Skip to main content

समजा प्राइम नंबर केसांसारखे आहेत

समजा असंख्य मुंग्या माणसाला ढकलत आहेत.
म्हणजे गणित केव्हा संपेल जेव्हा असंख्य अशी गोष्ट असणारच नाही.
पाहताच येत नाहीत इतक्या सूक्ष्म त्या आहेत.

समजा एखाद्याने येथे फक्त मराठीत टंकले म्हणून वाचणारे लोक आहेत याचे मला आश्चर्य वाटते. पण
मीही तसाच आहे. मी आंतरजालावरची मराठी वर्तमानपत्रं वाचू शकत नाही पण इतरत्र मराठी वाचण्यात वेळ घालवतो.
पण कोणी वाचत नसल्यास लिहीण्याचा उपयोग काय हे शोधण्यासाठी लिहीणे मला आवडते. पण तेही लोकांनी वाचावे
असेच वाटते.

गोंधळ

'वांझोटी?' (एक मूळकथा) - भाग १

शेवटचे वाक्य वगळता हा भाग इथे प्रकाशित झाला आहे. यापुढील भाग जे जपमाळकथेहून वेगळे आहेत ते क्रमशः प्रकाशित होतील.

इलेक्शनी- चारोळ्या

आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं.......

(१)
प्रसाद घ्या
तीर्थ प्या
आटोत बसा
वोट आपला
असा विका.
(२)
नेता नोट
मोजतात.
नोट मते
मोजते.

नरहरी सोनार हरीचा दास

आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया).
त्यांना भावपूर्ण आदरांजली.

वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय
करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत
होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा
व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते.
वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो.

यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या
दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे

एका डेटिंगची गोष्ट – भाग दुसरा

कारमधल्या शक्य त्या प्रत्येक आरशात पाहून,स्वतःशीच हसत, स्वतःवर निहायत खुश होत आणि ह्या आरशांमध्ये जितक्या निवांतपणे पाहता येतं, स्वतःला निरखता येतं तितक्याच निवांतपणे त्याच्यासोबत राहून त्याच्यात हरवून जाता येईल का हा बराचसा रोमांटीक आणि तितकाच अव्यवहार्य विचार करत ती कारमधून उतरली आणि हॉटेलात शिरली. तो आला नव्हताच. उत्साहात टेबलसुद्धा तिनेच बुक केलं होतं. तिथे जाउन ती बसली. कधी येईल तो? किंबहुना येईल तरी का हा प्रश्न तिला छळत होता. वेटरने आणून दिलेल्या मेनुकार्डची पानं उलटत ती बरीच मागं जाउन पोचली. पार कॉलेजपर्यंत. कॉलेज, नुसत्या नावासरशी आठवणी भरभर गोळा झाल्या.

कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!

Taxonomy upgrade extras

स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार

मराठी भाषेतले ज्येष्ठ लेखक श्री. भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. मराठी वाचक आणि मराठी भाषकांकरता आनंद वाटावा अशी ही घटना आहे. या निमित्ताने नेमाड्यांच्या लिखाणाबद्दल, त्यांच्या साहित्यिक आणि साहित्यबाह्य व्यक्तिमत्त्वावर चर्चा करता यावी म्हणून हा धागा काढत आहे.

श्री. नेमाडे आणि आपण सर्व मराठी वाचक यांचं अभिनंदन.

बातमीचा दुवा : http://www.loksatta.com/desh-videsh-news/jnanpith-award-declared-to-bha…

बातमीचा प्रकार निवडा

ती

दुपार टळून चालली होती , सुर्य मावळतीकडे झुकत होता. खरेतर ऑफिसमधून बसून ह्या गोष्टी
कधीच दिसत नव्हत्या, पण त्यावेळी माणसाचे आयुष्य चालते ते घड्याळाच्या काट्याकडे बघत…………
कंटाळा आला होता, त्याला रोजच्या ह्या धावपळीचा…………!!!!
त्यामुळे आज कामात सुद्धा लक्ष लागत नव्हते, समोरच्या कॉम्पुटर कडे नुसता शून्यात बघत होता,
कसला तरी विचार त्याला आज सतावत होता, मन पुन्हा - पुन्हा त्याला भूतकाळात घेऊन जात
होते….
अचानक त्याच्या मनात आले तडक उठावे, बाहेर जावे आणि एक सिगारेट सुलगावी आणि त्या सिगारेटच्या धुरासारखे
हलके हलके होऊन जावे…… पण त्याला आज तेही शक्य नव्हते…?????