पारिजातक
.
- Read more about पारिजातक
- Log in or register to post comments
- 2108 views
'नाहीसं करण्याचं' व्रत
जगताना फक्त नव्या गोष्टी निर्माण करणं पुरेसं नसतं, तर अनेक गोष्टी नाहीशाही करत जाव्या लागतात. जे आज हवं वाटतं, त्याचं उद्या ओझं होतं, किंवा जे आज नको वाटतं, त्याचा उद्या मोह पडतो .. त्यामुळे काय टिकवायचं आणि काय नाहीसं करायचं याचा निर्णय आपल्याला नेहमी करावा लागतो. हे लक्षात आल कागदांची आवराआवर करताना.
- Read more about 'नाहीसं करण्याचं' व्रत
- 13 comments
- Log in or register to post comments
- 9276 views
सर्जनशीलता व वेडेपणा
सर्जनशीलता व वेडेपणा किंवा (सौम्य शब्दात वेडसरपणा) यांच्यात काही संबंध असू शकेल का हा एक नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारण्यात एक गर्भितार्थही दडलेला असतो. तो म्हणजे वेडेपणाशिवाय प्रतिभाशक्ती असू शकत नाही किंवा प्रतिभेचे पर्यावसान वेडेपणात होऊ शकते. प्रतिभावान वेडे असतात हे मिथ वर्षानुवर्षे नव्हे, तर पिढ्यान पिढ्या जपली जात आहे. त्यात थोडा फार सत्यांश असला तरी अशा प्रकारचे sweeping statements त्या संबंधित व्यक्तीला, त्यांच्यातील प्रतिभेला व एकूण समाजाला धोकादायक ठरू शकतात. सर्जनशील व्यक्तींमध्ये वेडसरपणाची झाक असते, या विधानाला कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही.
- Read more about सर्जनशीलता व वेडेपणा
- 21 comments
- Log in or register to post comments
- 16815 views
जसपाल भट्टीला श्रद्धांजली.
'फ्लॉप शो', 'उल्टा-पुल्टा' आणि इतर टीव्ही मालिकांमधून विडंबनाला टीव्हीवर लोकमान्यता मिळवून देणार्या जसपाल भट्टीला श्रद्धांजली.
विनोदाकडे आपल्याकडे फार आदराने बघितलं जात नाही. पण दूरदर्शनच्या मोनॉपोलीच्या आणि उत्तम कार्यक्रम दाखवण्याच्या अखेरच्या काही वर्षांमधे फ्लॉप शो सुरू होता. जसपाल भट्टीने जवळजवळ एकहाती या कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली होती. राजकीय, सामाजिक विषयांवर अतिशय मार्मिक विनोद करून टिप्पणी करणारा जसपाल मला खूपच आवडत असे. जमून आलेल्या विनोदाशी ही माझी पहिली ओळख. 'फ्लॉप शो'च्या अगदी शीर्षकापासूनच तो स्वतःची थट्टा करत होता. एका भागात त्याने एक गाणं टाकलं होतं:
- Read more about जसपाल भट्टीला श्रद्धांजली.
- 12 comments
- Log in or register to post comments
- 11379 views
सेन्योरा एक्स
वास्तवाचा उत्सव साजरा करतानाच
दिवे जातात,
तेव्हा जाता जाता दिसलेली
ब्लुजमध्ये थिरकणारी तुझी पाठ.
अखंड पावसात वाहुन गेलेली पहाट,
तुझ्या खिडकीकडुन वळणारे रस्ते,
केसांत फिरणारे दगडी हात,
छातीवरची जुनी जखम,
तुझ्या बिछान्यात झोपणारी शिल्पं,
अढळपणाच्या दिप्तीने तुझ्या शरिरावर
सिगरेटचा धुर सोडणारे अल्टर इगोज,
या सगळ्याचं मी काय करायचं?
उद्या तुझ्या शरिरावरुन हात फिरवशील
तेव्हा माझा विचार करण्यापुरता
हा विचार झाकुन ठेव. बास.
- Read more about सेन्योरा एक्स
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6625 views
‘त्रिगुणी’ व्यक्तिमत्त्वातून साकारलेली... ‘त्रिपुटी!’
त्रिपुटी
(सुप्रिया विनोद - अक्षर प्रकाशन - रु१००/- पृष्ठे:८८)
- Read more about ‘त्रिगुणी’ व्यक्तिमत्त्वातून साकारलेली... ‘त्रिपुटी!’
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4605 views
अजाणताच
अजाणताच मी माझ्या मनात तुझा एक हसरा पुतळा उभा केला होता.
तुझी आठवण यायची तेव्हा मी तो न्याहाळून त्याच्या अभेद्यतेची कल्पना करायचे.
सगळं कसं शांत होतं, जणू तृप्तीने आसमंत भरला होता, जेव्हा तू आलास
तुझ्या एकाच कोमल स्पर्शाने माझ्या समक्ष तू त्या पुतळ्याचे तुकडे केलेस
ह्या आघातातून सावरत्ये तो पाहिलं की तू नाहीसा झाला आहेस
आणि माझ्या भोवती विखरून गेला आहेस काचांचे असंख्य तुकडे
त्यातून वाट काढताना मी राक्तबंबाळ होत्ये आणि तू ?
तू दूरवर छद्मीपणे हसताना आता मला दिसतोयस.
-ऋता
- Read more about अजाणताच
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6105 views
त्यांच्याकडे मोबाईल असता तर?
"मुलींना मोबाईलची गरज काय? आमच्यावेळी आया-बहिणींकडे कुठे होते मोबाइल? त्यांचा जीव गेला का?" असली विधानं करणार्या बहुजन समाज पार्टीचे राज्यसभा खासदार राजपाल सिंह सैनी सध्या मोठे चर्चेत आहेत. अहो पण या खासदारांना कोणीतरी सांगा रे, जीव म्हणजे सर्वस्व नाही. बाईची अब्रू हेच तिचं सर्वस्व. एकवेळ जीव गेला तरी चालेल, पण अब्रू गेली नाय पायजेल. लहानपणापासून मी पाहिले ते निळूभाऊंचे मराठी सिनेमे. त्यात निळूभाऊ सरपंच, पाटील असे कोणीतरी असतात. गावात नवीन मास्तर, नर्स म्हणून कोणीतरी 'पाखरू' आलेलं असतं.
- Read more about त्यांच्याकडे मोबाईल असता तर?
- 31 comments
- Log in or register to post comments
- 26880 views
तिढ्याचा काळ आणि नाटक
काळाची चौकट आखुन साहित्याची चिकित्सा करता येईल काय? मी किंवा माझ्या बरोबरीने लिहिणारे यांना एकत्र ठेऊन विशिष्ट काळाच्या चौकटीत सर्वांचे आकलन करता येईल काय? कुठल्या आधारे या-त्या सगळ्यांना एकत्र आणणार आणि बांधणार अथवा मोडणार? समकालिन लेखन-संसाराकडे बघायचे ठरवले तर व्यावहारिक काळाची चौकट सर्जन-काळाला लावता येईल काय? ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक बदल एका नंतर दुसरे, दुस-यानंतर तिसरे असे तपासता येतील काय? साठोत्तरी वा नव्वदोत्तरी वा इतर काही काळानुरुप मांडणी केल्याने काय साधणार?
- Read more about तिढ्याचा काळ आणि नाटक
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8172 views
टेंन्शन...
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...!
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं...
की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं...
पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही...
समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही?
सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥
देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥
''हे'' म्हणे येणारच...,असं समजुन जगायचं असतं...
नाहि आलं,तर..''अरे व्वा...!'',असंही म्हणुन बघायचं असतं...
- Read more about टेंन्शन...
- Log in or register to post comments
- 3083 views