बखर....कोरोनाची (भाग ९)
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम'मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.
ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.
म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात
बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---
या बातमीविषयी काही शंका आहेत.
या बातमीविषयी काही शंका आहेत. दोन - सव्वादोन महिन्यात वाटलेली डेथ सर्टिफिकेट्स म्हणजे ज्या डेथ सर्टिफिकेटांवर १ मार्च ते १० मे अशी तारीख आहे की वाटलेल्या काही सर्टिफिकेट्स पैकी काही आधी झालेल्या मृत्यूंची असू शकतील.
तरी ४० ते ५० हजार मृत्यूंबाबत अंदाज बरोबर म्हणायला हरकत नाही.
करोंनाने किती लोक मेले हे
करोंनाने किती लोक मेले हे गेल्या वर्षीच्या आकड्यांशी तुलना करण्यापेक्षा 2019 च्या आकड्यांशी तुलना करून पाहिले पाहिजे. गेल्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये कडक लोकडाऊन होता. त्यामुळे एकंदर मृत्यू संख्या तेव्हा कमी असेल.
----
अशी तुलना (2018/19 बरोबर ) मुंबईसाठी कोणीतरी केली होती. 2019 तुलनेत 2020 मध्ये मुंबईत तब्बल 20000 लोक अधिक गेले.
सावळा गोंधळ तर आहेच
१) rt pcr test pisitve आल्यानंतर झालेला रुग्णाचा मृत्यू.
२) rt pcr टेस्ट रिझल्ट निगेटिव्ह पण corona बाधित अशा लोकांचा झालेला मृत्यू.
२) कसल्याच टेस्ट झालेल्या नसलेल्या आणि घरीच corona नी मरण पावलेली लोक.
ह्यांची सविस्तर माहिती सरकार कडे असेल ह्याची शक्यता कमी च आहे.
आणि पळवाट काढून सरकार मृत्यू झालेल्या लोकांची संख्या लपवत आहे हेच खरे असण्याची शक्यता पण जास्त आहे.
भारतात सरकार जे आकडे दाखवत आहे त्या पेक्षा किती तरी जास्त लोक मेलेली आहेत.नंतर हळू हळू त्या विषयी माहिती बाहेर येईलच .
शाहीद जमील यांचा राजीनामा
शाहीद जमील यांनी दिला कोव्हिड पॅनलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
डॉ. जमील यांनी नुकतंच न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रात लेख लिहून भारतातील कोव्हिड-19 च्या हाताळणीवर टीका केली होती. कमी टेस्टिंग, लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता अशा मुद्द्यांना या लेखात स्पर्श केला होता.
देशातील कोरोनासंबंधी डेटा जमवण्याबाबत डॉ. जमील म्हणाले होते, "30 एप्रिल रोजी 800 भारतीय शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना विनंती केली होती की, डेटा मिळायला हवा. जेणेकरून संशोधन, अंदाज आणि विषाणू रोखणं यांसाठी मदत होईल."
अशी लसीकरण ची खिल्ली उडवली तर दोष कोणाला देणार.
भारतीय लसीकरण.
जानेवारी. - दोन डोस मध्ये 28 दिवसाचा फरक असावा.
मार्च.- दोन डोस मध्ये 48 दिवसाचा फरक हवा.
May - दोन डोस मध्ये 90 दिवसाचा फरक असावा.
जून - एक डोस पुरेसा आहे.
जुलै - घरातील एकाने लस घेतली तरी पुरेसे आहे.
ऑगस्ट - सगळ्या भावकीत एकानेच डोस घेतला तरी बस.
सप्टेंबर - विमानातून शिंपडणार सर्व देशात.
ऑक्टोबर. - अजुन तुम्ही जिवंत आहात तुम्हाला लसी ची गरज नाही जा घरी.
सारखेच लसी बद्द्ल नियम बदलून संबंधित लोक स्वतःचे हस करून घेत आहेत.
तीच बाब औषध आणि उपचार पद्धती बद्द्ल पण आहे.
Plasma उपचार योग्य आहे असे सांगणारे.plasma ni उपचार करणे चुकीचे असे सांगून complate U turn घेतला आहे.
तीच बाब remdisiver बद्द्ल हे औषध रामबाण आहे म्हणून खसा तोडून सांगते होते तेच आता हे औषध corona उपचार मध्ये काही कामाचे नाही असे सांगत आहे.
किती लशी कधी उपलब्ध होऊ शकतील
किती लशी कधी उपलब्ध होऊ शकतील, खाजगी-सरकारी, भारतीय-परदेशी वगैरेंचं विश्लेषण -
What Is Happening to India’s COVID-19 Vaccine Program?
लसीकरण
लसीकरण .
पहिला डोस
दुसरा डोस
हे देण्यासाठी वेळेचे बंधन आहे.अजुन 10 टक्के लोकांना पण पहिला डोस दिला गेलेला नाही.
अजुन सहा महिन्यांनी सुद्धा देशात पहिला डोस सर्व जनतेला देण्याची भारताची कुवत नाही.
जे आहे ते स्पष्ट आहे आणि ते स्पष्ट सरकार नी जाहीर करावे.
जेव्हा जगात लसीकरण पूर्ण होईल(,जग म्हणजे अमेरिका ,ब्रिटन,आणि मोजकीच प्रगत राष्ट्र ), तेव्हा ती प्रगत राष्ट्र त्यांचा लसी चा कचरा भारतात विकतील ( तेव्हा लसी ला कचरा च म्हणता येईल) आणि भारतीय सत्ता धारी कमिशन घेवून स्वतःचे ते खरेदी करतील तेव्हा कुठे भारतीय जनतेला पहिला डोस उपलब्ध होईल..
भारतीय लोकांनी फक्त स्वप्नात जगावे रिॲलिटी खूप कडू आहे.
वय वर्ष एक
वय वर्ष एक असलेल्या विषाणू विरूद्ध लस निर्माण करण्याचा मूर्ख पना जगाच्या इतिहासात कधीच कोणी केला नाही.
वय वर्ष एक असलेल्या विषाणू मुळे झालेल्या आजारावर बिन्धास्त अनोळखी औषधांचा वापर जगाच्या इतिहासात कधीच झाला नाही.
ह्या वेडे पना आणि राजकीय आर्थिक,लाभ मिळवण्याच्या नादात corona व्हायरस नी अतिशय आक्रमक अवतार घेतला आणि तो जीव घेणं झाला.
अती शहाणपणा केला नसता तर त्याचे जीवनचक्र पूर्ण होबून तो आता माणसाचा मित्र. झाला असता.
जपान सारख्या अतिशय प्रगत देशांनी पण युरोपियन मूर्ख देशांच्या नादाला न लागता अंध धुंद लसी करण केले नाही म्हणून. त्यांच्या देशात अती भयंकर corona virus ची रूप पण नाहीत.
अती शाहण्या लोकांच्या मूर्ख पना मुळेच corona virus नी घातक रूप घेतले .
आणि. काहीच. अभ्यास नसताना नको तो औषध वापरल्या मुळे ब्लॅक fungas पासून विविध विकृती मानवी शरीरात निर्माण झाल्या.पण पैसे हेच जीवन असणारे हे कधीच. कबूल करणार नाहीत
Black fungas
काळ्या बुरशी च्या केसेस भारतात च का वाढल्या
तज्ञ
शरीराची प्रतिकार शक्ती कमी झाली त्या मुळे.
तथ्य.
माणसाला जे काही आजार होतात ते तेव्हाच होतात जेव्हा रोग प्रतिकार शक्ती कमी होते.
काळी बुरशी भारताच का?
आणि आताच का?
सरळ आहे चुकीचे औषध उपचार corona वर.
औषध कंपन्या product dr ना हाताशी धरून विकतात.
ह्या क्षेत्रातील धंद्यात सर्व चांगले वाईट मार्ग निवडले जातात.
विज्ञान वादी म्हणजे डोळे (डोके )झाकून सर्व संबंधित गोष्टी वर विश्वास ठेवणे नक्कीच नाही.
गरीब देशांना ३.५ बिलियन लशींचे डोस
लसनिर्मिती करणाऱ्या फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांनी ना-नफा तत्त्वावर गरीब देशांना ३.५ बिलियन लशींचे डोस पुरवण्याचे आश्वासन दिले आहे -
Covid-19 vaccine firms pledge 3.5 billion doses for poorer nations
ब्रेकथ्रू इन्फेक्शन्स
It has been five months since the first Covid-19 vaccine was administered in the U.S., and so far the data on vaccinations suggests that they are highly effective. Breakthrough infections, which happen after a person is fully vaccinated, are few and far between.
By the end of April, when some 101 million Americans had been vaccinated, the C.D.C. had received 10,262 reports of breakthrough infections. A study found that of those cases, about 995 people were hospitalized and 160 had died, although not always because of Covid-19. The median age of those who died was 82.
संदर्भ : न्यूयॉर्क टाइम्स
सरळ आरोप चीन वर करायचा झाला तर
हे प्रश्न उभे राहतील असे मला वाटत
१) लॅब मध्ये विषाणू चा किती साठा असतो.
२) लॅब मध्ये जो विषाणू अभ्यास साठी ठेवलेला असतो त्या पासून माणसाला किंवा बाकी जीव सृष्टीला काय धोका निर्माण होईल ह्याचा अभ्यास झालेला असतो.
मग योग्य ती काळजी नक्कीच घेतली गेलेली असते.
३) चुकून तो बाहेरच्या वातावरणात गेला तर त्या वर काय उपाय करायचे ह्याचा मास्टर प्लॅन नक्कीच तयार असणार.
४) फक्त दहा मीटर अंतरावर जास्तीत जास्त तो जावू शकतो असे गृहीत धरले तरी त्या लॅब मध्ये काम करणारा कर्मचारी च. बाधित होण्याची शक्यता आहे.
५) त्या लॅब मध्ये काम करणाऱ्या किती लोकांना corona झाला ह्याची माहिती मागितली जाईल तशी कोणती माहिती कोणाकडे नसण्याचीच शक्यता जास्त आहे म्हणून बाकी देश चीन विरूद्ध सरळ आरोप करत नाहीत हे कारण असू शकतं.
६) समजा पन्नास कर्मचारी सुरवातीला बाधित झाले असे समजले तरी फक्त तोच सोर्स गृहीत धरलं तर जगातील करोडो लोक कमी कालावधीत बाधित कशी झाली ह्या प्रश्नांचे उत्तर कोणी देवू शकेल का?
Covid विषाणू च एकच मुळ सोर्स नसावा अनेक सोर्स असावेत हीच शक्यता जास्त आहे.
फक्त वुहान लॅब हा एकमेव मुळ सोर्स असू शकतं नाही.
origin of pandemic
जिद्न्यासूूंंनी कृपा करूून हे संदर्भ तपासून पहावे.
N. Chandra Wickramasinghe and Edward J. Steele हे प्रसिध्द शास्त्रज्ञ आहेत.
१https://cosmictusk.com/wickramasinghe-predicted-coronavirus-pandemic-in…
२ .https://www.indiatoday.in/science/story/where-does-coronavirus-come-fro…
३.https://www.discovermagazine.com/health/the-strange-theory-of-coronavir…
व्यक्ती ते व्यक्ती
हाच एक मेव संक्रमणाचा मार्ग असेल तर संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या कमी वेळात अती प्रचंड होणे तसे अवघड आहे .आणि अजुन अवघड शक्यता ही आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात व्हायरस पोचणे.
मुळात व्हायरस नी संक्रमण होण्यासाठी परिस्थिती योग्य पण असायला हवी . वारा मंद हवा ,व्यक्ती च्या नाकात व्हायरस ला प्रवेश मिळायला हवा,व्हायरस ची संख्या जास्त हवी ह्या सर्व शक्यता जुळून यायला हव्यात.
हे म्हणजे छर्या च्या बंदुकी नी २० मीटर अंतर वरून नेम धरून मुंगी मारण्या सारखे अवघड आहे.
भारताचे खरे आकडे
भारतात करोनाचे खरे आकडे किती असावेत याविषयी न्यू यॉर्क टाइम्सने काही अंदाज वर्तवले आहेत -
Just How Big Could India’s True Covid Toll Be?
न्ययार्क टाईम्स भारता विषयी
न्ययार्क टाईम्स भारता विषयी फक्त खोट्या बातम्या दाखविते. भारतात rtpcr ते लसीकरण पूर्णतया केंद्रीकृत आहे. एक हि रोगी सुटू शकत नाही. शिवाय देशातील सर्वांजवळ आधारकार्ड हि आहे आणि खाते हि. ४० कोटी लोक सरकार कडून ५०० रु दर महिना अनुदान घेतात. जर घरात कोणी करोना ने मृत झाले तर सरकारी अनुदान मिळेल हि आशा प्रबळ आहे. करोना मृतांचे जे आकडे आहे त्यात निश्चित २५ टक्के इतर रोगांनी दगावणार्यांची शक्यता जास्त.
भारतीय व्हेरियंट
प्रथम भारतात आढळलेला विषाणूचा प्रकार आता अनेक देशांत दिसतो आहे. त्यामुळे काही देश खबरदारीचे उपाय अंमलात आणत आहेत -
Millions in Australia plunged into new lockdown as Indian variant spreads
France imposes quarantine on UK travellers
कोव्हॅक्सिन
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीबाबत चुकत गेलेले आडाखे आणि निर्णय यांचा उत्तम लेखाजोखा या लेखात घेतला आहे -
चुकीच्या निर्णयांमुळे हकनाक गेलेले प्राण
महासाथीच्या सुरुवातीच्या काळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे अनेक लोकांचे प्राण हकनाक गेले (यूके) -
Public health experts warned of Covid disaster. Cummings confirms we were right - Devi Sridhar
Vaccine महागुरू
How vaccine planning failed or there wasn't a plan in place really.
https://time.com/6052370/modi-didnt-buy-enough-covid-19-vaccine/?s=08
एक लाख मृत
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे लॉकडाउनचे निर्बंध आजपासून कमी होऊ लागले आहेत. त्याच वेळी राज्यातील मृतांचा अधिकृत आकडा काल एक लाख झाला. (स्रोत : कोव्हिड १९ इंडिया)
लसीकरण तफावत
लसीकरणात सुरुवातीपासून परवा पर्यंत महाराष्ट्र राज्य आघाडीवर होते.
काल उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकून पहिला क्रमांक घेतला (एकूण डोसेस 3.6 कोटी,
महाराष्ट्र 3.57 कोटी)
या दोन दिवसात (7 आणि 8 तारीख )उत्तर प्रदेश मध्ये अनुक्रमे 7.47 आणि 8 लाख डोस दिले गेले.
महाराष्ट्रात 6.41 आणि 3.28 लाख.
गुजराथ मध्ये या दोन दिवसात फक्त 8158 आणि 7190 डोस दिले गेले.
ही तफावत का आहे हे लक्षात येत नाही.
किमान सिरमचे उत्पादन तरी एप्रिल पेक्षा खूप वाढलेले आहे , म्हणजे शॉर्टेज नसणार.
(महाराष्ट्रात किमान सोमवार पर्यंत तरी तुटवडा असणारे नक्की)
व्हायरस लाखोपटीने वाढविणे हे काम भारतीयांनी आपले आपणच केले आहे!
व्हायरस चीन मधून आला हे निश्चित. तो उत्क्रांतीतून बनला का जैविक शस्त्र म्हणून बनविला हे कधीच बाहेर न येऊ देण्यास चीन बांधील आहे. पण व्हायरस भारतात पोचल्यावर तो लाखोपटीने वाढविणे हे काम भारतीयांनी आपले आपणच केले आहे, करत आहेत हे नक्की. आणि आपली शरीरे व्हायरसला इन्क्युबेटर म्हणून उपलब्ध करून देऊन भारतीय लोक नवनवे व्हेरियंटस निर्माण करण्यासही प्रचंड हातभार लावीत आहेत.
नक्की किती मृत?
Why we need to count the Covid dead - Abhishek Anand, Justin Sandefur, Arvind Subramanian
नव्या संशोधनानुसार असे दिसते की कोव्हिडच्या काळात भारतात कित्येक पटीने अधिक मृत्यू झाले. पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन व इतर दोघांनी केलेल्या अभ्यासानुसार त्यांनी हा दावा केला आहे. जन्म-मृत्यू नोंदी पाहता पहिल्या लाटेतील मृतांची संख्या खूप अधिक होती, पण दुसऱ्या लाटेपेक्षा पहिली अधिक काळ चालल्याने डोळ्यांना दिसणारे चितांचे ढीग वगैरे गोष्टी तेव्हा दिसल्या नव्हत्या. मात्र, अद्याप दुसऱ्या लाटेदरम्यानच्या जन्म-मृत्यू नोंदी पूर्ण झालेल्या नाहीत असेही ते सांगतात.
त्यांचे संशोधन इथे वाचता येईल.
Covishield
https://www.ox.ac.uk/news/2021-07-16-t-cell-training-grounds-behind-rob…
Covishield मुळे मिळणारी प्रतिकारशक्ती दीर्घकालीन असू शकते. तिच्यातल्या adenovirus vector मुळे हा परिणाम होत असावा अंदाज आहे.
ऑस्टिन - प्रगत देशातलं आयटीसाठी प्रसिद्ध शहर
ऑस्टिनात आज (९ ऑगस्ट २०२१) सकाळी बातमी होती - मेट्रो भागाची लोकसंख्या १३ लाख आहे, आणि १४ आयसीयू खाटा उपलब्ध आहेत. संध्याकाळची बातमी, १४ नाही, ६ खाटा आहेत.
गेल्या आठवड्यात स्थानिक बातमी होती की एका सत्तरीतल्या फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या मनुष्यानं हॉस्पिटलात जागा नाही म्हणून हॉस्पिसमध्ये जाऊन मरण्याचा निर्णय घेतला. म्हणजे उपचार घेणार नाही. फक्त वेदना कमी व्हाव्यात म्हणून वेदनाशामकं, मॉर्फिन घेणार.
राज्यात रिपब्लिकन गर्व्हनरानं सगळ्या सरकारी संस्थांवर मास्क-सक्ती करण्यावर बंदी आणली आहे. शाळा दोनेक आठवड्यांत उघडतील, पण शाळा मास्कसक्ती करू शकत नाहीत. संपूर्ण देशातच लससक्ती नाहीच. देशात जेमतेम निम्म्या लोकांनी लशी घेतल्या आहेत. आणि लशी उपलब्ध आहेत. गेल्या काही आठवड्यांत ऑस्टिनात, आमच्या आजूबाजूला मास्क लावणाऱ्या लोकांचं प्रमाण पुन्हा वाढलं आहे. दोनेक महिन्यांपूर्वी मास्कसक्ती उठली तेव्हा रुग्णांचं प्रमाण बरंच कमी होतं, आणि हॉस्पिटलं भरलेली नव्हती.
गेले काही आठवडे या नव्या लाटेला लस-न-घेतलेल्या लोकांची लाट म्हणत आहेत. गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलात असलेले, आणि मरणारे कोव्हिडवाले लोक बहुतेकसे सगळे लोक लशी न घेतलेले आहेत. या छापाची आवाहनं स्थानिक बागकामाच्या फेसबुक ग्रूपांतही दिसत आहेत.
कालच्या रविवारी डॉ. फाऊचींची मुलाखत बघितली. ते म्हणाले, आतापर्यंत लशी सगळ्या व्हेरियंटना पुरून उरत आहेत. पण डेल्टा थोडा निराळा आहे. लशी घेतलेले लोक आजारी पडत नाहीयेत, किंवा गंभीर आजारी पडत नाहीयेत. पण अशा लोकांच्या नाकांत इतर व्हेरियंटपेक्षा डेल्टा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे 'ब्रेकथ्रू' केसेस सापडत आहेत - म्हणजे लस घेतलेल्या लोकांकडून संसर्ग झाला. आधीपर्यंत लक्षणं दिसल्याशिवाय चाचण्या करत नव्हते. आता ते बंधन ठेवलेलं नाही.
फाऊचींनी पुढे भीती व्यक्त केली की, लशी न घेतलेल्या लोकांमुळे विषाणूला पुनरुत्पादनाची संधी मिळते; त्यामुळे नवा व्हेरियंट तयार होण्याची शक्यता वाढते. आतापर्यंतच्या सगळ्या व्हेरियंटविरोधात मान्यतापूर्ण लशी उपयुक्त ठरल्या आहेत, पण पुढच्या व्हेरियंटविरोधात त्या प्रभावी ठरल्या नाही तर? तर आतापर्यंतचं लशीकरण पुन्हा नव्यानं करावं लागेल.
कृपया उपलब्ध असतील तर लशी घ्या. हा फाऊचींच्या मुलाखतीचा दुवा.
थोर थोर ग्रेगकाका ॲबट!!
आयसीयू बेड - काल संध्याकाळी ६, आत्ताची बातमी २.
बहुतेक शाळा काल सुरू झाल्यात. डॅलस आणि आता ऑस्टिनातल्या शाळांनी गव्हर्नराचा फतवा मोडून शाळांमध्ये मास्क-सक्ती केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांना काय शिक्षा होणार हे माहीत नाही; आणि मास्कसक्ती करणाऱ्यांना हजार डॉलरांचा दंड आहे. तो दर एकदा भरायचा आणि मास्कसक्ती करता येणार का कसं, हेही माहीत नाही.
काल संध्याकाळी गव्हर्नरानं काही काम केलंन मात्र! त्यानं महत्त्वाची नसणारी ऑपरेशनं रद्द करण्याची विनंती हॉस्पिटलांना केली आहे. थोर थोर ग्रेगकाका ॲबट!!
स्थानिक वाणी
अमेरिकेतल्या बाकीच्या गोष्टींसारखीच, वाण्याच्या दुकानांच्याही चेन असतात. टेक्सासात एच.ई.बी - 'हेब' नामक चेन सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध आहे. एकंदरीतच, सरकारला लाज वाटेल इतपत बरे वागतात ते. म्हणजे फेब्रुवारीत आठवडाभर बर्फाचा आणि राजकारण्यांचा उच्छाद सुरू होता. तेव्हा दुकानांतले दिवे गेले तर लोकांची बिलं कशी करता येणार, याचा विचार न करता वस्तू फुकटात नेऊ दिल्या, वगैरे.
तर या दुकानांमध्येही लस मिळत होती. सुरुवातीला अपॉइंटमेंट घेण्याची गरज होती. मग दुकानात जा, आणि लस घ्या, इतपत पुरवठा जास्त आणि मागणी कमी झाली.
गेले काही दिवस, आठवडाभर वगैरे परिस्थिती भीषण असल्याच्या बातम्या येत आहेतच. आता 'हेब'नं लशींसाठी अपॉइंटमेंट सक्तीची केली आहे. नाही तर लोकांना फार वेळ ताटकळत राहावं लागतं, पुरेसे लोक तिथे लशी देण्यासाठी उपलब्ध नसतात, वगैरे प्रकार सुरू झाले.
माझ्या थेट ओळखीतल्या सगळ्या लोकांचं लशीकरण पूर्ण झालेलं आहे. लोक बाहेर, रस्त्यावर भेटले की "किती उन्हाळा आहे सध्या", याजागी "का हे लोक लशी घेत नाहीयेत", अशी चिंता आधी व्यक्त होते!
अमेरिकेत कोव्हिड पुन्हा कसा पसरला
महिन्याभरात अमेरिकेत कोव्हिड पुन्हा कसा पसरला याचे नकाशांद्वारे विश्लेषण -
One month later: These maps show how quickly Covid engulfed the US again
फायझर लसीला अमेरिकेत पूर्ण मान्यता
फायझर लसीला अमेरिकेत पूर्ण मान्यता ( उरलेल्या सर्व लसी या इमर्जन्सी मान्यता असलेल्या आहेत )
https://www.nytimes.com/live/2021/08/23/world/covid-delta-variant-vacci…
टाका हजार रुपये आणि घ्या बुस्टर डोस
Anecdotes tell us what the data can't: Vaccinated people appear to be getting the coronavirus at a surprisingly high rate. But exactly how often isn't clear, nor is it certain how likely they are to spread the virus to others.
.....but it bolsters the case that some people will need booster shots in coming months.
आम्हाला हे आधीच माहित होते. वाटच बघत होतो.
हा प्रश्न नेहमी पडतो
Ai,super computer आज मदत करण्यासाठी असून सुद्धा विविध रोगांवर नियंत्रण मिळवले जात नाही.
आज माणूस ,
मेलेला माणूस पण जीवंत करेल इतकी तांत्रिक प्रगती आहे.
पण corona जगभर hungama निर्माण करत आहे .
ह्याचे एकमेव कारण बलाढ्य फार्मा कंपनीचे जास्त पैसे कमविण्याची हाव.हेच आहे.
अधाशी फार्मा कंपन्या
A SPECTER haunts progressive America — the possibility that a company might make too much money solving the world’s coronavirus crisis. At the last Democratic debate, Bernie Sanders called the leaders of the pharmaceutical industry “a bunch of crooks,” who are telling themselves in the midst of the epidemic, “Wow, what an opportunity to make a fortune.”
https://www.healthleadersmedia.com/innovation/opinion-say-thanks-greedy…
हा प्रश्न नेहमी पडतो
AI,robot,super computer,vividh साधन,प्रचंड पैसा हाती असून सुद्धा corona व्हायरस चा बंदोबस्त होत नाही.मानव भयभीत झाला आहे.
ह्याचे कारण दुसरे तिसरे काही नसून फक्त बौद्धिक संपत्ती कायदा चाचं ह्याला जबाबदार आहे
प्रचंड पैसे कमावण्यासाठी एकाधिकार शाही असावी ह्या दृष्ट हेतू नीच उपचार,प्रतिबंध, ह्या वर उपाय तयार केले जात नाहीत.
पेटंट कायदा corona वरील उपचारासाठी लागू नसेल असे United nation नी जाहीर करावे.
आयसिएमार आणि राजकीय दबाव
आयसिएमार आणि राजकीय दबाव -
As India’s Lethal Covid Wave Neared, Politics Overrode Science
“Science is being used as a political weapon to forward the government narrative rather than help people,”
प्लास्मा थेरोफी
उपचार करण्यासाठी वापरल्या मुळे अनेक corona बाधित रुग्णांची अवस्था गंभीर झाली .
आणि त्या मुळे लोक मृत्यू मुखी पडले असे मीडिया मध्ये बातमी होती.
कॅनडा मध्ये झालेल्या अभ्यासात असे निष्पन्न झाले आहे.
मग प्रश्न हा उभा राहतो corona बाधित रुग्णांवर plasma थेरपी नी उपचार करण्याची सूचना कोणाची?
काही तरी लाज ठेवा
निरर्थक आणि विनोदी श्रेणी देण्या अगोदर..कॅनडा मध्ये झालेल्या अभ्यासात plasma theropy मुळे covid बाधित रुग्णांची स्थिती गंभीर झाली आणि ते मृत्यू मुखी पडले हे निष्पन्न झाले आहे.
विज्ञाध वादी स्वतः ल स्वतःच लेबल लावयचे आणि
बुरसटलेले विचार सोडायचे नाहीत.
हा भारतीय लोकांचा अवगुण भारतातील स्व घोषित सुधारणावादी लोकात ढासून भरलेला आहे.
अबापट
अगदी खरे सांगतो.
मराठी मध्ये काही संकेत स्थळ आहेत .त्या मध्ये आपली ऐसी अक्षरे पण उत्तम काम करत आहे लोकांना विचार व्यक्त करण्यास स्थळ निर्माण करून देत आहे.
बाकी पण आहेत.
Mp,मायबोली, आणि इतर.
फक्त मनापासून इतकेच वाटते काही अजेंडा घेवून हे समाज कार्य करू नका.
विचार पटतील नाही पटणार अनेक विचार जगात असतात..
एजंडा म्हणजे ह्याच विचारच मत असेल तर मार्मिक शेरा आणि वेगळे मत असेल तर निरर्थक ,विनोदी शेरा असे करू नका.
विज्ञान कोणत्याच मताला नाकारत नाही हीच त्याची व्याख्या मी तरी समजतो.
सर्व स्तरातील बुद्धिमान लोकांनी
कथित डॉक्टर्स,कथित संशोधक,कोणाची तरी सेवा करत असणार प्रसार माध्यम.
ह्यांनी तिसरी लाट येणार अशी हवा केली होती अजुन तरी तिसरी लाट आली नाही.
ज्यांनी कथित लोकांना अडगळीत टाकले तिथे तर दुसरी पण लाट आली नाही.
बिहार,यूपी etc.
गंभीर पणे कथित लोकांना घेणारे महाराष्ट्र,केरळ मात्र बेजार..
आता काही दिवसातच समस्त प्रसार माध्यम,संशोधक,डॉक्टर्स लसी करना मुळे तिसरी लाट आली नाही असे ज्ञान वाटायला सुरुवात करतील.
You tube ni लसीकरण विरूद्ध असलेले सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे हे वाचले.
ही पूर्व तयारी आहे.
न्यूयॉर्क टाइम्स म्हणते की .
न्यूयॉर्क टाइम्स म्हणते की ...
Vaccinations in Asia surpass those in the U.S.
In the early months of the pandemic, the Asia-Pacific region was praised for its virus response. Countries had kept the coronavirus under control by masking, testing and keeping borders shut.
The Delta variant changed that. As the U.S. and E.U. ramped up their vaccination campaigns, Asia struggled with infections and a lack of vaccines.
Now, many countries there are on track to surpass the U.S. in fully vaccinating their populations.
Some have already done so. South Korea, Japan and Malaysia have administered more doses per 100 people than the U.S., a pace that seemed unthinkable in the spring.
Vaccines have helped keep most South Koreans out of the hospital. Among fully vaccinated people who contracted Covid there, about 0.6 percent had severe illness and about 0.1 percent died, according to the country’s Disease Control and Prevention Agency.
In Japan, serious cases have fallen by half over the last month, to a little over 1,000 a day. Hospitalizations plummeted from a high of just over 230,000 in late August to around 31,000 on Tuesday.
The turnabout, my colleagues Sui-Lee Wee, Damien Cave and Ben Dooley write, is as much a testament to the region’s success in securing supplies as it is to some Americans’ vaccine hesitancy and political opposition.
Vaccines are not polarizing in the Asia-Pacific region. Movements against them have been relatively small, without the sympathetic news media, advocacy groups and politicians that can exacerbate misinformation.
Overall, most Asians have put community needs over their individual freedoms. They’ve also trusted their governments, although many of those governments have also used incentives, such as lifting restrictions for the fully vaccinated.
In poorer nations, like Indonesia and the Philippines, many people felt they had no choice but to be vaccinated. Fear of unrest in countries that lack social safety nets, in turn, has motivated leaders to offer vaccines quickly.
But it’s not all good news. In Southeast Asia, the campaigns have been slow and uneven, dragging down economic prospects. And risks remain. Most of the countries do not manufacture their own vaccines, one reason for their slow starts, and they could face supply problems if their governments approve boosters.
ऑक्सफर्ड मधून आपले शैलेन
ऑक्सफर्ड मधून आपले शैलेन भांडारे यांच्याकडून हा रिपोर्ट
https://www.bbc.co.uk/news/health-58876089
महासाथ आटोक्यात आणताना ब्रिटिश सरकारचे सुरुवातीच्या काळातील अपयश आणि नंतरच्या काळातील सुधारणा
विषाणूचा पुढचा प्रवास
विषाणूचा पुढचा प्रवास कसा असेल याविषयी तज्ज्ञांनी बांधलेले काही अंदाज -
What the Future May Hold for the Coronavirus and Us
आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार पुण्यात म्हणाल्या
काल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार पुण्यात म्हणाल्या की 'पूर्वी आपल्याला लसी बाहेरून आणायला लागायच्या, अनेक वर्षे वाट बघायला लागायची.
आत्मनिर्भर भारत मुळे आपण नऊ महिन्यात 100 कोटी लसीचे डोस देऊ शकलो."
https://www.esakal.com/maharashtra/india-self-sufficient-in-vaccination…
वस्तुस्थिती
कुठल्या लसींच्या बाबतीत " बाहेरून आणायला लागायच्या आणि अनेक वर्षे वाट बघायला लागायची" नामदार मॅडम म्हणत आहेत ते कळेना.
गेली अनेक दशके भारत हा नेट लस एक्सपोर्टर देश आहे.
आपल्याकडे मोफत सार्वत्रिक लसीकरण (देशी लसी वापरून )किमान तीन दशके सुरू आहे.
लोके भाबडी आहेत
आणि आयटीसेल कर्तृत्वामुळे विचारबंदही आहेत.
देशातील दिल्या गेलेल्या डोसेस पैकी किमान ८६ टक्के सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार झाले आहेत.
सिरम इन्स्टिट्यूट ही खाजगी कंपनी आहे. त्यांनी आपले उत्पादन तिपटीहून वाढविल्यामुळे( एप्रिलपर्यंत सहा कोटी/महिन्याला ते आज २० कोटी महिन्याला ) हे वेगवान लसीकरण शक्य झाले आहे. कारण माहित नाही पण भारत बायोटेक आपले उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर वाढवू शकलेले नाही.
लस निर्मिती : सिरम ( ८६ + % , )भारत बायोटेक ११-१२ %
लस विकत घेणे व राज्य सरकारांना वितरण : केंद्र सरकार
प्रत्यक्षात लसीकरण कार्यक्रम राबविणे, लसीकरण करणे : राज्य सरकार आरोग्य विभाग.
अशी व्यवस्था आपल्याकडे आहे.
बोल्सोनारो
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी ज्या प्रकारे कोव्हिडची महासाथ हाताळली त्यासाठी त्यांच्यावर मनुष्यहत्येचा खटला चालवण्यात यावा असे संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. (आतापर्यंत तिथे सहा लाखांहून अधिक कोव्हिडमृत्यू झाले आहेत.)
Charge Bolsonaro with murder over Covid toll, draft Brazil senate report says
१०० कोटींनंतर?
रोज केवळ तीसेक लाख डोस दिले जातायत, पण आणखी किती तरी द्यायचे बाकी आहेत.
India still has to administer more than 700 million shots to reach its year-end goal, which at current rates looks increasingly unlikely unless India can repeat Mr. Modi’s birthday feat a few more times.
“There is hesitancy for going for the second dose because the community thinks, ‘Do we really need it now?’” said Dr. Jacob John, a public health physician in the southern Indian state of Tamil Nadu.
India Eased Its Covid-19 Disaster. Fears of Complacency Remain.
लसीकरण झालेल्या प्रगत देशात
लसीकरण झालेल्या प्रगत देशात.
१) कोरोना मुळे मृत्यू.
२) corona बाधीत लोकांची संख्या
३) गंभीर लक्षण असलेल्या लोकांची संख्या.
Vs
लसीकरण न झालेल्या देशातील
१) corona मुळे मृत्यू झालेली लोकांची संख्या.
२)corona बाधीत लोकांची संख्या
३) गंभीर लक्षण असलेल्या लोकांची संख्या.
ह्याची खरी,विश्वास ठेवण्यास लायक माहिती कुठे मिळेल.
न्यू यॉर्क टाईम्स
न्यू यॉर्क टाईम्सच्या ह्या पानावर जाऊन हे भाग पाहा -
Rates for vaccinated and unvaccinated
अमेरिकेत, लस घेतलेल्या लोकांपेक्षा लस न घेतलेल्या लोकांना सार्स-कोव्ह-२चा संसर्ग होण्याचं प्रमाण ६ पट जास्त आहे. कोव्हिडमुळे मृत्यूचं प्रमाण लस न घेतलेल्यांत १२ पट जास्त आहे.
फ्रान्समध्ये बूस्टर होणार अनिवार्य
फ्रान्समध्ये बूस्टर अनिवार्य होणार असं दिसत आहे. लोकांना अनेक ठिकाणी जाण्यासाठी लागणारं प्रमाणपत्र वैध राखण्यासाठी डिसेंबरपासून ६५+ वयाच्या लोकांना बूस्टर डोस अनिवार्य होईल. पुढे ५०+ वयाच्या लोकांसाठीही असा नियम लागू होईल -
Emmanuel Macron urges acceleration of France’s Covid booster rollout
जर्मनी
जर्मनीत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे, आणि आताची साथ प्रामुख्याने लस न घेतलेल्या लोकांत पसरत आहे -
Germany reports daily high number of new coronavirus cases
Germany Agrees Rules to Tackle ‘Pandemic of Unvaccinated’
सिंगल नो मिंगल
कोव्हिडचा असाही एक परिणाम?
कोव्हिडविषयी चुकीची माहिती
कोव्हिडविषयी चुकीची माहिती पसरण्यामागे कोणकोणते घटक जबाबदार होते याविषयी -
‘Injecting poison will never make you healthy’: how the wellness industry turned its back on Covid science
चुकीची माहिती कोणी दिली
सर्व अधिकृत संस्था..
सर्व मीडिया.
आणि बहुसंख्य संशोधक.
ह्याच लोकांनी सब से आगे.
आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी चुकीची ,अर्धवट माहिती लोकांस दिली.
एकाच उदा.
जास्त तापमान असलेल्या देशात covid व्हायरस जिवंत राहणार नाही.
ही अफवा संशोधक लोकांनीच प्रथम पसरवली होती
दीडएक वर्षांपूर्वी ही बातमी
दीडएक वर्षांपूर्वी ही बातमी वाचलेली.
https://www.theweek.in/news/india/2020/03/27/cuba-may-help-kerala-with-…
यातील वंडर ड्रगची प्रगती काय याबद्दल माहिती कुठे मिळेल? आणि केरळला ते मिळाले का?
मीडिया मध्ये बातम्या येत आहेत
अमेरिकेत परत वाढू लागले corona रूग्ण
चीन मध्ये corona च परत कहर अनेक ठिकाणी परत लॉक डाऊन सुरू.
ब्रिटन मध्ये पण तीच अवस्था.
फक्त देशांची नाव बदला पण गोऱ्यांच्या देशांच्या प्रदेशात रहा.
Corona तिथेच परत उगवला आहे.
मग ते vaccine दिल्याचा काहीच फायदा नाही का?
युरोपियन प्रगत देश च corona चे बळी का ठरत आहेत?
का बूस्टर डोस चे आर्थिक गणित आहे.
COVID 19 विषाणू चे उत्परीवर्त
विषाणू असेल किंवा जिवाणू किंवा कोणताही सजीव स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः मध्ये बदल घडवून आणतो त्याला natural' selection म्हणतात .
विषाणू चे उत्परीवर्तन का होते त्या मधील एक कारण स्वतःचे अस्तित्व टिकण्यासाठी हे कारण असणार.बाकी सुद्धा खूप करणे असतील.
विषाणू हा सिंगल रेणू आहे त्याची उत्परिवर्तन होण्याची क्षमता माणसा सारख्या multicellur अत्यंत जटिल जैविक रचना असलेल्या प्राण्या पेक्षा नक्कीच मागास असेल.
जसे हा विषाणू स्वतःचे उत्परीवर्तान करत आहे त्याच न्यायाने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी माणसाची प्रतिकार यंत्रणा पण स्वतः मध्ये बदल घडवून आणत असेल.
रोज अनेक शरीरास धोकादायक असलेले रेणू,अनेक जिवाणू ,विषाणू मानवी शरीरावर हल्ला करत असतील.
रोज च आम्हाला युद्धाचा प्रसंग अशी च अवस्था मानवी शरीरातील रोग प्रतिकार शक्ती ची असेल.
आणि त्या साठी मानवी रोग प्रतिकार शक्ती नेहमीच सावध असेल.
नाही तर रोज च्या अनेक घातक घटकांचा शरीरात प्रवेश होवून पण माणूस निरोगी राहिलाच नसता.
त्याच विचाराने पुढे गेले की असे म्हणता येईल.
नवीन varient शी मुकाबला करण्याची कुवत नक्कीच मानवी immune system मध्ये उत्परिवर्तान घडून येत असेल .
रोग उत्पन्न करणाऱ्या जिवाणू ,विषाणू च्या दोन पावले पुढेच मानवी रोग प्रतिकार करणारी यंत्रणा नक्कीच असेल .
तसे असेल म्हणून तर माणूस आज पण हयात आहे.
की असे काही नसते मानवी immune system स्वतः मध्ये उत्पारीवर्तन घडवून आणू शकत नाही?
मराठी,हिंदी मीडिया मधील
बातम्या देण्याची पद्धत.
१) corona च नवीन variant दक्षिन आफ्रिकेत सापडला.
अतिशय धोकादायक.
का?
काही साक्षी पुरावे आहेत .
२) मानवी रोग प्रतिकार शक्ती पण त्या पुढे निष्प्रभ होईल.
असे झाले की संपलेच की सारे मग कशाला बातम्या देताय.
संशोधक सांगतात वेगळेच आणि मीडिया वाले त्याचा अर्थ करतात वेगळाच.
हा नवीन covid व्हायरस मानवी immune system भेदेल .
असे संशोधक बोलले असतील पण त्याचा अर्थ आपण जो घेत आहोत ,मीडिया जे सांगत आहे तो नक्कीच नसणार.
शास्त्रीय भाषेच्या प्रतेक शब्दाचा विशिष्ट अर्थ असतो त्याच्या मागे पुढे न लिहलेले अर्थ असतात.
ते त्या मधील तज्ञ लोक च समजतील.
हे माझे मत आहे.
उगाच लोकांना हायपर करण्याचे काम मीडिया नी करू नये.
हे पण माझेच मत आहे.
एक लक्षात आले का?
१) खतरनाक व्हायरस लोक भयभीत.
२) खूप तीव्र गती नी प्रसार होवू शकतो.
३) अनेक देशांनी अंतर राष्ट्रीय उड्डाण वर बंदी घातली.
४) विमान तळा वरच विलगिकरण करणार.
Genome sequence तपासणी करणार.
....
मुंबई मध्ये १००० लोक दक्षिण आफ्रिकेतून आली त्यांचा शोध सरकार घेत आहे.
परस्पर विरोधी बातम्या.
नवीन व्हायरस किती घातक आहे ह्या बाबत नक्की सांगता येत नाही .
संशोधक.
जगाने सावध राहावे who च इशारा.
आफ्रिकेतील संशोधनाचा दावा हा विषाणू घातक नाही.
सर्व परस्पर विरोधी विधाने जबाबदार संस्था करत आहेत.
आणि .उलट corona विषयी चुकीची माहिती पसरवली तर सरकार कारवाई करेल.
असा दम गरीब बिचाऱ्या जनतेला ह्याच संस्था देत आहेत.
काय चाललं आहे हे.
उपचार विषयी पण तेच आणि लसी विषयी पण तेच
प्रसार माध्यम लोकांना माहिती येथूनच मिळते (आणि प्रसार माध्यमांना माहिती देणाऱ्या ह्या जबाबदार संस्था आणि प्रायोगिक संशोधक च असतात त्यांना कशाची घाई झालेली असते काय माहीत.अत्यंत खेदाने हे लिहीत आहे)
विषय लस.
१) नवीनच आलेल्या covid व्हायरस चा प्रतिबंध
करण्यासाठी लस शोधली जात आहे.
त्या नंतर .
आज पर्यंत आलेले रोग आणि त्यांच्या वर असलेल्या लसी ह्या माहितीचा भडिमार
उशीर होत आहे हे लक्षात आल्यावर..
लस शोधणे खूप अवघड असते अगदी ८० वर्ष पण लागतात अमक्या तमक्या रोगावर अजुन लस नाही.
हे पटवून देण्याची स्पार्था.
आणि अचानक एक वर्ष च्या आत लसी तयार पण झाल्या..
मग विविध कंपन्या त्यांच्या लसी त्या कशा उपयोगी आहेत ह्याचे पारायण चालू.
लोकांची कुठे स्वीकारण्याची मन स्थिती बनत आहे त्याच्या अगोदर.
लसी निर्माण करताना कोणत्या clinical trial घेतल्या जातात ह्याची माहिती सामान्य लोकांस काही देणे घेणे नाही.
अशा माहिती च overdose...
Aani नंतर कोणत्या कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायल च्या स्टेप पूर्ण केल्या नाहीत त्याच प्रचार..
आणि त्यांना जागतिक मान्यता नाकारणे.
आता पुढचा भाग.
१) लसी पासून पूर्ण संरक्षण मिळेल.
२) लस घेतल्यावर रोग होईल पण लक्षण गंभीर नसतील.
३) आणि हे दोन्ही fail झाल्यावर विषाणू चे mutation ह्या वर ज्ञान वाटप
खूप काही बोलता येईल .
जबाबदार संस्था नीच खेळ खंडोपा केला आहे.
कोणाशी कोणाचा मेळ नाही.
आणि सामान्य जनता आणि मेंढर ह्या मध्ये काही फरक नाही.
. आता उपचार.
१)::::;;;; हे इंजेक्शन corona वर उपचार साठी अत्यंत प्रभावी.
३):::::: हे औषध लोकांना कोरोणा पासून मुक्त करेल.
Etc Etc Etc.
आणि मृत्यू वाढल्यावर.
१),,,::: हे इंजेक्शन बिलकुल उपयोगाचे नव्हते.
२) :::;;;;; ह्या औषध मुळे critical स्थिती निर्माण झाली
कोणाचे नक्की ऐकायचे आणि विश्वास ठेवायचा.
दक्षिण आफ्रिका मध्ये
डिसेंबर 21 च्या मध्यावर 40000 च्या आसपास daily covid बाधित सापडत होते .
22 jan 2022 ल 3049 इतक्याच covid केसेस सापडल्या आहेत.
बाधित लोकांची संख्या कमी होण्याची काय काय कारण असावीत.
लसीकरण म्हणाल तर दक्षिण आफ्रिका मध्ये लसीकरण ची अवस्था जागतिक तुलनेत काय आहे हे माहीत आहेच.
ह्या धाग्यावर
व्यक्त झालेली संशोधकांची मत,लसी चे महत्व पटवून देणाऱ्या लोकांची मत.
लस नाही घेतली तर खूप मृत्यू होतील.
व्हायरस चे नवीन variant येतील.
सर्व च्या सर्व प्रतिसाद, मत आज खूप विनोदी वाटत आहेत.
मग विज्ञान चे नाव घेवून संशोधक लोकांनी व्यक्त केलेली मत साफ चुकीची ठरली .आज तरी चुकीची च ठरली आहेत.
आता ना लसी ची चर्चा आहे .ना covid जगात गंभीर रुपात आहे .
ना नवीन variant आला आहे.
विचार करण्यासारखी गंभीर बाब आहे.
नवीन उत्क्रांत झालेला
Covid व्हायरस ची जाहिरात जागतिक मीडिया करत नाही तो पर्यंत भारता सहित जगातील जनता.
संशोधक,तज्ञ, डॉक्टर ह्यांच्या दिव्य ज्ञाना पासून वंचित राहणार.खूप दुःखाची गोष्ट आहे..जगात covid कमी नाही तर आता तरी नष्ट झाला आहे.
सर्व लस वाले,डॉक्टर्स ,तज्ञ,संशोधक.
का covid कमी झाला ह्या विषयी काहीच मत व्यक्त करत नाहीत..
सबसे बडा रुपया हेच शेवटी सत्य आहे
ह्याच प्रमाणात मृत्यू लपवले जात असतील तर
https://www.sumanasa.com/go/1P22w6
ह्या प्रमाणात देशभर कारोना मुळे झालेले मृत्यू लपवले असतील तर देशात करोडो लोक मृत्यू मुखी पडले असतील covid मुळे.कसलीच सुविधा नसताना जेवढी लोक साथी च्य रोगांनी मेली नसतील त्या पेक्षा किती तरी जास्त लोक आता मेली असावीत.सर्व आधुनिक सुविधा असून सुद्धा.