Skip to main content

नरेंद्र मोदींचा 'व्हायब्रंट गुजरात' की तहलकाचा गंजलेला लोहपुरुष?

गुजरात निवडणुका जवळ आल्यामुळे मोदीभक्त आणि मोदींविरुध्द त्वेष बाळगणारे अशा दोहोंकडून मोदींच्या गुजरातबद्दल विविध दावे केले जात आहेत. मोदी जिंकणार हे निश्चित असं म्हणतानादेखील जाहिरातींतला गुजरात आणि वास्तवातला गुजरात यांच्यातला फरक टिपण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न 'तहलका'नं 'The Iron man Begins To rust' या लेखात केला आहे. केवळ मुस्लिमच नाही, तर इतर काही गटांत मोदींविषयी असंतोष आहे असा त्यात दावा आहे.

चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा

मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी.

माझ्या मायेचं भवितव्य

Taxonomy upgrade extras

महाराष्ट्रातील एकूण मराठी शाळांची संख्या अन त्यातल्या मुलामुलींची पटसंख्या याबाबत हे संस्थळ पाहण्यात आले. संस्थळ-चालकांचा उपक्रम स्तुत्यच आहे पण एकूण संस्थळावरील माहिती वाचून काळजात कुठेतरी लक्क झाले. आजवर दिसत असलेली पण त्यांचा अर्थ मनापर्यंत न पोचलेली काही सत्ये नजरेसमोर आली. चिकित्सकपणे पाहिले तर दिसते की नुसतीच मराठी शाळांची संख्या कमी झाली आहे असे नसून या शाळांमधील शिक्षणाचा दर्जाही खालावला आहे.

"राजे संभाजी"

धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

मनास वाटे -


. .
मनास वाटे
उगाच वाटे
उदास वाटे
भकास वाटे

मनात वारे
उगाच सारे
भलते सारे
गोळा सारे

मनात काय
उगाच काय
भलते काय
वाटते काय

मनास नाही
उमगत काही
भलते प्रवाही
वहातच राही !

.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १० : गर्दी

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : गर्दी

"गर्दीचं गाणं", "गर्दीतला निवांत क्षण" असे विषय मनात आले होते, पण छायाचित्राचं आकलन/बोध हा सापेक्ष विषय असल्याने फक्त गर्दी असा विषय देतो आहे. विषय गर्दी असला तरी आशय तुमच्या मनातला असू शकतो, विषयासाठी चित्र न काढता आशयासाठी चित्र काढा, तुमच्या छायाचित्रातून तुमच्या मनीचे थोडक्यात सांगा. फोटो नीट एडिट करून दिल्यास तुम्हाला जे सांगायचे आहे ते नेमके कळण्यास मदत होते.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

स्पर्धा का इतर?

कविता कशा पाडाल?

आज कोजागिरी पौर्णिमा आहे. दोन आठवड्यांत दिवाळी! दिवाळीच्या आधी दिवाळी अंकही येतील. ऑनलाईन अंकांसाठी लेखांच्या मागण्या येतील, "लेखन द्या". हे लोकं पक्के डांबिस हो, एक काहीतरी डेडलाईन देतात आणि पुन्हा ती वाढवतात. सेलमधे कसं, आधी किंमती वाढवतात आणि वरून मग डिस्काऊंट देण्याचा हरिश्चंद्री आव आणतात तसं. तर अशा वाढीव डेडलायनींच्या दिवाळी अंकांसाठी कविता पाडण्याचा एक उपाय आज सुचला. त्यासाठी आधी आभारप्रदर्शन. मा. श्री. मार्क झुकरबर्ग, हे आत्ता आपल्यात हजर नाहीत. बाकी आभार फेसबुकावर माझा बकवास ऐकून घेणार्‍या माझ्या मित्रयादीतल्या लोकांचे, ज्यांच्यामुळे मला हा धडा लिहीता येत आहे.

ब्रेन गेन की वाढते ओझे?

Taxonomy upgrade extras

बीबीसी वर भारतात परतणार्‍या व्यक्तिंपैकी काहिंच्या निवडक प्रतिक्रीयांचे संकलन केलेला लेख वाचनात आला. हे संकलन इथे वाचता येईल.
सदर लेखाच्या मते, अनेक परदेशस्थ भारतीय भारताच्या प्रगतीच्या वेगाकडे पाहून भारतात परतत आहेतच, त्याच बरोबर काही परदेशात जन्मलेल्या - मुळ भारतीय वंशाच्या व्यक्तीही भारतात येऊ लागल्या आहेत. भारताने ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा भारतीय नागरीक असतील अश्या परदेशी नागरीकांना 'आजीवन भारतीय व्हीजा' देण्याचे धोरण २००५ मध्ये अमलात आणल्यापासून साधारण ११लाख परदेशी नागरीकांनी त्याचा लाभ घेतला आहे.

जागतिक तापमानवाढ - प्रलयघंटावाद की वस्तुस्थिती?

गेल्या रविवारच्या 'लोकसत्ता'मध्ये 'जागतिक तापमानवाढ: ‘प्रलय-घंटावाद’ आणि वस्तुस्थिती' या शीर्षकाखाली राजीव साने यांचा एक लेख प्रसिध्द झाला होता. नायगेल लॉसन या ब्रिटिश राजकारण्याच्या 'अ‍ॅन अपील टू रीझन : अ कूल लुक अ‍ॅट ग्लोबल वॉर्मिंग' या पुस्तकातल्या माहितीवर आधारित या लेखाचा सूर हा तापमानवाढ रोखण्यासाठी कठोर उपाय तात्काळ योजायला हवेत असं म्हणणार्‍यांच्या विरोधात होता.