आदरांजली - कार्ल जेराझ्झी

कार्ल जेराझ्झी काल गेला. आज बातमी वाचेपर्यंत मला त्याचं नावही माहीत नव्हतं. ती माझीच चूक.

कार्ल जेराझ्झीने १९५१ साली नवीन रेणू आणि त्याचं काम यावर संशोधन प्रकाशित केलं. नोरेथिंड्रोन (norethindrone) असं नाव असणाऱ्या या रेणूने स्त्रियांच्या आणि परिणामतः सगळ्यांच्याच आयुष्यात प्रचंड मोठा फरक घडवून आणला. हा रेणू तोंडावाटे घेण्याच्या संततीप्रतिबंधकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. रोज एक गोळी घेतली की अनावश्यक संततीची भीती बाळगण्याचं कारण नाही. पाश्चात्य समाजात या गोळीने क्रांती घडवली. 'द पिल' नावानेच ही गोळी ओळखली जाते.

ख्रिश्चन धर्मात गर्भपात अधार्मिक, अनैतिक म्हणून पाश्चात्य देशांमध्ये गर्भपात बेकायदेशीर होता. फ्रांसमध्ये सुरू झालेल्या स्त्रीवादी चळवळीची सगळ्यात पहिली मागणी होती ती मतदानाची, आणि ती मान्य झाल्यावर गर्भपात कायदेशीर करण्यासाठी आंदोलन केलं गेलं. संततीप्रतिबंधक गोळी मिळाल्यानंतर अनावश्यक गर्भधारणा आणि पुढे गर्भपात करून शरीराला आणखी त्रास देण्याची गरजच राहिली नाही. १९६० च्या सुमारास अमेरिकेत झालेली लैंगिक क्रांती संततीप्रतिबंधक गोळीशिवाय होणं शक्यच नव्हतं.

पुरुषांना जे लैंगिक स्वातंत्र्य मिळतं, लैंगिक उपभोग घेता येणं शक्य होतं, ते अनावश्यक संततीच्या भीतीपोटी स्त्रियांना शक्य नव्हतं. संततीप्रतिबंधक गोळ्यांमुळे स्त्रियांनाही लैंगिक स्वातंत्र्य मिळालं. महिन्यातल्या कोणत्या दिवशी पाळी यावी इथपासून ते आपल्याला मूल हवं का नको याचा निर्णय घेण्याची क्षमता स्त्रियांच्या हातात आली. विज्ञान-तंत्रज्ञानातल्या या संशोधनाशिवाय स्त्रियांची आणि स्त्रीवादाची एवढी प्रगती शक्य नव्हती.

९१ वर्षांचा कार्ल जेराझ्झी काल गेला. बातमी दुःखद असली तरीही निदान आता त्याचं नाव समजलं. कार्ल जेराझ्झीला आदरांजली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम समयोचित लेख आहे. हा संशोधक माहीत नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

RIP Carl...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

काँडोम कोणी शोधला तो माणूस जास्त हुशार. अवांच्छित संतती आणि रोग दोन्ही पासून संरक्षण.
पिलवाले लोक मला मेल शॉविनिस्ट वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिलवाले लोक मला मेल शॉविनिस्ट वाटतात.

माझ्या मते पिलचा शोध हा मेल शॉविनििस्ट भूमिकेपासून उलट्या बाजूला नेणारा ठरला. प्रथमच स्त्रीला गर्भनिरोधाचं सामर्थ्य आपल्या हाती मिळालं. नाहीतर संभोगातून होणारा संततिचा धोका हा फक्त स्त्रीला होता, आणि पुरुष नामानिराळा राहू शकत होता. त्यामुळे लैंगिक स्वातंत्र्य घेण्याची कितीही इच्छा असली तरी स्त्रीला पुढच्या जबाबदारीच्या शक्यतेचा विचार करावा लागत असे. त्यामुळे लैंगिक संबंध हे लॉंग टर्म रिलेशनशिप होणार असेल तरच ठेवण्याकडे स्त्रियांचा कल होता. ही अडचण म्हणजे संपूर्ण लग्नसंस्थेच्या इमारतीतला प्रचंड मोठा खांब होता. स्त्रीचं शील जपलं पाहिजे, तेे जपण्याची जबाबदारी आसपासच्या पुरुषांकडे आहे ही विचारसरणीही अनाहुत गर्भधारणेतून येतेे. स्त्रियांना बुरख्याआड झाकून ठेेेवणं, लग्नव्यवहार ताब्यात ठेवणं या पुरुषप्रधान मानसिकताही त्यातूनच येतात. कारण दुसऱ्याचं मूल न पोसण्याबद्दलच्या तीव्र भावना या उत्क्रांतीतूनच आलेल्या आहेत.
पिलच्या शोधामुळे या स्वातंत्र्यासाठी आवश्यक अशी समानता आली. या समानतेच्या शक्तीवरच स्त्रीमुक्ती चळवळीला जुन्या संस्था मोडून टाकण्याचं बळ मिळालं. एका रेणूच्या शोधाने सर्वच समाजांत घट्ट बसलेली पुरुषप्रधान व्यवस्था खिळखिळी होते आहे. विसाव्या शतकाच्या क्रांतिकारी शोधांच्या यादीमध्ये हा शोध वरचं स्थान प्राप्त करेल. त्या संशोधकाला माझी आदरांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी.

शिवाय नैसर्गिकरित्या पाळी कधी येणार यावर स्त्रियांचा ताबा नसतो. गोळीमुळे स्त्रियांना स्वतःच्या शरीरावर आणखी ताबा मिळवता येतो. (धार्मिक लोक त्याचा वापर कसा करतात तो निराळा विषय. पण) तत्त्वतः आपलं शरीर, आपले निर्णय याचं स्वातंत्र्य गोळीमुळे मिळालं.

---

मेघना, मलाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. शोधलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यावर लोकसत्तामध्ये आलेला व्यक्तीवेध इथे वाचता येईल.
त्यांचे हे संशोधन मानवी इतिहासात एक महत्त्वाचा शोध होता ज्याने अनेक पातळ्यांवर स्वागतार्ह सामाजिक बदल घडवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंट्रेष्टिंग माहिती.
थोडं कुतूहल: त्याच्या या संशोधनावर थेट सामाजिक पडसाद काय उमटले? त्याची झळ कार्लला सोसावी लागली का? याबाबत त्याची काही भूमिका होती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>> पिलवाले लोक मला मेल शॉविनिस्ट वाटतात.<<<
यातला एक अँगल असा आहे की विवाहित जोडप्यांमधे जेव्हा काँडोम की पिल असा मुद्दा येतो तेव्हा नवरा म्हणतो की मला काँडोम वापरायचा कंटाळा आहे किंवा मला त्यातून पुरेसं रतिसुख मिळत नाही तेव्हा बायकोने पिलच घेतली पाहिजे. काही स्त्रियांना पिलच्या साईड इफेक्टचा मोठाच त्रास होतो. (विशेषतः पीरियड्स मधे.) तर स्त्रियांच्या या त्रासापेक्षा पुरुषांचा कंटाळा किंवा रतिसुखाचे कमी प्रमाण हे खरं तर कमी प्रॉब्लेमॅटिक आहे. पण तरीही पुरुष म्हणतात की तू पिल घे नाहीतर डील वुइथ द कॉन्सीक्वेन्सेस. (स्त्रियांना किती त्रास होऊ शकतो आणि हा प्रकार प्रसंगी त्यांच्या जीवावरही कसा बेतू शकतो याबद्दलची माहिती
या दुव्यावर मिळेल..

पिलवाल्यांचा शॉव्हिनिझम असा आहे.

अर्थात, उपरोक्त शॉव्हिनिझम हा, कुठल्याही प्रकारच्या गर्भनिरोधनाचं साधन महिलांना मिळूच न देण्याच्या आणि त्यांच्यावर डझनावारी संतती लादणार्‍या ऐतिहासिक शोव्हिनिझम पेक्षा कमी मानला पाह्यजे. परंतु डझनावारी संतती लादणारा शॉव्हिनिझम आता (किमान भारतीय संदर्भात) जवळजवळ इतिहासजमा झालेला आहे. त्यामुळे "पिलवाल्यांचा शॉव्हिनिझम" हा अधिक वास्तववादी आणि ज्यावर सामाजिक चर्चा आवश्यक आहे असा विषय आहे. ऐतिहासिक शॉव्हिनिझम निरक्षरातल्या निरक्षर माणसाला न परवडणरा झालेला असल्याने अस्तंगत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

निरोध वापरण्याचा कंटाळा किंवा त्यात कमीपणा वाटतो म्हणून जोडीदार स्त्रीला पिल घेण्याची सक्ती करणं, गोळीचे शारीरिक दुष्परिणाम ही गोळीची नकारात्मक बाजू आहे हे मान्य करूनही ...

संततीप्रतिबंधाची जबाबदारी फक्त स्त्रियांवर किंवा फक्त पुरुषांवर असणं हे अन्यायकारक आहे. निरोध आधी शोधला गेल्यामुळे ही जबाबदारी सरसकट पुरुषांवरच येत होती. मुक्त स्त्रियांनी ही जबाबदारी समजून, आपापल्या जोडीदारासोबत या गोष्टी ठरवाव्यात.

शिवाय निरोधापेक्षा गोळी अयशस्वी होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, पाळीत मोठ्या प्रमाणावर होणारा फार रक्तस्राव यांवर इलाज म्हणूनही ही गोळी वापरली जाते.

भारतीय, माझ्या माहितीत हिंदू, लोक घरातल्या लेकी-सुनांना गणपती-दिवाळीत पाळी येऊ नये म्हणूनही गोळ्या घ्यायला लावतात. हे धर्मातल्या वेडगळ कल्पनांमुळे शरीराशी आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याशी खेळणं आहे. गोळीमुळे ते सुद्धा बदललेलं नाही. स्त्रीद्वेषाला रसायनं वापरून उत्तर शोधता येणार नाही. कोणत्याही गोळीमुळे स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या माहितीत हिंदू, लोक घरातल्या लेकी-सुनांना गणपती-दिवाळीत पाळी येऊ नये म्हणूनही गोळ्या घ्यायला लावतात.

माझ्या माहीतीतल्या स्त्रीया स्वताहुन घेतात. माझ्या पहाण्यातल्या घरात गोळ्या घ्यायला लावण्याचे उदा नाही. कारण मी सुसंकृत लोकांशी संबंध ठेवते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूझनच्या आवाजातः "Apparently."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण उदारमतवाद्यांना असा पर्याय नसतो ना. असंस्कृतांशीही कोणत्या-ना-कोणत्या पातळीवर संबंध ठेवावे लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटलं फक्त समविचारी कंपूमध्ये खिल्ली उडवण्यानं काम भागत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निवड आपणच करतो, ऑप्शन असताना जाणिवपूर्वक असंस्कृतांची निवड का करावी ते कळले नाही.

उदारमतवादी हे सर्टीफिकेट कुठे मिळते? का स्वताच स्वताच्या हस्ते स्वताला द्यायचे असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरोध आधी शोधला गेल्यामुळे ही जबाबदारी सरसकट पुरुषांवरच येत होती.

हे कसं काय? पुरुषाने निरोध परिधान केलेला आहे की नाही हे स्त्रीला दिसत नाही काय? शिवाय स्त्रियांनी दुकानातून निरोध विकत घेण्यावर कोणतीही बंदी नाही.
एड्सविरोधातही शेवटी वेश्यांनाच निरोध वाटायची वेळ आलीच ना? "नो काँडोम नो सेक्स" असं म्हणण्याची जबाबदारी स्त्रीवरच असते.
स्त्रीने पिल घेतली आहे का हे पुरुषाला दिसत नाही आणि विचारायचे लक्षात राहिल असेही नाही. त्यामुळे पिलपेक्षा काँडोममध्ये जबाबदारी जास्त वाटली जाते आणि त्याच्या आड येतो मेल शॉविनिजम. तो नष्ट होण्याऐवजी पिलमुळे त्याला पळवाट मिळाली आणि स्त्रियांना कन्फ्रंटेशन टाळण्याची सबब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदीच अवांतर आहे पण

पुरुषाने निरोध परिधान केलेला आहे

हा शब्दप्रयोग वाचून या गंभीर चर्चेतही हहपुवा लागली. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL घातला म्हणालो असतो, पण पुन्हा ते बुटात पाय की पायात बूट असं व्हायला नको म्हणून अशा प्रसंगी संस्कृतप्रचुर किंवा इंग्रजी शब्द वापरण्याची जुनाट युक्ती वापरली झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषाने निरोध परिधान केलेला आहे की नाही हे स्त्रीला दिसत नाही काय? शिवाय स्त्रियांनी दुकानातून निरोध विकत घेण्यावर कोणतीही बंदी नाही.
एड्सविरोधातही शेवटी वेश्यांनाच निरोध वाटायची वेळ आलीच ना? "नो काँडोम नो सेक्स" असं म्हणण्याची जबाबदारी स्त्रीवरच असते.

पुरुष निरोध वापरो किंवा न वापरो, मूल होऊ न देण्याचा गोळीमुळे कंट्रोल स्त्रीकडे आला. त्यापूर्वी पुरुषाच्या सहकार्याशिवाय, (गोडीगुलाबीने किंवा 'नोकॉनोसे'), ते शक्य नव्हते. मूल होऊ न देणे स्त्रीच्या स्वाधीन असणे हा या शोधाचा सर्वात महत्त्वाचा पैलू होता.

व्यावसायिक संबंधात निरोध वापरण्याची अट संघटित वेश्यांना जशी अंमलात आणता येते तसे सर्वच कौटुंबिक संबंधात शक्य होतेच असे नाही. कितीतरी कुटुंबांत तसे म्हणण्याची आणि घडवून आणण्याची मुभा स्त्रीला नसते ही वस्तुस्थिती आहे. शिवाय एड्स्च्या भीतीने का होईना, स्वसंरक्षण हा निरोध वापरण्याला उद्युक्त करणारा भाग आहे. घरगुती संबंधात ती भीती कमी असल्याने जर का पुरुशाचे सहकार्य नसेल तरीही गर्भधारणा टाळण्याचा कंट्रोल पूर्णपणे स्त्रीकडे या गोळीमुळे आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दाशब्दाशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

जर का पुरुशाचे सहकार्य नसेल तरीही गर्भधारणा टाळण्याचा कंट्रोल पूर्णपणे स्त्रीकडे या गोळीमुळे आला.

कंट्रोल आला याबद्दल वादच नाही. पण "सहकार्य नसेल तरीही" या बद्दलचे मी निरीक्षण सांगितले एवढेच.
गोळी स्त्रियांना उपकारक आहेच पण मेल शॉविनिजम गुलदस्त्यात राहतो याचे दु:ख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्यावर डझनावारी संतती लादणार्‍या ऐतिहासिक शोव्हिनिझम पेक्षा कमी मानला पाह्यजे. परंतु डझनावारी संतती लादणारा शॉव्हिनिझम आता (किमान भारतीय संदर्भात) जवळजवळ इतिहासजमा झालेला आहे. त्यामुळे "पिलवाल्यांचा शॉव्हिनिझम" हा अधिक वास्तववादी आणि ज्यावर सामाजिक चर्चा आवश्यक आहे असा विषय आहे.

धन्यवाद मुसु!
स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि मेल शॉविनिजम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. मला वाटतं की पिलचं महत्व ऐतिहासिक आहे आणि ते तसं असावंही पण एखादं शस्त्र कोणाच्या हातात पडतं त्यावरून त्याचे सामाजिक परिणाम ठरतात. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धडपडणार्या स्त्रियांसाठी ही पिल लैंगिक स्वातंत्र्य आणि स्वतःच्या शरीरावर स्वतःचा ताबा देणारी असली तरी सनातनी विचारसरणीच्या समाजासाठी हीच पिल नको असलेले गरोदरपण टाळण्याची जबाबदारी पिलच्या साईडइफेक्ट्सची पर्वा न करता फक्त बायकांच्या अंगावर ढकलण्याचा शोव्हिनिस्टिक प्रकार असतो.
अर्थात त्यामुळे तिचा शोध लावणार्या शास्त्रज्ञाचे योगदान कमी महत्वाचे ठरत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>याच्या या संशोधनावर थेट सामाजिक पडसाद काय उमटले? <<<

त्याबद्दलची काही माहिती येथे मिळावी.

टाईम मॅगेझिनचे तत्कालीन कव्हर :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ह्या शास्त्रज्ञ/संशोधका ची माहिती दिल्याबद्दल आभार.
कार्ल जेराझ्झी च्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पिल' ने घडवून आणलेल्या सामाजिक क्रांतीची माहिती होती, पण तिच्या जनकाबद्दल आजच कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेरास्सी गेला?
फार वर्षापूर्वी आम्ही ग्रॅज्युएट स्टुडंट असतांना एका कॉन्फरन्समध्ये (बहुतेक एसीएस, अमेरिकन केमिकल सोसायटीच्या) त्याचं व्याख्यान ऐकायचा योग आला होता. त्यावेळेस तो अलरेडी एमिरॅटस झाला असावा, बहुदा तो एक की-नोट अ‍ॅड्रेस होता....
तिथेही त्याच्या व्याख्यानापूर्वी प्रास्ताविक करणार्‍याने त्याच्या शोधाचा, 'मानवाच्या उत्क्रांतीमधील आणि सांस्कृतिक इतिहासामधील एक महत्वाचा माईलस्टोन' असं केलेलं वर्णन आठवतं...
काही शब्दप्रयोग असे असतात की ते आयुष्यभर लक्षात रहातात, त्यापैकी हा एक.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदरांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0