Skip to main content

'सलाम डॉक्टर' : लक्ष्मण माने, उर्फ निखळ विनोदाचा अनपेक्षित झरा

डॉ. श्रीराम लागूंना नुकताच राजर्षी छत्रपती शाहू कला गौरव पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्तानं लक्ष्मण माने यांनी कालच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये लिहिलेला एक लेख वाचून अनेक दिवसांनी निखळ मनोरंजनाचा प्रत्यय आला. लागूंची महती सांगताना माने यांनी स्मिता पाटील, सुहास जोशी, रिमा लागू आणि दीपा श्रीराम अशा 'चित्रात पाहिल्यासारख्या बायां'बद्दल जे लिहिलं आहे ते वाचून पुरस्काराची महती आणि तो मिळालेल्या लागूंचं कर्तृत्व दोन्हींविषयीच्या आपल्या ज्ञानात मोलाची भर पडेल असा माने यांचा समज झालेला दिसतो.

बॉम्बे टॉकी

ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं. त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता. म्हणून पुन्हा एकदा नव्याने त्याचा 'माफीचा साक्षीदार' शोधत होते.

हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं?

Taxonomy upgrade extras

एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी किंवा गटाविषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही. उदा: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जपान्यांविरुद्ध चीड होती, पण जपानी लोकांबद्दल विनोद मात्र निर्माण झाले नाहीत. किंवा आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी विनोद ऐकू येत नाहीत.

संग्राह्य इंग्रजी पुस्तके

पुढिल-आठवड्यापर्यंत आमच्या हाफिसात 'स्ट्रॅन्ड' ने सवलतीत पुस्तक विक्री ठेवली आहे. ४०% ते ८०% इतकी घसघशीत सुट असणार आहे. तिथे केवळ इंग्रजी पुस्तके विक्रीसाठी असणार आहेत. अर्थातच ही संधी न दवडता जमतील (म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडतील ;)) तितकी वाचनीय + संग्राह्य पुस्तके घेण्याचा विचार आहे.

इथे मला पुढील क्याटेगरीतील वाचनीय +/ संग्राह्य पुस्तकांची सुचवणी हवी आहे:
-- इतिहास
-- करंट अफेअर्स
-- फिक्शन
-- क्लासिक लिटरेचर
-- रेफरन्स बुक्स
-- बालसाहित्य
(शिवाय म्यानेजमेन्ट, सेल्फ हेल्प वगैरे असणार आहे पण मला त्यात फारशी रुची नाही ;) )

एका बाहेरच्याने?

Taxonomy upgrade extras

अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाच्या जोडीला राजकीय आखाड्यात उतरून चार हात करण्याची घोषणा केली आहे हे आपण जाणतोच. भारतात अनेक नवे राजकीय पक्ष समोर येत असतात. काहि काळातच त्याच्यात 'नवीन' असे काहि उरत नाही किंवा असलेच तर ते हवेसे असते असे नाही. मात्र साधारणतः भारतीय राजकारणाचा आणि राजकीय पक्षांचा एक ठाम किंवा ठोस असा तोंडावळा बनलेला आहे. एक सैलसर असली तरी बर्‍यापैकी स्थिर चौकट आहे. आणि राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो त्या चौकटीला भेदायचा प्रयत्न क्वचितच करतो.

'शिवराय"

अवनी वरती नृप जाहले, अगणित आजवरी ।
परी शिवरायांसम नाही जाहला कोणी नृपकेसरी ॥

अगणित आले अगणित गेले नसे काही गणती ।
अमर जाहले शिवराय केली अघटित ऐसी कृती ॥

कड्या कपारी फिरूनी एक एक सवंगडी शोधीला ।
अमोघ वाणीने त्यांच्यातील मराठी बाणा जागविला ॥

शुन्यातूनी विश्व निर्मिले दिली झुंजार कडवी झुंज ।
टक्कर देऊनी महासाम्राजांशी उतरविला दुष्टांचा माज ॥

रयतेचा वाली गरिबांचा राजा सज्जनांचा कैवारी ।
ऐसी ख्याती शिवरायांची दुमदुमते भूवरी ॥

॥जय शिवराय, जय जिजाऊ ॥

हिंदी सिनेमातली स्त्री-प्रतिमा उलटीपालटी करणारा 'अय्या'

Taxonomy upgrade extras

आदिमाया, स्त्रीशक्ती वगैरे शब्दांचा येते नऊ दिवस आपल्यावर मारा होणार आहे. पण आदिमायेची सगळीच रुपं काही आपल्या सोयीची नसतात. मलालावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करायला अनेकजण पुढे येतात (ते योग्य आणि गरजेचंच आहे), पण 'बलात्कार थांबवण्यासाठी अल्पवयीन मुलींची लग्नं लावून द्या' असं म्हणणारे, किंवा 'पबमध्ये जाणारी बाई चवचालच असते' असं म्हणणारे लोकही आपल्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदी सिनेमातली सोयीची आणि सवयीची स्त्रीप्रतिमा बदलण्याच्या एका प्रयत्नाची घेतलेली ही एक दखल आहे. हे 'अय्या'चं एका विशिष्ट अंगानं केलेलं सामाजिक विश्लेषण आहे; ती सिनेमाची समीक्षा नाही.

मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षित आहे )

हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे
***************************************************************

ग्रंथालय कथा आणि व्यथा

"अहो,अहो, तुम्ही पुस्तकांना हात लावताय की!"
"बघतोय मी."
"बघतोय काय? मला सांगा कि कुठल पुस्तक हवयं?"
"मला कुठल पुस्तक हवय तेच तर मी बघतोय.तेवढाच तुमचा त्रास कमी होईल."
"नाही नाही.तुम्ही हात लावायचा नाही.जे हवं असेल ते मला सांगा."
मुंबईतल्या एका ग्रंथालयातील एका सेविकेबरोबर झालेले हे संभाषण.
"ठीक आहे ते डावीकडून तिसरे पुस्तक द्या."

कोडं-३

भौतिक शास्त्राचं एक मजेदर कोडं तुम्हाला घालतो आहे.

एका बंद कार मध्ये (काचा बंद) हेलियमच्या फुग्याला दोरीने बांधले आहे. ज्याला बांधले आहे ती जागा कारच्या फ्रेम ऑफ रेफरंस मध्ये फिक्स्ड आहे. थोडक्यात कारच्या रिलेटिव्ह पुढे मागे होण्यास फुग्यास वाव आहे.

प्रश्न: कार सरळ दिशेस अ‍ॅक्सलरेट केल्यास फुगा कोणत्या दिशेस जाईल?

उत्तरासह स्पष्टीकरण अपेक्षित आहे. त्याच बरोबर गृहितकंही दिल्यास उत्तम. उत्तर पांढर्‍या रंगात खाली द्यावे ही विनंती. गुगल किंवा इतर शोधाची अनुमती नाही. (भौतिकीच्या मुलभुत गोष्टींसंबंधी गुगल शोध करण्यास हरकत नाही)

कोड्याची प्रेरणा इतरत्र.