पंडीत रवीशंकर यांचे निधन : श्रद्धांजलि

ख्यातनाम सतारवादक भारतरत्न पंडीत रवीशंकर यांचे आज सॅन डीएगो येथे ९२व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

यासंबंधी तपशीलवार बातम्या विविध माध्यमांत वाचता येतील. त्यातील काही मोजक्या: TOI, म.टा., The Hindu, BBC

ऐसीअक्षरे तर्फे या स्वररत्नास अंतःकरणपूर्वक श्रद्धांजलि!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

सतारवादनातील फारसे काही समजत नसले तरी आवडते जरूर. त्यांची शेवटची कंसर्ट त्यांच्या मुलीसोबत जुगलबंदी केली असे ट्वीट वाचले.
ट्वीटरवरचीच एकाची The music just died ही प्रतिक्रीया बोलकी आहे.

या भारतरत्नास सलाम आणि आदरांजली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रविशंकर यांना श्रद्धांजली. एक महान जादुगार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवीशङ्कर भारताबाहेर प्रसिद्ध होत असताना परदेशी लोकाञ्च्या ते सङ्गीत ऐकतानाच्या प्रतिक्रिया फार मनोवेधक वाटल्या.
उदा. ही चित्रफीत (साल १९६७, तबल्यावर अल्लारखाँ साथीला आहेत.) केवळ ऐकण्यासाठीच नव्हे तर पाहण्यासाठीही रञ्जक आहे. विशेषतः १६ मि. नन्तर लय अधिकाधिक दृत होत जाते आणि कळस गाठला जातो त्यावेळच्या प्रेक्षकाञ्च्या प्रतिक्रिया. सङ्गीत माणसाला कसे नखशिखान्त बहरून टाकू शकते याचे एक उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्रुतलय आणि जुगलबंदी नेहेमीप्रमाणेच आनंद देऊन गेली. पं. रवीशंकरांनी संगीतबद्ध केलेली मीराबाईंची भजने माझ्या आवडत्या रचनांपैकी आहेत. कमीतकमी वाद्यमेळ वापरून, भारतीय संगीताशी निष्ठा ठेऊन संगीतबद्ध केलेल्या रचनांची एक झलक https://www.youtube.com/watch?v=54U2uR9WeUs इथे पाहता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक प्रख्यात सतार आज शांत झाली. रेस्टिन्पीस पंडितजी, ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सतारवादनास स्वतःच्या कर्तृत्त्वाने एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्‍या संगीतातील या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली.

रविशंकर यांच्या सतारीने माझे कित्येक दिवस मंत्रमुग्ध केलेले होते. त्यांच्या सतारवादनाची नशा मनावर अशी हळूवार पसरत जाते की त्या सुरावटींमधून बाहेर मोठ्या अनिच्छेनेच यावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देश -विदेशात , भारतीय शास्त्रीय संगीत गायना इतकेच भारतीय वाद्य संगीत प्रचलित करण्यात पंडितजींचा सिंहाचा वाटा होता. संतूर , बासरी , पखवाज , सरोद , वीणा हया वाद्यांचा आणि गायनाचा परदेशात प्रसार होण्यातही पंडितजींच्या सतारीचे योगदान मोठे आहे.
त्यांनी दिलेले पार्श्व संगीत हा ही एक अनमोल ठेवा आहे.
पंडितजी ना सद्गती लाभो ही प्रार्थना !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय सतारीला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देणारा प्रयोगशील कलावंत गेला. मागच्या पिढीतील अनेक अनमोल रत्ने हरपली.
किशोरकुमार गेला तेव्हा अचानक आपण मोठे झाल्याचे जाणवले होते. आता भीमसेन जोशी गेले, रविशंकर गेले हे ऐकता ऐकता वय होत असल्याचे जाणवत आहे. Sad
रविशंकरांच्या 'इन्साईड द क्रेमलीन'या ब्रेमेन म्युझिकच्या कॅसेटने तरूण वयात वेड लावले होते.अजूनही अधूनमधून ती क्यॅसेट ऐकतो. त्यातली 'विट्ठला..' ही रविशंकरांची हाक आताही कानात गुंजते आहे.
त्यातला शांतीमंत्रही - आता शांत झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

परवाच बोलण्यात आले की फारा वर्षांपूर्वी धोधो पावसात रवीशंकर आणि झाकीर हुसेन यांची जुगलबंदी ऐकताना वाटले होते की हे मानवी कुवतीच्या बाहेरचे आहे. 'हॅन्ड ऑफ गॉड' म्हणतात तो हाच असावा. अट्टल नास्तिकांनाही तसे वाटावे हेच या थोर लोकांचे यश. त्यामुळे शब्दांसाठी भीक मागूनच म्हणावेसे वाटते:
Farewell, sir.
It was good to be alive with you around.
We am sure wherever you are, you will create a small, sun-filled garden around you. And a small bird will come, and sing, not specially for you, but only for you.
अवांतरः श्रद्धांज'लि' की 'ली'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आजचे आदरांजली वाहणारे अग्रलेख / लेखः
अग्रलेख:
लोकसत्त्ता
म.टा.
दिव्य मराठी

लेखः
BBC
TOI

DNA ने रवीशंकर यांना वाहिलेले लेख/आठवणींनी भरलेले आणि भारलेले पान

डॉन वृत्तपत्रातील बातमी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रद्धांजली.
सतारीचा उल्लेख झाला की पंडित रविशंकर हे नाव सर्वप्रथम मनात यायचं, इतकं त्यांचं नातं घट्ट जुळलं होतं. संगीताला त्यांनी दिलेली देणगी त्यांच्या स्वरांच्या आणि शिष्यांच्या रूपाने टिकून राहो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0