Skip to main content

"भाषण छापा, नाही तर ..." ही सबनिसांची धमकी व साहित्य महामंडळासमोरील धोका

"भाषण छापा, नाही तर ..." ही सबनिसांची धमकी व साहित्य महामंडळासमोरील धोका
.

साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे किंवा खरे तर आपले काही खरे दिसत नाही.

अध्यक्षीय भाषणात त्यांनी त्यांचे छापील भाषण न वाचता भलतेच भाषण केले. अतिशय तावातावाने. कुठल्या साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष नव्हे, तर कुठल्या तरी कामगार युनियनचा नेता भाषण करतो आहे असा भास होत होता.

त्यांचे छापील भाषण सव्वाशे-दीडशे पानांचे आहे असे म्हणतात. आता ते महामंडळाने छापावे अशी मागणी सबनीसांनी केली आहे. ही मागणी २६ जानेवारीपूर्वी पूर्ण झाली नाही तर ते नंतर पत्नीसह उपोषणाला बसणार आहेत.

ललित लेखनाचा प्रकार

"Harassment At Workplace"

साक्षेपी संपादक व लेखक अरुण टिकेकर यांचे निधन झाले आहे. 'ऐसी'तर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे.

सोशल मिडियावर नेहमीच्या श्रद्धांजलीवजा प्रतिक्रियांबरोबर काही धक्कादायक प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. त्यात प्रवीण बर्दापूरकर आणि धनंजय कर्णिक या दोन पूर्वाश्रमीच्या सहकार्‍यांच्या प्रतिक्रिया आहेत. सोशल मिडियावर जे नाहीत किंवा ज्यांनी हे वाचलं नाही त्यांच्याकरता दोन्ही प्रतिक्रिया इथे कॉपीपेस्ट करतो आहे.
--------------------------------------------------------
Dhananjay Vinayak Karnik :

कृष्ण-राधा

खुळीबावळी राधा भोळी तिला कसे कळावे, कपटी श्रीरंगाच्या मनीची कुटील कारस्थाने.
संधीसाधू तो नसता कोणी,अवचित येऊनी मागे, करकमलांचा पाश घालुनी कानी गोड कुजबुजतसे.
.
सांग राधीके एकांती या भलत्या वेळी, आलीस ना तू भेटाया मज भीडभाड सोडोनी
का मग हा खोटा दुरावा,लटके दूर लोटणे,वाटे का मी देऊन टाकीन फुका तुझी वसने
.
कोणीही ना येथे केवळ आपण एकांती, आतातरी विसरशील का खोटी जगरीती
क्षणभर डोळे भरुनी मजला तुला पाहू दे ना, देतो मग मी तुझी वसने हे माझे वचन तुला
.
जो पुरुषोत्तम वसे जनी, मनी, कायी अंतर्यामी, त्या कृष्णाने राधेला का केली ही विनवणी,

पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण

Taxonomy upgrade extras

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं.

"राठोड"

त्या दिवशी संध्याकाळी हजरत निजामुद्दीनला जनरलचं तिकीट काढून आरक्षित डब्ब्यात चढलो तेव्हाच लक्षात आलेलं की खांडव्यापर्यंतचा किमान १६ तासांचा प्रवास आरक्षित डब्यातल्या सर्वात दुर्लक्षित जागेत बसून करावा लागणार आहे. कपाळाला गंध, हातात ४ वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या, अंगात काळा कोट आणि तोंडात खास बनारसी पानाचा तोबरा भरलेला TC दिसला. त्याला अत्यंत प्रेमाने, "देखो सरजी, कहां जुगाड हो रहा है तो" वगैरे विनवण्या करून पाहिल्या पण काही उपयोग नाही. शौचालयच्या बाजूच्या जागेत १६ तास काढता येतील इतका निर्ढावलेपणा शरीराच्या प्रत्येक अवयवांत आणला. तोवर गाडीने आग्रा सोडलं होतं. फारसा त्रास होत नव्हता.

अलिकडे काय पाहीलत - २२

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
काल "राही मतवाले" हे तलत मेहमूद यांचे गाणे ऐकून, त्यांचा व सुरैय्याचा "वारीस" हा १९५४ चा सिनेमा पाहीला. एकदम खूप आवडला. सशक्त व नाट्यमय कथा, अतिशय गोड गाणी. तलत मेहमूद देखणे दिसतातच पण डायलॉगमध्ये त्यांचा मृदू आवाज .... ओह माय गॉड!! साध्या बोलण्यातही, इतका मृदू, मखमली आवाज. सिनेमा फार छान आहे.
.
यु ट्युबवर सापडेल.
.

ही बातमी समजली का? - १००

हैद्राबाद विद्यापीठ आणि जातीयतावाद -

अशोक वाजपेयी यांनी हैद्राबाद विद्यापीठाने दिलेली डी.लिट. ही पदवी परत केली आहे. बातमीचा दुवा

गुलामी नात्यातली!!

एखादी भिडस्त व्यक्ती असेल जी कधी कुणाला "नाही" म्हणू शकत नसेल त्याची आजकालच्या जगात फारच परवड, कुचंबणा आणि गोची होत असते. अशा भिडस्त असलेल्या समोरच्या व्यक्तीची संमती न घेता त्याला गृहीत धरून अनेकदा काही गोष्टी केल्या जातात. समोरच्याने त्याबद्दल चकार शब्द काढायचा अवकाश की त्या अगोदरच त्याच्या तोंडावर "भावनिक धमकी" असलेली चिकट पट्टी लावली जाते आणि त्याला बोलू न देता व स्वत:चे मत व्यक्त न करू देता त्याचेवर अगणित स्वार्थी अपेक्षा, इच्छा, आकांक्षा कर्तव्याच्या वेष्टनात बांधून लादल्या जातात मग पट्टी काढली जाते. याला काहीजण संवाद म्हणतात.

ललित लेखनाचा प्रकार

फुसके बार – १९ जानेवारी २०१६ - साहित्य संमेलन

फुसके बार – १९ जानेवारी २०१६
‘
साहित्य संमेलनाच्या तिस-या दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत अणि भारत विकास ग्रुपचे हणमंत गायकवाड यांचे आत्मकथन हे विशेष कार्यक्रम झाले.

गायकवाड यांनी अगदी हलाखीच्या परिस्थितीतून सुरूवात करत व कष्ट करण्याची तयारी नेहमी ठेवत अक्षरश; शून्यातून त्यांचे विश्व निर्मिले. मोठी स्वप्ने पहा, कष्टांची तयारी ठेवा आणि गुणवत्तेचा आग्रह धरा हा संदेश त्यांनी युवा प्रेक्षकांना दिला.

मुंबई मॅरथॉन (८)

* मुंबई मॅरथॉन चे हे 16 वे वर्ष आहे . या वेळी मी सहभागी होऊ शकलो नाही. पण दर वर्षी होतो. मॅरथॉन वरती लेख पाहून मला माझा अनुभवपर एक लेख आठवला जो मी 8 व्या मॅरथॉन नंतर लिहिला होता . त्यावेळी पहिल्यांदाच सहभागी झालो होतो. म्हणून हा लेख माझ्या ब्लॉग वर टाकला होता. तोच लेख इथे शेअर करत आहे . * सळसळते चैतन्य , उत्साह, जोश, थ्रिल असेच मी मुंबई मेरेथोन चे वर्णन करेन.!!! ८ व्या मुंबई मेरेथोन मधील व्हील चेअर इवेन्ट चा स्पर्धक असतानाचे सारे अनुभव डोळ्यासमोर तरळत आहेत.

ललित लेखनाचा प्रकार