भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता
अवांतरात मोडेल पण एक किस्सा सांगितल्याशिवाय रहावत नाही.
स्थळः कोथरूडमधल्या एका डॉक्टरांच्या क्लिनिकची वेटिंग रूम. एक हुच्चभ्रू मध्यमवयीन मराठी महिला येते आणि शेजारच्या खुर्चीवर बसते. चेहेर्यावर चिंता करते विश्वाची छाप भाव. अचानक माझ्याकडे वळते:
हुममः मला एक सांगा...डॉक्टरांचं नाव करमाळकर आहे का करमळकर?
मी: (स्वगत) त्याने काय फरक पडतो, मावशी. औषध गिळा आणि गप पडा की. (प्रकट) काही कल्पना नाही.
हुममः विचारून घ्यायला पाहिजे त्यांना.
मी: (न रहावून) पण त्याने काय फरक पडतो?
हुममः नाही कसा पडत? नावा, आडनावांचा उच्चार स्पष्ट असावा. ("ष"चा खर्ज कानात गुदगुल्या करून गेला.)आमचं आडनाव कुळकर्णी पण लोक सर्रास कुलकर्णी म्हणतात. चूक आहे हे... (पुढे माझा नंबर येईपर्यंत बरीच शिकवणी घेतली!)
मोठा फरक आहे
जात पात वगैरेचा कट्टर अभिमान असणार्या देशात अग्गरवाल व अग्रवाल ह्यात प्रचंड फरक असणे स्वभाविक आहे.
गुजरात्,राजस्थान्,दिल्ली व काही प्रमाणात यूपी- एम पी इथल्या पब्लिकला विचारल्यास तपशीलवार माहिती मिळेल.
(दोघांची जात वेगळी, ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान असे कायसेसे आहे, विशेषतः दिल्लीत तर ह्या गोंधळावरून पब्लिक भडकते.)
अगदि "ठाकूर महेंद्रप्रताप " असे म्हणण्याऐवजी चुकून एकजण "महेंद्रपताप ठाकूर" असे म्हणाला (prefix ऐवजी suffix वापरले)
म्हणून ठाकूरसाहेब लै भडकले. एक दीड खंबे रिचवून ताठ बसलेले ठाकूर थेट " साले गोली से उडाता हूं" म्हणत पोचले.
त्यांना इतर झिंगलेल्या पब्लिकनं महत्प्रयासानं आवरले.
नंतर साहेब सोबर असताना वदले "अरे वो ठाकूर पेहले लगाते हैं हम असली ठाकूर - खानदानी जमीनदार, ये भोसडिके नाई (न्हावी) लोग बाद में लगाते है | मुझे उनके लाइन में खडा़ कर रहे हो |" (जो नाव सांगताना नंतर ठाकूर हा शब्द लावतो तो न्हावी असतो. तो न्हावी असतो मह्णून तो क्षुद्र व नालायकही असतो असा त्यांचा सिद्धांत.)
नंतर त्यांना रात्री शांत बसवल्याबद्दल त्यांएने मनःपूर्वक आभार मानले. खरोखरीच त्यांच्याकडे बंदूक होती व त्यांनी एखादेवेळेस गोळीही घातली होती असे म्हणत होते.
उत्साहात बंदूक आणून (व चालवून !) दाखवतो म्हटल्यावर मात्र आम्ही निरोप घेतला. पुन्हा भेट नाहीच.
जात पात अशी थेट जिवंत आहे उत्तर भारतीयंत असे दिसते.
महाराष्ट्रात निदान शहरी भाग तरी सुधारलेला दिसतो.
महाराष्ट्रात निदान शहरी भाग
महाराष्ट्रात निदान शहरी भाग तरी सुधारलेला दिसतो
पुन्हा एकदा जाज्वल्य, झणझणीत वगैरे असहमती!!!!
एकाच भागातील - भाषेचे लोक जिथे जिथे संख्येचे अधिक आहेत तिथे ही तथाकथित सुधारणेच्या चिंध्या होताना दिसतात. अनेक भाषिकांची सरमिसळ असणार्या भागात (एममेकांविषच्या व बद्दलच्या/जातींच्या अज्ञानामुळे) या सुधारणेचा भास होतो इतकेच!
महाराष्ट्रात निदान शहरी भाग
महाराष्ट्रात निदान शहरी भाग तरी सुधारलेला दिसतो.
मला वाटतं की ज्यांच्या आधीच्या १-२ पिढ्या शहरात होत्या त्या लोकांमध्ये जातपातीचा असला फाल्तू अभिमान कमी असतो. आणि उगाच लोकांच्या जातीबद्दल उत्सुकता कमी असते. पण ज्याच्या आधीची पिढी खेड्यामध्ये होती किंवा ज्याचं बालपण खेड्यात गेलंय त्यांच्यात इतरांच्या जातीबद्दल उत्सुकता जास्तं असते.
अर्थात वरच्या विधानांच्या समर्थनार्थ विदा माझ्याकडे नाही. ही फक्तं माझी निरिक्षणं आहेत.
पश्चिम भारतात, डिग्री ऑफ
पश्चिम भारतात, डिग्री ऑफ कट्टरता पेक्षा 'मोड ऑफ रिअॅक्शनमध्ये' सुधार आहे असे मला वाटते.
अतिउत्तरेला/दक्षिणेला मारायला धावत असतील तर ते इथे टाळले जाते किंवा किमान आधी शब्दात समजवायचा प्रयत्न होतो ही सुधारणा मान्य आहे.
पण कट्टरता तेव्हढीच असावी.
स्वानुभवः
मुंबईत असताना मला माझ्या जातीचा विचारही मनात येत नसे. मला नाव विचारल्यावर पूर्ण नाव सांगायची सवय नाहीये.
पुण्यात आल्यावर मात्र लोकांना माझ्या आडनावात भल्ताच इंटरेस्ट असलेला दिसला. काहिशा गोंधळात टाकणार्या आडनावामुळे मला थेट जात विचारली जाऊ लागली.
मी सर्दच झालो.. सवय नव्हती..
माझ्या समोर कित्येकांना केवळ जातीमुळे टाळणे, "त्याला कशाला बोलावलंस आपल्यासोबत? विषय वेगळे पडतात, शिवाय त्यांना काय अक्कल?" असे थेट सांगितले जाणे, "केटरिंग वगैरे नको करूस हा, शेवटी काही झालं तरी ते आचारीपण, आपल्याला शोभत नाही" वगैरे ड्वायलाग इथेच आल्यावर ऐकले आहेत. शेवटी शेजार्यांचा पोपट आवडला नाही एवढ्या कारणाने चाळ बदलणार्या धोंडु जोशी सारखा मी वैतागुन पुण्यातला 'तो भाग' सोडला! ;)
कार्यकारणभाव
अकर्यकारणभाव नक्की काय , कसा आहे ह्याबद्दल टंकण्यापेक्षा एक निरीक्षण नोंदवतो.
महारआष्ट्रात , त्यातही शहरी भाग आंतरजातीय विवाह अधिक होतात.
त्यांना होणारा त्रास खाप पंचायतीकडून होणार्या त्रासापेक्षा लै म्हणजे लैच सुसह्य म्हणायला हवा.
( नात्यातील चार चौघे फटकून वगैरे वागू शकतील. पण बंदुका,तलवारी निघणार नाहित.
आता विदा मागत असाल तर मी म्हणेन जा फुटा.
सामान्य निरिक्षणास विदा नसतो.
(महाराष्ट्र काश्मीरपेक्षा उष्ण आहे, हे सामान्य निरीक्षण आहे.
कीम्वा तमिळनाडूपेक्षा महाराष्ट्रात हिंदीची जाण अधिक लोकमानसात आहे.
ही सामान्य निरीक्षणे आहेत. विदा वगैरे काही नसतो ह्याला.)
)
.
.
सगोत्र तर लै म्हंजे लैच कॉमन झालय.
फक्त मुलगा व मुलगी बावचळलेले नसले, तर सर्व व्यवस्थित होते महाराष्तृआत.
कैकदा मुलगा किम्वा मुलीचा भन्नाट ब्रेनवॉश करत घाबरवून सोडल्याने अवसान गळते.
पण जर जोडप्यानं हिंमत दाखवली तर बंदुका,तलवारी निघत नाही. कुणी दगडाने डोके फोडत/चिरडत नाही.
अशुद्ध उच्चार आणि अस्मिता
करमाळकर का करमळकर? यात भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता कुठून आली? कुळकर्णी आणि कुलकर्णी असे भेद असतात पण त्यांच्यात भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता असते हे मी पहिल्यांदाच वाचले किंवा ऐकले.
माझा व्यक्तीगत अनुभव असा आहे की घारे हे मला एवढे सोपे वाटणारे नाव सहसा कोणीसुद्धा धडपणे उच्चारत नाही. खरे, घरे, खारे, गारे, गरे वगैरे त्याचे उच्चार ऐकून ती आपल्याला मारलेली हाक आहे हे मला ओळखावे लागते. एकदा चेन्नै एअरपोर्टवर अनाउन्स करणा-या इसमाने चक्क घोष असा पुकारा केला होता, पण त्यावेळी कोणी बोंगाली बाबू तिथे दिसत नसल्यामुळे आणि मीच तेवढा अशा हाकेची वाट पहात उभा असल्यामुळे काउंटरवर गेलो.
घारे हे आडनाव अनेक जातींमध्ये आणि मुसलमानांमध्ये सुद्धा आहे. कदाचित त्यामुळे सगळेच मला आपला जातभाई समजतात आणि चांगली वागणूक देतात.
अजून एक
माझे दिओन मित्र :-
साने आणि पागे दोघे नावामध्ये एकच A वापरतात म्हणून त्यांचा लै छळ होतो
बोले तो sane व page ह्यांचा उच्चार वाचणयचय नादात कैकदा लोक सेन (insane-sane मधला sane) आणि पेज असा करतात.मी त्यांना paage व saane अशी नावे करा, कीम्वा होणार्या घोटाळ्यावर निदान चिडू नका असे सुचवून थकलो.
...
'प्याटेल' (१) कधीतरी१ कोठेतरी२ वाचल्यासारखे अंधुकसे आठवते, आणि (२) 'पटेल' आडनावाच्या एका (भूतपूर्व) सहकर्मीचा उल्लेख एक (पुन्हा, भूतपूर्व) बंगाली सहकर्मी 'प्याटेल' असाच करत असे, असेही (पुन्हा, अंधुकसेच) आठवते.
तेही असो. स्पेलिंगानुसारी मोडतोडीनुसार 'पटेल'चे 'प्याटेल' (अथवा 'गोखले'चे 'गोखेल') हे (एक वेळ) समजू शकतो. 'जनरल'चे 'जेनारेल'३ हे कोठल्या न्यायाने होते, ते समजत नाही.
(अर्थात, बंगालीत कशाची मोडतोड कशी करावी, हा बंगाल्यांचा प्रश्न. आपण फक्त 'मम' म्हणावे, कसें?)
=====================================================================================================
१ फारा वर्षांपूर्वी.
२ अर्थात कोठल्यातरी बंगाली प्राथमिक पाठ्यपुस्तकात. आमची बंगाली वाचनाची धाव तिथपर्यंतच.
३ हेही कोठेतरी वाचल्याच्या धूसर स्मृती जागृत होतात. असेच होते ना? (चूभूद्याघ्या.)
पटेल चे प्याटेल असे रूप असले
पटेल चे प्याटेल असे रूप असले तरी मराठी उच्चारातील 'प्या' तिथे नसणार शकतो. त्यांचा उच्चार 'पॅ' च्या जास्त जवळ जातो. लिहिताना मात्र 'प्या' असे लिहितात.ते चिन्ह अवग्रहागत दिसते- नाव आहे 'जॉफोला'.
जनरल या शब्दाबद्दल सहमत आहे. पण त्या मोडतोडीतही काहीएक प्याटर्न१ असावा असे वाटते, यद्यपि अपुर्या ज्ञानामुळे ते तूर्तास पिनप्वाइंटवू शकत नसलो तरी.
अन शेवटी मम म्हणायचे तर बंगालीत 'मोमो'२ होईल. इंडियन चैनीज फूडची सुरुवात कोलकात्याहून झाली सबब हेही उचितच.
====================================================================
१बॉङ्गोभाषेत अर्थातच प्याटार्न.
२ खरे तर 'मॉमो' असे रूप होईल, परंतु कोट्यर्थ तेवढे मुआफ़वावे.
...
त्यांचा उच्चार 'पॅ' च्या जास्त जवळ जातो. लिहिताना मात्र 'प्या' असे लिहितात.ते चिन्ह अवग्रहागत दिसते- नाव आहे 'जॉफोला'.
हो, याची कल्पना आहे. (किंबहुना, 'अॅस्पिरिन' हा शब्ददेखील 'अ'ला तो 'जफला' की काय तो वापरून लिहिलेला पाहिलेला आहे.)
अन शेवटी मम म्हणायचे तर बंगालीत 'मोमो'२ होईल. इंडियन चैनीज फूडची सुरुवात कोलकात्याहून झाली सबब हेही उचितच.
'मोमो'चा उगम/प्रादुर्भाव नेपाळात/तिबेटात असण्याबाबत समजूत होती. कदाचित दार्जीलिङ्-मार्गे तेथे गेला असावा काय?
निषेध!
अन मोमो यद्यपि नेपाळ/तिबेटातला असला तरी उर्वरित भारतास याचा परिचय बंगालमार्फत जाहला, हेन्स द स्टेटमेंट.
'नेपाळास मोमोचा परिचय बंगालमार्फत झाला' असा (रोचक नि क्रांतिकारी) निष्कर्ष काढता येण्याची शक्यता असताना, 'मोमो नेपाळ/तिबेटातले आहे' या पारंपरिक समजुतीस दुजोरा देण्याबद्दल तीव्र निषेध!
अमराठी अन महाराष्ट्रापासून
अमराठी अन महाराष्ट्रापासून दूर एका ठिकाणी आम्हाला एक नवीन विषय शिकवायला एक तज्ञ येणार होते. मिस्टर गोगेट विल कन्डक्ट द कोर्स असे ऐकून कोण फॉरेनर येणार अशी वाट बघत होतो.
नंतर कळलं की पुण्याहून येणारेत.. Gogate.
यानिमित्ताने डमेल किंवा डमाले नावाच्या पुलंच्या मारकुट्या मास्तरांची आठवण झाली. :)
लळयो: भेदः
कुळकर्णी आणि कुलकर्णी असे भेद असतात पण त्यांच्यात भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता असते हे मी पहिल्यांदाच वाचले किंवा ऐकले.
'कुलकर्णी' बोले तो देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. 'कुळकर्णी' बोले तो चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.
हा झाला ढोबळमानाने फरक.
आता अस्मितांचेच बोलायचे, तर 'कुलकर्णी' मंडळींना 'कुळकर्णी' म्हणून संबोधले जाण्याचे उदाहरण डोळ्यांसमोर नसल्याकारणाने 'कुलकर्णी'मंडळींच्या प्रतिक्रियेबद्दल विधान करू शकत अथवा इच्छीत नाही१, परंतु 'कुळकर्णी'मंडळींना (अनवधानानेसुद्धा) 'कुलकर्णी' म्हणून संबोधल्यास सहसा (१) वस्स्कन अंगावर येतात, आणि/किंवा (२) ताबडतोब, तातडीने दुरुस्त करतात, असे एक सामान्यनिरीक्षण आहे.
=====================================================================================================================================
१ 'कुलकर्णी'-प्रतिनिधींनी जमल्यास आणि इच्छा असल्यास योग्य तो खुलासा जरूर करावा; त्यांचे स्वागत आहे.
आँ
परंतु 'कुळकर्णी'मंडळींना (अनवधानानेसुद्धा) 'कुलकर्णी' म्हणून संबोधल्यास सहसा (१) वस्स्कन अंगावर येतात.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण भुमिका> हे प्रभूलोक तर ब्राह्मण सुद्धा नव्हेत ह्यांना मान दिल्यामुळे खरतरं अपमान आमचा व्हायचा पण ह्येच कावून राह्यले, जौदे, आपण बरं आपलं काम बरं.देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण भुमिका>
पाटी - हा प्रतिसाद विनोदी आहे, विनोद कळला नसल्यास व अस्मिता दुखावली गेली असल्यास क्षमस्व.
पायमल्ली नको
>> It is not possible for society to maintain the so called "diversity" without each group/sect fiercely attempting to maintain its own distinct identity.
प्रत्येकाने स्वतःची अस्मिता (जातीय, प्रांतिक, धार्मिक) अवश्य जपावी. अगदी वेहेमंटली.
ठीक. पण त्यात इतरांच्या अस्मितांची किंवा मानवी हक्कांची पायमल्ली होत नाही ना, तेवढे मात्र पाहावे. माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे इतरांच्या अस्मितेला तुच्छ लेखणे नव्हे, पण तसे होताना अनेकदा दिसते.
शक्य नाही
माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे इतरांच्या अस्मितेला तुच्छ लेखणे नव्हे, पण तसे होताना अनेकदा दिसते.
व्यवहारात असे होणे शक्य नाही.
मी असा काहीतरी वेगळा आहे , म्हणजेच इतरांपेक्षा काही अधिकचे गुणावगूण माझ्यात आहेत असा अर्थ होतो.
अस्मिता, sense of belongingness.
तस्मात, इतांहून अधिकचे गुण जे माझ्यकडे व माझ्या belonging वाल्यांकडे आहेत, त्यापेक्षा इतर आपोआप तुच्छ ठरतात; निदान जे गुण माझ्यात अधिक आहेत असे मानले त्यात.
अर्थात इतरांना तुच्छ मानणेही श्रेयस्करच आहे, अशी टिपिकल मांडणी गब्बर करणार ह्याची खात्री आहे.
.
.
एक उदाहरण :-
समता पाळून अस्मिता सांभाला. हे म्हणणं मला आख्ख्या बोकडाचं मटन पचवून उपास पाळा म्हणण्यासारखं वआटतं.
वास्तवात हे शक्य नाही.
माझ्या धार्मिक अस्मिता डिफाइन होतानाच मला जर "अमुक एक गोष्ट अक्रणारे वाईट " असे शिकवले गेले असेल तर काय झाट तुच्छता मानणे थांबवू शकणार आपण ?
समजा मला "मूर्ती फोडणे हे प्रथमावश्य्क व मानवसंहाररक्षक आहे" अशी शिकवण आहे, तर मी प्रामाणिकपणे मूर्त्या फोडणार.
दुसरा "मूर्तीमध्येच सारे काही आहे" असे म्हणत आपली अस्मिता त्याच्याशी जोडू पहात असला, तर तुच्छता, उच्च्-नीचता , आपसात वैर येणार.
थोडक्यात अस्मिता एकमेकांना छेदतात तिथे संघरष होतो.
अस्मिता एकमेकांन छेदणार नाहितच; असे होणे युटोपिया सोडून कुठे शक्य आहे?
ठीक. पण त्यात इतरांच्या
ठीक. पण त्यात इतरांच्या अस्मितांची किंवा मानवी हक्कांची पायमल्ली होत नाही ना, तेवढे मात्र पाहावे. माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे इतरांच्या अस्मितेला तुच्छ लेखणे नव्हे, पण तसे होताना अनेकदा दिसते.
This is just an overly politically correct statement. तेव्हा असहमत.
सर्वसामान्यपणे - तुच्छ हा शब्द उगीचच पॉलिटिसाईझ केला गेलेला आहे. दुसर्यास तुच्छ समजण्यात काहीही चूक नाही. सगळ्यांना समान सोशल स्टेटस असावे ह्या गोड गैरसमजातून हा विचार बळावलेला आहे. मला तुम्ही खुशाल तुच्छ् समजू शकता कोणत्याही पॅरॅमिटर वर.
माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे माझ्या दृष्टीने माझी अस्मिता माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेपेक्षा जास्त मूल्यवान आहे असे मानणे. म्हंजे माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेस कमी मूल्य देणे. आता "दुसर्याच्या अस्मितेस कमी मूल्य देणे" ह्यास "तुच्छ" हा शब्द योग्य आहे की नाही हा वादाचा विषय होऊ शकतो.
If ASMITA is based on realistic performance indicators then those groups, which do not fare well on those performance indicators should essentially be considered तुच्छ and nothing other than तुच्छ. उदाहरणार्थ - आदिवासी हे शिक्षण, सामाजिक विकास, आर्थिक विकास, इहलौकिक विकास ह्या ३ पॅरॅमिटर्स वर शहरी शिक्षित वर्गापेक्षा अत्यंत कनिष्ठ आहेत. याला मी तुच्छ हा शब्द अवश्य वापरेन. उगीचच मखलाशी करणार नाही.
प्रश्न उरतो तो फक्त - realistic performance indicators कोणते (उदा. शिक्षण, सामाजिक विकास) व कोण ठरवणार हा.
Try to name 2 individuals who do the same task equally well.
+१
This is just an overly politically correct statement. तेव्हा असहमत.
हेच बोलतो.
सर्वसामान्यपणे - तुच्छ हा शब्द उगीचच पॉलिटिसाईझ केला गेलेला आहे. दुसर्यास तुच्छ समजण्यात काहीही चूक नाही.
हे असं म्हणणार आधीच भाकित केलं होतं वरती मी.
.
सगळ्यांना समान सोशल स्टेटस असावे ह्या गोड गैरसमजातून हा विचार बळावलेला आहे. मला तुम्ही खुशाल तुच्छ् समजू शकता कोणत्याही पॅरॅमिटर वर.
आय मीन हो. जर एकूणात मला जाणवत असेल की मी अत्युच्चशिक्षित आहे. माझ्या कुटुंबातील मागील काही पिढ्यातील लोकही अत्युच्च शिक्षित आहेत, आणि ह्याबबत माझी अस्मित असलेली चालेल; तर मी अशीच बाळगेन की "आम्ही लै भारी. शेजारचे भिकारडे शिक्षणात मागे आहेत. आम्ही श्रेष्ठ."
.
.
माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे माझ्या दृष्टीने माझी अस्मिता माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेपेक्षा जास्त मूल्यवान आहे असे मानणे.
+१
.
.
उदाहरणार्थ - आदिवासी हे शिक्षण, सामाजिक विकास, आर्थिक विकास, इहलौकिक विकास ह्या ३ पॅरॅमिटर्स वर शहरी शिक्षित वर्गापेक्षा अत्यंत कनिष्ठ आहेत. याला मी तुच्छ हा शब्द अवश्य वापरेन. उगीचच मखलाशी करणार नाही.
अवांतर होइल.
आदिवासी सामाजिक विकासात मागे आहेत ?
साहेब कैक आदिवासी समाजत नागर स्त्रियांपेक्षा मानाचे स्थान आहे ; किम्वा एकूणातच नॉर्मल वागवले जाते.
वर्-खाली अशी मांडणी तिथे नाही. बाकी सगळं ठीक आहे.
दुसर्यास तुच्छ समजण्यात
दुसर्यास तुच्छ समजण्यात काहीही चूक नाही. सगळ्यांना समान सोशल स्टेटस असावे ह्या गोड गैरसमजातून हा विचार बळावलेला आहे. मला तुम्ही खुशाल तुच्छ् समजू शकता कोणत्याही पॅरॅमिटर वर.
जर त्याच्यासारख्या/गटातल्या नसणार्या समोरच्याला तुच्छ समजून त्याला संपवणे करणे हीच त्याला गवसलेली अस्मितेची ओळख असेल व अशी अस्मिता बाळगणारा माणूस तुमच्या समोर आला, तर तो समोर आल्यावर त्याला त्याच्या अस्मितेशी तुम्ही प्रामाणिक राहु द्याल का? अर्थात तुम्ही स्वत:ला त्याला सपवू द्याल का?
मूल्य आणि परफॉर्मन्स
>> माझ्या अस्मितेचा अभिमान बाळगणे म्हणजे माझ्या दृष्टीने माझी अस्मिता माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेपेक्षा जास्त मूल्यवान आहे असे मानणे. म्हंजे माझ्या दृष्टीने तुमच्या अस्मितेस कमी मूल्य देणे. आता "दुसर्याच्या अस्मितेस कमी मूल्य देणे" ह्यास "तुच्छ" हा शब्द योग्य आहे की नाही हा वादाचा विषय होऊ शकतो.
If ASMITA is based on realistic performance indicators then those groups, which do not fare well on those performance indicators should essentially be considered तुच्छ and nothing other than तुच्छ. उदाहरणार्थ - आदिवासी हे शिक्षण, सामाजिक विकास, आर्थिक विकास, इहलौकिक विकास ह्या ३ पॅरॅमिटर्स वर शहरी शिक्षित वर्गापेक्षा अत्यंत कनिष्ठ आहेत. याला मी तुच्छ हा शब्द अवश्य वापरेन. उगीचच मखलाशी करणार नाही.
प्रश्न उरतो तो फक्त - realistic performance indicators कोणते (उदा. शिक्षण, सामाजिक विकास) व कोण ठरवणार हा.
प्रत्येक गोष्टीचा संबंध मूल्य आणि परफॉर्मन्सशी लावायलाच हवा, आणि तो लावला की त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ येणारच ह्या भावनेबद्दलच मला शंका आहेत. 'मी माझ्या घरी वरण-भात-भेंडीची भाजी खात वाढलो आणि मला ती आवडते' हे म्हणण्यात माझी अस्मिता आहे, पण त्यासाठी मला इतरांच्या घरी ते जे काही खात वाढले त्याची माझ्या घरच्या जेवणाशी तुलना करून त्यांपैकी एकाला श्रेष्ठ-कनिष्ठ मानण्याची गरजच भासत नाही. ही गोष्ट मान्य झाली, तर अस्मितांच्या बहुविधतेसह समांतर अस्तित्व सहज शक्य होईल. आपल्या अस्मितेची जागा आपल्याला राखता येण्याचं डोळस स्वातंत्र्य हवं असेल तर इतरांच्या अस्मितेला तिची जागा राखता येण्याचं स्वातंत्र्य द्यावं. किंबहुना ते परस्परावलंबी असतं.
टू-वे ट्र्याफिक
'मी माझ्या घरी वरण-भात-भेंडीची भाजी खात वाढलो आणि मला ती आवडते' हे म्हणण्यात माझी अस्मिता आहे, पण त्यासाठी मला इतरांच्या घरी ते जे काही खात वाढले त्याची माझ्या घरच्या जेवणाशी तुलना करून त्यांपैकी एकाला श्रेष्ठ-कनिष्ठ मानण्याची गरजच भासत नाही. ही गोष्ट मान्य झाली, तर अस्मितांच्या बहुविधतेसह समांतर अस्तित्व सहज शक्य होईल.
वर्क्स बोथ वेज़, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
आडनावाचे हे भोग माझ्या पण वाट्याला आले...
महाराष्ट्रात (म्हणजे पुणे-मुंबई-रत्नांग्री) जास्त त्रास होत नाही. खान्देशात्,वर्हाडात्,विदर्भात आणि मराठवाड्यात पण असाच त्रास होतो.(वरील वाक्य वाचल्यानंतर वेगळा खान्देश्,वर्हाड आणि मराठवाडा व्हायचे चान्सेस आहेत ले लक्षांत आले असेलच)
पण महाराष्ट्रा बाहेर सुरुवातीला "फाटक"च्या ऐवजी "पाठक" केले की, मला राग यायचा.
शेवटी महाराष्ट्रा बाहेर गेलो, की सरळ सांगायचो.
मेरा सरनेम (आडनांवाला हिंदी मध्ये काय म्हणतात हो?) "P H A T A K " है.तुम गलती से "P A T H A K" ऐसा मत लिहो. (आमचे हिंदी सॉलीड आहे.)
तरी पण लिहीणारा कधी काय गोंधळ घालेल काही सांगता येत नाही.मग सरळ संभाषणाला सुरुवात करायची.
मी : "तुम को वो, रेल्वे का गेट होता है ना.तुम उसको तुम क्या बोलते हो?"
तो : "फाटक"
मी : "हां... तो वही मेरा आडनांव हय."
तो : ऐसा कैसा ?
मी : वो क्या हुवा.अंग्रेजोंके जमानेमे हमारा पुर्वज रेल्वे का गेट बनाता था.तो अंग्रेजोने हमारा नाम बदल दिया.और फिर हमारा आडनांव "गेट" हुवा. फिर १९४२ में वो चले जाव चळ्वळ हुवी ना. उस समय हमारा पुर्वज मुंबई मे था.उस समय हमारा आडनांव बदला और "फाटक" हुवा.
आता इंग्रजांनीच हीच चूक केली आहे म्हणजे, हेच आडनांव बरोबर आहे. असे त्याला समजते आणि मग तो पाठकच्या जागी फाटक करतो.
आणि मी शांतपणे अजून एक किस्सा गाठीला बांधून निघून जातो.तर तिकडे तो बाबु पण हा किस्सा दुसर्याच्या कानांत ओतायला निघून जातो.
बाकी ह्या "पाठक" मुळे बराच फायदा पण होतो....
दक्षिणेकडची ४ राज्ये सोडली तर उर्वरीत समस्त भारतात "पाठक" आडनांव आहे.
गुजरात मध्ये "जयंत पाठक" हे एक प्रसिद्ध कवी आहेत.बहुदा सुप्रसिद्ध नसावेत्,कारण एकदा मी, गाडीत नुकत्याच ओळख झालेल्या एका प्रवाशाला, माझे नांव सांगीतले.त्याने करायचा तो गोंधळ केलाच आणि मलाच "जयंत पाठक" समजून नमस्कार पण केला.
जावु दे,
माझ्या आडनावाचे बरेच रंगतदार (म्हणजे तुम्हाला रंगतदार ????) किस्से आहेत.
थुत
थुत त्या काँग्रेसच्या.
झालच तर दारुबाजीचा निषेध असो.
पुरुषी वर्चस्वाचा त्याहूनही निषेध असो.
निसर्ग वाचवणं अपरिहार्य आहे.
तिच्या उन्मळून आलेल्या भावना तिने पत्रावाटे मोकळ्या केल्या.
अमेरिकेला तेलाचा माज चधलाय्.. हिरवा माज.
दलितांनी सर्वणांनाही आपले म्हणावे, चला एकीए घडवूया.
पाइक्स्तानच्या हातात अणुशक्ती आख्ख्या जगाला धोकादायक आहे.
भरिताचे पिठले करायचे असल्यास त्यात थोडा पिझ्झा घालून गोमूत्रात घोळवलयस चांगली चव येते.
मिरचीचे औषधी गुण आहेत. न आवडणार्अय पाहुण्याला कचाकचा मिरचा खायला लावल्याने आलेल्या पाहुण्यारुपी संकटाचे निवारण होते.
मद्य हीच एकमेव नशा नव्हे.
नशेशिवायही झिंगता येते.
झिंगल्यावरही लिहिता, तेही ऐसीवर लिहिता /टंकता येते.
गांजामुक्तीचा विजय असो.
इटलीमधे पिझ्झा आणि कापुचिनो
इटलीमधे पिझ्झा आणि कापुचिनो एकत्र घेतली तरीही सम'रस'तावादी म्हणतील बहुदा. (या दोन पदार्थांची नावं एका वाक्यात घेतली म्हणून एक इतालियन मित्र माझ्यावर भडकला होता. हा संवाद सुरू असताना आम्ही एका भारतीय रेस्तरॉंमधेच जेवत होतो. वैतागून तो म्हणाला, "मी हा पापड दह्यात बुडवून खाऊ का?". मी शांतपणे, "हो." म्हटलं. आणि वर "आजूबाजूला पाहू नकोस. बाकीचे भारतीय आणि ब्रिटीश तुला हसतील." असाही सल्ला दिला. पण त्यानंतर 'इतालियन अन्नाची शिस्त' या विषयावर एक माहितीपूर्ण लेक्चर मिळालं ... जे मी आता विसरले.)
ह्यांना आवरा रे!
बॅटमॅन आणि नवीबाजू यांचा हा जो श्रेणी अक्ष बनतोय इकडे त्याला आवरा रे कोणीतरी.
बाकी या निमित्ताने पाठीला साबण लावणे या वाकप्रचाराची आठवण येऊन काही जुन्या अस्मिता जाग्या झाल्या!! (या वाक्यासाठी या प्रतिसादाला इतिहासाबद्दल अज्ञान असणार्यांनी माहितीपूर्ण, इतिहासाबद्दल प्रेम असणार्यांनी रोचक, या इतिहासात रंगलेल्यांनी मार्मिक, या इतिहासातच राहिलेल्यांनी खोडसाळ आणि या इतिहासाशी सुतराम संबंध नसलेल्यांनी खवचट श्रेणी देणे!)
कुतूहल
(पुन्हा:) कुलकर्णी-कुळकर्णी भेदाबद्दल कल्पना होती. दाभोळकर-दाभोलकर असाही काही (सिग्निफिकंट) भेद असतो, हे नव्याने कळते आहे.
या भेदाचा सिग्निफिकन्स (केवळ सामान्यज्ञान१ / कुतूहल म्हणून) कोणी विशद करू शकेल काय?
==================================================================================================
१ काहीसे "दुसरी भाषा आली नाही, तरी हरकत नाही; दुसर्या भाषेतील शिव्या मात्र जरूर अवगत असाव्यात. वेळप्रसंगी उपयोगी पडतात, आणि गेला बाजार कोणी आपल्याला दिल्या, तर देणारा आपल्याला शिव्याच देतोय, आपली प्रशंसा करत नाही आहे, एवढे तरी लक्षात येते," या तत्त्वागत. व्यक्तिशः, आम्हांस 'दाभोळकरां'शीही घेणेदेणे नाही, आणि 'दाभोलकरां'शीही; पण त्यांच्यातले 'डिफरन्सेस' ठाऊक असलेले बरे - कधी कामी येतील, सांगवत नाही.
आमच्या एका मित्राचा किस्सा
आमचा एक "प्रभु" आडनावाचा मित्र. मराठी कुटुंब. गुजरातेत जन्मला, गुजराती भाषेत शिक्षण (अगदी चक्क बी एस सी केमिस्ट्री चा पेपर गुजरातीतून !!) . काही पिढ्यांपूर्वी यांच्या प्रभुदेसाई नावाचं कधीतरी प्रभु म्हणून झालेलं होतं. एकंदर आपल्या आईवडलांशी मराठी बोलणारा, पण परिसरातल्या सर्वांशी गुजराती.
तर असा हा गडी मास्टर्स करायला पुण्यात आला. कोथरुड परिसरातलं कुठलं तरी कॉलेज. पेईंगगेस्ट च्या जाहिराती पाहून एकेका घरमालकाला भेटायचं असा एकंदर प्रयत्न. सर्वत्र संवादाचा ढाँचा असा :
घरमालक : अच्छा तुम्ही कोण, प्रभु का ?
मित्र : हो
घरमालक :प्रभु म्हणजे कोण ?
मित्र :कोण ? म्हणजे ?
घरमालक :नाही तसं नाही. तुम्ही मासे खाता का ?
मित्र :नाही हो. मी नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही.
घरमालक :तुमचं आडनाव नक्की प्रभुच ना ?
मित्र :हो !
घरमालक :तुम्ही कोण सारस्वत का ?
मित्र :म्हणजे काय ?
घरमालक :अहो म्हणजे कसं कोकणस्थ, देशस्थ , तसं सारस्वत.
मित्र :अच्छा. अच्छा. नाही म्हणजे आम्ही ब्राह्मण आहोत हे मला नक्की माहिती आहे.
घरमालक :असं आहे की आमच्याकडे मासे वगैरे तळलेलं नाही चालणार. म्हणून विचारतोय.
मित्र :(मनातल्या मनात) हा काय साला वैताग आहे. मागच्या घरात पण असंच. (उघड) नाही हो, मासे कसले मी अंडं पण नाही खात.
घरमालक : (संशयाने) ओके. आपण पाहूया काय करायचं ते. मी जरा बाहेर जातोय. भेटूच आपण.
तर असा हा आमचा मित्र पुण्यात पंधरा दिवस काढल्यावर पहिल्यांदा आपल्या घरी गुजरातेत शनिवार रविवारकरता गेला. दार वाजवलं. आईने उघडल्यावर उंबरठ्यावरच तो म्हणतो " आई आपण नक्की कोण ?" पंधरा दिवस पुण्याला जाऊन आलेला पोरगा असलं कायतरी विचारतो म्हण्टल्यावर माऊली भंजाळली हो. "तू आधी आत ये पाहू, काय झालं सांग नीट".
त्यादिवशी पहिल्यांदा आमच्या मित्राने "कर्हाडे" हा शब्द पहिल्यांदा ऐकला. एकंदर त्याने पहिल्यांदा "कर्हाडे ब्राह्मण" हे लेबल धारण केले.
आटत असलेल्या अस्मिता
एखाद्या जागेतील आधुनिकीकरण वाढलं तर अस्मितांच्या संख्येतही वाढ अपेक्षित आहे. जर एकाच अस्मितेला कवटाळणारा समाज असेल तर कितीही आधुनिकीकरण होऊदे व्यक्तिला त्या अस्मितेला कवटाळावे लागते. थोडक्यात अस्मितांचा आड तर आहे पण व्यक्तिला मात्र भवतालचा समाज मात्र एखाद्या अस्मितेचाच पोहरा वापरू देतो. थोडक्यात समाजात अशा बहूअस्मित व्यक्तिची ससेहोलपट होते. या व्यक्तिंना 'पोस्ट-मॉडर्न' (पीएम) ही एक नवी अधिअस्मिता मिळाल्यास त्यांना जोमाने आयुष्याशी झगडता येणे शक्य होते.
बाकी, पीएम अधिअस्मितेमुळे झालेले दूरगामी नुकसान कालांतराने भारताला व जगालाही कित्येक अस्मिता मोठ्या प्रमाणात आयात करायला लावेल असे दिसते. विशेषतः या भंजाळण्यासाठी नवनवीन अस्मितांच्या शोधात असलेल्या पीएम व्यक्ति ज्या वेगाने असलेल्या अस्मितांना अंगिकारतात आणि झटकतात, त्यावेगाने या व्यक्ति पसरल्यास पीएम नसलेल्या लोकांना चिकटायला एकसुद्धा अस्मिता राहील का अशी शंका वाटते. आजकाल भारतातील माझे काही मित्र भारतात अस्मितांना न चिकटता आल्याने ऐन भावना दुखावण्याच्या बहरात अमेरिकेत शिफ्ट झालेले दिसतात (मात्र भारतात गेली दोन दशके आधुनिकीकरणाच सोस होता तेव्हा या व्यक्तिंना सुरूवातीला आधुनिकीकरणाचे फायदे तसेच अस्मिता पाळणेही सहज शक्य होत असे). अश्यावेळी हे वरवर दिसणारे - की अट्टाहासाने दाखवले जाणारे? - आधुनिकीकरण लांबचा विचार करता मोठाच घात करेल अशी भितीही वाटते.
(या प्रतिसादातील कारणमिमांसा ही भ्रष्ट नक्कल असल्याने प्रस्तुत उपटसुंभ प्रतिसादकास दाखले-बिखले मागण्याच्या फंदात पडू नये.)
कोल्हापूर?
तुम्ही कोल्हापूरचे का? ;-)