करोना व्हायरस - शरीरात कसा वागतो?

करोना व्हायरस जनसमूहात कसा पसरतो हे आपण आतापर्यंत मोजलं आहे; आता वेळ आली आहे तो शरीरात गेल्यावर कसा वागतो, याचा अभ्यास करायची.

टीप : मूळ इंग्रजी लेखक आहेत अमेरिकास्थित सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी. त्यांना २०११मध्ये “द एम्परर ऑफ ऑल मॅलडीज् – ए बायोग्राफी ऑफ कॅन्सर” या पुस्तकासाठी पुलिट्झर पुरस्कार मिळाला आहे. प्रस्तुत लेख ६ एप्रिल २०२० रोजी ‘द न्यूयॉर्कर’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. मूळ लेखाची शब्दसंख्या थोडी जास्त असल्याने आशयाला धक्का न लावता अनुवाद काहीसा संक्षिप्त केला आहे.
अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर

----------------

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जेव्हा चीनमध्ये कोव्हिड-१९ची धग अजूनही पसरतच होती, तेव्हा मी कोलकात्यात येऊन पोचलो. मी जागा झालो ती सकाळ तिथली नेहमीसारखी उकाड्याची, दमट हवेची होती. माझ्या हॉटेलच्या खिडकीतून पाहिलं तर घारी उंच आकाशात घिरट्या मारत होत्या. मी शितलादेवीच्या देवस्थानाकडे निघालो. तिच्या नावातच थंडपणा, शीतलता आहे. प्रचलित दंतकथेनुसार बलिदानाच्या अग्नीच्या थंड राखेतून तिचा जन्म झाला. ती केवळ उन्हाळ्यातला दाह परतवून लावते असं नाही, तर शरीरांतर्गत दाहदेखील तिच्यामुळे शांत होतो. ती लहान मुलाचं देवी रोगापासून रक्षण करते. ज्यांना तो रोग जडतो, त्यांच्या वेदना दूर करते, आणि देवीच्या साथीचं दमन करते.

हे देवस्थान कोलकाता मेडिकल कॉलेजपासून थोड्याच अंतरावर एका मंदिरात आहे. आतमध्ये असलेली तिची मूर्ती हजार वर्षांपासून ज्ञात असलेल्या तिच्या रूपात आहे – गाढवावर आरूढ, आणि हातात शीतद्रव्याची बरणी. हे मंदिर सुमारे अडीचशे वर्षं जुनं आहे. म्हणजेच, ज्या काळी ब्राह्मणांचा एक गूढ पंथ गंगेच्या आसपासच्या भागांमध्ये फिरत, ‘टीका’ लावण्याचा प्रसार करायच्या प्रयत्नात होता, तो काळ. हा प्रकार म्हणजे लसीकरण करण्याचे प्राथमिक प्रयत्न. देवीच्या फोडांमधला पू (म्हणजे जिवंत व्हायरसचा खजिनाच!) काढून निरोगी माणसाच्या त्वचेवर ओरखडा मारून त्यावर तो लावून त्यावर एक फडकं बांधणं, असा तो प्रकार होता.

भारतातल्या मंडळींनी हा प्रकार बहुधा अरेबियन वैद्यांकडून शिकला असावा. मुळात सन ११००च्या सुमारास चिनी वैद्यांच्या लक्षात आलं की देवीच्या रोगातून बचावलेल्या लोकांना तो आजार पुन्हा होत नाही. अशा लोकांना अन्य पीडित रुग्णांच्या सेवेसाठी कामाला लावलं जायचं. त्यांनी निष्कर्ष काढला की एखाद्या आजाराशी शरीराचा ‘परिचय’ झाला, की पुढच्या वेळी त्या व्यक्तीला त्या आजारापासून संरक्षण मिळतं. चिनी डॉक्टर देवीच्या रुग्णाच्या खपल्या कुटून, त्याची पूड चांदीच्या लांब नळीतून लहान मुलांच्या नाकात सोडत असत.

अशा प्रकारे जिवंत व्हायरस वापरून लसीकरण म्हणजे तारेवरची कसरतच. जर अशी पूड जास्त दिली गेली, तर मुलाला जीवघेणा आजार होऊन, मृत्यू ठरलेला. शंभरात एकाला तरी असं होत असे. जर सगळं व्यवस्थित झालं, तर मुलाला सौम्य आजार होऊन, पुढे जन्मभर संरक्षण मिळे. सन १७००पर्यंत लसीकरण संपूर्ण अरब जगतात पसरलं होतं. १७६०च्या सुमारास सुदानी आया एकमेकींसोबत विचित्र घासाघीस करू लागल्या: “तुझ्या मुलाच्या पू भरलेल्या किती पुळ्या माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी तू मला विकशील?” ही एक अतिशय कौशल्यपूर्ण कला होती. कोणत्या पुळ्यांमध्ये अगदी योग्य प्रमाणात व्हायरस असलेला पू असेल, हे चाणाक्ष डॉक्टरांना बरोबर समजत असे.

१७१५ साली इस्तंबूलच्या ब्रिटिश राजदूताच्या पत्नीला – लेडी मेरी वॉर्ट्ले माँटॅग्यूला – देवीचा आजार झाला आणि तिच्या नितळ कांतीवर अनेक व्रण उमटले. पुढे तिला तुर्कस्तानातल्या ग्रामीण भागात लसीकरणाची प्रथा पाहायला मिळाली. तिने अचंबित होऊन आपल्या मैत्रिणींना पत्रातून तिथल्या एका तज्ज्ञाचं अशा शब्दांत वर्णन केलं: ‘ही म्हातारी बाई एका कुपीत उत्तम दर्जाचा पू घेऊन येते आणि तुम्हाला विचारते की कुठल्या शिरेत तुम्हाला हे हवंय. मग सुईच्या टोकावर मावेल इतका पू ती घेते, आणि बरोबर त्या शिरेत तो घालते. दोन दिवस थोडा ताप येतो, आणि जरा विश्रांती घेतल्यावर माणूस ठणठणीत. त्या लोकांना चेहऱ्यावर जेमतेम पंचवीस-तीस पुळ्या उमटतात, पण आठ-एक दिवसांत एकही डाग न राहता ते पूर्ववत होतात. हजारो लोक दरवर्षी अशी लस घेतात आणि देवीचा रोग त्या भागात पूर्णपणे आटोक्यात आहे. मला तर लसीकरणाच्या सुरक्षिततेविषयी मुळीच शंका नाही, कारण मी माझ्या प्रिय मुलावर हा प्रयोग करून बघणार आहे.’ तिच्या मुलाला खरोखर देवी कधीही झाल्या नाहीत.

गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षांत आपण संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांबाबत प्रचंड प्रगती केली आहे. तरीही कोव्हिड-१९च्या बाबतीत अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. मूळ वुहानपासून हजारो मैल दूर असलेल्या इटलीत तो वणव्यासारखा का पसरला? अजून तरी भारतात तितकासा का दिसून येत नाही? मुळात कोणत्या प्राण्यापासून तो माणसात शिरला?

इथे तीन प्रश्नांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे, कारण आपण रुग्णांना कसे विलग (आयसोलेट) करतो, आणि कसे उपचार करतो, हे त्यावर ठरणार आहे. एक – सुरुवातीच्या इन्फेक्शनचा “डोज रिस्पॉन्स कर्व्ह” कसा आहे? म्हणजेच, व्हायरसची संख्या (‘डोज’) जास्त असली (जास्त ‘एक्स्पोजर’) तर इन्फेक्शन होण्याची शक्यता (‘रिस्पॉन्स’) किती जास्त असते, हे आपण मोजू शकू का? दोन – या सुरुवातीच्या व्हायरस “डोज”चा आजाराच्या तीव्रतेशी काही संबंध आहे का, म्हणजे, “जास्त डोज = जास्त गंभीर आजार” असं समीकरण आहे का? आणि तीन – लागण झालेल्या रुग्णांमध्ये व्हायरस कसं वर्तन करतो, हे आजमावण्यासाठी आपण काही गोष्टी मोजून पाहू शकतो का (उदा: शरीरातली व्हायरसची उच्चतम संख्या, अर्थात “पीक व्हायरल लोड”, आणि त्याच्या चढ-उताराचे पॅटर्न्स)? या पॅटर्न्सवरून आपण आजाराच्या तीव्रतेचा अंदाज वर्तवू शकतो का, आणि एखाद्या रुग्णापासून इतरांना संसर्ग होण्याचा किती धोका आहे, हे आजमावू शकतो का? आपण या पॅन्डेमिकच्या अशा अवस्थेत आता आहोत, की हा व्हायरस शरीरांतर्गत कसा वागतो, हे पाहायला आणि मोजायला आपण सुरू केलं पाहिजे.

Corona Virus Inside Human Body

पुरेशा माहितीअभावी बहुतेक सर्व एपिडेमिऑलॉजिस्ट्सना (साथीच्या रोगाचे तज्ज्ञ) या व्हायरसच्या प्रसाराचे ‘मॉडेल्स’ बनवताना ‘बायनरी’ पद्धतीनेच विचार करावा लागला आहे – व्यक्ती एक्स्पोज झाली आहे किंवा नाही, इन्फेक्शन झालं आहे किंवा नाही, लक्षणं असलेले रुग्ण किंवा लक्षणं नसलेले ‘वाहक’ (कॅरिअर्स). ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका ऑनलाइन अंकात एक अतिशय आकर्षक ‘सिम्युलेशन’ येऊन गेलं. यात एकमेकांना आपटून विलग होणाऱ्या रंगीत ठिपक्यांच्या साहाय्याने कोव्हिड-१९ कसा पसरतो हे दर्शवलं होतं. थोडक्यात हा व्हायरस जनसमूहात “ऑन-ऑफ” पद्धतीने कसा पसरतो याचं ते जणू विहंगम दृश्यच होतं. पण या ठिपक्यांच्या आत काय घडतंय हे माझ्यातल्या डॉक्टरला आणि संशोधकाला माहीत करून घ्यायचं होतं (पदवीधर विद्यार्थी असतांना व्हायरल इम्यूनॉलॉजीत माझं प्रशिक्षण झालं होतं). एक्स्पोजर, किंवा “टच-टाइम”चा संसर्ग होण्याच्या शक्यतेशी काय प्रकारे संबंध आहे? एखाद्या व्यक्तीपासून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता बदलत जाते का? प्रत्येक रुग्णात आजाराची तीव्रता कशी असते?

एड्स, सार्स आणि देवीच्या व्हायरसेसच्या अभ्यासावरून आपल्याला माहीत आहे की, असे आजार गुंतागुंतीचे असतात. त्यात “बायनरी” असं काही नसतं. उदा: एच.आय.व्ही.च्या बाबतीत इन्फेक्शन झाल्यानंतर काही काळानंतर रुग्णाच्या रक्तातल्या व्हायरसचं प्रमाण एका उच्चतम पातळीपर्यंत जातं, ज्याला “पीक व्हायरेमिया” म्हटलं जातं. ज्या लोकांचा पीक व्हायरेमिया जास्त असतो, ते चटकन आजारी पडतात आणि व्हायरसविरुद्ध प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता कमी असते. पीक व्हायरेमियापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे “सेट पॉइंट” – एखाद्याच्या पीक व्हायरेमियानंतर व्हायरस ‘काउन्ट’ (व्हायरसची संख्या) कोणत्या पातळीवर येऊन स्थिरावतो, ते. (उदा : HIV सेट पॉइंट.) ही स्थिती म्हणजे एक प्रकारचा समतोल किंवा तह असतो – व्हायरस आणि त्याच्या यजमानाच्या शरीरादरम्यान झालेला. ज्यांचा सेट पॉइंट उच्च, त्यांच्यात एच.आय.व्ही. पासून एड्सपर्यंतचा प्रवास अधिक वेगाने होतो. तेव्हा व्हायरल लोड ही काही बायनरी गोष्ट नव्हे. अर्थात, प्रत्येक व्हायरसचा ‘स्वभाव’ वेगळा असतो, म्हणजे त्याचं वर्तन वेगळं असतं. एच.आय.व्ही.च्या बाबतीत व्हायरल लोड खूप काही सांगून जातो. हा व्हायरस खासकरून माणसाच्या इम्यून संस्थेच्या पेशींवर हल्ला करतो. पण अन्य व्हायरसेसच्या बाबतीतही काही समान गोष्टी आढळून आल्या आहेत.

यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. तुमचं वय, तुमची जनुकं, आणि प्रतिकारशक्तीचे निर्देशांक यामुळे जर तुमचं शरीर वाढत जाणाऱ्या व्हायरसच्या संख्येशी चांगल्या मुकाबला करू शकलं, तर तुमचा सेट पॉइंट कमी असणार. लसीकरणामुळेही सेट पॉइंट कमी होत असेल का? या उलट व्हायरसने मोठ्या संख्येने, आणि एकापाठोपाठ एक असे तुमच्यावर हल्ले केले तर अशा हल्ल्यातून शरीराच्या प्रतिकारशक्तीला या युद्धात गमावलेली जमीन परत मिळवणं अवघड जातं.

व्हायरस लोडप्रमाणेच संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत आणखी एक घटक महत्वाचा असतो. तो म्हणजे बाधित व्यक्तीच्या (म्हणजे त्या रोगजंतूच्या ‘यजमानाच्या’) प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद (इम्यून सिस्टिम रिस्पॉन्स). व्हायरस आणि प्रतिकारशक्ती या परस्परविरोधी शक्ती आहेत. रशियन इम्युनॉलॉजिस्ट इल्या मेचनिकॉफ यांनी गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात याला झगड्याची उपमा दिली होती. सर्व प्रतिमा युद्धाच्या आहेत – रोगजंतूंची कुमक किती? यजमानाच्या प्रतिकारशक्तीची पातळी काय? या अगोदर त्याच्यावर या विशिष्ट जंतू-रूपी शत्रूने हल्ला केला होता का? त्याच्या जनुकांमध्ये काय दडलंय? हल्ला थोपविता येईल का, हे या सर्व गोष्टींवर ठरत असतं. शिवाय युद्ध सुरू होतानाच्या काळात कुठल्या पक्षाचं पारडं जास्त जड होतं?

यातून दुसरा मुद्दा पुढे येतो – जास्त व्हायरल लोड म्हणजे जास्त तीव्र आजार का? कोव्हिड-१९च्या संदर्भात बोलायचं तर तेहतीस वर्षीय चिनी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. ली वेनलियांग यांनी प्रथम या आजाराविषयी जगाला सावध करायचा मनापासून प्रयत्न केला. दुर्दैवानं याच कोव्हिड-१९ची बाधा झाल्यावर त्यांच्या अगदी अखेरच्या क्षणांची जी प्रतिमा जगासमोर आली, ती आपण विसरू शकत नाही – लालबुंद, घामेजलेला चेहरा, आणि मास्कच्या मागे जाणवणारी त्यांची श्वास घेण्यासाठी चाललेली धडपड. इतक्या तरुण वयात त्यांचा जीव या व्हायरसने घेतला (एरवी या वयाचे लोक कोव्हिड-१९मधून सहीसलामत बाहेर पडतात), त्याचा संबंध त्यांच्या सुरुवातीच्या व्हायरल लोडशी लावता येईल का? अमेरिकेतही इमर्जन्सी रूममध्ये आघाडीवर काम करणाऱ्या दोन डॉक्टर्सचा मृत्यू झालाय. या सर्व गोष्टींचा अर्थ अजून आपल्याला नीटसा लावता आलेला नाही.

आज आपल्याकडे करोना व्हायरसविषयी जी तुटपुंजी माहिती आहे, त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की हा व्हायरस कदाचित इन्फ़्लुएन्झा व्हायरससारखा वागेल. २००४ साली कोव्हिडचा भाईबंद असलेल्या सार्सच्या बाबतीत असं लक्षात आलं होतं की लागण होतांना व्हायरल लोड जितका जास्त, तितका आजार जास्त तीव्र होतो – रुग्णाचं वय काहीही असलं तरी. गोवराच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून आला होता. आणि असं असणं स्वाभाविकच आहे. कारण एकीकडे व्हायरस जास्तीतजास्त पेशींवर हल्ला करायच्या प्रयत्नात असतो, तर दुसरीकडे शरीर लवकरात लवकर व्हायरसला मारायच्या प्रयत्नात असतं. या शर्यतीत जो पहिल्या ढांगा वेगात मारतो, त्याचा विजय होण्याची शक्यता जास्त असते.

विविध संशोधक या सर्व बाबींचा कसून अभ्यास करत आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला अधिक उत्तरं मिळू लागतील. त्या उत्तरांच्या जोरावर आपण रुग्ण, हॉस्पिटल्स आणि एकूणच जनसमूह कशा प्रकारे मॅनेज करायचे हे ठरवू शकू. उदा : एकाच डॉक्टरचा किंवा नर्सचा अतिसंसर्गजन्य रुग्णांशी फार काळ संपर्क येऊ न देणं. किंवा हाताशी मर्यादित साधनसामग्री असताना कोणाच्या उपचारांना प्राधान्य द्यायचं, जेणेकरून योग्य रुग्णांना लवकरात लवकर आणि परिणामकारक उपचार करणं सुलभ होईल. शिवाय कोणाला आयसोलेट करायचं आणि कोणाला केवळ देखरेखीखाली ठेवायचं, हे ठरवणंही सोपं जाईल.

कर्करोग उपचार हे माझं कार्यक्षेत्र. इथे मोजमापाला खूप महत्त्व असतं. ट्युमर किती मोठा होता, किती ठिकाणी तो पसरला आहे, केमोथेरपीनंतर त्याचा आकार किती घटला, वगैरे. याउलट पॅन्डेमिकमध्ये रोगाच्या बरोबरीने भीतीही वेगाने पसरते. सर्वत्र गोंधळ असतो. जिथे साधनसामग्री कमी आहे, जमेल तिथे खाटा टाकून लोकांना सलाइन लावलं जातंय, अशा परिस्थितीत व्हायरल लोड तपासणं म्हणजे अशक्यप्राय वाटू शकेल. पण त्याला इलाज नाही. एकीकडे जनसमूहांमध्ये होत जाणाऱ्या व्हायरसच्या प्रसारावर जसं आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे, तसंच व्यक्ती-व्यक्तीमध्ये त्याचा प्रवास कसा होतो याचा अभ्यास करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
--------------------------

(अनुवादक पुण्यातील एका नामवंत वाहननिर्मिती कंपनीतून वैद्यकीय अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.)

निवेदन : सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे. प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

मूळ लेखाचा दुवा

© 2020 Condé Nast
This translation and the image accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान ! उत्तम लेख. आवडला आणि पटलादेखील..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

आणखी सहा महिने थांबायची तयारी ठेवा... (अबापट दीड वर्ष किमान म्हणतील.)

किंवा,

मागच्या लेखाचा गाभा होता तो काही लोकांना विषाणूचा संसर्ग झालेला असेल तरीही लक्षणं दिसत नसण्याची शक्यता आहे. ह्या लेखाचा गाभा आहे - कोव्हिड-१९चा अभ्यास काय प्रकारे केला जात आहे; त्यात काय प्रगती होत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगोदरचा प्रतिसाद असंबद्ध होता. मागे घेतला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थांबल्यावर समजेलच की! जगात कुणालाच जे काही समजलेलं नाही ते एका ट्वीटमध्ये समजावून हवं असेल तर धीर धरावा लागणारच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी माझे प्रतिसाद मागे घेतले आहेत असे समजावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोज रिस्पॉन्स कर्व्ह, पीक व्हायरल लोड, व्हायरेमिया वगैरे गोष्टी तुम्हाला आधीपासूनच माहीत असल्या तर लेख वाचायला अजिबात जाऊ नये. कोरोनाव्हायरसचा संसर्ग होतो तेव्हा किती विषाणू शरीरात गेले त्यावरून तुमच्यात आढळणारी रोगाची तीव्रता किती असणार आहे, हे कसं ठरतं हे जर तुम्हाला माहीत असेल, तर ऐसीवर रमू नका, डायरेक्ट WHOकडे किंवा किमान NIVकडे जा, कारण त्यांना ते अद्याप माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोना विषयी 'ठोस' माहितीच्या शोधात असाल तर तुम्हाला ते कुठंही सापडणं अवघड आहे.
(तुम्हाला सापडलं तर नक्की कळवा, कारण जगच त्यांच्या शोधात आहे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगोदरचा प्रतिसाद असंबद्ध होता. मागे घेतला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वायरस लागल्यावर काय स्थित्यंतरं होतात तया न्युयॉर्कर लेखाची लिंक टाकली होती इथे कुठेतरी. जरा तांत्रीक भाषेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुखर्जींचे न्यूयॉर्करमधले इतर लेखही वाचनीय, श्रवणीय असतात. (न्यू यॉर्करच्या संस्थळावर ते लेख ऐकण्याची सोयही आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या लेखावरुन एक महत्वची बाब लक्षात आली ती म्हणजे फक्त बायनरी विचार करुन चालणार नाही - व्यक्ती एक्स्पोझ झाली आहे का नाही?

व्हायरल लोड म्हणजे विषाणुंचे प्रमाणही लक्षात घ्यावे लागेल. व्हायरल लोड जितका जास्त, तितका आजार जास्त तीव्र होतो – रुग्णाचं वय काहीही असलं तरी.

काल एक लेख वाचला ज्यात म्हटले होते जिन्स म्हणजे गुणसूत्रांचाही बऱ्याच अंशी संबंध आहे असे लक्षात आलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय, लक्षणं तीव्र म्हणून मृत्यू होईलच असंही नाही. वैद्यकीय व्यवसायातल्या अनेकांना संसर्ग झाला, लक्षणं तीव्र होती, पण ते लोक वाचले. कुणाची किती काळजी घ्यायला लागते, त्यातही काळंपांढरं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करेक्ट. थँक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ताकदवान आणि कमजोर स्ट्रेन्स अस पण कुठंतरी वाचलेलं. त्याचा व्हायरल लोडशी संबंध जोडला येईल काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख छान आहे माहिती पूर्ण आहे.
मराठी भाषेत असल्या मुळे समजायला सोपा आहे.
पण ज्यांचा जीवशास्त्र विषयाशी काही संबंध नाही त्यांना त्याचा गहन अर्थ समजणार नाही.
व्हायर ल लोड म्हणजे शरीरात असणारी व्हायरस ची जास्त संख्या असा सरळ अर्थ आहे पण ही जास्त संख्या कशा वरून ठरते शरीरात जास्त व्हायरस बाहेरून प्रवेश केल्यामुळे की व्हायरस नी शरीरात जावून स्वतःच्या जास्त आवृत्त्या निर्माण केल्या मुळे हे दोन उप प्रश्न उभे राहतात.
दुसरे प्रतिकार शक्ती कोणत्या व्हायरस शी किती ताकतीने लढेल ह्याचे अनुमान कसे काढले जाते एकद्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती क्षय रोगाचं मुकाबला यशस्वी करत असेल तर तीच प्रतिकार शक्ती corona cha pratikar सुद्धा त्याच ताकतीने करेल हे ठरवता येते का? हा पण प्रश्नच आहे.
लेखाचा खोल वर अर्थ त्या क्षेत्रा शी संबंधित नसलेल्या व्यक्तीला समजणार नाही पण महत्वाची माहिती लेखातून जरूर मिळत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायरल लोड म्हणजे सुरुवातीला शरीरात गेलेली व्हायरसची संख्या, किंवा त्याच्या समकक्ष काहीसं. हे किती असतं ते घटना घडताना समजत नाही; नंतर अंदाज घ्यावा लागतो (मूळ लेखातून)।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डॊ अजेय हर्डीकर यांचे आभार. त्यांच्या अनुवादामुळे हा लेख आम्हाला समजला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

CDC चे डिरेक्टर, रॉबर्ट रेडफिल्ड म्हणतात -

"We're not defenseless. This virus has a very significant weakness, it can't swim 7 feet," he said.

कोणाचा काही अंदाज की या मर्यादेचा उपयोग कसा करुन घेता येइल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायरस हा सजीव निर्जीव च्या मधल्या अवस्थेत असतो असे वाचलं आहे .
मग तो कमजोर आहे म्हणून ८ फीट अंतर पेक्षा जास्त अंतर जावू शकत नाही ह्याचा अर्थ काय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो सीमिंगली माईंडलेसली पण सूक्ष्म नैसर्गिक अंतर्प्रेरणेने कदाचित पोहत असेल किंवा निदान तरंगत असेल. म्हणुन म्हटले असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जरा सांगण्याचा प्रयत्न करतो.
सजीव व निर्जीव यांच्या मधील अवस्था : हे विधान सर्व व्हायरसेस च्या बाबतीतील एक सामान्य विधान .हे बरोबरच आहे.
आणि
आणि आठ फूट यांचा संदर्भ ' या' विशिष्ट व्हायरसचा प्रसार कसा होतो 'त्याच्याशी संबंधित.
ज्याच्या शरीरात याचे इन्फेक्शन झाले आहे त्यांच्या नाकातून/तोंडातून सूक्ष्म कणांचा फवारा शिंकताना बाहेर पडतो त्यातून हा व्हायरस आपल्याजवळ /शरीरावर येऊ शकतो .
हा फवारा साधारणपणे सहा ते आठ फुटांच्या हुन लांब जात नसावा म्हणून आठ फूट सेफ असे विधान असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0