Skip to main content

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

अद्भुत आविष्कार

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.
"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.
आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?

तुम्ही नियमितपणे काय वाचता?

Taxonomy upgrade extras

'ऐसी'च्या संस्कृतीप्रमाणे ऐसीकर आपल्या म्हणण्याच्या पुष्टीदाखल यथार्थ दुवे देत असतात ही गोष्ट खरी. पण ते वाचताना प्रश्न पडतो की, ही मंडळी इतकी माहिती चाळून पचवत असतील आणि हवी तेव्हा चपखलपणे काढून देऊ शकत असतील, तर हे लोक नियमितपणे वाचतात तरी काय नि किती? ते कुतूहल शमवण्याकरता हा धागा.

उत्पलच्या धाग्यात त्यानं म्हटल्याप्रमाणे जालावरचं महाभारत एकेकदा पहायला, आपल्या वाचनाचं कुरण निवडायला नि त्यावर काहीएक म्हणणं तयार व्हायला वेळ जातो, तोवर हे दुवे महापुरात हरवूनही गेलेले असतात. तसे ते जाऊन नयेत, एका ठिकाणी सापडावेत, म्हणूनही.

'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग १

Taxonomy upgrade extras

काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत.
इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे.
१. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही
त्रास होउ शकतो का?
एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?

कुरळे केस सोनेरी...

कुरळे केस सोनेरी
बाहुली माझी सोनपरी

लुकलुक लुकलुक डोळ्यांची
इवल्या इवल्या नाकाची
गुब्रे गाल फुलापरी
बाहुली माझी सोनपरी

हिला न येतो राग कधी
नेहमी असते आनंदी
कधी न कुठला हट्ट धरी
बाहुली माझी सोनपरी

खूप मला ही आवडते
जवळ सदा माझ्या असते
मैत्रिण माझी खरीखुरी
बाहुली माझी सोनपरी

- ग्लोरी

अद्भुत आविष्कार

अद्भुत आविष्कार

निसर्ग हा खरेच अद्भुत किमयागार आहे. अश्या अनेक गोष्टींची निर्मिती त्याने अशी चुटकीसरशी केली की त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे निर्माण यांचे रहस्य उलगडा करण्यात हजारो वर्षे कमी पडतील. त्या कश्या निर्माण झाल्या? कोणी केल्या? आणि का आहेत याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. मग अश्या अनाकलनीय गोष्टींचे गूढ उकलत नसले की कालानुरूप त्या रहस्यावर धार्मिक रूढी वा अंधश्रद्धेचे टॉपिंग चढते.

शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

पृथ्वीगोलापासून किंचित दूर
निळ्या स्ट्रैटोस्फिअर मध्ये
असतात वस्ती करून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

संथपणे …. फिरणाऱ्या पृथ्वीला
आंजारत गोंजारत, प्रसंगी लाचलुचपत देत
असतात तग धरून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

हिंदकळतात वारयानं
हेलावून जातात नव्या वर्षाच्या रोषणाईनं
घाबरतात धूमकेतूंना
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

पहिल्या रडण्याचा किनरा आवाज
सूक्ष्मपणे ऐकतात
पहिल्या अडखळणाऱ्या पावलांकडे
असतात लक्ष ठेवून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह

धूर सोडणाऱ्या आगगाड्या
कौतुकानं न्याहाळतात
होतात हवालदिल
जंगलातल्या वणव्यानं

नेति नेति चा एक्सरसाइज

रेल्वे स्टेशन वर रात्री
रेल्वेला यायला अजून अर्धा तास असताना
कुठल्याशा कॅफेत केव्हाच पिउन संपलेल्या कॉफीच्या कागदी कपासमोर
थकलेल्या मनाच्या पुराण्या सवयी जाग्या होतात
त्यातलीच एक
नेति नेति च्या एक्सरसाइज ची

समोरचा कागदी कप…तू आहेस ?
नेति नेति

काचेच्या शो रूम मधले काळे चष्मे…तू आहेस ?
नेति नेति

खालची जमीन , जाहिराती मधली अर्धनग्न स्त्री ?
नेति नेति

मधूनच थंड हवेची झुळूक सोडणारं
भकास ट्यूब लाईट असणारं वरचं फाल्स सीलिंग ?
नेति नेति

इस्त्री केलेले लोखंडी रूळ ?
मागून धावणाऱ्या लोखंडी गाड्या ? त्यांची गति ?
नेति नेति

हवा ? कॉफीतले पाणी ? दूध ?
नेति नेति

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.

गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.

पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.

भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती

१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?

पार्श्वभूमी:-
१९६०चे दशक एक वेगळेच समीकरण जागतिक राजकिय पटलावर मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरीकन समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरु होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने तो फेटाळुन लावल्यावर राजकिय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. इतरही कारणे त्यास होतीच.

धाग्याचा प्रकार निवडा:

एअर इंडिया मध्ये सध्या काय चालले आहे?

1960च्या दशकात किंबहुना 1970 च्या दशकात सुद्धा, प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुखसोयींचा विचार केला असता, भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची गणना, जगातील त्या वेळच्या सर्वोत्कृष्ट विमान कंपन्यांत होत असे. पुढच्या बाजूस पंखे असलेल्या सुपर कॉन्स्टेलेशन विमानांचा ताफा या कंपनीकडे प्रथम असे व नंतर या विमानांची जागा बोइंग कंपनीच्या 707 या जेट विमानांनी घेतली होती. 1975 मध्ये एअर इंडियाच्या विमानाने मुंबई ते रोम असा केलेल्या माझ्या पहिल्या आंतर्राष्ट्रीय प्रवासाच्या सुखद स्मृती अजूनही माझ्या स्मरणात आहेत.