.

.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नुस्ता स्क्रोल करोन दमलो Sad
प्रतिक्रिया वाचून झाल्यावर देतो....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आणि तितकाच विस्तृत परिचय आवडला. "मौज प्रकाशन" ने जयंत नारळीकरांपासून विज्ञान विषयाशी निगडीत असणार्‍या कथानकाना आपल्या प्रकाशन प्रेफरन्सेसमध्ये स्थान दिल्याचा आनंद झाला होताच. श्री.अरुण हेबळेकर यांची अशा विषयावरील ही कादंबरी जरूर वाचेन इतपत आता म्हणतो.

बाकी श्री.चेतन सुभाष गुगळे यानी निरिक्षण केलेल्या...."तिथे कर्मचारी वर्ग फारसा टिकत नाही. लोक येतात, प्रशिक्षण घेतात आणि दुसरीकडे बदली मागून घेतात. कारण : भीती. ’आदित्य’ च्या एकंदर रचनेमुळे तिथे येणारा प्रत्येक माणूस बिचकतच येतो आणि जातो तो सुटकेचा नि:श्वास टाकून. ही भीती निर्माण व्हायला राजकारणी आणि वर्तमानपत्रवाले सारखेच जबाबदार आहेत. गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रत्येकच जण दरवेळी आदित्य च्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत असतो..." या वातावरणाशी मी सहमत आहे. हा अनुभव माझ्या काही परिचिताना उत्तर कन्नड जिल्ह्याच्या 'कैगा' गावी कार्यरत असलेल्या भारत सरकारच्या 'न्यूक्लीअर अ‍ॅटोमिक पॉवर स्टेशन' संदर्भात आला होता. तिथे प्रत्यक्ष काय काम सुरू आहे वा तिथे येणार्‍याजाणार्‍यावर इतकी सीक्रसी फिल्टर्स का लावली जातात याची नीट कल्पना नसलेली पण विविध कामाची टेन्डर्स मंजूर झालेली ठेकेदार मंडळी दबकून ये-जा करीत. 'न्यूक्लिअर', 'अ‍ॅटोमिक एनर्जी', 'हेवी वॉटर', 'स्ट्रीक्ट ड्रेस कोड' असे एरव्ही सर्वसामान्याना भयचकित करणारे (कारण भोपाळकांड) शब्द सतत कानावर पडत. कार्यालय तसेच कर्मचारी निवासस्थाने आणि तत्सम विविध बांधकामाच्या गरजेसाठी लागणारे सीमेन्ट, सळी, गर्डर्स आदी सप्लाय करण्याचे ठेके ज्या आठदहा कंपन्यांना मिळाले होते व त्यांच्याकडून ट्रक वाहतुक परवाने ज्याना मिळाले होते त्यापैकी तिघाचौघांशी माझे अगदी एकेरी पातळीवरील संबंध होते. त्यांच्याकडून पुसटसे समजत असे की, पुढे पुढे कित्येकांनी ते सप्लाय कॉन्ट्रॅक्ट पूर्णही केले नाही. कारण मिडियातील सुरक्षिततेविषयी येणार्‍या विकृत बातम्यांनी ही मंडळीही बिचकून गेली होती. बाहेरच्या कंत्राटदारांची ही कथा तर मग प्रत्यक्ष साईटवर काम करणार्‍या तंत्रज्ञच नव्हे तर बाबू लोकांचीही तीच मानसिकता झाली असल्यास त्याना तरी कसा दोष द्यायचा ?

कैग्याप्रमाणेच आदित्यचीदेखील हीच परिस्थिती असणार.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हो, नविन संस्थळावर नविन लेखापासून सुरुवात करायची तर तेच लेख, ब्लॉग, मिपा, जालरंग, आणि इथे टाकलेत.
तुमच्यासारख्या चतुरस्त्र माणसाकडून ही अशी शिळोप्याची अपे़क्षा नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

कादंबरीचा विषय वेगळा आहे. अशा तांत्रिक प्रश्नांवर बेतलेल्या, आणि तरीही मानवी संघर्ष दाखवणाऱ्या कादंबऱ्या कमी दिसतात. अशा कादंबऱ्यांतली पात्रं हाडामांसाची, खरीखुरी, जीवंत करण्यात लेखक यशस्वी झाला असेल तर ती वाचताना एक वेगळीच पार्श्वभूमी मिळते. मला एक आठवते ती म्हणजे अकरा कोटी गॅलन पाणी. कोळशाच्या खाणीतल्या दुर्घटनेवर आधारित होती ती.

कादंबरीच्या रसग्रहणापेक्षा हा सारांश अधिक वाटला. सगळी कथा, अगदी शेवटापर्यंत सांगू नये असा प्रघात आहे. शेवट सांगितला असल्यास लेखाच्या वर 'स्पॉइलर ऍलर्ट' द्यावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दम लागला स्क्रोल करूनच. पुस्तकच वाचेन.
वाचकाला पुस्तकवाचनाकडे नेण्याचा डाव या दीर्घ लेखनात आहे की काय अशी शंका चाटून गेलीच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकं संगणकावर वाचायची सवय नाही. पण वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(पूर्ण) सारांश दिल्याबद्दल, आता पुस्तक वाचायची गरज फारशी उरली नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कादंबरीत अशी काही अद्भुत ताकद आहे की तुम्ही ती एकदा संपूर्ण वाचलीत की तुम्हाला अजुन एकदा तरी संपुर्णत: वाचल्याशिवाय पुन्हा खाली ठेवावीशी वाटत नाही

चेतन मित्रा,
हे अगदी अगदी खरे आहे.
हेबळेकरांची आदित्य वाचताना हा थरार मीदेखील पूर्णपणे अनुभवला आहे.

'आदित्य' चे अतिशय सुरेख असे परिक्षण लिहिले आहेस तू.
तुझ्या परिक्षणामुळे 'आदित्य' पुन्हा वाचल्याचा अनुभव मिळाला
धन्यवाद मित्रा.

’आदित्य’चा गाभा. गाभ्यापासून बारा आरे निघतात
यात थोडी अवांतर भर - आदित्य हे नाव त्या अणुभट्टीला देण्यामागे कारण हे आहे की त्या अणुभट्टीचे भारा आरे. भारतीय परंपरेनुसार आदित्यांची संख्या ही १२ मानली गेली आहे, त्यामुळे आदित्य हे नाव Smile

आदित्य तुला जशी अतिप्रिय तशीच मला नारळीकरांची प्रेषित प्रिय आहे. वर्षातून १-२ पारायणे होतातच होतात Smile
आदित्य गेल्या वर्षीच वाचली असल्यामुळे आदित्यची आठवण अगदी ताजी आहे.
तू आदित्यचे परिक्षण खूप छान लिहिले आहेस.
अशाच अजून सुंदर पुस्तकांची ओळख तुझ्याकडून व्हावी ही मनापासूनची इच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0