Skip to main content

५) Are you out of your sense? Yes ! It's Sensory Integration Disorder.

आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound).
पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर?

हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.


धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

चिलॅक्स!

गेले आठ दिवस एकच चर्चा, तुकारामाच्या गाथेसारखी वर येत्ये. गाथा असती तरी बोअरच झालं असतं. फेसबुकाच्या मेसेजमधेही तेच सात लोक, तीच चर्चा आणि त्याच लोकांबद्दलचं गॉसिप. बेकार कंटाळा आला. फेसबुकाचं न्यूज फीड उघडलं. सध्या अमेरिकेत आहे म्हणून काही अमेरिकन वृत्तसंस्थांना तिथे उकाडा टाकायला सांगितला आहे. बातम्यांचा. तिथे सोची हिवाळी अॉलिंपिक. एकामागोमाग एक बहुतांश बातम्या रश्यात कसे भटके कुत्रे मारले, सोचीच्या शेजारच्या गावात साधे पूलसुद्धा धडके नाहीत आणि पुतिन कसा LGBT द्वेष्टा आहे याच्या.

निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट

एखादी गोष्ट आवडण्याकरिता त्या गोष्टीत काय असायला हवं?

समीक्षेचा विषय निवडा

तालीम

बजरंगा म्हन्त्यात मला. तालमीजवळ खोली हाय आमची. म्हंजी मी आन् थोरली भन रहायलोय न्हवं का! नरसिंगपुरास्नं आलोया हितं कोल्लापुरात. टेशनाजवळ आमचा मावळा सांजंच्या टायमाला भाजी इकाय् येतोय, तेच्या वळकीनं ही खोली धरलिया. भनीला पतकी डाक्टरांच्यात काम मिळालंया म्हून बरं. दीसभर दवाखाना झाडती-पुसती. लऽय मोट्टंमोट्टं लोक येत्यात थितं, पोर व्हईना म्हनताना! गावाकडं आसलं काय आसतं तर समद्यांनी खुळ्यात काढला असता की “मर्दा! आरं नवी बाईल आनशिला का डाक्टराफुडं जाशिला!” पर पोरगं झालं का आयबाप समद्यास्नी बक्षिशीबी देत्यात लऽय कायतर. भनीलाबी मिळतंया कवा-कवा! तसं बरं हाय म्हनायचं हितं.

काही व्हेलेंटाईनी चारोळ्या

(१)
कट्यावरच्या मुलांसाठी (कालेज तरुणासाठी) धोक्याची सूचना - पाहून कुणी हसली तर दोस्ती दुष्मनीत बदलण्याची शक्यता.

तिरछी नजर फेकुनी
ती मंदमंद हासली
जन्माची दोस्ती आमुची
तत्क्षणी खलास झाली.

(२)

माझ्या बरोबर कित्येकदा असेच घडले आहे. गेले ते दिन गेले ...

मी तिला गुलाब तिले
तिने काटे परत केले
तिच्या डोळ्यांत हंसू
माझ्या डोळ्यांत आंसू.

(३)

एकांती भेटण्यापूर्वी विचार करा, जमाना खराब आला आहे.

व्हेलेंटाईन दिनी
ती एकांती भेटली
रात्री आनंदी झोपलो
सकाळी कस्टडीत उठलो.

(४)
प्रेमाची फलश्रुती बहुतेक अशीच असते...

आधी प्रेम केले

कातरवेळ – २

याआधी भाग १ | २

घड्याळाने ४ चा टोल दिला. या खोलीतली तिची एकमेव वस्तू. रोज नियमाने तिला साद घालणारी. अगदी याच वेळेला. प्रत्येक टोलाबरोबर येणारा एक प्रश्न “ किती दिवस टाळणार आहेस?’

जपानी नेत्रपल्लवी

गेले काही महिने/वर्ष भारत आणि जपानमध्ये कमालीची जवळीक आलेली 'दिसते' आहे. श्री सिंग यांची जपान यात्रा झाल्यानंतर गेल्याच महिन्यात जपानच्या महाराजा व राणीने केलेली भारतवारी अनेकांच्या भुवया उंचावून गेली. एकूणच जपानी वर्तुळांत त्यांच्या राजाची भेट ही केवळ मित्र राष्ट्रांना - ती ही अतिशय क्वचित- ऑफर केली जाते. त्या लगोलग २६ जानेवारीच्या सोहळ्यात जपानी पंतप्रधानांना मिळालेले आमंत्रण भारताकडून उचललेले 'परतफेडीचे' पाऊल आहे असे वाटत असतानाच ही बातमी येऊन थडकली.

धाग्याचा प्रकार निवडा:

भविष्य दर्शन

अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात .

पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .

विसरून जाण्याचे वय

माझी इयत्ता तिसरीत असलेली नात रोज स्कूल बसने शाळेत जाते. तिच्याच वर्गात असलेल्या काही मुली सुद्धा या बसच्या फेरीत तिच्या बरोबरच्या रोजच्या सहप्रवासी असतात. ती शाळेतून घरी परत आली की तिच्या त्या वेळच्या मूड वरून त्या दिवशी ती आणि तिच्या बसमधल्या मैत्रिणी यांच्यामध्ये भांडणे झाली असतील? का त्या गळ्यात गळा घालून बसल्या असतील? याचा सहज अंदाज बांधता येतो.