Skip to main content

अल्पना

यंदाच्या लोकसत्ता च्या दिवाळी अंकात एक लेख वाचत होतो आसाराम लोमटे यांचा भवताल आणि भुमिका नावाचा. लेख अत्यंत सुंदर आहे त्यात एके ठीकाणी लोमटे त्यांच्या एका कथेचा उल्लेख करतात त्यात एका कार्यकर्त्याची कथा आहे नेत्यांसाठी त्याची संपलेली उपयुक्तता. टीचलेपण दाखवण्यासाठी एक शब्द वापरलेला "टिचरीगोटी" टीचलेली गोटी लहान पोरं सुद्धा खेळात घेत नाहीत. दुसरा शब्द "उकळलेली पत्ती" ज्याची रग आणि धग वापरुन झालेली आहे असा वापरुन फ़ेकलेला कार्यकर्ता अशा अर्थाने हे शब्द त्यात येतात. आता ती कथा वाचलेली नाही मात्र अगदी एका नेमक्या योजलेल्या शब्दात किती ताकद आहे बघा.

ड्रीमरन १६

मुंबई मेरेथोन २०१६ आज पार पडली. Standard Chartered बँकेतर्फे दरवर्षी जानेवारीमध्ये आयोजित केली जाणारी ही स्पर्धा दिवसेंदिवस प्रचंड लोकप्रिय होत चालली आहे. फुल (४२ किमी) , हाफ(२१ किमी) आणि ड्रीम रन (६ किमी) अशा तीन प्रकारांपैकी ड्रीमरनमध्ये भाग घेण्याचे माझे हे सलग दुसरे वर्ष. त्याआधी केवळ बातम्यांमध्येच बघायचो. पण मागच्या वर्षी मात्र आमच्या बँकेच्या कृपेने भाग घेण्याची संधी मिळाली. तशी ड्रीमरन म्हणजे खऱ्या अर्थाने मेरेथोन नव्हेच. जे अस्सल धावपटू आहेत त्यांच्यासाठी फुल आणि हाफ मेरेथोन आहेच.

इंटिमेट डेथ- आयुष्याचा सांगाती

टीप: हे जवळजवळ दोन वर्षांपूर्वी लिहले होते. आज सहज सापडले म्हणून अप्लोड करते आहे.

इंटिमेट डेथ- आयुष्याचा सांगाती.

समीक्षेचा विषय निवडा

बॉलीवूडचे ‘बोलट’

Taxonomy upgrade extras

अनेक चित्रपटांत तो दिसतो. कधी पार्टीमध्ये हातात चषक घेऊन, तर कधी सगळं रामायण घडून गेल्यावर एण्ट्री मारणारा पोलिस ऑफिसर म्हणून. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे, ‘दामिनी'मध्ये ज्या जज साबला सनी देओल ‘तारीख पे तारीख’वरचं लेक्चर सुनावत असतो, तो जज साब ‘तो'च होता. किंवा ‘इश्क'मध्ये जॉनी लिवर एका पार्टीमध्ये एका आगंतुक पाहुण्याची मजा उडवतो, तो आगंतुक पाहुणा म्हणजे ‘तो'. ‘तो'ला नाव गाव काही नाही. ‘तो’ बहुतेक इथे हिरो बनायला आला असेल. आता तर तो डायनॉसॉरसारखा नामशेष झाला असेल.

गाजराचा शिरा

http://www.aisiakshare.com/node/4750
कीस बाप्या कीस, गाजर कीस

साहित्य: गाजर ४ किलो, साखर ३-४ वाटी, दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, छोटी इलायची (वेलची) १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.

प्रारंभिक तैयारी: सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि छोटी इलायची सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.

अपेक्षा आणि फक्त अपेक्षा...

आई कडून मायेची अपेक्षा
पत्नी कडून प्रेमाची अपेक्षा
बहिणी कडून मैत्रीची अपेक्षा
नात्यात खऱ्या प्रेमाची अपेक्षा

शिक्षेत सूट मिळण्याची अपेक्षा
दुःखात सुख असण्याची अपेक्षा
सुखात जास्त पैसाची अपेक्षा
जास्त पैशात मानाची अपेक्षा

शाळेत सुट्टी मिळण्याची अपेक्षा
सुट्टीत मस्त करमणुकीची अपेक्षा
मौजमस्ती म्हणजे उत्साहाची अपेक्षा
उत्साहात वर्गशिक्षा विसरण्याची अपेक्षा

भूतकाळात दुःख विसरण्याची अपेक्षा
भविष्यात उज्ज्वल प्रगतीची अपेक्षा
वर्तमान कडून अतिआनंदाची अपेक्षा
स्वतःसाठी चांगल्या भविष्याची अपेक्षा

मरताना सुद्धा जगण्याची अपेक्षा
जगताना आयते मिळण्याची अपेक्षा

फुसके बार – १६ जानेवारी २०१६

फुसके बार – १६ जानेवारी २०१६
‘

१) त्याचे घरातील बारीकसारीक गोष्टींकडेही इतके लक्ष असे, की तो एक्स्पायरी डेट जवळ येणा-या औषधांवरही लक्ष ठेवे आणि ती वाया घालवण्याऐवजी शक्य असेल तर स्वत: घेऊन टाके.

२) लष्करातील रोखठोकपणा आपल्याला माहित असतो. ज्यांचे नवरे आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबाची सोय लष्कराच्या क्वार्टर्समध्ये केली जाते. साधारणपणे फार तर फार दोन किंवा तीन मजली एकाच छापाची घरे असतात ही.

अशा वासाहतींचे नावदेखील छानपैकी ‘सेपरेटेड फॅमिली क्वार्टर्स’ असे स्पष्टपणे लिहिलेले असते. आहे की नाही गंमत?

फुसके बार – १५ जानेवारी २०१६

फुसके बार – १५ जानेवारी २०१६
‘

१) जॅक जेकब व त्यांचे आयुष्य

जॅक जेकब यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. कोण होते ते? बांगला देशच्या युद्धाच्या वेळी त्यांनी मोलाची कामगिरी गाजवली होती. ते अविवाहित असल्यामुळे व त्यांच्या इतर नातेवाइकांपैकी कोणीच भारतात नसल्यामुळे जनरल जेकब यांची सर्व काळजी इतकी वर्षे स्वत: लष्कराच्या आर्टिलरी कोअरने घेतली हे आणखी एक वैशिष्ठ्य. अखेरच्या काळामध्ये त्यांना स्मृतिभंश झाला होता.

निवृत्तीनंतर त्यांनी गोव्याचे व नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही काम केले.