Skip to main content

महागोफणीचा भीमटोला

तुम्हाला जर असा प्रश्न कोणी विचारला की आदिमानवाला गवसलेले पहिले असे प्राणघातक हत्यार कोणते की जे वापरून त्याला दूर अंतरावरून आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गतीने धावू शकणार्‍या, रानटी प्राण्यांची शिकार करणे किंवा स्वत:च्या मानवी शत्रूलाही दूर अंतरावरूनच ठार मारणे किंवा किमान पक्षी त्याला घातक प्रमाणातील शारिरिक इजा करणे शक्य झाले असावे? तर तुम्ही त्याचे काय उत्तर द्याल? खरे तर या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. हे हत्यार होते व आहे, शेतकरी शेताची राखण करत असताना वापरतात ती साधी गोफण!

धाग्याचा प्रकार निवडा:

चिं. त्र्यं. खानोलकर - "गणुराया" आणि "चानी"

चि.त्र्यं. खानोलकर, "गणुराया" आणि "चानी"
मौज प्रकाशन, मुंबई, प्रकाशन वर्ष १९??

समीक्षेचा विषय निवडा

ठाणे कट्ट्याचा वृत्तान्त

स्मार्ट दिसण्याच्या क्षणभंगुर मोहापायी खादीचं जाकीट चढवलं, तेव्हाच या कट्ट्याचा वृत्तान्त सादर करण्याचं गोड झेंगट आपल्या गळ्यात येऊन पडणार याबद्दल नियती पूर्वसंकेत देते आहे हे मला कळायला हरकत नव्हती. पण स्वखुशीनं पत्करलेल्या स्थानिक यजमानपदाच्या उत्साहात गर्क असताना, गुर्जींनी माझी बकरी कधी केली ते माझ्या नजरेतून निसटलं. मग शहाण्या आणि अभ्यासू मुलासारखे फोटू काढणं, एका जागी जमवणं, फेसबुकावर डकवणं आणि अक्षम्य उशीर होण्याआत वृत्तान्ताची डेडलाईन गाठणं आलंच.

हाक

गावची नदी येते स्वप्नात
स्वप्नात नदीला पूर असतो आलेला
स्वप्नात समुद्रासारख्या उसळतात नदीच्या लाटा
वार्‍यानं घरंगळत जाते मी
पण पडत नाही पाण्यात नदी बेफाम हाका मारत असताना

स्वप्नात गावातल्या
खचलेल्या रस्त्यांना पडतात भूकंप झाल्यागत भेगा
त्या भेगेत जाऊन पडते सायकलरीक्षा
ज्यात बसलेय मी आणि चालवतोय एक लहान मुलगा
पण वाचतो आम्ही दोघंही, फक्त वाहन गायब होतं

स्वप्नात गावचं घर दिसतं
घरासमोरच्या मैदानात निजलेय मी उघड्यावर
आणि दोन आडदांड पाहून दचकते
ओरडते तर निघतच नाही घशातून आवाज
हाक मारू पाहतेय... बाबा... बाबा... बाबा...

भाषांतरकाराचे कार्य (अनुवादित)

मूळ जर्मन लेखक: वॉल्टर बेन्जॅमिन (१९२३)
इंग्रजी भाषांतर - "द ट्रान्स्लेटर्स टास्क": स्टीवेन रॅन्डल (१९९७)

(हे मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतरावरून केले आहे.)

ऱ्हायनो सिझन

पिफमधल्या आवडलेल्या काही चित्रपटांपैकी एक ऱ्हायनो सिझन. इराणच्या कट्टर इस्लामिक राजवटीमधे एका कवीला आणि त्याच्या बायकोला ब्लास्फेमीच्या आरोपाखाली वेगवेगळ्या तुरुंगात टाकलं जातं, ३० वर्षानंतर सुटल्यावर बायकोचा शोध घेणाऱ्या कवीची हि कथा.

समीक्षेचा विषय निवडा

बासरीचे गुपित

नित्य हरिचे अधरामृत
सेवन तू करिशी
भाग्यवंत तू बासरी
अभागी राधा मी बावरी

काय तप केले?
कोण पुण्य संपादिले?
मज सांगी तू बासरी
विनवी राधा मी बावरी

अहं भुसा टाकूनी
पोकळ जाहले
ऐक राधे गे साजणी
गुपित सांगतसे बासरी

- देवदत्त परुळेकर