणत्याही सरकारी विद्यावर विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाहीय.
दुसरी गोष्ट म्हणजे अनेक देशांनी फिस्कल डेफिसिट मर्यादा वगैरे धाब्यावर बसवून जीडीपीच्या नऊ-दहा टक्के रक्कम खर्च करायची घोषणा केली आहे; कारण ह्या पॅन्डेमिकनंतर येणारी आर्थिक घसरण याहूनही जास्त त्रासदायक असू शकेल.
भारतात त्याबद्दल अतिशय तुटपुंजी हालचाल आहे.
एकतर सरकारला पैसा कुठून उभा करायचा ते कळत नसेल किंवा सरकारला पर्वाच नसेल. आधीच कमाईअभावी मागणी बसलेली असताना हा फारच मोठा तडाखा आहे अर्थव्यवस्थेला. हे सरकार त्यासाठीही तयारीत आहे असे मला वाटत नाही. सध्या फक्त टॅक्स व कर्जाच्या हप्त्यांवर मोरॅटोरियम वगैरे शाॅर्ट टर्म उपाय केलेत; पण काही दूरगामी उपाय केले असल्यास मला माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


टेस्टिंग खूपच कमी असल्याने भारतातल्या रुगणांची संख्या कृत्रिमरित्या कमी असण्याची शक्यता दाट आहे.
भारतातून येणाऱ्या कोणत्याही सरकारी विद्यावर विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाहीय.


दोन विधानं एकत्र करुन बघीतल्यास जास्त प्रमाणात टेस्टींग करुन सुद्धा तुमचे समाधान होणार आहे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त टेस्टिंग माझ्या समाधानासाठी नसून भारतात राहणाऱ्या लोकांच्या भल्यासाठी आहे. ज्या देशांनी प्रचंड प्रमाणावर टेस्टिंग केलं त्यांना आटोक्यात आणता आला आहे प्रादुर्भाव. जर्मनीचं उदाहरण घ्या.
तुम्ही भारतात असाल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर गुड फाॅर यू!
बाकी जीडीपीपासून बेराजगारीपर्यंत प्रत्येक आकडेवारीत सरकारने हस्तक्षेप केला आहे; त्यामुळे करोनाच्या आकड्यांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. कोणाचं समाधान झालं की नाही झालं त्याने काही फरक पडत नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

करोना होऊन त्यातून बरे झालेले कोणी आहेत का ? त्यांचे अनुभव वाचायला जास्त आवडेल. किंवा, हॉस्पिटल मध्ये काम करणारे, नर्सेस, डॉक्टर्स यांचे अनुभव जास्त बखरीय असतील. बाकी सुखवस्तु लोकांच्या सर्व अनुभवांत आता तोचतोचपणा डोकावायला लागला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केरळमध्ये बरे झालेल्या वृद्ध दंपतीची बातमी

https://m.hindustantimes.com/india-news/93-yr-old-kerala-man-88-yr-old-wife-cured/story-FlAwzIJq6fkLvwgv3KQKzL.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रोफेसर अजित शर्मा यांचा करोना इन्फेक्शनमधून बरे होण्याचा अनुभव

https://www.youtube.com/watch?v=_7yWpvWCw4Q&feature=share

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. योगेश शौचे हे ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत.
त्यांनी कालच्या महाराष्ट्र टाईम्स मधे पूर्वी होऊन गेलेल्या एका 'साथी' बद्दल लेख लिहिला आहे .
तो इंटरेस्टिंग वाटला म्हणून लेखाची लिंक इथे देत आहे.
https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/coronavirus-unknown-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा रात्री बायकोच्या मोबाईलवर तिच्या परिचयातील डॉक्टर मैत्रिणीचा मेसेज आला. आमच्या एरियामध्ये एक केस सापडली आहे. जवळच्या मोठ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलयं. बरोबरच्या ५-६ लोकांना देखरेखीखाली ठेवलयं. बायकोची मैत्रीण आयसीयूत काम करते. ती त्या पॉझिटिव पेशंटच्या ड्युटीवर आहे. तिने घराबाहेर पडणे एकदम कमी करा म्हणून सांगायला मेसेज केला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी तिने व्यवस्थापनाकडून हॉस्पिटलमध्ये रहायला यायची ऑर्डर आल्याचे सांगितले. किती दिवस रहायला लागेल याची काही कल्पना नाही. सामान पॅक करत होती. बायको दोन दिवस बरीच अस्वस्थ होती.

आत्ताच झालेल्या चॅट मध्ये आणखी एक केस आल्याचे कळले. दोन्ही पेशंट वैद्यकीय भाषेत 'बॅड' आहेत.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा कलीग मुंबई मधला,त्याची 8 बिल्डिंग ची सोसायटी.
१५ ला लॉक डाऊन उठेल ची सगळेजण वाट पाहत होते, तर एक रुग्ण त्यांच्या सोसायटीत मिळाला,
ताबडतोब सोसायटी सील झाली, dis इन्फेक्ट वगैरे झालीच पण सगळ्यांना 21 दिवस अजून लॉक डाऊन ला तोंड द्यावे लागणार आहे,
त्या अवधीत अजून रुग्ण सापडला नाहींतर 21 दिवसांनंतर बाहेर पडू शकेल, नाहीतर लॉकडाऊन अजून वाढेल

कलीग चि घालमेल दुसऱ्याच कारणासाठी चालू आहे, तो सेल्स मध्ये आहे, Q1 काही फार ग्रेट नव्हता करण मार्च मध्ये काही विकताच आले।नाही, आता दुसऱ्या कोणाच्यातरी आजरपणामुळे याचे Q2 चे 20 30 दिवस गेले म्हणजे Q2 पण हाताचा गेला,

म्हणजे इकडे तुमचे भविष्य कम्युनिटी च्या भविष्याशी जोडले गेले आहे

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

___________ खालील व्हिडीओ जरुर ऐका. स्वत:च्या जबाबदारीवर त्यातील टिप्स ग्रहण करा________________

करोनाशी कसे लढाल्

कुमोओ सांगतात- ताप येणार अगदी ३-३ दिवस येणार पण पडून रहायचं नाही. उठुन थोडं थोडं स्ट्रेच करा. इच्छाशक्ती फार मजबूत हवी. उठायचं, व्हायटॅमिन्स घ्यायची, वेळेवर टॅलेनॉल घ्यायची. पाणि, गेटॉरेड पिणे वगैरे करत रहा.
खोल श्वास घ्या. होय दुखणार पण घ्यायचा खोल श्वास घ्यायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन कोरोना व्हायरसमुळे आज सगळं ठप्प झालं आहे. जगावर आलेलं गेल्या १०० वर्षांतलं हे सगळ्यात मोठं अरिष्ट आहे. आणि या अरिष्टावर नेमकी मात कशी करायची, याबद्दलचे ठोस उपाय सध्या तरी कोणाकडेही नाहीत. काही काळाने या कोव्हिड-१९ साथरोगावर काही ना काही उपचार निघतील, जग पुन्हा सुरूदेखील होईल, पण त्यानंतरचं जग मात्र वेगळं असेल. एकाअर्थी हा साथरोग जगाकरता वळणबिंदू ठरणार आहे. अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, मानसिक स्वास्थ, आरोग्यव्यवस्था अशा सर्वच बाबींवर या साथरोगाचे परिणाम होणार आहेत, होत आहेत. आणि साहजिकच, याचा परिणाम साहित्यिक-सांस्कृतिक जगतावर, लेखनावरही होणार आहे.

हे लक्षात घेऊनच आम्ही 'सजग'च्या एप्रिल-मे-जूनच्या अंकात 'कोरोनानंतरचे जग' असा खास विभाग करत आहोत. यामध्ये कोव्हिड-१९ या साथरोगामुळे साहित्य-सांस्कृतिक जगतावर काय परिणाम होतील, काय बदल होतील, किंवा इथून पुढे लेखकांपुढे कोणती आव्हानं असतील, असायला हवीत, त्यांना कसं भिडता येईल, अशा मुद्द्यांचा वेध घेणं अपेक्षित आहे. तर याबाबत आपणापैकी कुणाला लिहायचे असल्यास आम्हाला satishtambe@gmail.com या ईमेलवर संपर्क साधा किंवा इथे खाली कमेंट बॉक्समध्येही लिहू शकता. अथवा इथे मेसेज करू शकता.

काही निवडक लेख / टिपणं आम्ही प्रकाशित करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कन्नड साहित्यव्यवहारावर लॉकडाऊनचा काय परिणाम झाला आहे ह्याविषयीचा एक लेख. ह्यातले अनेक मुद्दे मराठी साहितायालाही लागू होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वैयक्तिक मत व विनम्र निवेदन

सद्यस्थितीत चालू असलेल्या साथीला कारणीभूत विषाणूबद्दल फारसा ( उपयोगी) पूर्वाभ्यास नाही . अभ्यास चालू आहे , व काळाच्या ओघात तो पूर्णही होईल.

या विषाणूशी संबंधित epidemiological माहितीही अजून पूर्णावस्थेत नाही ( अजून एखाद्या वर्षात होईल कदाचित पूर्ण )

सद्यस्थितीत साथीच्या विविध अवस्थांबद्दलची ( स्टेज १,२,३ इत्यादी ) विविध मॅथेमॅटिकल मॉडेल्स ही आत्तापर्यंत उपलब्ध माहितीच्या (म्हणजे अत्यंत कमी व संपूर्णपणे विश्वसनीय आहे किंवा कसे नक्की माहिती नसलेल्या ) आधारावर उभी आहेत . ( जसजशी माहिती उपलब्ध होत जाईल तसतशी यातही सुधारणा होईलच )

Epidemiology व जीवशास्त्र अभ्यासात प्रत्येक गोष्ट , थिअरी ही लिनियर पद्धतीनेच काम करेल अशी खात्री नसणे हे नॉर्मल असते .

सद्यस्थितीत जी माहिती जगासमोर येत आहे ती बहुधा फक्त डेटा आहे, नॉलेज नाही .

अजून विविध सीझन्स मध्ये बदलत्या वातावरणात , विविध भौगोलिक भागांमध्ये , विविध लोकसमूहांशी संपर्क आल्यावर या विषाणूचे वर्तन कसे राहील, यात काही बदल , म्युटेशन्स होतील किंवा कसे याबद्दल अजून अजून अनिश्चितता आहे .

नक्की चालणारे औषध किंवा लस बाजारात येईपर्यंत ही अनिश्चितीतता अशीच राहील असे वाटते .

आपले व इतर सरकारे आपापल्या कुवती , आकलन व उपलब्ध रिसोर्सेस नुसार काम करत आहेतच .

तरी ...

१. ज्ञानप्रबोधिनी , आयआयटी , हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील हुशार माजी विद्यार्थी .

२. हार्डवर्क युनिव्हर्सिटी , कुठल्याही पक्षाचे , सांस्कृतिक संघटनांचे प्रचारक , मंत्री संत्री इत्यादी

३. झिम्बाव्वेचे किंवा ग्रेट ब्रिटनचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान , स्थायी समितीचे अध्यक्ष, किंवा मोठ्ठ्या गणेश मंडळाचे खजिनदार

४. बेझोस , मा . अम्बानीजी , गेट्स किंवा अडानीजी इत्यादी मोठे व्यावसायिक

५. हिंदकेसरी विराट कोहली , करण जोहर , कुणीही कपूर इत्यादी खेळाडू

६.सरकारी अधिकारी, झिरो बजेट शेती तज्ञ, गोमूत्र, गोमय तज्ञ किंवा तत्सम कुणीही

७. कुठलेही ध गुरू, मुल्ला, फादर, भगत इत्यादी

८. १९ whats app ग्रुप्सचे व ३ फेसबुक ग्रुप्स चे अडमीन इत्यादी पावरफुल ....

यापैकी कुणीही असलात , तरीही उपरिनिर्दिष्ट माहिती आपणास लागू आहे , हे जाणावे .

कृपया आपल्या हुशारी , ज्ञान , स्थान , यश , आर्थिक स्थिती , पावर इत्यादींवर विसंबून, दररोज नवीन येणारा डेटा हा ज्ञान समजून काही वेडेपणा करू नये .

महाग पडू शकते .

बाकी तुमची मर्जी .

जनहितार्थ .

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो.
घरच्यांना फॉरवर्डपासून सावधान सांगताना नाकी नऊ आलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण सहमत तुमच्या मताशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला आणि पटला. खास करून,

दररोज नवीन येणारा डेटा हा ज्ञान समजून काही वेडेपणा करू नये . महाग पडू शकते .

हे मला तंतोतंत लागू पडते. पण हाती आलेला डेटा/माहिती प्रोसेस करून अटकळ बांधून शॉर्ट टर्म स्पेक्युलेटीव्ह बेट्स घेणे हा ट्रेडींग करणार्‍यांच्या रोजच्या जीवनाचा भाग असतो.

हाती आलेला डेटा पण कितपत विश्वासार्ह आहे हाही एक भाग झाला. उदा. चायनाच्या सरकारी आकडेवारीवर संशय घेणारे लेख वाचनात आले.

आज २ महिन्यांनी वुहान जिथे आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. (बंधनं उठवली तरी आजही सरकार घरी बसा शक्यतो असेच म्हणते आहे). बघायचे इतकेच आहे की कुणाला किती वेळ लागतोय. आणि या मधल्या काळात किती नुकसान होत आहे. चायनाची आकडेवारी नक्कीच विश्वासार्ह नाही पण युरोप, अमेरिकेची आकडेवारी परफेक्ट नसली तरी विश्वासार्ह आणि मॉडेल म्हणून पाहण्यास योग्य आहे. डॉ. फाउचीचे पॉडकास्ट ऐकले. बीग ड्रॉप इन डेली केसेस ही एक रिकव्हरीची साईन आहे. झकारिया यांच्या बोलण्यात तथ्य आहेच पण खूपच पॅसिमिस्टीक वाटत आहे. पण कुणास ठावूक, अजून जसा काळ पुढे जाईल तसा तोच सिनारिओ जास्त संभाव्य (प्रोबॅबल) वाटू शकेल वा कमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढचे भयावह चित्र उभे करतायत फरीद झकेरिया :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदू मुस्लिम दंगे होतील असं पण वाटायला लागलं आहे.
घरी बसून नुसतं डिप्रेशन अँक्झायटी आणि चिड्चिड वाढतेय.
दोन दिवसापूर्वी काल रात्री झोपेत अचानक बाहेरचा दरवाजा कुणी उघडतय असा भास झाला, पाहिलं नाही उठून पण आई सकाळी म्हणाली कि मुख्य दरवाजा सताड उघडा होता. आमच्या घराच्या बाहेर सरळ रस्ताच आहे. नो सिक्युरीटी ॲट ऑल. काल पासून दरवाज्याला कुलूप घालायला सुरू केलं आतून.
मुंबईचा ड्रोनमधून शूट केलेला व्हिडियो पाहीला. निर्जन रस्ते, तुरळक रह्दारी. रडू कोसळणार असं वाटलं. कुठे गेली गर्दी, कलकल, माणसं?
कधी संपणार हे सगळं असं वाटतं आहे,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अंतर्गत राजकारण आणि नोकरशाही वगैरे कारणांमुळे कोव्हिड-१९ला योग्य प्रतिसाद देण्यात युरोपीय महासंघ कमी पडत आहे असे सांगत युरोपियन रिसर्च काउन्सिलच्या प्रमुखांचा राजीनामा संस्थेचे वार्षिक बजेट २ बिलियन युरोचे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लॉकडाउनमधल्या नाभिक लोकांच्या परिस्थितीविषयी -
Barbers in lockdown: a hair’s breadth from ruin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाभिकासमोळ डोकं तुकवायचं नाही हे मी बरेच वर्षांपूर्वी ठरवलं ते बरं झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरोनामुळे रशियात काय होतं आहे ह्याविषयीचा एक रोचक लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

50 Million People May Gather For The ‘Greater American Eclipse,’ The Most
पूर्ण बातमी न वाचता फक्त हेडिंग वाचून चुकीची माहिती पोस्ट मध्ये असल्या मुळे ही पोस्ट delete kara

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे असतीलही ,त्यात शंका नाही.
पण कुठे काय झालं ? कुठे वाचलेत हे ?
जरा जास्त सांगाल का या घटनेबद्दल ?
बाकी काही नाही , पण 50 मिलीयन म्हणजे पाच कोटी अमेरिकन लोकं कधीही कुठेही एकत्र येण्याची शक्यता वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होऊन गेला 2017 साली. चुकून जुनी बातमी पाहून उत्साहाने शेअर केली असेल.
या डिसेंबरात सोलर इक्लीप्स आहे अर्जेंटीनात. जाण्याचे बेत आहेत, बहुतेक फिसकतील. पण, बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सकाळी (म्हणजे लवकर ७-८ ला नाहीच) दहाला बाहेर पडलो. एका नव्या भागात फेरफटका टाकला. तिकडच्या एका लग्नसमारंभातून (१५-१८ मार्च ?) करोना पसरला. तो १-२ एप्रिलला उजेडात आला. तिकडे भाजीवाल्यांना बसून दिले नाही. पोलिसची गाडी आली आणि हाकलले. (रांग मोडून सरळ पुढेपुढे गर्दी करण्यात बायका पुढे हे माझे निरीक्षण). मग तिथून परत दुसऱ्या मोठ्या रस्त्यावर. इकडे तीस चाळीस फुटांवर भाजीच्या हातगाड्या. खरेदी जोरात. केमिस्ट, किराणा दुकानासमोर रांगा. एक दोघे टंगळमंगळ करताना दिसलेल्यांना बाईकवरच्या पोलिसांने हाकलले "घरी जा, भटकायचं नाही." मी त्याच्या जवळूनच गेलो. चालताना मोबाइलवर बोलणाऱ्यांकडे जास्ती लक्ष ठेवतात पोलीस. कोण खरेदीसाठी चाललाय हे ते बरोबर ओळखतात. रिकाम्या बस स्टॉपवर बसलेल्या ज्ये नागरिकांनाही हाकलतात. खाली तोंड करून चालत राहिलात पटापट तर हटकत नाहीत.

केसेस निघाल्या की पोलिसांनाही वरून दम बसत असणार.
-----
ता.क. बऱ्याच किराणा दुकानांत कुरमुरेंची पोती उतरवत आहेत. मागच्या आठवड्यात कुरमुरे मिळत नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरोना - स्व -'गत' 

- स्कुटरला आठ आठ वर्ष वेटिंग ते आज पैसे भरा उद्या डिलिव्हरी 
- फोन ला अशीच आठ दहा वर्ष वेटिंग ते खिशात - पर्समध्ये फोन 
- संध्याकाळी चार तास  एकच चॅनेलचा टी व्ही ते  चोवीस तास चारशे चॅनेल 
अशा सगळ्या संक्रमणातून इथवर आलेलो आहोत

"महामारी" हा इतकी वर्ष ऐकीव शब्द आता प्रत्यक्ष पाहताना हबकून जायला होतंय ! 

फेब्रुवारीत कधीतरी एका मित्राने "पार्टीला या रे , वाट पाहतोय " असा मेसेज  आणि  खाली गुगल मॅप दिला होता  'वुहान' चा ! तेंव्हा असं डोक्यातही आलं नव्हतं की पुढच्या काही आठवड्यात आपल्या शहराचा पत्ताही असाच नोंदला जाईल ... 

पुस्तकं वाचून आणि सिनेमे पाहून " लॉक अप " हा शब्द माहीत होता . पण " लॉक डाऊन " याचा अनुभव यायचा होता . तोही आला .  

मग WFH  वरचे जोक्स झाले . भांडीकुंडी , नवरा बायको , सोशल डिस्टंसिंग  यावर नवीन काही सुचेना झालं तेंव्हा मग कविता , चित्रकला , अडगळीतला माऊथ ऑर्गन , माळ्यावरचे जुन्या फोटोंचे अल्बम, वरणफळं , पेंडपाला अशा "रेसिपीज" चे फोटो व्हॉट्स ऍप वर टाकणं   असंही सगळं झालं . पोलिसांच्या बदडणुकीचे व्हिडीओ झाले . झूम वरचे कॉल्स झाले . 

आता प्रतीक्षा १५ एप्रिलची आहे . त्याला म्हणे " न्यू नॉर्मल " असा एक शब्दही तयार झालाय . १५ एप्रिलनंतर जे असेल ते न्यू नॉर्मल ! 

पण म्हणजे काय ? 
सगळं काही "पूर्ववत " कधी होणार ? 
या ( अजून तरी ) एकवीस दिवसांनी व्यापार -उदीम किती मागे जाणार ?
"वाईटात चांगलं " म्हणत आपण किती दिवस आपली पाठ थोपटणार
?
?
?
?
?
- अनेक प्रश्नांच्या वाटेवर अजून तरी उत्तरांच्या सावल्या दिसत नाहीयेत !

- सुनील गोडसे 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेबनॉनमध्ये अडकलेले अमेरिकन नागरिक म्हणतात, आम्हाला स्वदेशी परत जायचं नाही, कारण बैरुत अधिक सुरक्षित आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लॉकडाउनचे कोलॅटरल डॅमेजही पाहायला हवे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बरेचदा विदाविज्ञानात लोक कार्यकारणभाव बघत नाहीत; किंवा तो महत्त्वाचा समजत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरच्या प्रतिसादाचा कार्यकारणभाव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पंप्रंच्या भाषणांबद्दल गुप्तांचे एक रोचक निरिक्षण. हे ट्वीट्सना पण लागू होईल.

-ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजपासून आणखी कडक बंदोबस्त जाहीर झाला आहे. सकाळी सात ते बारा दुकाने उघडी राहतील. भाजी, दूध व किराणा तेव्हाच मिळेल.
रुग्णांची संख्या वाढतच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वीज कारखान्यात काम करत असल्यामुळे आम्हाला सुट्टी नाही.

टाळेबंदीमुळे वीजेची मागणी खूप कमी झाली आहे. टाळेबंदी आधी 23000 मेवॉ असलेली मागणी एकदम 12-13000वर आली. दोन दिवस झाले उन तापत असल्याने (नागपूर -३९ सें) मागणी थोडी वाढत आहे (१७००० मेवॉ)- सगळे आकडे महाराष्ट्राचे.

मागणी नसल्याने आमच्या चिमण्या बंद आहेत. त्यामुळे बर्‍याचश्या विभागांनी लोकांना रोटे आखून दिले आहेत. काही लोक एक दिवस आड तर काही अर्धा-अर्धा दिवस येत आहेत. मला रोज जावं लागतं.

रोजचा माझा सुमारे 30 किमीचा प्रवास असतो. टाळेबंदीचे सुरूवातीचे दोन दिवस तर रिकामे रस्ते पाहून भयंकर मानसिक त्रास झाला. ठिकठिकाणी पोलिस आहेत. त्यांनी प्रत्येक वेळेला अडवू नये म्हणून आम्हाला 'अत्यावश्यक सेवा' असे स्टिकर वाहनांवर लावण्यासाठी वाटण्यात आले. त्यामुळे आता अडवणूक कमी झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

आज रात्री खोकला आला, अचानक उजवीकडे पाठ बरीच दुखते (व्यायाम की अन्य काही माहीत नाही.) आहे. घशात 'खिचखिच' होतेय (खवखवत नाहीये). आत्ता हळददूध पीते आहे. कोणाशीही बाहेरील व्यक्तीशी संपर्क नाही. औषधे व लाँड्री करावीच लागते. ग्रोसरी घरी येते. ती अँटायबॅक्टेरिअल्/अल्कोहोलयुक्त वाइप्स वापरुन पुसून घेते. ते काम घरात मीच करते. तेवढेच एक्स्पोजर.पाठ दुखायची थांबली/कमी तरी झालीच म्हणजे शरीर नीट फन्क्शन करतय. CDC चा ऑनलाइन सेल्फ चेक केला. फक्त खोकला असल्याने, घरात बसा. काळजी घ्या एवढाच व्हर्डिक्ट आला Smile
___________
काल संपूर्ण रुद्र पाठ (नमकम चमकम) पहील्यांदा ऐकला. मग इंग्रजीत अर्थ शोधून काढला. आज तोच पाठ २ दा ऐकला (सकाळी उठल्या उठल्या) व रात्री झोपताना.
राम दास (https://en.wikipedia.org/wiki/Ram_Dass) अर्थात रिचर्ड आल्पर्ट यांचे पुस्तक (बी हियर नाऊ) वाचले.= https://wikischool.org/_media/be_here_now.pdf
आवडले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे हवेत सध्या चिकार परागकण आहेत. पाऊस पडला तर तेवढ्यापुरते बसतात. मला ॲलर्जी अशी नाही, पण कणांमुळे नाक गळायला लागतं, शिंका येतात. हल्ली चारचौघांत शिंकायची चोरी वाटते. तरी शिंकताना रुमाल, कागद, बाही, काहीबाही वापरतेच...

गेल्या विकेण्डला कापडी मास्क शिवले. आमच्यासाठी दोन आणि शेजारच्या डेबीसाठी एक. अमेरिकी झेंड्याची आठवण करून देणारे कापडाचे दोन तुकडे होते, ते तिच्यासाठी वापरले, ती खुश. मास्क घालून दोघी गप्पा हाणत होतो तेव्हा तिला म्हणाले, "Now we can pull a bank job."

काल बँकेत गेले होते. आत शिरताना डोळ्यांवर काळा चश्मा आणि तोंडावर मास्क. त्याची भीती वाटली नाही, पण शिंक येईल का काय, ह्याची भीती होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१७ मार्च ला गावी जाण्याचा विचार आला होता मुलाल पण सुट्टी होती corona chi कुजबुज चालू झाली होती .
पण तेवढे गांभीर्य नव्हत.
नेमके त्याच वेळी भाचा आणि family gavi चालले होते गाडीत जागा पण होती एकाच वेळी सर्व गावी गेलो असतो.
पण आमच्या सौ नी इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो सर्वांवर बंधनकारक असल्या मुळे
(असले गुपित कोण्ही उघड करत नाही)
मुंबई मध्येच राहिलो.
पण आता कंटाळा यायला लागला आहे कुठे बाहेर जाता येत नाही .
आणि घरात दिवस रात्र बसून,आणि झोपून वैतकं आला आहे.
घरात सर्व समान आहे अजुन महिना भर जाईल.
दूध आणि भाज्या साठी थोडी मेहनत करावी लागते पण दूध आणि भाज्या मिळतात अजुन तरी.
टीव्ही, वर विविध वाहिन्यांचे ऍप आहेत पण आता काहीच बघण्यात स्वारस्य नाही.
मला सौ चा निर्णय कसा चुकीचं होता हे दाखवण्याची मध्ये मध्ये खुमकुमी येते.
गावी गेलो असतो तर घरात बसावे लागलं नसतं
शेतात,रानावनात फिरता आले असते.
अंगणात मोकळ्या नभातील चांदण्या मोजता आल्या असत्या.
आजू बाजूला किती तरी किलोमीटर पर्यंत एक पण बाधित व्यक्ती नसल्या मुळे सुरक्षेची भावना निर्माण झाली असती असे गावी गावी जाण्याचे फायदे आणि त्याला अनुसरून युक्तिवाद करण्यात मला बर वाटत आहे.सौ विरोधी मत व्यक्त करूच शकत नाहीत.
मुंबई मध्ये दिवसों दिवस बाधित लोकांची संख्या वाढत आहे त्या मुळे असुरक्षेची भावना नकळत निर्माण होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण गाव तुमचं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सातारा जिल्हा मध्ये वाई तालुका .
आणि वाई पासून ५ km var.
Wai तालुक्यात एक सुद्धा बाधित किंवा संशयित व्यक्ती नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाई, अरे वा! अजून वर गेले की महाबळेश्वर. वाधवासारखी ओळख पाहिजे, बस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाधवासारखी ओळख पाहिजे, बस!

का उगीच एका निरागस ऐसीकराला तुरुंगात पाठवता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सगळीकडे निरव शांतता, बाथरुममध्ये चोळलेल्या तंबाखूचा आवाज एक रुम सोडून हाॅलपर्यंत जातोय. आवाज क्वारंटाईन करण्यासाठी बादलीमध्ये कमी वेगाने पाणी सोडावं लागतय. तंबाखूचा पॅनिक बाईंग साठा संपत आलाय. आता दुप्पट भावात पहावं लागेल कुठं मिळतंय (अतृप्त आत्म्या ऐकतोस का?). डाउनलोड करुन ठेवलेले आणि काही भंकस म्हणून मध्येच सोडलेले काही असे सत्तरेक हिंदी भाषांतरीत चित्रपटं पाहून झालेत. लोळून कंटाळा आला की उठून बसतो, बसून कंटाळा आला की लोळतो, बदल म्हणून अंघोळ अन् जेवण करतो. एरव्ही एखाद्या सुट्टीच्या दिवशी हे नक्की करु असं ठरवून वेळ न मिळाल्याने रखडलेली कामे जसं की माळ्यावरचं सामान काढून धूळ साफ करणं, जाळ्याजळमटं काढणं, गाडी स्वच्छ करणं, गच्चीवर जाऊन मनसोक्त झोपाळा झुलन, कराओकेवर फाटक्या आवाजात गाणी म्हणणं, ढेरी कमी करण्यासाठी व्यायाम सुरू करणं, तुटलेली बॅडमिंटनची रॅकेट विणन,ऐसीसाठी एखादा लेख पाडणं(partially done) इ.इ. कामं वेळचवेळ असल्यानं अजून पुढं ढकलली जातील असं वाटतंय.
भूक लागत नाही तरीही रोजच्या वेळेवर जेवण होत. पोटात गॅसेस होतायेत. सक्काळ सक्काळ काहिबाही आणायला बाहेर जायचा बेत घरचे मानून पाडतात.
फेज २ लाॅकडाऊन नंतरही लोक शिक्षा संपल्यागत करतील अन कधी न मिळाल्यासारखे गर्दी करुन मिरवतील असे वाटते.
धार्मिक वादंग होतील/न होतील पण इकडे बघूनच का शिंकला/खोकला/थुंकला वरुन नक्कीच भांडण होतील असे वाटते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

करोना डायरी - ३

आज १२ एप्रिल उजाडली. लॉकडाऊन आता कमीत-कमी ३० एप्रिलपर्यंत वाढणार हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. गेल्या काही दिवसात या लॉकडाऊनने लोकांना नवीन नवीन गोष्टी शिकणे भाग पाडले. आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधे आमचे अत्यंत जवळचे स्नेही राहतात. त्या माझ्या वहिनी संस्कृतचे क्लास घेतात. नवीन आणलेला कॉम्पुटर ६ महिने न वापरता घरी पडलेला होता यावरून त्याच्या कॉम्प्युटरच्या जाणकारीविषयी माहिती व्हावी. पण शिकवण्याची आणि मुलांचे नुकसान होऊ नये ही इच्छा. त्याचे वयपण साठीच्या घरात. या वयात नव्या गोष्टी शिकणे सोपे नसते. त्यांना झूमविषयी माहिती कळली. त्यांनी ते फोन वर डाउनलोड केले. पण ५० विद्यार्थ्यांचा क्लास ऑनलाईन घ्यायचा तर ते लॅपटॉपवर घेणे भाग होते. त्याचे सिंकिंग, रेकॉर्ड करणे, अनुपस्थित विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे वगैरे अनेक गोष्टी जिद्दीने शिकून त्या वापरात आणल्या आणि आता त्यांचे क्लास ऑनलाईन सुरु झाले. माझी खात्री आहे की अशी परिस्थिती आली नसती तर त्या हे शिकल्या पण नसत्या. आता सगळे नॉर्मल झाले तरी क्लास घेण्यासाठी त्यांना पुण्यात असायची गरज नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असल्या तरी त्या क्लास घेऊ शकतात. असेच बदल अनेक जणांत झाले. योगाचे क्लास ऑनलाईन होऊ लागले. रोटरीच्या मिटिंग ऑनलाईन होऊ लागल्या. माझी खात्री आहे की ज्या वेळेस कधी हा लॉकडाऊन उठेल त्या वेळेस बरीच लोकं अनेक नव्या गोष्टी शिकलेल्या असतील.

अजून तरी घराबाहेर पडले की भाजीपाला, किराणा, चिकन, ब्रेड, अंडी वगैरे गोष्टी मिळत आहेत. या साठी खरंतर आपल्या सरकारचे आभार मानायला पाहिजेत, कारण यामुळे लोकांमधे घबराट माजली नाही. रस्त्यावर थोडी गर्दी आहे पण ती त्या त्या भागापुरती आहे. काल-परवा पासून सरकारने सर्व गल्ल्या आणि छोटे रस्ते ब्लॉक करायला सुरवात केली आहे. त्यावरून मेन रोड वर जाता येत नाही. मेनरोडला मिळणारे फक्त काहीच मोठे रोड खुले आहेत. अशा परिस्थितीमधे माझ्या जावयाच्या पोटात दुखायला लागले. त्याला जवळच्या हॉस्पिटल मधे न्यायची वेळ आली. व्हाट्स-अप वर अशा परिस्थिती मधे पोलिसांकडे अर्ज करण्यासाठी एक नेट वरची साईट दिली होती. त्यात माहिती भरली. आश्चर्य म्हणजे संध्याकाळपर्यंत पोलिसांनी एक मेसेज पाठवला. त्यात फक्त एक बारकोड होता. हाच बाहेर जाण्याचा ई-पास होता. जर कुठे पोलिसांनी पकडले तर हा मेसेज दाखवायचा होता. ही देखील सरकारची कार्यक्षमताच म्हणायची. अशा थोडक्या वेळात अशी काही सिस्टीम तयार करणे, ती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ती अंमलात आणणे हे काही सोपे काम नक्कीच नाही.

रोज रोज घरी स्वयंपाक करून कंटाळलेल्या आम्हाला
काल अचानक कळले की डॉमिनो पिझा अजून पण चालू आहे. डिलिव्हरी करतात आणि ती पण स्पर्शविरहित. म्हणून काल पिझ्झा मागवला. आश्चर्य म्हणजे खरोखर तो ३० मिनिटात आला. घरी काही दारापर्यंत आला नाही. खाली एका ठिकाणी तो ठेवला आणि आम्ही तो घेतला. अजून तरी परिस्थिती काबूत आहे याचाच हा एक निदर्शक.

सगळे व्हाट्स ऍपचे ग्रुप जे एक मनोरंजनाचे (खरंतर वैतागाचे पण) साधन होते, ते पण बंद झाले. अफवा, खोट्या बातम्या लोकांनी पसरवू नये म्हणून सरकारने सर्वांना ग्रुप चे सेटिंग फक्त ऍडमिन पोस्ट करू शकेल असे ठेवायला सांगितले. चुकीच्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट असेल तर ऍडमिन वर कारवाई होणार. त्यामुळे सर्व ग्रुपवर येणारे असंख्य व्हिडीओ बंद झाले.

आता या करोनाची झळ देवांना पण लागली आहे. रोज देवांना पूजा झाल्यावर फुले लागतात. घरातल्या कुंडीत कधीमधी थोडी फुले येतात पण नेहमी फुले विकतच आणायचो. आता गेले १५ दिवस फुल-बाजार पूर्ण बंद. त्यामुळे फुले मिळणे बंद झाले. त्यामुळे आता घरात येणारी काही फुले ज्या देवांचा वार असेल त्यांना वहायची!!!

क्रमश: ( जमेल तसे. जमले तर).

©️ शिरीष शेवाळकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते झूम app वापरायला गूगल कर्मचाऱ्यांना बंदी केलीय म्हणे. का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गूगलचं स्वतःचं Meet आहेच की! गूगलसारखी कंपनी अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर किंवा लोकांच्या घरून काम करण्यावर एवढ्या बटबटीतपणे आघात करणार नाही. हे वाचा. आयसीआयसीआयच्या लोकांचे पगार स्टेट बँकेत करण्यावरही मनाई असेल... फक्त तुम्हा-आम्हांला त्याचं काही पडलेलं नसेल!

(कृपया, जरा गूगलत जा ... ) आणि हे पाहा, गूगलच्या साथीला नासासुद्धा आहे. दुवा. बरं मग?

आमच्याकडेही झूम वापरायचं तर पासवर्डसकट असा फतवा आला आहे. त्यात काही नवल नाही. जशी लोकप्रियता आणि वापर वाढत जातात, तशा चोरांच्या, हॅकर्सच्या कारवाया वाढत जातात. सुरक्षिततेसाठी तेवढं करावंच लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

13/04/2020 - 07:24.
हं.
--------------
App म्हणून गूगल स्टोरवर टाकल्यावरही/अप्रूव केल्यावरही नंतर appमध्ये गुपचुप बदल केले जातात का?
15:55

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गूगल स्टोअर?

कामासाठी लोक बहुतेकदा पीसी किंवा मॅक वापरतात. तिथे गूगल स्टोअरशी काही संबंध नसतो. गूगलनं त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी, लॅपटॉपांवर झूम वापरायला मनाई केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लॉकडाउनमुळे बालकामगार झालेल्यांची बखरीत नोंद -
Lockdown burden on little shoulders in Latur

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लॉक डाउन मधील अर्थकारण पूर्ण वर्षभर परिणाम करणार आहे
आज सकाळी माझ्या गावाच्या ( फुळगाव)सरपंच चा फोन आला होता बोलाताबोलाता तो म्हणाला आमच्या गावातला घोडेवला आला होता तो सांगत होता त्याच्या कडे 3 घोडे आहेत तो ते वरती साठी देतो त्यासाठी एका दिवसाला त्याला 1 घोड्या साठी १० ते १५ हजार मिळतात सीझन मध्ये ५० दिवस बुकिंग असते ५ ते ६ लाख रुपयांची कमाई होते त्यातून वर्षाचा घरखर्च आणि घोड्याचा खर्च चालतो पण लॉक डाउन मुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम सार्वजनिक रित्या बंद केले आहेत त्यामुळे एकही बुकिंग नाही वर्ष कसे जाणार हा मोठा प्रश्न आहे सगळे एकूण सुन्न झालो
आत्ता आपल्या पैकी बऱ्याच जणाच्या मुला मुलींची लग्न झाली आहेत त्यामुळे लग्न म्हणाले की किती गोष्टी लागतात माहिती आहे हे सगळे करण्यासाठी मोठी साखळी असते पण सगळेच थाबलेले आहे
साधी फुलाची सजावट घ्या फुलशेती करणारा शेतकरी वाहतूक दार दलाल सजावट घेणारा कंत्राटदार कलाकार असे अनेक त्यावर अवलंबून असतात हे एक उदाहणादाखल झाले असे अनेक व्यवसाय लग्न या गोष्टीशी निगडित आहे band shaharat far नाही पण ग्रामीण sansruti चा भाग आहे अजून तसेच मांडव बागंडी हे पण
तसेच मोठा खर्च जेवण कपडे कार्यालय सर्व आलेच थोडक्यात सांगायचं तर जांचा व्यवसाय हौसेने केलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे. त्यांना जास्त अडचणी येणार आहेत. Tourism सगळ्यात जास्त affect होणार आहे. Car manufacturing, व्हाईट गुड्स, ब्रँडेड गरमेंट्स, fancy restaurents, सगळेच कमी होणारे.2 व्हिलर ची जरा कमी प्रमाणात अफफेक्ट होईल.

Vishwesh Athavale

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Corona chi lagan hi शहरी भागातच प्रचंड प्रमाणात झाली आहे .
मग ती भारता मधील मुंबई,दिल्ली असतील किंवा अमेरिकी मधील न्यूयॉर्क सारखी शहर असतील.
शहरीकरण च्या आडून प्रचंड लोकसंख्या एकाच जागी ऐकवटने हे धोकादायक आहे.
कधी हा पण विचार येतो.
Corona बरोबर आता पाणी टंचाई असती तर केवढे मोठे संकट मुंबई वर आले असते .
प्रचंड लोकसंख्या च्या बेसिक गरजा सुद्धा सरकार पूर्ण करू शकाल नसतं.
पाणी टंचाई बरोबर वीज टंचाई,भाजीपाला टंचाई हे जोडून येतात .
हाहाकार माजला असता आणि आणि बेवस पने त्याकडे बघत बसण्या शिवाय कोणताच मार्ग हातात शिल्लक राहिला नसता.
कुठे तरी हे बेबंद शहरीकरण थांबवणे गरजेचं आहे.
नाही तर नैसर्गिक appati,जैविक हल्ले,रोगाच्या साथी, सांस्कृतिक,भाषिक,,धार्मिक विवाद
ह्या सर्व संकटात खूप मोठ्या लोकसंख्येला जिवाला मुकावे लागेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही संसर्ग जन्य साठी किती महिने अजुन थैमान घालेल ह्याच स्पष्ट अंदाज कोणालाच नाही.
आता पर्यंत ज्याला प्रगती समजत होतो ती प्रगती कुठे तरी गायब झाली आहे
ना वाहतुकीची साधन वापरू शकत नाही हवाई वाहतूक करणारी विमान,
ना हॉटेल, पब चालू करू शकत
ना कोणत्याच प्रकारचे कारखाने.
सर्व कसे ठप्प झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या व्हायरसमुळे मागास, अशिक्षित राहण्यात किती फायदा आहे ते सिद्ध झाले आहे. व्हायरसने चीन, जपान, द. कोरिया, इटली, इंग्लंड, अमेरिका इत्यादी प्रगत देशांमध्ये प्रचंड उच्छाद मांडला असला तरी भारत, इंडोनेशिया, ब्राझील वगैरे देशांचे काहीही वाकडे करू शकलेला नाही.
भारतातही त्यातल्या त्यात प्रगत असलेल्या केरळ, महाराष्ट्र वगैरे राज्यांना जास्त त्रास झाला आहे.
ही राज्येही मागासलेली, अनागोंदीने जास्त भरलेली असती व तिथे बीजेपीचे सरकार असते तर आत्ता आहेत तितक्याही केसेस भारतात सापडल्या नसत्या.
शेम ऑन दीज देशद्रोही स्टेट्स.

READ: Good News : 'या' राज्याने केली कमाल, चार दिवसांत आढळला नाही एकही करोना रुग्ण

https://www.loksatta.com/desh-videsh-news/no-new-positive-case-in-the-ut...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ2

... पण कहर करता आला नाही.

विकेण्डला ट्वीटं स्क्रेप करण्याचा कोड लिहिण्याचा बेत होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ॲप्स लिहिण्यासाठी आधी प्रश्नोत्तरं करून मग परमिट मिळतं.

पण ट्विटर सध्या परवानगी द्यायला वेळ लागणार म्हणतंय.

"Due to COVID-19, application review times might take longer than usual

We’re working through developer applications at a reduced capacity. This could result in a longer than usual review time. As always, we appreciate your patience and interest in Twitter’s Developer Platform."

अपडेट -

पंप्रंची ट्वीट आपण होऊन गोळा करता येत नाहीयेत, म्हणून आणखी गूगल केलं. तर कागलवर खजिनाच सापडला. (दुवा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तात्यांनी WHOला जाणारा पैसा रोखला.
Trump says he is halting funding for the World Health Organization

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्यांची swab test घेतली जाणार आहे अशा सर्व संशयितांना एकाच हॉल मध्ये ठेवलं जातं. ज्यात शेजारचा माणून पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याची काहीच माहिती नसते. सीपीआर, कोल्हापूर मध्यल्या माझ्या मित्राने माझे डोळे उघडले. प्रोटोकॉल काय, कोणाचा आणि कसा प्रत्यक्षात उतरवायचा याबाबत अशक्य गोंधळ आहेत. पहिली तपासणी आणि माहिती संकलन करताना, त्यानंतर ज्यांना हॉस्पीटल मध्ये चाचणीसाठी वेगळं केलंय त्या सर्व संशयितांमध्ये करोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यांना पहिल्यांदा तपासणाऱ्यांना केवळ मास्क आणि अ‍ॅप्रन्स आहेत. पीपीई सर्वांनाच उपलब्ध नाहीत.
शिवाय संशयितांना दोन-तीन दिवस मिळणाऱ्या अन्नाचे फोटो पाहून मी आवंढा गिळला. ह्यात खोटी बिलं देऊन अ‍नेक अधिकाऱ्यांनी हातही धुऊन घेतले आहेत म्हणे!!! हेच अन्न कर्मचाऱ्यांनाही दिलं जातंय.

टेस्ट घेतल्यावर निकालाची वाट पाहत विलग केलेला रुग्ण अनेक करोनाबाधितांच्या संपर्कात येतो. टेस्ट निगेटिव्ह आल्यावर तो मुक्त होतो पण त्याला जर सरकारी विलगीकरणात बाधा झाली तर?
टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर पहिली तपासणी करणाऱ्यालाही साताठ दिवस विलग करतात!!!

बऱ्याच लोकांनी त्यांना विलगीकरणात आलेले आलिशान-हॉटेली अनुभव सांगितलेत सोशल मिडियावर. पण हे मुंबईसारख्या ठिकाणी, रुग्ण आणि संशयितांची संख्या कमी असताना.

लोकसत्तेमध्ये आज आलेली ही सेलेब्रिटी नसलेल्या आणि मुंबईबाहेरच्या एका संशयिताची नोंद प्रातिनिधीक म्हणून् या बखरीत समाविष्ट करतो. कॉपी पेस्ट करतो कारण लिंक उडू शकते.

४ वाजता लाळेचा नमुना घेतला. ‘एक गोळी जेवल्यावर घ्या,’ असे एक परिचारिका सांगून गेली. मग एका आठ-दहा खाटांपैकी एक खाट मिळाली आणि सुरू झाला अहवालाच्या प्रतीक्षेतील दोलायमान स्थितीमधील भयप्रवास.. संसर्ग तर झाला नसेल ना, ही शंका मन खाऊ लागे. संपर्कात तर आलो होतो; पण त्या वेळी अंतर किती होते दोघांमध्ये, याची उजळणी होत असे. दुपारी ४ वाजता औरंगाबादच्या करोना रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर दाखल झाल्यानंतर रात्री येणारे खोकण्यांचे आवाज मनात काहूर उठवीत. सोबत मोबाइल होता, एक पुस्तकही घेतले होते; पण मन काही कशात रमत नव्हते. एक मन म्हणायचे, आपले अहवाल निगेटिव्हच येणार; पण शेजारच्या माणसाला संसर्ग असेल तर? भीतीच्या सावटाखाली ४८ तास करोना रुग्णालयात घालविल्यानंतर एकदाचा अहवाल आला आणि सुटकेचा नि:श्वास सोडला..

हा अनुभव आहे दिवाकर (नाव बदलले आहे.) यांचा. सरकारी रुग्णालयातील एका व्यक्तीस करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्याची तपासणी झाली. या तपासणीच्या कालावधीतील मनातील भावनांना दिवाकर यांनी वाट मोकळी करून दिली.

एका मोठय़ा हॉलमध्ये संशयित म्हणून राहण्याचे हे तास अधिक ताण वाढविणारे असतात. दिवाकर सांगत होते- शेजारी पैठणचे एक जोडपे होते. त्यांना खूप खोकला येई; कोरडय़ा खोकल्याची उबळ. मग वाटे की, यांना झाला असेल तर आपणासही होईल का हा आजार? मन घट्ट करायचे आणि मोबाइलमध्ये मन रमविण्याचा प्रयत्न करायचा.

शेजारी संशयित म्हणून एक ‘चाचा’ आले. तसे त्यांना कोणतीच लक्षणे नव्हती. म्हणजे सर्दी, खोकला असे काही नाही. रुग्णालयात दोन वेळा जेवण, नाश्ता अशी सोय असे. त्याचा लाभ घेण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या एका नातेवाईकाने जवळच्या खाटेशेजारी बोलावले आणि तेही गेले. दुसऱ्या दिवशी कळले त्यांना करोनाचा संसर्ग होता. एक खाट सोडून दुसऱ्या खाटेवर एक तरुण. त्याच्या घरातील व्यक्तीला लागण झालेली. त्यामुळे त्याची तपासणी करण्यात आलेली. त्याला पाण्याच्या बाटल्या कोणी तरी आणून द्यायचा. त्याला आणखी एक बाटली पैसे देऊन मागविली. अन्यथा पाणी संपल्यावर ते मिळविण्यासाठी मात्र जरा अधिकच कष्ट पडतात. एखादी आया किंवा परिचारिका येत त्यांनी ‘पीपीई’ घातलेले असत. त्या सांगत, अंतर ठेवून वागा. एवढेच काय ते दुसरे बोलणे. मग, कोणी तरी नमाज अदा करताना दिसायचा, तर कोणी देवाचे नाव घेताना; पण कोणी बोललेच तर प्रत्येक जण आपली ओळख लपविणारा. कोठे राहता, असा कोणी सहज प्रश्न केला तरी शहरातील एका भागाचे नाव सांगून लोक मोकळे होतात. प्रत्येकाला आपली ओळख लपवावी वाटते. रात्र अंगावर येते, या वॉर्डातील. फक्त खोकण्याचे आवाज. सायंकाळी ४ नंतर तसे नव्या कोणाचे लाळेचे नमुने घेतले जात नसत. त्यामुळे रात्रीतून कोणी तसे भरती होत नव्हते. एखाद्याचा अहवाल करोना चाचणीला सकारात्मक आला, की त्याला बोलावून घेतले जाते. त्याचे सामान आणि तो एका मजल्यावरून वरच्या मजल्यावर नेला जातो. करोना रुग्णालयातील तिसरा मजला बाधितांचा आहे.

४८ तास संशयित म्हणून काढताना जिवाची घालमेल सुरू असायची. कोरडा ठसका वातावरणात आणखी भय वाढविणारा असतो. एक पुस्तक वाचले, पण तो मजकूर आठवत नाही. मोबाइलवर दोन-चार मराठी नाटकेही पाहिली, पण आता आठवत काही नाही. रात्री कधी तरी अडीच-तीन वाजता झोप लागायची. कितीही हात धुतले, तरी हा विषाणू चिकटणार तर नाही ना, ही भीती होती. करोना झाला तरी मृत्यू होणार नाही, याची खात्री बाळगूनही ते भयाचे ४८ तास भयंकर असतात. त्यामुळे सुरक्षित राहायचे असेल, तर घराचा दरवाजाही पुढचे काही दिवस उघडू नका, दिवाकर सांगत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मॉस्कोमध्ये सार्वजनिक वाहतूक वापरण्यासाठी किंवा आपली गाडी चालवण्यासाठी आता पास लागणार म्हणून काल मॉस्कोवासियांनी पास मिळवायला गर्दी केली -
Traffic Jams, Large Queues Mark First Day of Moscow’s Coronavirus Travel Passes

व्हिडिओ इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जानेवारी शेवटचा आठवडा - साधारणपणे  कोरोनाबद्दलच्या बातम्या येऊ लागल्या. घरातल्या (मी सोडून) दुसऱ्या मोट्ठ्या माणसाने मला आणि छोट्या माणसाला सार्वजनिक वाचनालयात जाण्यास बंदी केली. तेव्हा असंपण फ्लू सिझन सुरु होता  फारशी कटकट न करता ती बंदी पाळली गेली. तरीही मित्र मंडळीत अजूनही " ह्या !! यापेक्षा जास्ततर नेहमीच्या फ्लूमुळे माणसं मरतात" अशा चर्चा सुरु होत्या.
फेब्रुवारी पहिला आठवडा - येणारे दोन महिने फार धावपळीचे आणि  eventful  (मराठी?) असणारेत तेव्हा भारतातून  आईबाबांना  बोलावुया  असा विचार चालूये. पण कोरोनाच्या बातम्या वाढतायत त्यामुळे काय करावं कळेना.  पण मग त्यांचं मार्च पहिल्या आठवड्याचं तिकीट काढलं. 
फेब्रुवारी १६-  नुकतीच एक मैत्रीण भारतातून आली. सिंगापोर एयरलाईन. ती  म्हणाली, काही फार काळजीचं कारण नाही. फक्त चायना पासपोर्ट किंवा व्हिसावाल्यांची चौकशी करतायत. 
फेब्रुवारी शेवटचा आठवडा - वाढत्या बातम्यांमुळे अजूनच काळजी वाढली. परत कोरोनाचा धोका वयवर्षे साठपुढच्या माणसांना जास्त आहे म्हणतायत . मग आई-बाबांना अशा परिस्थितीत प्रवास करू द्यायचा का ?
फेब्रुवारी २९ - आई बाबा येणार तर एकंदरीत भारतीय पदार्थ करण्याचं आणि खाण्याचं प्रमाण वाढणार म्हणून डाळ-तांदूळ - गव्हाचं पीठ , रवा , पोहे  इडली रवा अशा गोष्टी घरात आणून ठेवल्या. शिवाय साबण , कागद वगैरे इतर सामानसुद्धा आणले. 
मार्च ३- कॉस्टको मध्ये लोकं मुर्खासारखे कागद आणि पाण्यासाठी भांडतायत आणि लवकरच त्यांची कमतरता होईल तर तुम्ही आत्ताच जाऊन या असा मैत्रिणीचा फोन आला. आम्ही आधीच सामान भरलय म्हणून निवांत होतो. 
मार्च ६ - आई बाबा पोचले एकदाचे.  त्यांनी प्रत्येक विमानात बसण्याआधी खुर्ची, हात, समोरचा भाग, बटणं जिथे हात लागू शकतो तो भाग disinfecting wipes वापरून पुसून घेतला. सॅनिटायझर वापरून वापरून त्यांचे हात प्रचंड कोरडे झालेत . फ्रँकफर्ट विमानतळावर  त्यांना (आणि त्यांच्या सारख्या इतरांनां) बाकी लोकांत मिसळू न देता सरळ गेटवरच नेलं गेलं . मुंबई विमानतळावर खुपजण मास्क घालून होते. विमानात गर्दी कमी होती त्यामुळे काहीजण चारजणांच्या / तीनजणांच्या सीटवर आडवे झोपले होते (म्हणे). 
घरी आल्यावर त्यांना अंघोळ करून आल्याशिवाय स्पर्शपण केला नाही . त्यांच्या बॅगापण disinfecting wipes वापरून पुसून घेतल्या आणि कपडे सरळ वॉशरमध्ये. घरी छोटा माणूस  असल्याने जरा जास्त काळजी घेतली. 
मार्च ७- इथल्या मराठी शाळेच्या दशकपुर्ती कार्यक्रम होता. साधारण ३००-३५० जण येणार होते. तेव्हापण आपण जाऊ नये , विलगीकरण वगैरे काही  विचार केला गेला नाही. उलट आमच्या छोट्या मनुष्याला लहान मुलं आणि नाचगाणी आवडतात  म्हणून घेऊन गेलो. आई बाबा घरीच थांबले. 
मार्च १०- माझी adviser सोबत मीटिंग होती. तेव्हा ते युनिव्हर्सिटीच्या प्रेसिडेन्टवर (ती योग्य स्टॅन्ड घेत नाही म्हणून ) वैतागले होते.  त्यांच्यामते प्राध्यापक मंडळी वयाने मोठी (वृद्ध) असल्याकारणाने त्यांना जास्त धोका आहे हे जाणून वर्ग ऑनलाईन केले जावेत.  असा त्यांनी प्रेसिडेन्टला मेलपण केला होता.  माझा Phd डिफेन्स १४ एप्रिल ठरला आहे , पण तोवर परिस्थिती निवळेल असं त्यांचं मत पडलं. घरी येऊन मोठ्या माणसासमोर त्यांच्या अवास्तव भीतीची चेष्टाच केली. 
पण रात्रीतूनच सगळे वर्ग ऑनलाइन घेतले जातील असा मेल आला. गेली दोन अडीच वर्षं मी शिकत किंवा शिकवत नसल्याने मला काहीच फरक पडत नव्हता. माझं रोज सकाळचं ३ मैल पळणं सुरू होतं, नाही म्हणायला बागेत  कमी गर्दी दिसत होती. एव्हाना  इतर माहितीसोबत कोरोनावरचे जोक सुद्धा वाढू लागलेत. 
मार्च १२ - घरातला (मी सोडून दुसरा ) मोठ्ठा माणूस एका कंपनीत काम करतो. त्याच्या टीमने आज ट्रायल म्हणून घरून काम करून पाहिले. जर पुढे जाऊन घरूनच काम करावं लागलं तर काय काय अडचणी येऊ शकतात वगैरे बघयला. विक्षिप्तबाईंचं येणं, भेटणं रद्द झालं. मेसेजा-मेसेजीवर घरात बसून phd डिफेन्स करून इतिहास घडवू वगैरे विनोद करून झाले. 
मार्च १३ -   मोट्ठ्या माणसाला महिनाअखेरपर्यंत घरून काम करण्याचे आदेश . 
मार्च १४ - बाबा आणि मी नेहमीच्या दुकानात गेलो (ट्रेडर ज़ोज) . सकाळी दहा वाजता फारशी गर्दी नाही, पार्किंग सहजच मिळाले म्हणून खुश होऊन आत जाताच , त्यामागचे कारण कळले. बहुतांश दुकान लुटून नेल्याप्रमाणे रिकामे . ब्रेड, फ्रोझन , रेडी तो ईट गोष्टींची कपाटे पूर्ण रिकामी होती.  नशिबाने ऑरगॅनिक दूध मिळाले . ५ एप्रिलपर्यंतची काळजी मिटली .  पुढे काही गोष्टींसाठी नाईलाजाने भारतीय दुकानात गेलो, तर तिथे दिवाळी आल्याप्रमाणे लोकांची गर्दी . चेकआऊटला लांबलचक लाईन होती. गरजेपुरत्या गोष्टी घेऊन कल्टी मारली.  मित्र दुक्कल आईबाबांसोबत आणलेला खाऊ घ्यायला आणि रात्रीच्या जेवणाला आले. येण्याआधी त्यांच्यातल्या एकीचा फोन - "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  येऊ ना ?"  तेव्हासुद्द्धा आपण फारतर फार एकमेकांच्या गळाभेटी टाळू असा विनोद केला. 
मार्च १६ - सगळेच घरी त्यामुळे छोटा माणूस मजेत !! आमचीसुद्धा दुपारी चहा - खाणं वगैरे ऐश सुरु. आता मात्रं , रोजची वाढती रुग्णसंख्या बघतोय. बाबा दररोजची सांख्यिकी सांगतायत. काळजी वाटतेच. हे सगळं किती दिवस चालणार ही अनिश्चीतता आहे. गरज नसताना उगीच कोरोनावर संभाषण करून तो विषय चर्चायचा नाही असा (नंतर कधीही पाळला न गेलेला) नियम केला. 
मार्च ३रा आठवडा : कोरोना आणि त्यासंदर्भात बातम्या , उपदेशपर आणि विनोदी स्टेटस , स्टोरीज इत्यादींचा सोशल मीडिया वरून भडीमार. त्यावर उतारा म्हणून मी रोज पळायला जाताना रस्त्यात आणि बागेत दिसणाऱ्या फुलांचे फोटो पोस्ट करत सुटले. डिनायल मोड. वसंत (ऋतू) आला आहे. 
 मार्च २१ -  सेमिस्टरची पहिली लॅब मीटिंग - झूम वर झाली. आतापर्यंत सुद्धा ज्यांना  प्रत्यक्ष यायला जमणार नाही त्यांना झूमवरून  पर्याय असायचा पण सगळेच आपापल्या घरून अशी ही पहिलीच मीटिंग.   स्कॉटने घरातला पसारा दिसू  नये  म्हणून virtual बॅकग्राऊंड वापरली. 
मार्च २१ - भारतबंद - त्यासंदर्भातले मेसेज, इत्यादी इत्यादी . ताली बजाव , थाली बजाव .  
मार्च २२ - तीन आठवडे भारतबंद मग हातावर पोट असणाऱ्यांचं काय ? कोरोनाने नाही तर भुकेने मरणार . सगळे सर्वोच्च नेतृत्वाच्या प्रशंसेत मग्न. ह्या मुद्द्यावर फारसं कोणी बोलताना दिसलं नाही. मित्रमंडळी , सो कॉल्ड सोशली ऍक्टिव्ह नातेवाईक मंडळी - सगळ्या ग्रुपवर आणि वैयक्तिक मेसेज पाठवले. कोणी ह्यासंदर्भात काही काम करताय का ? मी काही मदत ( सध्या तरी पैशांच्या स्वरूपातच शक्य आहे ) करू शकते का ?  तुरळक प्रतिसाद मिळाले. माझा सरकारी मदतनिधीवर विश्वास नाही. 
बाकी इकडे तिकडे शोधून खालच्या तीन चार संस्थांबद्दल माहिती मिळाली पैकी ketto वर डॉलरमध्ये रक्कम स्वीकारत होते म्हणून तिथे पैसे देऊ शकले. https://www.ketto.org/fundraiser/coronavirus?utm_source=donor&utm_medium...
https://joshconnect.org/#!/reqdetail/29
http://cjp.org.in/
https://www.feedingindia.org/donate
कोरोना आणि त्याच्या बातम्या (ज्या टाळणं अशक्य आहे) , मनावर परिणाम करू लागल्या आहेत. आपण घरून काम करू शकतो, आपण पुढच्या काही महिन्यांचं वाणसामान भरून ठेवू शकतो , आपली प्रेमाची माणसं आपल्या जवळ आहेत ,  आपण परसातल्या अंगणात बसून आकाशाच्या तुकड्याकडे बघू शकतो ,आपण लॉकडाऊन मध्ये निवांत राहू शकतो ह्या गोष्टींनी सकारात्मक वाटण्याबरोबरच एक अपराधीपणाची भावना आहे.  भरीस भर म्हणून आता सकाळचं पळणं थांबवलं , हवेतूनही प्रसार होऊ शकतो म्हणून. घरी व्यायाम करण्याची शिस्त माझ्यात नाही. 

मार्च ४था आठवडा : पब्लिक घरी बसून वेळ जात नाही म्हणून सोशल मीडिया वर धुमाकूळ घालतंय : साडी चॅलेंज, जुन्या फोटोचं चॅलेंज , स्वतःच्या फोटोचं चॅलेंज, नवर्यासोबतच्या फोटोचं चॅलेंज . भरीस भर म्हणून मित्र मंडळींचे जुने जुने फोटो शोधून त्यावर निरर्थक चारोळ्या टाकणे . दाल्गोना कॉफी आणि काय काय. 
ह्याच दरम्यान अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण असल्याचा विदा जाहीर झाला -  नेहमीच्या मंडळींसोबत कधी काही संपर्कात नसणारे मित्र - दूरचे नातेवाईक इत्यादी जमेल त्या माध्यमातून खुशाली विचारू लागले. घर न सोडण्याचा सल्ला आणि काळजी घ्या सांगू लागले. नाही म्हंटलं तरी बरं वाटलं. घरून काम करणे ३० एप्रिल पर्यंत वाढवले गेले. 
मार्च २५ - गुढीपाडवा !!!
मार्च २७ - दुसरी लॅब मीटिंग - माझ्या फायनल डिफेन्सची रंगीत तालीम . स्क्रीनशेअर करताना माझा विडिओ बंद करावा लागला. आता सगळे केवळ माझ्या आवाजाच्या चढ-उतारावरून माझा आत्मविश्वास (अथवा आभाव ) जोखणार. Breathe. 
२ एप्रिल - जवळच्या दुकानातून सकाळी लवकर जाऊन दूध ब्रेड फळं भाज्या आणल्या. दुकानात जेमतेम दहा माणसं आणि कडेकोट स्वछता . तरीसुद्धा ऑरगॅनिक दूध मिळाले नाही , जे मिळाले त्याची तारीख १५ एप्रिल. असो. 
३ एप्रिल - अमेरिकेने ३ लाख रुग्णसंख्या पार केली. आता तर माझा डिफेन्स नक्कीच ऑनलाईन होणार. घरबसल्या phd !!! Zoom अँप हॅक होतंय म्हणून दुसरा पर्याय शोधण्याचा विचार सुरु. कदाचित टीम्स वापरू पण पब्लिकला लिंक पाठवली की हॅक होण्याचा धोका आहेच. 
५ एप्रिल - लहानपणाचे दुरावलेले मित्र मैत्रिणी परत संपर्कात आलेत . सगळ्यांना एक प्रकारचा निवांतपणा असल्याने ग्रुप कॉल वगैरे सुचतंय .आजच सकाळी शाळेतल्या मैत्रिणींसोबत झूम कॉल झाला. जरी संभाषणाचा मुख्य विषय कोरोना असला तरी १४-१५ वर्षांनी प्रत्यक्ष  बघून बोलून  मजा आली. ३ आणि ५ एप्रिलला  भूकंप जाणवला . नक्की काय चालूये ?!!
१५ एप्रिल - शेवटी टीम्स वरून डिफेन्स संपन्न झाला. स्वतःच्या घरून हजर  राहण्याचा पर्याय असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्तच पब्लिक होता. स्क्रीन आणि माझा विडिओ दोन्ही दिसले. गेल्या आठवड्यात फारश्या बातम्या वगैरे पाहिल्या नाहीत.  इंस्टाकार्ट वरून घरी वाणसामान मागवलं. कोरोनाचं आता अति झालं आणि काही वाटेनासं झालंय.  रुग्णसंख्या ६ लाखांवर गेली बहुतेक. पण घराबाहेर न जाण्याशिवाय दुसरं काय करू शकतो?  अनिश्चितता आहेच पण आता त्याचा उल्लेख बंद केलाय. 
आज अचानक भरपूर वेळ असल्यासारखा वाटलं म्हणून लिहून काढलं. उद्या आमच्या छोट्या माणसाला लसीकरणासाठी दवाखान्यात नेणारे. सकाळी ७.३० ची वेळ दिलीये. सोबत एकाच मोट्ठ्या माणसाला येण्याची परवानगी आहे. 
ओळखीतल्या सुखवस्तू मंडळींचे प्रॉब्लेम : 

१. एका मैत्रिणीला एप्रिलमध्ये बाळ होणार आहे. तिचे आई- वडील येऊ शकत नाहीत. सध्या नॅनी किंवा डुला पण मिळत नाहीयेत. पहिल्या मुलाला दवाखान्यात नेणं शक्य नाही . पाळणाघरं बंद .  दवाखान्यात एकच माणूस तिन्ही दिवस पाहिजे . आलटून पालटून दवाखान्यात सोबती / मदतनीस असण्याची परवानगी नाही. बाकीच्या काळज्या तर आहेतच. 
२. एक उच्चशिक्षित डॉक्टर मैत्रीण इंग्लंडमध्ये आहे. ती आणि तिचा नवरा दोघांनाही रुग्णांसोबत काम करावं लागतं. दोन आठवड्यापूर्वी त्यांनी त्यांचे दोन सहकारी गमावले. सद्य परिस्थितीत त्यांना अर्थातच भारतात जाता येत नाही. त्यांचा व्हिसा (निःशुल्क ) एका वर्षासाठी वाढवला गेला. 
३. आमचा छोटा माणूस अजून खूपच छोटा आहे त्यामुळे परसातल्या बागेत रमतो आणि घरातल्या चार मोठ्या माणसांशी खेळतो पण बाकीच्या लहान मुलांना शाळा , शाळेतर खेळ , बागा , मैदाने सगळंच बंद असल्याचा बऱ्यापैकी त्रास होतोय आणि त्यांना नवनवीन गोष्टीत रमवण्यात त्यांच्या आईबाबांची त्रेधा उडतीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

वरातीमागूनही घोडं बरंच नाचतं आहे. ( तीन पिढ्यांचे अनुभव आहेत. आजुबाजूस कुणाला काय त्रास आहे हेही कळलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमी म्हणजे बरेच दिवस साडेनऊ ते बारा दरम्यान खरेदी निमित्त भटकून येतो. सोमवार मंगळवार (१३,१४ एप्रिल) भाजी बंद असल्याने तुरळक लोक फक्त किराणा आणि केमिस्टकडे होते. दूरवर जाता आले नाही. काल भाजी आली आणि दहा वाजेपर्यंत बाजार उठला. संपली. एका भाजीवाल्याकडे होती त्याच्याकडे बारा जण रांगेत उभे होते. पोलिस गर्दी होऊ देत नव्हता. आज लवकर जाणार. बाजारात फक्त कांदे बटाटे आणि पांढरी वांगी उरली. ही वांगी फक्त जुनी पिढीच खाते. हल्लीच्या पनीर, मसाला ,पावभाजी असल्या पदार्थांत वांग्यांना नो एन्ट्री.
"आजपासून सुरू?"
"नाही, ट्रक्स चालू बंद करतात. काही शेतकर्यांनी शेतातले टमाटे फेकून दिले. "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१० एप्रिल २०२० (प्रतिक्रिया थोडी उशिरा टाकतोय. क्षमस्व. पण वस्तुस्थितीत बदल असलाच तर अधिक वाईट झाला आहे.)

इटली मधून येणारा फीडबॅक भीषण आहे. म्हणजे मृत्यू तर आहेतच पण आता मृत्यूला न जुमानणारी भूक थैमान घालू लागली आहे. इटली सरकारने ६०० युरोचे पॅकेज देऊ केले आहे. तेही सर्वांना मिळणार नाही. खालील लेखात हे आहेच. पण माझे इटालियन कलिग्ज शी रोजचे बोलणे चालू आहे. काल मिलानो मध्ये घरात असलेला आंद्रेया म्हणाला, संदीप, मला काही दिवसांत तारांतो ला जाणे भाग पडेल. कारण आता अशा चर्चा चालू झाल्यात की मास्क वगैरे लावून, सॅनिटायझर्स वापरून पण ऑफिसात जाणे आवश्यक झाले आहे. नाहीतर नोकऱ्या जातील.

माझी स्वतःची नोकरीही धोक्यात आहेच. फक्त माझ्यात आणि त्याच्यात हा फरक आहे की मला नोकरी जाण्याची तेवढी फिकीर नाहीये. त्याला ती फिकीर आहे आणि तो पुन्हा कामाला जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी मी काय करायचे हा प्रश्न उभा राहीलच. जर इतर लोक जाणार असले तर मलाही येण्याचे कंपल्शन होऊ शकते. मला ही रिस्क घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे जायचे की नोकरी सोडायची असा प्रश्न उभा राहील.

इटली ह्या देशाची गणना इथून पुढे डेव्हलप्ड आणि समृद्ध देशांमध्ये होणार नाहीये हे निश्चित. तो एक भुकेकंगालांचा देश बनेल. पुन्हा एकदा एका पिढीला प्रचंड त्याग आणि कष्ट करावे लागतील. इटलीची कर्जे घेण्याची मर्यादाही पूर्वीच संपली आहे. जरी आत्ता त्यांचे युरोपियन युनियनकडे पैशासाठी प्रयत्न सुरु आहेतच. करोनाचे संकट येण्याच्या आधीच राष्ट्रीय उत्पन्नाच्या १३३% एवढ्या कर्जाचा भार असलेला हा देश हतबल झालेला होता. त्यातून मोठ्या प्रमाणात चायनीज इंटरव्हेन्शन सुरु झाले. चायनाने खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली व प्लॅन केलेली आहे. इथून पुढे चायनाच्या पूर्ण ताब्यात जाणे अटळ दिसते.

चीनची आर्थिक परिस्थिती आत्ता किंचित खालावलेली असली (कोरोना मुळे नव्हे, आधीच) तरीही ती कल्पनातीत प्रचंड आहे. गेल्या वर्षी शी जिन पिंग ह्यांची इटली भेट झाली. ह्याबद्दल माझी मॅकिंसी च्या काही कन्सल्टंट्स बरोबर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की ह्या पूर्वी परदेशी पाहुणे कधीच सिसिलिया किंवा सार्डिनिया ला आलेले नव्हते. शी जिन पिंग इटलीभर फिरले. कारण त्यांना इन्वेस्ट्मेन्ट्स चे स्पॉट्स निश्चित करायचे होते. सर्व तपशील उघड झाला नाही, पण अनेक हारबर्स, फॅक्टरीज, एनर्जी जनरेशन प्लान्ट्स वगैरेंचा प्लॅन आहे. त्यातले काही प्रोजेक्ट्स सुरूही झाले आहेत. कित्येकशे बिलियन्सची इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे. ह्या गोष्टीचा थेट संबंध आमच्या स्टील प्लांट शी होता. आर्सेलर मित्तल ने एका पॉइंटला इटलीचा प्लांट सोडून देण्याचे ठरवले होते. परंतु (हे एक स्पेक्युलेशन), आम्ही सोडताच कितीही लॉस पत्करून चायना हा प्लांट विकत घेणार, कारण त्यांना युरोपच्या स्टील स्पेस मध्ये फूटप्रिंट हवाच आहे.

वर संदर्भ दिलेला एन्वायटी मधला लेख - https://www.nytimes.com/2020/04/07/opinion/italy-coronavirus-naples.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोव्हिड-१९ साथीबद्दल उपलब्ध विदाचं विश्लेषण करून काढलेले काही रोचक निष्कर्ष. विविध निकष लावून कोणता देश सर्वाधिक सुरक्षित आहे ह्याची यादी केली आहे. भारत त्यात टॉप ४०मध्येही नाही.
Deep Analysis Of Global Pandemic Data Reveals Important Insights

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विविध निकष लावून कोणता देश सर्वाधिक सुरक्षित आहे ह्याची यादी केली आहे. भारत त्यात टॉप ४०मध्येही नाही.

यूएसएसुद्धा नाही.

उलटपक्षी, त्याच आर्टिकलात दिलेल्या रिस्क रँकिंगानुसारच्या (सर्वाधिक सुरक्षित देशांच्या?) यादीत यूएसए दुसऱ्या क्रमांकावर (इटलीच्या खालोखाल) आहे, तर भारत पंधराव्या क्रमांकावर आहे.

तुलना कशाशी करता, यावर अवलंबून आहे.

साथ चालू आहे, तर असुरक्षितता ही असायचीच. चित्र गुलाबी तर निश्चितच नाही. मात्र, तितकेही गयेबीते नाही - परिस्थिती याहूनही वाईट असू शकली असती; तसे आदर्श भल्याभल्यांनी घालून दिलेले आहेत - एवढेच निदर्शनास आणून देण्याचा हा प्रयत्न.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र गुलाबी तर निश्चितच नाही. मात्र, तितकेही गयेबीते नाही - परिस्थिती याहूनही वाईट असू शकली असती

याबद्दल शंका नाही, पण भारतातील मध्यमवर्ग आणि त्यांची लाडकी प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे वगैरे पाहता मोदींचा मास्टरस्ट्रोक आहे, भारतीय इम्यून आहेत, उन्हाळ्यात व्हायरस मरतोय, वगैरे कारणांवरून स्वतःची टिर्री बडवली जात आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतातील मध्यमवर्ग आणि त्यांची लाडकी प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे वगैरे पाहता मोदींचा मास्टरस्ट्रोक आहे, भारतीय इम्यून आहेत, उन्हाळ्यात व्हायरस मरतोय, वगैरे कारणांवरून स्वतःची टिर्री बडवली जात आहे.

Indian exceptionalism???

भारतातील मध्यमवर्ग आणि त्यांची लाडकी प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे वगैरे पाहता मोदींचा मास्टरस्ट्रोक आहे, भारतीय इम्यून आहेत, उन्हाळ्यात व्हायरस मरतोय, वगैरे कारणांवरून स्वतःची टिर्री बडवली जात आहे.

(मी मोदीभक्त नाही, परंतु) लोक गाढव आहेत त्याला मोदी काय करणार?

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने