Skip to main content

गप्पा गणितज्ञाशी!.........4

(फसव्या) जाहिरातीच्या जगात

हॉटेल वैशालीच्या एका कोपऱ्यात डॉक्टर आचार्य कॉफी पीत बसले होते. मी त्यांच्यासमोर बसल्यानंतर हातातील चिठ्ठी माझ्या हातात दिली. नेहमीप्रमाणे त्यात 2 कूटप्रश्न होते.

म्हणींच्या गोष्टी ...(२)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.   विविध प्रकारच्या म्हणी,   वाक्प्रचार आणि सुविचारांच्या  अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.   काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे  वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात,   त्या मागे काय कथा असतील?


तर काही म्हणींच्या या कथा...   
 


"ह्यात नाही राम - त्यात नाही राम"  
 

ललित लेखनाचा प्रकार

तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

गाभा:
तुम्हालाहीडिप्रेशनआलंय_का?
**

प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.
रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?

मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

स्टायपेंड देणारी पहिली नोकरी

स्टायपेंड देणारी पहिली नोकरी
(लेख, महाराष्ट्र टाइम्स : 17 मार्च २०२० ला छापून आला. )
एप्रिल १९७९ ला कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग,पुणे मधून बी इ मेक झालो आणि खडकीच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधे ट्रेनी इंजिनिअर म्हणून रुजू झालो, सहाशे रु. स्टायपेंडवर. तीच माझी पहिली नोकरी ! तिथल्या ८ वर्षाच्या नोकरीनंतर ,बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या , पण या पहिल्या नोकरीच्या आठवणी काही औरच आहेत, मनावर कायमच्या ठसलेल्या आहेत !

ललित लेखनाचा प्रकार

आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण )

खरंच ! आईच्या घराशी माझं फार जवळचं भावनिक नातं आहे. माझा जन्मच मुळी शनिवार पेठेतला, १९५६ सालचा , माझ्या मोठया भावाचा , विनोद रावांचा ( आता रिटायर्ड कंपनी सेक्रेटरी ) माझ्या आधी दोन वर्ष, माझी धाकटी बहिण, वीणा ( पेंडसे - फडके ) माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान, जी सध्या ' आई रिटायर होतेय ' मधे आईची भूमिका करत असते. शनिवार पेठेत म्हणजे ३७३, शनिवार : कन्याशाळा ते सुयोग मंगल कार्यालय यांना जोडणाऱ्या गल्लीत . सुयोगच्या पलिकडे अहिल्यादेवी.

ललित लेखनाचा प्रकार

माझी पहिली सायकल

माझी पहिली सायकल ही ' फिलिप्स ' मेकची आणि ' मेड इन इंग्लंड ' होती आणि ती ही लेडीज सायकल होती , असं मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ; पण हे अगदी खरं आहे !..
त्याचं असं झालं की ,माझे वडिल हे म. न.पा मध्ये नोकरीला होते. त्यांची झाली बदली ऑक्ट्रॉय नाक्यावर बोपोडीला. ३७३, शनिवार पेठेतल्या आमच्या घरातून (आताची पेपर गल्ली ) , रोज बोपोडीला जायचं म्हणजे काहीतरी वाहनाची गरज होती. त्यांच्याच ऑफिसमध्ये 'हुसेन ' नावाचा एक सहकारी होता. दोघे अगदी जिवलग मित्र बनले होते. हुसेनच्या भावाचा नव्या-जुन्या सायकल्सचा ट्रेडिंगचा व्यवसाय होता रविवार पेठेत. पुणे तेंव्हा सायकलचं शहर होतं ..

ललित लेखनाचा प्रकार

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)

आज सकाळी बँड्रावरून नेहेमीप्रमाणे मलबार-हिलला जायला टॅक्सी पकडली.

वांद्र्याचे कॉलनीतले काही टॅक्सीवालेही आता ओळखीचे झालेयत.

आज असेच तोंडओळखीचे आफ्रोझभाई भेटले.

आता मलबार-हिलची दिनेशभाईंची टॅक्सी बऱ्यापैकी सेट आहे तशी पण मुंबईकर सदैव "ऑन" असतो.

म्हणूनच आफ्रोझभाईंनासुद्धा सगळी स्टोरी सांगितली... म्हणजे बँड्रातही शनिवारी टॅक्सी मिळण्याची शक्यता चाचपून पहावी हा हेतू.

तर ते माझ्या एकंदरीत प्रोजेक्टवर बेहद्द इंप्रेस झाले.

बहोत मेहनती हो, आपकी इन्शाल्ला बहोत तरक्की हो वगैरे तोंडभरून आशीर्वाद दिले.

ललित लेखनाचा प्रकार

करोना कट्टा

फेसबुकवर मी एका ग्रुपची सदस्य आहे. private group आहे, (सदस्य करून घ्यावे अशी विनंती करू नये) दीडशेहून अधिक सदस्य आहेत. वेगवेगळ्या व्यवसायातले आहेत, विविध देशांत राहणारे आहेत. मुख्यतः टवाळक्या, गॉसिप हा उद्देश असला तरी बऱ्याच वेळा अनेक विषयांवर खूप सखोल चर्चा होते. यातले काही सदस्य एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेले आहेत, परंतु हा फक्त ओळखीच्या व्यक्तींचा ग्रुप नाही. कारण प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या अनेक व्यक्ती या ग्रुपच्या माध्यमातून खूप जवळच्या झालेल्या आहेत. यातील आम्हा १०-१५ जणांचा कायप्पावर ग्रुप आहे. तिथे आम्ही रोज संपर्कात असतो.

ललित लेखनाचा प्रकार

क्रोनोनॉट अरुण

अरुण रेडिओ वरची क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्यात अगदी रंगून गेला होता. खाली सोसायटी कंपाउंड मध्ये त्याचे मित्र गल्ली क्रिकेट खेळण्यात दंग होते. ते त्याला खेळण्यासाठी सारखे बोलावत होते. पण तो गेला नव्हता. त्याला भारत पाकिस्तान गेम मध्ये जास्त रस होता. शेवटची ओवर चालू होती. पाकिस्तान जिंकणे आता शक्यच नव्हते. हा गेम संपला की तो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणार होता. इतक्यात आतून बाबा आले. आज बाबा ऑफिसला गेले नव्हते. त्यांना जबरदस्त सर्दी झाली होती. थोड अंग गरम झाल्यासारखे वाटत होते.
“ झाली की नाही तुझी मॅच?” बाबांनी थोड्या चढ्या आवाजांत विचारले.

ललित लेखनाचा प्रकार