Skip to main content

कांदासंस्थान का **संस्थान?

दि. ६ नोव्हेंबर, कांदा संस्थान - थेट टीका करण्यासाठी प्रसिद्ध असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. de बंग यांनी कांदा संस्थान ग्रामपंचायतीला पुन्हा धारेवर धरले. कांदा संस्थानाची संभावना '**संस्थान' अशी करून श्री. de बंग यांनी पंचायतीच्या राजकीय नेतृत्त्वावर प्रचंड प्रमाणात टीका केली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीचा पत्ता आता 'फोरास रोड' अथवा 'बुधवार पेठ' असा लिहावा असंही त्यांनी सुचवलं. श्री. de बंग यांनी अशी टीका करताना आकडेवारीही जाहीर केली.

चावडीवरच्या गप्पा - महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत.

“ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या.

“अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या.

नामाचिये बळे

जेवल्यानंतर खरेतर आता पुन्हा शेतात जायचा कंटाळा आला होता.दिवसभर शेतातून नदीवर फेऱ्या घालून मी भयंकर थकला होतो .वीजमंडळाला दिवसभरात भरपूर शिव्या घातल्या होत्या. का नाही शिव्या घालणार , नदी ते शेत दीड किलोमीटर अंतर पंप चालू करून आलो नि पाटाने शेतात पाणी आले नि एखादा वाफा झाला कि लगेच लाईट जायची मग पुन्हा नदीवर जावे लागे. परत पंप चालू करून आलो कि पुन्हा तेच नुसता वैताग आणला होता ह्या लाईट वाल्यांनी शेजारच्या एम आई डी सीत थोडी सुद्धा लाईट जात नव्हती. आणि बाकी गावांनी आठ आठ तास लोड शेडींग, लोड शेडींग मध्ये लाईट अजिबातच नसते पण इतर वेळीही सारखी ये जा चालू असते.

लखलख चंदेरी

काल संध्याकाळी सहज म्हणून फिरायला बाहेर पडले. पलिकडच्याच रस्त्यावर एका माणसाने आकाशकंदिलाचं छोटांसं दुकान थाटलं होतं. दोन उंच झाडांना साधारण मध्यावर एक दोरी बांधून त्या दोरीला तऱ्हेतऱ्हेचे आकाशकंदील अडकवले होते. त्या प्रत्येक कंदिलात एकेक विजेचा दिवाही सोडला होता. वाऱ्यावर झिरमिळ्या थुईथुई नाचवत ते सगळे कंदील विविध रंगांच्या प्रकाशाची उधळण करत होते.ते दृश्यच मोठं मनोहारी होतं. मला तर असे अनेक आकाशकंदील एकत्र लावलेले पाहिले की दिवाळीचं एक वेगळंच मूर्त रूप पाहिल्याचा आनंद होतो. दिवस लहान होत जातात. हवाही कोरडी होते. पाऊस संपलेला असतो आणि शरदाचं चांदणं आसमंतावर शीतल वर्षाव करत असतं.

भावना

छाती भरून आल्यासारखी आणि हातातून वारे गेल्यासारखी विचित्र संवेदना हे लिहिताना होत आहे.
http://www.asianage.com/hyderabad/truck-mows-down-two-448.

दररोज वाचतो त्या बातम्या प्रत्यक्षात किती धक्कादायक असतात!
काल माझ्या मुलाची 'किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना' (केव्हीपीवाय) ही परीक्षा होती. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी हे परीक्षेचे सेंटर होते.
त्याला परीक्षेसाठी घेऊन गेलो होतो. परीक्षेहून परतत असताना दुपारी एकच्या सुमारास एका आठपदरी महामार्गावर (किमान १०० मिटर रुंद)मोठा ट्रॅफिक जॅम होता.
रविवार दुपार - आठपदरी महामार्ग - फ्लायओव्हरची सुरुवात. वेळ आणि ठिकाण बघता सहसा अशक्य.

एलेजी

कधी काळ आपला नाही म्हणून
कधी लोक आपले नाहीत म्हणून

कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी आधार सापडले नाहीत म्हणून

कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून

कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून

कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून

कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून

कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी वारसा खोटाय हे समजलं म्हणून

कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून

कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून

शाहू मोडकांशी वार्तालाप- एक आठवण

शाहू मोडकांशी वार्तालाप

पुण्यात सुभाषनगर मधून चाललो होतो तेवढ्यात एक जुन्या पिढीतले वयस्कर गृहस्थ भेटले. अशीच ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त ओळख. "तुम्ही परवा शाहू मोडकांच्या व्याख्यानाला आला होतात का? " मी नाही म्हणालो. मुंबईत होतो मी. " फार सुंदर झाले व्याख्या्न. काय गाढा व्यासंग! त्यांनी बोलाव आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाने ऐकावं. ज्योतिषशास्त्राचं फार चांगलं विवेचन केलं. अध्यात्माची जोड हवीच तरच ते ज्योतिषशास्त्र. तुम्ही भेटा की मुंबईत. शिवाजी पार्कला राहतात. " मी नाही म्हणलं तरी भारावून गेलो. " हं आणि फोनवर अपॉइंटमेंट घ्या. त्यांना वेळ नसतो. " मी बरं म्हणालो. " आणि डायरेक्ट क्रॉस करू नका. त्यांनाच बोलू द्या. नाही तर तुम्ही सुरुवातीलाच तुमचे मुद्दे मांडाल. " मी ठीक आहे म्हणालो आणि त्यांचा निरोप घेतला.

सायकलींचे मौन

'मी' यांच्या सायकलींच्या फोटो वरून 'स्तब्ध उभ्या त्या सायकली' ही ओळ सुचली होती...आणि पुढे या प्रेरणेच्या लाटेवर स्वार होवून ही कविता करण्यात (बरं....पाडण्यात) आली आहे.
'मी' यांचा सायकलींचा फोटो इथे देत आहे. तो इथे देण्यावर आक्षेप असल्यास तो काढून टाकावा.

कवितेचं शीर्षकः " सायकलींचे मौन"

प्रदूषण झाले आहे फार
लोक म्हणती हे वारंवार

स्कूटर, गाडया धूर ओकती
जाता येता मुले खोकती