Skip to main content

<आपली अड्ड्यावरची भेट>

त्यादिवशी रविवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, मामलेदार कचेरीसमोरच्या गुत्त्यात. तू डोंगरीहून नुकताच परतला होतास. मांडोलीचा कर्यक्रम मोठ्या भाईंबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट.
त्या रात्री संतापाने, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता घोडा वापरायचा, त्याबरोबर कोणते रामपुरी घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला.

अफूची गोळी

तो दरवर्षी येतो. न चुकता. ठरलेल्या वेळेला , ठरलेल्या दिवसांसाठी. आजकाल DJ च्या आवाजात त्याच्या नावाची ललकारी नीट ऐकूही येत नाही. सोन्या-चांदीच्या अलंकारांत त्याचं लंबोदर कधी झाकलं जातं कळत नाही. मैलभर पसरलेल्या रांगांमधून VIP पास असल्याशिवाय त्याचं दर्शनही होत नाही, उंचच उंच मूर्त्यांच्या स्पर्धेतून याच्या भक्तांचं खुजेपण समोर येतं. पण तरीही तो येतो. मला आश्चर्य वाटतं दरवर्षी इतक्या स्थितप्रज्ञतेने येणं जाणं कसं काय जमतं याला? कदाचित म्हणूनच याला देव म्हणत असावेत.

मनापासून विनंती करतो की...

जरा माझे स्पष्ट मत लिहू का?

अलीकडे 'ऐसी'वर बिनबुडाचे वावदूक आणि वितंडवादी धागे फार येऊ लागले आहेत आणि काही ठराविक जणांच्या ठराविक शब्दांतील शिवीगाळीपलीकडे त्यतून काहीहि निष्पन्न होतांना दिसत नाही. हे धागे कोणते असावेत आणि त्याचे निर्माते कोण हे लिहिण्याची आवश्यकता नाही. जाणकार जाणतातच. दर्जेदार आणि भरीव चर्चा सुरू करणारे धागे क्वचित बघायला मिळतात. गेल्या पाच सहा महिन्यातील ही स्थिति असावी.

अंदाज करा - इन्फंंट मॉर्टॅलिटी

वरील आलेखात गेल्या काही दशकातली इन्फंट मॉर्टॅलिटीची आकडेवारी दिलेली आहे. (इन्फंट मॉर्टॅलिटीने जन्मापासून एका वर्षाच्या आत मृत्यू पावणाऱ्या मुलांचं प्रमाण दर हजार जन्मांमागे दर्शवलं जातं) यात जगाचे पाच मोठे विभाग सामावलेले आहेत.

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ९

Taxonomy upgrade extras

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?

आपली वैशालीतील भेट

हा फार फार पूर्वी एका संस्थळावर टाकलेला लेख इथे परत टाकते आहे.
यातील शैली अभिषेक यांच्या शैलीशी जुळती आहे. अन ती आठवल्याने हा लेख टाकते आहे. :)
_______________________________________
त्यादिवशी रवीवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, फर्ग्युसन समोरच्या वैशालीत. तू अमेरीकेहून नुकताच परतला होतास. बघण्याचा कर्यक्रम मोठ्या माणसांबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट.
त्या रात्री अधीरतेनी, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता पोशाख घालायचा, त्यावर कोणते डूल घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला.

एका डेटिंगची गोष्ट – भाग पहिला

समोर किमान पाच हजार तरुण-तरुणी. अक्ख्या तरुणाईला वेड लावणारा गायक आणि त्याच्या सोबतचे अजून चार जण. गेले तीन तास त्यांच्या गाण्यांच्या बोलावर आणि गिटार, ड्रमच्या तालावर तरुणाई डोलत होती. कार्यक्रम शेवटाकडे यायला लागला. अक्ख्या वातावरणात संगीत पसरून गेलं होतं. शेवटचं गाणं सुरु होणार इतक्यात त्या ‘celebrity’ गायकाने त्याला बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चीत्कारणाऱ्या ‘crowd’ कडे बघत गायक म्हणाला ” Thanks Bro, This event was possible only because of you”. क्षणार्धात अक्ख्या गर्दीतून त्याच्या नावाच्या आरोळ्या निघाल्या. तो निवांत हसला आणि गर्दीकडे पाहत त्याने एक फ्लाइंग किस दिला.

Diwali to Diwali via Halloween

या दिवाळीलासुद्धा तो घरी यावा अशी त्यांची अपेक्षा नव्हतीच मुळी. त्याला तिकडे पाठवलं तेव्हा ज्या बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात त्यातलीच ही एक तडजोड होती. त्याच्या आयुष्यातले पुढचे अनेक दिवाळसण सुखात जावे म्हणून आपल्या आयुष्यातले काही दिवाळसण त्याच्याशिवाय साजरे करण्याला त्यांची हरकत नव्हतीच. शिवाय आता इतकं काही अंतर जाणवत नाही. स्काइप, whatsapp , facebook सगळं बुडाशी असतं. पूर्वी रोज गप्पा व्हायच्या आता पंधरा दिवसांनी होतात. त्याला तिकडे जाउन आत्ताशी कुठे तीन वर्षं झालीयेत. स्थिरस्थावर झाला की आपणच जायचं तिकडे. पहिल्या फेरीत अमेरिका बघून घ्यायची. मग तोच इकडे येईल तेव्हा लग्न उरकून घ्यायचं.

Performance Review -

दरवर्षी साधारण जानेवारीच्या मध्यात अन फेब्रुवारीच्या सुरवातीला, ऑफिसच्या रुक्ष वातावरणाचा एकदम कायापालट होतो. अगदी इतका की प्रकर्षाने जाणवू लागतो. म्हणजे Employee Orientation च्या काळात ऐकलेले, घोकलेले समस्त manners सर्वांचेच,एकदमच उफाळून येतात. अचानक सौहार्द (synergy) चे लोण, वणव्यासारखे पसरु लागते. सहकार्‍यांच्या संदर्भातील, etiquettes कडे विशेष लक्ष पुरविले जाते व सर्वजण एकदम गुण्या गोविंदाने नांदू लागतात. खरं तर ऑफिसमध्ये स्वर्गच अवतरतो.

वै. विष्णुबुवा जोग महाराज

विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा)
त्यांना भावपूर्ण आदरांजली.

ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील
तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला -
" पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥
बुवा एकदम त्याच्यावर खेकसले.
"मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा,
एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !"
कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने
ओळखतात. त्यांचा हा अल्प परिचय -

विष्णु नरसिंह जोग (जन्म : १४ सप्टेंबर १८६७, मृत्यू ५ फेब्रुवारी १९२०)