चंद्रमाधवीचे प्रदेश
चंद्रमाधवीचे प्रदेश
हे माझ्या आयुष्यातला अतिशय महत्वाच पुस्तक आहे. पाच वर्षांपूर्वी हे पुस्तक मी कसं काय विकत घेतलं हे मला कळत नाही, तुमच्या नशिबात असेल तेंव्हाच एखाद पुस्तक तुम्हाला भेटत यावर माझा विश्वास आहे.
या आधी मी कविता वाचल्या होत्या शाळेतच आणि खूप काही आवडत नसत कारण त्याच्याशी त्यावरचे प्रश्न, उत्तर, मार्क असल्या गोष्टी संबंधित होत्या.
कशावर तरी बोलू काही कार्यक्रमाने मी कवितांकडे ओढली गेले आणि हे पुस्तक हातात आले.
माझ्या कवितावाचनाची सुरवात या पुस्तकाने झाली आणि
ती सुरवातच अशी झाली की, काव्यप्रेमावर 'ग्रेस' या नावाची अमीट मोहर उमटली.
- Read more about चंद्रमाधवीचे प्रदेश
- 10 comments
- Log in or register to post comments
- 13566 views
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '- वि. का. राजवाडे हे जब्बरदस्त पुस्तक कुणी वाचलं आहे का. आपल्या थोर्र थोर्र , पवित्र इत्यादी संस्कृती बद्दल ज्ञानात भर पडून आपल्या बुद्धीवर साचलेले अनेक भ्रम दूर होतात . सप्तपदी , पाणीग्रहण , अग्नीच्या साक्षीने विवाह या सगळ्या रूढी मागे दडलंय काय ते कळते . फक्त वाचायच्या आधी (मनावरचे) सगळे चष्मे काढून ठेवा .नाहीतर मनावर फारच आघात होतील . :)
http://www.bookganga.com/eBooks/Books?BookSearchTags=Bhartiy+Vivahsanst…
- Read more about 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास '
- 11 comments
- Log in or register to post comments
- 24395 views
तर्कशास्त्र आणि विज्ञान - घनिष्ठ संबंध पण एकच क्षेत्र नव्हे
Taxonomy upgrade extras
विज्ञानाच्या पद्धतीत तर्कशास्त्राच्या कसोट्या मूलभूत असल्या, तरी विज्ञान आणि तर्कशास्त्र एकच क्षेत्र नव्हे. (वाटल्यास तर्कशास्त्र आणि शुद्ध गणित हे एकच क्षेत्र असल्याचे मानता येते.) युक्तिवादांची आकृती अथवा सांगाडा (फॉर्म) हे तर्कशास्त्राचे क्षेत्र. त्या सांगाड्यात ज्या संकल्पना वावरणार आहेत, त्यांच्या तथ्यतेबाबत काहीच विचार नसतो. उदाहरणार्थ, शालेय तर्कशास्त्रात "(अ) सॉक्रेटिस मानव आहे, (आ) सर्व मानव मर्त्य आहेत, (इ) तस्मात् सॉक्रेटिस मर्त्य आहे" हा युक्तिवाद शिकवतात. हे जीवशास्त्राबाबत किंवा नश्वर आयुष्यात काय धोरण असावे, त्याबाबत नाही.
- Read more about तर्कशास्त्र आणि विज्ञान - घनिष्ठ संबंध पण एकच क्षेत्र नव्हे
- 42 comments
- Log in or register to post comments
- 17628 views
तर अखेरीस
तर अखेरीस
कोशातला कोणताही शब्द येत नाही कामी
कोणत्याही भाषेतला
कोणताही उजेड आपला नसतो
आपला नसतो कोणताही अंधार
शून्य सावलीचा काळ
न जाणे किती युगे लांबणार
आपणच आपले नसताना
- Read more about तर अखेरीस
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4192 views
[अनुवाद] भारताचे प्रश्न सोडवणे: वानर पद्धत
सदर स्फूट द हिंदू या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला श्री साजन राजगोपाल यांनी लिहिलेले आहे. मूळ लेखन इथे वाचता येईल. सदर लेखनाचे भाषांतर करून केवळ चर्चेकरता ऐसी अक्षरेवर प्रकाशित करण्याची परवानगी लेखकाकडून घेतलेली आहे. आवश्यकता भासल्यास ती ऐसी अक्षरेच्या संचालकांकडे सुपूर्त/सादर करता येईल.
======
- Read more about [अनुवाद] भारताचे प्रश्न सोडवणे: वानर पद्धत
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6334 views
दत्त दत्त
दत्त दत्त
दत्ताचा बैल
बैलाची वशिंडं
वशिंडावरची झूल
झुलीवरचे मोर
मोराची लांडोर
लांडोरीचे पाय
पायातली साखळी
साखळीचे गज
गजामागचा सिनेमा
बघ पुन्हा मुन्ना.
- Read more about दत्त दत्त
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8778 views
की...
आपण दुसर्या जगात जातो आणि म्हणतो
की आधीच्या जागांच्या कोणत्याच खुणा सापडत का नाहीयेत इथे?
वेगळीच आहेत ही स्थळं.
आपण दुसर्या काळात जातो आणि म्हणतो
की आधीची माणसं दिसत कशी नाहीयेत? दुसरेच लोक आहेत इथं.
कसे असतील कोण जाणे?
विसरतो की आधीची माणसं तरी कुठे होती भली?
आधीची स्थळं तरी कुठे होती राहण्याजोगी?
काय होतं अनुकूल त्या काळात त्या जगात
की नव्यातल्या प्रतिकुलाची धास्ती वाटावी?
- Read more about की...
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6293 views
संस्कृत-द्राविडी भाषावाद = लॅटिन-इंग्रजी भाषावाद?
'द इकॉनॉमिस्ट'मधल्या या लेखात (१ मे २०१३) इंग्रजीवरचा लॅटिन प्रभाव, जर्मॅनिक प्रभाव आणि त्यातून उद्भवलेला वर्गभेद ह्याविषयीचं विवेचन आहे. त्यात तुलनेसाठी लेखकानं द्राविडी भाषांवरचा संस्कृत प्रभाव आणि त्यातून उद्भवलेला वर्गसंघर्ष उल्लेखला आहे. ज्यांना भाषा, भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास आणि भाषाकारणामागचं राजकारण यांत रस आहे त्यांच्यासाठी ही तुलना रोचक ठरावी.
- Read more about संस्कृत-द्राविडी भाषावाद = लॅटिन-इंग्रजी भाषावाद?
- 24 comments
- Log in or register to post comments
- 12117 views
जयंती
पुरोगामी ढोँगाची चुंबळ डोक्यावर घेऊन समाज सेवेचा क्याबरे करणार्या आरबाट समाजसेवकाची झलक दोन दिवसापूर्वी रात्री पाहिली. डाँ. आंबेडकर जयंतीत पूर्वी वाड्या वस्त्यावर जेवनावळी असायच्या. आरकेस्ट्रा साताठ वर्षापासून जोर धरु लागला. गायनपार्टीचा माहौल (उच्चारी गायंम पार्टी) हा अजून जुना ! प्रल्हाद शिँदे मयत आहेत हे चारदा सांगूनही जुनी खोडं जयंतीच्या आधी, परलाद शिँदे आनत आस्लाव तर वर्गणी देताव असं म्हणुन मंडळ अध्यक्षाला बुचकळ्यात टाकतात. अध्यक्ष खोटा बोलतो. आनतो म्हणतो. म्हातारं पैरणीतून नोट नोट निरखून देतं. जयंतीच्या आधीच जयंतीचा आनंद घेतं. हा चार घराआडचा प्रसंग नेहमीचाच.
- Read more about जयंती
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7441 views
पत्रिकामेलन, बर्नार्ड सिल्वरमान यांचा प्रयोग आणि प्रा. य. ना. वालावलकरांची दिशाभूल
Taxonomy upgrade extras
आजच्या मटा मध्ये प्रा. य. ना. वालावलकर यांनी पत्रिकामेलना संदर्भात एक स्फुट लिहीले आहे. त्यांनी बर्नार्ड सिल्वरमान नावाच्या एका प्राध्यापकाने केलेल्या प्रयोगाचा हवाला देऊन पत्रिकेच्या मदतीने विवाह स्थैर्य ठरवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. बर्नार्ड सिल्वरमान यांच्या प्रयोगाची माहिती नेट्वर मिळवायचा प्रयत्न केला पण मला प्राथमिक अहवाल मिळाला नाही. जे संदर्भ मिळाले ते दुय्यम दर्जाचे आहेत (म्हणजे प्रयोगाकडे बोट दाखविणारे. त्यातून लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्नार्ड सिल्वरमान यांनी फकत रविराशी त्यांच्या प्रयोगासाठी विचारात घेतल्या. प्रा. य. ना.
- Read more about पत्रिकामेलन, बर्नार्ड सिल्वरमान यांचा प्रयोग आणि प्रा. य. ना. वालावलकरांची दिशाभूल
- 7 comments
- Log in or register to post comments
- 10497 views