माय बॉडी, माय चॉईस
तुमच्या घरातली तारुण्यात पदार्पण केलेली मुलगी "मेरा अब्दुल" वगैरे म्हणते आहे का याकडे लक्ष ठेवा. ती किंवा अगदी जवळच्या नात्यातली एखादी षोडश वर्षीय बालिका अचानकच शाह रुक्ष खान, सॉलोमन खान किंवा हम्मीर खान यांचे सिनेमे आवडीने बींज वॉच करते आहे किंवा सुअव्वर फारुकी बिग बॉस मधून विनर झाला त्याबद्दल त्याचे तोंड भरभरून कौतुक करते आहे किंवा ती सारखे "माय बॉडी, माय चॉईस "अशी घोकंपट्टी करत आहे असे असेल तर ती लव्ह जिहादची शिकार होत आहे असे समजा. तसे असेल तर त्याला विरोध करण्याऐवजी तिच्या आवडीचे अगदी मनापासून समर्थन करा. ती मेरा अब्दुल सारख्या सुंदर अशा जीवन साथीची निवड करणार आहे त्याबद्दल तिचे अभिनंदन करा आणि भरभरून कौतुक करा. होय. मुलगी प्रौढ आहे. तुम्ही तिला तिच्या आवडीचे लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, म्हणून तिला साथ द्या.
नवीन धर्माच्या वातावरणानुसार तिला संस्कार देणे ही आई वडील म्हणून तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर तिचे सर्व आधुनिक कपडे वॉर्डरोबमधून काढून टाकून बोहारणीला द्या. तिच्या वॉर्डरोब मध्ये आता हिजाब आणि बुरखा ठेवा. जमल्यास कुराणाची एक प्रत आणून ठेवा. ती घराबाहेर पडताना संपूर्ण शरीरासह चेहरा झाकण्याच्या सक्त सूचना द्या. तिने घराबाहेर एकटी जाऊ नये, पुरुषांशी बोलू नये, नाटक, चित्रपट वगैरे पाहायला जाऊ नये आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करावी या सूचना देखील तिला देऊन ठेवा. मेरा अब्दुल तिला तीन सवत्या आणू शकतो हे ही सांगून ठेवा. कदाचित सवतीचे मूल वाढवावे लागेल याचीही मानसिक तयारी तिच्याकडून करून घ्या. रोज तिला मटन मार्केट मध्ये चक्कर मारायला सांगा. कोंबडी कशी कापतात याचे यू ट्यूब विडिओ रोज पाहायला सांगा.
तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या होणाऱ्या धर्माच्या चालीरीती आणि परंपरा शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही ना? बस्स... वर्ष सहा महिने तोंड बंद ठेवून आवाज न करता हे सगळं केलंत तर... सहा महिन्यांनंतर तुम्ही नक्कीच स्वतःला एक "यशस्वी" पालक म्हणवून घेऊ शकाल.
माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्ही वरील नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
......................................
ललित लेखनाचा प्रकार
हे असले चाळे...
हे असले चाळे माझ्या संघिष्ट वडलांनीही केले नाहीत. उलट मी कुणा मित्रांबरोबर उनाडताना दिसल्याची तक्रार त्यांची संघोट्या मित्रांनी केल्यावर बाबांनी त्या लोकांकडे साफ दुर्लक्ष केलं.
मी दहावीत होते, तेव्हा घरात घालण्यासाठी नवा झगा शिवून आणल्याचं मी बाबांना दाखवत होते. नेमके तेव्हा आजोबा - आईचे वडील - घरी होते. आई तेव्हा हयात नव्हती. तर तो झगा बघून झाल्यावर आजोबा म्हणाले, "तुझी आई मॅट्रिक झाल्यानंतर नेहमी साड्या नेसायची." मी एकदम सरसावून बसले, आता आजोबा आईच्या काही गोष्टी सांगणार म्हणून. तर आजोबा तेवढंच म्हणाले. यावर बाबांनी काहीही प्रतिक्रिया दाखवली नाही.
मी १७-१८ वर्षांची असताना बाबांना म्हणाले, "बाबा, मला वाटत नाही माझा देवावर विश्वास आहे!" बाबांचा चेहरा पुन्हा कोराच होता, ते म्हणाले, "ते ठीक आहे. पण आज संध्याकाळी काय जेवायचंय ते सांग; तशी तयारी सुरू करतो."
लहानपणी गांधीजींना 'टकल्या' म्हणत हिणवणं सर्रास चालत असे. हे वडलांसमोर एकदा केलं तर चांगलाच दम दिला होता त्यांनी.
मला या प्रसंगांचं महत्त्व फार वर्षांनंतर समजलं. आता वडीलही जिवंत नाहीत. तेही बरंच असं वाटतं. हिंदुत्ववाद्यांचा असला उन्माद एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा स्वतःच हिंदू परंपरेतून आलेला सहिष्णुपणा यात बाबांना खूप त्रास झाला असता.
'कोंबडी कशी कापावी' व्हिडियो
कोंबडी कशी कापतात याचे यू ट्यूब विडिओ रोज पाहायला सांगा.
कुतूहल म्हणून 'कोंबडी कशी कापावी' असे गूगलसर्चमध्ये डकवून पाहिले. विषयाशी संबंधित अधिकतर व्हिडियो हे मालवण-साइडकडच्या मराठी/मालवणीभाषक हिंदूंचे निघाले. एकमेव व्हिडियोत एकुलता एक मुसलमान सापडला, तोही एका अगोदरच मारलेल्या कोंबडीचे रक्त (तिच्यावर पायांनी दबाव देऊन) निथळत (ड्रेन करीत) निवांतपणे, मूकपणे, एका स्थितीत निश्चेष्ट तथा स्तब्ध बसून होता. (हिंदूंच्याच व्हिडियोंमध्ये काय तो (कोंबडी कापण्याबाबतचा) उत्साह, दंगा वगैरे आढळला.)
येथे एक मात्र कबूल केले पाहिजे: हिंदूंच्या काय, किंवा मुसलमानांच्या काय, कोणाच्याच व्हिडियोत दुर्दैवाने (जिवंत) कोंबडीस मारण्याचे प्रात्यक्षिक नव्हते. (घोर निराशा झाली.) मात्र, अगोदर मारलेली कोंबडी साफ करून तिचे तुकडे कसे करायचे, यावरील सविस्तर विवेचन मुबलक आढळले.
परंतु तरीही, अशा व्हिडियोंमध्ये हिंदूंच्या (आणि त्यातही मराठी/मालवणीभाषक हिंदूंच्या) व्हिडियोंचे प्राचुर्य (मुसलमानांच्या व्हिडियोंच्या तुलनेत) आढळावे, हे अंमळ रोचक, उद्बोधक, तथा शैक्षणिक आहे.
खाटकाच्या धंद्यात हिंदू नसतात, अशी लेखिकेची बहुधा (भाबडी परंतु प्रामाणिक) समजूत असावी. असे अमूल्य शिक्षण शाखेत वगैरे मिळते काय? की ही घरगुती पारंपरिक समजूत असावी?
(बाकी, खाटकाच्या धंद्याचा आणि रॅडिकलायझेशनचा (बादरायण)संबंध जर असलाच, तर बहुसंख्य हिंदूंच्या कोंबडी कापण्याच्या व्हिडियोंमधील उत्साहाच्या अतिरेकाचा anecdotal evidence जमेस धरता, रॅडिकलायझेशनचे प्रमाण मुसलमानांपेक्षा हिंदूंमध्ये खूपच अधिक असावे, अशा निष्कर्षावर उडी मारण्याचा मोह अनावर होतो. चालायचेच.)
(अतिअवांतर: कालीमातेसमोर बोकड कापण्याबद्दल लेखिकेने कधी ऐकलेले नाही काय? किंवा नवसाला बोकड कापणे वगैरे? हिंदूंमध्ये (१) मांसाहार करीत नाहीत, आणि/किंवा (२) खाटीक नसतात, असे लेखिकेस प्रामाणिकपणे वाटते काय? (हिंदू मांसाहारी केवळ मुसलमान खाटकांकडून मांस विकत घेतात, कारण हिंदूंना खाटीकगिरी निषिद्ध आहे, परंतु मुसलमानांनी मारलेले विकत घेतलेले चालते, असे काही असल्यास मला तरी ते नवीन तथा आश्चर्यजनक आहे. लेखिकेने बहुधा 'झटका' आणि 'हलाल' पद्धती तथा त्यासंदर्भात हिंदू आणि मुसलमान समाजांतील विधिनिषेधांतील फरक याबद्दल ऐकलेले नसावे.) की हिंदू म्हणजे केवळ कोकणस्थ, देशस्थ, तथा कऱ्हाडे ब्राह्मण, अशी काही लेखिकेची प्रामाणिक समजूत आहे?)
असो. अधिक काय बोलावे?
लव जिहाद
संघटीत पने धर्म परिवर्तन करण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे कृत करणे ह्याला च लव्ह जिहाद असे म्हणता येईल.
आणि हे कृत्य नक्कीच गुन्हेगारी स्वरूपाचे आहे कायदेशीर नाही .
भारतीय कायदा अशा गोष्टींना मान्यता देत नाही.
तरी असा लव्ह जिहाद सारख्या घटना भारतात होत असतील तर ते सरकारचे अपयश आहे कायदा सू व्यवस्थेचा प्रश्न आहे.
दोन व्यक्ती मधील प्रेमाला जिहाद म्हणता येणार नाही .
जसे खूप हिंदू स्त्रियांनी डोक्यावर पदर घेवून च सार्वजनिक ठिकाणी किंवा चार माणसात वावरने ही प्रधा फेकून दिली आहे .
त्या प्रमाणे खूप मुस्लिम स्त्रियांनी पण बुरखा फेकून दिला आहे.
जग बदलेले तसा सर्व समाज बदलत असतो त्याला कोणी थांबवु शकत नाही.
बेनझीर भुट्टो पाकिस्तान ची पंतप्रधान होती ती काय बुरखा खालून जग भर फिरत होती का?
बुरखा घातलेली मुस्लिम स्त्री डॉक्टर मी तर अजून तरी बघितली नाही.
रेवती ताई जिंकलात तुम्ही
रेवती ताई तुमची पोस्ट भिकार आहे. त्याला साहित्यिक, कलात्मक वा वैचारिक असे कसलेच मूल्य नाही. अनुल्लेखाने मारण्याच्या लायकीची ही पोस्ट आहे..
पण तुम्ही किंवा राम मंदिराला "भूषण" मानणारे व एखाद्या भुरट्या बाबाच्या पुतळ्याचे कौतुक करणारी "विवेक" हरवलेल्या मंडळींचा हेतूच हा आहे की काहीतरी निरर्थक वाद उकरून काढायचा आणि हिंदुत्ववादाचा विरोध करणाऱ्यांना बोलायला भाग पाडायचं...
(ते बिचारे आपोआप तुमच्या जाळ्यात अडकतात...)
हळूहळू ह्या मंचावरपण मग constructive चर्चा किंवा वाद होऊ न देता केवळ निंदानालस्ती करत राहायची...
वास्तविक भारताला वाद-संवादाची परंपरा आहे पण असल्या उदात्त परंपरेत तुम्हाला रस नाहीच त्यामुळे सगळीकडे ध्रुवीकरण करण्याचा तुमचा अजेंडा आहे..
त्यात तुम्ही दरवेळी यशस्वी ठरता म्हणून तुमचं अभिनंदन...
.
ऑर्गनायझर!
Come on, be serious.
————————————
बाकी, तुम्ही असले लेख इथे टाकण्याऐवजी तिकडे ‘मिसळपाव’वर जाऊन का टाकीत नाही? मला वाटते तुमच्या talentsकरिता ते outlet अधिक suitable आहे.
तिथे तुम्हाला उत्सुक वाचकही अधिक मिळतील, नि तुमच्या गुणांचे एकंदरीत चीज होईल, जे इथे होणार नाही. (शिवाय, unquestioning, सम‘विचारी’ वाचक मुबलक भेटतील.)
किंवा, दुसरा मार्ग म्हणजे, यूट्यूबवर व्हिडियो टाका, इन्फ्लुएन्सर बना. त्याकरिता लागणारे talent आहे तुमच्याकडे. Viral व्हायला वेळ लागणार नाही, नि उत्सुक श्रोत्यांच्या ‘हिट्स’ची वानवा भासणार नाही. एक ढूँढो, हज़ार मिलेंगे।
त्याव्यतिरिक्त, ‘फेसबुक’चा मला अनुभव नाही, परंतु बहुधा तेही माध्यम उपयुक्त असावे, असे वाटते.
पाहा विचार करून!
सर्वात जास्त भेदभाव
जाती वरून भेद भाव.
धर्मावरून भेदभाव.
आर्थिक स्थिती वरून भेद भाव.
भाषेवरून भेदभाव.
Nationality वरून भेद भाव.
शिक्षण वरून भेद भाव.
लिंगावरून भेद भाव.
एकच प्राण्याच्या जातीत सर्वात जास्त भेदभाव फक्त माणसात आहे
बाकी ह्या ब्रह्मांड मधील कोणत्याच प्राण्यात इतका भेदभाव नाही.
आणि सर्वात जास्त मागास मीच.
सर्वात जास्त शोषित मीच.
सर्वात जास्त भोळा मीच.
हे ठरवण्याची सर्वांची चाढाओढ सर्वात लागलेली असते .
पण सर्व च लबाड, धूर्त,स्वार्थी पना मध्ये कुठेच कमी नसतात
रेमंड किंवा तत्सम कापडाच्या
रेमंड किंवा तत्सम कापडाच्या दुकानात कापडाचे तागे असतात. पँट शिवायची असेल तर साधारण १.२० मीटर आणि शर्टला १.५० मीटर असा कपडा लागतो. तागा संपत आला की जो कपडा उरतो त्यात पँटसाठी तो १.२० पेक्षा कमी तर शर्टाचा तागा १.५० पेक्षा कमीच उरतो. ह्या असल्या तुकड्यांना कटपीस म्हणतात. त्याचा काहीच उपयोग नसतो. त्याला सुरकुत्या पडलेल्या असतात.शेवटी दुकानदार त्याचा फरशी पुसायला उपयोग करून घेतात.
काही दुकानात १.२० मीटर आणि १.५० मीटरचे कापड अगोदरच कापून ठेवलेले असते. यांना ओरिजनल कटपीस म्हणतात तर फरशी पुसायला उपयोगी पडणाऱ्या तुकड्यांना जयचंदी कटपीस म्हणतात. जय चंदी कटपीसचे आयुष्य अगदीच क्षणभंगुर असते. ता ग्यातून भस्सकन ओढून काढतात आणि चुरगाळून फेकून देतात.
ब्लाउज कॅटेगरी मध्ये देखील जयचंदी कटपीस ६०,७०,८० से.मी. चे मिळतात. पुरुषी जयचंदी कटपीसला इथे कटुवा असे म्हणतात.
हल्ली अश्या जयचंदी कटपीसाचे ढीग च्या ढीग भंगाराच्या दुकानात टांगलेले दिसतात.
...
डोंबलाचे क्रिप्टिक!
लईच क्रिप्टीक झालंय ...
माझ्या अंदाजाप्रमाणे ‘कटपीस’वर (ओढूनताणून) श्लेष साधण्याचा काही (विकृत नि निष्फळ) प्रयत्न असावा.
((स्वतः किंवा कुटुंबीयांपैकी कोणीही संघोटे नसलो, किंवा कधी चुकूनही शाखेवर फिरकलेलो नसलो, तरीही) आयुष्याची पहिली सतरा formative वर्षे संघाचा बालेकिल्ला म्हणता येईल अशा भागांत काढली, नि वेळोवेळी पुष्कळ संघोट्या वर्गबंधू वगैरेंशी पाला पडला. त्यामुळे, या लोकांची डोकी कशी चालू शकतात, याचा थोडाबहुत अंदाज आहे मला. ही मंडळी असले लिहू शकतात, याचे आश्चर्य नाही, परंतु, ‘ऐसी’ हे असले लिखाण चालवून घेते, याबद्दलच काय तो विषाद वाटतो.)
व्यवस्थापनास विनंती
'ऐसीअक्षरे'च्या व्यवस्थापनास विनंती:
'ऐसीअक्षरे' हे संघाचे मुखपत्र आहे काय? कृपया खुलासा व्हावा.
'ऐसीअक्षरे' हे (यदाकदाचित) संघाचे मुखपत्र असल्यास:
१. संस्थळाचे नाव बदलून कृपया 'ऐसीवत्सलेमातृभूमे' (This is terribly contrived, I know.) किंवा 'ऐसीअयोध्या' (किंवा 'ऐसेरामबोलो' कसे वाटते?) किंवा तत्सम काहीतरी करावे.
२. वेबपेजच्या फक्त उजव्या बाजूस लिहिणे सक्तीचे करावे. (डाव्यांना – किंवा मधल्यांनासुद्धा – अजिबात जागा ठेवू नये.)
३. संस्थळाची रंगसंगती (केवळ) भगवी करावी.
तसेच, ('ऐसीअक्षरे' हे संघाचे मुखपत्र असल्यास) या संस्थळावर इत:पर वावरण्यात मला अजिबात स्वारस्य नाही. त्या परिस्थितीत, कृपया माझे येथील सदस्यत्व रद्द करावे, तथा माझे येथील सर्व लिखाण, प्रतिसाद, तथा खरडफळ्यावरील खरडी येथून उडवाव्यात, अशी नम्र विनंती.
आगाऊ आभार.
आवरा ..
ऐसी कुणाचेच मुखपत्र नाही.
वडाची साल पिंपळाला लावून तुम्ही इथले वातावरण प्रदुषित करीत आहात. कृपा करून थांबा.
समाजात जे वाईट आहे, विकृत आहे -- त्याचे समर्थन इथे कुणीच करीत नाहीत. शहाणी माणसे उठसुट कुणाला बदलून टाकण्याची भाषा करीत नाहीत.
अन्यायाचा प्रतिकार जरूर करा, पण तुमच्या प्रमाणेच इतरांनीही वागावे, बोलावे अशी सक्ती करू नका.
ही फक्तं विनंती आहे, सल्ला नाही..
आपण सर्व बाजूला ठेवू.
धर्म,जात, nationality. सर्व बाजूला ठेवू या.
पालकांना आपल्या मुलांचे सुख च हवं असते.
मुलगीच अत्याचार ची बळी असते हा सर्वात मोठा गैर समज आहे मुल पण फसतात आणि त्यांच्यावर अत्याचार होतात.
व्यक्ती स्वतंत्र ही आधुनिक विचार श्रेणी असलीं तरी .
व्यक्ती स्वतंत्र चे समर्थन करणारे संकट काळात बिलकुल मदतीला येत नाहीत.
ते फक्त इंटरनेट जगात च फोकदरी करत असतात.
Ground मध्ये कार्य करत नाहीत.
व्यक्ती स्वतंत्र चे भूत स्वर झालेली unmatured मुल फसतात तेव्हा हे समर्थक कुठेच दिसत नाहीत ना मदतीला येत.
अडचणीत आला त आणि तुमची स्थिती आर्थिक बाबतीत गंभीर होईल तेव्हा तुम्हाला चाढवणारी एक पण व्यक्ती एक रुपया
पण मदत करणार नाहीत.
पालकांना च सर्व दुःख सहन करून लढा पण द्यावा लागतो.
जन्माचा जोडीदार निवडणे हा सोपा निर्णय नाही.
एक तर कच्चे वय ,दुनियादारी माहीत नसणे, सेक्स नी मेंदू वर घेतलेला ताबा (तो नैसर्गिक आहे) आणि विचार करण्याची क्षमता बिलकुल नसणे त्या मुळे अनेक जन जोडीदार निवडताना फसतात .
पण निर्माण होणाऱ्या कठीण परिस्थिती शी त्यांनाच सामना करावा लागतो मदतीला कोणी नसते.
जोडीदार निवडताना आई वडील हे आपले खात्री चे हितचिंतक च असतात.
कमीत कमी त्यांच्या शी ह्या विषयात चर्चा केलीच पाहिजे.
काही बिघडले तर तेच पाठीराखे असतात आणि त्यांनाच त्रास होतो.
बाकी दुनिया हसत असते.
मेंदू वापरून,व्यावहारिक पना बघून, चरित्र बघून, फॅमिली हिस्टरी बघूनच ..
लग्नासाठी जोडीदार निवडा+
((. लिंग विरहित हा सल्ला आहे स्त्री पुरुष असे वेगळे काही नसते )
उगाच उतावीळ पना करू नका
माय बॉडी माय चॉईस
माय body माय चॉईस असे तारे तोडणारा पुरुष किंवा स्त्री जेव्हा ह्यांच्यावर अन्याय होतो .
तेव्हा ..
शासकीय यंत्रणेची मदत मागतो.
समाजाची सहान भूती मागतो
सरकारी मदत मागतो.
म्हणजे त्याचे पूर्ण गर्व हरण झालेले असते.
सरकारी यंत्रणेची मदत न घेता.
समाजाची सहान भुती नसेल.
कुटुंबाचा पाठिंबा नसेल तर .
त्यांना न्याय पण मिळणे अवघड असते.
स्वतच्या हिम्मती वर आपल्या वर च्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची कुवत ह्यांच्यात बिलकुल नसते
सदर लेखिकेची वाटचाल पहाता
सदर लेखिकेची वाटचाल पहाता ह्या संघी वाटत नाहीत.
उदा :
१) https://aisiakshare.com/comment/196354#comment-196354 इथे म्हणतात - सनातन धर्म हा जगातील सर्वात भिकार धर्म आहे.
२) https://aisiakshare.com/comment/196359#comment-196359 इथे म्हणतात - सनातन धर्मातले आस्तिक अशक्य आणि भंपक गोष्टीवर पाच ही इंद्रिये बंद करून विश्वास ठेवतात कारण त्यात ईश्वराच्या महिमेचा पोवाडा गाईलेला असतो.
याच प्रतिसादात म्हटले आहे -
ग
साक्षात् भगवान शिव आले आणि आत जाऊ लागले. जिवंत पुतळ्याने त्यांना प्रवेश नाकारला. झालं, क्रोध ज्याच्या नसा नसात भरला आहे अशा भूतनाथाने त्याचे मुंडके की हो उडवले? कारण काय तर पुतळ्याने जय जय शिव शंकर यांना ओळखलेच नव्हते. कसे ओळखणार? मी पार्वतीचा पती आहे असे आय कार्ड देवोंके देवांच्या गळ्याभोवती नव्हता. होता तो जहरीला नाग. आता या क्षणी डसेल असा फणा काढून फूत्कार करणारा. मुंडके उडून बाजूला पडले त्या क्षणी पार्वती अवतरल्या. सुस्नात. तो मर्डर त्यांनी पाहिला आणि त्या विलाप करू लागल्या. मुंडके आताच्या आता, अब और इसी वक्त, जोडा असा स्त्री हट्ट त्यांनी धरला. परंतु महा महादेव यांना ते काही जमले नाही. तिथेच मॅटर्निटी वॉर्ड मधून नुकतीच बाहेर पडलेल्या हत्तिणिच्या पिल्लाचे शिर कापून त्या पुतळ्याला जोडले आणि श्री गजानन अवतरले. महादेवाना ना ब्लड ग्रुपची अडचण आली ना सर्जरी करावी लागली. हे गजानन इतके अतरंगी होते की ते म्हणाले मीच प्रथम देवता. मग सर्व देवी देवतांची शर्यत लावण्यात आली. त्या शर्यतीत पृथ्वी प्रदक्षिणा करायची आणि जो पहिला येईल तो प्रथम देवता असेल असे ठरले. गजानन यांनी पार्वतीला, आपल्या मातोश्रीना प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले की हीच ती पृथ्वी प्रदक्षिणा. सर्व देवी देवतांना त्यांनी येडा बनवले. जसे आताच आपल्याला दहा दिवस येडा बनवून वेठीला धरले आणि कानाची वाट लावली. टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन आणि जन जागृती साठी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता अचकट विचकट आणि अश्लील या पातळीवर येऊन पोचला तरी गणेश बुवांचा मोदक खाण्याचा हव्यास काही सुटत नाही. गेले की ब्रिटिश आता पंच्याहत्तर वर्षापूर्वी. कशाला पाहिजे आता सार्वजनिक गणेशोत्सव? दहा दिवस डीजे, त्यात टीवीतल्या तारे तारका ढोल बडवणार, सनातन धर्माचे दारू प्यायलेले तरुण त्यात चाळीस पन्नास तास नाचणार, गर्दीत तरुणींच्या मागे चिकटणार, जमल्यास त्यांच्या
ढुंगणाला चिमटा काढून आपण त्या गावचेच नाही असा आविर्भाव दाखवणार, विसर्जनाच्या वेळी पाच पंचवीस जण मरणार, शेकडो मोबाईल चोरी करणार, पोलिसांना बंदोबस्तात गुंतवून त्यांच्या फॅमिली लाईफची वाट लावणार आणि जमलेल्या वर्गणीचा ताळेबंद मांडताना त्यात गफला करून पैसे खाणार. हा आहे सनातन धर्म.
याचाच अर्थ काही विशिष्ट हेतूंनी त्यांनी हा लेख टाकला आहे.
ना-तजरबा-कारी से वाइ'ज़ की ये
ना-तजरबा-कारी से वाइ'ज़ की ये हैं बातें हैं, बुत हमको कहे काफिर, अल्लाह कि मरजी है….( बोले तो अल्लाह का बुत बना दो. तोबा तोबा.. लाहौल विलाकुवत…..?!!).
राम मंदिर बांधले गेल्याने बऱ्याच जयचंदाना( म्हणजे जीस थाली में…. जया बच्चन स्टाईल..) पोटशूळ उठलाय. ते त्यांच्या घरात वज्रासनात( वज्रासन इज बेस्ट फॉर डायजेशन. ज्याना मंदिराचे अपचन झालेय त्यांच्यासाठी) बसून मक्केच्या दिशेला कपाळ ( कप्पाळ!) जमिनीला टेकवत असतील तर दिवसातून पाचवेळा त्यांचा पार्श्वभाग वर झालेला असतो. ( या मुळे पोल्युशन होत असते, तो भाग निराळा) त्या मुळे लिओनेल मेस्सी सहज पाच गोल करु शकतो वुईथ ए हार्ड किक् ऑन इट एवरी टाईम. नो नीड टू गेट अ पेनल्टी कॉर्नर!
आमच्या घरात संध्याकाळी रामरक्षा म्हटली जाते.
इक शहंशाह ने तुड़वाके हंसी तेजोमलय, सारी दुनियाको नफरत की कहानी दी है।
आम्ही बाबरीच (बाबरी वॉज अ बॉय अँड सोलमेट ऑफ बाबर. रीड बाबरनामा, पेज नंबर 120-121) काय, पण ताजमहाल आणि कुतुब मिनार पण डेस्ट्रॉय करु आणि तिथे मंदिर बांधू. पोटशुळाचे चाटण आताच खरेदी करून ठेवा. जमल्यास बर्नोलच्या ट्युबा पण घेऊन ठेवा. काहींना हडेन्सा मलम सोईचे होईल.
नाही, नको. जयचंदांनी युनानी उपचारच ( बोले तो झाडू, फूंक, मंतरलेले पाणी, ऊंट का पेशाx इत्यादी ) करून घ्यावेत, तेच बरे. उगाच आयुर्वेदी उपचार कशाला? नाही का?
ऑफ कोर्स, इट इज युवर बॉडी, युवर चॉईस, vôtre affaire, vôtre derrière.
चालायचेच.
मी कूर्गच्या शाळेत तिसरीत
मी कूर्गच्या शाळेत तिसरीत असताना रोहन बोपण्णा नावाच्या मुलाला एका मुलाने गुद्दा मारला. रोहन रडायला लागला आणि हुंदके देत म्हणाला, “ना नम्म अव्वन तगोंडू बरतेन नोडू” या कानडी वाक्याचा अर्थ “मी माझ्या आईला घेऊन येतो बघ “असा होतो. एवढ्याश्या कारणासाठी तो आईला घेऊन येतो हे ऐकल्यावर आम्ही सगळे हसायलाच लागलो.
ऐसीच्या ॲडमीनकडे तक्रार करणे म्हणजे आईच्या पदराखाली लपण्याचाच प्रकार. ॲडमीनकडे तक्रार करून काय होणार? जास्तीत जास्त माझे सभासदत्व रद्द करण्यात येईल ना? या पेक्षा जास्त काही? खुशाल करा. तसे केल्यास रियासत ए पुदीना चे तुम्ही नागरिक आहात हे सिद्ध होते. तसे नसेल तर मग द्वेषमूलक वगैरे शब्द वापरत रडू नका. माझ्या लेखावर आलेले प्रतिसाद प्रेमपत्रे तर नक्कीच नाहीत.
बाय द वे, रोहन बोपण्णा तोच तो जो तुम्हाला ज्ञात आहे.
रेवती
देशातील खरी आज ची स्थिती ची जाणीव तुम्हाला नसावी असे वाटते.
तुम्ही विदेशात राहता का?
मोदी ३ रा टीम १००% पूर्ण करणार आहेत.
.
स्थिती तशीच आहे.
काँग्रेस काळात जवळ जवळ सर्व main streaming मीडिया मध्ये डावे कम्युनिस्ट लोकांचे वर्चस्व होते .
आता जवळ जवळ सर्व main stream मीडिया उजव्या विचारांच्या मालकीची आहे आणि ते त्यांचे काम चोख करत आहेत.
.
उजव्या विचाराची लोक आणि राजकीय पक्ष कधी नव्हे ते strong स्थिती मध्ये आहेत.
उगाच त्रागा करून घेवु नका
हे म्हणजे…
हे म्हणजे, एखाद्या नास्तिकाने ‘(माझ्यामुळे) परमेश्वराला मधुमेह होईल’ असे विधान करण्यासारखे झाले!
(नाही म्हणजे, तुम्ही नास्तिक आहात, असा दावा करू इच्छीत नाही. (बोले तो, असालही, किंवा नसालही; त्याने फरक पडत नाही.) फक्त, एखाद्या नास्तिकाच्या दृष्टिकोनातून असे वाक्य कसे ठरेल, याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. असो.)
तुमचे त्रैराशिक साफ चुकले आहे!
(स्पष्टीकरण द्यायला हवेच का? गरज नाही, उघड आहे, असे वाटले होते, नि खरे तर देण्याची इच्छा नव्हती. समझने वाले को इशारा काफ़ी, असे वाटले होते. परंतु आता नाइलाजाखातर देतोच!)
नास्तिक : परमेश्वर :: (३_१४ विक्षिप्त अदिती) : रेवती१९८०चा मेंदू
असे काहीसे त्रैराशिक आहे ते! (तुम्ही रेवती१९८०च्या मेंदूला मधुमेह होईल म्हटले होते, आठवते?)
३_१४ विक्षिप्त अदितीला कंसात अशाकरिता टाकले आहे, की, ३_१४ विक्षिप्त अदितीच्या जागी कोणीही असले (आणि ती व्यक्ती नास्तिक असली किंवा नसली), तरी फरक पडत नाही. बॉटमलाइन, जी गोष्ट (जसे: रेवती१९८०चा मेंदू) मुळात अस्तित्वातच नाही (जणू नास्तिकालेखी परमेश्वर!), तिला मधुमेह होईलच कसा?
(आता तरी समजले का?)
अगदी!
व्यक्तिस्वातंत्र्य अर्थातच आहे. अब्दुलने व्हीगन ते पोर्किटेरियन(+ व्हिस्कीटेरियनसुद्धा१) या ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये कोठेही असावयास प्रत्यवाय नाही. तसेच, ‘ति’नेसुद्धा केवळ मटणाहारीच नव्हे, तर बीफाहारी ते शाकाहारी + व्होडकापिपासू ते कोकमसरबतपिपासू या दोन्ही रेंजांमध्ये कोठेही बसावे; मला२ त्याबद्दल अडचण असण्याचे काहीच कारण नाही.
फार कशाला, खुद्द ‘ति’चा बाप हा खाटीक ते भटजी या स्पॅनमधील कोणताही व्यवसाय करीत असू शकतो. आणि, त्याने भटजीगिरी करताकरता पार्टटाइम खाटीकगिरी (किंवा, खाटीकगिरी करताकरता साइड इन्कम म्हणून थोडी भटजीगिरी)३ जरी केली, तरी ती त्याची वैयक्तिक निवड आहे; ते स्वातंत्र्य त्याला आहेच.
प्रश्न तो नाही.
मात्र, ‘मेरा अब्दुल’ जर शाकाहारी असला आणि ती जर मटणाहारीच नव्हे, तर हाताने मटण सोलणारी असली (आणि/किंवा तिचा बाप जर खाटीक असला), तर पुढील अडचणी उद्भवतात.
१. तिला मटणमार्केटमध्ये रोज जायचा सल्ला देण्याची गरज राहात नाही. (ती तशीही जात असू शकते.)
२. तिला ‘कोंबडी कशी कापावी’ या विषयावरचे व्हिडियो पाहण्याचा सल्ला देण्याची गरज राहात नाही. (ती तशीही सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट असू शकते. किंवा, नसलीच, तर तिचा पार्टटाइम-खाटीक-पार्टटाइम-भटजी बाप स्वतः तिला प्रात्यक्षिकांसह धडे देऊ शकतो; व्हिडियो कशाला पाहिजेत? हँड्स-ऑन एक्स्पीरियन्स इज़ द ओन्ली ट्रू एक्स्पीरियन्स.)
३. ती मटणबाजारात गेली (किंवा कोंबडी कापायला शिकली), तरी ते ‘मेरा अब्दुल’साठी असू शकणार नाही; (बहुधा) स्वान्तसुखाय असेल. (किंवा, दुसऱ्या कोणाकरिताही असू शकेल, परंतु ‘मेरा अब्दुल’करिता खचितच नव्हे!) (कदाचित भावी सासूसासऱ्यांकरिता वगैरे (म्हणजे, तेसुद्धा शाकाहारी किंवा व्हीगन नसले तर) कोंबडी ‘झटका’ऐवजी ‘हलाल’ पद्धतीने कशी कापावी, हे समजून घेण्यापुरता अशा धड्यांचा मर्यादित उपयोग होऊ शकेलही. आफ्टर ऑल, थेरडी मंडळी चिवट असतात, ‘आमच्याच पद्धतीं’वर अडून बसतात. सबब, त्यांच्यापुरती हलाल कोंबडी (नि आपल्यालासुद्धा; झटका-हलाल काय फरक पडतो? कुठे दोनदोन कोंबड्या कापत बसायच्या?) नि ‘मेरा अब्दुल’करिता वरणभातभेंडीचीभाजीनितूप.)
४. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे, (अ) मूळ लेखिकेचे नॅरेटिव बोंबलेल, (ब) तिचा अजेंडा गडगडत जाईल, आणि (क) तिच्या मर्यादित, संकुचित, झापडबंद अनुभवविश्वाला नि विश्वसंकल्पनेला तडा पडेल. त्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात काय?
सबब, ये हरगिज़ नहीं हो सकता!
——————————
१ बॅ. मुहंमद अली जीना नावाचे सद्गृहस्थ पोर्किटेरियन + व्हिस्किटेरियन दोन्ही होते. पुढे ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता तथा (पाकिस्तानचे) पहिले गव्हर्नर जनरल झाले.१अ
१अ उलटपक्षी, अवुल पकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम नावाचे सद्गृहस्थ हे व्हेजिटेरियन तथा टीटोटलर होते. पुढे ते अग्निबाणशास्त्रज्ञ, भारताचे राष्ट्रपती, नि आणखीही बरेच काहीकाही झाले.१अ१
१अ१ दुर्दैवाने, त्यांना ‘मेरा अब्दुल’ म्हणायला कोणीही मुलगी पुढे आली नाही. एकेकाचे नशीब, दुसरे काय!
२ मी स्वतः या दोन्ही रेंजांमध्ये सगळीकडे बसतो.
३ म्हणजे, लोक चरितार्थाकरिता रोज ९ ते ५ नोकरी करून बाजूला शनिवाररविवार उबर चालवतात किंवा एलआयसीच्या पॉलिश्या विकतात, तद्वत.
.
एवढे ऑब्सेशन?
बांधलेत ना मंदिर मनासारखे? आता तरी गप्प बसाल?