---------
समांतरः फक्त लेखनाने "आपले" दोष वगैरे पेक्षा समाजवाद्याचे दोष किंवा स्वतःचे दोष अशी शब्दयोजना अधिक आवडली असती.
लेखकाने "आपले" म्हटले की लेखक समाजवाद्यांच्यातील एक आहे असा भास होतो
एक सामाजिक हिताची भूमिका घेणारी विचारसरणी आज राजकीयदृष्ट्या अस्तित्वहीन होऊ पाहते आहे हे वेदनादायी वास्तव ज्याला खुपते आहे आशा एका सामान्य माणसाने 'हे असं हा घडलं किंवा घडतं आहे नि अजूनही ही परिस्थिती बदलावी म्हणून काही निश्चित प्रयत्न होतात का, नसल्यास का नाही?' असे प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा आपल्यापरीने केलेला हा एक प्रयत्न आहे.
समाजवादी विचारसरणीचा पराभव खुपणार्या (माझे आकलनः समाजवादी विचारसरणी जवळची मानणार्या) माणसाने केलेले हे विश्लेषण आहे.
पुरवणी: अर्थातच त्यामुळे लेखाचे आकलन अजिबातच बदलत नाही. मात्र माझ्या मते तटस्थपणा जपता जपता कितीतरी कठोर गोष्टी सांगायच्या राहून जाऊ शकतात. त्या कवाडीच्या आत उभं राहून सांगितल्या, तर त्या कमी टोचतात, जे सांगणार्याच्या उद्देशाच्या दृष्टीनं फायद्याचेच ठरते.
नेमक्या संदर्भाबाबत धन्यवाद. मी सारा लेख इतक्या वेळा रिवाईज केलाय नि मुद्द्यांची फेरजुळणी केली आहे की नेमके कुठे काय आहे मला स्वतःलाच सापडणे अवघड झाले आहे. :)
फक्त लेखनाने "आपले" दोष वगैरे पेक्षा समाजवाद्याचे दोष किंवा स्वतःचे दोष अशी शब्दयोजना अधिक आवडली असती.
लेखकाने "आपले" म्हटले की लेखक समाजवाद्यांच्यातील एक आहे असा भास होतो >>
विचार करणारे/तपासून पाहणारे म्हणून जे अपेक्षित आहेत ते स्वतः समाजवादी आहे त्यांनी 'आपले दोष ओळखावे' अशी वाक्यरचना आहे नि ती सयुक्तिक आहे असे वाटते.
शिवाय लेखकाला आधीच लोक समाजवादी समजतातच (वादविवादाच्या क्षणी उत्तराची जबाबदारी टाळण्यास कामी येते.) आणि लेखकाला त्यात काही गैर वाटत नाहीच. सुज्ञ म्हणवणार्या पण पोकळ हिंदूच्या उत्सवाच्या बाबतीतील शेपूट घालण्याबद्दल लिहिले की मी समाजवादी म्हणून आरोपित होतो. जसे हिंदू समाजातील पुरोगामी प्रसंगी मुस्लिमधार्जिणेपणाचे, धर्मद्वेष्टेपणाचे आरोप स्वीकारूनही आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागून स्वधर्मविरोधी मते व्यक्त करतात त्याच्या दशांशानेही मुस्लिम समाजातून घडत नाही - धर्मविरोधी सोडा, मुस्लिम दहशतवाद्यांबाबतही नाही - असे म्हणेन तेव्हा कुणी मला संघवाला म्हणेल. तेव्हाही मी ती शिवी हारासारखी गळ्यात मिरवेन. दोष माझा नव्हे तर शिक्क्याशिवाय ज्यांना पत्राचा मजकूर समजत नाही अशांच्या समजुतीचा आहे. :)
साम्यवाद्यांनी शेतकरी नि मजूर वर्गाची लोकशाही म्हणत प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे इतर समाजघटकांना दुय्यम लेखले आणि भूगोलाच्या नाही तरी सामाजिक गटांच्या संदर्भात आपले तत्त्वज्ञान एका कुंपणाआड बंदिस्त करून ठेवले.
भारतातला मजूर आणि शेतकरी वर्ग तरी साम्यवाद्यांशी कितपत जोडला गेला आहे हे पहाणेही रोचक ठरावे.

हान तेजायला ... एकदम टिपिंग प्वाईंट.
माझ्या माहीतीनुसार भारतात शेती ही प्रायव्हेटाईझ्ड आहे बव्हंशी भागात. साम्यवादी रशियात "sovkhozes तसेच kolkhozes" ही सामूहिक शेतीची मॉडेल्स होती. एक होती सरकारी शेती व दुसरी सामुहिक मालकीची (ज्यात सरकारचा सहभाग कमी होता). साम्यवादी रशियातील सामूहिक शेती ही अनुत्पादिकतेशी "चोली दामन" का रिश्ता ठेवून होती व आजही भारतातली प्रायव्हेटाईझ्ड शेती सुद्धा अनुत्पादकतेने भरून पावलेली आहे. आता प्रायव्हेटायझेशन म्हंजे उच्च उत्पादकता - असा जो काही क्यापिटलिस्टांचा दावा असतो तो कितपत खरा आहे ते तपासून पहा बरं.
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे तर हेतूबद्दल आहे हे ध्यानात घ्यावे.
मुद्दा एकदम मान्य. सहर्ष मान्य.
समाजवादाचा थिसिस हा परिणामांबाबत कधीच नव्हता. हेतूंबाबत च होता. अर्थात याचा अर्थ असा नाही की भांडवलवादाचा थिसिस हा परिणामांच्या साध्य होण्याच्या ग्यारंटीचा होता. भांडवलवादाचा थिसिस हा हेतूंच्या विशुद्धतेबद्दलचा सुद्धा नव्हता.
-
याबद्दल खालील उद्बोधक व्हिडिओ पाहणे. जेमतेम साडेचार मिनिटांचा आहे.
हा भाग आवडला. विशेषतः दुसरं
हा भाग आवडला. विशेषतः दुसरं बलस्थान इंट्रेष्टिंग वाटलं. सुचवल्या जाणार्या उपायांमध्ये त्याबद्दल अजून सविस्तर येईल का?
होय.
फोकस राजकारणावर असल्याने वर उल्लेखलेल्या मुद्द्यांपैकी ज्यांच्या संदर्भात Action items संभवतात त्याला अनुसरून विवेचन शेवटच्या भागात येईल.
आतापर्यंतच्या मालिकेतील हा
आतापर्यंतच्या मालिकेतील हा लेखांक सर्वाधिक आवडला
---------
समांतरः
फक्त लेखनाने "आपले" दोष वगैरे पेक्षा समाजवाद्याचे दोष किंवा स्वतःचे दोष अशी शब्दयोजना अधिक आवडली असती.
लेखकाने "आपले" म्हटले की लेखक समाजवाद्यांच्यातील एक आहे असा भास होतो
पण लेखक समाजवाद्यांतील आहे हे
पण लेखक समाजवाद्यांतील आहे हे त्यानं नाकारलं कुठे आहे? बळंच आणलेल्या कृतक तटस्थपणापेक्षा प्रांजळ पक्षधारणा केव्हाही उत्तम.
पण ते नक्की सांगितलं तरी
पण ते नक्की सांगितलं तरी कुठंय ते पहायला आवडेल.
ते
ते सांगणं बंधनकारक आहे? आणि तसा मी आहे की नाही यावरून लेखनाचे आकलन बदलते का?
ओ हॅलो साहेब. थंड घ्या.
ओ हॅलो साहेब. थंड घ्या. तुम्ही या लेखमालेत जितके लेख लिहिलेत तिथे असे लिहिलेले सापडत नाही इतकंच माझं म्हणणं आहे.
तदुपरि- तुम्ही ते सांगणं बंधनकारक आहे की नाही इ.इ. बद्दल आय कुडंट केअर लेस.
इथे खालील वाक्य सापडतं:एक
इथे खालील वाक्य सापडतं:
समाजवादी विचारसरणीचा पराभव खुपणार्या (माझे आकलनः समाजवादी विचारसरणी जवळची मानणार्या) माणसाने केलेले हे विश्लेषण आहे.
पुरवणी: अर्थातच त्यामुळे लेखाचे आकलन अजिबातच बदलत नाही. मात्र माझ्या मते तटस्थपणा जपता जपता कितीतरी कठोर गोष्टी सांगायच्या राहून जाऊ शकतात. त्या कवाडीच्या आत उभं राहून सांगितल्या, तर त्या कमी टोचतात, जे सांगणार्याच्या उद्देशाच्या दृष्टीनं फायद्याचेच ठरते.
धन्यवाद
नेमक्या संदर्भाबाबत धन्यवाद. मी सारा लेख इतक्या वेळा रिवाईज केलाय नि मुद्द्यांची फेरजुळणी केली आहे की नेमके कुठे काय आहे मला स्वतःलाच सापडणे अवघड झाले आहे. :)
नेमक्या
संदर्भासाठी धन्यवाद मेघना.
<< फक्त लेखनाने "आपले" दोष
फक्त लेखनाने "आपले" दोष वगैरे पेक्षा समाजवाद्याचे दोष किंवा स्वतःचे दोष अशी शब्दयोजना अधिक आवडली असती.
लेखकाने "आपले" म्हटले की लेखक समाजवाद्यांच्यातील एक आहे असा भास होतो >>
विचार करणारे/तपासून पाहणारे म्हणून जे अपेक्षित आहेत ते स्वतः समाजवादी आहे त्यांनी 'आपले दोष ओळखावे' अशी वाक्यरचना आहे नि ती सयुक्तिक आहे असे वाटते.
शिवाय लेखकाला आधीच लोक समाजवादी समजतातच (वादविवादाच्या क्षणी उत्तराची जबाबदारी टाळण्यास कामी येते.) आणि लेखकाला त्यात काही गैर वाटत नाहीच. सुज्ञ म्हणवणार्या पण पोकळ हिंदूच्या उत्सवाच्या बाबतीतील शेपूट घालण्याबद्दल लिहिले की मी समाजवादी म्हणून आरोपित होतो. जसे हिंदू समाजातील पुरोगामी प्रसंगी मुस्लिमधार्जिणेपणाचे, धर्मद्वेष्टेपणाचे आरोप स्वीकारूनही आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागून स्वधर्मविरोधी मते व्यक्त करतात त्याच्या दशांशानेही मुस्लिम समाजातून घडत नाही - धर्मविरोधी सोडा, मुस्लिम दहशतवाद्यांबाबतही नाही - असे म्हणेन तेव्हा कुणी मला संघवाला म्हणेल. तेव्हाही मी ती शिवी हारासारखी गळ्यात मिरवेन. दोष माझा नव्हे तर शिक्क्याशिवाय ज्यांना पत्राचा मजकूर समजत नाही अशांच्या समजुतीचा आहे. :)
भुमिका समजली. आभार. तुम्हाला
भुमिका समजली. आभार.
तुम्हाला शिक्के कोणी मारतं का? का मारतं? कोणते मारतं? हे इथे गैरलागु/अवांतर असलं तरी रंजक आहे . ;)
अजून डीटेलमध्ये वाचायला आवडलं
अजून डीटेलमध्ये वाचायला आवडलं असतं याबद्दल. असो, लिहिले तेही रोचक आहे.
बाकी, फाटाफूट होण्यासाठी वैचारिक खुलेपणा हे एकच कारण असेल असे नाही. ईगोलाही त्याचे रूप दिल्या जाऊ शकते.
साम्यवादी शेतकरी?
भारतातला मजूर आणि शेतकरी वर्ग तरी साम्यवाद्यांशी कितपत जोडला गेला आहे हे पहाणेही रोचक ठरावे.
भारतातला मजूर आणि शेतकरी वर्ग
भारतातला मजूर आणि शेतकरी वर्ग तरी साम्यवाद्यांशी कितपत जोडला गेला आहे हे पहाणेही रोचक ठरावे.
हान तेजायला ... एकदम टिपिंग प्वाईंट.
माझ्या माहीतीनुसार भारतात शेती ही प्रायव्हेटाईझ्ड आहे बव्हंशी भागात. साम्यवादी रशियात "sovkhozes तसेच kolkhozes" ही सामूहिक शेतीची मॉडेल्स होती. एक होती सरकारी शेती व दुसरी सामुहिक मालकीची (ज्यात सरकारचा सहभाग कमी होता). साम्यवादी रशियातील सामूहिक शेती ही अनुत्पादिकतेशी "चोली दामन" का रिश्ता ठेवून होती व आजही भारतातली प्रायव्हेटाईझ्ड शेती सुद्धा अनुत्पादकतेने भरून पावलेली आहे. आता प्रायव्हेटायझेशन म्हंजे उच्च उत्पादकता - असा जो काही क्यापिटलिस्टांचा दावा असतो तो कितपत खरा आहे ते तपासून पहा बरं.
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे तर हेतूबद्दल आहे हे ध्यानात घ्यावे.
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे
माझे विधान परिणामाबद्दल नव्हे तर हेतूबद्दल आहे हे ध्यानात घ्यावे.
मुद्दा एकदम मान्य. सहर्ष मान्य.
समाजवादाचा थिसिस हा परिणामांबाबत कधीच नव्हता. हेतूंबाबत च होता. अर्थात याचा अर्थ असा नाही की भांडवलवादाचा थिसिस हा परिणामांच्या साध्य होण्याच्या ग्यारंटीचा होता. भांडवलवादाचा थिसिस हा हेतूंच्या विशुद्धतेबद्दलचा सुद्धा नव्हता.
-
याबद्दल खालील उद्बोधक व्हिडिओ पाहणे. जेमतेम साडेचार मिनिटांचा आहे.
.
गल्लत
'समाजवाद्यांची बलस्थाने' आणि 'समाजवादी तत्त्वाची बलस्थाने' ह्यात माझी गल्लत झाली काय?