Skip to main content

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

नमस्कार ऐसी अक्षरे सदस्य व वाचक.
आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत.

नातं निसर्गाशी - गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति - भाग २

गेल्या भागात आपण नदीचा उगमापासून सपाटीवर येईपर्यंतचा प्रवास पाहिला. नदीला पूर का आला पाहिजे, riparian zone चे महत्त्व याविषयी देखील बोललो. आता या भागात आपण नदीचा मुखापर्यंतचा प्रवास आणि नदीच्या विविध इकॉलॉजिकल सेवा यांविषयी जाणून घेऊ या.

गोष्ट सांगा गणित शिकवा .... 12

उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?

ललित लेखनाचा प्रकार

"जाड जाहले बूड "

जाड जाहले बूड
सांभाळा ते धूड
हृदयावरती सूड खास हा
हृदयावरती सूड !

बस ती चुकली
गाडी हुकली
शयनगृहातिल प्रणयाराधनी
जाईल सारा मूड ,
सांभाळा ते धूड!

रक्तवाहिन्या अती सूक्ष्म त्या
पौंडामागे दोन मैल त्या
सोपे नाही रक्त ढकलणे,
(संपावरती जाईल ना ते !)
घेईल तेही सूड !

सांभाळा ते धूड, मित्रहो
सांभाळा ते धूड!
xxx

"वेदन -विरहित"

वेदन-विरहित सोफ्यावरती
वेदन -विरहित बसणे
आणि स्वच्छ त्या फरशीवरती
वेदन -विरहित उठणे.

वेदन -विरहित त्या फ्रिजमध्ये
मटण -कोंबडी नसणे
वरण -भात तो खाता खाता
वेदन -विरहित हसणे .

प्रसिद्ध लेखक बनणे सुद्धा
क्षितिजावरती नसणे
वेदन-विरहित जुने सिनेमे
पहाता पहाता हसणे!

कसे करावे जीवन अपुले
वेदन-विरहित आता?
विचारात त्या पडलो आहे
चिवडा खाता खाता!
xxx

दुसऱ्या लाटेचा मागोवा ...

Taxonomy upgrade extras

किरण लिमये यांनी महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेचा घेतलेला पूर्णपणे विदाधारित (डेटा बेस्ड) मागोवा.

नीतीमत्ता - उपजत की संस्कारित?

xxx एक स्वयंचलित ट्रॉली रेल्वेच्या रुळावरून वेगाने येत आहे. त्यामुळे रुळाच्या मध्यभागी खेळत असलेल्या पाच मुलांच्या जीवाला धोका आहे. अपघात होऊन पाची मुलं मरण्याची शक्यता आहे. आरडाओरडा करूनही उपयोग होणार नाही. धोका टाळण्यासाठी ट्रॉलीला दुसऱ्या रुळावर ढकलू शकणाऱ्या झडप यंत्रणेपाशी आपण उभे आहात. दुसऱ्या रूळाच्या मध्यभागीसुद्धा एक मुलगी एकटीच खेळत आहे. जर आपण ट्रॉलीसाठी रूळ बदलल्यास त्या मुलीचा जीव जाईल. रूळ न बदलल्यास मुलं मरतील.