माया नावाची संकल्पना

मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे. मायेचा कारक म्हणजे काय ते नक्की कधीच उलगडलेले नव्हते. तसेही माया म्हणजे नक्की काय हेदेखील कोणी कधी उलगडून सांगीतलेले माझ्या मर्यादित वाचनात आलेले नव्हते. वेदांतामधील ही एक फार महत्वाची संकल्पना आहे = 'माया' एवढेच, नीट वाचून वाचून माहीत होते. म्हणजे पुरुष-प्रकृती मधील पुरुष हे ब्रह्म तर प्रकृती ही माया. जीवाच्या अस्तित्वाला मायेच्या पटलाने वेढलेले असते. ज्यामुळे जीव, ब्रह्म जाणू शकत नाही. भल्या भल्या थोरामोठ्यांना मायेचे हे आवरण दूर करता आलेले नाही. अरे पण म्हणजे काय? कुठलं पटल, कुठलं धुकं, काहीही माझ्या पचनी पडलेले नव्हते. आता रामविजय ग्रंथातीलच मायेचे वर्णन घ्या ना. या ग्रंथात मूळमायेचे सुरस वर्णन आहे. पुरुष आणि प्रकृती यांमधील पुरुष निद्रीस्त असतेवेळी मूळमायेने, त्याच्या नकळत सत्व-रज-तम गुणांचा पसारा मांडला आणि त्या धूर्त प्रकृतीने असे काही विश्व उत्पन्न केले की पुरुषापर्यंत जीवास पोचताच येउ नये. अफाट वर्णन आहे.
_________

जैसा कोणी पुरुष निद्रीस्त| पहुडला असे चिंतारहीत|तो स्वेच्छे होउन जागृत| कार्य काही आठवी||
की समुद्री उठे लहरी|तैसी ध्वनी उठे चिदंबरी|मी म्हणोनी निर्धारी| हाक थोर जाहली||
एक असता ब्रह्मानंद| नि:शब्दी उठीला शब्द|ते ध्वनी मायानाम प्रसिद्ध| वेदांतशास्त्र गर्जतसे||
जिचे नाव मूळप्रकृती| जी आदिपुरुषाची चित्शक्ती| तिने शेजे निजवोनी पती| सृष्टीकार्य आरंभिले||
एवढे ब्रह्मांड निर्माण केले| परंतु पतीस कळो नेदि वर्तमान ते परम कवटाळीण| नसतीच दैवते उभी केली||
विधी-विष्णू-उमाकांत| ही तीन्ही बाळे जिच्या आद्न्येत| नेत्र उघडोनी निश्चित| पाहो नेदी स्वरुपाकडे||
ब्रह्मसुखाच्या समुद्रात्| बुडाले हे जीव समस्त|परंतु तेथीची गोडी किंचित्|चाखो नेदी कोणाते||
चैतन्य इनेच झाकीले|इने अरुप रुपासी आणिले|अनंत ब्रह्मांडाचे पुतळे| एकेच सूत्रे नाचवी||
इने निर्गुणास गुण लाविले जाण|अनामासी ठेविले नामकारण|निराकारासी आकारुन्| जीवीत्वासी आणिले||
हे परम पतीव्रता साचार|पतीस न कळता जाहली गरोदर| ब्रह्मांड रचिले समग्र|नानाविकारे करोनिया||
नानायोनी विकारभाव|इने फासा पाडीले अवघे जीव|गाधीस* कैसे दाविले लाघव|मिथ्या कर्तूत्व नसतेची||
कोणी मुरडे स्वरुपाकडे| त्यासी नसतेची घाले साकडे|अथवा स्वर्गसुख रोकडे|पुढे दावुनी भलवी की||

* या काव्याआधी, गाधी ऋषींची कथा येते.
____________
असो तर एवढे वाचूनही माया म्हणजे काय? हे कळलेच नव्हते.सॅम हा माता अमृतानंदमयी (द हगिंग सेंट) यांचा शिष्य आहे. सॅमने वरती उल्लेख केलेल्या 'चंद्र' विषयक व्हिडीओमध्ये फार सोप्या शब्दात हे मायेचे स्वरुप सांगीतलेले आहे.
तर थोडक्यात, माया म्हणजे 'लिमिटेड कॉन्शसनेस' आपला या जन्मी जे मर्यादित अस्तित्व आहे ते म्हणजे माया. माया = लिमिटेड एग्झिस्टनस, ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स.
आपले अनेकानेक जन्म झालेले आहेत त्यामध्ये आपण कित्येकदा कोणाचे भाऊ-बहीण-नवरा-बायको या भूमिका निभावलेल्या आहेत. आपल्याला अपत्ये झालेली आहेत पण आपल्याला ते आठवते का? तर नाही. या जन्मी मला, पूर्वजन्माची संपूर्ण विस्मृती झालेली असते. आणि हे जे विस्मृतीचे पटल आहे ते म्हणजे माया. चंद्राची, ज्योतिषातील भूमिका आपल्याला सुखात, आनंदात, भ्रमात व sane ठेवण्याची. उदा - मला या जन्मी कोणी उगीचच दुखावले तर मला आवडत नाही, विनाकारण कोणी माझी खोडी काढली आहे, त्रास दिला आहे असा भाव होतो. पण असे कशावरुन नाही की पूर्वीच्या एखाद्या जन्मी मीच काही दगाफटका केलेला असेल व त्याचे फळ मला आता मिळत असेल? काही व्यक्ती नको असतानाही आपल्या आयुष्यात येतात, रेंगाळतात याचे कारण कदाचित पूर्वजन्मातील आपल्याच वासना-आशांशी निगडीत असू शकते. तर ही आठवण न येणे , व आपण या जन्मी त्या अद्न्यानामध्ये सुखात असणे, ही आहे माया. आणि चंद्र त्याचा कारक आहे.

उदाहरणार्थ - गुरुचरित्रात एकदा नृसिंह सरस्वतींनी एकदा एका लाकूडतोड्याच्या तोंडून वेदांताची चर्चा घडवुन आणली व २ मदोन्मत्त ब्राह्मणांचा गर्व हरण केला ही कथा येते. या कथेत त्यांनी शिष्यांना सांगीतले की ७ रेघा वाळूत आखा व त्या लाकूडतोड्याला प्रत्येक रेघ ओलांडण्यास सांगीतली. प्रत्येक रेष ओलांडली की त्याला एकेक जन्म आठवत गेला. कधी तो वैश्य होता, कधी शूद्र तर कधी विप्र अथवा क्षत्रिय. ही जी युनिफाईड मेमरी आहे ते म्हणजे ब्रह्म. व त्या लाकूडतोड्याला आताच्या (करंट) जन्मी जी लिमीटेड मेमरी आहे ते मायेचे पटल.

अजुन एका कथेत एक स्त्री आपला मुलगा गेल्याने अतिशय शोकाकुल आहे, तेव्हा गुरु तिला म्हणतात यापूर्वी अनेक जन्म तू आई झालेली आहेस मग तेव्हाच्या अपत्यांकरता तूशोक करत नाहीस आताच का शोक करतेस? याचे कारण तिला पूर्वजन्म आठवत नाहीत व ते न आठवल्याने, तेव्हाचा शोक तिला होत नाही. हे मायेचे पटल.

हे माझ्याकरता तरी नवीन होते. मला कळल्यानंतर खूप अचंबा वाटला व वाटले अरे कोणी इतक्या सोप्या शब्दात का नाही सांगीतले की -
माया = लिमिटेड एग्झिस्टनस (आत्ताचा जन्म), ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स (अनेकानेक जन्म). सर्व पुस्तकांमध्ये
सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः|| .वाक्यहा दृष्टांत तसेच दागिना व सोने हा दृष्टांत अनेकदा वाचलेला होता. की लाट म्हणजे समुद्र नाही पण समुद्र हाही लाटेहून वेगळा नाही. सोन्यापासून जसे विविध दागिने घडतात त्या सर्वांमध्ये, सोने हे अविचल, कायमस्वरुपी असते. वगैरे दृष्टांत परत परत वाचलेले होते. पण कधीही कळलेले नव्हते. ते सॅमच्या एका व्हिडीओने कळले ब्वॉ.

आय होप धिस इज मेकिंग सम सेन्स Smile

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडलं लेखन.

असा विचार आला की एखाद्या बेटावर किंवा रानात किंवा वाळवंटात कुणी एकच आहे तर कोणते ग्रह प्रभावी ठरतील? चंद्र? इतर प्राणीमात्रांशी संपर्क ठेवून राहण्यासाठी? माया?
(अधिकार,सत्ता,संपत्ती,सुख देणारे ग्रह काहीच कामाचे नसणार तिथे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शरद्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरच्या एका झाडाचं नाव मी माया ठेवलं आहे. त्याची गोष्ट अशी.

गेल्या हिवाळ्यात, २०१९च्या डिसेंबरात बाहेर हवा फार छान होती. मला बागकाम येत होतं, शिंकेसारखं. पण करण्यासारखं काहीही नव्हतं. जानेवारी-फेब्रुवारीच्या थंडीत ते सगळं फुकट गेलं असतं. तेव्हाच हाफिसातला एक त्याच्या फिडल लीफ फिगसाठी गिऱ्हाईक शोधत असल्याचं गॉसिप कानांवर आलं. त्याच्याशी बोलल्यावर समजलं की ते घरात ठेवायचं झाड आहे; इथली थंडी त्याला अजिबातच सहन होणार नाही. आणि त्याला थेट नाही पण व्यवस्थित उजेड लागतो. मुख्य म्हणजे हे झाड १० फूट उंच आहे. त्याच्या अपार्टमेंटमध्ये तेवढी उंच जागाच नाही. शिवाय तो बदली करवून घेऊन शिकागोला जात होता.

मग मी लगेच ते झाड घेण्याची तयारी दाखवली. आमच्या घरात एका खोलीत (करोनाआधी) मोजकं फर्निचर होतं आणि माझा बेत होताच तिथे झाडझाडाट(!) करून टाकायचा. कधी नव्हे ते मला अमेरिकी आकाराचं घर असल्याचा आनंद झाला. त्यानं मुळात ज्या किंमतीला ते घेतलं होतं, तेवढे पैसे मी त्याला दिले. त्यानंच ते झाड घरी आणून दिलं. तो आणि त्याचा बॉयफ्रेंड, दोघं हट्टेकट्टे तरुण असल्यामुळे ते झाड सहज घरात आलं. माझ्यासाठी सहज; ते दोघं डिसेंबरातल्या गुलाबी उन्हात घामाघूम झाले होते.

ते दोघं झाडाचा उल्लेख बोलताना 'ती' असा करत होते. म्हणून सहज विचारलं, तिचं काही नाव आहे का? नव्हतं. म्हणून मी नाव ठेवलं माया. त्यांनाही सहज उच्चारता येईल.

लोकांनी बरीच भीती दाखवून झाली. अनेकांचं म्हणणं, एकेक करत पानं गळायला लागतात आणि अचानक झाड जातं. ह्या झाडाची वरची काही पानं मुडपलेली होती; अपार्टमेंटमध्ये उंच वाढायला पुरेशी जागा नसल्यामुळे पानं मुडपली होती. घरी आणल्यावर ती सरळ होईनात. मग मी वाट बघायचं ठरवलं. तिला फक्त पाणी घालते, खत नाही काही नाही. आणल्यावर नव्या कुंडीत ठेवताना थोडी वाढीव माती घालावी लागली, त्यात जे काही असेल ते.

आता माया आणखी चार फूट वाढून १४ फुटाचा आसपास झाल्ये. अधूनमधून त्या दोघांना फोटो पाठवते. पण काही फांद्यांची लवकरच छाटणी करेन. त्या वेड्यावाकड्या वाढल्या आहेत. त्यांतून नवीन झाडं करून तीही मित्र-मैत्रिणींत वाटून टाकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता माया आणखी चार फूट वाढून १४ फुटाचा आसपास झाल्ये. अधूनमधून त्या दोघांना फोटो पाठवते.

पुढच्या वेळेस फोटो पाठवताना त्यात 'माये'शेजारी उभे राहून पोज़ केल्यास फोटोस 'माया आणि महामाया' असे शीर्षक देता येईल. काही नाही, सहज आपले सुचविले झाले.

(अवांतर: चौदाफुटी झाड - अपार्टमेंटमध्ये राहणार नाही हे तर झालेच, परंतु - घरात तरी मावते? कोठे किचनमध्ये ठेवले आहे की जिन्यात? की आडवे करून ठेवले आहे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा जोक त्यांना समजला असता तर जरूर पाठवला असता. पण सध्या मराठी लोकांपुरताच मर्यादित राहणार!

दुमजली घर आहे; एका खोलीच्या वर काही नाही, ती दुमजली आहे. टेक्सन-आकाराची! विसेक फुटाची माया असेल छपरापर्यंत! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या गाण्यांत, 'साच तेरा प्यार बाकी माया है' असं म्हणत किशोरकुमारने बाकीच्या गोष्टी त्यागण्याचा जो थयथयाटी अभिनय केला आहे तो पाहिल्यावरच माया या संकल्पनेची जाणीव झाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही जी युनिफाईड मेमरी आहे ते म्हणजे ब्रह्म.

युनिफाईड मेमरी हीसुद्धा मायाच आहे. ब्रह्म निर्गुण निराकार असते!

आपले म्हणजे वैयक्तिक आणि समस्त लोकांचे, युनिफाईड विचार आणि त्या विचारांचे प्रोजेक्शन ह्यांनी साकार होणारे भौतिक जग (सगुण साकार) ही माया.

- (मायाजालात अडकलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आह्ह्ह!!! हे बाकी शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे ब्रह्म सोडून उरलेले सगळे माया का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

होय!

- (शास्त्रापुरता प्रतिसाद दिलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाबद्दल काही वाटणे म्हणजे माया.
भीमाने हिडिंब राक्षसास मारल्यावर जी उत्पन्न झाली ती माया?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाबद्दल काही वाटणे म्हणजे माया.

अगदी!

ह्यालाच अजून पुढे नेल्यास...

पाच इंद्रियांकडून सतत मिळणाऱ्या संदेशांवर अविरत प्रतिक्षिप्त होत राहणे म्हणजे माया!

- (मायावी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रह्म, माया, पटल, पुनर्जन्म काहीतरी वेगवेगळ्या संज्ञा घेऊन त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत असं समजायचं. हे सत्य, ते आभासी अथवा मिथ्य वगैरे असं पृथक्करण करायचं.

हे शून्याला भागत बसण्याचे उद्योग कशासाठी? निरर्थक समाधानाचा शोध कशाला?

त्यापेक्षा आवडीने एकेक झाड आणून लावणारी ३.१४अदिती खूप जास्त छान समजलीय काय करायला हवं ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ३.१४ चं संपूर्ण उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही माया कोणालाच समजली नाही, असं म्हणावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही गोष्टी म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह नाहीत. एक केले ती व्यक्ती, म्हणजे दुसरे करत नसेल - असे नाही. दोन्ही गोष्टी शक्य आहेत व आपापल्या ठिकाणी उचित. सर्वांना अध्यात्म निरर्थक वाटतच असेल असेही नाही.
___________
हां शी इज अ फाऊंडर ऑफ वन ऑफ द बेस्ट मराठी फरम्स - असे काही म्हणाल तर ते मी समजु शकते. ती तिची कर्तबगारी आहे.
बाकी झाडे येरे गबाळेही लावतात, आवडीने लावतात. त्या येऱ्या गबाळ्यात अस्मादिकही आहेत. मात्र आपल्या आपल्या घराच्या, हौशीच्या साईझप्रमाणे आम्ही लावतो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधि जंगलं कापायची आणि गगनचुंबी वस्त्या करायच्या आणि मग त्या घरांत झाडं लावायची आणि निसर्गाशी जवळीक करायचं समाधान मिळवायचं!

हे समाधान जास्त निरर्थक आहे असं नाही वाटत?

- (DevideByZero एरर हँडलर लिहीणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त निरर्थक

असं काही असतं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थंड हवेच्या प्रदेशांत, जिथे बाहेर काही महिने बर्फ असतो, तिथे घरात झाडं ठेवायची संकल्पना बरीच जुनी आहे. सिमेंटची जंगलं भारतात दिसण्याआधीपासूनची. जी झाडं घराबाहेर वाढणार नाहीत, बाहेरच्या हवामानामुळे मरतील, तीच सहसा घरात वाढवली जातात.

भारतातही तुळशी वृंदावन नामक कुंडीत, म्हणजे अनैसरगिकरीत्या तुळस वगैरे घरातल्या चौकांत वाढवण्याची जुनी पद्धत आहे.

व्यक्तिगत पातळीवर, मला निसर्गाशी जवळीक वगैरे प्रकार भोंगळ वाटतात. मी नाही त्यांतली! मला वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी वाढतात, ती मेली तर का मेली, जगली तर त्यातून नवी झाडं कशी तयार करायची ह्याचं निरीक्षण करायला आवडतं. मी माझ्या व्यक्तिगत आनंदासाठी झाडं लावते. ती झाडं बघून किंवा ज्यांना देते त्यांना ती मिळाल्यामुळे आनंद होत असेल तर तो बोनस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गगनचुंबी इमारती बांधल्या नाहीत तर एवढ्या लोकांच्या घरांसाठी जास्त जागा वापरावी लागणार; म्हणजे जास्त जमीन रिकामी करावी लागणार; म्हणजे मुळात असतील तर जास्त झाडं कापावी लागणार.

DivideByZero सोबत कधी जमल्यास Dirac, Kronecker Delta वगैरेंचा विचार करून पाहा. तत्त्वज्ञान म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Dirac, Kronecker Delta वगैरेंचा विचार करून पाहा. तत्त्वज्ञान म्हणून.

ह्यावर हे पुस्तक सुचवतो. क्वांटम मेकॅनिक्सचा तत्वज्ञान म्हणून विचार करण्यासाठी मस्ट रीड कॅटेगोरीतलं पुस्तक आहे.
(ॲमेझॉन, बुकगंगावर ऑनलाइन मिळते)

क्वांटम मेकॅनिक्स

- (क्वांटा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी हे दोन्ही डेल्टे (डिरॅक आणि क्रोनेकर) कॉलेजात आणि आता विदाविज्ञानानिमित्तानं शिकून झाले. पण ओम-बिम नको बुवा. आम्ही आमच्या ग्रीक अक्षरांत खुश आहोत. आम्हांला ओमची गरज नाही!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असं सिलेक्टिव्ह असणं हीच माया! Wink

-(सर्वसमावेशक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणितात गणित सोडून इतर गोष्टी घुसडणं, हे गणित न समजण्याचं लक्षण आहे. गणित समजण्याला माया-साया-ताया-भाया काहीही म्हणा!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंय. गणिताचा उपयोग करून इतर प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाड लावणे हे लिटरली घेऊ नका

तुलनात्मक आहे ते. ज्याचा थांग लागणं शक्य नाही अशा गोष्टींची थियरी उगाळण्यापेक्षा काहीतरी व्यवहारातील भौतिक करणे जास्त बरे अशा अर्थाने.

त्याजागी गाणे ऐकणे, क्रिकेट मॅच पाहणे, खेळणे वगैरे काहीही ठेवावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याचा थांग लागणं शक्य नाही अशा गोष्टींची थियरी उगाळण्यापेक्षा

अशा थिअरीज मांडल्या गेल्या नसत्या आणि उगाळल्या नसत्या तर भौतिकशास्त्रात केलेली अथांग प्रगती होउच शकली नसती.

ग्रॅविटॉन पार्टीकलचा शोध घेणाऱ्या क्वांटम फिजिक्सच्या संशोधकांनी शोध सोडून गोट्या खेळल्या पाहिजेत तर Wink

- (क्वांटम असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भौतिक व्यावहारिक उपयोगाचं संशोधन आणि सत्य, ब्रह्म, मिथ्य, माया याबद्दल तात्विक चिंतन यात फरक असावा असं वाटतं.

अर्थात ज्याला त्यात अर्थ वाटतो त्याने ते करावं. मी फक्त व्यक्तिगत मत व्यक्त केलं, की याची गरज आहे का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या थांग लागलेला नाही म्हणून कधीच लागणार नाही हे भौतिकशास्त्र किंवा निसर्गनियमांना लागू नाही. आज करोना विषाणूसाठी लस नाही म्हणून उद्या नसेलच असं नाही. हे भौतिकाबद्दलचं संशोधन.

मागचा जन्म, सत्य, ब्रह्म वगैरे गोष्टींना ठरावीक माणसांच्या मेंदूबाहेर अस्तित्व असण्याबद्दल मला बऱ्याच शंका आहेत. त्याची गरज आपल्याला वाटत असेल तर जरूर करा विचार! माझं त्याबद्दल काहीही मत नाही. पण त्याचा विचार करता म्हणून लोकांना हिणवायची काहीही गरज नाही. ह्या गोष्टींचा विचार कूल पॉइंट्स मिळवण्यासाठी करता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गवि हिणवतायत असं वाटत नाही. सदर लेखिका certain uncertainty (विज्ञान) आणि uncertain uncertainty (वरील लेखातील संकल्पना/ कल्पना) यातील फरक न समजता, केवळ शाब्दिक खेळ( कोशिंबीर Smile ) खेळून स्वतःची समजूत काढताहेत, ही माहिती वैज्ञानिक/ अध्यात्मिक माहिती असल्याचा भास निर्माण होतो आहे, आणि अखेरीस त्यातून निष्पन्न काहीच होत नाहिए, ह्याविषयीचा वैताग, उद्वेग आहे तो. उदा. या मायेच्या नव्या मॉडेलनुसार तिचा 'कारक' चंद्र हा ग्रह(!)च का, आणि सूर्य हा ग्रह( परत !) का नाही, याचे उत्तर नाही. हे मॉडेल सदोष आहे की नाही, हे कोणीच ठरवू शकत नाही. अशी टोकाची सापेक्ष मॉडेल्स, शब्दच्छलापलीकडे फार काही मिळवू शकत नाहीत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

काही कळलं नाही. विद्न्यानाचा इथे काडीमात्र संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञानाच्या ऐवजी शास्त्र म्हणा, पाहिजे तर: जेथे काही मूलभूत नियम पाळले जातात, काही गृहितकांवर आधारीत निष्कर्ष काढता येतात, त्याविषयी चर्चा करून इतरांनाही तो अनुभव/ विचार यांची पडताळणी करता येईल, अशी प्रणाली अपेक्षित आहे हा प्रतिसाद लिहिताना. बाकी जेवढा मला लेख समजलाय, त्यावरून तुम्हाला संकल्पना पूर्ण समजलीय असे तुम्ही म्हणत नाही आहात, फक्त तुलना करण्यासाठी चांगले/ मनाला जास्त पटणारे, रुचणारे उदाहरण सापडलेय, अशी मांडणी करता येईल. त्यातून निष्पन्न काय होणारे हा प्रश्न वेगळाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

म्हणजे ज्योतिष ही अशी systematic प्रणाली (discipline) आहे, अशी त्यावर विश्वास असणाऱ्यांची श्रद्धा असते, असा अनुभव आहे, म्हणून हा प्रतिसाद. चुभूदेघे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

निखिलराव, काय होतं की एखादा लेखक पुस्तक छापायला प्रकाशकाकडे गेला की दोन प्रश्न त्यास पडतात. १) लेखक नवीन आहे का? त्याचे नाव किती जणांना माहिती आहे. २) विषय 'खपणारा, उचकवणारा, 'आपला' आहे का?
त्याप्रमाणे लेखकास बदल करायला लावून राईट्स कमी किंमतीत पाडून घेतो.

'ओम' त्यापैकीच असावे. प्रकाशकाला पैसे बुडण्याची भीती वाटत नसावी.
(माझे मत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रह्म, माया वगैरे काही विभागणी केली तरी ती आपल्या याच हार्ड ड्राईव्हची पार्टीशन्स आहेत. व्हर्चुअल.

अमुक एक निखळ मूळ सत्य, आणि उर्वरित अमुक ही माया, मिथ्य किंवा एकूण काय निखळ अस्तित्वात आहे ते आपल्याला कळण्याची शक्यता आहे असं मानून शाब्दिक खेळ मांडण्याची गरज आहे का? असं म्हणायचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हार्ड ड्राइव्हची पार्टीशन्स म्हणे. व्हर्च्युअल. तिच्यामारी.

(विनोदी दिली आहे. खात्यावर मांडून ठेवणे. आगाऊ आभार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा शब्द चपखल

काहीही उपमा द्या, अर्क हाच.. काहीतरी सत्य, मूळ आणि काहीतरी माया.. कशापासून तरी वेगळं झालं की मूळ सत्य सापडतं वगैरे हे सर्व = तिच्यामारी

ता क, खवचट दिली आहे. हिशोब तूर्तास सेटल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>>>>तुलनात्मक आहे ते. ज्याचा थांग लागणं शक्य नाही अशा गोष्टींची थियरी उगाळण्यापेक्षा काहीतरी व्यवहारातील भौतिक करणे जास्त बरे अशा अर्थाने.>>>>>>>>>
शंकराचार्यांपासून जी साखळी सुरु होते ती पुढे इतकी विस्तारत जाते, प्रत्येकच जण अध्यात्मिक पुस्तकांत या विषयावर काही टिप्पणि करतोच. अनेक प्रकरणे या विषयावरती येतात. हे असे का? असा प्रश्न पडतो. इतक्या लोकांना हे प्रकरण/संकल्पना कळली असेल का? की एक जण आकाशाकडे पहातो, मग २-४ जण तो काय पहातोय हे पाहू लागतात. हळूहळू एक मोठ्ठा जमाव तयार होतो.
मग माया या संकल्पनेकडे लोण, साथ या दृष्टीकोनातून का पाहू नये? दिवाळी अंकात याविषयी च लेख लिहावा की काय असे वाटू लागले होते. पण तेवढे स्किल नाही. तसेच फक्त आपले नीरीक्षण म्हणुन काहीतरी ठोकून देणे हे ही तत्वात बसत नाही. मायेची संकल्पना ही 'अध्यात्मात आलेली साथ' आहे याबद्दल विदा नाही.
पण कुतूहल आहे. आता आहे कुतूहल त्याला काय करणार. प्रत्येकाचा पिंड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकराचार्यांपासून ......

ते विनोबा भावे. दोघांनाही सन्यास घ्यायचा होता. तो घेतलाच माया तोडून. पण शंकराचार्य ( आठव्या शतकातले कालडीचे.)थोडे मायेत अडकलेच. माय मेल्यावर तिचे तर्पण, श्राद्ध करायला गावी परत आले.
विनोबाच्या ब्रह्मचर्येचे गांधींनाही आश्चर्य वाटायचे.
मायेचे एक दृष्य रूप 'माय' समजायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती ...

***
विचार प्रक्रिया विस्कळीत .. पण चांगली आहे.
असा विचार करूनच एखादे दिवशी सत्य गवसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अदिती माझी बाजू घेतल्याबद्दल आभार Smile
गवि यांनी हिणावलेले नाही. त्यांनी फक्त तुलना केलेली आहे. अर्थात माया-ब्रह्म शब्दच्च्छल करण्यापेक्षा, वाचण्यापेक्षा अनेक व्यवहारोपयुक्त गोष्टी करता येतात हे मान्य आहे. किंबहुना, अध्यात्मात 'नामस्मरण' केल्याने जितक्यांचे भले झाले नसेल तितक्यांचे भले, विद्न्यानाने अनेक लशी शोधून करुन दाखवले. विद्न्यानाचे महत्व, प्रभुत्व आणि महत्ता निर्विवाद आहे. अध्यात्माच्या देखील लाख मर्यादा आहेत. पण आता ज्योतिष व अध्यात्म हा माझ्याकरता छंद झालेला आहे.
.
मध्यंतरी विद्न्यानाची काही पुस्तके आणुन वाचायचा प्रयत्न केला होता. तेव्हा राघांनीही एका धाग्यात, एका प्रतिक्रियेत काही पुस्तके सुचवली होती. पण त्याचा नंतर पाठपुरावा होउ शकला नाही.

हे माया-ब्रह्म हा विरंगुळा आहे. ते समजल्या न समजल्याने अजिबात फरक पडत नाहीये. खरं तर नामस्मरणही साधं जमत नाही तिथे कुठे आम्ही माया-ब्रह्म उकलणार. पण एक सॅम माझा आवडीचा ज्योतिषी आहे आणि त्याने काहीतरी आवाक्यात येणारं सांगीतलं म्हणुन धागा प्रपंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एक सॅम माझा आवडीचा ज्योतिषी आहे आणि त्याने काहीतरी आवाक्यात येणारं सांगितलं म्हणुन धागा प्रपंच.

पुस्तकांची माहिती मिळाल्याने नवीन वाचकांचे काम सोपे होते. लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॅम जेप्पी ची यु ट्युब लिंक वरती धाग्यात दिलेली आहे. बाकी त्याचे पुस्तक मी वाचलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. पुस्तक किंवा विडिओ वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0