काही डीजीट्ल पेंटिन्ग्स. ही फोटोज वर computer वर काम करुन केलेलि चित्रे आहेत.

- Read more about काही डीजीट्ल पेंटिन्ग्स. ही फोटोज वर computer वर काम करुन केलेलि चित्रे आहेत.
- 18 comments
- Log in or register to post comments
- 15053 views
तिला पाहण्याचा लळा लागला
तिला पाहण्याचा लळा लागला
स्वत:हून मासा गळा लागला
नव्हाळीत नाहून शृंगारली
किती देखणा सापळा लागला
नको गर्व, राधे, उजळ कांतिचा
तुलाही निळासावळा लागला
मनाला मृदुल स्पर्श झाला तिचा
झरा प्रीतिचा कातळा लागला
उभय चेहर्यांवर प्रभा तृप्तिची
भुकेला तनय आचळा लागला
युगुलगीत आपण जरी छेडले
तुझा सूर का वेगळा लागला?
उसळती नदी मी, निमाले, मिलिंद
तुझा पाय यमुनाजळा लागला
- Read more about तिला पाहण्याचा लळा लागला
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2272 views
समजा प्राइम नंबर केसांसारखे आहेत
समजा असंख्य मुंग्या माणसाला ढकलत आहेत.
म्हणजे गणित केव्हा संपेल जेव्हा असंख्य अशी गोष्ट असणारच नाही.
पाहताच येत नाहीत इतक्या सूक्ष्म त्या आहेत.
समजा एखाद्याने येथे फक्त मराठीत टंकले म्हणून वाचणारे लोक आहेत याचे मला आश्चर्य वाटते. पण
मीही तसाच आहे. मी आंतरजालावरची मराठी वर्तमानपत्रं वाचू शकत नाही पण इतरत्र मराठी वाचण्यात वेळ घालवतो.
पण कोणी वाचत नसल्यास लिहीण्याचा उपयोग काय हे शोधण्यासाठी लिहीणे मला आवडते. पण तेही लोकांनी वाचावे
असेच वाटते.
गोंधळ
- Read more about समजा प्राइम नंबर केसांसारखे आहेत
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4338 views
'वांझोटी?' (एक मूळकथा) - भाग २
- Read more about 'वांझोटी?' (एक मूळकथा) - भाग २
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2348 views
'वांझोटी?' (एक मूळकथा) - भाग १
शेवटचे वाक्य वगळता हा भाग इथे प्रकाशित झाला आहे. यापुढील भाग जे जपमाळकथेहून वेगळे आहेत ते क्रमशः प्रकाशित होतील.
- Read more about 'वांझोटी?' (एक मूळकथा) - भाग १
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4058 views
प्रिय 'प्र' ...
प्रियतम 'प्र',
- Read more about प्रिय 'प्र' ...
- 61 comments
- Log in or register to post comments
- 37339 views
इलेक्शनी- चारोळ्या
आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं.......
तीर्थ प्या
आटोत बसा
वोट आपला
असा विका.
मोजतात.
मोजते.
- Read more about इलेक्शनी- चारोळ्या
- Log in or register to post comments
- 2007 views
नरहरी सोनार हरीचा दास
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया).
त्यांना भावपूर्ण आदरांजली.
वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय
करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत
होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा
व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते.
वाड्.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो.
यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या
दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे
- Read more about नरहरी सोनार हरीचा दास
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6821 views
एका डेटिंगची गोष्ट – भाग दुसरा
कारमधल्या शक्य त्या प्रत्येक आरशात पाहून,स्वतःशीच हसत, स्वतःवर निहायत खुश होत आणि ह्या आरशांमध्ये जितक्या निवांतपणे पाहता येतं, स्वतःला निरखता येतं तितक्याच निवांतपणे त्याच्यासोबत राहून त्याच्यात हरवून जाता येईल का हा बराचसा रोमांटीक आणि तितकाच अव्यवहार्य विचार करत ती कारमधून उतरली आणि हॉटेलात शिरली. तो आला नव्हताच. उत्साहात टेबलसुद्धा तिनेच बुक केलं होतं. तिथे जाउन ती बसली. कधी येईल तो? किंबहुना येईल तरी का हा प्रश्न तिला छळत होता. वेटरने आणून दिलेल्या मेनुकार्डची पानं उलटत ती बरीच मागं जाउन पोचली. पार कॉलेजपर्यंत. कॉलेज, नुसत्या नावासरशी आठवणी भरभर गोळा झाल्या.
- Read more about एका डेटिंगची गोष्ट – भाग दुसरा
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4084 views
कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!
Taxonomy upgrade extras
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
- Read more about कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4947 views