ही बातमी समजली का? - ५८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

===========

http://timesofindia.indiatimes.com/city/bhubaneswar/Schoolgirl-delivers-...

A Class VI student of Umuri Ashram School (state-run residential school for SC and ST students) in Jeypore block of Koraput district delivered a boy on February 4. It happened 12 days after a Class X student of another similar school at Lingagada in Kandhamal district became mother of a boy.

चिंताजनक.

field_vote: 
0
No votes yet

चिंताजनक तर आहेच.

इयत्ता सहावीतील मुलीचे वय काय होते?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

५+६ =११ असायला हवे. एखादे वर्ष गॅप म्हटले तरी १२.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आजकाल काही मुलिंना जे अकाली सौंदर्यत्व प्राप्त होतय, त्याचे हे दुष्परीणाम असावेत

actions not reactions..!...!

अनेक मुलिंना आपल्यातील सौदर्यत्वाची जाणीव योग्यकाळा आधीच होते आणी त्या वयापेक्षा जास्त मोठ्या आहोत असे मानुन वागु लागतात दुर्दैवाने हे जे मानलेले मोठे वय आहे हे पुरेशी परिपक्वता आणत नाही. अन मग त्यामुळे नको त्या गोष्टी गळ्यात पडता. असे घडण्यामागे प्रतिसादकर्त्याच्या खवचटपणा कारणीभुत नसुन त्या वयातील मुलींचा हा दोष आहे. मुले बहुदा वयाने ३-४ वर्षांनी मोठी असतात म्हणून अकाली सौदर्यत्व न संभाळले जाणे फिमेललिंगी एंटीटीवर डिपेंड करते आहे. कृपया यात स्त्रि पुरुष वाद मधे आणून विषयाची लय बिघडवु नये.

actions not reactions..!...!

आजकाल? अहो हे तर जुन्या काळापासून्चे आहे.

http://www.ndtv.com/delhi-news/fevicol-for-arvind-kejriwal-bouquets-for-...
उद्या बीजेपीची फटफजिती निछ्छित ! योगेंद्र यादव म्हणतात केजरीवाल पळून जाऊ नये म्हणून अगदी फेविकॉल आणला आहे. खाली एका वाचकाने भाजपेयींची मस्त टांग खेचली आहे. म्हणे केजरीवाल फेवोकॉल देताय तसे मोदींना बर्नॉल द्या.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/vishwa-hind...
एकिकडे जगात कितीतरी राज्यांत गांज्याला/अफूला मान्यता मिळत असताना तुळस वैगेरे म्हणजे ...

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Anti-Americanism is exploding in Russia

Just over 80 percent of Russians now see the US negatively — an astounding and apparently unprecedented high — according to the reputable Levada Center polling organization. The poll also finds that 42 percent of Russians see the US and Russia as "hostile" or as "enemies," depending on the translation.

अमेरीकेने, युक्रेन चा support, वाढविल्याने (cranked up) असेल.
http://www.usatoday.com/story/news/politics/2015/02/08/john-kerry-angela...

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तरी भाजपाला विरोधी पक्षनेतेपद देऊ

चला सुरूवात तरी स्वागतार्ह आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नक्कीच.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://www.spacedaily.com/reports/Dark_matter_at_the_heart_of_our_galaxy...

पृथ्वीवर डार्क मॅटर मिळाल्याचा थेट पुरावा शास्त्रज्ञांना मिळाला आहे.

Now scientists from the Technische Universitat Munchen (TUM), Stockholm University, Universidad Autonoma de Madrid, ICTP South American Institute for Fundamental Research, Sao Paulo and University of Amsterdam have obtained for the first time a direct observational proof of the presence of dark matter in the innermost part the Milky Way, including at the Earth's location and in our own 'cosmic neighborhood'.

---------
मॅटर कमी पडले तर डार्क मॅटर वापरून मानवतेच्या गरजा भागवायची संभावना वाढली आहे असे मला वाटते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

at_the_heart_of_our_galaxy = पृथ्वीवर?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसं नव्हे -
including at the Earth's location = पृथ्वीवर

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://seeandsaynews.in/news/3328-stephen-hawking-calling-aliens-on-eart...
परग्रहवासीयांचा संपर्क झाला तर तो मानवतेसाठी विनाशकारक असेल. कोलंबसने नेटीव अमेरिकन लोकांचे खोबरे केले तसे होईल - हॉकिंग.
Search for Extraterrestrial Intelligence Institute, California (सेती) ही संस्था परग्रहावर जीवन, इ शोधण्यासाठी प्रयत्नशील असते. त्या प्रयत्नांना उद्देशून हॉकिंग यांनी म्हटले आहे. शिवाय हा संपर्काचा प्रयत्न "सर्व मानवांच्या अनुमतीने/बहुमताने (जे काय ते) व्हावा असेही म्हटले जाते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://www.ndtv.com/world-news/earths-inner-core-has-an-inner-core-of-it...
पृथ्वीच्या आतल्या कोअरचे दोन भाग आहेत. इनर इनर कोर नि आउटर इनर कोर. आउटर इनर कोरचे चुंबकीय क्षेत्र दक्षिण उत्तर आहे. इनर इनर कोरचे पूर्वपश्चिम. पृथ्वी बनली तेव्हा चंद्र ज्या महाटकरीमुळे बनला त्यात सगळी पृथ्वी यूनिफॉर्मली घुसळली गेली होती असे मानले जायचे. आता इनर इनर कोर सुरक्षित राहिली होती असे मानणारे काही आहेत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://www.dnaindia.com/india/report-donations-i-t-issues-notices-to-aap...
आप नि काँग्रेसला करकायदेभंगाची नोटीस. निवडणूकीत हरल्याने भाजपचा जळफळाट होतोय याचा पुरावा.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही नोटिस निकालापूर्वी काढली होती, शिवाय चौकशीची मागणीही आआपनेच केली होती.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://timesofindia.indiatimes.com/India/Kiran-Bedi-Fatwas-impact-the-fr...
फतव्यांमुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची, अभिनिर्णयनस्वातंत्र्याची गळचेपी होते असा कांगावा बेदीबाई करत आहेत. शाही इमामांनी फतवा काढणे योग्य असो वा अयोग्य, त्यामुळे देशातील फुटीर सांप्रदायिक ताकतींना छानच चाप बसला आहे. जिसका अंत भला वो सब भला.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे मुल्ला मौलवी फतवे काढून राजकारणात हस्तक्षेप करतातच कशाला. पॉवर माँगर्स साले.
इथेही मॉर्मॉन चर्च ने समलैंगिकांना पाठींबा जाहीर केला आहे पण या अटीवर की राजकारणात, धर्मास स्थान मिळावे, त्यांना "say" असावा.
http://www.cnn.com/2015/01/27/us/mormon-church-lgbt-laws/

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

राजकारणात, धर्मास स्थान मिळावे, त्यांना "say" असावा.

मला वाटतं राजकारणात धर्मवाले लोक "लायनीपरमान" आल्यास कोणाची ना नसावी..लोकशाहीत.

पण ऑपॉप पदसिद्ध हक्क द्या म्हटले तर चुकीचे आहे.

स्वतः केजरीवाल यांनी याविरोधात आपले मत निवडणूकीच्या आधीच दिल्याने, शिवाय असा पाठिंबा घेण्यास नकार दिल्याने याचा दोष त्यांना जात नाहीच.
बेदी बाईंचा त्रागा समजू शकतो. त्यांची स्थिती ना घरका ना घाटका झाली असणार..

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही रोचक डेवलपमेंट्स.
http://www.iflscience.com/physics/quantum-equations-dispute-big-bang
http://www.ibtimes.co.uk/big-bang-not-start-quantum-theory-suggests-univ...
सुरुवात
Einstein's theory predicts the universe came from an infinitely dense single point that then exploded outwards – the Big Bang. However, this state – singularity – creates a number of problems for scientists, including the fact it does not account for what happened before or at the moment of the Big Bang.
----------
"The Big Bang singularity is the most serious problem of general relativity because the laws of physics appear to break down there," says Dr. Ahmed Farag Ali of Benha University, Egypt
नविन थेरी

Using a quantum-corrected Raychaudhuri equation, they were able to create new equations to describe the expansion and evolution of the universe within general relativity. They showed that quantum particles can never meet or cross paths, phys.org explains.

"As far as we can see, since different points in the universe never actually converged in the past, it did not have a beginning," study author Professor Saurya Das told the MailOnline.

अंततः थोडा संभ्रम
This idea does not, however, suggest there was no Big Bang. Brian Koberlein, a researcher at Rochester Institute of Technology, wrote in a blog post that there was some confusion over what the physicists were suggesting.

"A new paper in Physical Letters B has the popular press wondering if there was no Big Bang, but the actual paper claims no such thing... The Big Bang is a robust scientific theory that isn't going away, and this new paper does nothing to question its legitimacy."

ते इथर नव्हे, दुसरे काहीतरी आहे
In another proposal that harks back to a now-discarded theory, Das and Ali propose that the universe is filled with a quantum fluid made up of gravitons, particles that probably have no mass themselves but transmit gravity the way photons carry electromagnetism. The follow-up paper suggests that in the early universe these gravitons would have formed a Bose-Einstein condensate, a collection of particles that display quantum phenomena at the macroscopic scale.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बातमी रोचक आहे पण इंडियाटाईम्समधे आली आहे तेव्हा खरी आहे की कशी याचा विचार करावा लागेल. इंडीयाटाईम्स हा टाईम्स समुहाचा 'संध्यानंद' आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कार्यकारी मंडळाच्या क्षेत्रात लुडबुड करू नका असे मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयास सांगितले आहे.

मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन.

हे तर खासच....
In any way, the court's hands are full. Its dockets are overflowing. It would be better to divert energy for tackling pendency than taking up issues relating to appointment of constitutional figures.

परंतु ज्या पीआयएलबाबत हे सुनावले ते थोडे चिंताजनक आहे.
Petitioners' counsel Prashant Bhushan said Sharma's appointment as CAG could give rise to a conflict of interest situation as Sharma would now be auditing purchase of defence equipment, which were procured during his tenure as defence secretary. Several of the purchases, including VVIP helicopters from AgustaWestland, have been mired in controversy, he claimed.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शर्मा हे संरक्षण सचिव होते ते युपीए सरकारच्या कारकीर्दीत. मामला गंभीर आहे.

मागे कोणतीही पोस्ट धारण केलेल्या माणसाला कॅग नेमू नये कारण त्याने काही ना काही प्रोक्यूअरमेंट केली असणारच.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही पटलं अरूण राव. उगाच आहे तुमची आर्ग्युमेंट. शिस्तीत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे इथे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पोस्टाचे सचिव कॅग केले तर ते पोस्टाचा फ्रॉड दुर्लक्षतील. काय सांगावे?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हो, पण जिथे ऑल्रेडी संशयाची सुई आहे त्या माणसाच्या कारकिर्दित घेतलेल्या निर्णयाबद्दल तिथे नक्कीच कॉन्फ्लिक्ट वाटतो.
आणि पोस्टातल्या घोटाळ्यांचा आवाका (magnitude) आणि परिणाम (repercussion) हे संरक्षण खात्यातल्या निर्णयांच्या आवाक्याच्या आणि परिणामांच्या जवळपासही फिरकत नाहीत असं वाटतं मला.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऑल्रेडी संशयाची सुई आहे त्या माणसाच्या कारकिर्दित घेतलेल्या निर्णयाबद्दल तिथे नक्कीच कॉन्फ्लिक्ट वाटतो.

एक तर ऑडीटर चोर थोडीच पकडतात? दुसरे म्हणजे नेमके या माणसाला नक्की काय झाले ते जास्त चांगले माहित असणार. फायदा देखिल होऊ शकतो त्याचा.

पोस्टातल्या घोटाळ्यांचा आवाका (magnitude) आणि परिणाम (repercussion) हे संरक्षण खात्यातल्या निर्णयांच्या आवाक्याच्या आणि परिणामांच्या जवळपासही फिरकत नाहीत असं वाटतं मला.

म्हणजे दर्वेळेस पोस्टवाल्यांनी स्वतः भ्रष्टाचार करायचा आणि डिफेंसवाल्यांना पकडून द्यायचे हे चालणार.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऑडिटर चोर पकडत नसले तरी चोरी झाली आहे हा निष्कर्ष तेच काढतात बहुदा. आदूबाळ सांगू शकतील जास्तं.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तसे नसावे.
साधारणतः ही व्यक्ती एकतर आधिच्या वित्तवर्षी कोणतेही मोठे/महत्त्वाच्या ट्रान्झॅक्शनमध्ये अधिकारी व्यक्ती नसते किंवा मुळातच पहिल्यापासून ऑडिटर असते.
उदा. व्ही.एन्.पॉल हे कॅग व्यतिरिक्त "हु - WHO" चे ऑडिटर होते तर त्याआधी ते न्यूयॉर्कमधे युनायटेड नेशन्सच्या ऑडिट अ‍ॅडव्हायझरी कमिटीचे व्हाइस चेअरमन होते.
प्रसिद्ध राय सुद्धा कॅङ व्हायच्या आधी Asian Organization of Supreme Audit Institutions (ASOSAI) चे प्रमुख ऑडिटर होते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुप्रिम कोर्टाने हक्कांवर अतिक्रमण करू नये हे थोड्याशा प्रमाणात खरे असले तरी ज्या केसमध्ये सरकारने हे सुनावले आहे ते काही योग्य वाटले नाही.
जर कॅगच्या नेमणूकीत "कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट" आहे असा आरोप आहे तर तो कसा नाही हे सिद्ध करणे सरकारचे काम होते. ते न करता आमचे आम्ही बघु तुम्ही लुडबुड करू नका अरेरावीचे वाटले.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेमके. मार्मिक.

अरेरावीचे फळ काय असते हे १० फेब नंतरही मोदीसरकारला कळू नये हे त्यांच्या एकूणच लक्षणांचे प्रमाणच आहे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गेल्या काही वर्षात सुप्रिम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळेच हा देश पूर्ण भरकटण्यापासुन वाचला आहे. मोदींनी सत्तेवर येण्यास ही काही प्रमाणात सुप्रिम कोर्टाने युपीए ला लावलेल्या चापामुळे तयार झालेल्या जनमताचा हात आहे.
एखादी चांगली गोष्ट कोणी करत असेल तर ते कोण करतय ह्या फंदात मोदींनी पडू नये.

तसेही मोदींनी बारामतीला जाण्याचे ठरवून पूर्ण निराशा केली आहे. केंद्रात ९ महीने आणि राज्यात ३ महीने सत्ता हातात असुन एकाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर केस कोर्टात उभी राहीली नाहीये. खरे तर खास कोर्ट स्थापन करुन आणि ती ३ शिफ्ट मधे चालवली पाहीजेत.

त्यापेक्षा जयललिता आणि करुणानिधी चांगले, सत्तेवर आले की एक दुसर्‍याला आत तरी टाकतात.

बारामतीला जाणं यात काही वाचावं असं वाटत नाही पण सिंचन घोटाळ्याच्या तपासाबाबत काही बातमी येईना... हा नक्कीच अपेक्षाभंग आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१
ज्यांना अपेक्षा होती त्यांच्यासाठी हा अपेक्षाभंगच आहे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बारामतीला जाणं यात काही वाचावं असं वाटत नाही

तुम्हाला नसेल वाटत, पण मला वाटते. आणि माझ्या सारख्या लाखोंना वाटते. त्यातल्या बर्‍याच जणांनी मोदींना मत दिले होते ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मोदी भ्रष्टाचारी लोकांना कायदेशीर प्रक्रीयेत आणतील अशी आशा होती.
आता मोदी जर त्यांच्याच बरोबर स्टेज वर बसणार असतील तर दाऊद नी काय घोडे मारलय?

>>यातल्या बर्‍याच जणांनी मोदींना मत दिले होते ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मोदी भ्रष्टाचारी लोकांना कायदेशीर प्रक्रीयेत आणतील अशी आशा होती.

ROFL ROFL ROFL

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बर्‍याच जणांनी मोदींना मत दिले होते ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मोदी भ्रष्टाचारी लोकांना कायदेशीर प्रक्रीयेत आणतील अशी आशा होती.

बर्‍याच जणांनी, बर्‍याच विविध कारणांसाठी मोदींना मते दिली होती! ते असो.

अवांतर -

दाऊद नी काय घोडे मारलय

बरोबरे. दाऊद कशाला घोडे मारेल? तो घोडेखाऊ * थोडाच आहे? तो फारतर बैल मारेल!! हाकानाका!!

* घोडेखाउ ही उपाधी मुंबईतील एका विशिष्ठ समाजाला दिली जाते.

घोडेखाऊ माहिती नाही पण आजच्या लोकसत्तात लोकमानसमध्ये घोडेचोर असे पत्रलेखकाचे आडनाव दिसले.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गेल्या काही वर्षात सुप्रिम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळेच हा देश पूर्ण भरकटण्यापासुन वाचला आहे.

साधु साधु !!! एकदम मनातले बोल्लात हो.

काश्मिर मधे पीडीपी व भाजपा यांचे संयुक्त सरकार ??? अहो आश्चर्यम.

च्यायला किती दिवस भिजत घोंगडं ठेवलंय या लोकांनी ??

म्हणजे इतके दिवस फुटीरांचे समर्थक म्हटले त्यांच्याशीच युती?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाजपा फुटीरतावादी आहेच कारण लालू ने सुद्धा भाजपावर "ये देश को तोडनेवालोंमें से है" असा आरोप केलेला होता. इथे पहा. पहिल्या ३० सेकंदांतच तुम्हास कळून चुकेल की भाजपा किती सेपरेटिस्ट पक्ष आहे ते.

एआयबी रोस्टिंग हा प्रकार योग्य की अयोग्य यावर जालावर खूप चर्चा झाली आहे. (ज्यांना रोस्टिंग इत्यादीबद्दल काही माहिती हवी असेल ती 'पाहावे मनाचे'वर मराठीत तपशीलात वाचायला मिळाली)

याबद्दल अनेकांविरूद्ध FIR दाखल झाली आहे. एआयबी हा प्रकार योग्य होता की अयोग्य यात मला सध्या पडायचे नाही. मात्र त्याविरुद्ध दाखल झालेल्या FIRमध्ये फक्त सोनाक्षी सिन्हाचे नाव का वगळले आहे? असा रास्त सवाल महेश भट यांनी विचारला आहे. जर ४००० लोकांना जमवून हसवणे हा सद्य राज्यात गुन्हा आहे तर भाजपा खासदार शस्त्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीलाच यातून का वगळले जावे? असा रास्त सवाल त्यांनी केला आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुरुंग छोटे आहेत फार...
पण हसणार्‍या लोकांवर गुन्हा अगदीच हास्यास्पद आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुरुंग छोटे आहेत फार...

ROFL

अर्र सॉरी अश्या शारीर विनोद केला वा हसलो तर हल्ली थेट "क्रिमिनल" केस होते नै का! Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाजपा सत्तेत असताना त्याच्या आमदारा खासदारांच्या पुत्र पौत्रिकांना सगळे गुन्हे माफ होणार आहेत असं दिसतंय.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसा लगता है तो लगने मे कुछ बुराई नही
दिल ये कहता है "आप" अपनी है परायी नही

हो तर....
मागच्या वेळी अडवाणींना बाबरी केसमधून मुक्त केलं आता अलिकडेच अमित शहांना फेक एन्काउंटर केस मधून मुक्त केलं....
ते साहजिकच आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संसदेत असे सोडवायचे कायदे करावेत म्हणजे अवघड आहे लोकशाहीचं.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मराठीत "तळे राखील तो पाणी चाखील" आणि हिंदीत "जिसकी लाठी उसकी भैस" अशा म्हणी आहेत.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हि बातमी अपुर्या माहितीवर आधारित आहे . या कार्यक्रमा विरुध्द ५ -६ ठिकाणी F I R दाखल झाली आहे . आणि काही ठिकाणी सोनाक्षी सिन्हा च पण नाव त्यात आहे

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

http://www.aamaadmiparty.org/AAP-Manifesto-2015.pdf
आम आदमी पार्टीने २४ तास वाय फाय प्रॉमिस केलेले. आता अचानक ३० मिनिटे म्हणताहेत. वाराणसीच्या घाटावरचा कुत्रा चावला का? वर शासकीय सेवा घेताना खासगी जाहीराती पाहाव्या लागणार म्हणे. कंपल्सरी. एक वचन शपथविधीच्या आत ४८ पट कमी केले. आमचे काँग्रेसचे शीलाताईंचे सरकार खरोखरच छान होते (नो पन).
आता स्पीड आणि डाउनलोड लिमिट पाहू. शिवाय अधिकच्या वापराचे चार्जेस पाहू.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Ahmedabad: Bajrang Dal men throw tomatoes on couples celebrating Valentine's Day ...

उसे तो कत्ल करना और तडपाना ही आता है
गला किसका कटा क्यु कर कटा तलवार क्या जाने

करो फरियाद सर टकराओ अपनी जान दे डालो
तडपते दिल की हालत हुस्न की दीवार क्या जाने

The Staggering Vanity of India's Powerful - रामचंद्र गुहा.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विचार करायला लावणारं आहे आर्टिकल. इतरांना नमस्कार करण/करवून घेणं हेही याचंच उदाहरण आहे असं वाटतय.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रामचंद्र गुहा यांचे आर्टिकाल दोनदा वाचलं. लेखकाला जे म्हणायचे आहे ते मला समजले. किमान काही प्रमाणावर तरी अविचारीपणाचं वाटलं.

उदा. हे वाक्य - But science begins with an interest in the world outside yourself. -

१) स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हे सायन्स नाही ??? माझे शरीर व माझा मेंदू हे सायन्टिफिक बाबी नाहीत ??? मला जे वाटते ते, माझ्या आकांक्षा सायंटिफिक नाहीत ??
२) व माशेलकर काय किंवा सी एन आर राव काय - यांनी आधी सायन्स वर लक्ष केंद्रीत केले, संशोधन केले व नंतर सेल्फ प्रमोशन केले. "सायन्स बिगिन्स विथ..." मधे बिगिन्स हा शब्द लक्ष देण्यास पात्र आहे की नाही ???? या दोन्ही सायंटिस्टांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीस सायन्स वर (म्हंजे स्वतःच्या बाहेरील जगावर) लक्ष केंद्रित केले. कारकीर्दीचा बहुतांश काल ते सायन्स वरच लक्ष केंद्रित करून होते. व प्रचंड यश मिळाल्यावर मग सेल्फ प्रमोशन केले. (आता लगेच - त्यांना मिळालेले यश हे यश कशावरून ? - असा प्रश्न उपस्थित केला जाईलच.)

----

In allowing (or encouraging) things to be named after themselves, C.N.R. Rao, Amartya Sen and Jagdish Bhagwati have not done anything that is illegal. What they have done is not even immoral. But it is unquestionably in poor taste.

१) दिग्गज शास्त्रज्ञांनी आपल्या दैदिप्यमान कारकीर्दीच्या उत्तरार्धात सेल्फ प्रमोशन केले तर ते पूअर टेस्ट ?????
२) व रामचंद्र गुहा यांनी "इगॅलिटेरियनिझम" चा पुरस्कार करणे (म्हंजे ज्यांनी तुलनेने काहीही विशेष यश मिळवलेले नाही व योगदान केलेले नाही अशा अतिसामान्यांना समान अधिकार मिळावेत व समान संधी मिळावी असा आग्रह धरणे) - ही उच्च अभिरुची ???? खरंच ????
३) उच्च हा शब्द अस्तित्वात असावा की नसावा ???? कारण इगॅलिटेरियनिझम मधे कोणीही कोणत्याही बाबतीत उच्च नसेल व कोणीही "खालचा" नसेल. मग तो शब्द तरी का अस्तित्वात असावा ???? Let's expunge that word from dictionary.

-----

Yet Modi's expensive display of self-love was entirely characteristic of how powerful and successful Indian males tend to behave in public.

१) पुरुषांची मानसिकता ???? स्त्रिया सौंदर्यप्रसाधने वापरतात ती "सेल्फ प्रमोशन" नसते ????

२) एखाद्या स्त्री चे सौंदर्य ही तिची बार्गेनिंग पॉवर नाही ????

३) सौंदर्यप्रसाधने वापरून "सेल्फ प्रमोशन" करणे हे भारतीय स्त्रिया करीत नाहीत ???? व सौंदर्यप्रसाधने लावून झाली की स्त्रिया घरातच बसून राहतात की पब्लिक प्लेस मधे जातात ???

----

संपूर्ण लेखाची अजून बरीच चिरफाड करता येऊ शकते.

पण लेखकाचे खरं दुखणं हे आहे की - लोकांनी निष्काम कर्म करावे ही मागणी. यशस्वी मंडळींनी अनिवार्यपणे विनम्रतेची पराकाष्ठा करावी ही अपेक्षा. लोकांना इगो नाय पायजे - अशी गुहा यांची अपेक्षा. पण एखाद्या कामाची जी मुख्य फले आहेत त्यात अ) फायनान्शियल कॉम्पेन्सेशन व ब) आदर्/सन्मान या दोन बाजू असतात. (अर्थात इतर बाबी सुद्धा असतात.) काही कामं अशी असतात की ज्यात फायनान्शियल कॉम्पेन्सेशन हे प्रचंड महत्वाचे असते. माशेलकर, सी एन आर राव, अमर्त्य सेन, जगदीश भगवती यांच्या कामात आदर सन्मान हे महत्वाचे मानले जातात. या सगळ्यांच्या संशोधनाचे योगदान इतके जबरदस्त आहे की त्यांचे पुतळे खरोखर बांधले जावेत व अशा विद्वानांची सर्वत्र पूजा व्हावी.

रामचंद्र गुहा यांच्या या अविचारी लेखाचा निषेध.

------

संभाव्य आक्षेप -

१) गब्बर ला लेख समजलेलाच नैय्ये.
२) गब्बर चा एकांगी ...
३) गुहा यांनी जगदीश भगवतींवर टीका केली म्हणून गब्बर पेटून उठलाय
४) सी एन आर राव व माशेलकरांनी जे संशोधन केले त्याचा रिक्षावाल्यांना, भाजीवाल्यांना, शेतकर्‍यांना, मजूरांना, हमालांना काय फायदा झाला, गब्बर ??

लेख पटला - जाहीरपणे स्वतःची लाल करणं हास्यास्पद असतं.

पण गुहाकाकाचं कंफ्युष्टन कळलं नाही. रावांन्ना जो न्याय तो कुंबळेला का नको?

These intellectual and ideological differences have led to the construction of Bhagwati and Sen as rivals and adversaries.

हे खरच आहे का, गब्बरभौ?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

These intellectual and ideological differences have led to the construction of Bhagwati and Sen as rivals and adversaries.

हे खरं आहे.

अमर्त्य सेन हे चांगल्यापैकी redistributionist आहेत. असा माझा समज आहे. नितिश कुमारांनी ज्या सायकली वाटल्या त्या योजनेचे त्यांनी खूप समर्थन केलेले होते.

जगदीश भगवती हे redistributionist खूप कमी आहेत.

अमर्त्य सेन हे फ्री मार्केट चे समर्थक कमी आहेत. जगदीश भगवती हे चांगलेच फ्री मार्केट वादी आहेत.

या दोघांत तू तू मै मै फक्त झालेली नाहिये. पण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

>>माझे शरीर व माझा मेंदू हे सायन्टिफिक बाबी नाहीत ???

नाही. माझे शरीर व माझा मेंदू यांचा इतर सर्वांची शरीरे आणि मेंदू यांच्यासह अभ्यास ही सायंटिफिक बाब आहे. Science is about study of groups/classes of observations and developing knowledge about common properties among them. Measuring say blood sugar level of an individual is not in the perview of scientific knowledge. The statement that Normally blood sugar is between so and so range can be a part of scientific book/paper. The statement that Nitin Thatte's blood has X mg/dl sugar level cannot be.

पॉवरफुल आणि सक्सेसफुल पुरुषांच्या सेल्फ प्रमोशनची स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधने वापरण्याशी तुलना/बरोबरी ही उदाहरणार्थ विनोदी आहे.
हॅविंग सेड दॅट पॉवरफुल सक्सेसफुल महिलासुद्धा सेल्फ प्रमोशन करतात हे खरे आहे. इंदिरा गांधी* हे उत्तम उदाहरण आहे.

>>माशेलकर, सी एन आर राव, अमर्त्य सेन, जगदीश भगवती यांच्या कामात आदर सन्मान हे महत्वाचे मानले जातात.
त्यांना आदर/सन्मान मिळण्याबाबत गुहा यांना आक्षेप आहे असे वाटत नाही. मला भगवती/सेन यांच्या नावाने काही चेअर असण्याविषयी माहिती नाही. कदाचित त्यात काही गैर नसावे आणि तशी चेअर निर्माण करण्याच्या या लोकांनी स्वतः प्रयत्न केला नसेल. सीएनआर राव यांनी आपले नाव चौकाला देण्याच्या समारंभाला स्वत: हजर राहणे हे मलाही खटकण्यासारखे वाटते. त्याचबरोबर राव यांना आदर सन्मान मिळू नये असे मला वाटत नाही. पण आदरसन्मान आणि चौक/पुतळा या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि सहसा जिवंतपणे चौक/पुतळा लेव्हल असू नये असे वाटते.
[The toughest question I find in a job interview is "Tell me something about yourself".]

*नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींची आठवण करून देतात असे मला नेहमी वाटते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पॉवरफुल आणि सक्सेसफुल पुरुषांच्या सेल्फ प्रमोशनची स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधने वापरण्याशी तुलना/बरोबरी ही उदाहरणार्थ विनोदी आहे.

माझं म्हणणं हे आहे की - "पॉवरफुल आणि सक्सेसफुल पुरुषांनी सेल्फ प्रमोशन करणे हे पूअर टेस्ट चे लक्षण अजिबात नाही". व शास्त्रज्ञांनी सेल्फ प्रमोशन करणे हे तर उच्च अभिरुची चे लक्षण आहे. दिग्गज शास्त्रज्ञांनी सेल्फ प्रमोशन करणे हे तर त्यांच्या व इतरांच्याही अत्युच्च अभिरुचीचे लक्षण आहे. कारण अज्ञान दूर करण्याच्या कार्यात हे बुद्धीवंत लोक अतिसामान्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त योगदान करतात. व त्याबदल्यात त्यांना मिळणारे फायनान्शियल कॉम्पेन्सेशन हे खूप कमी असते. म्हणून त्यांना सॉफ्ट कॉम्पेन्सेशन हे elevated level of reputation and fame and recognition च्या स्वरूपात दिले जाते.

----

पण आदरसन्मान आणि चौक/पुतळा या वेगळ्या गोष्टी आहेत.

अजिबात नाही.

एखाद्याचा पुतळा बांधणे हे त्यास आदर देणे त्याचा सन्मान करण्यासाठीच केले जाते. मरणोत्तर असो अथवा..... तसेच एखाद्याचे नाव चौकास देणे हे सुद्धा त्या व्यक्तीस सन्मान देण्याच्या अनेक मार्गांपैकी एक आहे. सन्मान्/आदर हे इन्सेंटिव्हज आहेत. असे इन्सेंटिव्हज की जे फायनान्शियल कॉम्पेन्सेशन्ला कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतात.

----

आणि सहसा जिवंतपणे चौक/पुतळा लेव्हल असू नये असे वाटते.

इथे मला समस्या आहे.

व्यक्ती जिवंत असताना तिला तिने केलेल्या सत्कार्याची जाणीव करून देणे व आभार प्रकटन करणे - हे का खटकते ? ती व्यक्ती वर गेल्यावर तिच्या पतळ्याला हार घालून जे स्पेसिफिक उद्दिष्ट साध्य करायचे असते ते ती व्यक्ती जिवंत असताना पुतळा बांधून केले तर ते उचित असेलच की.

----

The statement that Normally blood sugar is between so and so range can be a part of scientific book/paper. The statement that Nitin Thatte's blood has X mg/dl sugar level cannot be.

इथे आपल्या दोघात मतभेद नाहीत. मी ज्या कोनातून बघतोय तो तुमच्यापेक्षा भिन्न असेल कदाचित.

>>एखाद्याचा पुतळा बांधणे हे त्यास आदर देणे त्याचा सन्मान करण्यासाठीच केले जाते. मरणोत्तर असो अथवा.....

जिवंतपणी आदर आणि सन्मान केला जातोच. तसा तो राव, माशेलकर, भगवती आणि सेन यांचा व्हावाच. आणि तो होत देखील आहे.

चौकाला नाव देणे किंवा पुतळा बांधणे हे मरणोत्तर स्मृती रहावी म्हणून असते. जिवंतपणी हे होणे हे 'सायकोफन्सी' या सदरात मोडते. म्हणून आपले नाव चौकाला दिले जात असताना तिथे उपस्थित असणे म्हणजे सायकोफन्सीत आनंद मानण्यासारखे आहे. म्हणून त्यावर 'पुअर टेस्ट'चा आक्षेप.

-----

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कारण अज्ञान दूर करण्याच्या कार्यात हे बुद्धीवंत लोक अतिसामान्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त योगदान करतात.

माझ्यामते बुद्धीवंत लोक सामान्य लोकांपेक्षा प्रचंड अज्ञान निर्माण करण्यात कितीतरी पटीने जास्त योगदान देतात. आज जितकं अज्ञान आहे तितकं मागे कधीच नव्हतं कारण आज बुद्धीवंत फार जास्त झाले आहेत. हाच ट्रेंड पुढे कायम राहणार असे वाटते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा प्रतिसाद खूपच संक्षिप्त झाला. म्हणून बर्‍याच लोकांना तो बाष्कळ वाटला आहे.
---------------------------
आता खालील बुद्धीवंत लोकांचे कार्य / विचार वाचा.
http://www.collective-evolution.com/2014/09/27/this-is-the-world-of-quan...
हे वाचून माझे अज्ञान वाढले आहे. अगदी ज्ञान नष्टच झाले आहे असे देखिल म्हणता यावे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही माणसं बुद्धिवंत का मानली जावीत? त्या साईटवरचे काही लेख पाहता अंमळ शंका आली. उदा :

Proof Of Reincarnation? This Boy Can Remember Specific Details About His Previous Life As A Woman, Named Pam

थोडं गूगललं असता हे पान सापडलं. त्यावरून काही रत्नं सापडली -
Is There An Organ In Your Brain Which Seats Your Soul? This May Be The Answer

New Study Links Vaccine Induced Overload To Autism

सुज्ञांनी आपापले निर्णय घ्यावेत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी काय म्हणतोय ते समजण्यात अंमळ गफलत* झाली आहे का? (*जी नेहमी तुमच्यासोबत इतरांची होत असते.)
मी दिलेल्या लिंकेमधला माणूस निर्बुद्ध जरी मानला तरी तो बुद्धीवंतांबद्दल बोलतोय. माझ्यासारखाच एक सामान्य माणूस म्हणून तो ज्ञानी लोकांच्या कार्याचा अर्थ लावतोय.
त्याने दिलेले प्रकाशाच्या गतीचे उदाहरण बुद्धीवंतांनी लाज वाटून घेण्यासारखे आहे. दर वेळेस प्रकाशाची गती वेगळी निघते म्हणून आम्ही आता अंतरच प्रकाशाच्या गतीला स्थिर मानू व्याख्यू!!! अरे काय महान जोक आहे!!!!
======================
शिवाय बुद्धिवंत लोकांची एक विशिष्ट विचारसरणीच असते हा विचार नविन वाटला.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Fifth Column: Well done, Kejriwal

तवलीन सिंग यांचा लेख -

Political analysts of leftist persuasion have written gleeful reams about how Delhi was lost because of Hindutva raising its ugly head. I do not believe this to be true. In my view, younger Indians are so uninterested in such things that they would have been willing to ignore the sadhus, the sadhvis, the ludicrous homecomings if they had seen signs of the promised ‘parivartan’. They know that something has gone very wrong with the way India has developed and been governed and it is this that they want to see change.

If the Prime Minister wants proof that nothing has changed, he needs only to summon a Cabinet meeting and ask each of his ministers what changes they have brought about in policies and methods of governance. He will find that there have been changes so minimal as to not count as changes at all. When this is combined with exactly the sort of arrogance we learned to despise in the ancient regime, it becomes a recipe for defeat. This is why Delhi was lost.

>>n my view, younger Indians are so uninterested in such things

याविषयी मला प्रचंड शंका आहे. माझ्या आसपासची तरुण (कॉलेजातील किंवा नुकतीच कॉलेजातून बाहेर पडलेली, नोकरीला लागलेली) माणसे तरी परफेक्टली हिंदुत्ववादी आहेत. तसेच फेसबुकावर दिसणारे नमोरुग्णसुद्धा तसेच दिसतात. हे लोक निवडणुकीपूर्वी निदान फोटोशॉप केलेले गुजरात विकासाचे फोटो टाकत असत. आता तसे फोटो येणे बंद झाले आहे त्याअर्थी विकास हा नुसता प्रचारकी मुखवटाच होता. खरी इच्छा हे साधु साध्वी करत आहेत त्याच्याच होत्या.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

याविषयी मला प्रचंड शंका आहे.

आता मला याविषयी चिंता आहे. माझ्या भोवतीच्या तरूणांना भारताच्या सेक्यूलरीझमबद्दल पडलेले असते. ते जात पात देव धर्म मानत नाहीत. या गोष्टींना त्यांच्या जीवनात स्थानच नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला फेसबुकवरच्या भाजपेयींच्या* पोष्टींमध्ये या साधु साध्वींचा निषेध करणार्‍या पोष्टी दिसतात का? मला तरी दिसत नाहीत. मला मुख्यत्वे केजरीवालला नावे ठेवणार्‍याच पोस्ट दिसतात. आता निवडणुका संपल्या आहेत. आता पाहू काय होते ते.

*२०१४ च्या निवदणुकीत जे हिरिरीने नमोनमो करत होते ते.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Arvind Kejriwal part of RSS plan for Congress-free India: Digvijay Singh

दिग्विजय सिंग यांच्या चरणाचे तीर्थ हवे आहे मला आता. कुणी मदत करा !!!

-----

Prime Minister Benjamin Netanyahu on Sunday called for massive immigration of European Jews to Israel

नेतान्याहू यांनी आपल्याकडून काही शिकावे. युरोपातून आयात करण्यापेक्षा त्यांनी पॅलेष्टाइनातील मुसलमानांची* घरवापसी करून घ्यावी.

*अवांतर: प्यालेष्टाइनमधील आजच्या मुसलमानांना अरब समजले जाते. येशू आणि मोझेस हे अरब नव्हते का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इस्रायल मधे लवकरच (येत्या चार पाच आठवड्यांत) राष्ट्रीय संसदीय निवडणूका असल्याने नेतानयाहू सध्या अशी विधाने करतीलच. नवल ते काय ???

बाय द वे नेतानयाहूंनी केलेली प्रचाराची जाहिरात इंट्रेष्टिंग आहे. https://www.youtube.com/watch?v=0CzqrB7aQgs

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Woman-cant-evict-hubby-ju...

नवरा ९०००० रु घरखर्चाला देतो. बायको ईएमआय भरते. घर जॉइंट नावावर आहे.

बायकोला सल्ला देणार्‍या वकीलाच्या बुद्धीबद्दल शंका येत आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कॉ. पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला!

जळजळीत निषेध!
यातून ते वाचोत नी ज्यांनी हा हल्ला केला व करवला ते दोघेही सापडून कायद्यापुढे उभे राहोत ही सदिच्छा व्यक्त करतो.

दाभोलकरांनंतर आणखी एका कार्यरत व क्रीयाशील समाजकारण्यावर ही वेळ यावी याचे दु:ख वाटते

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.hindustantimes.com/world-news/new-islamic-state-video-shows-m...
इस्लामिक स्टेटचा प्रभाव पहिल्यांदाच इराक्/सिरीया बाहेर दिसतोय. लिबियात २१ कॅथोलिक लोकांचे शिरकाण!!!

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Sad
हे इसिस प्रकरण इतके दिवस चालवून घेणार्‍या युनोचा निषेध!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वात चिंताजनक प्रकार हा आहे कि या लोकांनी आपल्या राज्याला इस्लामिक स्टेट असे नाव जोडले आहे. यातून जगात अकारण ख्रिश्चन/जपानी लोकांत मुस्लिम लोकांबद्दल वैमनस्य निर्माण होण्याचा धोका आहे. वास्तवात जगातल्या सर्व सुज्ञ* मुस्लिमांना हा प्रकार आपल्या नावावर कलंक वाटतो.
-------------
* अनावश्यक शब्द. सुज्ञ नसला तरी प्रत्येक मुस्लिम माणसाला हे शिरकाण चुकिचेच वाटते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तसे नसावे. त्या राज्याची प्रेरणा धार्मिक भुमिकेतूनच आहे. नी ते नावातून पुरेसे स्पष्ट केलेले आहे.
इतर प्रकारच्या मुलतत्त्ववाद्यांप्रमाणेच मुस्लिम मुलतत्त्ववाद असा नाव झाकून नष्ट होणार्‍यातला नाही. त्या नावासकटच त्याला नामोहरम केले पाहिजे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इस्लामिक राज्यापूर्वी इराक किंवा सिरीयात असं कोणतं इस्लामचं ऑप्रेशन होत होतं म्हणून इस्लामिक राज्याची गरज पडावी? लिबियात कोणता अन्याय आहे इस्लामवर? आणि जर रोमवर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहात तर इटलीवर्, रोमवर हल्ला करा ना, इराकवर कशाला?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इराक व सिरीया "पुरेसा इस्लामिक" नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@ऋशेठः

हे इसिस प्रकरण इतके दिवस चालवून घेणार्‍या युनोचा निषेध!

चालवून न घेणे म्हणजे काय करणे?

त्या नावासकटच त्याला नामोहरम केले पाहिजे!

काय केले पाहिजे आणि कोणी?
अश्या प्लॅनचे एखादे काल्पनिक उदाहरण?

वापरायचे असल्यास लष्करी कारवाई सकट अनेक मार्ग आहेत. इराक येथील सद्दामच्या ऑफिशियल राजवटीला उलथवायला आतूर झालेल्या आम्रिकादी मित्र राष्ट्रांना आयसिस मात्र तितकी खुपत नाहिये हे रोचक आहे.

तुर्तास त्यांचे तेथील टिकून असण्याला बरेच गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय राजकीय पदर व कारणे आहेत.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे इसिस प्रकरण इतके दिवस चालवून घेणार्‍या युनोचा निषेध!

युनोला नक्की काय फरक पडतोय म्हणून त्यांनी यात पडावे? हरामखोर युरो-अमेरिकन लोकांना मध्ये पडायला इन्सेण्टिव्ह हवे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://zeenews.india.com/news/west-bengal/tmc-wins-krishanganj-takes-mas...
भाजपने बंगालमधे काँग्रेस व सीपीआय ला तिसर्‍या चौथ्या स्थानावर ढकलले आहे. भाजपची बंगालमधली हवा वाटते तितकी खोखली नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ममता डाव्यांहून डावी वागु लागली आणि बंगालातील काँग्रेसही त्या भरात अधिक डावी होऊ लागली
बंगालात डावे विरूद्ध अतिडावे अशा भुमिकांमध्ये चढाओढ असताना निर्माण झालेली मध्याच्या आसपास घुटमळणारी विरोधकांची पोकळी भाजपा भरून काढत आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाजप पोकळी भरून काढू पाहतीये हे खरंय, आणि राज्यस्तरीय काँग्रेसमधे फारच गोंधळ आहे, सीपिएम गेल्या निवडणुकांच्या पराजयातून बाहेर आलेले नाही हे देखील खरंय. पण सिंगूर हे कारण फार जुनं झालं. सिंगूर मधे शेतकर्‍यांची बाजू घेतल्याने तृणमूल ला विधान सभेच्या निवडणुकांमधे यशच आले होते. कलकत्त्याच्या शहरी मंडळींमधे तृणमूलबद्दलचे आकर्षण कमी झाले असले तरी आजही ग्रामीण भागांत, राष्ट्रीय मीडियाच्या नजरेआड, तृणमूल ला प्रचंड प्रमाणात समर्थन आहे. तृणमूल बद्दल निराशा (पण अजून ममताबद्दल नाही) अलिकडच्या शारदा स्कॅम, आणि त्यात तृणमूलच्या बर्‍याच मंत्र्यांचा सहभाग असल्याने, जास्त वाढली आहे.

आमच्या ऑफिस शेजारी एका छोट्याशा मोकळ्या जागेत आजकाल रोज चार वाजता संघाची शाखा भरतेय.

आभार.

सिंगूर जुनं झालं हे मान्यच. मात्र एकुणच दिदि डावी बाजू सोडायला तयार नाहित. डाव्यांना त्या मोठ्या जागेतून दिदिंनी हाकलल्यावर डावीकडे उरलेल्या लहान जागेत डावे नी काँग्रेस सगळेच बसू पाहताहेत. अशावेळी भाजपा मध्याच्या भोवती - उजवीकडील - डाव्या बाजु इतकी मोठी नाही पण लक्षणीय- जागा भरू पाहतोय इतकाच लिमिटेड पॉइंट होता.

तुमच्या प्रतिसादातून प्रत्यक्षातील माहितीही कळली. म्हणून आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ममताने अशी कोणती "डाव्यांहून डावी" कामे केली?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यादीच देता येईल. तुर्तास सिंगूर पुरेसे बोलके नाही काय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डाव्या हुन डावे होण्यासाठी कामे करायला लागतात असे कोणी सांगितले अजो.

हल्लीची पत्रकारीता आणि माध्यमे कशी उथळ होत चालली आहेत ह्याचे एक उदा. मटा मधल्या लेखाचे टायटल असे होते "‘डिजिटल अंधार युग’ येणार"
आणि बातमी मधे ही माहीती.
http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/computer/Internet-pionee...

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||