व्ह्यूफाईंडरमधून कोरीया
थंडी ओसरू लागल्यावर फिरायला घराबाहेर पडणे अधिक सुखावह होऊ लागले. तेंव्हा असेच एकदा संध्याकाळचे आम्ही फिरायला म्हणून बाहेर पडलो. वेगवेगळे रस्ते शोधून काढायची मला भारी हौस असल्याने नेहमीचा मुख्य रस्ता सोडून आम्ही एका आतल्या रस्त्याला लागलो. थोडे पुढे गेल्यावर अचानक आम्हाला एके ठिकाणी काही तंबूवजा स्टॉल्स निवासी संकुलाच्या मधल्या मोकळ्या जागेत घातलेले दिसले.
- Read more about व्ह्यूफाईंडरमधून कोरीया
- 18 comments
- Log in or register to post comments
- 12381 views
आयुष्य
अंधारातल्या अंधारात सतत पळत राहतं आयुष्य
वास्तवाची झोप घेत स्वप्ने गिळत राहतं आयुष्य
सागराच्या लाटांवर हिंदकळत बुडत राहतं आयुष्य
झोंबणार्या गार वार्यात कुडकुडत बसतं आयुष्य
घोंगावणार्या वादळात भरकटत जातं आयुष्य
बांधलेल्या पाळीव प्राण्यासारखं गुरगुरतं आयुष्य
थेंबभर पाण्यासाठी रोज व्याकुळ होतं आयुष्य
भेगाळलेल्या भुईखाली दडून जातं आयुष्य
मुंगी होऊन साखरदाणा टिपत राहतं आयुष्य
कणभर प्रेमासाठी तेच झुरत राहतं आयुष्य
तोतया माझाच बनून फसवित राहतं आयुष्य
माझेच ते तरीही मला वापरीत राहतं आयुष्य
अंधारातल्या अंधारात सतत पळत राहतं आयुष्य
- Read more about आयुष्य
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4436 views
द विच : एक परी (उत्तरार्ध)
- Read more about द विच : एक परी (उत्तरार्ध)
- 22 comments
- Log in or register to post comments
- 12739 views
काही रानफुले
खगोलशास्त्रीयदृष्ट्या २१-२२ मार्चपासून वसंत ऋतूची सुरूवात होते. मी तशी उत्तर गोलार्धाच्या दक्षिणेलाच रहात असल्यामुळे आमच्याकडे वसंत ऋतू अंमळ लवकरच येतो. बातम्यांमधे अॅलर्ज्यांचे उल्लेख वाढायला लागले की समजावं झाडांचा वसंत ऋतू आलेला आहे. इतर हजार गोष्टींच्या अॅलर्ज्या असल्या तरी या फुलांचा त्रास होतो का नाही माहित नव्हतं. एक प्रयोग करून पाहू म्हणत फुलांचे फोटो काढण्यासाठी बाहेर पडले. मधूनच कधीतरी कॅमेर्याने चांगलं काम केलं, त्याचं हे प्रदर्शन:
१. 
- Read more about काही रानफुले
- 19 comments
- Log in or register to post comments
- 15085 views
अल्बर्ट कान्ह
अल्बर्ट कान्ह
जन्म ३ मार्च १८६० - मृत्यू - १४ नोव्हें १९४०
- Read more about अल्बर्ट कान्ह
- 23 comments
- Log in or register to post comments
- 17722 views
मराठी अनुवादकांसाठी
नमस्कार मंडळी,
साहित्याचा अनुवाद, तांत्रिक भाषांतर, यंत्रसिद्ध भाषांतर (मशीन ट्रान्स्लेशन) अशा विविध विषयांत रस असलेल्या व्यावसायिक व हौशी अनुवादकांना एकत्र आणून त्यांच्यात अनुवादविषयक विचारांचे आदानप्रदान घडवून आणावे या उद्देशाने https://groups.google.com/forum/?hl=en&fromgroups#!forum/marathi-anuwad… हा गुगलग्रुप निर्माण करण्यात आला आहे. हा कट्टा आंतरजालावर असल्याने, सदस्यांना फारसा वेळ व श्रम खर्च न करता इतर अनुवादकांपर्यंत पोहोचता येईल व त्यांच्यातील चर्चेला गती प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.
या कट्ट्यावर पुढील स्वरूपाची पत्रे पाठवता येतील-
- Read more about मराठी अनुवादकांसाठी
- 10 comments
- Log in or register to post comments
- 6430 views
पुन्हा जंतर मंतर: : भाग १
'नरेन्द्र ट्रॅक्टरसे कुचला गया; सोनवणे जिंदा जला दिया गया' हे वाचून मला कुठल्यातरी टी.व्ही. मालिकेची माहिती दिसते आहे असं वाटलं होत. पण लागोपाठ दोन तीन दिवस तोच निरोप येत राहिल्यावर मी तो नीट वाचला. त्यातून लक्षात आलं की तो 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' कडून आलेला निरोप आहे आणि दुसरं म्हणजे २५ मार्चला 'जंतर मंतर' वर एक दिवसाच लाक्षणिक उपोषण आहे. अनायासे तो रविवार होता आणि मी दिल्लीत असणार होते; त्यामुळे जायच ठरवलं.
- Read more about पुन्हा जंतर मंतर: : भाग १
- 24 comments
- Log in or register to post comments
- 20821 views
कवी ग्रेस यांचे निधन
ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज पुण्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या कवितेच्या वेगळ्या जातकुळीने मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांचे ललित लिखाणही काव्यात्म म्हणून रसिकप्रिय होते. संध्याकाळच्या कविता (१९६७), राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७) हे त्यांचे काही गाजलेले कवितासंग्रह. चर्चबेल (१९७४), मितवा (१९८७) हे त्यांचे ललितसंग्रह गाजले होते. मराठी माध्यमांनी त्यांच्या मृत्यूची दखल घेऊन आंतरजालावर प्रसिद्ध केलेले काही लेखः
- Read more about कवी ग्रेस यांचे निधन
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7719 views
द विच : एक परी (पूर्वार्ध)
आंतरजालावरती हॅ़किंगच्या नव्या दुनियेची ओळख करून घेत असताना आणि गुमराहच्या हाताखाली नवं नवे धडे गिरवत असताना अगदी योगायोगाने एकदा माझी भेट 'द विच' बरोबर झाली. ही खरेतर गुमराहची मैत्रीण, पण तसे म्हणाले तर आंतरजालावरती तिला शत्रू असे नव्हतेच. एकतर तिचा धाक आणि आपण बरे आपले काम बरे ही वृत्ती. तिचे खूप काही किस्से होते किंवा तिनी लोकांना छळ छळ छळले होते अशातला काही भाग नाही, पण का कोण जाणे एकूणच आंतरजालावरती ज्या मोजक्या लोकांचा दबदबा होता त्यात द विच चे नाव चांगलेच वरती होते. ह्या 'द विच' ची आणि 'बबल गर्ल' ची जोडी फार जमायची. दोघी एकाच शहरातल्या, मँचेस्टर मधल्या.
- Read more about द विच : एक परी (पूर्वार्ध)
- 13 comments
- Log in or register to post comments
- 10161 views
उद्दिष्टपूर्ती
Taxonomy upgrade extras
वृथा प्रयत्न करणे सोडण्याची योग्य वेळ कोणती?
गेली कित्येक वर्षे आपण Ph D साठी म्हणून संशोधन करत आहात. संशोधन अजूनही पूर्ण न झाल्यामुळे तुमचा गाइड तुमच्यावर भरपूर वैतागला आहे. घरचे सर्व शिव्या देत आहेत. तुम्ही स्वत: इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. मौज मजा करू शकत नाही. हे अती झालं म्हणून गाशा गुंडाळण्याचा विचार मनात हजारो वेळा आला असेल. तरीसुद्धा तुम्ही आशा सोडली नाही. इतका वेळ, परिश्रम (व पैसा) यात ओतलात व शेवटच्या क्षणी अशा प्रकारे हार खाणे नामुष्कीचे ठरेल याची तुम्हाला जाणीव आहे. परंतु एके दिवशी Ph D मिळवूनच दाखवीन ही जिद्द तुम्हाला स्वस्थही बसू देत नाही.
- Read more about उद्दिष्टपूर्ती
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6785 views