Skip to main content

मराठी सिरिअलच्या प्रेक्षकांना विनंती....

मी अनेक वर्षापासुन मराठी सिरिअल्स बघत नाही...पण काल एका चॅनलवर काही मिनिटे थांबलेलो असताना "होणार सुन मी या घरची" नावाची एक सिरिअल बघितली (मोजुन ५ मिनिटे) आणि मराठी सिरिअल्सच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर घसरलेल्या निर्मितीमुल्यांची अक्षरश: कीव आली....मुख्यत्वेकरुन मनोरंजन हा भाग सिरिअल्सच्या किंवा मालिकांच्या निर्मितीमागे असतो. काहीवेळा मनोरंजनाबरोबर प्रबोधन, विनोद, समाजातील तत्कालीन घटनांचे अवलोकन करुन मांडलेले वास्तववादी चित्रण हे देखील अनेक मालिकांमधुन (पुर्वी) पहायला मिळत असे. कालची सिरिअल म्हणजे, पाचेक मिनिटातच मला अक्षरश: वीट आला अशी होती....
१) सामान्य प्रेक्षकांना सहजासहजी पचनी पड्णार नाहीत असे साहित्यातील जडबंबाळ शब्द ( जे आपण बोलताना किंवा बोलीभाषेत चुकुनही वापरत नाही) वाक्या वाक्यात पेरलेले होते. अशा शब्दांची वाक्ये बनवुन उद्या आपण बोलायला लागलो तर लोकं वेड्यात काढतील...अभ्युदय, अभिव्यक्ती, अप्रत्यक्षपणे वगैरे वगैरे...आणि या शब्दांच्या प्रचंड जडबंबाळ गुंतागुंतीतुन कथालेखकाला आवडेल असे तत्वज्ञान लोकांच्या माथी मारण्याचे उद्योग असह्य आहेत. जुन्या सिरिअल्समध्ये शब्दांचा वापर आणि वावर हा बराच सुसह्य होता. हमलोग, बुनियाद या हिंदीतल्या मालिका, मराठीतील चिमणराव गुंड्याभाऊ, किंवा अगदी आत्ताअत्ता आलेली अग्निहोत्र, झोका (श्रीरंग गोडबोले यांची) किंवा श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकांमध्येही उत्तम संवाद होते आणि त्या संवादात एक सहजता होती, कोणताही भाषीक-शाब्दिक अभिनिवेश नव्हता...
२) अभिनयाच्या बाबतीत काल मी बघितलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान ही इतकी प्रचंड ओव्हर-ऍक्टींग करत होती की मी थक्क झालो. बोलण्यातला सहजसाधेपणा दाखवायलाही तिला अभिनय करावा लागत होता ( याच चुका पुर्वी निशिगंधा वाडने केल्या आहेत)...सोनाली कुलकर्णीही कधीकधी "मी अगदी तुमच्या आमच्यासारखं बोलतेय" हे दाखवायला असं कृत्रिम सरळसोप्पं बोलते..तो अभिनय आहे हे समजतं...कुठेतरी आपण Girl next door आहोत हे इतरांना आवडलंय, लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलंय, आपण खरोखरच एक अतीआदर्शवादी सुन आहोत हे महाराष्ट्रातल्या तमाम सासवांना पटलंय असा गोड गैरसमज तिने करुन घेतलेला आहे...असो. असा वास्तववादी (loud) अभिनय आजच्या लोकांना आवडतो आहे हे त्या सिरिअलच्या वाढत्या टीआरपीवरुन दिसतंय यावरुनच महाराष्ट्रातील तमाम मराठी मालिका प्रेक्षकांच्या अभिरुचीवर आता अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत...असं माझं स्पष्ट मत आहे.
३) कथानके देखील व्यवहारात "अशक्य" वाटणारी, वारंवार "असं कसं घडु शकतं बरं?" असे प्रश्न निर्माण करणारी आहेत. कोणाची स्मृती जाते काय? कोण नात्यातल्याच बहिणभावंडांवर कुरघोडी करण्यासाठी सतत कसलेतरी भंकस प्लॅन करतो काय? नणंदा भावजयांवर आणि भावजया नणंदांवर काय काय कृष्णकृत्ये करत असतात? भरजरी साड्या घालुन, दुष्टाव्याचा फील आणण्यासाठी उभ्या टिळ्यापासुन काळ्या कुंकवापर्यंत काहीतरी भडक मेकप करुन दुष्टाव्याने बोलायचं काय?....सगळंच असह्य...नुसत्या अभिनयातुन आणि बोलण्यातुन दुष्टावा दाखवणाऱ्या दया डोंगरे, पदमा चव्हाण,ललिता पवारांना असले भडक मेकप कधीच करावे लागले नव्हते...ही सगळी एकता कपुरछाप हिंदी हिणकस मालिकांमधुन घेतलेली कथानके, मेकपचे तंत्र हे आपण मराठी दिगदर्शक निर्माते कधी झुगारुन देणार आहोत?
४) निर्माते आणि दिग्दर्शकांचंही फार चुकतंय असं नाही. बरेच प्रमाणात आपल्या प्रेक्षकांचाही दोष आहेच हे मुद्दाम नमुद करावेसे वाटते. वाट्टेल ती कथानके, हिणकस अभिनय, भडक संवाद यांना आपण प्रेक्षकच डोक्यावर घेतात, रोज नित्यनेमाने ती सिरिअल बघतात...म्हणुन त्याचा टीआरपी वाढतो आणि दिवसेंदिवस अशाच छापाच्या रद्दड मालिका आपल्या माथी मारल्या जातात. कुठेतरी सातत्याने प्रेक्षकांनी आपला विरोध हा अनेक माध्यमांतुन निर्माता दिग्दर्शकापर्यंत पोहोचवायला हवा, मालिकांवर बहिष्कार टाकायला हवा असं माझं प्रांजळ मत आहे. तरच त्यांचे डोळे उघडतील आणि चांगल्या दर्जेदार कथानकांवर आधारित, भक्कम बांधणीच्या, उत्तम अभिनय असलेल्या मालिका आपल्याला पहायला मिळतील. for a change म्हणुन एकाही दिग्दर्शकाच्या मनात जुन्या कथानकांवर आधारित (चिमणराव गुंड्याभाऊ सारख्या) नवीन मालिका बनवुन ते कथानक पुनरुज्जीवित करावं असं येत नाही याचं आश्चर्य वाटतं...
....मराठी व हिंदी मालिकांच्या प्रेक्षकांनो स्वत:ची अभिरुची बदला, चांगलं वाचा, चांगलं लिहा, चांगलं पहा....ही सवय लावुन घ्या....जुने अभिरुचीसंपन्न विनोद वाचत जा, जुन्या कथाकादंबऱ्या वाचा, नव्या लेखक-कवींनीही खुप नवीन सृजनात्मक लिहिलं आहे ते वाचत जा...पण या सांसारिक कटकटी, हेवेदावे यापलिकडचं विश्व नसलेल्या मालिका बघणं बंद करा
(आधारित)
साभार-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

मन Mon, 21/07/2014 - 12:45

नका हो इतका त्रास करुन घेउ.
रस्त्यावरून जाताना कुणी कर्कश्श हॉर्न वाजवत शेजारुन गेला तर काय करता येतं?
काहिच नाही. वा-झवू द्यायचं ;)

बॅटमॅन Mon, 21/07/2014 - 15:57

In reply to by मन

जालीय अस्तित्व प्यारे असल्याच्या कारणावरून दरवेळेस लाजणार्‍या मनोबाकडून अशी अ-वा'झ'वी कमेंट येणं रोचक वाटलं. ;)

मेघना भुस्कुटे Mon, 21/07/2014 - 16:11

In reply to by बॅटमॅन

बाकी लघुरूपांचे विस्तार करताना लाजून चूर होणार्‍या बॅट्याकडून मनोबाला अशी प्रतिक्रिया मिळणं, हेही एक रोचकच. असो! ;-)

बॅटमॅन Mon, 21/07/2014 - 16:22

In reply to by मेघना भुस्कुटे

कोणते लघुरूप ओ? केयलपीडी? खास लम्हे पे धोका हा त्याचा लाँगफॉर्म सांगितलाच आहे की ओ 'पुरा कल्पे'! मग क्व लज्जा क्व च दृष्टिपातः ;)

मेघना भुस्कुटे Mon, 21/07/2014 - 16:23

In reply to by बॅटमॅन

किती वेळा तुझ्या मिनत्या केल्या, शेवटी मुसु मदतीला धावून आले, तेव्हा कुठे विस्तारित रूप मिळालं! लाजलो, तर लाजलो म्हणावं. लाजायचं काय त्यात?! ;-)

मन Mon, 21/07/2014 - 16:25

In reply to by मेघना भुस्कुटे

आणि जे मिळालं तेही सॅनिटाइझ्ड रुपडं मिळालं म्हणतात.
नेमका, खराखुरा लाँगफॉर्म सांगायला बॅट्या अजूनही कां कू करतोय.

बॅटमॅन Mon, 21/07/2014 - 16:31

In reply to by मेघना भुस्कुटे

नाही, हे अर्धसत्य आहे. मुसुंनी हा लॉङ्गफॉर्म सुचवायच्या अगोदर एक फर्स्ट कट प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आम्ही दिलेलंच होतं- 'केवल लालसा पे धोका' म्हणून. नीट होमवर्क करा बघू अगोदर!

बॅटमॅन Mon, 21/07/2014 - 17:04

In reply to by मेघना भुस्कुटे

लाजणं हे महत्त्वाचं नै, तर लाजूनही शेवटी उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे. ;) तस्मात लाजणे हे प्यारामीटर इथे इनसिग्निफिकंट आहे.

नगरीनिरंजन Mon, 21/07/2014 - 19:24

In reply to by बॅटमॅन

=))
मुळात त्यात वर्णन केलेल्या घटनेचे मूळ कारण लाँगफॉर्मच असल्याने कचरणे स्वाभाविक आहे. ;)

बॅटमॅन Mon, 21/07/2014 - 19:28

In reply to by नगरीनिरंजन

मूळ कारण लाँगफॉर्मच

च्यायला =)) =)) =))

'(पीक)ग्रोथ नंतर डिक्लाईन येतोच' हे स्पष्ट करण्यासाठीचे हे आदर्श उदा. मानता यावे, नै ;)

नितिन थत्ते Mon, 21/07/2014 - 18:30

In reply to by मेघना भुस्कुटे

केयलपीडी? खास लम्हे पे धोका हा त्याचा लाँगफॉर्म ....

हा केयलपीडीचा लाँगफॉर्म? तेजायला हाष्टेल संस्कृती पार रसातळाला गेलेली दिसते १४ वर्षांत. :(

अवांतरः आमच्याकाळी हा शब्द केएलडी इतकाच होता.

बॅटमॅन Mon, 21/07/2014 - 19:10

In reply to by नितिन थत्ते

तेजायला हाष्टेल संस्कृती पार रसातळाला गेलेली दिसते १४ वर्षांत.

थत्तेचाचा, यू, टू?????? =)) =)) =)) अहो समझा करो सरजी ;)

बाकी के एल डी मध्ये पी घुसल्याचे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

आडकित्ता Mon, 21/07/2014 - 20:52

In reply to by बॅटमॅन

खादीच्या लेंग्यावर (पिवळा) धब्बा असं आहे नं ते?
पूर्वी नुस्ता धब्बा म्हणायचे. मग कुणीतरी पिवळा म्हणून पी घात्ला असावा मधेच.
पण यात फुलांना वास यायचा काय संबंध ते लक्षात आले नाही..
:निरागस भावला:

बॅटमॅन Mon, 21/07/2014 - 22:37

In reply to by आडकित्ता

ळॉळ =)) फारस बॉ निरागस तुम्ही ;) फुलांच्या वासाचा संदर्भ इतकाच, की सगळं बदललं तरी काही गोष्टी आहे तशाच राहतात हे सांगायचं होतं.

(इथे वैट्ट वैट्ट कोटीचा मोह आवरल्या गेला आहे.)

अन 'धब्बा' काय आहे? मराठीची अशी कत्तल पाहून एक ऐसीकर म्हणून शरम वगैरे वगैरे वाटल्या गेली आहे.

आडकित्ता Tue, 22/07/2014 - 00:22

In reply to by बॅटमॅन

नुकत्याच हाती आलेल्या रिसर्च रिझल्ट्सवरून
काळ्या लेंग्यावर पांढरा/पिवळा डाग
असं असल्याचं ध्यानात आलं.
होते चुक माणसाची. इतकं लोळून हसायला काय झालं त्यासाठी @ ब्याटम्यान.

अजो१२३ Tue, 22/07/2014 - 11:57

In reply to by आडकित्ता

काळ्या लेंग्यावर पांढरा/पिवळा डाग

हाच लाँगफॉर्म मानला तर मोनिकाबाईंनी क्लिंटनबाबांचा सर्वात मोठा केएलपीडी केला म्हणायचा!!!

अजो१२३ Mon, 21/07/2014 - 22:52

In reply to by बॅटमॅन

आमच्या काळी (९८ बॅच, बॅच यासाठी सांगायची कि 'आमच्या काळी' म्हटले कि आयघाले लोक जोशीआजोबा वैगेरे म्हणून KLPD करतात.) KKLLPPD हीही एक संज्ञा होती. तिच्यात प्रचंड बारुद भरलेला आहे.

अतिशहाणा Mon, 21/07/2014 - 17:08

In reply to by बॅटमॅन

'माझ्या सुखाचा मला हेवा' हे आगामी मालिकेचे शीर्षक आहे. तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बोलणारी नायिका आणि इसबगोलची आता ताबडतोब गरज असल्यासारखा चेहरा करुन बोलणारा नायक.

अस्वल Mon, 21/07/2014 - 22:55

In reply to by ॲमी

सध्या आम्हीही चेंब्याला हेच धोरण पाळतो. टीवीच नसल्यामु़ळे एका रिमोटच्या एका बटणाद्वारे आपल्या डोक्यावर आघात करणार्या मालिकास्त्रांचा धोका खूपच कमी झाला आहे.
मालिकास्त्रांप्रमाणेच सदा सर्वदा नाचकाम दाखवणारी नाचास्त्रं, ठो ठो आवाज करून हसवायला भाग पाडणारी हास्यास्त्रं ह्यांचीही काळजी करायची गरज उरली नाही.
त्यातून कधी एखादी मालिका बघायची हुक्की आलीच तर "होणार सून.." चा एखादा भाग यूट्यूबवर लावतो- आणि लसीसारखा वापरतो.

आदूबाळ Mon, 21/07/2014 - 15:54

होसुमीयाघ मालिकेचा मुद्दाच कालबाह्य झाला आहे. ती बया आता त्या घरची सून होऊनही जमाना झाला. कशाला रटवतायत ही मालिका?

असो. मनोबांचा मुद्दा पटतोय. मनोरंजन म्हणून मालिका बघा.

सविता Mon, 21/07/2014 - 18:02

मला वाटतं रहाटगाडग्यात अडकून बहुसंख्य लोकांची डोकी बथ्थड होऊन जातात तेव्हा लोकांना अशी लाउड करमणूक बरी वाटत असेल.
(दिवसभर मरमर काम करणार्‍या मजूरांना कशी नारंगी/मोसंबी, देशी दारू ची क्वार्टर वाटते तशी)

"फॅन्ड्री" पाहून झाल्यावर परिचयातील एका सिनिअर सिटिझनला हे एवढं दोन तासाचं पिक्चर नक्की कशासाठी बनवलं वगैरे प्रश्न पडले शिवाय शेवटच्या डुक्कर पाठलागात हागणदारी मध्ये जब्याची बहिण एकाला "महत्वाचे काम" करताना रंगेहाथ पाहते हा सीन मुरकुंडी वळून हसण्याइतका विनोदी वाटला, रादर मला शंका आहे की ती एकच गोष्ट आख्या पिक्चर मध्ये त्यांच्या लक्षात राहिली.

आता या थराला संवेदनशीलता पोचलेल्या लोकांना दुसरं काय आवडेल म्हणता?

अशा लोकांना हल्ली नावे ठेवण्याच्याऐवजी मी प्रार्थना करते देवा मला इतके अडकवू नकोस की माझे डोके काही काळाने इतके बथ्थड होऊन जाईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/07/2014 - 19:56

मराठी सिरिअलच्या प्रेक्षकांना विनंती....

काय हव्या तेवढ्या मराठी, हिंदी मालिका पहा आणि मनसोक्त स्वपीडन करून घ्या, आपल्या सोबत स्वखुशीने सामील होणाऱ्या लोकांना त्यात सहभागी करून घ्या आणि त्या स्वपीडनाचा मनमुराद आनंद लुटा. पण त्या लागणीचा उपद्रव कृपया मराठी मालिका न पाहणाऱ्या लोकांना देऊ नका. असा उपद्रव लोकांना देणं, रोगाचा प्रादुर्भाव करणं दुष्ट, अमानवी आणि अनैसर्गिक आहे. मराठी बोलणारे, घरात टीव्ही, यूट्यूबची उपलब्धता असणारे परंतु मालिका न पाहणारे, बरेच लोक जगात आहेत. त्यांच्या डोक्यांची गाझापट्टी करू नका.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/07/2014 - 19:56

मराठी सिरिअलच्या प्रेक्षकांना विनंती....

काय हव्या तेवढ्या मराठी, हिंदी मालिका पहा आणि मनसोक्त स्वपीडन करून घ्या, आपल्या सोबत स्वखुशीने सामील होणाऱ्या लोकांना त्यात सहभागी करून घ्या आणि त्या स्वपीडनाचा मनमुराद आनंद लुटा. पण त्या लागणीचा उपद्रव कृपया मराठी मालिका न पाहणाऱ्या लोकांना देऊ नका. असा उपद्रव लोकांना देणं, रोगाचा प्रादुर्भाव करणं दुष्ट, अमानवी आणि अनैसर्गिक आहे. मराठी बोलणारे, घरात टीव्ही, यूट्यूबची उपलब्धता असणारे परंतु मालिका न पाहणारे, बरेच लोक जगात आहेत. त्यांच्या डोक्यांची गाझापट्टी करू नका.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/07/2014 - 23:25

In reply to by अजो१२३

अक्षरांचा आकार वाढवायला हा खालचा कोड रोमन लिपीत लिहा. आणि गोल कंसांच्या जागी त्रिकोणी कंस वापरा.

(फॉंट साईझ ="५")मराठी मालिका बघणं थांबवा.(/फॉंट)

मराठी मालिका बघणं थांबवा.

मी Mon, 21/07/2014 - 20:00

हल्ली बरेचसे लोक दोन वेळा प्रतिसाद देताना दिसतात, घरी-दारी हे लोक प्रत्येक गोष्ट दोनदा बोलत असतील काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/07/2014 - 20:27

In reply to by मी

सेवादात्याशी 'फोन-अ-फ्रेंड' सुरू आहे; तिथेही डोक्याची गाझापट्टीच सुरू आहे. पण ही अडचण लवकरच दूर होईल अशी अपेक्षा आहे.

राजेश घासकडवी Tue, 22/07/2014 - 00:07

पूर्वी कुठेतरी एक लघुत्तम विनोद वाचला होता
'लग्नेच्छु तरुणांना सल्ला - नका करू' (अॅडव्हाइस टू मॅरिजेबल यंग मेन - डोंट.) त्याची आठवण आली.

मंदार कात्रे Tue, 22/07/2014 - 05:31

माननीय रा.रा. श्री उर्फ़ श्रीरंग गोखले .... आपल्या पत्नी सौ. जान्हवी यांची स्मृती गेल्याचे गेल्या महिन्यात समजले.... तुमच्या अथक प्रयत्नांना अजूनही यश येत नाही म्हणून काही सूचना वजा उपाय सुचवित आहे.

मुळातच सौ. जान्हवी यांची स्मृति स्पेशल टाईप ने गेली आहे .... म्हणजे त्यांना बरोबर घरचे सगळे आठवते फ़क्त लग्न आठवत नाही. तुम्ही स्वतः कधी त्यांना भेटत होतात... ते आठवत नाही.... त्यांच्या Bank मध्ये तुमचे अकाउंट होते.... तुम्ही त्यांचे प्रीमियम client होतात, असले काहीही आठवत नाही... हे विशेष. असो उपाय सांगतो.....

१. तुमच्या घरी एवढ्या बायका आहेत, त्यांच्या हौसेकरीता किमान तुमच्या लग्नाचे विडियो शूटिंग केले असेल, गेला बाजार किमान फोटो तरी काढले असतिल तर एक नेहमी प्रमाणे सोहळा आयोजित करून त्या जान्हवीला ते फोटो नाहीतर लग्नाची सीडी दाखवा.

२. परत एक एक्सीडेंट चे नाटक करा, गाडी खरी वापरा....

काहीही करा पण तुमच्या बायकोची स्मृति परत आणा.
...म्हणजे आम्ही एकदाचे मोकळे होउ.

ऐन वेळी महत्वाची Match चालू असताना, तुमच्या या रडारडी चा कार्यक्रमासाठी बायको रिमोट काढून घेउन Channel बदलते .... यातील आमचे दुःख शब्दातीत असते.

सोडवा एकदा ... दया करा.

आपला
एक त्रस्त नवरा....

साभार - व्हाटसअ‍ॅप

सविता Tue, 22/07/2014 - 10:39

In reply to by मंदार कात्रे

हा मेसेज आमच्याच एका मित्रवर्याने कंटाळून टायपला होता. त्यावर माझे उत्तर असे होते

"एकच न्युज पाच पाच च्यॆनेल वर पाहणे, अर्नब गोस्वामी, वागळे इत्यादी लोकांचे हातवारे करत भांडणे तासन्तास पाहणे इत्यादी प्रकार तू करतोस तेव्हा बायकोला किती त्रास होत असेल याचा काही विचार केलास का?"

अजो१२३ Tue, 22/07/2014 - 11:47

In reply to by सविता

अगदी अगदी. बायकांनी आपलं विडंबनकौशल्य वाढवलं पाहिजे. सामाजिक माध्यमांत सध्याला पुरुषांसाठीचा मसाला असह्य अतिरेकी प्रमाणात आहे. बायकोच्या मेसेजेस मधे इतकं काही रोचक येत नाही. ( येत असेलही, सालं ९०% अज्ञात भाषेत असतं.)

माझी बायको 'प्यार का दर्द मिठा मिठा, प्यारा प्यारा' नावाची सिरियल गेल्या ३-४ वर्षांपासून १० ते १०.३० ला पाहते. आरंभी मी ती टिपिकल पुरुषी रिअ‍ॅक्शन द्यायचो. तिच्या हातून मूलगा रिमोट घेऊ शकायचा नाही तर माझी काय गत? हळूहळू आलिया भोगासी म्हणून ते विडंबन म्हणून पाहू लागलो नि मधे मधे टवाळ कमेंट देऊ लागलो. पण नंतर मला याचं वैषम्य वाटू लागलं. 'भिन्न रुचि'ला 'खालच्या दर्जाची रुचि' मानणं हे 'बुद्धिहिनतेचं' लक्षण आहे. त्या सिरियलमधल्या ज्या गोष्टींचा मला संताप येत असे त्या बायको कशी एंजॉय करू शकते असा जन्विन प्रश्न मला नेहमी पडे. त्याचे उत्तर मुलामुळे कळाले. तो त्याचे चॅनेल पाहताना मी त्याच्यासोबत एंजॉय करतो. त्याच्याकडून रिमोट मी कधीच घेत नाही. असे का? तर त्याच्या भिन्न रुचीचा मला आदर आहे. मग हळूहळू मी देखिल बायकोसोबत शांतपणे ती सिरियल पाहायला शिकलो. अजूनही मला तिच्यात रुची आली नाही, पण येण्यास मी ओपन आहे नि संताप वैगेरे येत नाही.

वरच्या लेखात लेखकाने नायकाने कसे बोलावे, नायिकेने कसे नटावे, खलनायक कसा उभा करावा, इ इ बद्दलची त्याची रुचि सांगतली आहे. ती रुचि योग्य आहेच. पण इतर रुचि हिन आहेत असे का म्हणावे? एखाद्या ललिताचा आशय आपणांस ज्या पद्धतीने ग्रहण करायचा आहे त्या पद्धतीने तो इतरांनी केला नाही ही विचित्र तक्रार आहे. मला माझ्या सिगारेटचा ब्रँड आवडतो इथपर्यंत ठिक आहे, पण अन्य ब्रँड्सबद्दल घालून पाडून का बोलावे? आज लोकरुचिचा जमाना आहे. लोकरुचि ही जास्तीत जास्त माध्यमांत रिफ्लेक्ट होणारच. याचा अर्थ उच्चाभिरुचिला तिलांजली द्यावी वा दिली आहे असा होत नाही. आजही राज्यसभा टीवीचा दर्जा एकदम अव्वल उच्चाभिरुचिचा आहे. त्याच्यावरचे काही प्रोग्राम पाहताना हे पाहायची, कळायची आपली पात्रता नि लायकी आहे का असे वाटल्यावाचून राहत नाही.

सर्वसाक्षी Tue, 22/07/2014 - 13:27

असं काय करता?

तुम्ही म्हणता "या सांसारिक कटकटी, हेवेदावे यापलिकडचं विश्व नसलेल्या मालिका बघणं बंद करा"

मग रामायण व महाभारतही यात आले की! तेही बघु नये का?

पण बघु का नयेत?

मला तर भयंकर आवडतात! बघायच्या आणि मज्ज्जा करायची. विचार करायची गरज नाही. शिवाय रोज बघायची सक्ती नाही; १५ दिवसानंतर बघीतली तरी काही फारसं बदललेलं नसत.

भाऊ, आमचे ८०+ वयाचे आई वडील आम्ही घरी पोचतो तेव्हा या विश्वात रममाण असतात. मी आत जाऊन माझा संच लावला तर कुटुंबाचा संवाद साधणार कसा आणि कधी? त्यापेक्षा ताट हातात घेऊन त्यांच्या शेजारी बसा. जी चालु असेल ती मालिका पाहा, पात्रांची चेष्टा करा, दिग्दर्शक/ लेखक यांचा उद्धार करा, मजा करा, आनंद लुटा. एकिकडे जेवा एकीकडे मालिका बघा. मालिका भिकार असतात ते बरे. मधे मधे बोलण्याला प्रत्यवाय नसतो. आपल्या गप्पांमुळे मोठे आशयघन संवाद निसट्ण्याची धास्ती नसते. कटकटी सगळ्या घरात असतात हो, पण त्या मालिकांकधे असतात तेव्हा आपल्याला झळ नसते, बघायला बरे वाटते. तेच हेच्यादाव्यांचे.

ज्यांनी आयुष्यभर काम केले, छंद जोपासले,कार्य केले, वाचन केले, घर उभे केले, नाती जोपासली त्यांना उतारवयात शीण कशाला? पाहा आणि आनंदी व्हा!

बॅटमॅन Tue, 22/07/2014 - 13:32

In reply to by सर्वसाक्षी

अंमळ असहमत.

रामायण महाभारतात खंग्री ड्वायलॉक आणि तितकीच खंग्री अस्त्रांची मारामारी आहे, झालंच तर मस्त अप्सराही आहेत. तुमच्या त्या शीर्यलीत काय हाय? हां आता त्यांच्या हिरविणी मस्त असतात ते एक आहे म्हणा, पण...तरी, रोज अल्पदुग्धप्राशनार्थ महिषीपालनाचा प्रकार वाटतो त्या हिरविणीला पहायला शीर्यली पाहणे म्हणजे.