Skip to main content

वळूया!

प्लॅस्टिकचं हृदय,
प्लॅस्टिकचेच भळभळणारे रक्त,
दोन शब्द विंदांचे, दोन शब्द पाडगावकरांचे,
एक कल्पना शांताबाईंची, एक यमक गदिमांचे,
अजून काही ह्याचे, तजून काही त्याचे
दुनियेभरचे तरल फरल फोटो
सगळा स्टॉक डब्यात व्यवस्थित भरून ठेवलाय.

सिच्युएशन, मूड, ऑडियन्सचा अंदाज घेऊन
तुपावर बेसन भाजून..

हमखास डोळ्यातून पाणी, हृदयातून हुंकार,
घशातून उसासा, अजून कुठूनतरी अजून काहीतरी
काढायला लावणारे
काव्यबोळे वळायला घ्यायला हवेत..

या.. वळा चार काव्यबोळे..
तुमचेही हात लागूद्यात..
मराठी नेटजगताचं वर्‍हाड मोठं, भिंत मोठी..
सर्वांना पुरायला हवेत.

आणि बेदाण्यासारखा फोटो खोचायला विसरू नका

कीस बाप्या कीस, गाजर कीस

ताजे ताजे गाजर हि आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली. मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे. गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात). आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील. जिभेचा स्वाद माणसा करून काय काय करवून घेतो, निमूटपणे गाजर किसायला घेतली......

कीस बाप्या कीस
गाजर कीस.
किसता किसता
कविता हि कीस.

भटकंती ३

असंच काही बाही.

आयुष्यात काही भारी माणसं भेटतात. विविधरंगी, प्रसंगी चक्रावून टाकणारे, विचार करायला लावणारे अनुभव देऊन जातात.

ह्या उन्हाळी सुट्टीत मी आणि माझा मुलगा, वय वर्षं १४, जर्मनी भटकायला गेलो होतो. १२-१३ दिवसांत, बर्लिन, म्युनिक, स्टुटगार्ट, हायडेलबर्ग असा ढोबळ प्लॅन होता. जर्मन फुटबॉल आणि जर्मन गाड्या हे लेकाचं माझ्याबरोबर येण्याचं कारण.

बेबंद हुकुमशाहीचा हायड्रोजन बॉम्ब

Taxonomy upgrade extras

पूर्व आशिया खंडातला एक देश. सर्व जगापासून फारकत घेतलेला. देशांतर्गत घडामोडींबद्दल सहसा काहीच थांगपत्ता लागू न देणारा. सतत आपल्या भोवती एक गूढ अगम्य असे वलय घेऊन वावरणारा असा हा देश. उत्तर कोरिया म्हणजेच DPRK(Democratic People’s Republic of Korea) त्यांच्या भाषेत. नावात डेमोक्रेटिक असले तरी डेमोक्रसी इथे औषधालाही नाही. देशाच्या निर्मितीपासूनच इथे एकछत्री हुकुमशाही अंमल आहे. गेले अनेक दिवस दिवसेंदिवस अधिक आक्रमक आणि युद्धखोर बनत चाललेल्या या देशाबद्दल बरेच काही ऐकायला, वाचायला मिळत होते.

भटकंती २

भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे.

कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर.

अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं. माणसं भेटायला हवीत, तिथलं खाणं पिणं, गाणं, इतर कल्चर, इमारती, त्यावरुन होणारी त्या गावाची ओळख, सार्वजनिक ठिकाणं, पार्क्स, म्युझियम्स, रेल्वे, ट्राम, त्यामधे दिसणारी तिथली जनता, त्यांचा पेहराव , लोकल ते ग्लोबल फुटट्टीवर त्यांचा नंबर शोधणं हे माझे आवडते विषय.

ललित लेखनाचा प्रकार

भटकंती १

भटकंती -१

लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास!
आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!!

हळूहळू त्या प्रवासाची म्हणा, अथवा अनुभवाची, चटकच लागली. शाळेतून येताना, पुणे ३० ते गुलटेकडी, रोज नवीन रस्ता असो, वा गडकिल्ले असो, आजीच्या गावाला म्हशींच्या मागे जाणे असो वा शाळेतून गुंजवणी खोर्‍यात विविध उपक्रमांसाठी जाणे असो. मला मनापासून आवडणारी गोष्ट , भटकंती!!

वय (महाविद्यालयात प्रवेश) वाढलं (अक्कल नाही) तेव्हां हे सगळं म्हणजे काय नक्की आवडतंय, हा विचार सुरु केला.

- ह्यासाठी मेंदू इतका का झिजवायचा
- नवीन माणसं /नग /वल्ली भेटतात
- नवीन जागा पहायला मिळतात.
- असेच भटके लोक भेटतात.

ललित लेखनाचा प्रकार

भोकातला मंडूक - ब्रिटीश पाक-साम्राज्याचा मेरुमणी

पूर्वसूचना :
अ. एवढं भारी, सूचक, रोचक शीर्षक असलं तरीही त्यावर भलसलते विचार करण्याआधी हे वाचा - मी बनवलेली पाककृती शाकाहारी होती. तेव्हा चावटपणा करायचा असेल तर दुसऱ्या धाग्यांवर जाऊन करा.
आ. पाक या शब्दातून पाकिस्तान, साखरेचा/गुळाचा पाक असे अर्थ काढू नयेत.

---

कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!

दिनांक- 27/02/2050
वार- रविवार!
वेळ- सकाळी चार!

मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता!
"सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! सृष्टीचे चक्र बिघडल्याने आता सरासरी रोज पाऊस पडायचाच!!

त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"

ललित लेखनाचा प्रकार

पठाणकोटचे शहीद व आपण

पठाणकोटचे शहीद व आपण
.

पठाणकोटमधील घटनांमुळे संरक्षणमंत्र्यांना पत्रकारपरिषद घ्यावी लागावी यावरूनच सारे आलबेल नाही हे कळावे. अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले थांबवणे हे लष्कराच्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण कितीही नाही म्हटले तरी या दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळतेच. आताही पंजाबच्या एका उच्चपदस्थ पोलिस अधिका-याने दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले असे सांगितले. अतिरेकी अशा उच्चपदस्थ अधिका-याला जिवंत सोडतील यावर कोणाचा विश्वास बसावा?

ललित लेखनाचा प्रकार