डॉनल्ड ट्रंप दोषी!
- Read more about डॉनल्ड ट्रंप दोषी!
- 15 comments
- Log in or register to post comments
- 3594 views
सिंधू सरस्वती संस्कृती (भाग २)
सिंधू सरस्वती संस्कृतीतली नगररचना कशी होती? राज्यव्यवस्था, अर्थकारण यांविषयी काय अंदाज बांधता येतात?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सिंधू सरस्वती संस्कृती (भाग २)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1901 views
बाजारगप्पा-भाग-१
खुलासा
सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील. तर आता हात झटकुन झाल्यानंतर मी हातवारे करत तुम्हांस माझे अनुभव शेअर करतो कदाचित कोणांस उपयोग झाला तर होइल.
- Read more about बाजारगप्पा-भाग-१
- 9 comments
- Log in or register to post comments
- 3580 views
कथा दोन सावरकरांची
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची १४१ वी जयंती २८ मे रोजी आहे. त्या निमित्ताने सावरकरांवरील एका महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकाचा राहुल सरवटे यांनी करून दिलेला हा परिचय. सावरकरांचं मराठीजनांमधलं आकलन आणि इंग्रजी आकलन यांत फरक असू नये, ही अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करतं का?
- Read more about कथा दोन सावरकरांची
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2935 views
मोदीस्तोमाची दशकपूर्ती
सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी राजकारणात हळूहळू मोदीकेंद्रीत होऊ लागल्या. याचा फायदा भाजपाला झालाच पण तोटाही भाजपालाच झाला. कारण भाजपाप्रणित मोदी की मोदीप्रणित भाजपा याचे द्वंद्व निर्माण झाले. भाजपाला आजपर्यंत हुकुमी एक्का मिळाला नव्हता सत्तेवर येण्यासाठी. तो मोदींच्या रुपाने मिळाला. कालांतराने मोदींनी आपली पक्षावरची पकड अजून मजबूत केली. राजनाथसिंह यांच्यानंतर अमित शहा यांच्याकडे भाजपाची सूत्रे आल्यानंतर एका वेगळ्या धाटणीचे मॉडेल भाजपाने डेव्हलप केले.
- Read more about मोदीस्तोमाची दशकपूर्ती
- 39 comments
- Log in or register to post comments
- 7917 views
सिंधू सरस्वती संस्कृती (भाग १)
साधारण १९२५ च्या सुमारास ब्रिटिश आर्किओलोजिस्टनी (पुरातत्त्ववेत्त्यांनी) सिंधू संस्कृतीचा शोध लावला. त्यानंतर जगभर ही संस्कृती Indus Valley Civilization म्हणून प्रसिद्ध झाली. आर्किओलोजिस्टना नंतर गुजरातपासून हरियाणापर्यंत अनेक प्राचीन वस्ती असलेली स्थळे मिळाली. ही सर्व प्राचीन शहरे त्या काळात अस्तित्वात असलेल्या सरस्वती नदीच्या बाजूला आहेत असे ध्यानात आले. म्हणून ही सिंधू-सरस्वती संस्कृती.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सिंधू सरस्वती संस्कृती (भाग १)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3080 views
भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती
शरद बाविस्कर यांचं 'भुरा' वर वर पाहता एका खान्देशी तरूणाची संघर्षमय जगण्याची गोष्ट न राहता गेल्या दोन दशकातील तरुणाईची प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केलेली मनस्वी चिंतनशील आणि प्रेरणादायी गोष्ट झाली आहे. लेखनाचा काळ हा लेखकाची दहावी ते जेएनयू मधील शिक्षकी जीवन एवढाच रेखाटला आहे. हा प्रवास सरासरी वीस वर्षातील संघर्ष आणि यशस्वी घोडदौड यापुरता मर्यादित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हाच प्रवास छोटेखानी वाटत असला तरी उर्वरित पुढच्या आयुष्याबद्दल आश्वासक असा वैचारिक पाया यातून साकारला गेला आहे. यात लेखकाने प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीने काल सुसंगत घडलेल्या घटना त्यावरची मूलभूत मतं लिहिली आहेत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1649 views
त्या तरूतळी
अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते
शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो
वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे
अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ
नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!
आज्ञा पडत्या फळाची
तरुतळाशी बसून
कुणी ऐके, त्याची प्रज्ञा
देई शास्त्रा संजीवन
- Read more about त्या तरूतळी
- Log in or register to post comments
- 1084 views
ॲलिस मन्रो
नोबेल पुरस्कारविजेती लेखिका ॲलिस मनरोचे नुकतेच निधन झाले. तिचा साहित्यिक वारसा काय आहे?
- Read more about ॲलिस मन्रो
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2288 views
पाकिस्तान- १२
युद्धात शस्त्रापेक्षा शस्त्र कोण चालवत आहे हे महत्त्वाचे असते. जेव्हा पाकिस्तानी लष्कराने लाहोर आघाडीवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराकडे कोणता पर्याय होता? त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते, तसेच रस्तेही बंद करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना अखनूर (काश्मीर) वाचल्याची बातमी मिळत होती. पाकिस्तानी वायुसेना लाहोर आघाडीवर जोरदार हल्ला करत होती, त्यामुळे भारतीय लष्कर आपली पोझिशन बदलत होते. पाकिस्तानच्या युद्ध इतिहासात मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या पलायनाचे चित्रण मोठ्या चवीने केले जाते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about पाकिस्तान- १२
- Log in or register to post comments
- 999 views