करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती अशा प्रकारे निर्माण होते

हा व्हायरस आपण दरवाजे खुले केल्याशिवाय आपणहून आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. आपल्या इम्यून सिस्टिममधलं कोणतं अस्त्र कोव्हिड-१९च्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे? यावर व्हायरॉलॉजिस्ट्स आणि इम्यूनॉलॉजिस्ट्स अहोरात्र काम करत आहेत. मानवाने गेली अनेक दशकं अशा प्रकारचं संशोधन केलं आहे. आतापर्यंतचं उपलब्ध ज्ञान, अनेक तज्ज्ञ, आणि दानशूर व्यक्तींनी पुढे केलेले हात यांच्या जोरावर फार मोठं संशोधन चालू आहे.

टीप : मूळ लेख १० एप्रिलच्या ‘द गार्डियन’मध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्या लेखिका झानिया स्टामाटाकी व्हायरल इम्यूनॉलॉजिस्ट असून त्या बर्मिंगहॅम विद्यापीठात ज्येष्ठ व्याख्यात्या आणि संशोधिका आहेत.
अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर
-----------

Immunity defence - Illustration: James Melaugh/Guardian Design

हवाईदल अधिकाऱ्याची आणि नर्सची मुलगी असल्याने संरक्षणप्रणालींविषयी मला नेहमीच खूप आकर्षण वाटत आलंय. आणि अर्थातच मनुष्यप्राण्यातील संरक्षणव्यवस्था, ज्याला ‘इम्यून सिस्टिम’ (रोगप्रतिकारसंस्था) म्हटलं जातं, तिचा महिमा काय वर्णावा? विविध प्रकारच्या असंख्य रोगजंतूंविरुद्ध तिच्या शस्त्रागारात अनेक प्रकारची शस्त्रास्त्रं आहेत. परंतु त्याचबरोबर व्हायरसेसनेही या सर्वांचा डोळा चुकवून शरीरात आपलं बस्तान बसवायची कला अवगत केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या इम्यून सिस्टिमनेही व्हायरसेसचे गनिमी कावे समजून, त्याविरुद्ध प्रति-डावपेच आत्मसात केले आहेत. कोव्हिड-१९ म्हणजे काय तर ‘लिपिड’चा अंगरखा आणि प्रथिनाचा मुकुट घातलेला एक जनुकीय मटेरियलचा तुकडा.

तर एकूणच आपली इम्यून सिस्टिम व्हायरसेसशी, आणि विशेषतः कोव्हिड-१९शी दोन हात कशी करते? पाचएक महिन्यांपूर्वी मानवाला ज्ञात झालेल्या करोनाव्हायरसला त्याचं नाव मिळालंय ते त्याच्या मुकुटामुळे – लॅटिनमध्ये करोना म्हणजे ‘क्राऊन’. खरं म्हणजे काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या ‘सार्स’ व्हायरसचा हा नातलग आहे असं म्हणता येईल. याच्या प्रथिन आवरणावर अनेक ‘काटे’ असतात. हे काटे आपल्या शरीरातल्या पेशींना जाऊन चिकटतात. कोव्हिड-१९शी साधर्म्य असलेल्या इतर व्हायरसेसबद्दल आपल्याला असलेलं ज्ञान इथे उपयोगी पडत आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हायरस आपण दरवाजे खुले केल्याशिवाय आपणहून आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही.

व्हायरस हा एखाद्या रोबॉटसारखा असतो. तो स्वतःचं पुनरुत्पादन करू शकत नाही त्यामुळे त्याला कच्च्या मालाच्या एखाद्या कारखान्याची गरज असते. हा कच्चा माल म्हणजे प्रथिने, लिपिड्स आणि न्यूक्लिओटाइड्स. हा माल वापरून तो स्वतःच्या ‘कॉपीज्’ तयार करू शकतो. एकदा याचे काटे आपल्या पेशीला (अशा पेशीला ‘टार्गेट सेल’ असं म्हणतात, कारण व्हायरस त्या विशिष्ट पेशींनाच चिकटतो) चिकटले, की मग नवीन व्हायरस कसा तयार करायचा, याच्या सूचना तो त्या पेशीला देतो. या सूचना न्यूक्लिओटाइड्स म्हणजेच ‘आर.एन.ए.’च्या भाषेत लिहिलेल्या असतात. त्यामुळे शरीरात प्रवेश केल्यावरचं व्हायरसचं पाहिलं काम म्हणजे आपला लिपिड सदरा उतरवून ‘आर.एन.ए.’ला कामाला लावणं.

एकदा आपल्या पेशीत घुसखोरी केल्यावर आपल्याच पेशीतली यंत्रसामग्री वापरून हा व्हायरस स्वतःच्या कॉपीज् बनवायची आज्ञा देतो. आपल्या शरीराला शत्रू घुसल्याचा सुगावा लागायच्या आत हे सगळं घडलेलं असतं. पहिल्या हल्ल्यात व्हायरसग्रस्त झालेल्या आपल्या पेशी एका प्रकारे शहीद होतात – त्यांची हाक ऐकणाऱ्या पेशी म्हणजे आपल्या इम्यून सिस्टिममधल्या ‘टी-सेल्स’. या टी-सेल्सना टार्गेट सेलवर चिकटलेले व्हायरसचे सूक्ष्मतम तुकडे लक्षात येतात, आणि त्या थेट जाऊन अनेक ‘विषारी’ एन्झाइम्सच्या साहाय्याने त्या टार्गेट सेल्स मारून टाकतात. टार्गेट सेलच्या या हाराकिरीमागे शरीराचा धूर्तपणा असतो. कारण टार्गेट सेल मेली, तर व्हायरसला स्वतःच्या कॉपीज् बनवणारी साधनसामग्री उपलब्ध होणार नाही. यामुळे ‘व्हायरल लोड’ कमी व्हायला मदत होते. व्हायरसची नीट ओळख होऊन त्याविरुद्ध ॲन्टीबॉडीज्, म्हणजे त्यांना मारक अशी द्रव्यं तयार करायला काही दिवस जावे लागतात. शरीराकडे आणखी एक खुबी असते – ‘मेमरी सेल्स’. एखाद्या व्हायरसची एकदा ओळख झाली, की या पेशी त्याला विसरत नाहीत. त्यामुळे पुन्हा कधी त्याच जातीच्या व्हायरसनं आपल्यावर हल्ला केला, तर आपल्या ॲन्टीबॉडीज् तयारच असतात. कोव्हिड-१९चा व्हायरस नवीन असल्यामुळे आपल्यापाशी संरक्षक अशी ‘मेमरी’ नाहीये. अशा स्थितीत लसीकरण उपयोगी ठरू शकतं. लस म्हणजे त्या त्या व्हायरसचे काही तुकडे – जे व्हायरसची ओळख तर करून देतात, पण विषग्रंथी काढलेल्या सापासारखे निरुपद्रवी असतात. अशा लशीमुळे संरक्षक मेमरी सुदृढ बनते.

लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरातून व्हायरस मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकला जातो. त्यात हा व्हायरस बाधित व्यक्तीला कोणताही त्रास किंवा लक्षणं न जाणवू देण्यात माहीर आहे. एका बाधित व्यक्तीच्या शरीरात व्हायरसच्या अनेक कॉपीज् तयार झाल्या, की दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं जरुरीचं असतं, कारण नाहीतर व्हायरसच्या नव्या पिढ्या तयार कशा होणार? त्याचा वंश तिथेच संपून जाईल. म्हणून मग खोकल्याच्या किंवा नाकातील स्रावाच्या सूक्ष्म कणांवर आरूढ होऊन हा व्हायरस इकडून तिकडे जातो. शरीराबाहेर त्याचं अस्तित्व काही काळ टिकून असतं, हे आता सर्वांना माहीत झालंय. हा व्हायरस काही प्राण्यांमध्येही आढळून आला आहे. कोणताही प्राणी दगावल्याचं जरी पुढे आलं नसलं, तरी बाधित प्राण्यांकडून व्हायरस पुन्हा मनुष्याच्या शरीरात घुसू शकतो का, हे अजून माहीत नाहीये.

कोव्हिड-१९मुळे झालेल्या मृत्यूंकडे पाहिलं, तर अंदाज बांधता येतो, की सुदृढ इम्यून सिस्टिम या व्हायरसला बऱ्यापैकी रोखू शकते. पण वयामुळे किंवा अन्य कारणांमुळे कमकुवत झालेली इम्यून सिस्टिम मात्र फार काही प्रतिकार करू शकत नाही. हा व्हायरस आपण त्यासाठी दरवाजे खुले केल्याशिवाय शरीरात शिरू शकत नसल्यामुळे, चेहऱ्याला हात न लावणं, आणि हात स्वच्छ धुणं याला फार महत्त्व आहे.

सुदृढ शरीर साधारणपणे दोन आठवड्यात व्हायरसला आटोक्यात आणू शकतं. पण आपल्या शरीराकडे असलेल्या अस्त्रांपैकी नेमकी कोणती या कमी येतात हे नीटसं ज्ञात नाहीये. काही लशी ॲन्टीबॉडीज् तयार करतात, तर काही लशी ताकदवान मेमरी टी-सेल्स बनवतात. व्हायरस शरीरात घुसल्यावर तीन ते चार दिवसात ॲन्टीबॉडीज् आढळून येतात, पण दुसऱ्यांदा इन्फेक्शन झालं तर त्या कामी येतात का? सार्स- किंवा मर्सविरुद्धच्या ॲन्टीबॉडीज् एक ते तीन वर्षांपर्यंत टिकून राहतात हे आपल्याला माहित आहे. पण हा व्हायरस नवीन असल्यामुळे त्याच्या बाबतीत काय घडेल हे इतक्यात सांगता येणार नाही. ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने १६,००० ते २०,००० स्वयंसेवक अशा प्रकारच्या संशोधनासाठी हाताशी धरले आहेत. महिन्यातून एकदा, असं वर्षभर या स्वयंसेवकांमधल्या ॲन्टीबॉडीज् मोजल्या जाणार आहेत. या अभ्यासातून उपरोक्त प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. या ॲन्टीबॉडीजचा ‘दर्जा’ काय आहे, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

आपल्या इम्यून सिस्टिममधलं कोणतं अस्त्र कोव्हिड-१९च्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे? ‘सायटोटॉक्सिक टी-सेल्स’ हे कदाचित उत्तर असू शकेल. सायटोटॉक्सिक म्हणजे पेशीला मारक. कोव्हिड-१९विरुद्ध दीर्घकाळ संरक्षण देऊ शकेल अशी लस बनविण्यावर व्हायरॉलॉजिस्ट्स आणि इम्यूनॉलॉजिस्ट्स अहोरात्र काम करत आहेत. मानवाने गेली अनेक दशकं अशा प्रकारचं संशोधन केलं आहे. आतापर्यंतचं उपलब्ध ज्ञान, अनेक तज्ज्ञ आणि दानशूर व्यक्तींनी पुढे केलेले हात यांच्या जोरावर फार मोठं संशोधन चालू आहे. देवीसारखा भयानक, प्राणघातक रोग आपण नामशेष केल्याला जवळजवळ पन्नास वर्षं होत आली आहेत. हा लसीकरणाचाच विजय होता. दुसरीकडे हेपॅटायटिस-सीचं उदाहरण आहे – यावरचं औषध व्हायरसला आपलं जनुकीय मटेरियल यजमान पेशीत शिरूच देत नाही. तात्पर्य, व्हायरसशी मुकाबला करायला वेगवेगळे डावपेच उपयोगी ठरू शकतात.

संशोधन हे आपलं मुख्य अस्त्र आहे. या संशोधनात परस्परसहकार्य खूप महत्त्वाचं आहे. पण जोपर्यंत उपयुक्त लस किंवा औषध आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत स्वतःचा आणि आप्तेष्टांचा बचाव करण्यावरच जोर द्यावा लागणार आहे – रुग्णांचं विलगीकरण, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, आणि स्वच्छता. जर आपल्यापैकी प्रत्येकानं खारीचा वाटा उचलला, तर सध्या जगाला वेठीस धरणाऱ्या या चिमुकल्या व्हायरसवर मात करणं काही तितकंसं अवघड नाही.
--------------------------

(अनुवादक पुण्यातील एका नामवंत वाहननिर्मिती कंपनीतून वैद्यकीय अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.)

निवेदन : सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे. प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

मूळ लेखाचा दुवा

© 2020 Guardian News & Media Limited or its affiliated companies.
This translation and the image accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बरंच गुंतागुंतीचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. उत्तम माहिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शरीराला, खूपच प्रगल्भ अशी सुरक्षायंत्रणा लागते की. किती रोचक आहे हे सगळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शरीराकडे आणखी एक खुबी असते – ‘मेमरी सेल्स’. एखाद्या व्हायरसची एकदा ओळख झाली, की या पेशी त्याला विसरत नाहीत. त्यामुळे पुन्हा कधी त्याच जातीच्या व्हायरसनं आपल्यावर हल्ला केला, तर आपल्या ॲन्टीबॉडीज् तयारच असतात.>>>>>>हे मेमरी सेल्स नेमक काय प्रकरण आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेख आवडला. अनुवादासाठी खूप धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करोनातून बरे झालेल्या लोकांच्या प्रतिकारशक्तीबद्दल -
'No Evidence' Yet That Recovered COVID-19 Patients Are Immune, WHO Says

As of Friday, the WHO said, "No study has evaluated whether the presence of antibodies to SARS-CoV-2 confers immunity to subsequent infection by this virus in humans."

सार्स-कोव्ह-२ असं नाव असणाऱ्या ह्या रोगातून (नवा करोनाविषाणू, किंवा कोव्हिड-१९ विषाणू) बऱ्या झालेल्या लोकांत विषाणूसाठी प्रतिजैविकं (antibodies) तयार झालेली असतील ह्याचा काही अभ्यास झालेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.