मस्ग्रेव्हांचा रिवाज - २
"वॉटसन, हा सगळा घटनाक्रम मी किती उत्कंठेने ऐकला असेल हे तुला वेगळे सांगायला नकोच, मी हा गुंता सोडवून या सगळ्या घटनांच्या मागचे सूत्र शोधून काढायच्या प्रयत्नात होतो. मस्ग्रेव्हच्या घरातली मोलकरीण गायब होती. बटलर निघून गेला होता. मोलकरणीचे बटलरवर प्रेम होते, पण नंतर त्याचा दुस्वास करायला तिच्याजवळ सबळ कारण होते. ती वेल्श होती, भडक माथ्याची आणि सणकी. बटलर दिसेनासा झाल्यावर लगेच ती प्रमाणाबाहेर उत्तेजित झाली होती. शिवाय तिने एका पिशवीत विचित्र वस्तू भरून ती पिशवी तळ्यात फेकली होती.
- Read more about मस्ग्रेव्हांचा रिवाज - २
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6209 views
मस्ग्रेव्हांचा रिवाज
(सर ऑर्थर कॉनन डॉइल यांच्या 'द मस्ग्रेव्ह रिचुअल' या कथेचा स्वैर अनुवाद)
- Read more about मस्ग्रेव्हांचा रिवाज
- Log in or register to post comments
- 7189 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ११ : दोन
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : दोन
जेव्हा ऋषिकेश आणि आतिवास असे दोन विजेते घोषित झाले तेव्हा नियमाला मुरड घालण्यासारखं होतं खरं.. पण दोघांनी विचार केल्यावर आधीच्या निर्णयात नव्या विषयाची नांदी दिसत होती. 'दोन' हा विषय केवळ जोडी किंवा युती इतकाच सिमीत असायचे बंधन नाहीच. आपापल्या प्रतिभेला आव्हान देऊन 'दोन' या विषयाला न्याय देईल असे कोणतेही छायाचित्र येऊ देत.
अतिवास आणि ऋषिकेश हे दोन आव्हानदाते याचे विजेते निवडतील
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ११ : दोन
- 26 comments
- Log in or register to post comments
- 25784 views
कुणी वैशिष्ठ्य सांगेल का?
जेव्हा आपल्याला आपली चित्रे बरी आल्याचा भास होऊ लागतो तेव्हा मी एकतर कुण्या भल्या प्रकाशचित्रकाराबरोबर जातो किंवा प्रकाशचित्रांच्या प्रदर्शनाला जातो वा मला बर्या वाटलेल्या माझ्या चित्राच्या विषयातील/ स्थानावरील इतर चित्रे पाहतो. यामुळे माझा आपली चित्रे उच्च असल्याचा गैरसमज दूर व्हायला मदत होते.
- Read more about कुणी वैशिष्ठ्य सांगेल का?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4324 views
हसर्या चकल्या
सध्या, जिलब्यांच्या ऐवजी बर्याच चकल्या पडताहेत, म्हणून म्हटलं, आपणाही पाडाव्या
प्रेरणास्थानः अजाणता ही उत्कट कविता.
- Read more about हसर्या चकल्या
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4063 views
अल्बर्ट काम्यू जन्मशताब्दी
नोबेल परितोषिक विजेता विख्यात लेखक अल्बर्ट काम्यू याचा जन्म ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झाला. म्हणजे आता त्याचे जन्मशताब्दी वर्ष चालू झाले आहे. 'लोकसत्ता'त दर शनिवारी येणाऱ्या 'ग्रंथविश्व' ह्या सदरात आज विबुधप्रिया दास यांनी त्याची दखल घेतली आहे. लेखाचा दुवा -
http://www.loksatta.com/sampadkiya-news/birth-century-of-alber-kamu/
- Read more about अल्बर्ट काम्यू जन्मशताब्दी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4064 views
संवाद-१
मी तिला म्हणालो की मी वैतागलो आहे.एकंदरीत जगण्याची वीण आणि आपल्या गुणसूत्रांची विशिष्ट रचना - ह्याचा काही मेळ बसताना दिसत नाहीए ती म्हणाली की तू अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करतोस आणि व्यथित होतोस. माणसाला आपल्या विचारांवर ताबा मिळवता आला पाहिजे.
- Read more about संवाद-१
- Log in or register to post comments
- 3655 views
तुम्ही किती व्यवस्थित आहात?
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.
खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.
- Read more about तुम्ही किती व्यवस्थित आहात?
- 15 comments
- Log in or register to post comments
- 11942 views
लक्ष लक्ष दिव्यांचा ..............
लक्ष लक्ष दिव्यांचा दिपत्कार घडविणारी दिवाळी,
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी दिवाळी,
मरगळलेल्या थकलेल्या मनाला उल्हासित करणारी दिवाळी,
वर्षभर कामात बुडालेल्या जीवांना सलग सुट्टी देणारी दिवाळी,
कामानिमित्त दूर दूर विखुरलेल्या पिलांना घरट्यात आणणारी दिवाळी,
धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज एकत्र आणणारी दिवाळी,
घनदाट अंधारया रात्रीतील अलौकिक दिपोत्सव म्हणजे दिवाळी,
*************************************************************************
अश्या ह्या अलौकिक दिवाळी/दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
अनिल तापकीर आणि परिवार
- Read more about लक्ष लक्ष दिव्यांचा ..............
- Log in or register to post comments
- 2030 views
जालावरचे दिवाळी अंक २०१२
दिवाळी येण्याची चाहुल जशी फराळ, कपडे आदींमुळे लागते तसेच दिवाळी अंकांच्या आगमनानेही. बदलत्या काळात आता जालावर दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागतील. काही प्रकाशित झाले देखील आहेत.
हा धागा अश्याच जालावरील दिवाळी अंकांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. तुम्ही वाचलेल्या, माहित असलेल्या आणि जालावर उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे मनमोकळी चर्चा करू शकता, समीक्षा करू शकता, परिचय करून देऊ शकता आणि आपली मते मांडू शकता.
- Read more about जालावरचे दिवाळी अंक २०१२
- 31 comments
- Log in or register to post comments
- 24361 views