कोडं-गंमतजंमत वगैरे
खालील व्हिडीओतील प्रकाराचे स्पष्टीकरण द्या.
- Read more about कोडं-गंमतजंमत वगैरे
- Log in or register to post comments
- 15452 views
फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)
रविवारचा दिवस होता तरी सकाळी योग पाहण्यासाठी सकाळी ६ वाजताच उठलो. योग संपण्याचा आधीच आमच्या भागात पाऊस सुरु झाला. सकाळी ९ वाजता आमच्या चिरंजीवाने ‘हैप्पी फादर्स डे’ केले. संध्याकाळी बाजारातून २५०ग्रम पनीर घेऊन आलो होतो. आल्यावर सौ. ला म्हंटले आज फादर्स डे आहे. शाही पनीर करते का? सौ. उतरली, मिक्सर खराब झाले आहे. मोटर कामातून गेली आहे. गेल्याच वर्षी ठीक केली होती. आता नवीन ‘फूड प्रोसेसर’ घेऊन मगच अश्या ग्रेवीवाल्या भाज्या करायचा ऑर्डर करा.
- Read more about फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)
- Log in or register to post comments
- 10966 views
बोल
अंधारा दिवस
आभाळ झाकळे
मनावर चढे
जशी ओल
येथून तिथे हा
चालला कारवां
आपल्या सोबत
थंड वारा
दिसू म्हणे वाट
धूके दिसू नेदी
अजब झगडा
चाललेला
म्हणू म्हणे बोल
म्हणू दे न कोणी
बोल बसलेला
गोंधळून
इथे तिथे घुमे
आपला आवाज
ऐकू ये न काही
दूर दूर
बाहेर पडले
आतले संदेह
आकाशाला गेले
लगबग
चल वाहू शब्दे
आपले कथन
भरो येई जन्म
भरू दे बा...
अनंत ढवळे
- Read more about बोल
- Log in or register to post comments
- 2807 views
मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५१
Taxonomy upgrade extras
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
जीर्ण झालेल्या नोटा बदलायच्या असतील तर काय प्रोसिजर आहे? पुण्यात कुठे बदलून मिळतात?
- Read more about मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५१
- 111 comments
- Log in or register to post comments
- 53666 views
शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ४
Taxonomy upgrade extras
व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३
----
"सुमार" ह्या शब्दाचा मराठी मधे अर्थ average ह्या अर्थी घ्यायचा की below average ह्या अर्थी घ्यायचा.
मी तरी दुसरा अर्थ वापरते.
हा उर्दु/फारसी वगैरेतुन आलेला दिसतो शब्द ( बेसुमार मधला हाच सुमार असला तर ), पण सध्या तिथे तो वापरात आहे का?
- Read more about शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ४
- 112 comments
- Log in or register to post comments
- 129830 views
शेतातील रस्त्या विषयक
Taxonomy upgrade extras
नमस्कार मंडळी
माझी विदर्भातील एका गावी ३ एकर शेतजमीन आहे आणि माझ्या शेतातून शासकीय दस्तेवज्ञुसर कुठलाही रस्ता नाही तरी पण माझा शेजारी माझ्या शेतातून जबरदस्तीने रस्ता पडून स्वताहाच्या शेतामध्ये जातो .माझ्या शेत मध्ये संत्राची फळबाग असून या फळबागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे कारण शेजार्याने पडलेला रस्ता हा गाव्रस्त्याला लागून असल्यामुळे गावातील जनावरे माझ्या शेतात घुसून नुकसान करतात कृपया मला हा अतिक्रमित रस्ता बंद करण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन करावे हि विनंती.
- Read more about शेतातील रस्त्या विषयक
- 9 comments
- Log in or register to post comments
- 12993 views
भुलभुलैय्या
आशुतोष रामाणीला मी ऑफिसमध्ये पहील्यांदा भेटले. त्याचे झाले असे - मला एका MNC मध्ये Computer Programmer ची पहीलीवहीली नोकरी मिळाली. अन join होण्याच्या दिवशी एक तास आधीच म्हणजे ८ वाजता, मी किंचीत बिचकत आमच्या ऑफिसच्या भव्य इमारतीत प्रवेश केला. इमारत जितकी impressive होती तितकीच जंतर्मंतर भुलभुलैय्याही होती. (स्माईल) पहीलं प्रेमही तसच असतं नाही?
.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about भुलभुलैय्या
- 19 comments
- Log in or register to post comments
- 15618 views
देवतांची ऐसी (तैसी)
भगवान विष्णूंचे पाय चुरुन चुरुन, देवी लक्ष्मीला अतिकंटाळा आलेला होता. हे काय मेलं जगाचा भार हे वहाणार अन मग पायात पेटके आले की पाय चुरुन मात्र मी द्यायचे, असे काहीसे टिपिकल, वैतागवाडी विचार तिच्या मनात फिरुन-फिरुन येऊ लागले होते. नक्की काय करावं हे सुचलं नाही तरी तिला पार्वतीची तिच्या जीवलग मैत्रिणीची आठवण आल्याशिवाय राहीली नाही. आता नारायण निद्राधीन झालेले असल्याने, काय करावं या कंटाळ्याला या विचारात तिने पार्वतीस फोन लावला. .. पार्वतीचं काय बरं असतय, महादेव नेहमी ध्यानात मग्न अन ही मोकळी शॉपिंग अन नट्टापट्टा करायला. अपेक्षेनुसार पार्वतीने दुसर्या रिंगला फोन उचलला.
- Read more about देवतांची ऐसी (तैसी)
- 40 comments
- Log in or register to post comments
- 19416 views
बॉटबॉय यांची ऐसी विशेषांक संपादकपदी नेमणूकीनिमित्त मुलाखत
'ऐसी अक्षरे'च्या आगामी विशेषांकाच्या संपादकपदासाठी कोणाची नेमणूक होते यावर जालीय जगताचं लक्ष केंद्रित होऊन राहिलेले होतं. या महत्त्वाच्या पदावर व्यवस्थापकांनी बॉटबॉय यांची नेमणूक केल्याचं जाहीर केल्यावर एकच कल्लोळ झाला. हे पद भूषवण्यासाठी अनेक लायक उमेदवार असताना, निव्वळ व्यवस्थापकांच्या उजव्या प्रतिगामी विचारसरणीची री ओढणे आणि जमेल तेव्हा विरुद्ध विचारसरणीवर हल्ला चढवणे एवढ्याच पात्रतेवर त्यांना हे पद देण्यात आले आहे अशी चर्चा ताबडतोब खरडवह्यांतून आणि नुकत्याच जन्मलेल्या खरडफळ्यावर सुरू झाली.
- Read more about बॉटबॉय यांची ऐसी विशेषांक संपादकपदी नेमणूकीनिमित्त मुलाखत
- 15 comments
- Log in or register to post comments
- 6496 views
सॅन अँटॉनिओ - गुरुद्वारा - अनुभव
पिडा यांनी अदितीच्या धाग्यावरती हा सुंदर प्रतिसाद दिलेला वाचला अन टेक्सासमधील काही स्मृतींना उजाळा मिळाला. तो या धाग्यात मांडते आहे.
.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सॅन अँटॉनिओ - गुरुद्वारा - अनुभव
- 57 comments
- Log in or register to post comments
- 42782 views