सामान्याचे असामान्य कर्तृत्व: कॅथी हॅरिस

स्वत:च्या आयुष्यात असे काही तरी घडू शकेल याची कॅथी हॅरीस कल्पनाही करू शकली नसती. प्राप्त परिस्थिती व अन्यायाविरुद्धचा मनस्वी संताप व चीड यामुळेच बलाढ्य अमेरिकन प्रशासनाच्या विरोधात दोन हात करण्यास ती उद्युक्त झाली.

जॉर्जिया राज्यातील बोडोन येथील एका गरीब आफ्रिकन - अमेरिकन कुटुंबातली ही मुलगी. चांगले शिक्षण व मोठेपणी भरपूर प्रवास करण्याची स्वप्ने पाहणारी. सैन्यात भरती झाल्यास उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्ती होण्याची शक्यता होती. म्हणूनच सक्तीच्या सैन्यभरतीत तिने नाव नोंदविले. त्याच काळात तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. सैन्यातील सेवेचा कालावधी संपल्यानंतर ती नगरविकास व निवास या सरकारी खात्यात नोकरी करू लागली. तेथून महसूल खाते, व नंतर तिच्याच विनंतीवरून कस्टम्स खात्यात तिची बदली झाली. पहिल्या पहिल्यांदा ती सेक्रेटरी म्हणून काम करत असे व नंतर ती कस्टम्स इन्स्पेक्टर म्हणून टेक्सास विमानतळावर काम करू लागली.

परंतु तिच्या अपेक्षेप्रमाणे ही नोकरी नव्हती. टेक्सासच्या विमानतळावर प्रवाश्यांची झडती घेण्याच्या पद्धतीवरून ती अस्वस्थ होत असे. तिचे पुरुष सहकारी महिला प्रवाश्यांच्याकडे कुत्सित व लैंगिक नजरेने बघत असत. जमेल तेवढे व जमेल तेथे आपल्या पुरुषीपणाचे प्रदर्शन करत असत. एक सहकारी नेहमीच आफ्रिकन-अमेरिकन तरुणींची टिंगल टवाळी करत असे. तरुणींच्या स्तनाविषयी, त्यांच्या अंगरूपाविषयी यद्वा तद्वा बोलत असे. हा सगळा प्रकार तिला किळसवाणा वाटत होता. याविषयी वरिष्ठाकडे तक्रारही केली. परंतु वरिष्ठ अधिकारीसुद्धा पुरुषच असल्यामुळे तिच्या तक्रारीची साधी दखलही कुणी घेतली नाही. एवढेच नव्हे तर उलट तिलाच ते छळू लागले.

असे प्रसंग वारंवार येत असतानासुद्धा हॅरिस आपल्या मनाचे संतुलन ढळू नये म्हणून शिकस्त करत होती. सर्व काही सहन करत होती. इतर सहकार्‍याप्रमाणे आपण बरे व आपले काम बरे यावर भर देण्याचा प्रयत्न करत होती. आपण येथे नवीन आहोत; काही कमीजास्त झाल्यास फटकन नोकरी जाईल या भीतीमुळे ती मानसिक मुकामार सहन करत होती. घरी घटस्फोटित आई, व दोन भावंडं यांची तिच्यावर जवाबदारी होती. आपल्या सहकार्‍याविरुद्धची तक्रार फार महागात पडली. त्याचा तिला फार मोठा वाईट अनुभव आला. हे प्रकरण 8-10 महिने चालले. व शेवटी तिलाच सर्वजण उपदेशाचे डोज पाजू लागले. तिची वेगळ्या ठिकाणी बदली करू असे सुचविण्यात आले. परंतु त्या सहकार्‍याला कुठलीही शिक्षा झाली नाही. शेवटी वैतागून तिने बदली स्वीकारली. 'यानंतर मी कधीच लैंगिक छळवादाचे बळी होणार नाही,' असा निर्धार करूनच ती तेथून वाहेर पडली.
असेच 2-4 ठिकाणी बदली होत होत अट्लांटा या अत्यंत गजबजलेल्या विमातळावरील कामावर रुजु झाली. या मधल्या काळात तिला पदोन्नती मिळाली होती. त्या पदोन्नतीचा वापर पुरुषी पाशवी वृत्तीला वेसण घालण्यासाठी वापरावे अशी तिची प्रबळ इच्छा होती.
अट्लांटा विमानतळावर रोज हजारो प्रवाश्यांची कसून तपासणी करावी लागत असे. मादक व इतर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी हा विमानतळ कुप्रसिद्घ होता. कस्टम इन्स्पेक्टर्स जास्त सतर्क असत. अमेरिकेतील याविषयीच्या कडक कायदे-नियमामुळे कस्टम इन्स्पेक्टर्सच्या हाती अनिर्बंध सत्ता एकवटली होती. कॅथी हॅरिसला येथेही अत्यंत कटू अनुभव येऊ लागले. बहुतेक सहकारी सत्तेचा दुरुपयोग करत होते. आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत मनमानी करत होते. या इन्स्पेक्टर्सच्या लैंगिक वर्तनाचे शिकार बहुतेक वेळा आफ्रिकन -अमेरिकन तरुणी असत. कृष्णवर्णीय तरुणांचा शारीरिक छळ करण्यात त्यांना असुरी आनंद मिळत असे. विनाकारण कपडे उतरवण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, क्षुल्लक कारणावरून तुरुंगात रवानगी करणे, तपासणीच्या निमित्ताने ताटकळत ठेवणे, इत्यादी प्रकाराने त्रास देत स्वत:तील सॅडिस्टिक वृत्तीचे जाहीरपणे प्रदर्शन करत असत. थोडा जरी संशय आला तरी पुढील वैद्यकीय तपासणीसाठी बळजबरीने विरेचक (laxatives) प्यायला लावणार्‍या हॉस्पिटलला पाठवून देत असत. ऑफिसच्या नियमित वेळांपेक्षा जास्त वेळ काम करून ओव्हरटाइम भत्ता उकळणारे हे इन्स्पेक्टर्स आपण किती महत्वाचे काम करत आहोत याची प्रौढी मिरवत असत.

आफ्रिकन -अमेरिकन गर्भवती तरुणींना यामुळे होत असलेला मानसिक छळ, शारीरिक हिंसा तिच्याकडून बघितले जात नव्हते. अशा उघड उघड अन्यायाविरूद्ध प्रतिकार करायलाच हवे, या निर्धाराने प्रेरित होऊन तिने स्वत:च्या नोकरीची, पदाची, स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता या छळवादाच्या विरोधात अत्युच्च वरिष्ठाकडे निषेध नोंदवला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट तिलाच नोकरीतून कमी करण्याची भाषा बोलू लागले. धमकी देऊ लागले.

कायदे व आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून व वर्णभेद, वंशभेद न करता विमान प्रवाश्यांची तपासणी करण्यात यावी एवढीच तिची माफक अपेक्षा होती. परंतु मग्रूर व माजलेले इन्स्पेक्टर्स नियमांच्या कक्षेबाहेर जावून प्रवाश्यांना कचाट्यात पकडून अनन्वित छळ करत होते. त्याना थांबवणे अशक्य झाले होते. प्रवाश्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी कुठलीही सोय नव्हती. निमूटपणे छळ भोगल्याशिवाय तक्रार करण्यास मुभा नव्हती. मनमानी करणे, सतावणे, अश्लील भाषा वापरणे इत्यादींची चटक लागलेले इतर सहकारी तिलाच छळू लागले. तिच्यावर पाळत ठेऊन तिच्या प्रत्येक हालचालीची नोंद ठेऊ लागले. तिच्या विरोधात पुरावे गोळा करू लागले.

अशा प्रकारे अनेक दिवस मानसिक कुचंबणा सहन केल्यानंतर एके दिवशी "आता बस् , यानंतर शक्य नाही" अशी तिची अवस्था झाली. कृष्णवर्णीय प्रवासी, कृष्णवर्णीय अधिकारी व विशेषकरून महिला यांच्यावर होत असलेल्या छळवादाविरुद्ध सार्वजनिकरित्या आवाज उठवल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी तिच्या मनाची खात्री झाली. तक्रारींचे खातेनिहाय निवारण व वेळकाढूपणा यांना कंटाळून whistleblower protection status या शासकीय विशेष समितीकडे तिने तक्रार नोंदवण्याचा निर्धार केला. परंतु या समितीतील कर्मचार्‍यांनी अशा प्रकारच्या तक्रारी समिती नोंदवून घेऊ शकत नाही म्हणून तिची बोळवण केली. त्याचप्रकारे न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे तिचे प्रयत्नही असफल ठरले. शेवटचा उपाय म्हणून प्रसार माध्यमांच्या पर्यंत गार्‍हाणे पोचवणे हा एकमेव मार्ग तिला दिसत होता.

कॅथी हॅरिसने यासाठी Customs Employees Against Discrimination Association (CEADA) या नावाची स्वयंसेवी संघटना स्थापून समविचारी लोकांना संघटित करू लागली. कृष्णवर्णीयांना सहानुभूती दाखवणार्‍या व मदत करणार्‍या News People Publishers Association ची मदत घेऊन पुढची कारवाई ठरवू लागली. मुळात यासाठी एखाद्या नावाजलेल्या अनुभवी अटॉर्नीला गाठणे आवश्यक होते. प्रसार माध्यमांच्या संपर्कात असलेल्या एका अटॉर्नीने पुरावे म्हणून यासंबंधातील गेल्या सहा महिन्यातील सरकारी पत्रव्यवहारांच्या प्रती गोळा करण्याचा सल्ला दिला. कॅथीने कागदपत्रांच्या प्रती गोळा करून अटॉर्नीला दिले. या अटॉर्नीने तिला न विचारताच सर्व प्रसार माध्यमांना, वृत्तपत्राना त्या प्रती वाटून टाकल्या. ती एक सणसणाटीची बातमी झाली. आफ्रिकन - अमेरिकन स्त्रिंयावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटली. अट्लांटाच्या टीव्हीवर पुढील सहा आठवडे चर्चा, मुलाखती दाखवण्यात आल्या. कस्टम्स ऑफिसला हा एक जबरदस्त हादरा होता. परंतु शासकीय कागदपत्रांचा गौप्यस्फोट केल्याबद्दल हॅरिसवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिला नोकरीवरून काढून टाकले. एकटी हॅरिस बलाढ्य प्रशासनाशी झुंजत होती. तिने whistleblowersना पाठिंबा देणार्‍या Government Accountability Project (GAP) या शासकीय विभागाशी संपर्क साधला. GAPने नेमलेल्या अटॉर्नीने हॅरिस कुठल्या परिस्थितीत पत्रव्यवहारांचा गौप्यस्फोट केला आहे याची साद्यंत माहिती देत कस्टम्स कशाप्रकारे अन्याय करत आहे हे न्यायालयाला पटवून दिले. न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली व तिला पुन्हा नोकरीवर घ्यावे अशी शासनाला आज्ञा दिली. हॅरिस 18 महिने विनावेतन लढत होती. घरात आर्थिक ओढाताण होती. शेवटी राहते घर विकून दिवाळखोरी जाहीर करावी असे तिना ठरवले. परंतु अट्लांटा येथील समविचारी संघटना एकत्र येवून तिला दिवाळखोरीतून वाचवले.

कस्टम्स खात्याला ही बाई पुन्हा एकदा नोकरीवर व त्याच पदावर येईल याची किंचितही आशा नव्हती. तिला सहानुभूती दाखवणारे सर्व सहकारी आश्चर्यचकित झाले. तिच्या या लढ्याच्या परिणामामुळे कस्टम्स खात्याला आपल्या ध्येय-धोरणात आमुलाग्र बदल करावे लागले. हॅरिसच्या धडाडीचा बोध घेवून स्थानिक सेनेटरने कस्टम्स कायद्यात सूक्त बदल करण्यास प्रशासनाला भाग पाडले. प्रवासीसुद्धा या देशाचे सन्माननीय नागरिक असून मूलभूत हक्कापासून त्यांना वंचित ठेवता येत नाही याची जाणीव होऊन लिंगभेद, वंशभेद इत्यादींना आळा घालण्यास कॅथी हॅरिसच्या प्रतिकाराचा फार मोठा उपयोग झाला. आफ्रिकन - अमेरिकन तरुण-तरुणींची त्यांना उघडपणे मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीतून सुटका झाली.
हॅरिसच्या या यशामागे तिची अन्यायाबद्दलची चीड व संताप, तिच्यातील असामान्य धैर्य, याबरोबरच संघटितपणे काम करण्याची तिची हतोटी, मोठ्या प्रमाणात असलेले तिचे नेटवर्क, व अशा प्रसंगासाठीचे अमेरिकन कायदे यांचा फार उपयोग झाला. अनेकांना आपण काम करत असलेल्या खात्याविरुद्ध बेईमानी करणे रुचत नाही, म्हणून त्या खात्याकडून वा त्या खात्यातील इतरांकडून होत असलेल्या अन्यायाकडे जाणून बुजून डोळेझाक केले जात असते. परंतु त्यांच्या या तटस्थ वृत्तीमुळे खात्याचेच नव्हे तर सर्वांचेच नुकसान होत असते, बदनामी होत राहते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु कॅथी हॅरिससारखे एखादे - दुसरेच व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचे धैर्य दाखवू शकतात, टक्कर देवू शकतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3.875
Your rating: None Average: 3.9 (8 votes)

प्रतिक्रिया

चार तारका दिल्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उत्तम माहिती.
अशा कितीतरी ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या धडाडीमुळे स्त्रियांच्या, कृष्णवर्णियांच्या व एकुणच दबलेल्या गटांच्या चळवळीला बळ मिळत गेले आहे.

माहितीबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१ असेच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

New systems have new types of hazards. What is missing is the candidness to accept this.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माहितीबद्दल धन्यवाद.

कुठल्या दशकातल्या या घटना आहेत ते लेखात नमूद केले तर बरे होईल. विचारण्याचे कारण असे की मिनिसोटा राज्यात खाणकामगारांत होणार्‍या लैंगिक छळावर आधारित 'नॉर्थ कंट्री' (२००५) हा सत्यघटनांवर आधारित चित्रपट आहे. त्या घटना ८०च्या दशकात घडल्या व संबंधित न्यायालयीन निकाल ९०च्या दशकात आले. त्याच्या अनुषंगाने कॅथीसंबंधित निकाल कधी आले हे पाहणे कुतुहलाचे आहे.

'कॅथी हॅरिस'वर विकिपेडियात काहीच नाही हे पाहून आश्चर्य वाटले. (मात्र 'कॅथरीन हॅरीस' सापडली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकीपिडियात माहिती नसेल. परंतु येथे थोडिशी माहिती मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0