ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ७
प्रकरण ७ – आयुर्वेदाची औषधे - भाग २
सुधीर भिडे
आधुनिक वैद्यकासाठी पुराव्यांवर आधारित माहितीसाठा तयार केला जातो. आयुर्वेद क्षेत्रानेही अशा प्रकारचे विदागार (डेटाबेस) तयार करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या आयुश पोर्टलवर आतापर्यंत ४० हजार शोधनिबंध अपलोड करण्यात आले आहेत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी
***
विषयाची मांडणी
- प्राचीन मोजमाप पद्धती
- या आजाराला हे औषध
- आयुर्वेदाची औषधे दुष्परिणामविरहित असतात का?
- आयुर्वेदिक औषधे आणि ॲलोपाथिक औषधे – तुलना
- आयुर्वेदिक औषधांच्या किंमती
- आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन
- RCT करण्यातल्या अडचणी
- शास्त्रीय संशोधन पद्धतीचा अवलंब
- समालोचन
***
प्राचीन मोजमापपद्धती
माहिती खालील लेखातून घेतली आहे
Mana Paribhasha - Ayurvedic System of Weights and Measures
मान म्हणजे मोजमाप. पूर्वीच्या काळात दोन प्रकारची मोजमापे वापरात होती असे दिसते – मगध मान (चरकाने वापरले असे सांगितले जाते) आणि कलिंग मान (सुश्रुताने वापरले असे सांगितले जाते).
मगध मानाची काही उदाहरणे –
वजनाचे माप
३० परमाणु = ०.०५ मिलीग्रॅम
४ याव = १२५ मिलीग्रॅम
४ माश = ३ ग्राम
२ कर्ष = २४ ग्रॅम
२ द्रोण = २४.५७६ किलोग्रॅम
द्रव पदार्थाचे आकारमान
८ बिन्दू, ३२ बिन्दू, ६४ बिन्दू
लांबीचे माप
यवोदरा = ०.२४ से.मी., अंगुल- १.९५ से.मी.
हस्त – ४५.७२ से. मी., व्याम = १८२.८८ से. मी.
वेळाचे माप
क्षण = ०.४ सेकंद, निमिष = १.५ सेकंद
काल = २ मिनिट २० सेकंद, यम = ३ तास
पक्ष = १५ दिवस
गरमीचे मोजमाप
मंद अग्नी, तीक्ष्ण अग्नी
या मोजमापांविषयी काही टिप्पणी आवश्यक आहे. प्राचीन मापाचे समतुल्य आधुनिक माप दिले आहे. आधुनिक माप second decimal place अचूकतेपर्यंत दिले आहे. यावरून एक गैरसमज होऊ शकतो की जुने माप इतके अचूक होते. हे अर्थातच खरे नाही. त्या अचूकतेपर्यंत मोजमापे करण्याची साधने त्या काळात नव्हती. मग हे कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाले आहे हे सांगणे कठीण आहे. एक निमिष म्हणजे १.५ सेकंद हे लिहिणे एक आणि सेकंदाचा अर्धा भाग मोजणे निराळे. आजच्या काळात analytical balance मिळतो; त्याची अचूकता ०.१ मिलिग्रॅम एवढी असते. दोन हजार वर्षांपूर्वी भारतात असे तराजू वापरले जायचे असे मानावे का? हे विधान आम्ही त्या काळी विमाने बनवित होतो त्याच श्रेणीचे विधान झाले.
आज आपण जेव्हा मोजमापांचा विचार करतो तेव्हा मीटर लांबीची सळई आणि एक किलोग्रॅम वजनाचा एक ठोकळा पॅरिसमध्ये ठरावीक तापमानाला ठेवलेले आहेत. त्यांची एक प्रतिकृती दिल्लीत आहे. त्यांच्या तुलनेत आपण वजने आणि मीटर वापरतो. अशी कोणती व्यवस्था त्या काळी होती?
या मोजमापांचा उपयोग अर्थातच औषधे बनविण्यासाठी होत असे.
या आजाराला हे औषध
ॲलोपाथीप्रमाणे आयुर्वेदात या आजाराला हे औषध असा प्रकार नसतो. रोग्याची प्रकृती आणि त्रिदोष पाहून औषध द्यायचे असते. दुर्दैवाने आजच्या काळात आयुर्वेदाचे वैद्य या आजाराला हे औषध असे औषध देताना दिसतात. आयुर्वेदाचा वापर करताना ॲलोपाथीची विचारसारणी लागू करून चालणार नाही. परंतु ॲलोपाथीच्या प्रभावाने आज आयुर्वेदाचे वैद्य तशा प्रकारे उपचार करताना दिसतात. आयुर्वेदाचा विचार येथे दिसत नाही.
संदर्भ – Much of Ayurveda's 'Irrationality' Originates Within the Ayurvedic Community, हा लेख Science, the Wire या साइटवर २३ जानेवारी २०२१ला प्रसिद्ध झाला. लेखिका श्यामा राजगोपाल.
आयुर्वेदाच्या औषधांची माहिती देणारी दोन पुस्तके वाचनात आली.
संपूर्ण आरोग्यवर्धिनी, लेखक वैद्य खडीवाले. डायमंड पब्लिकेशन्स २०१७
आयुर्वेदीय औषधे, लेखक वैद्य खडीवाले, वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था, १९९२.
ही पुस्तके वाचून काही प्रश्न मनात येतात –
'या रोगाला हे औषध', असा आयुर्वेदात विचार नाही हा उल्लेख वर आला आहे. त्याला या पुस्तकात मान्यता दिसत नाही. औषधांची नावे, ती औषधे तयार करण्यात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, औषधे तयार करण्याची पद्धत, आणि ते औषध कोणत्या आजारावर दिले जाते याची माहिती या पुस्तकात आहे. यावर महाराष्ट्रात तरी सर्व मान्यता आहे?
संपूर्ण आरोग्यवर्धिनी या पुस्तकात काहीही संदर्भ नाहीत. ‘तज्ज्ञाचे मत’ या प्रकारात हे पुस्तक जाते. अशा लिखाणाची विश्वासार्हता कमी होते. आयुर्वेदीय औषधे या पुस्तकात दिलेल्या औषधांच्या Randomised Controlled Trialsचा उल्लेख नाही त्यामुळे त्या औषधांचा उपयोग हे एक वैयक्तिक मत होते.
आयुर्वेदाची औषधे दुष्परिणामविरहित असतात का?
आयुर्वेदाच्या औषधांबद्दल सांगितले जाते की ॲलोपाथीच्या औषधांप्रमाणे या औषधांचे काही दुष्परिणाम नाहीत. हे कितपत खरे आहे? Much of Ayurveda's 'Irrationality' Originates Within the Ayurvedic Community, Science, the Wire, २३ जानेवारी २०२१. लेखिका श्यामा राजगोपाल. या लेखात उद्धृत केलेली काही उदाहरणे –
एका व्यक्तीने बरेच महिने तुळशीची पाने टाकून उकळलेले पाणी रोज प्यायले. काही महिन्यांनी व्यक्तीच्या सांध्यात रक्तस्राव होऊ लागला.
Averrhoa bilimbi हे फळ कोलेस्टेरोल कमी करते असे सांगण्यात येते. या फळाच्या अतिसेवनाने मूत्रपिंडे खराब होतात.
– डॉ. ॲबी अब्राहम, कोचीमधील मूत्रपिंडतज्ज्ञ
Irrational prescriptions are precisely the reason we see a lot of people turn to modern medicine after Ayurveda treatment fails, and [which] also lead to toxicity problems. A majority of practitioners are into trial-and-error methods – which means prescribing five or six or even up to ten medications at a time.
डॉ. कृष्णन
कर्करोगतज्ज्ञ डॉ. गंगाधरन सांगतात की त्यांच्याकडे कर्करोगग्रस्त व्यक्ती येतात आणि इलाज चालू करतात. मग रोगी नाहीसे होतात आणि काही महिन्यांनंतर रोगी परत येतात; चौकशी करता कळते की मध्यंतरी त्यांनी आयुर्वेदाचे इलाज केले होते. परंतु तोवर कर्करोग खूप पसरलेला असतो.
Abby Philips’s battle against Ayurveda started in 2017 when a group of teetotalers (people who do not drink alcohol) showed up with all the symptoms of alcohol-induced liver failure. With a diagnosis of exclusion, Abby and his team found that Ayurveda pills were the cause. Since then, he has made it his mission to educate the masses about the harmful effects of pseudoscientific 'medicine'.
"There’s an idea that herbal [medicine] is safe and even if it’s not effective, it’s not harmful. This is what I want to change," Abby says
27 December, 2022, The Print.
इंग्लंडमध्ये सप्टेंबर २०२२ या महिन्यात इनसायडर मासिकात एक बातमी आली. एका ३७ वर्षीय गुजराती महिलेला संधिवाताचा त्रास होत होता. त्या स्त्रीने लंडनमधील एका आयुर्वेदिक डॉक्टराकडून औषधे घेतली. काही महिन्यांतच यकृताच्या आजाराने त्या स्त्रीचा मृत्यू झाला. कोर्टाने महिलेच्या मृत्यूचे कारण आयुर्वेदिक औषधे हे ठरविले.
आयुर्वेदिक औषधे आणि ॲलोपाथिक औषधे – तुलना
ॲलोपाथिक औषधांची सुरुवात अनुमानधपक्यानेच झाली. कोणत्या आजाराला अमके औषध का, याला काही तार्किक आधार नसे. जशी ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी या शास्त्रांत प्रगती झाली तसे हळूहळू कोणता आजार कशामुळे होतो हे समजू लागले. मग त्यावर औषध शोधणे सोपे झाले. सध्याच्या शास्त्रीय वैद्यकाच्या औषधात एक विशिष्ट रेणू (मॉलेक्युल) असतो. वेध घेऊन बाण सोडल्याप्रमाणे हे औषधाचे रेणू विशिष्ट प्रकारच्या पेशींवर काम करतात. प्रत्येक रेणू बनविण्याची निश्चित रासायनिक प्रक्रिया असते. त्यामुळे कोणीही तो रेणू बनविला तर परिणाम तोच मिळणार.
आयुर्वेदिक औषधे वनस्पतीपासून बनविलेली असतात. त्यात पन्नास प्रकारचे रेणू सहज असतात. जर औषधाने काम केलेच तर कोणत्या रेणूने, का काम केले हे सांगणे अशक्यच असते.
आयुर्वेदाला शास्त्रीय पाया द्यायचा असेल तर प्रत्येक औषधात किती प्रकारचे रेणू असतात आणि प्रत्येक रेणूचे काय प्रमाण- टक्केवारी आहे हे ठरविणे ही चांगली सुरुवात होईल. अशा कामाला सुरुवात झाली असेल तर ते चांगलेच आहे.
औषधांच्या वेष्टनावर जे लिहिलेले असते त्यावरून आयुर्वेद आणि ॲलोपाथी यांच्यातील औधधांची तुलना कशी होते ते पाहू. एक आयुर्वेदिक औषध खोकल्यावरचा काढा आहे. बाटलीवर proprietary medicine असे लिहिले आहे. याचा अर्थ हे औषध classical medicine या प्रकारात बसत नाही. तेव्हा या औषधाची RCT झाली असली पाहिजे. पण असे झाले असेल असे वाटत नाही. या औषधात तीन वनस्पती वापरल्या आहेत. ज्येष्ठीमध २० ग्राम, कंकोला २.५ ग्रॅम आणि काळी मिरी २.५ ग्रॅम यांचा अर्क दर शंभर ग्रॅम मागे असे लिहिले आहे.
दुसरे औषध च्यवनप्राश. याच्या वेष्टनावर असे लिहिले आहे की हे औषध घेतल्याने रोगप्रतिकारक क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढते. अजूनही ॲलोपथीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता मोजण्याकरिता काही मोजपाम आलेले नाही. यापुढे जाऊन असे लिहिले आहे की रोगप्रतिकारक क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढते, हे क्लिनिकली प्रमाणित आहे. असे लिहिणे किती अयोग्य आहे हे आपण समजू शकतो. आता या औषधात काय आहे? वेष्टनावर लिहिल्यानुसार –
३६ औषधी वनस्पतींचा अर्क, प्रत्येकी ०.३९६ ग्रॅम याप्रमाणे घ्यावा. ९० ग्रॅम आवळा, ६० ग्रॅम साखर आणि चार ग्रॅम मध याचा मुरंबा करावा. यात वरील वनस्पतींचा अर्क घालावा. यात दहा पदार्थांची प्रत्येकी ०.१ ग्रॅम भुकटी घालावी की च्यवनप्राश तयार झाले.
तिसरे औषध – शिलाप्रवंग. हे औषध शुक्रगणना कमी झाल्यास किंवा पुरुषांना वंध्यत्व आल्यास देण्यात येते. या औषधाच्या एका गोळीत याप्रमाणे पदार्थ असतात – शिलाजित ४० मिग्रॅ, प्रवाळ २० मिग्रॅ, वांग भस्म २० मिग्रॅ, सुवर्णमक्षिक भस्म २० मिग्रॅ, गुडूची सत्त्व २० मिग्रॅ, अश्वगंधा ६० मिग्रॅ, शतावरी १५ मिग्रॅ, गोक्षुर १५ मिग्रॅ, अमळकी १५ मिग्रॅ, आकारकारभ १० मिग्रॅ, जायफळ ५ मिग्रॅ, कापूर ५ मिग्रॅ, लताकस्तुरी बीज २० मिग्रॅ, क्रौंच बीज ९० मिग्रॅ, मकरध्वज १० मिग्रॅ, सुवर्ण भस्म १ मिग्रॅ, मौक्तिक पिष्टी १ मिग्रॅ.
सुवर्णमाक्षिक भस्म म्हणजे काय फसवणूक आहे ते आपण मागच्या भागात पाहिले आहे.
यानंतर ॲलोपाथीच्या काही औषधांच्या वेष्टनावरच्या नोंदी पाहू. पहिली दोन औषधे कॅल्शियम सप्लिमेंट आहेत. कॅल्शियम देणारे रासायनिक संयुग (chemical compound) कोणते आणि एका गोळीत ते किती मात्रेत आहे ते लिहिले आहे. ड जीवनसत्त्व सोबत असले तर कॅल्शियम रक्तात अधिक घेतले जाते. यासाठी दोन्ही औषधांत ड जीवनसत्त्वही आहे.
कलिजोय – एच डी - calcium citrate – 1250 mg, vitamin D3 – 1000 IU
शेल कल - calcium carbonate – 1250 mg, vitamin D3 – 250 IU
टेलिमिकाइंड हे औषध रक्तदाब नियंत्रणासाठी वापरले जाते. या औषधात तेलमीसारटन हे एकाच संयुग आहे; आणखी काही नाही. टेलिमिकाइंड ८० – telmisartan 80 mg
हायफेनाक हे औषध वेदनाशमनासाठी वापरात येते. असिक्लोफेनक या संयुगाशिवाय या औषधात दुसरे काही नाही. हायफेनाक – aceclofenac – 100 mg.
आता या दोन वैद्यकीय प्रणालींतील फरक पाहू.
ॲलोपाथीच्या औषधांच्या वेष्टनावर औषध कशासाठी वापरायचे ते लिहिलेले नसते. (ॲलोपाथीची वर लिहिलेली ही औषधे कशासाठी वापरली जातात हे मी माझ्या माहितीप्रमाणे लिहिले आहे.) कारण औषध कोणते आणि किती घ्यायचे ते डॉक्टर ठरवितात. बहुतेक आयुर्वेदिक औषधांवर ते औषध कशासाठी आहे ते लिहिलेले असते.
ॲलोपाथीच्या औषधांत एक किंवा दोन संयुगे असतात. आयुर्वेदाच्या औषधात पाच-पन्नास संयुगे सहज असतात.
ॲलोपाथीची औषधे RCT पास झालेली असतात. आयुर्वेदाच्या औषधांना RCT नाही.
आयुर्वेदिक औषधांच्या किंमती
शास्त्रीय वैद्यकाची औषधे बऱ्याच संशोधनानंतर शोधली जातात. असे संशोधन काही वर्षे चालू असते. त्यावर दहा-वीस शास्त्रज्ञ काम करीत असतात. त्यानंतर या औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स होतात. त्यावेळी औषध नाकारण्याची शक्यता असते. नव्या औषधाचे पेटंट घेण्यात येते. पेटंटची प्रक्रिया खर्चिक असते. त्यानंतर ते औषध दुसऱ्या कोणा कंपनीस बनवायचे असेल तर लायसन्स फी द्यावी लागते. ते औषध देशात आयात होत असेल तर आयात कर असतो.
वरील सर्व प्रक्रिया आयुर्वेदिक औषधांस लागू होत नाही. तरीही आज आपण पाहतो की आयुर्वेदिक औषधे शास्त्रीय वैद्यकासारखीच महाग असतात. याचे एकच कारण असू शकते औषध कंपन्या अचाट पैसा करीत आहेत. पतंजली कंपनीने २००८ साली उत्पादन चालू केले. बारा वर्षात त्यांची विक्री १००० कोटींच्या वर गेली. आज कोणत्याही इंजिनीअरिंग कंपनीला अशा तऱ्हेची वाढ शक्य नाही.
यावरून कोणी असा समज करून घेऊ नये की शास्त्रीय वैद्यकाच्या औषधांच्या किमती योग्य आहेत असे मी म्हणत आहे. फार्मास्युटिकल कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण अचाट असते.
आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन
आपल्या ब्रँडनावाचे आयुर्वेदिक औषध उत्पादन करणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त कंपन्या आहेत. याशिवाय औषधे बनविणाऱ्या एक हजाराहून अधिक कंपन्या आहेत. लघु उद्योग दर्जाच्या किती कंपन्या आहेत हे ठाऊकच नाही. या कंपन्यांची शेकडो उत्पादने बाजारात आहेत.
आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीची जाहिरात टाईम्स ऑफ इंडियाच्या २० ऑक्टोबरच्या पहिल्या पानावर, पूर्ण पान भरून आली होती. याचा काय खर्च आला असेल याची आपण कल्पना करू शकतो. या जाहिरातीविषयी काही विचार – जाहिरातदारानुसार त्यांची उत्पादने – backed by science असून extensive R&D करून बनलेली असतात. हल्ली बऱ्याच आयुर्वेदाच्या औषधांच्या जाहिरातीत असे शब्द असतात. असे म्हणणे किती चूक आहे ते आपण वरच्या तीन भागांत पाहिले आहेच. दुसरा भाग म्हणजे आयुर्वेदाच्या उत्पादनाला आता wellness product असे संबोधिले जात आहे. जर या उत्पादनाला औषधे म्हणायचे नाही तर औषधांच्या मागे जो काटेकोरपणा जरूर आहे तो संपला. याशिवाय चार लाख डॉक्टर्स या कंपनीबरोबर सहकार्य करतात आणि कंपनीचे wellness products विकण्यात मदत करतात असे स्पष्टपणे लिहिले आहे. ॲलोपाथीचे डॉक्टर आणि औषधकंपन्या यांचे साटेलोटे याविषयी आपण सातत्याने वाचत असतो. या जाहिरातीत हा प्रकार दडवून ठेवण्याची गरजही या कंपनीला वाटत नाही.
RCT करण्यातील अडचणी
(Brazilian Journal of Pharmacognosy, 20(2): 276-281, Abr./Mai. 2010, Problems associated with clinical trials of Ayurvedic medicines
Ashish K Sharma, Rajesh Kumar, Anurag Mishra Rajiv Gupta या लेखातून माहिती घेतली आहे.
- एकाच रंगाचे, एकच घनता आणि वास असणारे प्लासिबो तयार करणे अवघड आहे.
- आयुर्वेदिक औषधांची साठवणूक केली तर औषधांचे गुणधर्म बदलतात; याशिवाय औषधात विषाणूंचा प्रादुर्भाव शक्य असतो.
- आयुर्वेदिक औषधांत बऱ्याच वनस्पतींचे सार असते. या प्रमाणाचे अजून आवश्यक तेवढे प्रमाणीकरण झालेले नाही.
- बऱ्याच रोग्यांना एकाच कारणासाठी एकच औषध देणे हे आयुर्वेदाच्या ‘प्रकृतीप्रमाणे औषध’ या तत्त्वाला छेद देते.
- बऱ्याच वेळेला औषधाबरोबर इतर चिकित्सा पद्धतींचा वापर होतो. फक्त औषधानेच इलाज होत नाही.
- एकच वनस्पती जेव्हा निरनिराळ्या भौगोलिक क्षेत्रात उगवते तेव्हा त्यातील रासायनिक गुणधर्मांत फरक पडतो.
- बरीच आयुर्वेदिक औषधे काही महिने घेणे आवश्यक असते. अशावेळी RCT करणे शक्य होत नाही.
शेवटी लेखक मान्य करतात -
As a function of such difficulties, few herbal drugs have been studied adequately but well-controlled double-blind clinical trials to prove their safety and efficacy have been lacking.
आयुर्वेदिक औषधांची क्लिनिकल ट्रायल करणे किती अवघड आहे हे खालील निबंधात नमूद केलेल्या प्रयोगावरून दिसते. ३० व्यक्तींना ३० दिवस नस्य चिकित्सा दिली. याचा अर्थ या तीस व्यक्तींनी तीस दिवस रोज एक ते दीड तास या चाचणीसाठी द्यायचा. असे किती रोगी आपला असा वेळ देतील?
(CLINICAL STUDY ON EFFECT OF DIFFERENT PROCEDURES OF NASYA WITH BHRINGARAJA TAILA IN KHALITYA, RAJANI THANKAN, VASANT PATIL, PRASANNA AITHAL, Published by Atreya Ayurveda Publications, Ilkal-587125 (India) : 26/04/14)
शास्त्रीय संशोधन पद्धतीचा अवलंब
या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण संशोधकांनी शास्त्रीय संशोधन पद्धतीचा अवलंब करून संशोधनाला सुरुवात केली आहे. ही फार स्तुत्य प्रगती आहे. खालील शोधनिबंधात हे दिसून येते. या निबंधात एक गोष्ट जाणवते ती ही आधुनिक investigative techniquesचा पूर्णपणे वापर करण्यात आला आहे. एक आयुर्वेदिक औषध हाडांचा ठिसूळपणा कमी करू शकते का याचा उंदरांवर अभ्यास करण्यात आला. हे औषध नीम, पटोला, कंटकारी, गुडूची आणि वसा या पाच वनस्पतीने बनलेले असते. प्रयोगाच्या शेवटी औषध उपयोगी आहे असा निर्णय काढण्यात आला.
Does Panchatikta ghrita have anti-osteoporotic effect? Assessment in an experimental model in ovariectomized rats
Renuka Munshi, Samidha Joshi, Falguni Panchal, Dipti Kumbhar,
Pradip Chaudhari ; Journal of Ayurveda and Integrative Medicine 12 (2021) 35e42
समालोचन
आपण वारंवार हे ऐकतो की आयुर्वेदाच्या औषधांचे दुष्परिणाम नसतात. आपण पाहिले की हे पूर्ण सत्य नाही. काही औषधे बऱ्याच काळासाठी घेतली तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
ॲलोपाथीची औषधे आणि आयुर्वेदाची औषधे यांची तुलना केल्यास दिसते की ॲलोपाथीच्या औषधांत एक किंवा दोन संयुगे असतात. आयुर्वेदाच्या औषधांत पाच-पन्नास संयुगे सहज असतात. ॲलोपाथीची औषधे RCT पास झालेली असतात. आयुर्वेदाच्या औषधांना RCT नाही.
आज एक हजारपेक्षा जास्त कंपन्या आयुर्वेदिक औषधे बनवीत आहेत. या औषधांचे गुणवत्ता नियंत्रण हा मोठा प्रश्न आहे, (हाच प्रश्न ॲलोपाथीच्या औषधांबाबतीतही उभा आहे.) आयुर्वेदाच्या औषधांच्या इतक्या जास्त किंमती ही न समजणारी बाब आहे. आयुर्वेदाच्या औषधांना संशोधनाचा खर्च नाही. आयुर्वेदाच्या औषधांना RCT नाही. या औषधांना कोणती लायसन्स फी नाही. तरीही किमती फार आहेत.
आयुर्वेदाच्या औषधांच्या RCT हा मोठा प्रश्न आहे, ॲलोपाथीच्या औषधांप्रमाणे आयुर्वेदाच्या औषधांच्या RCT सोप्या नाहीत.
(क्रमशः)
***
भाग १ – शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ – ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ – आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ – आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ – परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ – आयुर्वेदाची औषधे – भाग १
आणखी एक (हिंदुस्थानी) चावटपणा...
वगैरे वगैरे...
आता,
विक्स वेपोरब हे (कोठल्याही फार्मसीमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारे) औषध सामान्यत: सर्दीपडशापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी वापरले जाते. (सर्दीला 'औषध' असे नाही; ती होते तशीच बरीही होते, औषधे फक्त त्रास कमी करतात; परंतु ही बाब तूर्तास सोडून देऊ.)
या औषधाच्या RCT झाल्या आहेत, किंवा कसे, याबद्दल मला कल्पना नाही. परंतु, येथे तो मुद्दा नाही.
हे औषध प्रॉक्टर अँड गँबल या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीचे उत्पादन आहे. जगभरात अनेक देशांतून मिळते, तसेच जगभरात अनेक देशांत प्रॉक्टर अँड गँबलच्या स्थानिक कंपन्यांतून त्याचे उत्पादनही होते.
येथे यूएसएत मिळणारे विक्स वेपोरब हे अमेरिकेतील प्रॉक्टर अँड गँबल कंपनी बनविते. भारतात मिळणारे विक्स वेपोरब भारतातील प्रॉक्टर अँड गँबल कंपनी बनवते. फॉर्म्युला सेम टू सेम, काहीही फरक नाही. दर्जातदेखील फरक नाही. किमतीत फरक अर्थातच आहे, परंतु त्यास अमेरिकी बाजार आणि भारतीय बाजार यांच्यातील फरक कारणीभूत आहे, आणि येथे तोही मुद्दा नाही.
इथवर ठीक. चावटपणा यापुढे सुरू होतो.
अमेरिकन विक्स वेपोरबच्या बाटलीवरील घटकांची यादी वाचल्यास, मेंथॉल वगैरे घटक दिसून येतात. तीच भारतीय विक्स वेपोरबच्या बाटलीवरील घटकांची यादी वाचल्यास, त्याच घटकांची 'भारतीय'/'आयुर्वेदिक' नावे ('मेंथॉल'च्या जागी 'पुदिना के फूल' वगैरे, इंग्रजीतून/रोमन लिपीतून) लिष्टिलेली असतात, आणि त्याउपर बाटलीवर 'आयुर्वेदिक मेडिसीन' असेही ठोकून दिलेले असते.
(हे बहुधा गेल्या काही वर्षांत होऊ लागले असावे. माझ्या लहानपणी भारतात मिळणाऱ्या विक्स वेपोरबच्या बाटलीवर 'मेंथॉल' वगैरे असेच लिहिलेले असे, आणि 'आयुर्वेदिक मेडिसीन' असेही ठोकून देण्याची प्रथा तेव्हा नव्हती. आणि, हो, ते विक्स वेपोरबदेखील भारतातच बनलेले असे; अमेरिकेतून आयात होत नसे.)
आता, यावरून काही प्रश्न पडतात:
१. प्रॉक्टर अँड गँबल ही अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आयुर्वेदिक औषधे कधीपासून बनवू लागली?
२. प्रॉक्टर अँड गँबलने भारतात बनविलेले 'आयुर्वेदिक' विक्स वेपोरब, त्याऐवजी जसेच्या तसे अमेरिकेत बनवून अमेरिकेत विकले, तर लगेच बिगर-आयुर्वेदिक कसे बनते?
(या रेटने, कोकाकोलाच्या घटकांची यादी 'शर्करा' (साखर), 'कषायार्क' (कॅफीन) वगैरे वगैरे करून, कोकाकोला हेसुद्धा 'आयुर्वेदिक पेय' म्हणून खपवता येईल. विकणारे विकतील, आणि विकत घेणारे विकत घेतीलसुद्धा. चालायचेच.)
----------
अवांतर: या धाग्यावर या संदर्भात अधिक (आणि रोचक) माहिती मिळाली.
स्पॉट ऑन
पाठदुखी, तात्कालिक स्नायुदुखीवर सर्रास वापरले जाणारे प्रचंड खपाचे अजून एक औषध/मलम/स्प्रे म्हणजे मूव्ह.
तर मूव्ह हे आयुर्वेदिक औषध आहे असं स्पष्ट लिहिलेले असते. चक्क रेफरन्स म्हणून 'भाव प्रकाश' असंही लिहिलं आहे.
आधी हे आयुर्वेदिक औषध आहे हे डोळ्यांवर येण्याइतके मोठे छापले नसायचे. किंबहुना हे आयुर्वेदिक 'नाही' असं सांगावं लागे कारण आयुर्वेदिक औषधे तत्त्काळ परिणाम करत नाहीत, ती स्लो असतात असा सार्वत्रिक समज असे. आणि तुम्हाला वीस सेकंदात जर रिलिफ हवी असेल तर आयुर्वेदिक औषधांना पण आयुर्वेदिक नसण्याचा भास तयार करावा लागे. पण अलिकडच्या वेष्टनांत/जाहिरातींत हे ढळढळीत छापले जात आहे. मार्केट सेंटिमेंट्स बदलल्या आहेत.
मला वाटतं, हा मार्केटिंग गिमिक + आयुष औषधांना मिळणाऱ्या सवलती या दोघांचा सुवर्णमध्य साधण्यासाठी मुद्दाम घेतलेला निर्णय आहे. विशेषत: पतंजलीसारखी प्रचंड तगडी संस्था तिची निम्मी उर्जा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरूद्ध थेट मार्केटिंग करण्यात खर्च करते तेव्हा असं करणं मूव्ह सारख्या उत्पादनांना आवश्यकच आहे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
थोडक्यात…
…‘आयुर्वेदिक’ या लेबलास ‘चुलीवरचा(/ची/चे) गावरान’ याहून अधिक मतलब नाही तर.
मार्केटिंग गिमिक नुसते.
मूव हे असेच आहे जसे
मूव हे असेच आहे जसे यूनिलिव्हरचे वेद शक्ति टुथपेष्ट. बाकी पतंजलि विज्ञापन वर फारच कमी खर्च करते. पतंजलिची औषधी आयुष द्वारा प्रमाणित असतात. पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूट देशातील सर्वात मोठ्या लॅब पैकी एक आहे. जिथे 500 वैज्ञानिक कार्यरत आहे. इथे सेल पासून ते अॅनिमल ट्रायलची सुविधा आहे. पतंजलि फूड पार्कचा 70 टक्के नफा फक्त रिसर्च वर खर्च होतो. अधिकान्श औषधी अनुसंधान आधारित आहे आणि प्रभाव कारी आहे. याचा प्रत्यय करोंना काळात देशातील जनतेला आला याच औषधांने लाखो लोकांचे प्राण वाचविले. पतंजलिचे शिक्षण संस्थान एक दिवस ही बंद झाले नाही की फूड पार्क ही एक दिवस बंद झाला नाही. फक्त सहा वर्षांत त्यांचे रिसर्च जागतिक दर्जाच्या मोठ्या रिसर्च जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहे.
अधिकान्श आयुर्वेदिक निर्मात्यांजवळ शास्त्रीय पद्धतीने औषधी निर्माण करण्याची सुविधा नाही आहे, कारण सरकार 95 टक्के बजेट फक्त एलोपैथि विकासावर खर्च करते. आयुर्वेदिक शिक्षणिक संस्थान मध्ये अनुसंधान सोडा. आयुर्वेदात प्रयोग येणार्या 100 वनस्पति ही नसतात. पण भविष्य उज्ज्वल आहे.
वाक्य नंबर २ हे जबरदस्त आहे
वाक्य नंबर २ हे जबरदस्त आहे पटाईत काका.
अभिनंदन.
शिवाय ते कोरोना काळात लाखो लोकांचे प्राण वाचवले वगैरेही
अत्यंत स्फुर्तीदायक
आभारी आहे ही माहिती दिल्याबद्दल
.
शेमलेस (निर्लज्ज) लोकांवर सार्कॅझम (उपरोध) आत्यंतिक यूसलेस (निरुपयोगी) तथा निष्प्रभ ठरतो, एवढाच प्रेमळ (आगाऊ!) सल्ला देऊन गप्प बसतो.
असे आहे जे सत्य देश विदेशातील
असे आहे जे सत्य देश विदेशातील लाखो लोकांनी स्वीकार केले ते आपले तथाकथित शिक्षित स्वीकार करायला तैयार नाही. एकच उदाहरण. हरिद्वार योगग्राम मध्ये फक्त 600 रुग्णांची चिकित्सा व्यवस्था होती. करोंना काळात 2021 मध्ये वाढवून 1200 झाली नंतर 2022 पर्यन्त 3200 रोगी आयपीडी चिकित्सा घेऊ लागले. तरीही 6 महीने बूकिंग राहू लागले आहे. कारण अधिकान्श रोगी करोंना काळात कोरोंनील घेऊन स्वस्थ्य झाले. जर्मन जर्नल ने कवर पाणा वर या औषधला स्थान दिले. मजेदार हेच एकमेव औषध ज्यावर सेल ते अॅनिमल लेवल अनुसंधान झाले होते.
वाक्य नंबर २ हे जबरदस्त आहे
वाक्य नंबर २ हे जबरदस्त आहे पटाईत काका.
अभिनंदन.
शिवाय ते कोरोना काळात लाखो लोकांचे प्राण वाचवले वगैरेही
अत्यंत स्फुर्तीदायक
आभारी आहे ही माहिती दिल्याबद्दल
...
यूनिलिव्हर तथा ('मूव'चे उत्पादक) रेकिट बेनकायसर हे (तथा त्यांच्या व्यापारी प्रथा) हरामखोर आहेत, हे मान्य करायला मी तयार आहे. (फार कशाला, 'विक्स वेपोरब'चे उत्पादक प्रॉक्टर अँड गँबल यांजबद्दलसुद्धा अशीच भूमिका घ्यायला मी तयार आहे.) 'पतञ्जलि'च्या संदर्भात आपलीही अशीच तयारी आहे काय? (असावीच, असा आग्रह नाही. फक्त, एक कुतूहल.)
दुर्दैवाने याला (तथा 'आयुष'च्या 'प्रमाणना'ला) काहीही अर्थ नाही.
बाकी चालू द्या.
पुरावा?
हे सगळं तुम्ही म्हणता म्हणून मानायचं, पटाईत काका, का काही खरोखरचे पुरावे आहेत? काही महिन्यांपूर्वी देशातल्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर मोठ्या जाहिराती पतंजलीनं छापल्या होत्या, त्यांसाठी किती खर्च केला होता, काही आकडे आहेत का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ
अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे, हे वाक्य कोणी म्हटले होते? नाही, जरा संदर्भ शोधत होतो. अवांतर तर झाले नाही ना माझे?
हा हाहा ...
होऊ दे अवांतर. कायच्या काय, असंवेदनशील फेका मारलेल्या सहन करायच्या तर किमान काही विनोद हवाच!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(लेखकास विनंती)
माझ्या वरील ('विक्स वेपोरब'च्या तथा त्याच्या 'आयुर्वेदिक म्हणून मार्केटिंगच्या संदर्भातील) प्रतिसादाच्या अनुषंगाने लेखकाची मते तथा प्रतिक्रिया वाचायला आवडतील. (हा आग्रह अवश्य समजावा.)
सर्व pathy योग्य च आहेत
Alopathy आता आली आहे त्या अगोदर आयुर्वेद हीच उपचार पद्धती होती.
Aayurved कसे चुकीचे आहे हे सिद्ध करण्यात किंवा तसा आरोप करण्यात काही अर्थ नाही.
ते पण एक शास्त्र च आहे जे अनुभव वर आधारित आहे.
त्या पेक्षा alopathy असू किंवा आयुर्वेदिक ,किंवा homeopathy.
ह्या सर्वांसाठी एकच नियम सरकार नी लागू करावेत.
जी उपचार पद्धती शास्त्रीय नाही असा आक्षेप घेतला जातो .
त्या उपचार पद्धती नी शास्त्रीय पद्धत वापरायला सांगावी.
त्या साठी सरकार नी खूप मोठी आर्थिक मदत करावी.
उगाचच फक्त आरोप करण्यात काही अर्थ नाही.
आधुनिक उपचार पद्धती मध्ये पण खूप लूप hole आहेत.
ते आजारी पडल्यावर उपचार करण्याची वेळ येते तेव्हा माहीत पडतात.
सर्व pathy योग्य च आहेत
Alopathy आता आली आहे त्या अगोदर आयुर्वेद हीच उपचार पद्धती होती.
Aayurved कसे चुकीचे आहे हे सिद्ध करण्यात किंवा तसा आरोप करण्यात काही अर्थ नाही.
ते पण एक शास्त्र च आहे जे अनुभव वर आधारित आहे.
त्या पेक्षा alopathy असू किंवा आयुर्वेदिक ,किंवा homeopathy.
ह्या सर्वांसाठी एकच नियम सरकार नी लागू करावेत.
जी उपचार पद्धती शास्त्रीय नाही असा आक्षेप घेतला जातो .
त्या उपचार पद्धती नी शास्त्रीय पद्धत वापरायला सांगावी.
त्या साठी सरकार नी खूप मोठी आर्थिक मदत करावी.
उगाचच फक्त आरोप करण्यात काही अर्थ नाही.
आधुनिक उपचार पद्धती मध्ये पण खूप लूप hole आहेत.
ते आजारी पडल्यावर उपचार करण्याची वेळ येते तेव्हा माहीत पडतात.
व्हिक्स आणि मूव्ह
लेखांवर येणाऱ्या प्रतिक्रिया मी काळजीपूर्वक वाचतो. भाग सातवरील प्रतिक्रियांत व्हिक्स आणि मूव्ह या दोन औषधांविषयी वाचकांनी लिखाण केले आहे. बहुतेक सर्व लिखाण योग्यच आहे. व्हिक्स आणि मूव्ह ही औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतात. म्हणजे ही औषधे आपण आपल्या जबाबदारीवर वापरत असतो. आता वाईट गोष्ट ही की बहुतेक आयुर्वेदिक औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतात. म्हणजे, स्वत:हून घेतलेले च्यवनप्राश आपण आपल्या जबाबदारीवर घेत असतो. ॲलोपाथीच्या औषधांसाठीही केमिस्ट प्रिस्क्रिप्शन विचारत नाही हा आणखी निराळा भाग. त्याचीही विविध कारणे आहेत. पण आत्ताचा तो विषय नाही. व्हिक्स आणि मूव्ह यांसारखी औषधे, बद्धकोष्ठतेवरील औषधे यांखेरीज कोणत्या विशिष्ठ आजारावरच्या औषधाचा प्रतिक्रियेत उल्लेख झाला असता तर त्याची दखल घावी लागली असती.
औषधांचे उत्पादक निरनिराळ्या औषधांच्या वेष्टनावर आयुर्वेदिक औषध असे लिहून मार्केटिंग गिमिक करत आहेत. याचा अर्थ समाजातील मोठा घटक आज आयुर्वेद या शब्दावर विश्वास ठेऊ लागला आहे. असा अंधविश्वास योग्य नव्हे हाच या लेखमालेचा हेतू आहे. आयुर्वेदाच्या सर्व कल्पना टाकाऊ आहेत असे मी म्हणत नाही. पण प्रत्येक कल्पना शास्त्रीय निकषावर पारखून जे सिद्ध होत नाही त्याचा त्याग करणे हे महत्वाचे आहे. आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसमध्ये हे सुरू झाले आहेच. आता आयुर्वेदिक डॉक्टर्स सर्रास आधुनिक चाचण्या वापरतात. ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आयुर्वेदाच्या परीक्षापद्धती कालाबाह्य झाल्या आहेत म्हणून त्या शिकवू नयेत असे म्हणण्याचे कोणाचे धाडस होत नाही.
याच अनुषंगाने माझ्या आत्तापर्यंतच्या लिखाणात माझ्या दृष्टीतून आयुर्वेदात काय त्रुटी आहेत असे वाटते याचा पुनरुल्लेख करतो. कारण आजपर्यंत या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत असे वाटत नाही. धातू, अग्नी, आम आणि त्रिदोष या आयुर्वेदाच्या मूलभूत कल्पना आहेत. या कल्पनांची सत्यता सिद्ध करण्याची गरज आहे. आयुर्वेदातील अष्ट-परीक्षांत कोणतेही मोजमाप नाही. आयुर्वेदाने आधुनिक चाचण्यांचा उपयोग सुरू केला आहेच. अष्ट-परीक्षा सोडून देणे योग्य होणार नाही का?
आयुर्वेदाच्या उपचार पद्धती – ज्याला चिकित्सा म्हणतात – शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्याची गरज आहे. आयुर्वेदाच्या औषधांना साईड इफेक्ट्स नाहीत हे विधान खरे नाही.
काही आयुर्वेदिक औषधातून शरीरात अपायकारक द्रव्ये जातात. सुवर्ण आणि सुवर्ण भस्म यांच्या उपयोगबाबतीत पूर्णपणे संभ्रमावस्था आहे. आयुर्वेदिक औषधांची RCT झालेली नाही आणि ती करणेही अवघड आहे.
आधीच्या एका लेखावर एक प्रतिक्रिया अशी होती कि मी आयुर्वेद सोडून इतर पद्धतीबाबत का बोलत नाही? त्याचे उत्तर हे -
भाग १० युनानी आणि सिद्ध
भाग ११ निसर्गोपचार
भाग १२ आणि १३ होमिओपाथी
भाग १४ ॲक्युपंक्चर
भाग १५ आयुष
भाग १६ , १७, १८, १९ ॲलोपाथी
अशी योजना आहे.
Irrational prescriptions are
Irrational prescriptions are precisely the reason we see a lot of people turn to modern medicine after Ayurveda treatment fails,
सत्य विपरीत आहे. 99 टक्के एलोपैथि पासून निराश झाल्यावर येतात.
100 पैकी 99 टक्के लोक एलोपैथि सेल्फ मेडिसीन अर्थात केमिष्ट कडून पीसीएम, पेन किलर, एंटीबिओटीक, स्टेओराईड औषधी घेऊन आपले लीवर किडनी इत्यादि खराब करून घेतात. आयुर्वेद औषधी घेऊन फक्त 1 असेल.
'पतञ्जलि'ची भलावण करणारे आपले या संस्थळावर तथा अन्यत्र छापून येणारे लेख) हा अप्रत्यक्ष विज्ञापनाचा प्रकार म्हणता येईल.
पतंजलि नान -प्रॉफिट कंपनी आहे. मुनाफा ट्रस्ट मध्ये जातो. योगपीठचे लाखो सदस्य आहेत. देशातील विभिन्न क्षेत्रातील शास्त्रज्ञ फ्री सेवा ही पतंजलिला देतात. सत्य मांडयाला पैशांची गरज नाही. पतंजलि 2 टक्के हून जास्त विज्ञापन वर खर्च करत नाही. अनुसंधान वर होणारा खर्च ही औषधींचा किमतीत टाकत नाही. विक्रेतांनाही अत्यंत कमी नफा देते. जवळच केमिष्ट याची पुष्टी करून देईल.
या घटकेला देशात लोक पुन्हा आयुर्वेदावर विश्वास ठेऊ लागले आहे. त्यामुळे आयुर्वेदावर भ्रम पसरविण्याचे कार्य ही ..... करत असतील असे मी म्हणेल तर निश्चित उचित नाही. प्रत्येकाला विचार स्वतंत्रता आहे.