Skip to main content

प्रेम

तव नयनांचे गहिरे काजळ जेव्हा बनते धुंद सुरा
अन् ओठांचे थरथरणे ते, त्या चषकाचा भास खरा
बुडून जातो स्वप्नामध्ये तुझ्या मिठीच्या, प्राणसखे!
नकोस स्पर्शू हलकेही मज उठवाया तू, थांब जरा!

आकर्षक ते गोंदवणाचे फूल जणू मज खुणावते
हनुवटीस त्या स्पर्शुनि माझी तुजवर प्रीती दुणावते
ह्या केसांच्या वादळात मी योग्यासम संयत राहू?
वाट पाहतो साखरकळिच्या स्पर्शाची, तू दे मजला




इतरत्र पूर्वप्रकाशित

मी चालत गेलो...

मी चालत गेलो
माणसं भेटत गेली
कुणी दूर गेलं
कुणी जवळ आलं
संवाद होत गेले
मन जुळत गेले
मी चालत गेलो...

नाती गुंफत गेली
गाठी बांधल्या गेल्या
कैफात बुडत गेलो
जग हरवत गेलं
जगणं रमत गेलं
हर्ष दुणावत गेला
मी चालत गेलो...

मोह वाढत गेला
स्वार्थ कळत गेला
मन वळत गेलं
वाद होत गेले
कुणी रडत गेलं
कुणी हरत गेलं
मी चालत गेलो...

मन झुरत गेलं
प्रेम मरत गेलं
काही सुटत गेलं
काही उरत गेलं
दरी वाढत गेली
लळा पुसत गेला
मी चालत गेलो...

बंध विरत गेले
साथ झडत गेली
वर्तमान ढळत गेला
भविष्य चकवत गेलं
हृदय तुटत गेलं
दु:ख रडवत गेलं
मी चालत गेलो...

ग्रीन स्मूदी

लहानपणी खोकला होऊ नये म्हणून मी प्रयत्नाची शिकस्त करीत असे. कारण जरा नुसता संशय आला सर्दी पडशाचा तरी आई लगेच "अहो, येतांना आढूळशाचा पाला घेऊन या, विद्या जरा खोकते आहे." असे वडिलांना फर्मान सोडायची. यावर काही बोलण्याची सोय नसल्यामुळे मी गप्प बसून दुख्खी अंतकरणाने रात्रीच्या त्या क्षणाची वाट पाही. बहुतेक लोकांना(सुदैवी) आढूळसा माहिती नसेल. कदाचित हा फक्त विदर्भातील खेड्यावरचा सर्दी-खोकल्यावर असलेला रामबाण उपाय असेल. गर्द शेवाळी रंगाचा हा कडूजहर रस खोकला तर सोडाच पण जगातल्या सर्व जंतूंचा नाश करू शकेल अशी मला खात्री होती. आता वळून बघतांना वाटते आई तो रस कशात मिसळून का देत नव्हती?

"सिन सिटी"

पाडगावकरांनी म्हटले "एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून”, तसा प्रत्येकाच्याच मनात असतो एक जुगारी दडून. आयुष्यभर विविध संभाव्यता तोलून आपण निर्णय घेतो, संधींचा फायदा घेतो आणि त्या साधल्या किंवा नाही साधल्या तरी त्याला शेवटी दैवयोग म्हणून मनाची समजूत घालतो. खरे तर कसिनोमध्ये पैशांनी खेळण्याच्या कितीतरी पटीने ज्यास्त धोके आपण आयुष्याशी, जिवाशी, नैतिकतेशी खेळत असतो.

पुन्हा एकदा, आस्ताद देबू: आता, रविंद्रनाथ टागोर

आस्ताद देबूंचा मुंबईतला ‘इंटरप्रिटींग टागोर’ चा प्रयोग पाहुन झाल्यावर त्यांच्याकडे ऑडिटोरियममधुन पहात होतो. प्रयोग पाहिल्यानंतर त्यांच्याशी आधीपासुन जोडलेले भेटायला, त्यांचे हातात हात घेऊन बोलायला उत्सुक होते. घामाघुम झालेले आस्ताद प्रत्येकाच्या शुभेच्छांचा तेवढ्याच अदबीने स्विकार करत होते. प्रेक्षकांच्या गर्दीत एखाद्याला त्यांनी ओळखलं नसलं तरी तसं न दाखवता त्याच्याशीही त्यांचं नातं दिसत होते. येणारा प्रत्येकजण आस्तादना भेटायला येत होता तसा काही वेळापुर्वी त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीलाही भेटायला येत होता. या प्रयोगाचा शेवट आस्तादांनी त्यांच्या ठेवणीतल्या गिरकी-प्रकाराने केला.

एक आध्यात्मिक पंथ: शेवईवाद

Taxonomy upgrade extras

श्री. क्लिंटन यांचा देवाला रिटायर का करा? हा चर्चाप्रस्ताव/लेख आणि त्यावरील प्रतिसाद मी वाचले आणि मला न राहवून वाटले की आपणही काही तरी टाकावेच. हा लेख मी ह्यापूर्वी मनोगतावर देखील प्रसिद्ध केला आहे.


शेवईवाद (Pastafarism किंवा Flying Spaghetti Monsterism)


लेखकहो सावधान

आज माझ्या एका ओळखीच्यांकडून मला लोकमत या वृत्तपत्रातील हा दुवा ईमेलने कळवण्यात आला:

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedN…

ऐसीअक्षरेच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला माझा लेख मला कोणतीही पूर्वसूचना न देता लोकमत मधे प्रसिद्ध करण्यात आला आहे. तेव्हा ऐसीवर लेखन करणार्यांना मी सावध करू इच्छिते की त्यांचे लेखन इथून परस्पर दुसरीकडे प्रसिद्ध होऊ शकते.

आई, अशी कशी ही दिवाळी !

आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते झटकन,
अभ्यासाला पुन्हा जुंपते
दहा दिवस का जाती चटकन !

फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या
गोड गोड का तसेच उरते ?
चकली चिवडा चट्टामट्टा
पोटामध्ये भरकन जिरते !

भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !

सुट्टी असते किती ग हट्टी
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं रहाते !