Skip to main content

आजचे दिनवैशिष्टय - २

Taxonomy upgrade extras

व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्‍या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री कोल्हटकर हा धागा सुरू केला होता. पहिल्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.

यापूर्वीचे भागः भाग
========
आजच्या दिनवैशिष्टयात पुढील उल्लेख आहे:

'आनंद' या मुलांच्या मासिकाचे संस्थापक-संपादक, बंगाली-मराठी कोशकार वासुदेव आपटे (१८७१).>

नरेंद्र मोंदीना भिण्यात कितपत तथ्य आहे?

Taxonomy upgrade extras

मला राजकारणातलं फारसं काहीच कळत नाही. पण तसं कबूल करायची सोय नसते. कोणत्याही कारणास्तव राजकीय भूमिका घेण्याचं टाळणं हा पळपुटेपणा, आत्मघात, आळशीपणा (आणि बरंच काय काय) आहे, हे ऐकवून टपलीत मारण्याची संधी कुणीच सोडत नाही. त्यात तथ्यही असल्यानं ते निमूट ऐकून घेण्यावाचून पर्याय नसतो. त्यावर उपाय म्हणजे सजगता - आणि पर्यायानं - वाचन वाढवणे. माझ्या प्राधान्यक्रमातल्या वाचनाला वेळ काढताना सध्या पंचाईत होते आहे, तर हे अधिकचं वाचन कुठून नि कसं वाढवणार? वेळ खूपच कमी पडतो. अशा वेळी आपल्या वर्तुळातल्या जाणकार लोकांच्या मतांची चाचपणी करण्याचा एक शॉर्टकट उपलब्ध असतो.

आजचे दिनवैशिष्टय

Taxonomy upgrade extras

'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्‍या नावे आणि घटनांवरून अन्य धागे सुरू होतात. मीहि असे दोन धागे सुरू केले आहेत. असे वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून हा धागा सुरू करीत आहे आणि त्यात आजच्या (२२ जानेवारी) दिनवैशिष्टयांपैकी 'संतवाङ्मयाचे अभ्यासक व कोशकार ह. श्री. शेणोलीकर (१९२०)' ह्यांचा जन्मदिवस ह्यावरून आठवलेली एक गोष्ट लिहितो.

बहुतेककरून १९६१ साल असावे. फर्गसन/फर्ग्युसन कॉलेजातील 'साहित्य सहकार' ह्या विद्यार्थिसंघटनेचा २५वा वाढदिवस साजरा होत होता. आमच्यासारखे उत्साही सदस्य उपस्थित होतेच पण काही जुने सन्मान्य सदस्यहि आवर्जून आले होते. प्रा. ह.श्री शेणोलीकर त्यांपैकीच एक होते. कार्यक्रमामध्ये काही वेळ जुन्या सदस्यांच्या आठवणीपर भाषणांसाठी ठेवला होता.

त्यात स्वतः रा.श्री.जोग बोलल्याचे आठवते. पण विशेष लक्षात राहिलेली आठवण आहे शेणोलीकरांबाबत. त्याच्याच एका सहाध्यायाने आपल्या आठवणी सांगतांना शेणोलीकरांवर त्या काळात कोणीतरी लिहिलेली 'असा हा शेणोलीकर हरी' ही कविता म्हणून दाखविली आणि चांगलेच हास्य पिकवले.

पण शेणोलीकरांना ते लागले असेहि आम्हांस जाणवले. ह्या सर्व तरुण पोरांसमोर आपली कुचेष्टा झाली असे त्यांना वाटले असावे.

ह्याच दिवशी जंबो जेट बोईंग ७४७ चे पहिले उड्डाण १९७० साली झाल्याचे नोंदविले आहे. तदनंतर लवकरच ही विमाने एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली. परदेशी विमानसेवा देण्याचा मक्ता असलेली सरकारी एअर इंडिया तेव्हा मोठया तोर्‍यात होती. आजच्यासारखा poor relation चा दर्जा तिला मिळायला कैक वर्षे जायची होती. त्या ताफ्यातले पहिले विमान होते 'सम्राट् अशोक'. 'Your palace in the sky' अशी त्याची जाहिरात एअर इंडिया करीत असे. त्याच्या खिडक्यांना बाहेरच्या बाजूने राजवाडयातील वातायनांसारखे रंगविले होते आणि पहिले काही दिवस हे विमान मुंबई शहरावर अगदी खालून उडवून ह्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले गेले होते हे चांगले आठवते.

८ वर्षांनंतर हेच 'सम्राट् अशोक' मुंबईहून दुबई ला जायला १ जानेवारी १९७८ ह्या दिवशी निघाले आणि चार मिनिटांतच विमानतळापलीकडे समुद्रात कोसळून नष्ट झाले. विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आणि चालक वर्ग मृत्युमुखी पडले. मला वाटते आजतागायत ते विमान तेथेच समुद्रतळावर बसून आहे.

'सम्राट् अशोक' एक चित्र

श्रेय

भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी

भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी

लेखिका - कविता महाजन

चित्रकार : शुभा गोखले


गोष्ट पहिली

उमगत असणारे वसंत पळशीकर

उमगत असणारे वसंत पळशीकर

लेखिका - Dr. Medini Dingre

ज्येष्ठ विचारवंत आणि कार्यकर्ता असा अपवादात्मक संगम ज्यांच्या व्यक्तिमत्वात झाला आहे अशा वसंत पळशीकर यांच्या कार्याची माहिती देणारा लघुपट बनवण्याचं काम सध्या चालू आहे. या कामात सिंहाचा वाटा उचलणार्‍या डॉ. मेदिनी डिंगरे यांच्या, या कामादरम्यानच्या दिवसांमधे लिहिलेल्या अनुदिनीची ही काही पानं.

---------------------------------------

पार्श्वभूमी

विशेषांक प्रकार

अर्थनिर्णयनाच्या विरोधात

अर्थनिर्णयनाच्या विरोधात

लेखक - मिलिंद

"आशय कशाचं तरी ओझरतं दर्शन असतं, काहीतरी क्षणभर चमकून जातं. आशय अतिशय सूक्ष्म असतो."
विलियम ड कूनिंग (एका मुलाखतीत)
"फक्त उथळ माणसंच बाह्य रूपावरून पारख करीत नाहीत. गूढ दृग्गोचरात आहे, अदृश्यात नव्हे."
ऑस्कर वाइल्ड (एका पत्रात)


अर्थनिर्णयनाच्या विरोधात