Skip to main content

मराठी बोलींचे काही नमुने

मागे एकदा मराठी भाषा शिकण्यासाठी डॉ. दत्तात्रय पुंडे, जोशी , कालेलकर इ.ची पुस्तके घेतली होती. ती वाचत असतांना त्यात दिलेले बोली भाषेचे काही मजेदार नमुने आढळले. ते वाचुन बोली भाषांचे महत्व नव्याने लक्षात आले. या व इतर भाषातज्ञांच्या मते साधारण असे मानण्यात येते की. एकभाषक समाजाच्या एका गटाकडुन किंवा एकभाषक समाजाच्या एखाद्या विशीष्ट प्रदेशातील लोकांकडुन देवाणघेवाणीसाठी, दैनंदिन व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट भाषिक रुपास बोली असे म्हणतात. संपुर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाजाकडुन बोलल्या जातात त्या मराठीच्या विवीध बोली.

त्याचे असे झाले (भाग १)

तो दिवसच असा कसा उगवला होता देव जाणे. किंबहुना उगवण्याआधीच त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. आदला दिवस कार्यालयात 'प्रकल्प व्यवस्थापक' (Project Manager) या बिरुदाबरोबर येणाऱ्या डोकेदुख्या (अनेकवचन बरोबर नसेल, पण भावना जाणून घ्या) मिटवण्यात गेला होता. आणि हे सगळे कधी नव्हे ते वेळेत पूर्ण करून 'संध्याकाळी घरी लौकर येण्याचा' सनातन वायदा पूर्ण होण्याचा इरादा दिसायला लागताच वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक नावाचा असुर जागृत झाला.

ललित लेखनाचा प्रकार

आपापल्या डीडीएलजेंची गोष्ट

Taxonomy upgrade extras

ऋणनिर्देशः जॅबरवॉक हा सिनेमा आणि पुस्तकविषयक एक इंट्रेष्टिंग ब्लॉग आहे. त्यावर नुकताच एक गंमतीशीर प्रयोग वाचला. या धाग्याची कल्पना तिथून ढापलेली आहे. तसंच इथेच काही दिवसांपूर्वी राही यांनी असं सुचवलं होतं, की आपण आपल्या व्यक्तिगत अनुभव वा आठवणींविषयी बोललो, तर 'ऐसी'च्या चर्चांचा कोरडेपणा थोडा कमी होईल. तेही या धाग्यामागे आहे.

ट्रॅफीक

दोन रस्ते एकमेकांना येऊन मिळतात,
तिथेच होतो भारीपैकी ट्रॅफीक

फार वर्दळ नसते सुरुवातीला
गजबजती गर्दी तर सोडाच, टोळभैरवही फिरकत नाहीत नाक्याकडे
उगाच एखादं जीव धरून राहिलेलं पिंपळाचं रोपटं
नि गंभीर होऊन गुलुगुलु बोलणारी एखादी अल्पवयीन फ्रेण्डशिप

फ्रेण्डशिप जीव धरू लागते
तसतसा नाकाही जीवही धरू लागतो
एखादी टपोरी पानाची टपरी
मोबाइल रिचार्ज मारणारा एखादा मल्टिपर्पज वाणी
नि गणपत वाण्याचे वारसदार असलेले काही फुटकळ रिक्षावाले

फ्रेण्डशिप हळूहळू सरकू लागते आतल्या गल्लीच्या लपलेल्या तोंडाकडे
तसतसे रस्ते रंगात येतात, सैलावतात
अंग ऐसपैस पसरून एकमेकांना टाळ्या देतात

ओपिनियन फॉर्मेशन (माहिती हवी आहे)

मी आणि माझा मित्र स्नेहल शेकटकर, नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे,

सिलेक्टीव्ह कायद्यांची सिलेक्टिव्ह अंमलबजावणी आणि आपण

Taxonomy upgrade extras

व्यवस्थापकः हे लेखन इथे हलवले आहे. अश्या प्रासंगिक विचारांसाठी वा प्रश्नांसाठी योग्य त्या धाग्याचा उपयोग करावा.