ही बातमी समजली का? - ५९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
===========
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले आहे.
Taxonomy upgrade extras
झी न्यूज, आयबीएन, इंडियन
झी न्यूज, आयबीएन, इंडियन एक्स्प्रेस, महाराष्ट्र टाइम्स अशा अनेक ठिकाणी बातमी आहे.
घ्या !!! आणखी अतिक्रमणांना आमंत्रण.
घ्या !!! आणखी अतिक्रमणांना आमंत्रण.
तसेच - The (Kejriwal) cabinet also set in motion the process to implement two key promises made by AAP - 50% reduction in power tariff by way of a subsidy and free water up to 20 kl for all consumers.
------
स्वस्त पाणी आणि वीज मिळते
स्वस्त पाणी आणि वीज मिळते म्हणून इतर राज्यांतून दिल्लीत अतिक्रमणे होतील?
नाय नाय. माझा मुद्दा - अतिक्रमणे तोडणे जर कायदेबाह्य असेल तर अतिक्रमणांना उत्तेजना का मिळणार नाही ? इझंट धिस अ क्लासिक केस ऑफ मोरल हजार्ड ??
--
व स्वस्त दरात ल्या वीजेच्या मुद्द्याच्या मागे "तसेच" हा शब्द होता. वाक्यातला पहिला शब्द.
--
पण तुमचा मुद्दा - कोरिलेशन डझ नॉट इम्प्लाय कॉजेशन - बरोबर आहे. पण कोरिलेशन डझ नॉट नेसेसरीली प्रिक्लुड कॉझेशन.
अॅक्च्यली स्वस्त दरात वीज व २० लिटर पाणी मोफत हे अतिक्रमणांना उत्तेजक म्हणून काम का करणार नाही ?
??
>>अॅक्च्यली स्वस्त दरात वीज व २० लिटर पाणी मोफत हे अतिक्रमणांना उत्तेजक म्हणून काम का करणार नाही ?
स्वस्त वीज आणि फुकट पाणी हे फक्त अतिक्रमण करणार्यांनाच आहे का? तुम्ही वर दिलेल्या उद्धृतात तसे नाही.
माझ्या मुद्द्यावर तुमचे काय म्हणणे आहे? अकुशल कामगारांना मिळणार्या वेतनात अतिक्रमण न करता राहता येत नाही. आणि इतक्या कमी वेतनात काम करणारे अकुशल कामगार ही शहरातल्या श्रीमंतांची गरज आहे.
ह्या समाजवादी फुकटेपणात
ह्या समाजवादी फुकटेपणात भांडवल असणारे आणि सत्ताधीशांच्या जवळच्या लोकांना कधीच त्रास होत नाही, ( गेली ६० वर्ष बघतोच आहोत ). फुकट्यांची तर मजाच असते. पण त्यासाठी लागणारी किंमत ( कॉस्ट ह्या अर्थी ) पांढरपेशा टॅक्स पेयर, नोकरीपेशा, कायद्याला घाबरणारा मध्यमवर्ग भरत असतो. त्यामु़ळे ऋषिकेश, तुमच्या आणि माझ्या सारख्यांना सर्वात जास्त त्रास होणार आहे ह्या फुकटेगिरीचा.
त्यातुन त्या भरडल्या गेलेल्या वर्गाला ( पांढरपेशा टॅक्स पेयर, नोकरीपेशा, कायद्याला घाबरणारा मध्यमवर्ग )असा मेसेज जातो की प्रत्येक गोष्ट ही अशीच लुबाडुन आणि फुकट मिळवायची असते.
असेलही किंवा नसेलही! मात्र
असेलही किंवा नसेलही! मात्र तुम्ही मांडलेला तर्क माहितीतला आहे. त्यावर बरेच आधीच अनेक ठिकाणी बोलले गेले आहे. थत्तेचा मुद्दा लाऊन धरण्यासाठी त्यावर सध्या मौन बाळगतो.
तुर्तास, मला यामुळे भांडवलदारांचे कसे नुकसान आहे या दृष्टीने वरील थत्ते यांच्या तर्काचे खंडन ऐकण्यात (गब्बर कडून आले तर अधिकच छान - पण तो आता सोयीस्कर मौन बाळगेल अशी भिती वाटते आहे ;) :P ) अधिक रस आहे :)
थत्तेंच्या मुद्द्याचे खंडन
थत्तेंच्या मुद्द्याचे खंडन केलेय की खाली.
??
>>त्यामु़ळे ऋषिकेश, तुमच्या आणि माझ्या सारख्यांना सर्वात जास्त त्रास होणार आहे ह्या फुकटेगिरीचा.
अदरवाईज अतिक्रमणे मोडून काढली तरीसुद्धा तुम्हाला त्रास होणारच आहे.
तुमच्या प्रत्येक वॉचमनचा पगार (ठाण्यात) महिना किमान ६००० रुपयांनी वाढवला पाहिजे.
तसेच कामवालीला ती दहा घरी काम करते असे मानले तर ६०० रु जास्त द्यायला हवेत.
रिक्षावाल्यांची भाडी, सुतार/प्लंबर/वायरमन इत्यादींना त्यांना अधिकृत घरात राहणे परवडेल इतपत मोबदला द्यावा लागेल.
अधिक सर्व कंत्राटी कामगारांना अधिक वेतन देणे कारखान्यांना भाग पडल्यामुळे सर्व वस्तूंच्या किंमती जास्त द्याव्या लागतील.
आता गब्बरसिंग म्हणतील की कॉस्ट पुश इन्फ्लेशन ही चुकीची कल्पना आहे. पण कॉस्ट पुश इन्फ्लेशन कसे होते ते मी इतरत्र दाखवले आहे.
स्वस्त वीज आणि फुकट पाणी हे
स्वस्त वीज आणि फुकट पाणी हे फक्त अतिक्रमण करणार्यांनाच आहे का? तुम्ही वर दिलेल्या उद्धृतात तसे नाही.
स्वस्त वीज आणि २० लि. पर्यंत फुकट पाणी हे फक्त अतिक्रमण करणार्यांनाच नाही. सगळ्यांना आहे. मुद्दा हा आहे की "सगळ्यांना" यामधे २ भाग - अ) जे दिल्लीवासी आहेत ते. ब) व जे भविष्यात दिल्लीवासी होणार आहेत ते. माझे म्हणणे हे आहे की - स्वस्त वीज आणि २० लि. पर्यंत फुकट पाणी हे - (ब) ला उत्तेजना देणारे आहे. व याचा परिपाक म्हणून अतिक्रमणे वाढतील. म्हंजे दुसर्या शब्दात - The subsidized electricity and water will re-inforce/exacerbate the problem of encroachments because demolition of encroachment has been made illegal.
-----
माझ्या मुद्द्यावर तुमचे काय म्हणणे आहे? अकुशल कामगारांना मिळणार्या वेतनात अतिक्रमण न करता राहता येत नाही. आणि इतक्या कमी वेतनात काम करणारे अकुशल कामगार ही शहरातल्या श्रीमंतांची गरज आहे.
अ .... हं.
१) दिल्ली मेट्रो चे दर अत्यंत माफक् आहेत. (मिनिमम वेज च्या तुलनेत जरी म्हंटले तरी माफक आहेत.). दिल्ली बाहेर राहूनही व्यक्ती ये जा करू शकते.
२) मिळणारे वेतन पुरत नाही (तुटपुंजे आहे) म्हणून अतिक्रमण करणे हे संयुक्तिक आहे ?? अतिक्रमण ही चोरी आहे. दुसर्याची मालमत्ता हडप करणे. ती मालमत्ता मोबदला न देता वापरणे. मग ती सरकारची का असेना ??
३) अर्बन एरियाकडे मायग्रेशन होते हे नेमके कशाचे लक्षण आहे ते सांगतो - हे नेमके - अकुशल, सेमिकुशल व कुशल कामगारांना रोजगाराची गरज आहे याचे लक्षण जास्त आहे. श्रीमंतांना त्यांची गरज कमी व त्यांना श्रीमंतांची गरज प्रचंड जास्त आहे. श्रीमंत फक्त शहरातच असतात असे नाही. गावात सुद्धा असतात. मग गावाकडून शहराकडे मायग्रेशन का होते ???
४) तुमचे म्हणणे - की श्रीमंतांना या कामगारांची गरज आहे - हे जरी खरे मानले तरी - ह्या सगळ्या योजना (स्वस्त वीज आणि फुकट पाणी) म्हंजे वेल्थ रिडिस्ट्रिब्युशन नाहीच असे म्हणता येईल ???
५) माझा मुख्य मुद्दा आहे तो "आणखी" अतिक्रमणा चा आहे. दिल्लीचे आजचे जे मतदार आहेत त्यांना स्वस्त वीज आणि फुकट पाणी मिळणारच आहे. पण या "स्वस्त वीज आणि फुकट पाणी" मुळे भावी कालात जे अतिक्रमण वाढणार आहे त्याबद्दल माझा मुद्दा आहे. आजच्या घडीला जे अतिक्रमण आहे त्यात जे लोक राहतात ते श्रीमंतांची आजचीच काय पण भावी गरज भागवायला सुद्धा पुरेसे नाहीत का ??? व नसतील तर (अधिक मायग्रेशन च्या अनुपस्थितीत) त्या कामगारांच्या तनख्वा वाढणार नाहीत का ??? व हे त्या कामगारांच्या हिताचे नाही का ????
६) ह्या सगळ्या सुविधा (स्वस्त वीज आणि फुकट पाणी) दिल्या नाहीत तर अतिक्रमणे होणार नाहीत व मायग्रेशन सुद्धा होणार नाही असे गृहित धरू (क्षणभर). हे गृहितक खरे खोटे ते नंतर तपासून पाहता येईलच. जर श्रीमंतांची गरज जास्त असेल तर सध्या जे कामगार दिल्लीत आहेत त्यांच्या तनख्वा वाढतील (कारण कामगारांचा सप्लाय कमी झालेला आहे ... मायग्रेशन कमी झालेले असल्यामुळे). व हे दिल्लीच्या आजच्या कामगारांच्या (मतदारांच्या) हिताचे च होणार नाही का ????
>>१) दिल्ली मेट्रो चे दर
>>१) दिल्ली मेट्रो चे दर अत्यंत माफक् आहेत. (मिनिमम वेज च्या तुलनेत जरी म्हंटले तरी माफक आहेत.). दिल्ली बाहेर राहूनही व्यक्ती ये जा करू शकते.
दिल्ली मेट्रो कुठवर जाते. त्या शेवटच्या बिंदूला अधिकृत २०० स्क्वे फू घराचे भाडे किती आहे?
>>अकुशल, सेमिकुशल व कुशल कामगारांना रोजगाराची गरज आहे याचे लक्षण जास्त आहे. श्रीमंतांना त्यांची गरज कमी व त्यांना श्रीमंतांची गरज प्रचंड जास्त आहे.
गरज म्युच्युअल आहे. उदाहरणार्थ जे कामगार समजा एल & टी* मध्ये १९८० मध्ये काम करत असत त्यांना भरपूर पगार मिळे आणि त्यामुळे त्यांना "अतिक्रमण न करता राहता येई". त्यानंतर एल & टी ने मागच्या दशकात मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग केले असेल/किंवा परमनंट कामगारांना नारळ देऊन कंत्राटी कामगार घेतले असेल. त्यामुळे त्यांना अनधिकृत झोपडपट्टीत राहणार्यांकडून किंवा अनधिकृत गाळ्यांमध्ये लेथ मशीन टाकून कामे करणार्यांकडून स्वस्तात काम करून घेणे शक्य झाले. असे कामगार+ उद्योजक मिळाल्याने एल & टीला बाजारात कॉम्पिटिटिव्ह राहणे शक्य झाले. कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी स्वस्त कामगारांची कारखान्यांना गरज आहे. कामगारांना रोजगाराची गरज आहे.
बघा विचार करून ....
ह्या सगळ्या योजना (स्वस्त वीज आणि फुकट पाणी) म्हंजे वेल्थ रिडिस्ट्रिब्युशन नाहीच असे म्हणता येईल ???
मी कुठे नाही म्हणतो? पण त्यात श्रीमंतांवर खरे तर जबरदस्ती नाही. दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे.
लोक मायग्रेट होतात आणि होतच राहणार... त्याचा मोफत/स्वस्त वीज पाण्याशी संबंध नाही. त्यामुळे मायग्रेशन वाढणार नाही. ते वाढेल हे केवळ कन्जेक्चर आहे.
*एल & टी हा केवळ प्लेस होल्डर आहे. पण कंत्राटी कामगारांची प्रथा सुरू होणे आणि झोपडपट्ट्या वाढण्यात कोरिलेशन आहे. कॉजेशन आहे की नाही हे ठाउक नाही.
गरज म्युच्युअल आहे.
गरज म्युच्युअल आहे. उदाहरणार्थ जे कामगार समजा एल & टी* मध्ये १९८० मध्ये काम करत असत त्यांना भरपूर पगार मिळे आणि त्यामुळे त्यांना "अतिक्रमण न करता राहता येई". त्यानंतर एल & टी ने मागच्या दशकात मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग केले असेल/किंवा परमनंट कामगारांना नारळ देऊन कंत्राटी कामगार घेतले असेल. त्यामुळे त्यांना अनधिकृत झोपडपट्टीत राहणार्यांकडून किंवा अनधिकृत गाळ्यांमध्ये लेथ मशीन टाकून कामे करणार्यांकडून स्वस्तात काम करून घेणे शक्य झाले. असे कामगार+ उद्योजक मिळाल्याने एल & टीला बाजारात कॉम्पिटिटिव्ह राहणे शक्य झाले. कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी स्वस्त कामगारांची कारखान्यांना गरज आहे. कामगारांना रोजगाराची गरज आहे.
.
.
गरज ही म्युच्युअल आहे व सर्वसामान्यपणे अनेकदा असते. कोणाकडे बार्गेनिंग पॉवर जास्त आहे ?? हा नेहमी कळीचा प्रश्न असतो. There are many many more workers available to perform a particular task than needed by L&T. Also L&T has the CAPITAL to replace (substitute) a group of workers by means of machine(s). इथे कामगारांची उत्पादकता अत्युच्च असली तरी L&T has a number of options. याचा च अर्थ L&T कडे जास्त बार्गेनिंग पॉवर जास्त आहे. व हाच माझा मुद्दा आहे. कॅपिटलिस्ट्स हॅव अ लॉट मोअर बार्गेनिंग पॉवर दॅन वर्कर्स. याचा साध्यासोप्या भाषेत अर्थ हा की - कॅपिटलिस्टांना कामगारांची गरज असली तरीही कामगारांना कॅपिटलिस्टांची गरज जास्त आहे.
व हे दिवसेंदिवस जास्त बिकट चित्र होत आहे - असे माझ्या वाचनातून मला वाटते. माझे वाटणे फायनल आहे असे नाही. व तसंही मला फोरकास्टिंग वर फारसा भरोसा नाही.
-----
मी कुठे नाही म्हणतो? पण त्यात श्रीमंतांवर खरे तर जबरदस्ती नाही. दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे.
ह्यात श्रीमंतांवर जबरदस्ती होतेय की नाही ते दिल्लीतील सेल्स्टॅक्स चे रेट्स बघूनच ठरवता येईल.
-----
लोक मायग्रेट होतात आणि होतच राहणार... त्याचा मोफत/स्वस्त वीज पाण्याशी संबंध नाही. त्यामुळे मायग्रेशन वाढणार नाही. ते वाढेल हे केवळ कन्जेक्चर आहे.
खरंतर मिनिमम वेज मुळे मायग्रेशन होते हे एका पेपर द्वारे सिद्ध झालेले आहे. Here. जे मिनिमम वेज मुळे होते ते स्वस्त वीज व पाणी यामुळे नक्की होईलच असे मला म्हणायचे नाही. पण ... कंजेक्चर इन्व्हॅलिड नाही.
>>ह्यात श्रीमंतांवर जबरदस्ती
>>ह्यात श्रीमंतांवर जबरदस्ती होतेय की नाही ते दिल्लीतील सेल्स्टॅक्स चे रेट्स बघूनच ठरवता येईल.
सेल्स टॅक्सचे रेट दिल्लीत नेहमीच कमी राहिले आहेत. शिवाय केजरीवालच्या म्हणण्याप्रमाणे तो रेट कमी करणार आहे तो सिस्टिममधील भ्रष्टाचार कमी करून आणि वीज कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्याला चाप लावून (I don't know what this means). नफ्याला चाप लावला की सबसिडी कमी होईल.... वगैरे
आणखी शिवाय सेल्स टॅक्स सगळ्यांना भरावा लागतो. फडतूसांनासुद्धा...
पण श्रीमंत वापरतात त्या
पण श्रीमंत वापरतात त्या वस्तूंवर जास्ती सेल्सटॅक्स लावणे वगैरे उद्योग करते सरकार.
एक उदाहरण द्याल? उगाच काहीही म्हणू नकात. सरकार गरीबांच्या गरजांवर जास्त व्हॅट लावते.
http://dvat.gov.in/App_Themes/PublicNotices/Schedule_2014.pdf
इथे वॅट माफ असलेल्या आयटमची लिस्ट आहे. जवळजवळ सगळे आयटम श्रीमतांचे आहेत वाटतेय.
मुद्दा मान्य. मी अतिक्रमणे
मुद्दा मान्य.
मी अतिक्रमणे निर्दय पणे तोडून काढण्याच्या मताचा आहे. मधे येणार्या प्रत्येकास क्रूर पणे कुचलून मारून टाकावे व अतिक्रमणे तोडून काढावी या मताचा आहे.
केजरीवाल स्वतःची व्होट बँक (अजाणतेपणे) वृद्धींगत करण्याचा यत्न करीत आहे. युपी, हरयणा मधून येणारे स्थलांतरित दिल्लीतील स्वस्त दरात वीज, पाणी तसेच "मिनिमन वेतना" मुळे सुद्धा आकर्षित होतील. Minimum Wage Policy (Delhi Govt.) (अर्थात हे मिनिमम वेज एन्फोर्स कितपत केले जाते हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतोच.)
म्हणूनच मी प्रायव्हेट सिटिज चा फॅन आहे. पण प्रायव्हेट सिटिज उदयास आल्या तरी नंतर सरकारी हस्तक्षेप इतका होईल तो सगळा प्रकारच ओम्फस्स होईल. व कदाचित - anticipating this potential excessive Governmental intervention... the private city concept does not even take root.
Govt approves construction of
Govt approves construction of 7 stealth frigates, 6 nuclear-powered submarines
Modi government has cleared the indigenous construction of seven stealth frigates and six nuclear-powered attack submarines, which together will cost well upwards of Rs 1 lakh crore.
इस बात पर एक जाम हो जाए.
चिअर्स! चांगभलं! फक्त आपण या
चिअर्स! चांगभलं! :)
फक्त आपण या टारगेटच्या काही वर्षे मागे आहोत हेही लक्षात घ्यायला हवे!
RSS ला मौलवींनी सहा प्रश्न
RSS ला मौलवींनी सहा प्रश्न विचारले आहेत.
याची उत्तरे आर एस एस देईल असे तुम्हाला वाटते का? मला नाही वाटत.
भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे
- भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे संघ मानतो काय?
- भारताला हिंदुराष्ट्र करण्यासाठी संघाने काही कार्यक्रम तयार केला आहे काय?
- हे हिंदुराष्ट्र हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांच्या आधारे चालणार की त्यासाठी संघाने काही नवे तत्त्वज्ञान तयार केले आहे?
- धर्मांतर करून तुम्ही काय साधणार आहात?
- मुस्लिमांकडून संघाला कोणत्या प्रकारचे 'राष्ट्रप्रेम' अभिप्रेत आहे?
- इस्लामकडे पाहण्याचा संघाचा नेमका दृष्टिकोन काय?
यातील प्रश्न क्र. ३ हा अगदीच बिनडोक प्रश्न आहे. संघाचे तत्वज्ञान (हिंदुत्व असो वा एकात्मिक मानवतावाद) जाहीर आहे. (जाहीर चा अर्थ सुसंगत, सुयोग्य असा नाही. जाहीर म्हंजे गुप्त नसलेले.)
प्रश्न क्र. ४ - कोणावरही जबरदस्ती न करता व फसवणूक न करता जर धर्मांतर केले जात असेल तर हा प्रश्न विचारण्यात नेमके काय हशील आहे ??? संघा ला जर हिंदुंची संख्या वाढावी असे वाटले तर ते आक्षेपार्ह नाही व नसावे. व तेच इतर धर्माचे प्रचारक जेव्हा धर्मांतर करवतात ते आक्षेपार्ह नाही व नसावे.
खरंतर हे प्रश्न विचारणे हे च मुळी तितकेसे संयुक्तिक नाही. चलाखपणा आहे. हे प्रश्न त्यांनी मुस्लिम म्हणून विचारलेले आहेत. व्यक्ती म्हणून नाही. मुस्लिमांपैकी ज्यांना मुस्लिमप्रधान राष्ट्र हवे होते ते पाकिस्तानात गेले. त्यांना त्यांच्या धर्माची म्हणून स्वतःची भूमि मिळाली. ज्यांना मुस्लिमप्रधान राष्ट्रात जायला नको होते ते भारतात राहिले. मुस्लिमांना ... they got all that they wanted. हो की नाही ?
नक्की काय?
>> यातील प्रश्न क्र. ३ हा अगदीच बिनडोक प्रश्न आहे. संघाचे तत्वज्ञान (हिंदुत्व असो वा एकात्मिक मानवतावाद) जाहीर आहे.
संघातर्फे अधिकृतरीत्या नक्की काय तत्त्वज्ञान स्वीकारलेलं जाहीर आहे? (प्रश्न खवचट नाही.) 'हिंदुत्व असो वा एकात्मिक मानवतावाद' असं म्हणताना तुम्हीही हे मान्य करता की त्यात सुसंगती नाही. त्यामुळे नक्की काय स्वीकारार्ह आहे ह्याबद्दल लोकांच्या मनात गोंधळ होणं स्वाभाविक नाही का?
मुद्दा उचित आहेच. दोन
मुद्दा उचित आहेच. दोन आयडिऑलॉजीज ची गरज का भासते ??? दोन्ही मधे द्वंद्व निर्माण झाले तर कोणती प्राधान्याने राबवणार ?? ( हे व असे अनेक उचित प्रश्न आहेत.)
संघाच्या मुखपत्रातून (ऑर्गनायझर) दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावादाचा मुद्दा बरेचदा मांडला जातो. संघाचे देश चालवण्यासाठी निर्माण केलेले संगठन म्हंजे भाजपा. त्यांच्या संकेतस्थलावर एकात्मिक मानवतावाद हे आमचे तत्वज्ञान आहे हे भाजपा उघड पणे म्हणतो. प्रश्नकर्त्याने २ बाबी कंबाईन केलेल्या आहेत - अ) हिंदुराष्ट्र हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांच्या आधारे चालणार का ??, ब)की "हे राष्ट्र चालवण्याचे दुसरे तत्वज्ञान निर्माण केलेले आहे ??? "
एकात्मिक मानवतावाद चा तपशील वाचलात तर समजेल की तो देश चालवण्याचे तत्वज्ञानच आहे. इथे. It is actually a document of political philosophy. Heck ... it even takes potshots at other political philosophies.
माझा मुद्दा हा आहे की - या दोन्ही प्रश्नांची उत्तरे संघाने दिलेली आहेत. आधीच. (ती माझ्या दृष्टीने समस्याजनक आहेत हा भाग निराळा). पण उत्तरे अस्तित्वातच नाहीत असा अध्याहृत दावा प्रश्नकर्त्याचा आहे असे दिसते.
व मुस्लिम पर्सनल लॉ अस्तित्वात असताना हा प्रश्न आगाऊपणाचा वाटतो. (मी समान नागरी कायद्याचा समर्थक नाही. )
विसंगती
>> या दोन्ही प्रश्नांची उत्तरे संघाने दिलेली आहेत. आधीच. (ती माझ्या दृष्टीने समस्याजनक आहेत हा भाग निराळा). पण उत्तरे अस्तित्वातच नाहीत असा अध्याहृत दावा प्रश्नकर्त्याचा आहे असे दिसते.
दिलेली उत्तरं विसंगत आहेत म्हणून प्रश्न बिनडोकपणाचा नाही. (तुमची लिंक भाजपची आहे; संघाची नाही.)
>>मुस्लिमांपैकी ज्यांना
>>मुस्लिमांपैकी ज्यांना मुस्लिमप्रधान राष्ट्र हवे होते ते पाकिस्तानात गेले. त्यांना त्यांच्या धर्माची म्हणून स्वतःची भूमि मिळाली. ज्यांना मुस्लिमप्रधान राष्ट्रात जायला नको होते ते भारतात राहिले.
याविषयी साशंक आहे. शेवटी पाकिस्तान बनले ते बहुसंख्येच्या प्रदेशांचे. त्या प्रदेशातल्या लोकांना पाकिस्तान हवेच होते की नाही याची कल्पना नाही. मुस्लिम राष्ट्रवाद्यांची सगळी मुख्य केंद्रे उत्तरप्रदेशात होती/आहेत.
सेन्सॉर बोर्ड, बॅन्ड शब्दांची यादी वगैरे
१३ फेब्रुवारी : चित्रपटांतून काही शब्दांच्या वापरावर बंदी - पहलाज निहलानी
१३ फेब्रुवारी : कोणकोणते शब्द बॅन केले आहेत?
१८ फेब्रुवारी : निहलानींवर थोडा लगाम घातला जाईल?
१८ फेब्रुवारी : मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रतिक्रिया
आणि इथपर्यंत पोहोचलाच आहात, तर एन्जॉय करा डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि पहलाज निहलानी निर्मित 'अंदाज'मधलं (१९९४) हे गाणं -
घ्या. अव्वाच्या सव्वा किंमती लावतात ना डॉक्टर्स. ही घ्या प्राईस
घ्या. अव्वाच्या सव्वा किंमती लावतात ना डॉक्टर्स. ही घ्या प्राईस सीलिंग.
NEW DELHI: The government has issued an advisory to regulate prices for swine flu tests across the country to save consumers from being overcharged. This comes in the wake of health ministry receiving complaints that private labs are fleecing consumers for the test, even as the number of cases infected with H1N1 influenza A continues to rise.
"We have asked all the states to take stringent measures to monitor prices as consumers should not be overcharged for such tests. We have already written to Delhi government and advised other states also to regulate prices if there are complaints," Union health secretary B P Sharma told TOI.
वायफाय
http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Patnas-free-Wi-Fi-zone-ca…
लोक किती फ्रिक असतात पाहा. नितिश कुमारांनी १८ किमी लांबीचा फ्री वाय फाय झोन बिहारात फेब्रुवारी २०१४ मधे जाहीर केला. लोकांनी त्यांना लोकसभेत मतेच दिली नाहीत. केजरीवालांचे अपिल दिल्लीकरांना प्रचंड झाले.
गाढवाला* गुळाची चव काय असे म्हणावे का?
====================
गाढव म्हणजे बिहारची जनता.
याआधी दिले जाणारे नो पोल्युशन
याआधी दिले जाणारे नो पोल्युशन सर्टिफिकेट कसे दिले जात होते, अश्या लहान इंडस्ट्रीकडून किती प्रमाणात पोल्युशन होते वगैरे माहिती कळली तर काही मत देता यावे.
==
तोवर मनात पटकन आलेली प्रतिक्रीया: जर आधी हे सर्टिफिकेट तसेही पैसे खाऊन दिले जात असेल तर ते असले काय नसले काय होणार्या प्रदुषणात काहीच फरक न पडावा. हे सर्टिफिकेट गेल्याने किमान भ्रष्टाचार व "रेड टेप उशीर" तरी कमी होईल
मात्र याच बरोबर खरंतर सरकारने शहरातील प्रदुषण कमी कसे होईल यासाठी मोठे कारखाने वगैरेंसाठी हे कायदे कडक करत अधिकप्रयत्न करणे गरजेचे आहे.
मात्र जर या लहान व्यावसायिकांकडून एकुणात हे प्रदुषण खूप असेल तर मात्र निर्णय चुकलाय म्हणावे लागेल
सागरिका घोष व अमर्त्य सेन
Sagarika Ghose & Amartya Sen: The Interview That Wasn’t
Is pro-poor, Left politics re-emerging?
No questions on Nalanda yet? Great! I am really enjoying this. But I will still answer your question.
Being an economist, I do not have the luxury which you journalists have of drawing conclusions based on a ridiculous sample size of events. If Left politics is re-emerging then why is Prakash Karat seen most of the time wandering about in Palika Bazar? I would like to reiterate that please do not come to such major conclusions based on one election in one city. Tomorrow if BSP wins a by-poll in UP, will you say that people have now begun to support the building of statues?
-----------
भारतीय पुरुष स्त्रियांकडे टक लावून का बघत बसतात ??
.
The reasons for staring may be numerous but the truth is that we unfortunately live in a sexually deprived and depraved society, largely helped along by stereotypes and to a certain extent Bollywood. I, for one, firmly believe that proper education, not just at school but also at home, on the TV, movies, etc. is the only way out of this stare-struck country of ours.
.
.
लेखक अनंतनाथ झा यांनी "पुरुष स्त्रियांकडे टक लावून बघतात" ही समस्या नसण्याची शक्यता नाहीच असे गृहित का धरलेले आहे ????
.
-------
.
.
-------
लेखक अनंतनाथ झा यांनी "पुरुष
लेखक अनंतनाथ झा यांनी "पुरुष स्त्रियांकडे टक लावून बघतात" ही समस्या नसण्याची शक्यता नाहीच असे गृहित का धरलेले आहे ????
या वाक्यासाठी माझ्यातर्फे टाळ्यांचा कडकडाट. टक लावून पाहाणे हा पुरुषांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पुरुषांकडून टक लावून पाहून घेणं हा स्त्रियांचा प्रेरोगेटिव्ह आहे. त्यांना हवा असल्यास तो वापरावा, नाहीतर त्याकडे दुर्लक्ष करावं. त्यांना हवं तर त्यांनीही पुरुषांकडे टक लावून पाहावं. मला खात्री आहे की पुरुष काही तक्रार करणार नाहीत. कदाचित 'स्त्रिया पुरुषांकडे पुरेसा वेळ टक लावून बघत नाहीत' ही अधिक मोठी समस्या आहे.
धक्के मारण्याची गोष्ट वेगळी...
स्त्रीया असे टक (किंवा
स्त्रीया असे टक (किंवा काहीही) लावून पाहणे आपणांस रुचते आहे काय याचा संकेत करतात. ते सुज्ञपणे जाणून लक्ष अन्यत्र घालायचे असते. काही स्त्रीया मात्र प्रचंडच आकर्षक असतात. सभ्य मनाने कितीही समजावले तरी नजर वारंवार त्यांच्याकडे वळते. हा अशा सभ्य पुरुषांचा जैविक नाईलाज आहे असे वर्तन सभ्य आहे तोवर तरी आकर्षक स्त्रीयांनी समजून घेतले पाहिजे.
असा "जैविक नाईलाज" पुरूषांचाच
असा "जैविक नाईलाज" पुरूषांचाच आहे असे वाटते का?
संघ हे हिंदूंचे संघटन आहे म्हणजे ते ऑटोमॅटिकली मुस्लिम विरोधी संघटन होत नाही. मी जे निरीक्षण मांडले आहे ते पुरुषांबद्दल मांडले आहे. मी पुरुष आहे आणि अतिशय आकर्षक स्त्री पाहिली तर मला काय वाटते आणि ते सभ्य असते का नसते त्यातली द्विधा मांडायचा प्रयत्न मी केलाय. "असे नाईलाज प्रत्येक लिंगाचे असू शकतात" असे लिहिल्याशिवाय* मी माझी मते लिहू शकत नाही का?
अॅनि वे - वाटते का? - नाही
---------------
दुसरे असे की समजा एखाद्या पुरूषाला तुम्ही आवडलात आणि त्याने तुमच्याकडे सतत टक लाऊन पाहिले तर तुम्हाला ते रुचेल का? तुम्ही समजावून घेऊ शकाल का?
हा प्रश्न समलैंगिकतेच्या स्विकाराविषयी आहे. आपण जे बोलतोय त्याविषयी नाही. पण जर मी समलैंगिक असतो तर समजून घ्यायला हरकत नाही. अर्थातच मी समलैंगिक नसल्याने माझी प्रतिक्रिया सामान्य नसेल. But understand that it would not be anything about the gaze, it would be all about the orientation. आता मी समलैंगिक नाही तेव्हा कोण्या स्त्रीने पाहिले तर समजून घेऊ शकता का असे विचारा. ऑफेन्स नाही तोवर मला काही वाटत नाही.
=====================
मी पुरुष आहे आणि पुरुषासारखा वागणार. मला संतुलित लिहायची अजिबात गरज वाटत नाही.
हे अवांतर होतंय पण मी हा तर्क
हे अवांतर होतंय पण मी हा तर्क जरा पुढे नेणार आहे.
हा प्रश्न समलैंगिकतेच्या स्विकाराविषयी आहे. आपण जे बोलतोय त्याविषयी नाही. पण जर मी समलैंगिक असतो तर समजून घ्यायला हरकत नाही. अर्थातच मी समलैंगिक नसल्याने माझी प्रतिक्रिया सामान्य नसेल. But understand that it would not be anything about the gaze, it would be all about the orientation. आता मी समलैंगिक नाही तेव्हा कोण्या स्त्रीने पाहिले तर समजून घेऊ शकता का असे विचारा. ऑफेन्स नाही तोवर मला काही वाटत नाही.
तुम्ही जरा गोंधळला आहात असे मला वाटू लागले आहे. तुम्ही समलिंगी आहात की नाही याचा तुमच्याकडे पुरूषाने टक लाऊन बघावे की बघु नये याच्याशी काहीच संबंध नसावा.
समजा तुम्ही एखाद्या अत्यंत आकर्षक स्त्रीकडे टक लाऊन बघताय (त्यात त्या जैविक नाईलाजामुळे) तुम्ही नजर हटवू शकत नाही आहात. तेव्हा ती स्त्री समलैंगिक आहे की नाही हे तुम्हाला माहित असायचे काहीच कारण नाही. तिने तुम्हाला समजून घेतले पाहिजे असे तुम्ही म्हणत. त्याच न्यायाने जर एखाद्या पुरूषाने तुमच्याकडे टक लाऊन पाहिले किंवा एखाद्या स्त्रीने पाहिले ततीही तुम्ही समजूनच घेतले पाहिजेत असे वाटत नाही का?
इथे बघणार्याची नैसर्गिक गरज भागणे महत्त्वाचे म्हणताय ना?
---
असो. माझा लिमिटेड पॉइंट असा: (जो अजोंच्या पहिल्या प्रतिसादात काही अंशी आला होता)
सामोरच्या व्यक्तीला (स्त्री असो वा पुरूष) जर आवडत नसेल/संमती नसेल/संमतीदर्शक लक्षणे नसतील तरीही त्या व्यक्तीचे मत लक्षात न घेता - घ्यायची गरजच नाही, जन्मसिद्ध "हक्क" वगैरे आहे म्हणत - माझी जैविक भानगड/गरज आहे म्हणून टक लाऊन पाहण्यापासून ते शारीरीक संबंध ठेवण्यापर्यंत हे काहीही गैरच वाटते.
राजीखुशीचा मामला असेल तर यातील काहीही योग्यच!
सामोरच्या व्यक्तीला (स्त्री
सामोरच्या व्यक्तीला (स्त्री असो वा पुरूष) जर आवडत नसेल/संमती नसेल/संमतीदर्शक लक्षणे नसतील तरीही त्या व्यक्तीचे मत लक्षात न घेता - घ्यायची गरजच नाही, जन्मसिद्ध "हक्क" वगैरे आहे म्हणत - माझी जैविक भानगड/गरज आहे म्हणून टक लाऊन पाहण्यापासून ते शारीरीक संबंध ठेवण्यापर्यंत हे काहीही गैरच वाटते.
अच्चं जालं तल
सामोरच्या व्यक्तीला (स्त्री
सामोरच्या व्यक्तीला (स्त्री असो वा पुरूष) जर आवडत नसेल/संमती नसेल/संमतीदर्शक लक्षणे नसतील तरीही त्या व्यक्तीचे मत लक्षात न घेता - घ्यायची गरजच नाही, जन्मसिद्ध "हक्क" वगैरे आहे म्हणत - माझी जैविक भानगड/गरज आहे म्हणून टक लाऊन पाहण्यापासून ते शारीरीक संबंध ठेवण्यापर्यंत हे काहीही गैरच वाटते.
माझा मुद्दा हा फक्त टक लावून बघण्याच्या बाबतीत आहे. मी समोरच्या व्यक्तीकडे टक लावून बघत बसण्याचा तिला कोणताही त्रास होत नाही व म्हणून मी तिच्याकडे टक लावून पाहणे हे गैर नाही.
गायन
माझा मुद्दा हा फक्त टक लावून बघण्याच्या बाबतीत आहे. मी समोरच्या व्यक्तीकडे टक लावून बघत बसण्याचा तिला कोणताही त्रास होत नाही
त्या व्यक्तीला त्रास होतो की नाही हे गब्बर कसे काय ठरवतोय ?
ते तर ती व्यक्ती ठरवेल ना ?
नैतर उद्या म्हणशील "मी त्या व्यक्तीला मिरचीच्या धुर्या दिल्याने त्या व्यक्तीला काहीही त्रास होत नाही."
हा काय प्रकार आहे ? त्रास होतो की नाही हे त्या व्यक्तीने ठरवायचे की गब्बरने ?
म्हणून मी तिच्याकडे टक लावून पाहणे हे गैर नाही.
हे वाक्य चुकीच्या आधारावर आहे.
.
.
अजून एक उदाहरण :-
मी तुझ्या कानापाशी येउन बेसूर बेताल गात सुटलो तर तुला त्रास होतो का ?
रात्री बेरात्री अतिप्रचंड आवाज करत राहिलो तर तुला त्रास होतो का ?
करवत कापल्यासारखा किंवा अजून एखादा भयानक त्रासदायक आवाज रेकॉर्ड करुन तुझा पिच्छा करत तुला ऐकवत राहिलं तर तुझी प्रतिक्रिया काय असेल ?
(रात्री उशीरा ढोल-ताशे-मिरवणूकीस त्यामुळेच नकार दिला जातो.)
.
.
ह्यात मी तुला प्रत्यक्ष स्पर्श केलेला नाही.
.
.
हे उद्योग करताना कुणीही तुला प्रत्यक्ष स्पर्श केलेला नाही. पण हा प्रकार भोगणार्यांना कित्येकदा हृदयविकाराचा झटकाही येतो असे ऐकले आहे.
(रात्री बेरात्री बको तिअत्क्या मोठ्याने आवाज गोंधळ वगैरे असणे इत्यादी)
.
.
समाजशास्त्र हे गणितासारखे आणि गणिताइतके काटेकोर असत नाहित. सगळ्याच गोष्टी नेमक्या मांडता येतील असं नाही.
सर्वसहमतीनं साधारणपणे समाजाचा आपला एक गाडा चाललेला असतो; संकेत रूढ झालेले असतात.
ह्या घडीला तरी "होय. हे असं माझ्याकडे एकटक बघणं मला आवडत नाही. मी इतर कुणाकडे बघणार नाही; इतरही कुणी माझ्याकडे बघू नये."
हे "परस्परसंमती"नच ठरलेलं तत्व पाळलं जातं; जवळपास/व्हर्चुअली सर्व समाजाची ह्याला मान्यता आहे.
.
.
जर "आम्ही इतरांकडे पाहतो. इतरांनी आमच्याकडे पाहिलं तरी आम्हाला चालेल" असं म्हण्णारे बहुसंख्य होतील; तेव्हा आपोआप "सदर संकेत्/नियम ऑब्सोलेट/कालबाह्य झालेला आहे" असे म्हणत लोक त्याला रद्द करु पाहतील. ह्या घडीला तरी लोकांना ह्याचा त्रासच होतो. समाजात राहणं हे एक कॉण्ट्रॅक्ट आहे.
त्यातली ही अध्याहृत कलमं आहेत. तांत्रिकदृष्ट्या, समाजात रहायचं तुला कम्पलशन तुला नाहिये. एकमेकांना रोखून बघणे चालवून घेणार्या लोकांचा स्वतंत्र समाज स्थापायला तू मोकळा आहेस. लोकांकडे रोखून बघण्याचा अधिकार इतका महत्वाचा तुला वाटतो का (की ज्यासाठी तू स्वातंत्र्ययुद्ध वगैरे पुकारावस)?
.
.
तुम्ही रोखून पाहिल्याने समोरच्याचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. ह्यातून वाईट काही झालं तर होणार्या घटनेची जिम्मेदारी तुझीच.
"मी स्पर्श केला नाही" आणि "मी हानी केली नाही" ही वाक्य वेगळी आहेत.
तू एखाद्या बंद थेटरमध्ये चित्रपट बघत असताना गंमत म्हणून कोणी खोलीतील ऑक्सीजन ओढून घेतला एखाद्या रासायनिक क्रियेने ; तर???
तर ते चूकच आहे.त्याने तुला स्पर्शही न करता तुझी हानी केलेली आहे.
तुझा जीव धोक्यात घातलेला आहे.
(ऑक्सीजनवर माझाही अधिकार आहे; व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे वगैरे टिवटिव चालणार नाही.ऑक्सीजन तू खरेदी केलेला नाहिस.
त्या खोलीतील ऑक्सीजनसाठी समजा एखाद्या उद्योगपतीने सरकारला दहा लाख कोटी रुपये दिले; ऑक्सीजन खरेदी केला आणि
एखाद्याला ऑक्सीजन विना तडफड करायला लावली; तर ते चूकच आहे.)
"मी स्पर्श केला नाही म्हणून झालेल्या हानीशी माझा संबंध नाही" हे वाक्य पूर्णत: अतार्किक आहे.
तुम्ही समलिंगी आहात की नाही
तुम्ही समलिंगी आहात की नाही याचा तुमच्याकडे पुरूषाने टक लाऊन बघावे की बघु नये याच्याशी काहीच संबंध नसावा.
मला वाटतं तुम्ही प्रचंडच गोंधळला आहात. समलैंगिकता बाजूला ठेऊन उदाहरण द्या. "टक लावून पाहणे" वर माझे काय मत आहे आणि "समलैंगिकतेवर माझे काय मत आहे" हे मिक्स कशाला करताय?
पुरुष माझ्याकडे पाहतोय तेव्हा मला कळणारच ना तो समलैंगिक आहे म्हणून. आणि मी ज्या स्त्रीकडे पाहीन ती समलैंगिक असली तर तिला काय वाटतेय हे मी कसे सांगू?
Irrespective whether homosexual (so long as don't know) or not, I am ok with a woman's gaze (of that kind) that is not offensive.
पुरुष माझ्याकडे पाहतोय तेव्हा
पुरुष माझ्याकडे पाहतोय तेव्हा मला कळणारच ना तो समलैंगिक आहे म्हणून. आणि मी ज्या स्त्रीकडे पाहीन ती समलैंगिक असली तर तिला काय वाटतेय हे मी कसे सांगू?
तुम्हाला समलैंगिक पुरूषाने बघितल्यावर जसे वाटेल तसेच तुम्ही तिला बघितलेत तर तिला वाटणार! तेच तर सांगतोय!
अर्थात हा मुद्दा अवांतर असल्याने खरडीत बोलु नी ठरवू काय गोंधळ आहे (नी कोण गोंधळलेय ते ;) )
===
बाकी, अजूनही स्त्रियांकडे (तिची मर्जी/संमती वगैरे नसतानाही) टक लाऊन पाहणे हा तुमचा हक्क वा अधिकारच आहे असे तुम्हालाही वाटतेय का? [बहुदा तसे नसावे]
==
आतापर्यंत दोनदा लिहून खोडले पण विचारतोच.
एखाद्या व्यक्तीच्या पार्टनरकडे (बायको / नवरा) इतर अनुक्रमे पुरूष व स्त्रियांनी टक लाऊन पाहिल्यास नवरे/बायका (बायकोचे अनेकवचन) असे बघणार्यांवर चिडतील का? चिडावे का? का समजून घ्यावे?
तुम्हाला समलैंगिक पुरूषाने
तुम्हाला समलैंगिक पुरूषाने बघितल्यावर जसे वाटेल तसेच तुम्ही तिला बघितलेत तर तिला वाटणार!
स्त्रीने मला गेझ केले तर मला काय वाटते हे मी सांगू शकतो. पण समजा एक स्त्री करार निगोशिएट करताना, दुसर्या पार्टीकडून, माझ्याकडे टक लावून पाहू लागली तर माझे मत भिन्न असेल. करार करताना कदाचित माझी देहभाषा काय आहे, मूड काय आहे, इ इ चा ती अंदाज घेतेय म्हणून माझे मत वेगळेच असेल. म्हणून शुद्ध स्त्री असणे मधे इतर कोणताही अस्पेक्ट आणला तर वेगळे मत बनते. इथे म्हणूनच समलैंगिकतेचा संबंध आणायची गरज नाही.
स्त्रियांकडे (तिची मर्जी/संमती वगैरे नसतानाही) टक लाऊन पाहणे हा तुमचा हक्क वा अधिकारच आहे असे तुम्हालाही वाटतेय का?
संमती नसताना मुळीच पाहू नये. मग अशी संमती खूप हलक्या संकेताने का व्यक्त झालेली असेना. पण माझा "जैविक नाईलाज" देखिल बर्याचदा झालेला आहे हे देखिल सत्य आहे. त्याला जैविक नाईलाजच म्हणता येईल, हक्क नव्हे.
एखाद्या व्यक्तीच्या पार्टनरकडे (बायको / नवरा) इतर अनुक्रमे पुरूष व स्त्रियांनी टक लाऊन पाहिल्यास नवरे/बायका (बायकोचे अनेकवचन) असे बघणार्यांवर चिडतील का? चिडावे का? का समजून घ्यावे?
(स्त्रीला) तू फार आकर्षक आहेस, (पुरुषाला) तुमची बायको फारच आकर्षक आहे इतपत प्राथमिकरित्या जाणवून देण्यास हरकत नसावी. मी तरी तसे मानत नाही. यात चिडण्यासारखं काही नाही. पण सभ्यतेची एक मर्यादा नेहमी एका समूहासाठी सहज प्रस्थापित होते. ती लांघू नये.
आता स्त्रीकडे बघण्यासाठीही
आता स्त्रीकडे बघण्यासाठीही परवानगी लागणारे हो अजो. बोलणे वगैरे तर दूरच. स्पर्शादि गोष्टी तर अजूनच दूर. एरवी समानतेच्या गप्पा मारणारे लोक अशा सौदीस्टाईल नियमांना मात्र पाठिंबा देतीलसे वाटू लागले आहे.
बाकी करणारे करतात अन बोलणारे बोलतात. बर्याचदा स्वतःला आकर्षक न वाटणार्यांकडून असे अनुभव घेतल्याने लोक चिडतात, नपेक्षा आकर्षक वाटणार्यांना अनेक गुन्हे माफ असतात. इथे अपव्होटस्पर्धेसाठीचे मत अन प्रत्यक्ष व्यवहारातले मत नेहमीच वेगळे असते.
आपल्याला ज्यांच्याशी संबंध
आपल्याला ज्यांच्याशी संबंध नकोसा वाटतो अशा - मग ते भिन्नलिंगी असो वा समलिंगी - कुणीही टक लावून पाहिलं तर माणसाला अस्वस्थ होईल. कारण मनुष्य भिन्नलिंगी असला, तरी सदासर्वकाळ सगळ्याच्या सगळ्या माणसांशी संबंध ठेवायला खुला असतो असा नव्हे. पण हे तुम्हांला कळत नसेलसं नाही. त्यामुळे वाद संभवत नाही. ;-)
शक्यता
लेखक अनंतनाथ झा यांनी "पुरुष स्त्रियांकडे टक लावून बघतात" ही समस्या नसण्याची शक्यता नाहीच असे गृहित का धरलेले आहे ????
ईव्ह टिझिंगच्या अनंत तक्रारी येत असतात. तक्रारी म्हणजे फक्त पोलिस स्टेशनमधल्या एफ आय आर नव्हेत. नक्की गुन्हे म्हणून नोंदवले जात नाहित; पण त्याचा त्रास भलताच होतो अशीही वागणुकीची एक मधलीच पातळी असते.(व्म्शभेदातही नेमकी हीच समस्या आहे. थेट गुन्हे म्हणून नोंदवता येत नसल्या तरी तुच्छ लेखण्याची वागणूक दिली जात असल्याचं सरळ सरळ समजत असतं सालं.) ह्या गोष्टी विविध सर्वेक्षणातून बाहेर येतात; परिचितांशी बोलताना जाणवतात; जनमानसात समजलेल्या असतात. अशा गोष्टींत त्यात फार मोठ्या प्रमाणात रोखून बघणे ही तक्रारही असते.
गब्बर निरक्षर असावा; किंवा बहीरा असावा किंवा परग्रहावर असावा असा डाउट येतो आहे.
अन्यथा त्याच्या वाचण्यात, ऐकण्यात ह्या गोष्टी आल्या असत्या. पहिल्या दोन शक्यता नसण्याची खात्री वाटते.
हा परग्रहवासीच असावा.
आणि हो, हे भारतात अधिक प्रमाणात असलं तरी पाश्चात्त्य/प्रगत जगतही ह्यातून अगदिच मुक्त नाही.
तिथंही pepper spray वगैरे उत्पादनांची गरज पडतेच बरं का गब्बर.
नेमका काय त्रास होतो ?
ईव्ह टिझिंगच्या अनंत तक्रारी येत असतात. तक्रारी म्हणजे फक्त पोलिस स्टेशनमधल्या एफ आय आर नव्हेत. नक्की गुन्हे म्हणून नोंदवले जात नाहित; पण त्याचा त्रास भलताच होतो अशीही वागणुकीची एक मधलीच पातळी असते.
लेख एव्ह टीझिंग बद्दल नाहीये. टक लावून बघणे या एवढ्या एकाच कृतीबद्दल आहे.
एखादी व्यक्ती तुमच्याकडे टक लावून बघत बसलेली आहे याचा तुम्हास नेमका काय त्रास होतो ?
---
pepper spray हे उत्पादन वापरले जाते ते स्वसंरक्षणार्थ. पण एक पुरुष एका स्त्री कडे टक लावून पाहतो यात स्त्री च्या नेमक्या कोणत्या बाबीचे रक्षण करण्याची आवश्यकता असते ?
भाषण शोधून काढले. वाचत आहे.
भाषण शोधून काढले. वाचत आहे. Here.
रघुराम राजन यांना डी डी कोसांबी यांच्या फेस्टिवल मधे बोलावले हे रोचक आहे. आमचे मित्र रमताराम हे डी डी कोसांबी यांच्या साहित्याचे फॅन आहेत. संपूर्ण भाषण वाचणे गरजेचे आहे.
---------
The rule of law is needed to prevent the tyranny of the majority that can arise in a democracy, as well as to ensure that basic “rules of the game” are preserved over time so that the environment is predictable, no matter which government comes to power.
Income / Wealth inequality चे निवारण करण्यासाठी जी धोरणे राबवली जावीत ती "tyranny of the majority" कशी काय नसते ???
Even a simple progressive taxation system is a tyranny of majority. Isn't it ?
The number of people trying
The number of people trying to find inner peace—or maybe just fitness and flexibility—through yoga soared to 24.3 million in 2013, a 37% climb in six years, according to the Sports and Fitness Industry Association.
Yoga is supposed to be about unity and ultimately the divine
यात वर्णन केलेला तो मॅट चा प्रसंग इंट्रेष्टिंग आहे. तो जो शिक्षक आहे तो मालक आहे असे गृहित धरले तर त्याने योगा हे एकात्मतेबद्दल आहे व डिव्हाईन (ईश्वरीय, दैवी, स्वर्गीय) आहे असे सांगून (मखलाशी करून) स्वतःची जबाबदारी अत्यंत लीलया झटकली. योग शिकायला येणार्या विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता तर त्यांना पुरेशी जागा नको का पुरवायला ? जागा कमी पडली तर व त्यावरून विवाद निर्माण झाला तर "योग ही ईश्वरीय व आध्यात्मिक संकल्पना" आहे असे म्हणून कसे चालेल ?
नयन लेख वाच. कमल डोळ्यात पाणी भर.
नयन लेख वाच. कमल डोळ्यात पाणी भर.
गब्बर , गब्बर हा पहा लेख :-
http://www.loksatta.com/sampadkiya-news/what-came-first-medicine-of-dis….
.
.
गब्बर/निब्बर खुश हो.
.
.
फडतूस फडतूस; मरणाचं सरपण गोळा कर.
.
.
कमल नयन बंद कर.
मोदींनी वाचवले
http://www.oneindia.com/india/father-alexis-thanks-pm-modi-his-release-…
मोदींना भारतीय ख्रिश्चनांच्या गुड बूक्स मधे राहणे महत्त्वाचे आहे हे कळलेले दिसते. ते मुंबईतले भाषण काय (http://www.hindustantimes.com/india-news/modi-reaches-out-to-christian-…), आणि आता ही बातमी काय. हा फादर अलेक्सिस तर अगदी पढवल्यासारखे टिवीवर 'मला केवल मोदींनी वाचवले, मी त्यांचा खूप खूप आभारी आहे' इ इ म्हणत होता. मोदींनी सुटकेची बातमी स्वतः फोन करून त्यांच्या स्वकीयांना दिली. प्रकार इतका नाटकी वाटला कि अफगाणीस्तानमधले अपहरण देखिल एक स्टेजिंग असावे. असो.
ऐकावे ते नवलच
http://www.pardaphash.com/news/bjp-leader-murli-manohar-joshi-calls-pro…
मोहम्मद पैगंबर सर्वश्रेष्ठ योगी - भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी.
कलगीतुरा
http://timesofindia.indiatimes.com/home/science/Did-dark-matter-trigger…
डायनोसोर डार्क मॅटर मुळे मेले.
समलिंगी जोडप्यांना मुलं पैदा करता येणार?
नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार समलिंगी जोडप्यांना बाळाचे जैविक पालक होणं दोन वर्षांत साध्य होऊ शकेल. एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींच्या त्वचेच्या मूळपेशींपासून अंडपेशी आणि शुक्रपेशी बनवण्यात केंब्रिज विद्यापीठातल्या काही शास्त्रज्ञांना यश आलेलं आहे. एक भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ ह्या गटाचे प्रमुख आहेत.
अधिक महत्त्व
कोणालाही या शोधाद्वारे जैविक पालक होता येईल हे खरे असले तरी विरुद्धलिंगी जोडप्यांना ही गोष्ट आधीच सहजसाध्य होती. समलिंगींना ती नव्हती. या शोधामुळे खासकरून त्यांना या शोधाचा उपयोग होऊ शकणार आहे. त्यांच्या दृष्टीने या शोधाचे महत्त्व अधिक आहे.
त्यामुळे, समलिंगींना या शोधामुळे आता जैविक पालक बनता येईल असे म्हणणे फारसे चुकीचे नसावे.
J.P. Morgan to start charging
J.P. Morgan to start charging big clients fees on some deposits
New federal rules essentially penalize banks for holding deposits viewed as prone to fleeing during a crisis or a stressed environment.
युरो आणि इतर काही युरोपियन चलनांसाठी हे नियम आधीच लागू झाले आहेत आणि युएसडीसाठी लवकरच होतील. क्रायसिस किंवा 'स्ट्रेस्ड एन्व्हायर्न्मेंट' इथून पुढे सामान्य बाब असणार आहे याचे आणखी एक लक्षण.
मुख्यमंत्री ????
????