मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०८
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
डिजिटल माध्यम लेखक आणि वाचक.
डिजिटल माध्यम लेखकांना वेगवेगळ्या संस्थळांवर एकच लेख कॉपी पेस्ट करावा लागतो ही माध्यमांची शोकांतिका आहे का वाचकांचा हट्टीपणा?
( वाचक फक्त वाचनमात्र राहात असतील, सभासद होत नसतील तर ते समजू शकत नाही.)
छापील माध्यमांना मर्यादा पडतात. वेगवेगळी पुस्तके, पेपर विकत घेऊन वाचक वाचू शकत नाही आणि एका ठिकाणचे लेखन दुसरीकडे प्रसिद्धीसाठी देता येत नाही.
शोकांतिका?
कसलातरी शेवट दुःखी असेल तर त्याला शोकांतिका म्हणता येईल. हा शेवट असल्याचं सध्यातरी दिसत नाही.
वाचकांचा हट्टीपणा का? माझं उदाहरण बघितलं तर मला दिसतं की माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. काम करताना कंटाळा आला की मधूनच ऐसी उघडते. त्यापेक्षा जास्त मराठी-आंजा वाचायला वेळ नसतो. इतर संस्थळांवर तोच लेख आहे, हेही मला हल्ली समजायला लागलं आहे, तेही फेसबुकमुळे. हल्लीच फेसबुकवर मायबोलीवर (किमान एकेकाळी) नियमितपणे वावरणारे लोक माझ्या यादीत आले आहेत; त्यामुळे कदाचित काही लेख सापडतात.
काही वर्षांपूर्वी एक बातम्यावजा पोर्टल आलं होतं
- कायतरी नामा, 'अक्षरनामा' नाही, ते नवीन आहेआठवलं नाव, 'कलमनामा'. मग ते गायब झालं. 'मी मराठी' मराठी साईट आली आणि काही वर्षांनी गायब झाली. 'मायबोली'वरचा 'संयुक्ता' नावाचा भाग फक्त स्त्रियांसाठी होता; तो त्यांनी सगळ्यांसाठी खुला केला, तेव्हा सगळ्यांना आपलं लेखन तिकडून मिटवण्याची मुभा होती. अनेकींनी ती वापरली आणि लेखन गायब झालं.चेयरमन माओनं हे विधान केलं होतं, ह्याची मला गंमत वाटली होती. ते विधान मला पटतं - Let thousand flowers bloom. त्यात अंत तर नाहीच, पण दुःख वाटण्यासारखी काय गोष्ट आहे?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Thousand नव्हे hundred.
Thousand नव्हे hundred.
ह्यानिमित्ताने या कॅंपेनचे विकिपान वाचले. लोकांनी कम्युनिस्ट सरकारबद्दल खरे मत प्रगट करावे, खुली टिकाटिप्पणी करावी असे काहिसे या कॅंपेनचे मूळ तत्व होते. प्रत्यक्षात, सरकारच्या विरोधकांना चुन चुनके मारण्यासाठीचा हा प्लॅन होता. आपल्याकडे आजकाल चाललंय त्याची प्रेरणा हीच असावी.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
संस्थळं - मराठी संस्थळं
पाच वर्षांपूर्वी सात होती. स्वप्रकाशन, संपादन सोय. संपादक/अडमिनच्या नजरेत. फुकट. वाचकांनी कुठेही जाऊन वाचण्यात अडचण नव्हती. प्रकाशन झालेल्या संस्थळावर जाऊन वाचकांनी प्रतिसाद दिले असते तर सर्वच चालू ठेवण्यात त्या त्या मालकांचा उत्साह कायम राहिला असता. एकेक संस्थळ अमुक एक प्रकारांच्या पद्धतीचे म्हणून नावाजले गेलेही असते.
मुळात नवीन इंग्रजी माध्यमातून शिकलेली पिढी मराठी लेखन टाळतेच. फेसबुकवर जाते. ( तिथे वर-आंगठे लगेच मिळतात.) जे काही जुने वाचक आहेत ते एकाच संस्थळास चिकटून बसलेले वाटतात.
विविधता गेली तर गंमत जाईलच.
मराठीसाठी एवढं तरी करायला हवं.
तपशिलातला सैतान हवा.
एवढं म्हणजे? सैतान त्या तपशिलांत असतो, तो कुठे आहे?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुस्तक प्रकाशन
नवी आवृत्ती आणि पुनर्मुद्रण ह्यात काय फरक आहे?
"मराठीत पुस्तकाची आवृत्ती अजूनही १००० प्रतींची असते" हे कुठेतरी वाचल्याचं स्मरतं- ते खरं आहे का?
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
अपडेट्स असणे नसणे हा बदल.
अपडेट्स टाकल्यावर नवी आवृत्ती होते. उदाहरणार्थ पर्यटन पुस्तकांत नवीन नावं, फोन नंबर्स, नवे रूट्स टाकून छापतात.
पुनर्मुद्रणात आहे तसंच जुनं पुस्तक छापतात. उदाहरणार्थ स्वामि कादंबरीची पहिल्या प्रती संपल्यावर पुन्हा तेच छापणे. यात बदल काही नसतात.
पर्यटन पुस्तकं/माहितीपर -
पर्यटन पुस्तकं/माहितीपर - समजू शकतो.
पण कादंबऱ्या/कथा वगैरेची नवी आवृत्ती हा प्रकार कसा काय?
म्हणजे हार्ड बाउंड, नवी चित्रं किंवा कागदाची क्वालिटी वगैरे बदलली तर त्याची नवी आवृत्ती होते का?
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
नवीन माहिती अपेक्षित
नवी चित्रं ओके. किंवा नवीन ( जुनी कागदपत्र मिळवून) फोटो दिल्यासही. पण कागद,पुठ्ठा बदलून काय होणार?
उदाहरणार्थ "१८५७ चे
उदाहरणार्थ "१८५७ चे स्वातंत्र्यसमर" या पुस्तकातले मुसलमान योद्ध्यांचे उल्लेख वगळून पुन्हा पुस्तक छापणे म्हणजे नवी आवृत्ती.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सानेगुरुजी आणि बटाट्याच्या चाळीतील सांडगे
साने गुरुजी यांचे इस्लामी संस्कृती नावाचे एक पुस्तक आहे. त्यात हा एक उतारा येतो जो अरबांविषयी आहे तो असा
"अरब लुटालुट करी परंतु लुटालुटीतही त्याने मर्यादाधर्म ठेवला होता. तो उगीच मारहाण करीत नसे. शक्यतो हिंसाचार टाळी, रक्तपात टाळी, " मी या व्यापाऱ्याचे ओझे फक्त कमी करतो " असे म्हणे ! आणि ज्यांना लुटावयाचे तेथे स्त्री असेल तरी बेदुइन कितीही आडदांड वा उछुंखुल असला तरी स्त्रियांशी तो अदबीने वागे. तो स्रीवर हात टाकीत नसे. तो म्हणेल " तुमचे नेसुचे लुगडे किमतीचे आहे ते मला हवे आहे तुम्ही दुसरे नेसा मी दुर जातो" आणि तो दुर जाऊन पाठ करुन उभा राहील.
हे वर्णन वाचल्यावर आठवण झाली ती सांडगे या बटाटाय्च्या चाळीतील एका पात्राची. त्यात एक बटाट्याच्या चाळीचे सांस्कृतिक शिष्टमंडळ सांडग्याच्या चाळीत जाते. ते सांडगे मोठे भारी पात्र पु.ल. नी रंगवलेले आहे. सांडग्याच्या चाळीत आता नेमके आठवत नाही पण जे नाटक बसवले जाते त्यात शिवाजी अफजलखानाचा वध करत नाही उलट अफजल खानाचेच आतडे प्रेमभावनेने बाहेर आले असले काहीतरी भन्नाट आहे ( चुकभुल देणे घेणे व्यवस्थित आठवत नाही ) असे अनेक धक्के पचवल्यावर सांस्कूतिक शिष्टमंडळ परत येते व पुढे नळावरच्या भांडणात अरे माणुस आहे की दादा सांडगे ? असे ही विचारले जाऊ लागले. हे सांडगे अगदी साने गुरुजी वरुन घेतले आहे की काय असे हे पुस्तक वाचुन वाटले.
कारण बटाटयाच्या चाळीत एक बाबा बर्वे नावाचे पात्र विनोबांवरुन घेतले आहे असे वाचल्याचे स्मरते ( पुन्हा चुकभुल देणे घेणे) तर या पुस्तकात विनोबांचा ही एक जबरदस्त धुळे जेलमधला प्रसंग साने गुरुजी सांगतात ज्यात विनोबांना मुहम्मंद यांच्या चार पेक्षाही जास्त लग्नांविशयी आणि १७ वर्षाच्या मुलीबरोबर ही त्यांनी लग्न केले असा एकाने प्रश्न केला ( हे वय १७ पेक्षा सुद्धा कमी होते असे वाचल्याचे स्मरते ते असो ) तर त्यावर साने गुरुजी मोठ्या विलक्शण शैलीत विनोबांचे उत्तर
विनोबाजी गंभीर झाले त्यांचे डोळे चमकले " थोरांच्या लग्नाचा पुष्कळ वेळा पालक होणे एवढाच अर्थ होतो त्यांना तुम्ही भोगी समजता वगैरे आणी पुढे साने गुरुजी म्हणतात " विनोबाजींचे ते कातर सकंप भावभक्तीने भरलेले शब्द माझ्या कानात घुमत आहेत "
अशा अनेक गोष्टी पुस्तकात आहेत जे खरे म्हणजे मुळातुन वाचावे असे आहे.
मला अगोदर वाटत असे की ही मंडळी सानेगुरुंजी सारखी भाबडी असावीत. पण आता अधिक विचार केल्यास तसे वाटत नाही. ही मंडळी सामाजिक धार्मिक एक्यासाठी डेस्परेट होते हे समजु शकते. पण या पुस्तकातील त्यांची मांडणी भाबड्या एक्याची आस बाळगणाऱ्या व्यक्तीची न वाटता एखादा कसलेला वकील किंवा धुर्त राजकारणी जसे मांडणी करेल तशी वाटते. हे एकीकडी दुसरा अजुन एक विचार असा आला की कदाचित या मंडळीना कठोर वास्तव जसेच्या तसे पाहण्या समजण्याची क्षमता नसावी. म्हणजे त्याला कुठला ना कुठला आदर्शवादी मुलामा देऊन च बघण्या ची त्यातुन आपल्याला हव्या त्या विचारसरणीचा प्रसार करणे हे सवय जडलेली असावी. पण तरी..... इतका अतिरेक....?
या मंडळीच्या या वागण्यातुन आलेल्या फ्र्स्ट्रेशन मध्येच पु.ल. यांना बाबा बर्वे आणि सांडगे सारखी पात्रे निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली असावी
म्हणजे हसावे की रडावे हा प्रश्न आणि हे काय चाललय काय नक्की अशी तीव्र भावना त्याकाळच्या नॉर्मल लोकांना येत असावी
Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love
मी कुठेतरी असा एक क्वोट वाचला
मी कुठेतरी असा एक क्वोट वाचला होता जो इथे चपखलपणे लागू होतो - 'author can be excused of dishonesty only on the grounds that before deceiving others he has taken great pains to deceive himself.'
गूगलमध्ये शोधल्यावर तो सर पीटर मेडवर नावाच्या शास्त्रज्ञाचा निघाला.
Kiran Nagarkar -
Cuckold१ पुस्तकात शेवटी म्हणतात -all storytellers are liars.we all know that.
#१- मीराबाई आणि तिचा पती महाराजकुमार यावर आधारित पुस्तक. हिस्टॉरिकल फिक्शन.
चिमणराव सानेगुरुजींचे हे पुस्तक गंभीरपणे लिहिलेल नॉन फिक्शन आहे
चिमणराव तुम्ही म्हणता तसे कथे च्या कादंबरीच्या संदर्भात खरे असेल्
सानेगुरुजींचे हे पुस्तक मात्र गंभीरपणे लिहेलेले नॉन फिक्शन प्रकारातील आहे.
त्याला आचार्य विनोबा भावे आणि राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची कौतुक केलेली प्रस्तावना ही आहे.
त्यामुळे नगरकरांचे म्हणणे इथे काही लागु होइल असे वाटत नाही.
डॉ. झाकीर हुसेन हे एम ए आणी बर्लिन युनिव्हर्सिटीतुन इकॉनॉमिक्स मध्ये पी एच डी होते तरी अरब लुटारुंच्या जोक वर ते हसले नाहीत. हे विशेष प्र्स्तावनेत ते म्हणता
It is an exquisite
example of sympathetic understanding and a genuine appreciation of a life that has meant such a great deal for humanity and a true appreciation of whose work and mission can be of immense help in the process of our own national integration. The author has in unusual measure succeeded in entering the spirit of his subject.
विनोबाके तो क्या कहने बस नाम ही काफी है ते प्रस्तावनेत म्हणतात जे अगदी पटते ते असे
"गुरुजींनी हे चरीत्र भाविकपणाने लिहिलेले आहे.ज्या भाविकपणाची अपेक्षा एखाद्या निष्ठावंत मुसलमानाकडुन करता येइल. "सर्वधर्मी सनानत्व " ही भावना गुरुजींच्या ठिकाणी मुरलेली होती यामुळे हे शक्य झाले "
यावर आता काय म्हणणार धन्य आहे !
हे पुर्ण पुस्तक एक गंभीर विनोद असेल तर तो अति उच्च दर्जाचा असावा यावरील तत्कालिकांचे मौन ही बरेच बोलके आहे.
Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love
प्रोत्साहनापर -
प्रस्तावनेतली दोहोंचीही वाक्यं पाहता ती प्रोत्साहन पर वाटतात.
"गुरुजींनी हे चरीत्र भाविकपणाने लिहिलेले आहे.ज्या भाविकपणाची अपेक्षा एखाद्या निष्ठावंत मुसलमानाकडुन करता येइल." - म्हणजे चिकित्सकवृत्तीने वाचू नये कारण मुळातच भाविक वृत्तीने लिहिलेलं पुस्तक आहे.
साने गुरुजींची पुस्तकं "भावुक/भावनात्मक" असतात त्यापेक्षा हे वेगळं आहे.
तुम्ही म्हणता आहात तसे "अरब लुटारू"वर केलेल्या मेहेरबानीव्यतिरिक्त पुस्तकात अरबांना/मुस्लिमांना झुकतं माप दिलं आहे का?
अर्थात गांधींनीही स्त्रियांना बलात्कार होत असला तर आत्महत्या करावी असा सल्ला दिला होता हे वाचल्याचं आठवतं (संदर्भ शोधतो.)
तेव्हा विषयाचा अभ्यास नसताना केवळ "जनांपरी अपार कळवळा" हे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही ह्यात काय संशय?
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
गुरुजी आणि भाविकपणा
हा प्रचंड होता. आणि भाविकपणा व्यवहाराच्या बाहेर असतो.
हे दोन साबणाचे फुगे एकत्र येऊ एक मोठा फुग्गा होत नाही. एक किंवा दोन्ही फुटतात. बघताना डोळ्यांत पाणी येते.
मजकुराआधारे शिकवणारी साईट
मा तं मधील technologies शिकताना मला, विडिओ पाहून (आणि कोड लिहून) शिकण्यापेक्षा, मजकूर वाचून (आणि कोड लिहून) शिकणं अधिक सोयीस्कर वाटतं.
त्या दृश्य, श्राव्य, वाच्य वगैरे शिकण्याच्या प्रकारांपैकी बहुधा मी वाच्य या प्रकारात मोडतो. नाहीतरी मला विडिओपेक्षा वाचनच जास्त आवडतं.
माझ्या कामाचा भाग म्हणून मला नेहमीच नवनवीन IT tools, frameworks, libraries इ. अल्पकाळात शिकाव्या लागतात. हे सर्व शिकण्यासाठी युडेमी ही एक चांगली साईट आहे. पण मला विडिओ पाहत बसण्याचा खूप कंटाळा येतो. (ते tool शिकण्याचा कंटाळा येत नाही, मला ते काम आवडतं.)
युडेमीसारखी किंवा अजून चांगली - मोफत किंवा शक्यतो विकत सेवा देणारी - पण कटाक्षाने मजकुराआधारे शिकवणारी एखादी चांगली साईट आहे का?
काही साइटी प्राथमिक बाबी चांगल्या शिकवतात आणि मग अर्ध्यात सोडून देतात. मॉंगोडीबीसारख्या काही tools चे अधिकृत documentation चांगले असते. पण अँग्यूलरसारख्याचे मात्र अतिशय गचाळ असते.
प्रतिसाद, मांडणी, भाषा इ विस्कळीत वाटली तर क्षमस्व, पण मला मदत हवी आहे.
-वामन देशमुख
बघलं-केलं-आलं.
नुस्तं बघून मला काहीही समजत नाही. माँगोडीबी आम्हांला शिकवला तेव्हा मला काहीही समजलं नव्हतं. म्हणून माँगोनं चालवलेला कोर्सही करून बघितला. तरीही काहीही समजलं नाही. मग शिकण्यासाठी मुद्दाम एक प्रकल्प सुरू केला. त्यात माँगोच वापरला. तेव्हा मला तो वापरता येत असे. गेल्या दोनेक वर्षांत हातच लावलेला नाही.
मला कंप्युटर सायन्स येत नाही; डेटाबेसेस, SQL, NoSQL, पायथन वापरता येतात, पण 'हे असंच का' ते समजत नाही. मला त्याची गरजही पडत नाही; किंवा त्या छापाचे प्रश्न सहकर्मचारी जाणकारांवर सोडून देते. लोकांचा पायथन कोड वाचूनवाचून माझा सुधारला. सांख्यिकी आणि मशीन लर्निंग दोन्ही समजण्यासाठी मला थियरी शिकावी लागते; ती वाचून बऱ्यापैकी समजते. वापरण्याची संधी मिळाली तर बरीच जास्त गंमत समजते. (शिवाय मला थोडं बॅश येतं, लिनक्सची वापरण्याइतपत माहिती आहे) एवढ्या भांडवलावर सध्या तरी माझं बरं सुरू आहे*.
* तेही संपूर्ण खरं नाही. मी जे काम करते त्यात व्यवसाय नक्की कसा चालतो, याचं आकलन असावं लागतं. त्यासाठी कॉलसेंटरवाल्या, मॅनेजमेंट, मार्केटिंगवाल्या लोकांशी बोलावं लागतं. तांत्रिक तपशिलात न घुसता, आम्ही काय काम करत आहोत, त्यातून त्यांना काय फायदा होईल, मला त्यांच्याकडून काय हवंय वगैरे गोष्टीही समजून द्याव्या-घ्याव्या लागतात. साधी मोजणीसुद्धा आमची बरोबर आणि त्यांची चूक हे लोकांना पटेल अशा पद्धतीनं सांगावं लागतं. पण त्यासाठी फक्त कोडिंग येऊन फायदा नाही. आणि हो, मोजणी हे काम वाटतं तेवढं अजिबात सोपं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नळस्टॉप
नळस्टॉपला नळस्टॉप का म्हणतात?
ती पुण्याची पायधुणी असणार.
मुंबईत आहे पायधुणी. तिथे लोक पाय धुऊन पुढे कुठल्या देवळात जात. तसे पुण्यातला पहिला सार्वजनिक नळ असेल.
करोना विषाणूचे आगमन झाल्यास
करोना विषाणूचे आगमन झाल्यास आता वर्ष झाले आहे.
एवढ्या काळात कशा प्रकारे विषाणूचा "प्रसार होत नाही"? याविषयी खात्रीपूर्वक माहिती आता उपलब्ध झाली आहे का?
कागद/प्लॅस्टिक किंवा इतर पॅकिंगची माध्यमे.
हाताळल्या जाणाऱ्या इतर वस्तू जसे नोटा, नाणी, सार्वजनिक जागची हॅण्डल्स, बटणे,
केशकर्तनालयातील उपकरणे कंगवे, कात्र्या
हवा
यामधून प्रसार होत नाही किंवा होतो याबद्दल खात्रीशीर माहिती आता उपलब्ध झाली आहे का?
मास्क हा सगळ्यात परिणामकारक उपाय आहे हे तर दिसतेच आहे.
मास्क हाताळणे, न धुता पुन्हा वापरणे यातून प्रसार होत नसावा असे मला वाटत आहे. याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मी मराठी - अलक
मी मराठी - अलक
----------------------
सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! "
सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही .
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "
--------------------------------------------------------------------------------------------------------------
आज कवी कुसुमाग्रज जयंती .
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !
...
'टीशर्ट'ला मराठीत काय म्हणणार? ट-सदरा?
बाकी, 'सनी' नावाचा मराठी मुलगा आपल्या आईला 'मम्मी' म्हणून हाक मारतो, याबद्दल आपल्याला आक्षेप दिसतो. पैकी, मराठी मुलाला 'सनी' म्हणून संबोधण्याचा भाग तूर्तास बाजूस ठेवू. (तसेही, आईबापांनी आपल्या मुलाला नक्की कसे संबोधावे, हा संबंधित आईबाप आणि मुलगा यांच्यातील खाजगी मामला आहे. इतरांकरिता तो दखलपात्र काय म्हणून असावा?) राहता राहिली गोष्ट 'मम्मी'ची. शिवाजीमहाराज आपल्या मातुःश्रींस 'माँसाहेब' म्हणून संबोधीत, ते काय ते म्लेंच्छ होते म्हणून?
('माँसाहेब'वरून आठवले. आईला 'आईसाहेब' म्हणायचे नाही - कारण म्हणे 'साहेब' हा यावनी प्रत्यय आहे - त्याऐवजी 'आईराव' म्हणायचे, अशी टूम पूर्वी एकदा म्हणे काही (सावरकरी/भाषाशुद्धीवादी) गोटांतून आली होती. त्यावरून कोणीतरी म्हणे 'यांच्या आईला मागून साहेब लागलेला चालत नाही; राव लागलेला चालतो!' अशी (काहीशी असभ्य) टीका केली होती, असे ऐकून आहे.)
----------
बाकी, 'मराठी भाषा अभिजात होणे' (अथवा 'मराठीचा अभिमान बाळगणे') म्हणजे केवळ भगव्या रंगात 'मी मराठी' असे लिहिलेला टीशर्ट घालणे, या बाबीकडे जर आपला रोख असेल, तर तो काही अंशी समजण्यासारखा आहे.
----------
(भाषा ही अभिजात (व्हॉटेव्हर दॅट मे मीन) एक तर असते, किंवा नसते. तिला अभिजात बनवणार कशी?)
भावना दुखावून घेऊन?
भावना दुखावून घेऊन आणि/किंवा गोबेल्सनीतीनं, आणि/किंवा सरकारवर दबाव आणून?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अभिजात मराठी
निरनिराळ्या देशांच्या लोकसंख्या
ब्रिटेन >>>>67,886,011
फ्रांस >>>>>65,273,511
जर्मनी >>>>83,783,942
आणि आपला
महाराष्ट्र >>>124,862,220
इंग्लिश, फेंच, जर्मन, ह्या भाषांच्या अभिजातपणा म्या पामरे काय लिहावे.
विसाव्या शतकाच्या सुरवातीला नवविज्ञान बहुतांशी जर्मनीत प्रगत झाले. जेव्हा आपण इकडे
आपसात लढाया खेळत होतो तेव्हा तिकडे न्यूटन डार्विन ह्यांच्या ग्रंथांच्या आवृत्त्या निघत होत्या. आपण जर इंग्लिश शब्दांचा उगम पाहिला तर आपल्याला कळून येईल की कुठल्या कुठल्या भाषांतून आयात केले आहेत. त्यांना इंग्लिश--- मायबोलीचा -- अभिमान नसावा असे एकंदरीत दिसते आहे. आपण मराठी लोक कुठल्या स्वप्नात हरवलो आहोत देव जाणे. सर्व सामान्य लोक जी बोलतात ती भाषा. ते मोबाईलला मोबाईल म्हणतात तर आपण मोबाईल शब्द दत्तक का घेऊ नये? ते नेट ला नेट म्हणतात. वापरा तोच शब्द. खरा मुद्दा हा आहे की बारा कोटींचा महाराष्ट्र असताना आपली मराठी समृध्द का होऊ शकत नाही?
लोकसंख्येचा आणि अभिजात पणाच काही संबंध आहे असे मला म्हणायचे नाही.
मराठी अभिजात होणार नाही हे सूचित करणे बरोबर नाही.
जेव्हा लॅॅटिन ,ग्रीक .संस्कृ्त आणि तमिळ प्रगत भाषा होत्या तेव्हा इंग्रजी घास कापत होती.
श्री मोदी हलकट आहेत की नुसतेच
श्री मोदी हलकट आहेत की नुसतेच मूर्ख व अडाणी आहेत?
खाजगीत लस विकायला हॉस्पिटल्सवर २५० रुपयांची कमाल मर्यादा घातली आहे. कशाच्या आधारे?
हे स्वत:ला उजवे म्हणवणारे लोक कशाला प्रायव्हेट मार्केटमध्ये काड्या करताहेत? आपली विचारधारा काय हे समजण्याइतकी तरी शाळा शिकायला हवी माणसाने. भाषणात मात्र “धंदा करणे सरकारचे काम नाही” वगैरे तारे तोडायचे. प्राईस डिस्कव्हरी हे सरकारचे काम आहे वाटतं?!
इतकंच आहे तर सरकारने घ्यावे सगळे डोस विकत आणि द्यावेत २५० काय अन् फुकट काय.
कॉंग्रेसला नावे ठेवत कॉंग्रेसी समाजवादी चाळे करतोय हा माणूस. नुसता काळाबाजार करायचे डोहाळे. शिवाय फुकट लस द्यायची आश्वासनेही देऊन ठेवलीत. आज गब्बरसिंग हा आयडी जिथे कुठे असेल तिथे त्याच्या आत्म्याला भयंकर वेदना झाल्या असतील.
https://www.hindustantimes.com/india-news/claims-are-misleading-govt-on-message-saying-vaccine-to-be-priced-at-rs-500-101614424384176.html
https://www.nationalheraldindia.com/national/niti-aayog-propose-covid-19-vaccine-price-between-rs-300-500
श्री मोदींची दूरदृष्टी
दोन बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्यांनी संप केला. खाजगीकरणाची ही तर नुसती सुरुवात आहे. धंदा करणे सरकारची जबाबदारी नाही हे श्री मोदींनी केव्हाच समजावून सांगितले आहे.
खरंतर मोदींना भरघोस पाठिंबा देणार्या व “२०० रुपये पेट्रोल झाले तरी चालेल; पण आमचे मत मोदींनाच“ असे म्हणणार्या वर्गाने खाजगीकरणास पाठिंबा द्यायला हवा.
सरकारी आस्थापनांमध्ये आरक्षणामुळे, ज्यांचे पूर्वज गटार साफ करणारे मजूर वगैरे होते अशा ऐतखाऊ लोकांचा बुजबुजाट वाढला होता.
खाजगीकरणामुळे आता आरक्षण जाऊन परंपरागत हार्डवर्किंग लोकांना “आपल्यातला आहे ना?” हे पाहून हार्डवर्किंग लोकांनाच कामावर घेणे शक्य होणार आहे. हार्डवर्किंग पूर्वज असलेल्यातली काही येडपट मंडळी मात्र सरकारी नोकरीत आरक्षण मिळणार म्हणून खुशीत आहेत.
श्री मोदींच्या दूरदृष्टीस तोड नाही.
>>>परंपरागत हार्डवर्किंग
>>>परंपरागत हार्डवर्किंग लोकांना “आपल्यातला आहे ना?” हे पाहून हार्डवर्किंग लोकांनाच कामावर घेणे शक्य होणार आहे.
इथे हार्डवर्किंग ऐवजी जन्मत:च हुश्शार असा शब्दप्रयोग करावा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
;-)
पेट्रोल महाग झालंय. पण तरीही लोकांना इथे आणून ओतावसं वाटतंय याचा अर्थ महाग होण्यानं फारसा फरक पडला नसावा,
कलावती देवी
काही वर्षांपूर्वी कलावती देवी या नावाचे प्रस्थ होते. आध्यात्मिक क्षेत्रातील इच्छुकांच्या तोंडी हे नाव असे. कलावतीदेवींचा इतिहास काय आहे, याबाबत माहिती द्यावी.
गूगल गुरू, गूगल कल्पतरू
तुम्हाला या कलावती देवी अपेक्षित नसाव्यात!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कलावती आई..
कलावती आई..
बेळगाव भागात बरेच प्रस्थ आहे. आश्रम, मंदिरसुद्धा आहे बहुधा.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
.
बेळगाव कर्नाटकासच लखलाभ होवो.