छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे
अतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.
उदाहरणादाखल -
१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग
२. नितळ जलाशयातली एकाकी होडी
३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्याला आधार देणे इ. लीळा)
४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)
५. गडावर जाऊन क्षितिजाकडे विचारमग्न मुद्रेने पाहत काढलेले फोटो. (अधिक तिघांची 'दिल चाहता है' पोझ)
६. झाड - फूल - फळ - पान - पक्षी
. . .
अर्थात, ही यादी कितीही वाढवता येईल, कारण एखाद्या बाबीचं 'क्लिश्ट'त्व हे शेवटी बिहोल्डराच्या डोळ्यांतच पडून असतं!
त्यामुळे,
- विषयाचं बंधन पाडून घेऊ नका.
- मूठभर हुच्चभ्रू काय म्हणतील याचा विचार न करता, क्लिशेंना आपलं म्हणा.
फोटो पाठवण्याची अंतिम तारीख - १ मे, २०१५.
(अडगळीस्तव इतर नियम कॉपीपेष्टवणे टाळले आहे. ते इथे वाचा.)
स्पर्धा का इतर?
नावेतील तीन प्रवासी
नावेतील तीन प्रवासी (द. मा. मिरासदार) वा मूळ पुस्तक Three Men in a Boat (जेरोम के जेरोम)
अतिशय कठिण आव्हान
अतिशय कठिण आव्हान. मागे कोणीतरी "भंकस कविता" आव्हान दिले होते, त्याची आठवण झाली.
नुसतेच न-बघण्यालायक चित्र देता येत नाही, पण पुरेसे तंत्र असून काहीसे सफाईदार हवे - विषय मात्र चावून चोथा झालेला हवा.
पण पर्यटनस्थळातील "मी/आम्ही येथे होतो" चित्रांची आठवण करून दिली, म्हणून सोय झाली. भिकार तंत्र+कंटाळवाणा विषय असलेली चित्रे तर माझ्याकडे भरपूर आहेत. परंतु ती येथे देण्यात काही मजा नाही.
तर शोधतो.
१. मोठी लेन्स मिळाली म्हणून
१. मोठी लेन्स मिळाली म्हणून एका रात्री चंद्राकडे एकटक बघत काढलेला हा चांद्रक्लिशे (copyright च्या सहीसकट!)…
२. उडता उडता खालील सुंदर दृश्य टिपण्याचा प्रयत्न करताना काही अपरिहार्य कारणाने विमानाचे पंख सुद्धा फोटोमध्ये आले. वैमानिक फक्त माझ्या फोटो काढण्यापुरता तरी आपले पंख सावरू शकत नव्हता काय? तरीही जीवाचा आटापिटा करून काढलेला हा पंखेवाला क्लिशे…
३. धबधब्यावर गेलो असता मुद्दाम काढलेला, पाणी म्हणजे जणू कापूस पिंजून ठेवलाय असे दाखवणारा, हा मुलायम क्लिशे…
४. नायगारा जवळून अनुभवताना स्वतापेक्षा स्वतःची "ग्याजेट्स " जपण्यासाठी प्रयत्न करणारे रेनकोटे लोक आणि "tourist spot" या शब्दांनी गौरवला गेलेला एक अतिशय "क्लिशे" धबधबा या दोन्ही गोष्टी एकाच चित्रात दाखवणारा हा ओवरडोशीय क्लिशे…
होय, f १६ किंवा २२ पर्यंत
होय, f १६ किंवा २२ पर्यंत खेचला होता. आणि चित्र स्थिर राहावं म्हणून कॅमेरा कठड्यावर ठेवला होता. आणि हे चित्र ithacha, NY इथल्या "ताकाचा धबधबा" (Buttermilk Fall) चे आहे. त्या सहलीमध्ये असेच काठाकाठावर कॅमेरा ठेवून फोटो काढून माझ्या मित्रांना जाम बोर केलं होतं मी… :)
१) हा फोटो मॅक्सिको मध्ये
१)
हा फोटो मॅक्सिको मध्ये पर्यटन करताना 'माया सांस्कृतिक अवशेष'- 'मायन पिरॅमिडस' बघायला गेलो होतो तेव्हाचा आहे. ह्या फोटोमधला 'क्लिशे' म्हणजे मुलांबरोबरचे सगळे फोटोज असेच आलेत.. एकदम असहकाराचे. एकतर भर दुपारी पोहोचलो, रणरणतं ऊन नव्ह्तं पण ऊन होतं, आम्ही जबरदस्तीने मुलांना '१००० वर्षांपूर्वी लोप पावलेली महान संस्कृती' दाखवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. मुलांच्या वयाचा (वय वर्षे ७ आणि ३)काही ताळमेळच बसत नव्ह्ता.
दोघांचही म्हणणं होतं कि, एक तर आम्हालां सोडा ,कुठे पाहिजे तिथे मनसोक्त भटकु द्या, नाहीतर मला( छोटुला) कडेवर घ्या आणि मग पाहिजे त्या संस्कृत्या बघत फिरा. आमचा ऑप्शन नं.२ गपचुप स्विकारला.
२)
कसं छान आहे ना.. फुलोंके खेत टाइपचा फोटो.. समोर पसरलेला अथांग फुलोरा.ह्यातला क्लिशे खरा लांबुन कळत नाहीये पण ज्या ठीकाणी ही रानटी फुलं पसरली आहेत तीथे एक सुकलेला तलाव आहे. मागच्या दोन तीन वर्षात मध्य टेक्सास मध्ये जो दुष्काळ पडला होता त्यामध्ये असे कितीतरी तलाव आटले असतील.. पण निर्सगाची कमाल अशी अनपेक्षित बघायला मिळाली.
३)
आकाश-पाताळ एक करुन काम करतोय असं वाटतयं. खरा फोटो तो काम करतोय ह्याचा होता..पण लक्ष भलतिकडेच वळतयं.
का रे ऐसी माया?
पहिला फोटो 'चिचेन इत्झा'चा दिसतोय. त्याखालचं वर्णन धमाल आहे, 'का रे ऐसी माया' हे कॅप्शन चालून जावे :)
क्याप्शनच्या नालापायी फोटोचा
क्याप्शनच्या नालापायी फोटोचा घोडा जाऊ नये म्हणून हे नवनीत गैड:
१. चोथा झालेल्या गाण्याच्या ओळी (उदा. वर अमुकने दिलेलं आहे)
२. क्षयझ डॉट कॉम : कशालाही डॉट काँम जोडून आपण फॉर्वर्ड (ड पूर्ण) असल्याचं जाहीर करणे (उदा. सूर्यास्त डॉट कॉम)
३. क्षयझ वर बोलू काही : खर्यांनी मराठी भाषेला बहाल केलेलं क्याप्शन (उदा. मेदयुक्त बटाट्यांवर बोलू काही)
४. चेकलिस्टचा आव आणणे : "काहीतरी काहीतरी ... चेक!" (उदा. कडी लावणे ... चेक. पायजम्याची नाडी सोडणे ... चेक)
५. यमक्यावामन : शाळकरी यमके जोडणे (उदा. माय हार्ट इज फुल्ल ऑफ जॉय, द गॉड हॅज ब्लेस्ड अस विथ बेबी बॉय!)
६. क्याप्शनमध्ये नावं गोवणे (उदा. "अर्चना डूइंग पूजा-अर्चना" - लक्ष्मीपूजनाचा फोटो.)
७. नावांची मोडतोड करणे (उदा. "सुधाकर की सीधा कर?" - शाळा/कालेजच्या सेंडॉफला एकाला चौघापाच मित्रांनी आडवं धरलेला फोटो)
८. अक्करमासे : प्रसिद्ध व्यक्तींची नावे आपल्या आडनावाला जोडणे किंवा व्हाईस व्हर्सा. (उदा. "लान्स ढोबळे" - सायकलवर बसलेला फोटो)
९. फ्लेक्समय क्याप्शन : फ्लेक्सवाङ्मयातून घेतलेली स्फूर्ती (उदा. "एका दमात पोरी प्रेमात" - जरा सूटबीट घातलेला फोटो)
१०. "कल ... याद आयेंगे ये पल" - कोणत्याही फोटोला चारचांद लावणारं "वेळेला केळं" टैप क्याप्शन
शंका.
क्लिशेत्वाला गुण आहेत हे समजलं पण खालीलपैकी कसे?
अ. विषय आणि ऑब्जेक्ट किमान तीव्रतेचा क्लिशे पाहिजे पण त्यानंतर मात्र फोटोची क्वालिटी जितकी चांगली तितके गुण जास्त (रेटिंग जास्त)
की
ब. फक्त क्लिशेत्वाची तीव्रता जितकी जास्त तितके गुण जास्त. मग क्लिशेत्व तीव्र असण्यासाठी फोटोची क्वालिटी कमी होणे आवश्यक असल्यास तेही चालेल?
रास्त शंका
गणितात बसवणं अवघड आहे, कारण एकंदर मामला सापेक्षच आहे.
पण:
- जर दोन फोटोंतलं क्लिशेत्व साधारण सारखं असेल, तर अधिक चांगल्या दर्जाच्या फोटोला झुकतं माप मिळेल.
- क्लिशेत्व टिपण्यापायी थोड्या क्वालिटीचा त्याग आवश्यक असेल, तर हरकत नाही. त्याबद्दल गुण कापले जाणार नाहीत :).
वाचकांच्या प्रतिक्रिया/मतंही याबाबत अर्थात मोलाची आहेत.
प्रत्यक्ष फोटो
प्रत्यक्ष फोटो नसले तरी साधारण खालील चित्रे डोळ्यासमोर आली.
- काश्मिरी ड्रेस घालून महाराष्ट्रीय अथवा तामिळनाडूतील जोडप्याचे फोटो.
- उपरोक्त प्रकारच्या वेषात फोटो- केसाळ "याक"सोबत
- फूलयुक्त डहाळी पकडून मुग्ध नजरेने पाहणारी तरुणी
- केकचे कापण्यापूर्वी घाईने काढलेले क्लोजअप्स
- बक्षीस अथवा घास देऊन झालेला असताना पुन्हा एकदा फोटोग्राफर हुकल्याने रीयुनियन करुन अवघडलेल्या "देण्याच्या"१ पोझमधे काढलेला फोटो. - सेम विथ मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालणे.
- पिसाच्या मनोर्याला हातभार
- चिमटीतला किंवा ओंजळीतला सूर्य
- उडी मारण्याचा क्षण पकडण्याच्या प्रयत्नातला फराटा
- डोक्यावर बोटांनी शिंगे केलेला ग्रुप फोटो
- सर्व तरुणमंडळाने काळे गॉगल लावून मंकी पॉईंटला उभे राहून काढलेला फोटो
- हपीस कॉन्फरन्समधे पायर्यापायर्याच्या स्ट्रक्चरवर किंवा लॉनवर साठजण उभे असलेला प्यानोरामिक फोटो
- घोड्यावर बसलेली बाई आणि टाळलेल्या घोडेवाल्याची लगामावरची बोटे फ्रेमच्या एका कॉर्नरात
- साळुंखी
- लोणावळ्याची कट्ट्यावर बसलेली माकडे
बर्याच आयडिया एक्सपोज केल्या काय ? ;)
१. बहुतांश वेळा ही री-अरेंज्ड बक्षीस, पुष्पगुच्छ वगैरे देण्याची पोझिशन अशी असते की त्यात मूळ देणारा आता ती वस्तू विजेत्याकडून परत घेत आहे असं वाटतं. कारण हातांची पोझिशन उलट होते.
स्पॉट ऑन
- काश्मिरी ड्रेस घालून महाराष्ट्रीय अथवा तामिळनाडूतील जोडप्याचे फोटो.
हा हा, अगदी अगदी! (मला 'घरात अक्रोड नव्हते, नसायचेच!) आठवलं ;)
१. बहुतांश वेळा ही री-अरेंज्ड बक्षीस, पुष्पगुच्छ वगैरे देण्याची पोझिशन अशी असते की त्यात मूळ देणारा आता ती वस्तू विजेत्याकडून परत घेत आहे असं वाटतं. कारण हातांची पोझिशन उलट होते.
अचूक! याला 'घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे'! असं एक कॅप्शन आगाऊच सुचवून ठेवतो.
बाकी यादी अगदी नेमकी आहे. अर्थात, अलीकडे काश्मिरी ड्रेसच्या सोबतीनेच युनिव्हर्सल स्टुडिओतल्या मोटरसायकलवर किंवा मादाम तुसॉद्सच्या एखाद्या म्युझियममध्ये ओबामाला चार गोष्टी सुनावतानाच्या पोझमध्ये (एक जालीय काका आठवले!) काढलेल्या फोटोंचाही अलीकडे बराच प्रादुर्भाव झाला आहे म्हणा.
युअर कॅमेरा बट देअर फेसेस.
युअर कॅमेरा बट देअर फेसेस. आणि सार्वजनिक कार्यक्रम म्हटलं तर दिवसातले बारा पंधरा तास मनुष्य सार्वजनिकातच असतो. शाळेत मुलं सार्वजनिक बसने जातात. बायका पुरुष सार्वजनिक पार्कात जॉगिंगला जातात. म्हणून तिथले फोटो काढून पोटेन्शियली वैश्विक, अवैयक्तिक, अनियंत्रित, आंतरजालीय दृश्यमानतेसाठी खुले करणे हा चॉईस आपला कॅमेरा असल्याने आपोआप प्राप्त होऊ नये.
अधिकचा प्रतिसाद सविस्तर
अधिकचा प्रतिसाद सविस्तर लिहिला होता पण प्रतिबंधितचे भिंताड आड आले.
असो. मुद्दा असा की मुख्य सब्जेक्ट स्वतः बीचवर बसलेला असताना बाजूला अनोळखी लोक पहुडलेले फ्रेममधे आले तर नाईलाज असतो.
आयफेल टॉवर हा सब्जेक्ट असताना त्याच्या आसपास उभे असलेले इतर लोक टाळणे शक्य नाही.
या फोटोत तो ग्रुप हेच मुख्य सब्जेक्ट आहेत. ते घरगुती सर्क्युलेशनपुरते फोटो असणं अपेक्षित आहे. आंतरजालावर, स्पर्धेसाठी जिथे कोणीही ते अनिर्बंध पाहू शकतो तिथे टाकणे हे मुख्य सब्जेक्ट असताना योग्य वाटत नाही.
याहून जास्त साले काढणे बरोबर वाटत नसल्याने थांबतो. इतर कोणाचे फोटो टाकायला मी थांबवू शकत नाही.
म्हणजे आता तेंडुलकर, मोदी,
म्हणजे आता तेंडुलकर, मोदी, कांदापोव्हा, इ. चे फटू शेअर करतानाही हेच झेंगाट आडवं येणार तर....अवघडे.
"गोहत्याबंदीनंतर पोर्क, कांदा लसूण यांच्यावरही बंदीची मागणी आली तर कठीण आहे", किंवा मंगळावर यान पाठवताना मुहूर्त पूजा इत्यादि करण्यामुळे शास्त्रज्ञांच्या वस्तुनिष्ठतेवरच शंका येते, वगैरे अशा आशयाचे आक्षेप आले की "टोकाचे, कपोलकल्पित सिनारिओ अन केसेस, फिअरमाँगिंग, निव्वळ तांत्रिक मुद्दे,प्रतीकमैथुन इ इ इ" गोष्टी लगेच प्रथम क्रमांकावर न आणता प्रत्यक्ष परिस्थिती पाहून सारासार विवेकाने काय स्वीकारायचे आणि काय नाही हे ठरवावे अशी लॅटरल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग इत्यादिची रास्त भूमिका मांडणारा बॅटमॅन तूच ना?
मग घरगुती समारंभात बसलेले लोक आणि तेंडुलकर मोदी वगैरेंचे फोटो यांच्यात तांत्रिकदृष्ट्या एकच पातळी शोधून मुद्दा मांडणं हे अंमळ रोचक, उदाहरणार्थ इ इ आहे.
वा वा! तोडलंस मित्रा, काय
वा वा! तोडलंस मित्रा, काय भारी विषय दिलायस, आता स्पर्धकांचा महापूर येईल असे भाकीत करते.