छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे

अतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.

उदाहरणादाखल -

१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग

२. नितळ जलाशयातली एकाकी होडी

३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्‍याला आधार देणे इ. लीळा)

४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)

५. गडावर जाऊन क्षितिजाकडे विचारमग्न मुद्रेने पाहत काढलेले फोटो. (अधिक तिघांची 'दिल चाहता है' पोझ)

६. झाड - फूल - फळ - पान - पक्षी

. . .

अर्थात, ही यादी कितीही वाढवता येईल, कारण एखाद्या बाबीचं 'क्लिश्ट'त्व हे शेवटी बिहोल्डराच्या डोळ्यांतच पडून असतं!

त्यामुळे,
- विषयाचं बंधन पाडून घेऊ नका.
- मूठभर हुच्चभ्रू काय म्हणतील याचा विचार न करता, क्लिशेंना आपलं म्हणा.

फोटो पाठवण्याची अंतिम तारीख - १ मे, २०१५.
(अडगळीस्तव इतर नियम कॉपीपेष्टवणे टाळले आहे. ते इथे वाचा.)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

वा वा! तोडलंस मित्रा, काय भारी विषय दिलायस, आता स्पर्धकांचा महापूर येईल असे भाकीत करते.

अगदी ! नं-दन्-दनादन्... Smile

---

आणि पहिली तीन उदाहरणे आम्ही आधी दिलेल्या फटूंवरून , , उचलल्याने श्रेय अव्हेराबद्दल णिषेढ. Wink

बाकीचे लोकही असले फोटो काढतात म्हटलं. आम्हाला लगेच अशा लिंका फेकून मारता येत नसतील म्हणून काय झालं!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

और ये रहा मेरा पहला पत्ता!! मायबाप रसिक वाचकहो तुम्हीच एखादे कॅप्शन सुचवा, बाकी पंचनामा तुम्ही करालच.

नावेतील तीन प्रवासी (द. मा. मिरासदार) वा मूळ पुस्तक Three Men in a Boat (जेरोम के जेरोम)

एवढं भारी कॅप्शन चालणार नाही, क्लिशे पाहिजे अमुक. Smile

मग ही चालतात का पाहा बरे !
'प्रवास आणि दोस्ताना - करावा तितका थोडाच !' , 'ये दोसती.. हम नहीं तोडेंगे', 'मन उधाण वार्‍याचे..'

क्या बात है!! Smile धन्यवाद अमुक.

उदाहरणं भारी आहेत!

क्लिश्ट'त्व हे शेवटी बिहोल्डराच्या डोळ्यांतच पडून असतं!

हे घाईघाईत 'बिल्डरच्या डोळ्यात' असं वाटलं आणि गोंधळले.

आमच्या फेसबुकाची लिंकच इथे देतो, काय वाटेल ते घ्या.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

स्पर्धेचे नियम वाचा आणि बक्षीस हवे असल्यास फोटो इथे आणून दाखवा. आम्ही तुमच्या फेसबुकाकडे ढुंकून बघत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे आमचे क्लिशे, स्मरणरंजनाच्या फोडणीसकट -

सध्या वश्या ऋतू असल्यामुळे स्मरणरंजन मोड ऑफ -

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेवटचा फोटु सोडला तर बाकीचे फोटु क्लीशे-स्केलवर फारच वाईट कामगिरी करतात. आम्हाला फोतुग्राफीतलं शून्य कळत असलं तरी क्लिशे आमच्या श्वासोच्छ्वासात आहे त्यामुळे त्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

१. उघडं कुलूप + बंद जागेची जाणीव करून देणाऱ्या गजांच्या सावल्या
२. कामावरून परत जाताना घरासाठी लाकूड नेणारी कष्टकरी वर्गातली स्त्री

या गोष्टी (इतर काही संदर्भ नसतील तर) क्लिशे नाहीत! का म्हणे?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

३_१४_अदितींचे उत्तर वाचल_, तरी मुक्तसुनीत यांना +१.

हे उच्चभ्रूंचे क्लिशे वाटत आहेत Smile दुसर्या फोटोतल्या स्त्रीच्या साडीचोळीची रंगसंगती मस्त आहे. या फोटोचे शीर्षक 'साडीचोळी आणि मोळी' असे देता येईल काय? Smile

फुलांचा फोटो अतिशय आवडला.

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

पण एक शंका.. फोटो टाकावेसे वाटतात पण त्यामध्ये स्वःताचे फोटोही असल्यामुळे जरा डौट है..
एडिटींग करुन काढताही येत नाहीयेत.
काय करावे बरं?
-मयुरा.

यासारख्या एखाद्या सॉफ्टवेअरचा उपयोग करता येईल.

अतिशय कठिण आव्हान. मागे कोणीतरी "भंकस कविता" आव्हान दिले होते, त्याची आठवण झाली.

नुसतेच न-बघण्यालायक चित्र देता येत नाही, पण पुरेसे तंत्र असून काहीसे सफाईदार हवे - विषय मात्र चावून चोथा झालेला हवा.

पण पर्यटनस्थळातील "मी/आम्ही येथे होतो" चित्रांची आठवण करून दिली, म्हणून सोय झाली. भिकार तंत्र+कंटाळवाणा विषय असलेली चित्रे तर माझ्याकडे भरपूर आहेत. परंतु ती येथे देण्यात काही मजा नाही.

तर शोधतो.

हे क्लिशे आहे का माहीत नाही. तरी पाठवतोय.

होय पहीला क्लिशे आहे. अन मस्त आलाय फोटो.

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

दुसरा फोटो पाहून पटकन वाटलं तिरशिंगरावांनी काय आमच्या फेसबुकावरनं उचल्ला का काय ! ( पण नाही. आमचा ज्यास्ती "गोड" आहे.)

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

१. मोठी लेन्स मिळाली म्हणून एका रात्री चंद्राकडे एकटक बघत काढलेला हा चांद्रक्लिशे (copyright च्या सहीसकट!)…

२. उडता उडता खालील सुंदर दृश्य टिपण्याचा प्रयत्न करताना काही अपरिहार्य कारणाने विमानाचे पंख सुद्धा फोटोमध्ये आले. वैमानिक फक्त माझ्या फोटो काढण्यापुरता तरी आपले पंख सावरू शकत नव्हता काय? तरीही जीवाचा आटापिटा करून काढलेला हा पंखेवाला क्लिशे…

३. धबधब्यावर गेलो असता मुद्दाम काढलेला, पाणी म्हणजे जणू कापूस पिंजून ठेवलाय असे दाखवणारा, हा मुलायम क्लिशे…

४. नायगारा जवळून अनुभवताना स्वतापेक्षा स्वतःची "ग्याजेट्स " जपण्यासाठी प्रयत्न करणारे रेनकोटे लोक आणि "tourist spot" या शब्दांनी गौरवला गेलेला एक अतिशय "क्लिशे" धबधबा या दोन्ही गोष्टी एकाच चित्रात दाखवणारा हा ओवरडोशीय क्लिशे…

तिसरा क्लासिक क्लिशे आहे, यात वादच नाही! Smile
स्मोकी माऊंटन्स भागातला आहे का? तसंच f/8 किंवा f/10 सेटिंग ठेवून हा इफेक्ट आला आहे का?

होय, f १६ किंवा २२ पर्यंत खेचला होता. आणि चित्र स्थिर राहावं म्हणून कॅमेरा कठड्यावर ठेवला होता. आणि हे चित्र ithacha, NY इथल्या "ताकाचा धबधबा" (Buttermilk Fall) चे आहे. त्या सहलीमध्ये असेच काठाकाठावर कॅमेरा ठेवून फोटो काढून माझ्या मित्रांना जाम बोर केलं होतं मी… Smile

पाण्याच्या इफेक्ट एक्पोझर वाढवल्याने येईल. किती उजेड आहे त्यानुसार फारतर १-३ सेकंद.

-Nile

नंबर तीन फोटो उत्तम क्लीशे - अशी दृश्यं कित्ती कित्ती डॉक्टरांच्या बाहेरच्या खोल्यांमधे पोस्टर वर पाहिले आहेत!
चंद्राचा फोटो खरोखर सुरेख आहे.

१)
हा फोटो मॅक्सिको मध्ये पर्यटन करताना 'माया सांस्कृतिक अवशेष'- 'मायन पिरॅमिडस' बघायला गेलो होतो तेव्हाचा आहे. ह्या फोटोमधला 'क्लिशे' म्हणजे मुलांबरोबरचे सगळे फोटोज असेच आलेत.. एकदम असहकाराचे. एकतर भर दुपारी पोहोचलो, रणरणतं ऊन नव्ह्तं पण ऊन होतं, आम्ही जबरदस्तीने मुलांना '१००० वर्षांपूर्वी लोप पावलेली महान संस्कृती' दाखवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. मुलांच्या वयाचा (वय वर्षे ७ आणि ३)काही ताळमेळच बसत नव्ह्ता.
दोघांचही म्हणणं होतं कि, एक तर आम्हालां सोडा ,कुठे पाहिजे तिथे मनसोक्त भटकु द्या, नाहीतर मला( छोटुला) कडेवर घ्या आणि मग पाहिजे त्या संस्कृत्या बघत फिरा. आमचा ऑप्शन नं.२ गपचुप स्विकारला.

२)

कसं छान आहे ना.. फुलोंके खेत टाइपचा फोटो.. समोर पसरलेला अथांग फुलोरा.ह्यातला क्लिशे खरा लांबुन कळत नाहीये पण ज्या ठीकाणी ही रानटी फुलं पसरली आहेत तीथे एक सुकलेला तलाव आहे. मागच्या दोन तीन वर्षात मध्य टेक्सास मध्ये जो दुष्काळ पडला होता त्यामध्ये असे कितीतरी तलाव आटले असतील.. पण निर्सगाची कमाल अशी अनपेक्षित बघायला मिळाली.

३)

आकाश-पाताळ एक करुन काम करतोय असं वाटतयं. खरा फोटो तो काम करतोय ह्याचा होता..पण लक्ष भलतिकडेच वळतयं.

पहिला फोटो 'चिचेन इत्झा'चा दिसतोय. त्याखालचं वर्णन धमाल आहे, 'का रे ऐसी माया' हे कॅप्शन चालून जावे Smile

चिचेन इट्झा ला चिचेन इट्झा म्हणतात हेच विसरले होते. बाकि शिर्षक अगदी चपलख आहे-'का रे ऐसी माया'

-मयुरा.

दुसरा फोटो कधीचा आणि कुठला आहे गं?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा फोटो मार्बल फॉल्स ह्या ठीकाणी जाताना वाटेत एका आडवळणाच्या तलावावरचा.. टेक्सास हिल कंट्री ह्या विभागात जो उंच सखल भाग येतो तिथेच.

--मयुरा.

क्याप्शनच्या नालापायी फोटोचा घोडा जाऊ नये म्हणून हे नवनीत गैड:

१. चोथा झालेल्या गाण्याच्या ओळी (उदा. वर अमुकने दिलेलं आहे)
२. क्षयझ डॉट कॉम : कशालाही डॉट काँम जोडून आपण फॉर्वर्ड (ड पूर्ण) असल्याचं जाहीर करणे (उदा. सूर्यास्त डॉट कॉम)
३. क्षयझ वर बोलू काही : खर्‍यांनी मराठी भाषेला बहाल केलेलं क्याप्शन (उदा. मेदयुक्त बटाट्यांवर बोलू काही)
४. चेकलिस्टचा आव आणणे : "काहीतरी काहीतरी ... चेक!" (उदा. कडी लावणे ... चेक. पायजम्याची नाडी सोडणे ... चेक)
५. यमक्यावामन : शाळकरी यमके जोडणे (उदा. माय हार्ट इज फुल्ल ऑफ जॉय, द गॉड हॅज ब्लेस्ड अस विथ बेबी बॉय!)
६. क्याप्शनमध्ये नावं गोवणे (उदा. "अर्चना डूइंग पूजा-अर्चना" - लक्ष्मीपूजनाचा फोटो.)
७. नावांची मोडतोड करणे (उदा. "सुधाकर की सीधा कर?" - शाळा/कालेजच्या सेंडॉफला एकाला चौघापाच मित्रांनी आडवं धरलेला फोटो)
८. अक्करमासे : प्रसिद्ध व्यक्तींची नावे आपल्या आडनावाला जोडणे किंवा व्हाईस व्हर्सा. (उदा. "लान्स ढोबळे" - सायकलवर बसलेला फोटो)
९. फ्लेक्समय क्याप्शन : फ्लेक्सवाङ्मयातून घेतलेली स्फूर्ती (उदा. "एका दमात पोरी प्रेमात" - जरा सूटबीट घातलेला फोटो)
१०. "कल ... याद आयेंगे ये पल" - कोणत्याही फोटोला चारचांद लावणारं "वेळेला केळं" टैप क्याप्शन

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रंग दे बसंती टाईपचा क्लीशे.

कॅप्शन : shootout @ पन्हाळा

पूर्ण फोटो दिसत नसल्यास राईट क्लीक करुन open/view image करा. (मला ४ पैकी ३ जण दिसत आहेत फ़ोटोत)
हे करेक्ट करता येईल का?

मला दिसताहेत चारही जण फोटोत. कदाचित मोठ्या स्क्रीनवर फॉन्ट मोठा दिसण्यासाठी झूम ऑन असल्यास, फोटोंची उजवी बाजू छाटली जाते (प्रतीकात्मक? Lol त्यामुळे तसं दिसत असेल.

बाकी, मला 'रंग दे बसंती'बरोबरच होम्सच्या नाचणार्‍या माणसांचे ते कोडे आठवले Smile -

धन्यवाद. लॅपटॉपवर ओक्के दिसतंय. आणी आपण म्हणालात तसे मोबाईलमधेही 'टेक्स्ट स्केलिंग' कमी केल्यावर व्यवस्थित दिसतंय आता.

माझ्या फोटोला डीकोड करून दाखवायचं लेटर २२१-ब, बेकर रस्त्यावर पाठवतोय. Wink

बेकर रस्त्यावर

पावभट्टी रोड कसं वाटतंय? (अंमळ हातभट्टी)

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Lol

क्लिशेत्वाला गुण आहेत हे समजलं पण खालीलपैकी कसे?

अ. विषय आणि ऑब्जेक्ट किमान तीव्रतेचा क्लिशे पाहिजे पण त्यानंतर मात्र फोटोची क्वालिटी जितकी चांगली तितके गुण जास्त (रेटिंग जास्त)

की

ब. फक्त क्लिशेत्वाची तीव्रता जितकी जास्त तितके गुण जास्त. मग क्लिशेत्व तीव्र असण्यासाठी फोटोची क्वालिटी कमी होणे आवश्यक असल्यास तेही चालेल?

गणितात बसवणं अवघड आहे, कारण एकंदर मामला सापेक्षच आहे.

पण:
- जर दोन फोटोंतलं क्लिशेत्व साधारण सारखं असेल, तर अधिक चांगल्या दर्जाच्या फोटोला झुकतं माप मिळेल.
- क्लिशेत्व टिपण्यापायी थोड्या क्वालिटीचा त्याग आवश्यक असेल, तर हरकत नाही. त्याबद्दल गुण कापले जाणार नाहीत :).

वाचकांच्या प्रतिक्रिया/मतंही याबाबत अर्थात मोलाची आहेत.

प्रत्यक्ष फोटो नसले तरी साधारण खालील चित्रे डोळ्यासमोर आली.

- काश्मिरी ड्रेस घालून महाराष्ट्रीय अथवा तामिळनाडूतील जोडप्याचे फोटो.
- उपरोक्त प्रकारच्या वेषात फोटो- केसाळ "याक"सोबत
- फूलयुक्त डहाळी पकडून मुग्ध नजरेने पाहणारी तरुणी
- केकचे कापण्यापूर्वी घाईने काढलेले क्लोजअप्स
- बक्षीस अथवा घास देऊन झालेला असताना पुन्हा एकदा फोटोग्राफर हुकल्याने रीयुनियन करुन अवघडलेल्या "देण्याच्या" पोझमधे काढलेला फोटो. - सेम विथ मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालणे.
- पिसाच्या मनोर्‍याला हातभार
- चिमटीतला किंवा ओंजळीतला सूर्य
- उडी मारण्याचा क्षण पकडण्याच्या प्रयत्नातला फराटा
- डोक्यावर बोटांनी शिंगे केलेला ग्रुप फोटो
- सर्व तरुणमंडळाने काळे गॉगल लावून मंकी पॉईंटला उभे राहून काढलेला फोटो
- हपीस कॉन्फरन्समधे पायर्‍यापायर्‍याच्या स्ट्रक्चरवर किंवा लॉनवर साठजण उभे असलेला प्यानोरामिक फोटो
- घोड्यावर बसलेली बाई आणि टाळलेल्या घोडेवाल्याची लगामावरची बोटे फ्रेमच्या एका कॉर्नरात
- साळुंखी
- लोणावळ्याची कट्ट्यावर बसलेली माकडे

बर्‍याच आयडिया एक्सपोज केल्या काय ? Wink

१. बहुतांश वेळा ही री-अरेंज्ड बक्षीस, पुष्पगुच्छ वगैरे देण्याची पोझिशन अशी असते की त्यात मूळ देणारा आता ती वस्तू विजेत्याकडून परत घेत आहे असं वाटतं. कारण हातांची पोझिशन उलट होते.

- काश्मिरी ड्रेस घालून महाराष्ट्रीय अथवा तामिळनाडूतील जोडप्याचे फोटो.

हा हा, अगदी अगदी! (मला 'घरात अक्रोड नव्हते, नसायचेच!) आठवलं Wink

१. बहुतांश वेळा ही री-अरेंज्ड बक्षीस, पुष्पगुच्छ वगैरे देण्याची पोझिशन अशी असते की त्यात मूळ देणारा आता ती वस्तू विजेत्याकडून परत घेत आहे असं वाटतं. कारण हातांची पोझिशन उलट होते.

अचूक! याला 'घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे'! असं एक कॅप्शन आगाऊच सुचवून ठेवतो.

बाकी यादी अगदी नेमकी आहे. अर्थात, अलीकडे काश्मिरी ड्रेसच्या सोबतीनेच युनिव्हर्सल स्टुडिओतल्या मोटरसायकलवर किंवा मादाम तुसॉद्सच्या एखाद्या म्युझियममध्ये ओबामाला चार गोष्टी सुनावतानाच्या पोझमध्ये (एक जालीय काका आठवले!) काढलेल्या फोटोंचाही अलीकडे बराच प्रादुर्भाव झाला आहे म्हणा.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

’... माझ्या मनातला का तेथे असेल रावा...’ (टिंबं कम्पल्सरी आहेत. गाळण्याचा विचारही करू नये.)

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

’माझ्या गोव्याच्या भूमीत...’

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यावरून आठवले. पुळणीत उमटत गेलेली पावले. ती टाका बॉ कुणीतरी. आणि खाली 'जीवन के सफर में राही...'.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रकाटाआ!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चले, हा अजिबात नापास आहे या धाग्यावर.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमच्या घरच्या कुठल्याही हॉल घेऊन केलेल्या कोणत्याही फंक्शनचे फटु बघा, त्या फटूत अशा बाया-पुरूषांचा (कधी एकदा फंक्शन सम्पतेय नी जेवणे सुरू होताहेत छाप Wink ) फटु नैये?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चक्‌.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जाहिर लिंकेवर फोटु टाकण्यापूर्वी फोटुमधील व्यक्तींची पूर्वपरवानगी मिळवली असावी अशी आशा आहे.
नैतर फट् म्हणता प्रायव्हसी भंग होणे वगैरे प्रकार व्हायचे.

अशा ज्वलंत विषयावर गंभीरपणे चर्चा होणे श्रेयस्कर.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तरी असा फोटो थेट जालावर आलेला आवडला नसता. प्रत्येकाची परवानगी काढली असणे शक्य नाही.

माय क्यामेरा, माय च्वाईस?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

युअर कॅमेरा बट देअर फेसेस. आणि सार्वजनिक कार्यक्रम म्हटलं तर दिवसातले बारा पंधरा तास मनुष्य सार्वजनिकातच असतो. शाळेत मुलं सार्वजनिक बसने जातात. बायका पुरुष सार्वजनिक पार्कात जॉगिंगला जातात. म्हणून तिथले फोटो काढून पोटेन्शियली वैश्विक, अवैयक्तिक, अनियंत्रित, आंतरजालीय दृश्यमानतेसाठी खुले करणे हा चॉईस आपला कॅमेरा असल्याने आपोआप प्राप्त होऊ नये.

धन्यवाद. इतःपर फक्त मानवेतर प्राण्यांचे आणि निर्जीव वस्तूंचेच फटू टाकणे हेच हलाल आहे अशा सर्टिफिकेटाच्या प्रतीक्षेत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वतःच्या नातेवाईकांचे किंवा क्लोज्ड नोन ग्रुपचे टाकण्यात गैर नसावे.

नोन टु हूम?

काढून टाकलेल्या फटूतील सर्व व्यक्ती ऋषिकेश यांना अनक्नोव्न होत्या का?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अधिकचा प्रतिसाद सविस्तर लिहिला होता पण प्रतिबंधितचे भिंताड आड आले.

असो. मुद्दा असा की मुख्य सब्जेक्ट स्वतः बीचवर बसलेला असताना बाजूला अनोळखी लोक पहुडलेले फ्रेममधे आले तर नाईलाज असतो.

आयफेल टॉवर हा सब्जेक्ट असताना त्याच्या आसपास उभे असलेले इतर लोक टाळणे शक्य नाही.

या फोटोत तो ग्रुप हेच मुख्य सब्जेक्ट आहेत. ते घरगुती सर्क्युलेशनपुरते फोटो असणं अपेक्षित आहे. आंतरजालावर, स्पर्धेसाठी जिथे कोणीही ते अनिर्बंध पाहू शकतो तिथे टाकणे हे मुख्य सब्जेक्ट असताना योग्य वाटत नाही.

याहून जास्त साले काढणे बरोबर वाटत नसल्याने थांबतो. इतर कोणाचे फोटो टाकायला मी थांबवू शकत नाही.

होय त्या व्यक्ती माझ्या परिचयातील नव्हत्या.
कोणत्याही कार्यक्रमात दिसणारे (नी बहुतांश आल्मब्स मधील एक प्रातिनिधीक चित्र) या दृष्टिकोनातूने एक क्लीशे म्हणून तो (एका सार्वजनिक फंक्शनमधील) फोटो टाकला.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे आता तेंडुलकर, मोदी, कांदापोव्हा, इ. चे फटू शेअर करतानाही हेच झेंगाट आडवं येणार तर....अवघडे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शॉल्लेट.

म्हणजे आता तेंडुलकर, मोदी, कांदापोव्हा, इ. चे फटू शेअर करतानाही हेच झेंगाट आडवं येणार तर....अवघडे.

"गोहत्याबंदीनंतर पोर्क, कांदा लसूण यांच्यावरही बंदीची मागणी आली तर कठीण आहे", किंवा मंगळावर यान पाठवताना मुहूर्त पूजा इत्यादि करण्यामुळे शास्त्रज्ञांच्या वस्तुनिष्ठतेवरच शंका येते, वगैरे अशा आशयाचे आक्षेप आले की "टोकाचे, कपोलकल्पित सिनारिओ अन केसेस, फिअरमाँगिंग, निव्वळ तांत्रिक मुद्दे,प्रतीकमैथुन इ इ इ" गोष्टी लगेच प्रथम क्रमांकावर न आणता प्रत्यक्ष परिस्थिती पाहून सारासार विवेकाने काय स्वीकारायचे आणि काय नाही हे ठरवावे अशी लॅटरल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग इत्यादिची रास्त भूमिका मांडणारा बॅटमॅन तूच ना?

मग घरगुती समारंभात बसलेले लोक आणि तेंडुलकर मोदी वगैरेंचे फोटो यांच्यात तांत्रिकदृष्ट्या एकच पातळी शोधून मुद्दा मांडणं हे अंमळ रोचक, उदाहरणार्थ इ इ आहे.

धन्यवाद. अंमळ ऐसी-एस्क भूमिका मांडून पाहिली, फॉर अ चेंज- बाकी काही नाही. Smile

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फोटोंच्या धाग्यावरही हजार-हजार शब्दच ओसंडताना पाहून "कुठे नेऊन ठेवली फोटोस्पर्धा आमची" असं झालं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाने