खेड्याकडे चला..
Taxonomy upgrade extras
खुप दिवसानी राजेश आपल्या ग़ांवी आला होता,ग़ांव सोडुन त्याने तब्बल पाच वर्ष झाले होते,आता तो शहरात राहुन तो शहरी झाला होता,आता ग़ावात त्याच्या भावाचे घर होते, तो त्याच्याच घरी आला होता.
भाऊ शेती करुन आपले पोट भरत होत.
त्याला दोन मुलं होती.घरी येताच घरची परस्थिती पाहुन खुप दु:खी झाला आणि आपला भाऊ रमेशला म्हणाल,' हे काय घर आजुन जसेच्या तसे,मला वाटले थोडीतर प्रग़ती झाली आसेल तुझी?'
'आता खेड्यात कसली प्रग़ती हुत्यायं,खायला मिळाले तर खुप झाले',रमेश म्हणाला,
'आसलं जग़ंन काही बरे नाही,'राजेश म्हणाला,
'मग़ काय करु म्हणतोस',रमेश वैताग़ुन म्हणाला,
- Read more about खेड्याकडे चला..
- 2 comments
- Log in or register to post comments
- 7877 views
शेटजी
संजय हा शेटजीचा वफादार नोकर होता, त्याने शेटजीजवळ सुमारे दहा वर्ष सेवा देत होता.शेटजीचा त्याच्यावर विश्वास होता पण त्याचा विश्वास शेटजीवर नव्हता. पण तो शेटजीशी व्यवाहारानी वाग़त, शेटजीचा व्यवसाय चांदीचा होता.तेथे संजय हीशोब पाहत आसे,एक एक पैशाचा हीशोब शेटला देत आसे.
काही दिवसानी संजयला आपला ही धंदा आसावा आसे वाटत होते.पण पैशाच्या कमी पणामुळे तो काही करत नव्हता.
एकदा सुट्टीच्या दिवशी संजय आपल्या पत्नी सोबत जेवत होता,
पत्नीने विचारले,' खुप शांत आहात, काही झाले का?'
'हो , मी तसा बरा आहे पण मला वाटतं आपण कीती दिवस शेट जवळ काम करायचे',संजय म्हणाला,
- Read more about शेटजी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4341 views
आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते सांग
मानसशास्त्राविषयी आज सर्वसामान्यांना ऐकून माहित असतं आणि त्याचबरोबर बरेच गैरसमजही असतात. सायकोलॉजीच्या विद्यार्थी आणि प्रोफेशनल्स यांच्या वैतागाचा विषय असणारा एक प्रश्न म्हणजे 'आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते सांग'. मला हा प्रश्न किती वेळा विचारला गेला हेही आता आठवत नाही. या लेखामुळे हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची संख्या थोडी कमी झाली तर बघायचं. ;)
- Read more about आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते सांग
- 21 comments
- Log in or register to post comments
- 53608 views
गूगलं शरणं व्रज |
मूळ रचना आणि तिचे समश्लोकी भाषान्तर अधिक सौकर्याने वाचता यावे म्हणून त्यांची पुनर्रचना करून मांडीत आहे. (मुळाचे संपादन आत शक्य नाही.)
| “कुत्र किं क्रीयते वस्तु कुत्र विक्रीयते च तत् । | कोठे काय मिळे चीज कोठे काय विकावया? |
| किं मूल्यं च भवेन्मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ १ ॥ | काय त्यास असे मूल्य “गूगलं शरणं व्रज” ॥ १ ॥ |
| “अस्वस्थमद्यमेऽपत्यं को गदः किं च भेषजम् । | अपत्याला असे रोग काय त्या देउ औषध। |
| कुत्रास्ति वैद्यो मे ब्रूहि” “गूगलं शरणं व्रज” ॥ २॥ | कोठे वैद्य तया शोधू “गूगलं शरणं व्रज”॥ २॥ |
| “भोजनाय क्व गच्छाम किं खाद्यं तत्र लभ्यते । | भोजनासि कुठे जावे आणि काय तिथे मिळे। |
| किं मूल्यं च कियद्दूरं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ३ ॥ | किती पैसे किती दूर “गूगलं शरणं व्रज” ॥ ३ ॥ |
| “चलचित्रालयं कुत्र तत्र किं चित्रदर्शनम् । | सिनेमाला कुठे जावे काय आज तिथे असे। |
| तत्र दर्शनवेला का” “गूगलं शरणं व्रज” ॥ ४ ॥ | ’शो’च्या वेळा तिथे कैशा “गूगलं शरणं व्रज” ॥ ४ ॥ |
| “कुत्रास्म्यहमिदानीं भोः कियद्दूरं हि मद्गृहम् । | कोणती ही असे जागा माझे गेह कुठे असे। |
| वर्त्मना केन गच्छामि” “गूगलं शरणं व्रज” ॥ ५ ॥ | कोणत्या जाउ मार्गाने “गूगलं शरणं व्रज”॥ ५ ॥ |
| “विश्रान्त्यै कुत्र गच्छाम तत्रासीदाम वा कथम् । | सुट्टीसाठी कुठे जावे आणि खर्च तिथे किती। |
| तत्र पश्याम किं मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ६ ॥ | तिथे काय पाहावे म्या “गूगलं शरणं व्रज” ॥ ६ ॥ |
| “कोऽर्थः पदस्य तत् वाक्ये कथं सम्यक् प्रयुज्यते । | शब्दाचा अर्थ ह्या काय तो कसा ठीक वापरू। |
| समानार्थपदं किं स्यात्” “गूगलं शरणं व्रज” ॥ ७ ॥ | समानार्थी तया काय “गूगलं शरणं व्रज” ॥ ७ ॥ |
| “चित्राणि द्रष्टुमिच्छामि श्रोतुमिच्छामि गायनम् । | चित्रप्रदर्शना कैसा जाऊ तैसाच गायना |
| इच्छामि पठितुं ग्रन्थं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ८ ॥ | कोठल्या पुस्तका वाचू “गूगलं शरणं व्रज” ॥ ८ ॥ |
| “शालायां सहपाठी मे कुत्राद्येति कुतूहलम्” । | शाळेतील सखा माझा आता कोठे बरे असे। |
| “देशकालततायामं गूगलं शरणं व्रज” ॥ ९ ॥ | कोठल्या तो असे देशी “गूगलं शरणं व्रज” ॥ ९ ॥ |
| “चेतुमिच्छसि किं पत्नीं पतिं जामातरं स्नुषाम् । | पाहिजे का तुला भार्या पति वा सून जावई। |
| नवोद्योगं तदा सद्यः गूगलं शरणं व्रज” ॥ १० ॥ | व्यवसाय नवा शोधू “गूगलं शरणं व्रज” ॥ १० ॥ |
| “विमानरेलयानानां गमनागमनेषु किम्। | विमान-रेलगाडीने जावयाचे असे कुठे। |
| विलम्बं सूच्यते मित्रं” “गूगलं शरणं व्रज” ॥ ११ ॥ | लेट आहे किती त्यांना “गूगलं शरणं व्रज” ॥ ११ ॥ |
| “कुत्र वर्षति पर्जन्यः कुत्र शैत्यं कियन्मितम् । | कोठे किती असे वर्षा शीताचे अंशमान वा। |
| कुत्र सूर्यप्रखरता” “गूगलं शरणं व्रज” ॥ १२ ॥ | उष्णता वा किती कोठे “गूगलं शरणं व्रज” ॥ १२ ॥ |
| “नगरे मम का वार्ता मद्देशे वा महीतले । | बातमी काय गावाची देशाची जगताचि वा। |
| क्रीडासु जनसौख्ये च” “गूगलं शरणं व्रज” ॥ १३ ॥ | खेळाची कर्मणूकीची “गूगलं शरणं व्रज” ॥ १३ ॥ |
| “तत्त्वार्थशास्त्रविज्ञानगणिताध्ययने स्पृहा” । | तत्त्वार्थ शास्त्र विज्ञान गणिताची असे रुची। |
| “सर्वज्ञानमहाद्वारं गूगलं शरणं व्रज” ॥ १४ ॥ | कवाडा सर्व ज्ञानाच्या “गूगलं शरणं व्रज” ॥ १४ ॥ |
| “आत्मानन्दं मनःशान्तिं तृप्तिं वाञ्छसि वा यदि । | आत्मानन्द मन:शान्ति तृप्ति वा यदि इच्छसी। |
| गूगलं संपरित्यज्य श्रीहरिं शरणं व्रज” ॥ १५ ॥ | टाकुनी गूगलाला तू "श्रीहरिं शरणं व्रज” ॥ १५ ॥ |
- Read more about गूगलं शरणं व्रज |
- 3 comments
- Log in or register to post comments
- 7191 views
धमाल वासलेकर....
Taxonomy upgrade extras
श्री संदिप वासलेकर हे नाव काही महिन्यांपूर्वी ऐकलं. त्यानंतर अमेरिक अर्थव्यस्थेबद्दलच्या धाग्यात , सौर ऊर्जेच्या उत्पादनातील आशावादाबद्द्ल वाचून ननि ह्यांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर कमी झाल्याचं दिसलं.
.
आताच इ-सकाळवर त्यांच्या नावानं पुढील मजकूर प्रकाशित झालाय.
(दुवा देत नाहीये; कारण लोकसत्ता काय किम्वा इ सकाळ काय ह्यांचे दुवे काही काळातच गंडल्यासारखे होतात. कालांतराने उघडतही नाहित.
त्यापेक्षा आख्खा लेखच पेस्टवतोय.(त्यांच्या नावासकट जशास तसा देत असल्यानं इथे प्रकाशित करायला हरकत नसावी असा माझा अंदाज आहे.))
.
- Read more about धमाल वासलेकर....
- 66 comments
- Log in or register to post comments
- 59993 views
माझी भटकंती
सध्या स्पर्धा परिक्षेचे दिवस आहेत,प्रत्येकजण त्याच्या पाठीमाग़े आसतो,कोणि फाँर्म भरत आसतो तर कोणी परीक्षा फी.
मी ही या स्पर्धेत बरोबरी ने होतो फाँर्म भरायला,तसा आभ्यास ही करत होतो नाहीतर कशाला फाँर्म भरला आसता. कीमान वर्षाला दोन ते तीन परीक्षा देत होतो.अनुभव सर्व काही शिकवतो म्हणतात त्याचा परिपुर्ण अनुभव होता.
परिक्षा फाँर्म भरला की त्या परिक्षेची वाट पाहावी लाग़त नसे तो पर्यत माग़े कधीतरी फाँर्म भरलेला आसल्याने त्या परिक्षेचे पत्र येई ,मग़ आभ्यास कमी जाण्याची घाई जादा होत.
- Read more about माझी भटकंती
- Log in or register to post comments
- 4218 views
सुलभतेने संस्कृत शिकण्यासाठी (संदर्भ श्री. कोल्हटकर यांच्या गूगल-स्तवनावरील सारिका यांची प्रतिक्रिया)
श्री. अरविंद कोल्हटकरांच्या 'गूगल-स्तवना'च्या पोस्टवर सारिका यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचून हे आठवलं.
http://www.learnsanskrit.org/
वाटलंही नव्हतं तेव्हा....
वाटलंही नव्हतं तेव्हा
पाऊस इतकाही मनमोहक असेल
शाळेतल्या बाकांवर बसताना
वह्या भिजल्या जेव्हा
वाटलंही नव्हतं तेव्हा
वारा इतका सुसाटही असेल
उन्हाळ्या मध्ये हातांचा
पंखा झाला जेव्हा
वाटलेही होतं त्यापेक्षा
खूप छान होता पाऊस
तरूण वयात आल्यावर जेव्हा
पहिल्यांदा भिजवुन गेला
कळलंच नाही तेव्हा
काय होउन गेलं
पावसापूर्वीचा वारा
नकळत मन घेउन गेला.....
- Read more about वाटलंही नव्हतं तेव्हा....
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2250 views
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी
-------------------------------------------------------
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
-------------------------------------------------------
- Read more about बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 8163 views
छोटीशी कथा
सख्ये भाऊ बहीण पिंकी व पिट्या दोघे घराजवळील देवळात खेळत आसतात,देईळ फार जुने आसल्याने देवळात आनेक घंटा आसतात.
घंटा उचांवर आसल्याने ते देवळातील खांबावर चढुण ते उडी मारुन वाजवत आसतात,दुपारच्यापारी देवळात कोण नसल्याने नेहमी हे दोघे देवळात खेळायला येत आसत.देवळातुन त्याच्या घराचे पाठीमाग़चे दार दिसत आसे, घंटा वाजवुन दोघे ही दमले,
'आता लपा छपी खेळुया',पिंट्या म्हणाला
'पण तु पहीला डाव घ्यायचा,' पिंकी आनंदाने म्हणाली
- Read more about छोटीशी कथा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6508 views