Skip to main content

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २९ : पॅटर्न

आपल्याला आजूबाजूला अनेक पॅटर्न दिसतात, पुन:पुन्हा घडणारी, दिसणारी भौमितिक किंवा इतर कोणतीही घटना. जुन्या देवळांमधल्या शिल्पांमधे दिसणारी नियमितता, किंवा तारांच्या जाळीतली नियमितता, किंवा ऋतूंमधे दिसणारी नियमितता, किंवा वागण्या-बोलण्याचे पॅटर्न्स हा या आव्हानाचा विषय आहे. एकावर एक आलेले, वेगवेगळे पॅटर्न्स (उदा: हा फोटो पहा.) बघायला आवडतील.

याशिवाय विषयाचा काही वेगळा अर्थ लावला तरीही स्वागतच आहे.

------------

मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग ३

Part 1 ,
Part-2

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २९ : सावली

कॅमेर्‍यातून काढलेल्या चित्रांना "छायाचित्रण" म्हणतात. (काहीकाही लोक रंगीत चित्रांना "प्रकाशचित्रण" म्हणण्याचा आग्रह धरतात, ही बाब त्यांना क्षणभर माफ करूया.) चित्रामध्ये सावल्यांचे पार्श्वभूमी म्हणून महत्त्व अनन्यसाधारण आहे. भगभगीत फ्लॅशमुळे सावल्या नाहिशा झाल्या, तर पुष्कळदा चित्र सपाट होते, त्याची त्रिमिती हरवते. द्विमिती चित्राची त्रिमिती हरवते, म्हणजे काय? चित्रातील वस्तू त्रिमिती असल्याचा हवाहवासा भास हरवतो. उलटपक्षी कधीकधी सावल्या नको तिथे येऊन रसभंग करतात... यावेळच्या पाक्षिक आव्हानात आपल्याला सावल्यांनाच विषय बनवायचे आहे. छोटी जिची बाहुली, मोठी माझी सावली.

मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग २

Part 1

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा दुसरा धागा.

------------------------------------------------------------------------------------------------------------

मनातले छोटे मोठे विचार आणि प्रश्न - भाग १

प्रत्येकाच्या मनात रोज कितीतरी विचार येतात. त्यातले बरेच सारे विचार रोजच्या आयुष्याशी निगडीत असतात. इतर काही मात्र केवळ आपल्यालाच पडत आहेत असे वाटते. त्यामुळे ते विचार योग्य आहेत कि नाही असे तर वाटतेच पण असे विचार पडणेही योग्य आहे कि नाही असेही वाटते. सहसा असले विचार प्रश्नरुपी असतात, क्वचित कल्पनारुपी असतात. समोरच्याला त्यांत रस असेल कि नसेल म्हणून आपण प्राधान्याने ते चर्चेस घ्यायचे टाळतो. तहीही ते विचार अधूनमधून मनात रुंजी घालतच असतात. कधी संकोच नडतो तर कधी पुढचा त्यावर चर्चा करू शकेल इतका सक्षम नसेल असे वाटते. ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत ते पुन्हा पुन्हा मनात येत राहतात.