Skip to main content

अज्ञाताचा गड चढताना

अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी येते
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतीस्तव बसते
उठून, गड बेलाग लांघण्या, पुन्हा कंबर कसते
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढते

जिथे संपते वाट त्या तिथे असे काही लखलखते
त्या तेजातच अज्ञाताचे अपूर्व दर्शन घडते

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भारताच्या जीडीपीतला धर्म/श्रद्धांचा टक्का

मला खरंतर या विषयावर पोल काढायचा होता, पण काही तांत्रिक कारणामुळे तो काढता येत नाहीये. तेव्हा चर्चाविषयातच ते प्रश्न सामावून घेऊन त्यावरून काही आकडेवारीचे निष्कर्ष काढण्याऐवजी काहीशी गुणात्मक चर्चा व्हावी ही इच्छा आहे. मला विचारायचा मूळ प्रश्न असा :

"तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबीयांनी, तुमच्या किंवा एकत्रित कुटुंबाच्या उत्पन्नाच्या किती टक्के खर्च निव्वळ धार्मिक किंवा ज्याला श्रद्धा मानता येईल अशा गोष्टींवर गेल्या वर्षभरात केला?"

सगळ्या इन्व्हॉल्व्ह्ड पार्टींचं उत्पन्न लाखांत मोजता आलं तर दर लाखामागे किती हजार खर्च केले? हे झालं गणिती वर्णन. पण नुसतं तिथे थांबता येत नाही.

सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला

माव्याची पुडी अशीच पडून राहिली

विजारीच्या खिशात तिला सापडली

पतिपरमेश्वर कर्माने मेला

भर ग्रीष्मात वर्षाव जो झाला

वर्षावासंगे आगडोंब उसळला

सिंव्हाचा छावा धुळीस मिळाला II

रक्तावरुनी धडे गिरवले

अब्रूचे धिंडवडे काढले

लग्नाचे दागिने निघाले

सासरचे चौघडे वाजले II

पोरें गुपचूप खेळ मोडिती

हातपाय धुवूनी स्तोत्रे म्हणती

ग्रूहलक्ष्मी ती चाल करोनी

सर्वशक्ती प्राणाशी लढती II

थेट भेटुनी विक्रेत्याला

नाव गाव अन ठिकाण विचारी

लागणारे सामान विचारी

"रॅम्बो" चे नाटक बंद झाले

रामभाऊनि ठरवलं एकदा

बदलून पाहूया नाव

करून टाकूया इंग्लिश बारसे

बघू काय बोलतंय ते गाव

काय ठेवूया , खलबते झाली

भरपूर नावे समोर आली

रजनीकांत आवडत असूनही

"रॅम्बो" चा झाला लिलाव

रामभाऊ आता रॅम्बो झाले ,

रॅम्बोबरोबर धोतरहि सुटले

टोपीसंगे सदरेपण विकले

जीन्स घालुनी उघडबंब ते

सांजसकाळी फिरू लागले

झटावून त्या गावगुंडांशी

दशावतार ते समजू लागले

खिशात पिस्तुल अन बनुनी धनुर्धर

नीट वागा नाहीतर करेन मर्डर

अंग देखण्यालायक त्यांचे

हाडांची काडं अन पातळ "ब" ओचे

ही बातमी समजली का? - भाग १८८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

स्त्री मुक्ती असावी पण त्यात आपली बायको-सून-मुलगी-बहीण...?

माणसाचा जन्म कोणत्या कुटुुंबात व्हावा हे त्याच्या किंवा तिच्या हातात नसतं. माणूस विशिष्ट कुटुुंबात अनवधानाने जन्म घेतो आणि त्याचा पुढील प्रवास सुरू होतो. माणूस ज्या कुटुुंबामध्ये जन्म घेतो त्या कुटुंबाला जातीचे-धर्माचे कंगोरे असतात. कुटुंब हा समाजाचा भाग असल्यानं समाजानुसार भौतिक प्रश्न बदलतात. स्वाभाविकपणे व्यक्तीची जडणघडण बदलते. माझा जन्म असाच पूर्वाश्रमीच्या दलित आणि सध्याच्या बौद्ध कुटुुंबातला. कुटुुंबाला चळवळीचा वारसा. आई-वडील शिक्षक. शिकलेली पहिली पिढी. आई-वडलांकडून बाबासाहेब, सावित्रीबाई ऐकत आम्ही मोठे झालो.

एक वेळ अशी येते कि

एक वेळ अशी येते कि

तुम्हाला झाडं जवळची वाटू लागतात

तुमच्याशी फुलं बोलू लागतात

सारे पक्षी तुमच्याकडेच बघून उडतायत

असं वाटू लागलं

कि समजा तुमची प्रेमळ पहाट झालीय

दूर मनाच्या आकाशात

एक प्रेमाची चांदणी उगवलीय

ती जशी टीम टीम करू लागेल

तसं प्रेम पसरेल चराचरी

नखशिखांत बनवेल प्रेम पुजारी

सुचतील रात्रीबेरात्री नवीन उखाणे

भल्या पहाटे द्याल कबुतरांस दाणे

गप्प घालाल विवेकानंदांची घडी

तोंडाचा होईल चंबू अन नजर सताड उघडी

मायबापास वाटेल जेव्हा

तुमचा काहीतरी बिघाड झालायं